सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवत आहे.
अनुकूल बाजू.
अनिल गोडबोले,सोलापूर.
सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवत आहे का.. या मताशी मी असहमत आहे कारण,:-
1.आपले मत समाजासमोर मांडण्यासाठी प्रत्यक्ष कुठेही जाण्याची गरज नाही
2. इतर प्रसार माध्यमे जी बातमी देतील तीच आपल्याला मान्य करावी लागत असे पण आता आपण आपले मत, कार्य सर्वांसमोर मोबाईल च्या माध्यमातून मांडू शकतो
3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्तम नमुना हा सोशल मीडियावर व्यक्त होण्यात आहे.
4. प्रत्यक्ष समोर जाऊन सभेत बोलायची भीती वाटत असलेला व्यक्ती आपल्या घरातून समाज समोर येऊ शकतो.
5. भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
6. अनेक आंदोलन किंवा चळवळी तसेच जनमत तयार करायला सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
7. आपत्ती आल्यानंतर, दुःखद घटना घडल्या नंतर, आनंदाच्या घटना घडल्यावर, सण वार साध्य करण्यासाठी सोशल मीडिया उपयोगी पडत आहे.
8. आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी लांब अंतरावर असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करता येतात, व्हिडीओ द्वारे बोलता येत, बघता येत
9. सकारात्मक विचार असतील तर आभासी बैठका घेऊन कार्यालयीन कामकाज करता येऊ शकते.
10. डिजिटल व्यवहार करता येतात, पैसे वस्तू खरेदी व विक्री करता येतात..
11. माहितीचा खजिना उपलब्ध करता येतो, बरच काही... प्रचंड क्रांती करण्याची क्षमता सामाजिक माध्यमात आहे
प्रतिकूल बाजू.
किरण पवार,औरंगाबाद.
सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवतं आहे या मताशी मी सहमत आहे. त्याला ठराविक कारण आहेत ती सांगू इच्छितो;
1) सोशल मिडीयावर मांडलेल्या मतात बऱ्याचदा चर्चा व्हायची सोडून लोकं पर्सनली घेऊन वादाच्या भोवर्यात अडकतात.
२) प्रसारमाध्यमं आज टिआरपीसाठी फार खोट्या बातम्या खपवतात आणि शहानिशा न करता आपण त्याच खऱ्या मानून चुका करतो.
३) आज इतके बातमीदार झालेत की, खरं कोणाचं हे सत्य तपासता येतं नाही; महत्वाचं सत्य तपासणी केली तरी लोकं पहिल्याच समोर आलेल्या गोष्टीचा पुर्वग्रह मनात ठेवून जगतात.
४) तुमचं पर्सनलं आयुष्य काही अंशी जखडल्या जातं नाहक प्रमाणात आपण चौकटीत स्वत:ला नंतर सवयीप्रमाणे बांधून घेतो.
५) आंदोलन/चळवळी घडत असताना राजकीय फायद्यासाठी आंदोलनांना चुकीच्या प्रवाहाची दिशा दिली जाते. जेअनयू प्रकरणाबाबत सर्वजणांनी अनेकदा पाहिलं आहे.
६) आज देशात सरळसरळ "आयटी सेल" तुम्हा आम्हाला जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचं कार्य बजावत आहे.
७) आपल्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्यात प्रमाणाबाहेर हस्तक्षेप आज बऱ्याच सोशल मिडीयाचा झाला आहे त्याचा कधीकधी गैरफायदा घेतल्या जातो. मागे याचं उदाहरण कर्नाटकातल्या एका महिलेने अनुभवलं आहे.
८) सोशल मीडिया जरी माहितीचा खजिना उपलब्ध करून देत असेल तरी खऱ्याची शाश्वती देता येत नाही. उदा. आज नरेंद्र मोदी आणि इतर जे राज्यकर्ते आहेत त्यांचा आंदोलनकाळाचा इतिहास जाणिवपूर्वक सोशल मीडियावरून लपवल्या गेला आहे.
शुभम देशमुख, नांदेड़.
