बेरोजगारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बेरोजगारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-3/3)


अनिल गोडबोले,सोलापूर

लॉक डाउन, नवीन स्ट्रेन, वाढत जाणारे संसर्गाचे आकडे, लोकांचे होणारे मृत्यू आणि लसीचे राजकारण या गोष्टी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला व्यापार, काम, पैसा करिअर, संधी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा.. या बाबतीत उदासीनता येत आहे.


लोक जगले तर व्यापार होईल असं सरकार म्हणत आहे व्यापारी म्हणतात की "कोरोना येईल जाईल पण जी मंदी येईल त्यात कोणीही राहणार नाहीत"


खर काय आणि खोट काय..! काहीच कळत नाही


यामुळे येत आहे प्रचंड निराशा त्याच्या पाठोपाठ येत आहे उदासीनता..  वाढत जाणारे आत्महत्येचे आकडे..


तरुणांच्या देशात तरुण मानसिक दुर्बल होणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे..


पण सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज आपल्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही. सरकारला किंवा कोणालाही दोष देत बसलात तर नुकसान जास्त होईल..


काळ कठीण आहे खरा... पण संघर्ष करणे आपल्या हातात आहे.. अजिबात निराश न होता.. मानवी मेंदूने विचार करा.. मानवतेच्या भावनेने विचार करा.. 


आपण नक्की जिंकू .. हा आत्मविश्वास बाळगण्याची गरज जास्त आहे..


राजकारणी ,मीडिया, व्यवस्था यांचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत.. न्यायव्यवस्था तोकडी आहे.. 


आपण आपला मार्ग शोधावा, 'मला असच जगायचं आहे..!'हा हट्ट सोडून नवीन कौशल्य, नवीन ज्ञान, नवीन काम शोधावे..


जीवन अमूल्य आहे.. ते जाणून घेऊन आपण आपला बचाव करणं आणि पुढे जाण आपल्या हातात आहे.. 


स्वतःला संसर्ग होऊ देणार नाही.. माझ्यामुळे संसर्ग वाढू देणार नाही.. एवढी काळजी घेऊन आजचा काळ आपण काढला तरी येणाऱ्या काळात आपण नक्कीच पुढील जीवन जगू शकतो...


हारा वही जो लढा नहीं.. एवढंच लक्षात ठेवा आणि निराशेतून बाहेर या... दुसर्यानाही मदत करा.. मानवतेचाच विजय होईल याची खात्री मला आहे.


सौरव दुर्गेकार,अमरावती

गात जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली होती तेव्हा तेव्हा जुन्या गोष्टी लयास जावून नव्या गोष्टी उदयास आल्या. निसर्गाचा नियमच आहे, “फक्त मजबूत असणारच जगेल (survival of thefittest)”. ज्यांनी काळाशी जुळवून घेतल ते टिकणार ज्यांनी बदल स्वीकारला नाही त्यांना निसर्गाने स्वीकारलं नाही. जर डायनासोर सारखे महाकाय प्राण्यांवर जर वाईट दिवस आलेच नसते तर लहान प्राणी आणि आपण तयार होऊन पृथ्वीवर नसतोच दिसलो.


माझ्या घराजवळील उदाहरण सांगतो,"अनंता दादा जो गेली 5 वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता त्याने कोरोना आल्यावर आपल्याला नोकरी मिळणार नाही हे समजताच गुरांच्या पौष्टिक खाद्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला, त्यात यश मिळवून आज त्याने स्वतःच पक्क घर पण बांधलं. जर कोरोना आलाच नसता तर त्याला समजलच नष्ट की रोजगाराचे अन्य मार्ग पण आहेत. त्याने आमच्या गावाची गरज ओळखली की गावात हे हे उपलब्ध नाही हे उपलब्ध करून देवू...”

 

नैराश्य, त्याच्यासाठी ज्याने आलेल्या संकटाला आपला शेवट समजला, पुनर्जन्म, ज्याच्यासाठी ज्याने संकटाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून नवीन संधी निर्माण करून संधीच सोनं केलं त्यांच्यासाठी.


बेरोजगारी नक्कीच वाढली. माझा मामा, ज्याच एक उपहारगृह आहे, पूर्वी त्याच्याकडे कामाला 13 माणसे होती, तेच कोरोणा नंतर 5, माणसांना द्यावा लागणारा पगार कमी झाल्याने कमाई खूप वाढली. जी पाच उरली आहे त्यांना चांगला पगार आहेच पण ज्यांना काम सोडावं लागलं त्यांच्या पोटावर पाय. मामा आणि असेच अनेक उद्योजक, दुकानदार तरी काय करणार, आता जास्त लोकांची गरज नाही म्हणून त्यांना काढावच लागेल. 


जे काही होत ते चांगल्यासाठीच होत, या दृष्टीने बघितलं तर सगळ्यांना अशक्य वाटणारं ऑनलाइन शिक्षण या कोरोनाने आणून दाखवील, या क्षेत्रात जुन्या नोकऱ्या गायब करून नवीन नोकऱ्या आल्या. शाळेचं उदाहरण बघितल तर, घंटा वाजविणाऱ्या मामाच्या जागी आता एसएमएस वर remainder पाठवणे हे एक काम आलं, साफसफाई करणे याच्या जागी फाईल्स आणि व्हिडिओ जंक काढून व्यवस्थित बॅकअप तयार करणे, म्हणजे आताचं सफाईच काम बनलं. असच सगळ्या कामा कडे बघता येईल. 


तरुण नेहमी शोक व्यक्त करायचे की जुने लोक नोकरीवरून. निघणार नाही तर आम्ही नोकरी करणार कोठे? घ्या तुमचं काही काम कोरोना ने करून टाकलं. नवीन जगाला लागणारे नवीन कौशल्य शिका, नाहीतर काही खर नाही ब्वा….


संगीता देशमुख,वसमत

कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.

       वास्तव हे आहे की,मागील काही वर्षांपासून देशात नोकरभरतीच नाही.वाढती लोकसंख्या आणि शासनाची उदासीनता पहाता आजचे शिक्षण हे वांझोटे झाले आहे. त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल,याची शाश्वती आजचे शिक्षण देऊ शकत नाही. समाज माध्यमातून तरुणांना अनेक सल्ले देण्यात येवू लागले की,नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय शोधा. मग तरुणाई काहीतरी व्यवसाय शोधात फिरू लागले. तरुणाई इतकी गोंधळलेली की,कोणता व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर पुरेसे भांडवल नाही, भांडवल जमा केले तर त्याची शाश्वती नाही.सरकार उठसुठ हे विक,ते विक सुरू आहे. त्यातूनही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,ज्यांच्या टिकल्या ते अर्ध्यावर आले. यात कहर म्हणजे, कोरोनाचे जागतिक संकट!  तरुणांची होती नव्हती आशा या कोरोनाने हिरावून घेतली. तरुणांचे स्वप्न पहाता पहाता कोसळलीत. तरुण नैराश्याच्या खाईत इतके कोसळले की,तरुणांच्या आत्महत्या वेगाने वाढल्या. ते मानसिक रुग्ण होण्याचीही प्रमाण प्रचंड वाढले. तरुणांचीच बेरोजगारी हा प्रश्न नाही तर,अनेक कमावते हात याकाळात घरात लॉकडावून झाले. घरातील पोटे लॉकडावून झालीत. देशात अशी अवस्था असताना आजही सरकार लक्ष न देता निवडणुका,राजकारण यालाच प्राधान्य देत आहे. देशातील वाढती बेरोजगारी,जनतेची हतबलता,नैराश्य,हे सगळे जाणीवपूर्वक जनतेपासून लपवून जनतेची दिशाभूल केली जात आहे.

कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद!ऑनलाइन शिक्षण हा फक्त दिखावा ठरला. सामान्य पर्यंत एकही दिवसाचे शिक्षण पोहोचलेच नाही. कारण अजूनही अशा अनेक लोकांकडे स्मार्ट फोन नाहीत आणि काहीजणांकडे आहेत त्यांच्याकडे तेवढा डेटा नाही.अनंत अडचणीतून देश जात आहे. देशात उत्तम शिक्षण(स्वावलंबी बनवेल असे) आणि प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल, याचे नियोजन शासनाने करायला हवे,अन्यथा देशात तरुणांचे नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हा कोरोनापेक्षाही भयानक समस्येला देशाला सामोरे जावे लागेल. कोणत्याही सरकारचे आजची तरुणाई हे प्राधान्य असायला हवे. आज  कोरोनापेक्षाही सवंग राजकारणामुळे देशाची अवस्था आतून पोखरलेली आहे.

कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-2/3)

प्रविण दळवी,नाशिक

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे हे संकट अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. कोविड-१९चा प्रसार रोखणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर झाला आहे त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


मीकवी,मंगळवेढा,सोलापूर

ह्या रोगराईला सामोरे जात असताना कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकांना आपला रोजगार गमवावा लागला.मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहे.खरं तर या स्पर्धेत जागा असतात 250 आणि उमेदवार असतात 4 लाख 50 हजार.उरलेल्या  4 लाख 49 हजार 750 उमेदवारांचं काय होईल...? आता ह्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार कुठून उपलब्ध व्हायचा....


दुसरा मुद्दा :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पण ते खरंच योग्य आणि दिशादर्शक होत का...? हा प्रश्न मुळात मला सतावतो.


कोरोनाच्या काळात ना परीक्षा झाल्या ना कोणता रोजगार भेटला... मग आपलं जीवन जगायचं कस हा प्रश्न वारंवार आजच्या युवकाला पडतो....खरं तर याच प्रभाव उभरत्या भारतातील युवकावर पडत आहे.ना रोजगार उपलब्ध ना रोजगारक्षम मार्गदर्शन वा शिबिर. 


वाढतं नैराश्य :- जर रोजगार नसेल तर प्रत्येकजण तणावाखाली येणार हे साहजिकच आहे.आजचे युवक म्हणजे वय 18 ते 35 च्या आतील सर्व जण नैराश्याने जगत आहेत....एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रभावाने कमी होत असलेल्या नोकऱ्या.नैराश्याची अनेक कारणे येतात परंतु बेरोजगारी हे प्रमुख कारण आजकाल दिसत आहे.यावर उपाय सापडेल अस मला वाटत नाही...२०२७ पर्यंत भारत लोकसंख्या बाबतीत जगात एक नंबर होईल तेव्हा बेरोजगारी अजून कोणत्या थरापर्यंत जाईल हे अंदाजही लावू शकत नाही.


शुभम देशमुख,नांदेड़.

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभुतपुर्व संकट निर्माण झाले आहे. या महामारीमुळे आनेक क्षेत्र माघे पडले आहेत. आनेक बाबींवर याचा गंभीर असा परिणाम दिसून येत आहे, ज्यामध्ये आर्थिक, मानसिक, वैधकीय, सामाजिक आशा आनेक बाबी आहेत. मानवजातीसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.हे संकट रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशानी वेगवेगळी उपाययोजना केली आहे पण बहुतांश देशांनी लॉकडाउनची उपाययोजना केलेली आहे. लॉकडाउन मुळे कोविड-१९ चा प्रसार रोखण्यास मदत तर होत आहे परंतु आर्थिक द्रश्ट्या आनेक देश मागे पडले आहेत. याच लॉकडाउनमुळे जागतिक आर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आनेक उद्योग-धंदे थांबले आहेत काही तर बंद पण पडले आहेत. उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे किंवा जे सुरु आहेत ते खुप कमी प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 


बेरोजगारी वाढल्यामुळे खुप जणांना नैराश्य आले आहे. त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखिल झालेला आहे. त्यामुळे आनखी एक मोठे संकट आपल्या पुढे उभे टाकले आहे. आता सर्वसामान्य माणूस जीव वाचवणार की आपली उपाजिविका वाचवणार काही कळत नाहिये. या संकटा मुळे पुर्ण मानवजाती खचली आहे. आपण सर्वानी मिळुन या संकटाला सामोरे जा लागेल. नियम पाळुनच आपल्याला या कोरोनाला टाळता येईल.



कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-1/3)


शिरीष उमरे,नवी मुंबई.

जानेवारी २०२० ला अंतर्देशिय विमान प्रवासी कोरोना भारतात घेवून आले. तेंव्हापासुन आज १६ महिने झालेत, कोरोना थैमान मांडतोय सगळीकडे... ह्या पाचशे दिवसात सगळी उलथापालथ झाली आहे देशात...


२०१४ च्या मध्यापासुन धार्मिक उन्मादाचा उगम मागिल सात वर्षात त्सुनामीचे रुप धारण करुन थयाथया नाचतोय संविधानाच्या छातीवर... भस्मासुरासारखी गत झाली आहे मतदारराजाची !! वणवा पेटतो तसे सगळीकडे आग पसरत चालली आहे. त्यात चुकीचे राजकिय निर्णय पेट्रोल सारखे काम करत आहेत... हा भडका आता सगळ्यांना भाजत चालला आहे. 


नोटबंदी व जीएसटी ह्यासारखे अवकाळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे माकडाच्या हातात कोलित दिल्यासारखे झाल होतेे. कित्येक करोडो छोटे व्यवसायी, उद्योजक व सेवा पुरवठादार ह्यांची अर्थव्यवस्था कोलमोडुन पडली होती. नविन नोकरभरती तर सोडाच, जुन्या स्टाफची छाटणी सुरु झाली होती.


 ह्यातच एनपीए माफीच्या माध्यमातुन काही ठराविक कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहचवुन बँका मोडकळीस आणल्या गेल्या. सामान्य लोकांना कर्ज मिळणे तर दुरच, त्यांच्या कष्टाच्या बचतीच्या ठेवी धोक्यात आणुन टाकल्या.  लघुउद्योग संपुष्टात येत गेलेत. सरकारी नियंत्रणातल्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय त्यातुन खाजगी क्षेत्राला फायदा पोहचवणे व आरक्षण संपवणे अशी दुहेरी कुटनिती अंमलात येत आहे.

शेतकरी, आदिवासी व मजुर वर्गाला जगणे मुष्कील करणाऱ्या पॉलिसी संसदेत पाशवी व अनैतिक मतदानाने मंजुर करवुन अर्थव्यवस्थेच्या कबरीवर शेवटचा दगड ठेवण्यात आलाय. 

ह्या सगळ्या अराजकतेत कोरोना ही आंतराष्ट्रीय आपदा आली. केंद्र सरकार व राज्य सरकारने ह्याचा योग्य फायदा उचलुन लॉकडाउन च्या शस्त्राचा वापर करुन बेरोजगारीचा पहाड तात्पुरता झाकण्यात यश मिळवले. 


लॉकडाउनच्या काळात झालेल्या मानवी हक्काची ऐशीतैशी व करोडो मजुरवर्गाची पायपीट हृदय पिळवटुन टाकणारी होती. एक वर्ष आख्खी भारतीय जनता घरी बसवुन ठेवली होती. -२३ ही जीडीपी ची निगेटिव ग्रोथ ह्याचेच ध्योतक आहे... 

कोरोनाचा मृत्युदर १% सुध्दा नाही आहे. ह्यापेक्षा दहापटीने जास्त मृत्युदर असणारे रोग भारतात आहेत त्यावर मुलभुत आरोग्य सुविधा कुठलेच सरकार पुरवत नाही. आर्थिक अंदाजपत्रकात आरोग्य व शिक्षणावर असलेली तुटपुंजी व्यवस्था व त्यात सरकारी यंत्रणेचा प्रचंड भ्रष्टाचार ह्यामुळे जागतिक पातळीवर १९६ देशाच्या यादीत १६४ वा नंबर आहे आपल्या देशाचा. हे सगळे दारिद्र्य लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणे सुरु आहे. 


कोरोना वर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार जवळ ना पुरेसा मेडीकल स्टाफ आहे ना हॉस्पीटल बेड...ना आवश्यक औषधी ना वेंटिलेटर्स ... त्यातच महागाई चे जनतेला रोजचे झटके !!


आरोग्य व शिक्षणातील खाजगी क्षेत्रे तर जबरीची वसुली करुन राहिली आहे जनतेकडुन. मिडीयाद्वारे कोरोनाची प्रचंड भिती निर्माण करुन बेरोजगारी ह्या महत्वाच्या मुद्द्या वरील लक्ष वळवण्यात सरकारी यंत्रणेला यश मिळाले आहे. पण ही तात्पुरती थोपवणूक भयंकर रुप धारण करणार ह्यात शंकाच नाही. 


सध्याचे बेरोजगार तरुणवर्गाचे नैराश्य त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त आहे. प्रचंड प्रमाणात लोक डीप्रेशनचे बळी पडत आहेत. ह्यातुन त्यांना सावरणे गरजेचे आहे.  आज मुठभर सधन लोक सोडले तर ९०% भारतिय आर्थिक चणचणीला सामोरे जात आहेत. 


ह्यात वेळेवर योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात  जनक्षोभातुन गृह युध्द व गुन्हेगारीत नियंत्रणाबाहरील वाढ आणि नंतर  हुकुमशाही सारख्या अरिष्टके नाकारता येणार नाहीत. 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व कोरोना संपवण्यासाठी आणि देशाला पुर्वपदावर नेण्यासाठी एकजुट महत्वाची... पुढील ३ वर्षे देशासाठी खुप महत्वाची !!! जागते रहो ....


किरण पवार,औरंगाबाद.

          ध्या कोरोनामुळे एक गोष्ट फार विचित्र झालेली पहायला मिळते आहे, ती म्हणजे नैराश्य येणं. नैराश्य येणं आणि त्याविरोधात मानसिक लढा देणं हे एका मर्यादेपर्यंत आधी बऱ्यापैकी सहज वाटतं होतं. परंतु कोरोनामुळे गोष्टी अशा काही बद्दलच्या की, पुढे दिसू लागणारी प्रत्येक शाश्वत गोष्ट अंधारात दिसू लागली किंबहुना नाहीशीच झाली. थोडक्यात यात करियरचा एखादा महत्वाचा टप्पा असेल, एखाद्या व्यवसायाचा जम बसवणं असेल, काहींच्या ठराविक स्पर्धा परिक्षा असतील, वा इतर विविध गोष्टींचा यात समावेश येतो. काही गोष्टी अशाही घडत आहेत की, अनेकांना दोन वर्षांच शिक्षण थेट ऑनलाईन मिळून नंतर त्यांच कॅम्पस इंटरव्हू, नंतर सिलेक्शन आणि थेट काम भेटलं तर वर्क फ्रॉम होम. कुठेतरी आपण आधीपासूनच अशा अचानक आलेल्या बदलाला सामोरे जाण्यासारखे नव्हतोच, आत्ताही अनेकांची ती मनस्थिती तयारच नाही होतं. नैराश्य यायला कारणीभूत ठरलेल्या ठराविक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, अनेकजण आज सर्वांसोबत, सर्वांमधे असूनही एकटे पडले आहेत. त्यांना त्यांच्या एकटेपणाची चाहूल आहे पण ती उलगडून दाखवता येत नाहीये. आपण माणूस म्हणून अनेकदा दिखाव्यांना अधिक महत्व देतो, ज्याने गोष्टी आपल्याच आंगलट येतात; आणि हे कोरोनाकाळात अनेकांचं झालं आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे तरीदेखील आम्हाला यासारख्या महत्त्वाच्या विषयावर पाठ फिरवायला अधिक आवडतं. कारण इन्स्टाग्राम रिल्स आनंद द्यायला सोबत आहेतचं की! मुळात आपण कोरोनामुळे व्यवस्थापन, नियोजन, आयुष्यात तयारीत रहाव्या लागणाऱ्या करियरसाठी इतर प्लॅन्सची अशी कुठली तसदीच घेतलेली नाही. बेरोजगारी कुणा एकाच्या अमुकतमुक निर्णयाने तयार झाली असं नाहीये, बेरोजगारी वाढीस लागायला अनेक घटक जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न नैराश्यातून बाहेर पडायचा तर ते आपण साध्य करू शकतो फक्त थोडासा खंबीरपणा मनाला जाणवून देण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतो, धन्यवाद!


सौदागर काळे,पंढरपूर.

वळपास दीड वर्ष झाले कोरोना हा आजार आपल्यात आहे.सध्या तो जास्तच वेगाने आपले साम्राज्य तयार करतो आहे. त्याच्या या शक्तीपुढे जगातील अणवस्त्रधारी देश सुद्धा नांगी टाकत आहेत.त्याने सर्वांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.तहान लागली की विहीर खोदण्याचा प्रकार करावा तशाप्रकारे सर्व देशांतील सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याचा चंग बांधला.पण तो किती तकलादू आहे याचा आपण रोज  मीडियाद्वारे तमाशा पाहतो आहे.आता कोरोना वर लस आली.लसीकरण चालू झाले.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचा विचार केला तर केंद्र-राज्य , सत्ताधारी-विरोधक यांच्या भांडणात केव्हाही राज्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय! असे चित्र उभे राहत आहे.


उद्या कोरोना जेव्हा जाईल तेव्हा त्याने किती हानी केली याच्यापेक्षा त्याने आपल्या या व्यवस्थेप्रती आपले कितपत डोळे उघडले,हे अनुभवणे खरं महत्त्वाचे ठरणार आहे. 

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही जगण्या-मरण्याच्या अस्तित्वाची गरज आहे. वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण या गरजा पोट भरल्यानंतर येतात.तरीपण या साऱ्या गरजांची पूर्तता होण्यासाठी या व्यवस्थेत आपण धडपडत असतो. अशावेळी योग्य वयात काम मिळणे खूप गरजेचे आहे.ते मिळत नसल्याने खुपजण नैराश्यात जीवन जगत आहेत.कोरोना येण्यापूर्वी आपल्या देशात बेरोजगारी व त्याच्या मुळे लोक नैराश्यामध्ये जाण्याचे प्रमाण होतेच.हे नाकारून चालणार नाही.फरक एवढाच होता तेव्हापर्यंत ते पद्यावर अंधूकपणे दिसण्याची व्यवस्था सरकारने केली होती ती आता कोरोनाने हातामध्ये सूत्रे  घेताच  पडद्यावर स्पष्टपणे दिसू लागले. कोरोनापूर्वी नवा रोजगार मिळावा म्हणून काम करण्यासाठी तरुण वर्ग प्रतीक्षेत आहे.


आता कोरोना काळात अर्थव्यवस्था बेजार झाल्याने जे रोजगार होते ते सुद्धा जात आहेत.ज्यांचा रोजगार जात आहे, तो वर्ग कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाहणारा आहे.ज्याच्यावर अख्खे कुटुंब अवलंबून आहे. जॉब नसल्यामुळे लग्न न होणाऱ्या तरुणाईपेक्षाही हा वर्ग सर्वात जास्त नैराश्यात असणार यात शंका नाही.या कोरोनाच्या काळात जे असंघटित क्षेत्रात काम करत होते.त्यांचे रोजगार गेले. सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरून घरी चालत जाणारे लोक पाहिले की अजूनही ते विचलित करून जातं. त्यांनी ते अनुभवलं.आजही ते पोटाला चिमटा काढत येणाऱ्या दिवसाला सामोरे जात आहेत.


हे कधीपर्यंत चालेल.माहीत नाही.उद्या कोरोना या जगातून जाईल सुद्धा.पण बेरोजगारीवर राज्यकर्ते लस तयार करतील का! याचे सध्यातरी उत्तर नाहीच. त्यामुळे आपण नैराश्याला सोशल डिस्टिंग प्रमाणे सध्यातरी दूर ठेऊनच जगूया.यातच भले आहे.


72000 पदे रिक्त...तरीही प्रशासन चालते कसे

72000 पदे रिक्त...तरीही प्रशासन चालते कसे

🌱वि४☘️ या व्हाट्सअप ग्रुपवरून
72000 पदे रिक्त...तरीही प्रशासन चालते कसे ?


Source:- INTERNET
-मनोज वडे ,
पंढरपूर

‎ सरकारी योजना असो किंवा सरकारी कामे कधीच लवकर किंवा पारदर्शक होत नसताना दिसत आहे.याचे कारण म्हणजे ही रिक्त पदे .कारण आज बऱ्याच कार्यलयाचा विचार केला तर अस दिसून येतो की त्याना इतका लोड असतो की काही वेळेस ते अधिकारी हजरी लावून तिथच फिरताना दिसतात. हयाच कारण की तिथे 2 ते 3 व्यक्ती लागणार तीथ 1 माणसा वर सोपले तर ते शक्य होणार का ? बघा ना प्रत्यक्ष सद्या गाव पातळीवर विचार केला तर 4 ते 5 गावासाठी एक तलाठी असतो. मी अस पाहिले की एवढा लोड असल्या मुळे काही तलाठी कोठेच जात नाहीत ,निवांत घरी बसून पगारी घेतानाच वास्तव चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे . पण बिचाऱ्या त्याची तरी काय चूक! एक गाव एक तलाठी झालं तर गावातील सर्व प्रकारची व्यवस्था नीट चालेल. उत्पनाचे दाखले नीट जातील ,पारदर्शक व्यावहार होईल. जो पर्यंत गाव पातळीवरील राजकारण असो या सुविधांची विल्हेवाट जो पर्यंत नीट होत नाही तो पर्यंत हे चाललेले असच चालत राहणार .पण एवड्या मोठया संख्येने जागा रिक्त असल्या तरी सरकार मात्र सुन्न असताना दिसत आहे .एक मात्र आहे की आमदाराच्या पगारी असो भत्ते असो, सुविधा असो ,हे विधेयक विरुद्धी पक्ष असो अगर अपक्ष असो हे विधेयक एक मतांनी सहमतही होते आणि त्याचा गाजावाजा झालेला ही दिसत नाही.अशावेळी एकही वृत्तपत्र खरी भूमिका घेत नाही असं दिसतं ह्याच अर्थ की आज फक्त आणि फक्त आपलं कस भागेल ह्याचाच विचार होत असताना दिसतो आहे.पण हे कुठे थांबले पाहिजे कारण आज ह्या लोकांची विचारच तसे झाले आहेत.जो पर्यंत हे ..जे सत्तेवर असलेले म्हणा विरोधी म्हणा ,जोपर्यंत हे सर्व खानदानी निघत नाहीत. तो पर्यंत मला वाटत हा बोजा असाच वाढत वाढत जाणार अस दिसत आहे.....😢😢

Source:- INTERNET
-रामेश्वर क्षीरसागर

जेंव्हा विषयाकडे पाहायला लागतो, त्यावेळेस मुळात मला विषय कुठेतरी चुकीचा वाटायला लागतो. कारण , चालणे या क्रियेला काही विशिष्ट वेग असतो. मग, ती क्रिया वापरण्यासाठी किमान तितका वेग असेल तरच त्या क्रियापदाला न्याय मिळू शकतो. पण प्रशासनाचा काम करण्याचा वेग पाहिल्यानंतर प्रशासन पोटावर पुढे सरकते आहे, किवा फार तर मग रांगते आहे असे म्हणावे लागेल.
असो...मूळ विषयाकडे येताना एक कलाच घडलेला प्रसंग सांगावासा वाटतो. काल सायंकाळी बीड जिल्ह्यात भर दुपारी एका तरुणाचा प्रेमविवाह केल्याने मुलीच्या भावाने खून केला. आता खून झालं ती वेळ होती सायंकाळी ४:३५ च्या आसपास...आणि त्यानंतर पोलिस प्रशासनाने तक्रार नोंदवली ती रात्री १२ च्या आसपास. मग, जर इतक्या मंद वेगाने प्रशासन काम करत असेल तर मग प्रशासनाच्या *चालणे* या क्रियेवर प्रश्नचिन्ह येणे साहजिक आहे. आता पोलिस व्यायवस्थेबाबत च बोलायचे झाले तर, संयुक्त राष्ट्र संघटना म्हणते की, " एक लाख लोकसंख्या मागे किमान 220 पोलिस असावे." आणि भारताचा विचार केल्यास ही संख्या १३७ च आहे. मग असे असेल तर प्रशासनाचा वेग मंदावणे साहजिक आहे.
दुसरा मुद्दा घेऊ यात ग्रामसेवक या पदाचा, किंवा तलाठी . तर , मुद्दा असा आहे की तलाठी किंवा ग्रामसेवक हे असे पद आहे की किमान २-३ गावांना किंवा ग्रामपंचायतींना १ ग्रामसेवक किंवा तलाठी दिलेला असतो. मग, हे महाशय आठवड्यातून २-२ दिवस प्रत्येक गावात जाणार. आणि मग सध्या ग्रामपंचायत स्थपणेमागील विचार आणि आताचे तिचे कार्य पाहता, ग्रामपंचायत चालत नाही, तर ती रांगत आहे .
तिसरा मुद्दा असा की, वन अधिकारी आणि कृषी अधिकारी ही दोन महत्त्वाची प्रशासनातील पदे आहेत. भारतातील कृषीची अवस्था पाहता कार्यकारी प्रशासनाला मुळात असे काही पदे भरण्याची आवश्यकता वाटत नाही, आणि कार्यरत असलेले अधिकारी नेमके काय करतात हा माझा बालपणापासून चां निरागस प्रश्न आहे. बाकी, भारतात मुळात वने कुठे दिसत नाहीत त्यामुळे वन अधिकारी हा प्राणी तसा दुर्मिळ. आणि राहिला प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांचा तर , आमच्याकडील शिक्षक ते काम चोखपणे पार पाडतात की बाबा आम्हाला त्यांची नेमणूक करण्याची गरज कधी भासलीच नाही.
आमच्या न्यायव्यवस्थेचां खटले निकाली लावण्याचा वेग पाहिल्यानंतर आम्ही राग व्यक्त करतो, पण मुळात आमच्याकडे पुरेसे न्यायाधीशच नियुक्त केलेले नाहीत ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेत नाहीत. म्हणजे प्रशासनातील सगळ्याच घटकांची ही अवस्था पाहिल्यानंतर मला हल्लीच आलेल्या 'आपला माणूस ' चित्रपटातील उदाहरण द्यावे वाटते की, पोलिस असलेले बना पाटेकर म्हणतात की बाबा ,*" *पोलिस असलो तरी माझे पोलिस व्यवस्था , न्याय व्यवस्था याविषयी फार काही अनुकूल मत नाही."* मला वाटते की, हा अविश्वास जनतेबरोबर च प्रशासनातील अधिकारी यांना पण वाटतो आहे, ही मोठी खेदाची गोष्ट आहे.
मग आता यावर उपाय शोधताना मला एकच साधा मुद्दा मांडावा वाटतो की बाबा आपले जे काही प्रतिनिधी निवडून देतो, ते आपण लोकसंख्येच्या प्रमुख घटकावर देत असतो. म्हणजे इतक्या - इतक्या लोकसंख्येला एक आमदार, खासदार वगैरे. मग, आपण हीच गोष्ट प्रशासना बाबत का करू शकत नाहीत ? म्हणजे एका तालुक्याला एक तहसीलदार असण्यापेक्षा अमुक -अमुक लोकसंख्येला एक तहसीलदार, पोलिस अधीक्षक वगैरे असा विचार आपण का करू शकत नाहीत ? मला वाटते की, हा मार्ग प्रशासनाचा वेग वाढवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो.
धन्यवाद ..

Source:- INTERNET
-वाल्मीक फड
नाशिक

चालते कशाचे हो चालविले जातेय.मला तर एक प्रश्न पडतो की,जर एवढी पदे रिकामी आहेत तर मग मी म्हणतो मोठ्या कार्यालयां
त बरेच कर्मचारी हे मी तर रिकामे टाईमपास करताना पाहीले आहेत.मी माझ्या शासकीय कामास्तव तहसिल कार्यालयात गेलो असताना मि बघितले तर महिला कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत मोबाईलवर गेम खेळण्यात दंग असलेल्या पाहीलेल्या आहेत.त्यांना विचारायला गेलो की,अमुक कागद पाहिजे तर एकमेकांच्या कडे बोट दाखवून समोरील माणसाला वेड्यात काढून त्याला वेगळा विचार करायला लावायचे काम हे बिनकामी सरकारी कर्मचारी करत असतात.अर्थात सगळेच कर्मचारी असेच असतात असे नाही.एवढं सांगायचं कारण ह्यासाठीच की,बुवा 72000हजार रिक्त जागा असताना कामकाज कसे होते तर मला सांगावेसे वाटते की जे यांना घबाड देतिलना त्यांचेच कामे लवकर होतात वेळेवर होतात.माझे स्वतःचे रेशनकार्ड दोन महीन्यापूर्वी बनवायला टाकलेले आहे आणी मला पंधरा दिवसाची मूदत दिलेली होती परंतु मी महीन्याने गेलो तरी मला माझे रेशनकार्ड मिळाले नाही.आणी सांगितले गेले की,अजुन महीना दोन महीने लागतील.मी मागे फिरल्यावर शेतूतिल कर्मचारी माझ्याकडे पाहून अर्जँट लागत असेल तर लगेच बनऊन देतो.तो मला म्हणाला ५००रु.द्या लगेच तुमचे कार्ड तुमच्या हातात .
समजा असतिल कर्मचारी कमी परंतु जे आहेत त्यांनी तर कामे करायला पाहिजे ना.ते कामे करतात पण पैसे घेऊन करतात मग इतरांचे का नही?पैसे दिल्यावर काम होते नाहीतर बसतात रिकामे टाईमपास करत.
सगळेच कर्मचारी भष्ट नाहीत पण जे चांगले काम करतात त्यांना माझा सलाम.प्रशासन रिक्त पदे असुनही चालते म्हणजे ते चालते ईमानदार कर्मचार्याँच्या जीवावर चालते आहे ते बिचारे सतत काम करुन ही 72000हजाराची तुट भरुन काढत असतात.आणी चालते प्रशासन.

आजची स्पर्धा परीक्षा म्हणजे बेरोजगारांचा कुंभमेळा.

🌱वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून :

आजची स्पर्धा परीक्षा म्हणजे बेरोजगारांचा कुंभमेळा

(या विषयावर रविराज,तेजस महापुरे,अनिल गोडबोले,प्रफुल्ल,खटाव.,मधुकर लेंगरे,वैशाली गोरख सावित्री,बालाजी सानप, दिगंबर मोरे,मयुरी देवकर,करण ,हिंगोली, राहुल अनपट,अमोल
गायकवाड यांनी मांडलेले विचार नक्की वाचा.त्यांचे मत जसेच्या तसे दिलेत स्पेलिंग चुका असू शकतात)

रविराज:
आजकाल विद्यार्थी खूप अभ्यास करून पदवीधर होतात.पण नोकऱ्या नसल्यामुळे थेट स्पर्धा परिक्षेच्या कुंभमेळ्यात उडी मारत आहेत..तशी तिकडे स्पर्धा खूप वाढली आहेच त्यामुळे मिळेल त्या पोस्ट साठी तयारी करताना दिसतात..पण खरच कितीजण प्रामाणिक पणे प्रयत्न करतात हे सर्वाना माहीत आहे.अक्षरश इतके विध्यार्थी आहेत की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात की जणू कुम्भमेळाच भरला आहे अस वाटत आहे..खर कारण तर बेरोज़गारी आहे. नोकऱ्या नसल्यामुळे हा उपाय सगळ्याना बरा वाटत आहे ..पण यात वावगं अस काही नाही..करेल त्याला यश मिळेलच पण ही किती  मोठी स्पर्धा आहे..पुणे शहर तर खास ह्याच स्पर्ध्धेसाठी ओळखलं जातंय..जो तो फक्त पुणे पुणे म्हणून अभ्यासला तिकडे जात आहे ...सगळ्यात जास्त बेरोज़गार mpsc न upsc चा पर्याय निवडतात..त्यामुळं ही परिस्थिती झाली आहे..अस मला वाट्त..
तरीही सर्वाना छान यश मिळेल असा आपण विचार करू शकतो

तेजस महापुरे :
हा  विषय हा फारच महत्त्वाचा वाटतो... सध्याचे युग स्पर्धेचे आहे... मग क्षेत्र कोणतेही असो..त्या पद्धतीने विद्यार्थी तयारी करत नाही... आपल्याला काय आवडत... हे योग्य वेळी न समजल्यामुळे निर्णय चुकतात....Mpsc upsc करणारे अनेक जण आहेत... पण खरं तर त्यातील बहुतांश मंडळी ही अधिकारी पदाला असलेले वलय पाहून या वाटेला आलेले असतात...अपुरी माहिती, अभ्यास करण्याची चुकीची पध्दत यामुळे ते यशस्वी होत नाहीत... खरतर अनिश्चितता हे स्पर्धा परीक्षा चे प्रमुख वैशिष्ट्य आहे... त्यामुळे यासाठी अभ्यास करत असलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की हे काही अंतिम ध्येय नाही... आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी करण्या सारख्या आहेत...

अनिल गोडबोले:
स्पर्धा परीक्षा मुळात असतेच करिअर करण्यासाठी. आणि करिअर करणे म्हणजे पैसे मिळवणे... पैसे मिळवणे व ते ही कमी कष्ट जास्त पॉवर आशा रीतीने .... हे सर्व पाहिजे असेल तर सरकारी नोकरी पाहिजे
आणि सरकारी नोकरी पाहिजे तर परीकशा महत्वाची...
या परिक्षेकडे कोन येणार?... तर अर्थातच युवक आणि त्यातूनही बेरोजगार युवक...
मग त्याला कुंभमेळा म्हणावं का?
कुंभमेळ्यात स्नान केल्यावर पुण्य लागत म्हणतात(खर खोट नंतर बघू) इथे परीक्षा दिल्यावर काय मिळणार?
कुंभमेळ्यातल्या आखड्यासारखे इथे देखील कोचिंग क्लास वाले आहेत का?
जास्त कठोर तपश्चर्या म्हणजे अधिक लवकर मोक्ष... त्या प्रमाणे खूप प्रयत्न करणारा यशस्वी होतो का?

तर या प्रशांची उत्तर "नाही' अशी आहेत.

स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावी अशी वतन स्वसभावीक आहे..
याला सिरियसली घेत नाही ते आपण तरुण मंडळी....
काहीजण नुसते पेपर देतात मार्ग नाही दिशा नाही.. प्रयत्न नाहीत उगाचच पस होतो का कोणी...
आणि म्ग काहीच मिळत म्हणून कुंभमेळा

प्रफुल्ल ,खटाव(सातारा):
खरंतर बरोबर आहे ...बेरोजगारांचा कुंभमेळा म्हणजे स्पर्धा परीक्षा.आज भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात जर बेरोजगारीचा उच्च दर जो लपून आहे तो स्पर्धा परिक्षेमुळे...
एकदा जर शासनाने MPSC आणि UPSC चा पडदा हटवला तर शासनापुढं तसेच देशापुढं *बेरोजगारीचा* फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहील.समजत नाही लोक का स्पर्धा परीक्षा निवडतात?सगळे प्रश्न काय या स्पर्धा परीक्षा देऊन सुटणार आहेत का?माझं तर स्पष्ट मत आहे.अजिबात नाही...ही जनता फक्त लाल दिव्यामाग धावणारी आहे.याना समाजतल्या प्रश्नचं काही पडलेलं नाही...काहीतरी तरी तात्विक उत्तर बनवायचं आणि मुलाखतीमधून यशस्वी व्हायचं.कशासाठी करायचं आहे?हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही.त्यांने 50 टक्के गुण मिळवून upsc त यश मिळवले मला तर 51 टक्के आहेत... अशा अर्धबुद्धी विचारामुळे कुंभमेळा मोठा होत चाललाय.(आपल्याला काय जमत,आपल्या जमेच्या बाजू काय आहेत?हे तर नीट पाहिलं पाहिजे. नाहीतर उगीच मेंढरासारख त्या स्पर्धा परीक्षेची कळपात पळून आयुष्य देशोधडीला लावत खूप जण अजून तयारी करत आहेत.त्यांच्यासाठी शुभेच्छा💐💐

वैशाली गोरख सावित्री:
स्पर्धा परीक्षेच्या क्षेञात आज असख्य तरुण ,तरुणी पडलेल्या आहेत व आपल्या कष्टाची चिकाटीची बाजी लावण्याचा प्रयत्न करत आहेत तीही अत्यंत प्रामाणीकपणे कारण ह्या क्षेञात time passकरायला काय हे एक दिवसाच काम नाही जो पर्यत पास होत नाहीतोपर्यत करत राहण्याशिवाय पर्याय नसतो . ह्या स्पर्धैच्या कुंभमेळ्यात पडल्यावर कितीही इच्छा असली तरी माणूस बाहेर येत नाही .🔴 ह्या क्षेञात फक्त  arts ,com. , sci. एवढ्याच क्षेञातील लोक नसून eng.doc.करणारी पण ह्या क्षेञाकडे वळालेत ह्याला कारण काय आसू शकेल?
कारण त्यांना ही कळून चुकल आहे की त्याच्या क्षेञात चांगल्या नोकरीची खाञी नाही
🔴आज स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थिना एवढ्या मोठ्याप्रमाणात वळवले गेले आहे कारण आज समाज्यात चाललेल्या महत्वाचे प्रश्न संप्रदायकता , महीलांचे गंभीर प्रश्न ,शेतकर्रचे प्रश्न , झुंडशाही बेरोजगारी  अनेक बरेच प्रश्न ह्या गोष्टीविषयी त्यांनी विचार करु नये ,ह्याचा सरकारला जाब विचारु नये
🔴 ह्या क्षेञात जर आपण Rajyaseva ह्या परीक्षेचा विचार केला तर जास्तीत जास्त 300/400 जागा निघतात आणी फाॅर्म भरणार्रची संख्या अरते 2/अडीच लाख जर अडीच लाखातून 300 विद्यार्थिच पास झाले तर एक समाजशील प्राणी म्हणून विचार करावासा वाटतो बाकी विद्यार्थिनी करायच काय?🔴तर येथे main मुद्दा हा आहे की केक नाहीच आहे तूमच्या पूड्यात तरीहीव्यवस्थीत  कापून खावा

🔴कूभमेळ्यात उतरल्यावर मनासारखी अंघोळकरुन बाहेर येताही येत पण स्पर्धा परीक्षाच्या कूभमेळ्यात पडल्यावर आलातर येचालही उरती नाहीतरी डोळे झाकून बूडायची ही तयारी ठेवावी लागेल.

बालाजी सानप:
आज कालच्या तरुण मुलांना विचारलं ना "काय करतो रे सध्या...?" तर समोरून 99.99% एकच उत्तर येत ते म्हणजे "स्पर्धा परीक्षेची तयारी" यावरून आपल्याला समजू शकते की आपला विषय किती  व्यापक आहे.....
साधारण 12 वी झाली की खेड्यापाड्यातील मुले शहराच्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी येतात आणि भरती करत असताना स्पर्धा परीक्षेचे क्लास लावतात, आता काहीजण ध्येय म्हणून तर काहीजण घरचे फोर्स करत आहेत म्हणून क्लास करतात तर काहीजण त्याने लावला म्हणून मी पण लावला असा पण क्लास करतात(हे लोक जास्त प्रमाणात आहेत)...
बऱ्याच ठिकाणी जागा निघाल्यानंतर पाहण्यात येते की जागा असतात 150-200 आणि त्यासाठी फॉर्म येतात 10 हजार, 15 हजार(जास्त येतात पण उदाहरणांसाठी इतके देत आहे).
आणि जागा निघाल्या की त्या जागांच्या नावाखाली लगेच क्लासेस वाले त्यांची पोळी भाजून घेतात....

अस का होत तर काही ठिकाणी घरचे फोर्स करतात, तर  काही ठिकानी त्याने केलं म्हणून तो पण करतो, स्वतःला वाटत म्हणून करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे ही खरी वास्तविकता आहे. हा सर्व प्रकार थांबण्यासाठी अगोदर पालकांना आणि नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे असं मला वाटत,

पालकांना मार्गदर्शन का....?
तर सध्या समाजामध्ये विद्यार्थी दशेमध्ये मुलांना ९५% पालक विचारात नाहीत तूला काय करायचं आहे...? तुला काय बनायचं आहे...? ते फक्त सांगतात तुला हे करायचं आहे मग कस करणार ते कर, किती पैसे लागतील तितके घे पण कर...! ही मानसिकता कोठेतरी बदलायला हवी...!!

मुलांना मार्गदर्शन का....?
तर मुलांनी त्यांच्या अंगातील सुप्त  गुण ओळखून त्यांचं  carrier  ठरवायला हवं आणि त्यांच्या पालकांना  कस समजावून सांगू शकतो ? याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे...!!!

मधुकर लेंगरे: 
हा विषय खरोखरच संवेदनशील आहे. आज प्रत्येक पालकांना आपली मुले क्लास वन अधिकारी झाली पहिजे असे वाटत आहे. पन स्पर्धा परीक्षेची आजची स्थिती व तयारी करुन घेणारी दुकाने यानी स्वप्ने  दाखवून वेगवेगळे आखाडेच जनु निर्माण आहेत. आमच्या आखाड्यात या लवकर स्नान होईल असे जनु आमिष दाखवले जात आहे. पन आंघोळ तर दुरच पाण्याचे दर्शन पन होत नाही या दुकानांच्या मदतीने. जर कोणी दुकानात न जाता पवित्र स्नान केले कि हे दुकानदार या साधुस काही पैसे देवून आपल्या आखाड्यात नेवून जनु प्रवचन सांगायला लावतात कि हे दुकान (आखाडा) किती पवित्र आहे. वरुन हे खोटे बोलून सांगतात कि आम्ही याच दुकानात( शिकलो )होतो या आखाड्यात खुप चांगले प्रवचन होते मग काय ग्रामीण भागातून जाणारे आपले मित्र नेमके याच ठिकाणी जावून फसतात. वरुन साधारणपणे एक लाख फि व रात्रभर रांगेत उभे राहून फसवणूक करुन घेतात.
स्थिती अशी आहे कि वर्षभरात साधारणपणे ३०० जागा राज्यसेवा, सरासरी ६००  जागा PSI, STI, ASST. या प्रकारातील असतात. एवढे विध्यार्थी तर एका आखाड्यात (दुकानात) असतात. एकट्या  सदशिव पेठेत अशे हजाराच्या वर आखाडे आहेत. यावरून या कुंभमेळ्याची किति भयानक परस्थिति आहे. हे पुण्यातील एका पेठेतील आहे अशी गल्लीबोळात किति तरि सधु निर्मिती केंद्रीय आहेत
प्रमुख शहर  :-  पुणे येथील ५०% अर्थव्यवस्था फक्त या कुंभमेळ्याच्या आधारावर चालेते इतर ठिकाणी असनारे आखाडे त्याचे महंत या उद्योगातुन कोट्यधीश झाले पन स्नान करण्यासाठी असलेले अजुन प्रतीक्षा करत आहेत त्यांच्या स्तिथी अशी झाली आहे साबण लावला आणि पाणी संपले धाड सोडून पन देता येत नाही आणि थांबायाचे तर अजुन किति पैसे लागतील याचा हिशोब लावत बसायचे. घरुन आत्ता अजुन किती दिवस पैसे मागनार वर्षभर पैसे सहज मिळतात पन तेथून पुढे परिस्थिती गंभीर बनत जाते. या कुंभमेळ्यात अनेकांचे हातोनात बळी जातात त्यांची नोंद कोणत्याही मदतीविना पुसली जाते. कित्येक आयुष्य उधवस्त होत आहेत या चिंतेतुन............

करण, हिंगोली:
आज काल कुणाला विचारलं काय चालू आहे त्यात maximum उत्तर येतात की स्पर्धा परीक्षा ची तयारी चालू आहे.
यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी time पास म्हणून करतात आणि खूप कमी विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात.
पण आपण जर वास्तविकता बघितली तर या क्षेत्रात खूप कमी जागा निघतात आणि त्या जागे साठी compitation भरपूर असते.
माझं observation असं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी अस विचार करतात की मला शिकून नौकरी करायची पण असं खूप कमी विचार करतात की मला शिकून दुसऱ्याला नौकरी द्यायची आहे आणि मला असं वाटतं की याच कारणामुळे भारतात बेरोजगारी जास्त आहे.
मला पण बरेच जण advise करतात की तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर पण मला ते माझ्यासाठी मूर्खाता वाटली कारण मी विचार केला की या भारतात प्रत्येक जातीला आरक्षण आहे आणि मी open मध्ये मला स्पर्धा करून फायदा नाही बरोबर आहे कारण लोकांना हे आरक्षण आणखी कमी पडत आहे ते आणखी आरक्षण मागत आहेत आणि इथं जे अभ्यासू विद्यार्थी आहेत ते फक्त अभ्यास करत राहणार .खरतर या आरक्षणाची गरज नाही कोणालाच जर दम असेल तर त्याच्यावर लढा. आरक्षण सारखे विषय राजकारण करण्यासाठी फक्त.
या आरक्षणामुळे लोक थोडं relax राहायला लागत आहेत हे चुकीचं आहे.
ज्या वेळेस लोकांना या गोष्टी समजतील तेव्हा भारत खरा स्वतंत्र होईल.

दिगंबर मोरे:
आजकाल जे तो उठतो स्पर्धा परीक्षा classes ला शिव्या द्यायला लागतो.classesvale काही लोकांच्या घरी जात नाहीत क्लास लावा म्हणून सांगायला.स्पर्धा परीक्षा द्यायची की नाही हा निर्णय पुर्णतः स्वतःचा असायला हवा.आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की शेजाऱ्याने एखाद्या गोष्टीत यश मिळवले की आपल्यालाही ती गोस्ट करावी वाटते.मग त्यासाठी लागत असलेली मेहनत,जिद्द,चिकाटी,पात्रता इ गोष्टी विचारात कोण घेतात.मुळात जर खाजगी नौकर्यामध्ये अनिश्चितता वाढली आहे ,विकासाचा दर योग्य त्या प्रमाणात वाढत नसल्यामुळे कमी संधी आणि जास्त पुरवठा होत आहे.लोकांमध्ये बेरोजगारी चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.mpsc ची परीक्षा मराठीत असल्यामुळे इंगर्जी,गणित या विषयात आपण पारंगत नसलो तरी पुस्तके मराठीत असल्यामुळे बरेच विध्यार्थी स्वतःला तीन चार वर्षे आरामात फसवून घेण्यात!स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला तर नौकरी ही एकमेव अपेक्षा केंव्हाच संपून जाईल. असा विध्यार्थी जरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी नाही झाला तरी जीवनात जे क्षेत्र निवडले त्यात नक्कीच यशस्वी होईल आणि भारताचा सुजाण नागरिक म्हणून ही आपली कर्तव्ये निभावेल.

मयुरी देवकर:
खरंच आज याच  विषयावर मंथन करने गरजेचे आहे  कारण आज ज्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ते माहिती नाही , त्यांचे अधिकार , कर्तव्ये माहिती नाहीत पण लाल दिव्याची गाडी घेवुन माझा मुलगा /मुलगी  येयील अशी बऱ्याच पालकांची अपेक्षा वाढत चालली आहे . त्याचप्रमाणे आपण हे करू शकतो ....समाजात मिळणारा मान , सन्मान हे सूद्धा या स्पर्धा परीक्षाकडे वळण्याचे खूप मोटे कारण बनले आहे आणि परिणामी पदवी /पदव्युत्तर शिक्षण झाले की स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी पुणे किंवा मुम्बई ला स्थलान्टर करणे , ही तर आजची fashion बनत चालली आहे ....आणि तेथे जावून 80%मुले -मुली जिवाचे रान करून अगदी सगळे देहभान अर्पुण अभ्यास करतात ..परंतु जागांची कमतरता व विध्यार्थीची वाढती संख्या यामुळे सतत येणारे अपयश यामुळे तरुणांची मानसिकता बदलत चालली आहे व त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वैफ्ल्यग्रस्त तरुणांची संख्या वाढत चालली आहे व परिणामी बेरोजगारी वाढली आहे आणि ती एवडी वाढली आहे की या तरुनायिकडे पहिले की खरंच कुम्भमेळ्याची च आठवण येते .....

राहुल अनपट:
स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी जरी भरपूर झाले असले तरी ज्याचे कष्ट त्याला फळ मिळते.यात काही साधू लोक आहेत(संधी साधू लोक)यात काही शंका नाही पण लोक ओळखणं माज्या भावंडना अजून समजत नाही.

मी सुद्धा स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे .१वेळ सर्व परीक्षा दिलीय पण पास झालो नाही.आजही प्रयत्न चालूच आहे आणि करीत राहीन(प्रामाणिक)🙏

वरील काही प्रतिक्रिया ,मनोगत वाचली आमच्या बद्दल अन स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्रांबद्दल खूप काळजी वाटते त्याबद्दल धन्यवाद ।
*"जेव्हा काही करता येत तेव्हा काहीच करू वाटत नाही"*

अमोल गायकवाड:
     हो आजची स्पर्धा परीक्षा म्हणजे बेरोजगारांसाठी कुंभमेळा आहे परंतु यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील टॅलेंट एकाच क्षेत्रात एकवटतेयं .
    कितीतरी डोक्टर, इंजिनिअर प्रशासनात येतात यात काही गैर नाही पन त्या क्षेत्राचे काय?

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************