नमस्कार मित्रांनो खरच हा विषय खुप महत्वाचा आहे की सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवत आहे का?. कधी कधी विचार करा वाटते की या सोशल मीडिया मुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो की दूर गेलोत? मला तर आस वाटते की आपण एकमेकांपासून खुप दूर जात आहोत. सोशल मीडियाचा वापर हा आपण दुसरीकडे काय काय नविन होत आहे हे जाणून घेण्यासाठी करतो पण सध्यातरी आपण दुसरीकडे काय काय नविन होत आहे, दुसरे नविन मित्र बनवण्याच्या नादात आपण आपल्या जवळ काय काय सुरु आहे, आपल्या मित्र-संबंध याना आपण दूर करत आहोत.
पहिले आपण बालपणी सगळे मित्र मिळुन अनेक प्रकारचे खेळ खेळत होतो. त्यामुळे एकमेकाना समजुन घेत होतो. पण सध्याचे लहान मुल बाहेर जाऊन खेळ खेळन्यापेक्षा त्याना घरी बसुन ऑनलाइन मोबाइल वर गेम खेळायला आवडत आहे. म्हणून तते एकमेकाला समजुन घेत नाहियेत. त्याना मैत्रीची किमत कळल नाहिये.
पूर्वी गवामधे सर्व मंडळी पारावार बसुन चर्चा करत होते, पण आता ति चर्चा, त्यांच्या गप्पा कुठतरी हारावल्यात आस दिसून येत आहे. आता सर्वजण आपल्या सोशल मीडिया वर व्येस्त आसतात. आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्म वर बाहेर काय काय सुरु आहे यावर बोलत बसतो किंवा वाद विवाद करत बसतो पण आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे याकडे आपल लक्षच नाहिये.
आपल्या देशात खुप सन आहेत पूर्वी आपण सनावाराला आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या घरी जाऊन भेट देत होतो, शुभेच्छा देत होतो पण आता या सोशल मीडियामुळे सर्वांची भेट ही ऑनलाइनच होत आहे.
पहिले सुट्टीच्या दिवशी आपण आपला पुर्ण वेळ हा आपल्या परिवाराला किंवा मित्राना देत होतो पण आता आपला पुर्ण वेळ हा सोशल मीडियावर घालवत आहोत.
खुप काही अजुन गोष्टी आहेत ज्यामुळे मला आस वाटते की सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवत आहे.
माया मुळे,उस्मानाबाद.
सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवत आहेत या मताशी मी सहमत आहे. आजच्या काळात सोशल मीडिया वापरणं किंवा त्याबाबतीत अद्ययावत असणं खूप महत्वाचं आहे. मात्र, त्याचा अतिरेक आज मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. किंबहूना आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी या अतिरेकाला बळी पडला असेल. या धावत्या जीवनशैलीत जेव्हा घरातील पती-पत्नी दोघेही कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात तेव्हा घरी परतल्यावर त्यांचा "घराशी" सुसंवाद होणं खूप गरजेचं असतं. मात्र असं होतं नाही. बहुतेक वेळा पत्नी स्वयंपाकघरात असते त्यावेळी पती फोनवर तर मुलं आपापली अभ्यासात. हे चित्र दिवसेंदिवस विदारक होतांना दिसत आहे. म्हणजेच आपण आपल्या घरात सुसंवाद साधू शकत नाही तर गाव, समाज, राष्ट्र या गोष्टी दुरापास्त ठरतात.
घरात, शेजारी-पाजारी खूप गरजू असतात याचं भान आपल्याला रहात नाही. पेशंटच्या बिछान्यावर बसुनही आपण फोनशीच एकरूप असतो. समोरच्या व्यक्तीला आपली गरज आहे, आपल्याशी बोलायचं आहे, मोकळं व्हायचं आहे याचं भान आपल्याला नसतं. जवळ बसलेल्या माणसापेक्षा कोसो दूर असलेल्या माणसांत आपल्याला जास्त स्वारस्य असतं. जिवंत माणूस उपेक्षित ठेवून नजरेपड्यालच्या विश्वात आपण गुंतून जातो. अशा वेळी संवेदनशील मनाची माणसं एकटी पडतात, घुसमटून जातात. विशेषतः गृहिणी, लहान मुलं, वयात आलेली मुलं, घरातील वयोवृद्ध माणसं. ज्यांना कुठलेही छंद नाहीत ती माणसं तर उध्वस्त होतात! बऱ्याचदा व्यसनाधीनता जडते. सण, समारंभ, उत्सव, शुभेच्छा हे पण, ऑनलाईन च...!
चावडीवरच्या गप्पा, 'येष्टीतल्या' ओळखी, पावसापाण्याच्या गोष्टी, शेजारधर्म, गावकीचे व्यवहार, नाती-गोती सगळं धूसर होतं चाललंय... स्वतः शी बोलायला, छंद, आवडी-निवडी जोपासायला, स्वाथ्याकडे लक्ष द्यायला(शारीरिक आणि मानसिक) फुरसत नाही. वरदान असलेला विज्ञानाचा हा अविष्कार माणसाच्या अतिरेकामुळे माणसालाच मानसातून उठवतोय..! आत्मा हरवलेलं असं शरीराचं यंत्र ही मग एक दिवस कायमचं बंद होईल पुन्हा कधीही न दुरुस्त होण्यासाठी...!शेवटी काय तर,आपणच आपल्या भाव-भावना गोठवून स्वतः लाच पणाला लावलेलं आहे अजून कुणीही नाही...! सारी सृष्टी आपल्यात एकरूप झाली आपण मात्र "मी" च्या विश्वात कायमचे गुरफटून गेलो....!!
सॅम देव्हडे , बुलढाणा .
सोशल मीडिया आपल्याला असामाजिक बनवत आहे. या मताशी मी सहमत आहे, कारण सोशल मीडिया माणसांना एकलकोंडा,एककल्ली बनवत आहे.साधं उदा. घ्याना रस्त्यावरुन चालताना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलशी इतके एकरूप झालेले असतात कि समोर काय होत आहे याच भान त्यांना राहत नाही.सोशल मीडियामुले संवाद , संभाषण व इतर बाबीसाठी माणूस जवल आलेला असला तरी मनाने मात्र दूर जात आहे. जे अजून आपल्या विवेकबुध्दीचा वापर करण्यासाठी सक्षम झालेले नाही एव्हाना विवेकबुध्दी काय असते हे त्यांच्या आकलनापलिकडे आहे अशा लहान मुलांनपर्यंत समाजातील विकृत घटना सोशल मीडियामुले धडाधड पोहचत आहे. विशेष म्हणजे वाईट घटना खुपच जलदगतीने पोहचत आहे ,ज्यांना योग्य काय अन् अयोग्य काय हे सुध्दा समजत नाही अशी लहान मुलें असे एक दोन नव्हेतर तब्बल अख्खी पिढीच असामाजिक बनत आहे. whatsapp university वरून तर मेसेजस् ची सत्यता न पडतालता बिनधास्त फोरवर्ड केल्याजात आहे.अन् यांचाच फायदा घेऊन काही समाजकंटक समाजात जात ,धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करत आहे.यात विशेषतः देशाचा गाडा हाकणारे राजकारणी स्वत:ची पोली भाजण्यासाठी सर्वात पुढे आहे.देशात घडलेले मॅाब लांचिंग च्या घटना असो की अलिकडे आपल्या एका ताईचे खाजगी आयुष्यातील फोटो व्हायरल केल्यामुले तिच्या आई बापानी बदनामी सहन न झाल्यामुले आत्महत्या केली, शेवटी त्या ताईनही हाच मार्ग पत्करला. हे सर्व सोशल मिडियाने पसरवलेल्या अफवामुले व कसल्याही गोष्टीचा विचार न करणार्या मानसिकतेमुले ,शेअर करायला काय लागत बटन दाबल की झालं, पण यामुले काहींचे जीवन उधवस्त होत आहे त्याच काय.. ही असामाजिकता नव्हे त काय व्हय..?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा