धर्म आवश्यक कि रोजगार ?


धर्म आवश्यक कि रोजगार ?

वाल्मीक फड, निफाड नाशिक



 धर्मापेक्षा निच्छितच रोजगार आवश्यक आहे कारण रोजगार नसेल तर आपण आपले पोट कसे भरणार? कारण खाली पेट तो  भजन भी नही होता.जुन्या काळात एक म्हण प्रचलित होती "पोटात भर तर तंगडीत जोर"याचाच अर्थ असा आहे कि,मणूष्य जर उपासी असेल तर जोपर्यत त्याला पोटाला अन्न मिळत नाही तोपर्यंत त्याला जात धर्म ह्या गोष्टीशी काही घेणेदेणे नसते.म्हणून रोजगार हे आवश्यतेचं पहिले मुळ राहील.

याउलट धर्म काही कमी समजू नका. धर्मामुळे लोक एकञ गुण्यागोविंदाने नांदतात.जात असू द्या हो कोणतीही त्याने काही फरक पडत नाही. म्हणून हिंदुस्थानात जे रहातात ते अप्रत्यक्ष हिंदूच आहेत. आता काही लोकांनी स्वधर्म सोडून दिला त्याला कोण काय करणार. संभाजी राजांनी तर स्वधर्मासाठी आपल्या प्राणाची आहुति दिली.
खरं म्हणजे आपल्या देशावर जी वेळोवेळी परकीय आक्रमणे झाली त्याच वेळेस खर्या धर्माचा नाश झाला .त्या लोकांनी आपले हित साधण्यासाठी भारतात जातीजातींत भांडणे लाऊन आपला डाव साधून घेतला. ह्या गोष्टि केल्या आपल्याच गद्दारांनी.धर्माशिवाय देश असु शकत नाही आणी असेल तर त्या देशात स्वबघिनीसी विवाह होत असेल.यावरुन चांगले आचार विचार व सात्विक भाव रहाण्यासाठी धर्माची सुद्धा नितांत गरज आहे.बघा लहान मुले ही जेव्हा धर्माच्या बंधनात राहून लवकर सुसंस्कारी होतील तसे पाच्छात्य संस्कृती बघून नाही होणार.म्हणूनच धर्म सुद्धा तितकाच आवश्यक आहे.

शिरीष उमरे, यवतमाळ




धर्म म्हणजे काय असते हो ? अस्तित्वात असलेल्या सगळ्या धर्माची मुलतत्त्वे बघाल तर शांतीपुर्ण, सामंजस्याने उत्साहवर्धक प्रगतीशील सहजीवन असा काहीसा अर्थ सगळीकडे दिसतो. म्हणजे एक वाहता निर्मळ झरा विचारांचा... पण कुठला धर्म असा राहीला आहे ??

कालबाह्य रुढी परंपरा, अंधश्रध्दा,  अमान्य नियमाद्वारे असमानता, अन्याय, जातपात, जुलुम, जबरदस्ती ह्यामुळे जे धर्नाचे स्तोम माचले आहे त्यात वैज्ञानिक दृष्टीकोणाचे दमन होत आहे.

पुर्वी रोजगाराची समस्या नव्हती. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र होते. मागील पीढीपेक्षा जास्त चांगले करण्याची चढाओढ असायची. द्वेष, मत्सर, हाव ह्यांना थारा नसायचा. आपली संस्कृती आपण च मातीत घातली. हा समतोल बिघडवण्यास आपण च कारणीभुत आहोत.

अर्थहीन शिक्षण, जीवनमुल्यांची ऱ्हास व भौतिक सुखाची हाव ह्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले.
जर मानवता धर्म नीट समजावुन घेतला तर रोजगाराच्या समस्या येणार नाहीत.
सगळे समजुन उमजुन ही हा बदल घडवणार कोण ? शिवाजी जन्मावा शेजारी ही वृत्ती सोडा.. स्वत:पासुन सुरुवात करु या...


अनिल गोडबोले, सोलापूर

रोजगार आवश्यक.
माणूस जगला तर बाकीच्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कितीतरी धर्म प्रसार करणाऱ्यांनी पहिल्यांदा लोकांना रोजगार, साधन दिली मग ती लोक जन्मजात धर्म सोडून तिकडे गेली.
धर्म ही जगण्याची रीत आहे. ती नियमांवर्ती आधारित आहे. पण नवीन गोष्टी चा शिरकाव करण्यासाठी सुधारणा होणे गरजेचे आहे.
आज धर्म हा अफू सारखाच काम करताना दिसत आहे. धर्म गरजेचा तो पर्यंत जो पर्यंत तो माणसाला जगवतो. माणसाला भीतीखाली, नियमांखाली दाबण्यासाठी धर्म असेल तर काही उपयोग नाही.

रोजगार, जीवन, आनंद,  प्रगती या गोष्टी मिळणे हे देखील गरजेचे आहे. आपण ज्या सामाजिक नियमांनी जगतो.. तोच पुढे धर्म होऊन जातो.

किरण पवार,औरंगाबाद


गरजेचा तर रोजगार आहे
पण आवश्यक वाटतो धर्म आहे,

संस्कृतीला जपण मानन योग्यचं
पण हिंसा करत धर्म मिरवणं आहे,

रोजगार किमान मुबलक हवा
राहणीमान तेवढं सुसज्ज हवं आहे,
पण ताळमेळ जमत नाही अन्
मानला आम्ही धर्मच माणुसकीपेक्षा मोठा आहे,

चुकीच्या गोष्टींच तेवढं आजही
सुशोभीकरण सरळ दिसतं आहे,
धर्मांधतेच्या नावाखाली मंदिर-मज्जिद गरजेचं बनवून
आम्ही कापला एका माणसाचाच गळा आहे.

दिपाली वडणेरे - नाशिक


धर्म  की रोजगार ?
तसे महत्वाचे  तर दोन्हीही आहेत कारण धर्म  आपल्याला  कसे जगावे,  वागावे , राहावे हे शिकवतो तर रोजगारा वर आपले जगणे अवलंबून  आहे  त्यामुळे  गरजेचे  दोन्हीही
   रोजगार तर आपल्याला मिळवायचाच आहे कारण तो जिवन जगण्यासाठी  गरजेचा आहे... पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला रोजगाराची आवश्यकता  नितांत आहे पण त्याच बरोबर धर्म त्याचे पालन  गरजेचे असलेले रूढी-परंपरा, रिती-रिवाज यांना सोबत घेऊनच....  हो पण म्हणजे काय सर्वच म्हणजे ज्या अनिष्ट,  ज्यावर आपल्याला काडीचाही विश्वास  नाही  अशा नव्हे,  तर ज्या  खरच गरजेच्या  आहेत ज्यामधून पल्यावर आपल्या मुलाबाळांवर योग्य संस्कार  पडणार आहे असा धर्म  , रिती-रिवाज देखील आपल्याला पाळायचे आहेत.....आपले सण - उत्सव  आपली संस्कृती  आपल्याला जपायची आहे आणि यासाठी  धर्म  महत्वाचा आहे .
      आजचे युवक/युवती  काहीही विचार न करता बोलून मोकळे होतत की माझा देवावर / धर्मावर अजिबात  विश्वास नाही.....पण कुठेतरी आणि थोडाफार का होईना तो मानतोच आणि मानलंही पाहीजे आज जर आपणच नाही मानणार तर मग आपल्या पुढील पिढ्या तरी कशा घडवणार आहोत याचा तरी विचार केलायं का कधी ? आहो नका न मानू तुम्ही  पण ज्या अनिष्ट  प्रथा  आहेत ,  विचार आहेत ते नका  मानू पण
आज आपल्या आपण साजरे करतो ते का करतो ? केव्हापासून ? करतो कशासाठी करतो? हे   करत असण्यामागे  प्रत्येक  सण--उत्सवामागे कारणे आहेत ती  आपल्यातील कित्येकांना माहिती नाहीती ती कधी आपण जाणून घेण्याचा  प्रयत्न  करतो का ?  ती जाणुन  घ्या म्हणजे आपल्या पुढील पिढीने  आपल्याला विचारले तर सांगता आले पाहीजे यासाठी गरजेचा आहे धर्म ...
    
रोजगार तर महत्वाचाच आहे पण त्याचे महत्त्व  हे प्रत्येकालाच  आहे कारण त्याची जाणिव  सर्वांनाच  आहे  जाणिव असणे महत्वाचे  असते ...पण आज धर्म   त्याचे महत्व  याचीही जाणिव  असणे गरजेचे आहे हो पण त्यातुन आपण काय घेतोय हे सुद्धा  तितकेच महत्वाचे  आहे . सकारात्मक  बाजू  घेणे आपल्या  हातात  आहे. चांगले ज्ञान आपल्याला यातुन घेता आले पाहीजे.  आणि सर्वांत  महत्वाचे  म्हणजे माणुसकी हाच सर्वांत  मोठा  धर्म  आहे  आणि आपली संस्कृती,  सर्व ग्रंथ संपदा,  आपला धर्म  आपल्याला हेच सांगतो आणि  सर्वांत  आधी आपण सर्वांनी  मिळून तीच जोपासण्याचा प्रयत्न  करूया... यासाठी प्रयत्न  करायचे  म्हणून  धर्म  महत्वाचा आहे....

     हो पण म्हणून धर्म  घेऊन बसायचं असं नाही तर रोजगार मिळवून  पोटाची खळगी भरेल इतके तरी मिळलवेच पाहीजे  नुसता धर्म  तर आपले पोट भरू शकणार  नाहीये त्यासाठी  कष्ट  तर आपल्याला करावेच लागणार आहे कष्ट  तर आपण इतरांसाठीच करतो पण धर्म - प्रपंप- देवदेव जे काही आपण करतो ते स्वतःसाठी  करत असतो त्यामुळे  तो सुद्धा  रोजगारासारखाच  निटनेटका आणि प्रामाणिक  पण करा   आणि रोजगार सांभाळून धर्म  सांभाळा आपल्या संस्कृतीची जोपासणा करा  कारण  महत्वाचे आणि गरजेचे दोन्हीही आहेत... .

लिहीण्यासाठी  तसे तर या विषयावर खुप काही आहे.... आपल्या बंधु- भगिनींनी  देखील अनेक वेगवेगळ्या  प्रकारे  आणि अतिशय  सुंदर  असे लेखन  केलेले आहेत.

अमृत महोत्सवी आठवड्याच्या निमित्ताने... *माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षा*

*🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप*
📄 *आठवडा 7⃣5⃣वा* 📝
*अमृत महोत्सवी आठवडा*
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
 *14 एप्रिल 2019 ते 20 एप्रिल 2019*
💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐

अमृत महोत्सवी आठवड्याच्या निमित्ताने... *माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षा*


किरण पवार ,औरंगाबाद

वि४ ग्रुप म्हणजे नक्कीच एक आगळावेगळा आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करायला शिकवणारा ग्रुप आहे. आज समुहात असलेले वा नसलेले इतर व्यक्ती असतील ते एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणाने नक्कीच स्वत:त ज्ञानाची आणि विशेषत: जागृकतेची भर पाडत आले. मला नेमका दिवस आठवत नाही मी कधी इथे जॉईन झालो. पण ज्यादिवसापासून इथे आहे त्यादिवसापासून नक्कीच थोडाफार का असेना पण बदललो. मला लेख लिहायची पूर्वीपासून आवड होतीच परंतु काही विषयांबाबत मर्यादित माहिती असायची किंवा ती पूर्णत: नसायचीच. या ग्रुपने वैचारिक तारतम्य तर दिलचं शिवाय अजूनही भरपूर गोष्टी दिल्या त्या म्हणजे माझ्या लेखांमधे दिवसेंदिवस भर पडत गेली. बऱ्याचदा ग्रुपवर अनेक विषय लिहायचे सुटले पण ते सुटलेले विषयही जमा करून लिहण्यासाठी नंतर वेळ काढून लिहले. लेख समोरच्याला उद्देशून सांगायला अथवा पूर्णत: टिकात्मक असा काही वि४ माझ्या मनात नसतो. मी जेव्हा योग्य लेख लिहू शकतो तेव्हा मी स्वत:ची बुद्धी तपासत असतो. ज्या दिवशी स्वत:ला जाणवत नाही की, योग्य लिहलयं तेव्हा पुन्हा माझं वाचण सुरू होतं. असो.
           आता मुळ मुद्यावर येतो. वि4 समुहाकडून माझ्या असलेल्या अपेक्षा म्हणजे, समुहाने घडवलेल्या विविधांगी विचारांची ही पिढी पुढच्या पिढीसाठी काहीतरी अमुल्य ठेवा आणि शिकवण देऊन जाणारी असावी. इथल्या सुजाण नागरिकत्वाच मुल्य कायम जपून रहावं. साहित्यिकाला केवळ लिखाणातलं मर्यादित लिहीणचं नाही तर सामाजिकतेकडेही त्याच भान असावं. कारण साहित्यिक लिखाणातून एक वेगळी चळवळ एखाद्या अन्यायाविरूद्ध स्थापित करू शकतो, याची बरीच उदाहरण इतिहासात आपल्याला पहायला मिळतात. त्याचबरोबर समुहातल्या काही मंडळींनी किमान पंधरा मिनीटे वेळ काढून दिलेल्या विषयांबाबत आलेल्या लेखांवर मत मांडत जावे. आणि शक्यतो जमल्यास लिखाणही करावं. धन्यवाद!
*=============================*

वाल्मीक फड,निफाड ,नाशिक

अनेक दिवसापासून मनात एक प्रबळ इच्छा होती की,काहीतरी लिहावं पण आपण तर पडलो अल्पशिक्षीत आपण काय लिहीणार?ह्याचं मुख्य कारण म्हणजे मी जर एखादे पुस्तक वाचायला घेतले आणी त्यावर लेखकाचे नाव वाचले तर त्यांच्या नावापुढे प्रोफेसर,डाॕक्टर किंवा इतर त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख असायच्या त्यामुळे मनाला एक हळहळ असायची कि आपण काय लिहीणार आहोत यांच्यासारखे.परंतु माझा पुतण्या सचीनकडून मला वि४ समूहाबद्दल माहीती मिळाली.मग काय मला तर आकाश ठेंगणे झाले आणी मी समूहात सामील झालो.
तसं मी सातवीत असताना सात आठ कविता केल्या होत्या त्यातिल दोन मी समूहावर टाकल्या पण होत्या नववीत असताना मी दोन नाटके लिहून ती नाटके शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात स्वता कलाकार होऊन सादर पण केली आणी भरपूर प्रमाणात दादही मिळाली होती.
खरं ह्या समूह तयार करण्याचा विचार ज्या महानुभवाच्या डोक्यात आला त्यांचे मनापासून आभार मानतो.कारण हा समूह मला मिळाला नसता तर कदाचित मी माझे विचार आपणापर्यंत पोहचवू शकलो नसतो आणी तुमचे पण चांगले विचार मला अनुभवायला मिळाले नसते.व्याकरणाची इतकी जाण नसताना आपण मला वाचता आहात यातच मला धन्यता वाटते.
समूहाकडून अपेक्षा इतकीच आपणासारखे उच्चशिक्षण घेतलेले नाही म्हणून तुमचे सुंदर विचार वाचण्यास मिळावे हिच प्रेमळ अपेक्षा.जय हिंद .वंदे मातरम्.
*=============================*

संगीता देशमुख,वसमत

            मला या समूहात येवून जवळपास एक वर्ष होत आले. समूहात कोणीही ओळखीचे नव्हते. अक्षय पतंगे यांनी या समूहात मला घेतले. समूहाचे शीर्षक पाहून समूहाचे वेगळेपण आणि गुणवत्ता कळाली. या समूहात काही अनुभवी लोकांसोबतच अगदी नवीन तरुण पिढी असल्याने आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव यांना आहे. लवकरच माझ्यावर ॲडमिनपदाचीही जबाबदारी टाकण्यात आली. फार धडाडीने मी ही जबाबदारी पार पाडत नसले तरी पूर्णत: निष्क्रियही नसते. आणि हीच अपेक्षा मी या समूहाच्या अमृतामहोत्सवी आठवड्यानिमित्त करते. असं म्हणतात की, "ये दुनिया इसलिए बुरी नही के यहाँ बुरे लोग ज्यादा है।

बल्कि इसलिए बुरी है कि यहाँ अच्छे लोग खामोश है…." याप्रमाणे तरुणांनी आजूबाजूला काय घडत आहे,यावर व्यक्त व्हायलाच हवं. त्याशिवाय त्यांना त्यांच्या कल्पनेतील भारत कसा पहाता येईल? देशाचा भावी आधारस्तंभ म्हणून माझे हेच कर्तव्य आहे. म्हणूनच समूहातील लोकांनी व्यक्त व्हावं म्हणून आपल्याला ते वारंवार प्रोत्साहीत करीत असतात. दररोज विषय बॅंक टाकून आवर्जून आठवण करून देतात. खरच काही जणांची हा समूह अतिशय उत्कृष्टरित्या कसा चालेल याची सर्वतोपरी धडपड चालू असताना मात्र बरेचसे सदस्य हे लेख वाचतात की नाही,हेही कळायला मार्ग नाही. या समूहात २५२ सदस्य आहेत. आणि ज्याअर्थी आपण व्हाटसॅप वापरतो त्याअर्थी मला वाटते,दिलेल्या विषयावर किमान चारपाच ओळी ह्या प्रत्येकाला लिहिता यायलाच हव्यात. कारण माझी ही अपेक्षा फार अवास्तव आहे,असं वाटत नाही. २५२ सदस्य आहेत म्हटल्यावर दर आठवड्याला किमान १००-१५० लेख हे यायलाच हवेत. काही वेळा आपल्याला हे विषय कठीण वाटत असतील तर आपण आपल्या पध्दतीने विषय सुचवायला हवेत. पण इतक्या संवेदनशील समूहात विचारविमर्श व्हायलाच हवा. मला वाटते,विचार करणे हे मानवाचे आणि विशेषतः जिवंतपणाचे लक्षण आहे. आणि आपल्या समूहाचे नावच आहे "वि४"! या अमृतमहोत्सवी "वि ४" समूहात विचार व्हायला हवा आणि तो व्यक्त व्हायला हवा,ही मी अपेक्षा करते.
*=============================*

अनिल गोडबोले,सोलापूर

एक विचार.. कोणालाही न भेटता 75 आठवडे सतत मराठी साठी काम करतो आणि ते देखील मोठे लेखक नसताना... त्यामुळे सर्वात पहिल्यांदा सर्वांना "अमृत महोत्सवी आठवड्यानिमित्ताने शुभेच्छा"

विचार ग्रुप चालत आहे मध्येच जोरात कधी हळू... पण थांबणार निश्चित नाही.. त्यामुळे माझ्या सर्व अडमीन सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.!

सर्व सदस्य जे लिहितात, वाचतात त्या सर्वांचे देखील अभिनंदन.!

अपेक्षा म्हणाल तर फार माफक आहेत.
1. 257 सर्व सदस्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे 3ही विषयावर एकतरी आठवड्यात लिहावे.
771 लेख....!

2. उदासीन लोकांना लिहिण्याची आणि वाचनाची गोडी लागली पाहिजे.

3. या नंतर एक विशेषांक काढावा आणि दिवाळी अंक.. भरपूर साहित्य घेऊन..!

4. एखादं संमेलन व्हावं सर्व विचार लेखक सदस्यांचे.. (त्याला बऱ्याच गोष्टी लागतील याची कल्पना आहे)

5. 100 वा आठवडा अजून काहीतरी वेगळं आणि भव्यदिव्य व्हायला पाहिजे.

6. नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून इतर प्रस्थापित साहित्यिक अभिमानाने उदाहरण देतील.

7. येणाऱ्या युगातील फार मोठी मराठी साहित्य संवर्धनासाठी चळवळ होऊन नवीनच इतिहास घडेल. मराठी अभिजात दर्जा मिळवेलच... आणि जगात सर्व मान्य भाषा होईल यात कोणतीही शंका राहणार नाही..


भरपूर अपेक्षा झाल्या.. त्या पूर्ण होवोत हीच एक मोठी अपेक्षा आणि सदिच्छा व पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद..!!
*=============================*

सौदागर काळे,पंढरपूर

आता वि४ बघता बघता ७५ आठवद्याचा होतो आहे. जवळपास दीड वर्षांचा.या दीड वर्षात २२५ च्या आसपास विषय चर्चेला घेतले.ते आपण वेळ मिळाल्यास ब्लॉगवरही पाहू शकता.वि४ ग्रुप कसा आकाराला आला .हे अगोदर सांगितले आहे.ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज वाटत नाही.आपला ग्रुप सतत बदलत राहिला आहे. प्रवाहासारखा.त्यात तुमच्यासारखे वाचक-लेखक चिऊच्या गोष्टीसारखं चोचीत जेवढं पाणी बसेल तेवढं मराठी साहित्याच्या माठात टाकत आला आहात. पण आपल्या घरातील पाण्याचा माठ नुसता भरून ठेवून त्याचे पिण्यासाठी वापर नाही झाला तर काही दिवसानंतर तो पिण्यायोग्य राहत नाही.ते पाणी शिळं झालं म्हणून आपण बदलतो.त्याप्रमाणे वि४ वर अनेक जण लिहीत आहेत.ते फेसबुक पेज,ब्लॉगवर इतरांना वाचण्यासाठी पोहोचावे म्हणून आपली ऍडमिंन टीम निस्वार्थ हेतूने वेळ काढून योगदान देत असते.या आपल्या ऍडमिंन टीमला वि४ सेवक म्हटले तर वावगे वाटणार नाही.अशा वि४ सारख्या माठात आपण विविधांगी विचारांचे पाणी भरतो.ते पाणी आपण पिण्यासाठी नाही वापरले तर तो माठ भरण्याचा काय उपयोग?अशावेळी ७५ आठवडे झाले!दीड वर्ष झाले!२२५ विषय चर्चेला घेतले!असा पोकळ अभिमान आपण प्रत्येक वेळी मिरवल्यासारखे होईल.म्हणून हा वि४ चा माठ रोज भरावा ,रोज वाचकांनी वाचून रिकामा करावा.
आता माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षाबद्दल:

१.ग्रुपमधील जुन्या लेखकांनी वेळ काढून लिहीत रहावे जेणेकरून आपली लेखणी अजून समृद्ध होईल.अन जे वाचक आहेत,जे लिहिण्यासाठी धडपडत आहेत.तेही आपल्यातील काही गोष्टी शिकून स्वतः समृद्ध होत राहतील.

२.फेसबुक पेज व ब्लॉगवर तुमचे प्रसिद्ध झालेले लिखाण किंवा तुम्हांला आवडलेले लिखाण लिंकद्वारे शेअर केले तर अनेक वाचकांपर्यंत आपले विचार पोहोचू शकतात.

३.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वि४ समूह आपल्या माध्यमातून पोहोचला आहे.तो प्रत्येक तालुक्यात पोहोचत जावा.

४.या ग्रुपला अजून चांगल्याप्रकारे आपण सर्वजण मिळून पुढे कसे नेऊ शकतो.यावर प्रत्येक रविवारी या ग्रुपने ठरवलेल्या नियमातील वेळेनुसार चर्चा करावी.

५.हा ग्रुप कोणत्याच विचारधारेचा पुरस्कार करत नाही.म्हणून ग्रुपमध्ये अजून आपल्या माध्यमातून विविध विचारधारेचा पुरस्कार करणारी माणसे जोडत जायला हवीत.

६.वि४ ग्रुपचा प्रवास एखाद्या कुटुंबासारखा बळकट व्हावा.

७.वि४ चे ४-वि....१.विद्यार्थी २.विनय ३.विवेक ४.विरजा हे घटक प्रत्येकांनी निरंतर आत्मसात करत आपली वैचारिक वाटचाल करत राहावी.

८.तुम्ही सर्वजण या विषयाच्या माध्यमातून अपेक्षा मांडा.म्हणजे आपल्याला अजून ग्रुपला चांगल्याप्रकारे कसे वळण देता येईल.हे समजेल.
ही छोटीशी आशा .धन्यवाद.
*=============================*

निखिल खोडे, पनवेल

       युवकांचे मराठी भाषेत स्वविचार मांडण्यासाठी उपलब्ध असलेले व्यासपीठ म्हणजे वि४ व्हॉट्स अप ग्रुप! नवीन लेखकांचे विचार ब्लॉग, फेसबुक पेज द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविले जातात. गेल्या ७५ आठवड्यापासून सुरळीत चालू असलेला ग्रुप ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला विविधांगी विषय दिले जातात. आठवड्यात दिलेल्या विषयांवर तरुण मंडळी स्वतःचे विचार मांडत असतात.

वि४ ग्रुप कडून असलेल्या अपेक्षा

१) वि४ ग्रुप मधील वाचकांनी ४ ओळी मध्ये का होईना आपले विचार ग्रुप वर मांडावे.

२) ग्रुप मधील लेखांना जास्तीत जास्त वाचक वर्ग मिळवा यासाठी प्रयत्न असायला हवे.

 ३) वि४ ग्रुप ची लवकरच दुसरी शाखा म्हणजे वि४-२ सुरू व्हावा त्यासाठी नवीन लेखक जोडावे.

४) वि४ व्हॉट्स अप ग्रुप अविरत पणे चालू असाच चालु राहावा त्यासाठी शुभेच्छा!!
*==========================-==*

गंगा नदी स्वच्छ झाली का?.. नमामी गंगे



क्षितीज गिरी, सातारा

भाजप सरकारने 2014 च्या निवडणुकीत गंगा साफ करण्याचा वादा केला होता.तसे बरेच वादे केले होते त्या पैकी हा एक.एवढेच नाही तर ती स्वच्छ झाल्याचा दावा पण मागे काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.अजून किती खोटे बोलणार ते काय माहिती.पण कांग्रेस पण काय यशस्वी झाली नाही यामध्ये त्यांनी पण वेळच्या वेळी कडक पावले उचलली असती तर आज ही वेळ आली नसती.आणि मुळात सरकारला तरी का म्हणून पूर्णपणे जबाबदार धरायचे आपण. एक नागरिक म्हणून आपण किती जागृत असतो या विषयावर. कंपणीतील अशुद्ध काही ठिकाणी तर विषारी पाणी निदी मध्ये सोडले जाते तेव्हाच आपण याला विरोध केला पाहिजे.सगळे सांडपाणी आणि कचरा आपणच तर टाकतो किवा सोडतो पाण्यात आणि मग दोष सरकारला देतो.त्यात प्लास्टिक मुळे तर खूपच प्रदूषण होते.
गंगा स्वच्छ करण्यासाठी नमामि गांगे हा उपक्रम भाजप सरकार कडून राबवला गेला पण तो फक्त जाहिरातीवर. ग्राउंड लेवल ला म्हणावे एवढे काम झालेच नाही.
जगामध्ये बाकीच्या प्रगत देशांचा जर विचार केला तर त्याच्याकडील  नद्या साफ असतात.ते तर नद्यांना देव मनात नाहीत.तरी साफ असतात.आपण तर नद्यांना देवी वा श्रद्धेचे स्थान दिले आहे.तरी इतकी गहाण का.काही ठिकाणी तर नदी जवळून जावेसे पण वाटत नाही.एवढा गहाण  वास येतो.कुभ मेळ्यात कसे डुबकी लावतात काय माहिती.

पण थोडक्यात काय भाजपची योजना पूर्णपणे फसली आहे.गंगा अजिबात साफ झाली नाही.त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात  योजना राबवली पाहिजे.त्यामध्ये राजकारण न करता लोकांनी व सरकार प्रतिसरकार ने सर्वांनी मिळून जर प्रयत्ना केले तर आपली गंगा साफ होऊ शकते नाहीतर दर 5 वर्षांनी फक्त हा राजकारणाचा विषय राहील राम मंदिरा सारखा.
_______________________________


वाल्मीक फड, नाशिक.

खरं तर हा प्रश्न आपण स्वतालाच विचारायला पाहीजे की,नदीच्या स्वच्छतेसाठी आपण प्रथम  काय केले आहे.जेव्हा आपण स्वतापासून सुरुवात करु तेव्हाच खर्या अर्थाने नदी किंवा गंगा स्वच्छ होईल असे मला वाटते.
खरं म्हणजे ह्या असल्या कामांना सरकारला दोष देण्यापेक्षा आपणच यावर काहीतरी तोडगा काढला पाहीजे.थोडक्यात म्हणजे आपण गणपती विसर्जन करतो,ताबुत विसर्जन करतो आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांडपाणी,कंपनीचे केमिकलयुक्त पाणी हे पाणी ह्या गोष्टि आपण नदीत सोडायला बंद केल्या तर काय लागंतं नदी  स्वच्छ व्हायला?
नदी आज खर्या अर्थाने खरंच निर्मळ नाहीये जुन्या काळात आम्ही तहान लागली की बुट्टी लाऊन मनमुराद पाणी प्यायचो पण आत्ता नदीजवळ गेलं की पाण्याच्या वास (दुर्गध) येतो.
सरकारने नमामी गंगे नावाचे मिशन हातात घेतले पण त्याचा म्हणावा असा परीणाम झाला नाही.सरकारच्या भरवशावर थांबण्यात मजा नाही. म्हणून आता आपण सावध होऊन गंगेमध्ये सांडपाणी सोडणे,रासायनिक खतांचा अतिवापर,गणपती विसर्जन,ताबुत विसर्जन अशा ज्या नदीला अस्वच्छ करणाऱ्या वस्तु टाळल्या पाहीजे.
________________________________

संगीता देशमुख,वसमत

२०१४ च्या जाहिरनाम्यात नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत' ही संकल्पना मांडताना गंगा नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी तसा अल्पसा प्रयत्न करून,तेथे दीपोत्सव करून एक दिवसाच्या स्वच्छ गंगेचे फोटो जास्त टाकून लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. वास्तवात मात्र गंगा नदी स्वच्छ झालीच नाही.  आज पृथ्वीवरील पाण्याचे फारमोठे प्रदूषण झाले आहे. त्यात लोकांच्या अंधश्रद्धा,धार्मिक भावना,मोठमोठाले उद्योगधंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यातल्या त्यात धार्मिक ठिकाणी तर हे पहावतच नाही. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की,ते प्रदूषण होऊ नये म्हणून लोकांचे प्रबोधन होऊन मनपरिवर्तन व्हायला हवे. गंगा नदी ही आपल्या देशाची मुख्य नदी. तिने माता म्हणून अनेकांचे जीवन समृद्ध केले परंतु माता म्हणून श्रध्दा-अंधश्रद्धेपोटी तिची हेळसांडही खूप झाली. रुढीपरंपरांचे पालन करता करता ती घाणीची जननी झाली. अशी ही नदी नुसती स्वच्छ करून थांबता येणार नाहीतर तिथे येणारे भक्त,उद्योगधंदे यांच्याकडून होणारे प्रदूषणाचे स्त्रोत थांबवावे लागतील. आणि यासाठी काही वर्षे निश्चितच लागणार आहेत. त्यासाठी लोकांचे मनपरिवर्तन होणे आवश्यक आहे. त्याशिवाय केलेले काम मग क्षणिक आणि  फक्त फोटोसेशनपुरतेच मर्यादित रहाते.  असं भावनिक होणं नेत्यांनीही टाळायला हवं.
_________________________________
टीप- (सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहे)

लोकपाल आणि सामान्य माणूस


शिरीष उमरे, यवतमाळ

लोकपाल च्या नियुक्तीनंतर व अमंलबजीवणीनंतर सिंगापुर सारखा टीकली एवढा देश जगातल्या विकसीत देशाच्या यादीत मानाचे स्थान मिळवले व आजगायत टीकवुन आहे. त्यापासुन प्रेरणा घेउन भारतात लोकपालसाठी बरेच वर्षापासुन आंदोलने सुरु आहेत.

लोकपाल साठी झालेल्या उग्र व मोठ्या जनआंदोलनाने मागील लोकसभेच्या निवडणुका गाजल्या. नेहमीप्रमाणे जेवढे लोकपाल निष्क्रीय करता तेवढे करुन तसे विधेयक मागील सरकारने पास केले पण भ्रष्टाचाराच्या प्रचंड अनागोंदी कारभारामुळे लोकांनी त्यांना नाकारले.

न्यायलयाने बरेचदा फटकारुनही नविन सरकारने लोकपाल नियुक्ती जेवढी लांबवता येइल तेवढी लांबवुन सिध्द केले की त्यांची ही इच्छाशक्ती नाही आहे. शेवटी निवडणुकीच्या आधीची लितापोती म्हणुन समिती सदस्य नावे दीलीत पण अंमलबजावणी शुन्य !!

आता लोकांच्या पण आशा मावळल्यात. मागील काही राज्यातील निवडणुकांमधे  नोटा ला मिळालेले मतसंख्या बघता लोक कंटाळले आहेत राजकीय पक्षांना... भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेरोजगारी, महागाई वाढतच चालली आहे. शिक्षण व आरोग्य व्यवस्था ढासळतच चालली आहे.
लोक तिसरा पर्याय म्हणुन चांगला उमेदवार निवडुन देतील तर काही बदल होण्याची शक्यता आहे. नाही तर आहेच ये रे माझ्या मागल्या !!
_______________________________

किरण पवार, औरंगाबाद,

          लोकपाल आणि सामान्य माणूस यांच नात काय? किंवा लोकपालमुळे सामान्य माणसाच्या आयुष्याय खरचं कितपतं फरक पडेल? अशी बरीचशी प्रश्न आज समोर ऊभी आहेत. पण एक मात्र खरं आहे की, लोकपालची आज भ्रष्टाचारलेल्या जगात न्याय मिळवण्यासाठी गरज आहे. मागे आपल्याच ग्रुपवर विषय झाला होता की, लोकपाल हे एक मृगजळ आहे का? माझं मत होतं नक्कीच नाही. कारण लोकपालसाठी जे आंदोलन झाली ती तेवढ्याच पोटतिडकीने झाली आणि या कायद्यात सविस्तर गोष्टी मांडणारी सर्व मंडळी नक्कीच उच्चशिक्षीत होती, मग त्यात केजरीवालांचा समावेश असो वा प्रशांत भूषण यांचा. लोकपालचा मुद्दा अगदी इतका गाजला होता की, लहान मुलही "मै भी अण्णा" अशा टोप्या घालून फिरायचे. भलेही त्यांना नेमकं काय? हे माहित नव्हतं पण एक आशा होती, काहीतरी बदलणारं आहे आणि चांगल घडणार आहे.
             मुळात लोकपालमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चोप लागणार ही गोष्टच फार उल्लेखनीय होती. पण एक मुद्दा लोकपालचा महत्वाचा होता तो म्हणजे, एखाद्या खटल्याचा निर्णय दिलेल्या कालावधीतच लवकरात लवकर लावणे, असं झाल नाही किंवा कामात कुचराई दिसल्यास तो लोकपालचाही अधिकारी निलंबित केल्या जाणार. आजतागात मुळात सरकारी कामकाज इतकं संथ गतिनं चालत की, कुठलीच गोष्ट सर्वसामान्यांना न्यायाच्या बाबतीत योग्यवेळी मिळत नाही. पण लोकपालमुळे हे शक्य होणार; हे मात्र नक्की आहे. लोकपालची बारकाइतली बाजू लक्षात घेतल्यास समजेल की, जो वेळ आज कोर्ट निकाल द्यायला दहा पंधरा वर्ष सहज घालवून टाकतो तो वेळ तेवढा लागणारं नाही. लोकपाल खूप वैचारिक, अनुभवी व सामंजस्यातून निर्माण केलं गेलं आहे. त्यामुळे लोकपाल नक्कीच सर्वसामांन्यांच संरक्षण करण्यास सक्षम आहे, असं मला प्रांजळपणे वाटतं.
धन्यवाद!
_______________________________


वाल्मीक फड निफाड नाशिक.

लोकपाल लोकपाल असं पाच वर्षापूर्वी मला ऐकायला मिळालं.खरं पाहीलं तर ह्या लोकपालबद्दल सामान्य माणसाला आजीबात माहीती नव्हती पण ज्यावेळी आण्णांनी लोकपालबद्दल आंदोलन केले त्याचवेळी लोकांना कळाले की,लोकपाल नावाची काहीतरी संकल्पना कायद्यात ऊपलब्ध आहे.आण्णा करताहेत म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे असे समजून लोकांनी आण्णांना भरभरून प्रतिसाद दिला.पण लोकपालबद्दल कोणालाही काही माहीत नव्हते.
काय झालं आण्णांनी लोकपाल साठी एवढा संघर्ष केला पण ह्या गोष्टीचा फायदा घेऊन अनेक राजकारणातील आंबट शौकीनांनी फायदा घेऊन राजकारणात सक्रीय होऊन आज ते मोठे पद सांभाळत आहे.
इतकी माहीती मला लोकपालबद्दल नाही पण लोकपाल चालू जर केले तर भ्रष्टाचाराला आळा बसतोय व भ्रष्ट आधिकारी घाबरतात असं ऐकलंय म्हणून लोकपाल चालू व्हावं असं मला मनापासून वाटतय.सामान्य माणसाच्या न्याय व हक्कासाठी लवकरात लवकर लोकपाल जनतेला मिळावा ही प्रामाणिक इच्छा.जय हिंद .वंदे मातरम्.
________________________________
टीप- (संबधित छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

जातीच्या राजकारणाचे परिणाम

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
📄 *आठवडा 7⃣4⃣वा* 📝
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖


जातीच्या राजकारणाचे परिणाम

शिरीष उमरे यवतमाळ

ही जात आली कुठुन हे माहीत नाही पण दोन हजार वर्षीपुर्वी व्यक्तीला त्याच्या व्यवसाय व गावावरुन ओळखल्या जायचे. त्याचा काही धुर्त लोकांनी गैरफायदा घेत मानवीय उतरंड तयार केली व मानवी हक्क हीरावुन घ्यायला सुरुवात केली. एकदुसऱ्यात गैरसमज निर्माण करुन राग व द्वेषाची बीजे पेरली. सत्तेसाठी कुठल्याही थरावर जाणारी ही लोके म्हणजे आजकालच्या भ्रष्टाचारी गुन्हेगार राजकारण्यांची पुर्वजे....

 जातीच्या अयोग्य व्यक्तीला मत देणे म्हणजे स्वत:ला समाजात असुरक्षित वाटणे होय !!  सरकार कींवा राजकीय पक्ष नागरिकांमधे  ही असुरक्षितता वाढवुन स्वत:च्या स्वार्थाच्या भाकऱ्या  द्वेषाच्या व रागाच्या आगीत शेकुन घेत आहेत.

 एक नागरिक म्हणुन कवडीची कीमंत नाही आहे व्यक्तीला. पैसा व बाहुबल ह्याच्या जोरावर बहुसंख्यंकाना जातपात धर्मामधे गुंतवुन भांडणे लावुन ही गिधाडे मजा घेतात ह्या खेळाची...

एक इतर धर्मिय वा दुसऱ्या जातीचा चांगला उमेदवार निवडुन दिला तर विकास होइल की एक गुन्हेगार, भ्रष्ट स्वजातीचा व्यक्ती विकास घडवेल ??

 एकदुसऱ्यावरचा विश्वास का व कोणामुळे उडाला हे जाणुन घेणे गरजेचे आहे. एक देश म्हणुन विकास करायचा असेल ल संविधानानुसार स्वच्छ राज्यकारभार चालावा असे वाटत असेल तर चांगला स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षीत चारीत्रवान युवक राजकारणात निवडुन द्या. जात पाहुन चुकीच्या व्यक्तीला मत दिल्यास स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घ्याल.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवुन दिले. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकशाहीत आपल्या सगळ्यांची आहे. विचार करुन मत द्या.
*=============================*

वाल्मीक फड निफाड,नाशिक.

जातीय राजकारणाचे अनेक तोटे आपण भोगत आलो आहोत.त्यामुळे आपण नेमके जो लायक उमेदवार असेल त्याला टाळून जात पाहून मतदान करत असतो.प्रसंगी त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची राजकारणाबद्दल काहीही माहीत नसते,परंतु एक जातवाला म्हणून आपण त्याला मतदान करत असतो.
मला वाटतं आपण हे जर कायम करत राहिलो तर लवकरच आपला देश माघारी जायला वेळ लागणार नाही.जात म्हणून आपण एखाद्या मुर्ख माणूस किंवा एखादा गुंड माणूस निवडून दिला तर त्याचा परिणाम निच्छितच आपल्यावर म्हणजे पर्यायाने आपल्या देशातील व राज्यातील राजकारणावर होऊ शकतो.अनेक प्रकारच्या विकास कामे तसेच योग्य निर्णय न घेतल्यामुळे आपलेच नुकसान जास्त होणार आहे.
म्हणून जवळजवळ सर्वच मतदार बंधु आणी बघीनींना माझे विनम्र आवाहन आहे कि कोणत्याही प्रकारच्या जातीय प्रलोभन कींवा आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता आपल्या उमेदवाराचे अपराधीक रेकाॕर्ड तपासून त्याचे शिक्षण त्याची समाजाशी असलेली वागणूक आणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे चरीञ.
काय आहे की एखाद्या पोपटासारखा बोलणारा असला की आपण त्याला भुलतो आणी मतदान करुन मोकळे होतो पण आपलीच अधोगती आपण करुन घेतो.म्हणून आता भुलथापा मारणारा,चरीञहीन असलेला,अशिक्षित असलेला,जाती धर्माच्या नावाने मतदान मागणारा एकही उमेदवार निवडून येता कामा नये.देशाच्या संंविधानाला न माननारा देशाविरुद्ध बोलणारा तसेच सत्तेवर येण्यासाठी देशाला तुच्छ समजून आमूक एका जातीला प्राधान्य देऊन इतर जातिंची धर्माची पायमल्ली करणारा उमेदवार नसावा.
शेवट एकच विणवणी एक योग्य उमेदवार निवडावा नाहीतर सरळ NOTA दाबून आपलं मत व्यक्त करावं.
*=============================*

गणेश नारायणराव फाळके,कामशेत. पुणे.

कसंय मंडळी..
राजकारणातच काय..कुठंही जातीभेद नसावा..सर्वसमावेशक राजकारण असावं या हेतूनं राजकारणात विविध जाती जमातीतल्या शिकल्या सवरलेल्या मंडळींना प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या..पण याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतोय असं चित्र सध्या तरी दिसतय.
ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात सरपंच,उपसरपंच,सदस्य,
झेडपी सदस्य, सभापती, उपसभापती अशा अनेक जागांवर उमेदवार उभा करताना
जात बघीतली जाते..
बघूद्यात.. पण ही सगळीच मंडळी हुशार,राजकारणात तरबेज असतात असं नसतय..
फक्त जात बघून उमेदवार उभा असतोय.. त्या पदाचं ज्ञान कमी असतय.. मग अशावेळी आजूबाजूला मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी मंडळी आपापला फायदा करुन घेतात.. विधायक कामं बाजूला राहतात..लबाडी,भ्रष्टाचार आणि जातीचे राजकारण केलं जातं.. सामान्य माणसाला फुकटचा मनस्ताप होतो..

राजकीय क्षेत्रात जातीवाद नसावा असं म्हणनं नाही..कारण सर्व क्षेत्रात संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय..कुणी कुठल्याही जातीत वा धर्मात जन्माला येवो..त्याला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याची मुभा आहे..तशी ती राजकीय क्षेत्रातही आहेच..पण किमान तो माणूस लायक असावा.. त्याला सामाजिक व राजकीय जाण व भान असावं..म्हणजे झालं.
*=============================*

जगताप रामकिशन शारदा,बीड

जातीच्या राजकारणाचे दुष्परिणाम असतात ते फक्त परिणाम नसतात. मग ते विविधांगी असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक ही. प्रत्येकाने आप आपली जात जपली पाहिजे कारण त्याला सांस्कृतिक, सामाजिक विविधतेची किनार असते पण सध्याच्या परिस्थितीत जात ही दुधारी तलवारी सारखी वापरली जात आहे. माणूस नावाची जात तर कधीच हद्दपार झाली असून विविध प्रकारच्या आणि सोयीस्कर जाती जन्माला आलेल्या आहेत. सर्वधर्मसमभाव समजावून घेतानाही इतर जातींना कस प्राधान्य किंवा स्वजातीला कस दुर्लक्षित केले जाते पटवून सांगताना जी उदाहरण दिली जातात तिथून खर जातीच गलिच्छ राजकारण चालू होते. पुढे चालून गेल्यावर लक्षात येते की जातीच्या नावाने रंग विभागून घेतलेले आहेत आणि जातीच्या नावावरून फळांची पण विभागणी माणसान केली आहे. आपला सुधारणेचा अजेंडा का सपशेल अपयशी ठरला किंवा आपण समाजासाठी का योगदान देऊ शकलो नाही याची प्रांजळ कबुली देण्यापेक्षा आपण काही विशिष्ट जातीत असल्यामुळे डावलले गेलो हा मुद्दा प्रखर आणि ठळकपणे मांडला जातो. विविध मतदार संघातील उमेदवार जाहीर करतानाही जातीय समिकरणे जुळतात का? याचा आढावा घेतला जातो. आणि मतदारही जात नावाच्या अफुच्या नशेत उमेदवार किती पात्रतेचा आहे हे न पाहता त्याला डोळेझाकून मत देतात. कितीही पुरोगामी विचारांचा दाखला दिला तरीही सुरवात करायला नेहमीच इतरांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा तळागाळापर्यंत रूजलेली आहे. निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जात धर्माच्या नावावर मत मागितली जाऊ नये यासाठी प्रयत्नशील असतानादेखील सत्ता काळात किंवा विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीत कसा कोणाकोणावर अन्याय झाला किंवा कसा फक्त विशिष्ट वर्गाला फायदा झाला याचे उदाहरण देऊन देऊन जनतेच्या मनावर जात बिंबवली जाते. जाती निर्मूलन साठी प्रयत्न केले जात नाहीत अशातला भाग नाही पण ते कितपत यशस्वी होताहेत हे परिक्षण कोणीही करत नाही. अलिकडील गोष्ट आहे भिमा कोरेगाव चा जो हिंसाचार झाला त्यावेळी सोशलमेडियावर एका लहान मुलाचा हातात दगड घेतलेला व्हिडिओ व्हारल झाला ज्याला अजून लेखणी कशी धरावी याच ज्ञान नसाव पण तो इतर जातींच्या लोकांबद्दल ज्या तिरस्कार भावनेने बोलत होता ती तिरस्काराची भावना नक्कीच विचार करायला लावून शर्मेने मान खाली घालायला लावणारी होती. जात कधीपर्यंत टिकेल माहिती नाही पण जो पर्यंत राजकारण राहील तोपर्यंत जात नावाचा बागुलबुवा समाजामध्ये राहणार कारण जात हे असे बटण आहे की ते दाबले कि लोकांना दोन वेळच्या जेवणाचाही विसर पडतो आणि ते जातीच्या भल्यासाठी समोर येतात, समाजाच्या नाही. महापुरुषांच्या नावाखाली पण जातीचा जोगवा फिरवून मत मागायला ही राजकारणी कमी करत नाहीत. लाजीरवाणी बाब ही आहे की सोशलमेडियावर फिरणारे भडकावू मेसेज वाचून तरुणपिढी आपल मत बनवत आहे आणि राजकीय नेते पण समाजासाठी महापुरुषांच्या असणाऱ्या विचारात सोयीस्कर तफावत असंदर्भीय माहिती देऊन आपली पोळी भाजत आहेत. कितीही विद्रोह झाला तरीही जात नावाची किड पुन्हा रूजवण्याच आणि तिला खतपाणी घालण्याच काम राजकारणी करतच आहेत. मग जिथे विठ्ठलाच्या वारीचा झेंडा घेणारा हातात फक्त दांडा घेऊन फोडत राहतो इतरांचे माथे आणि आख्ख्य कुटुंब जे त्याच्या उपजिविकेवर चालते ते टाहो फोडत असते. घरातील सदस्य आपल लेकरू अस करणारच नाही अस ठामपणे सांगत राहत पण त्यांना काय माहिती की ते लेकरु कोणत्यातरी साहेबांच्या आदेशानुसार काम करणार सांगकाम्या बनल असून घरात वाट पाहणाऱ्या लोकांपेक्षाही त्याला साहेब आपला वाटू लागला आहे कारण तो अमक्या जातीचा आहे.
*============================*

मुकुंद शिंदे

जोपर्यंत निळ्या विरुद्ध भगवा न भगव्या विरुद्ध हिरवा याच्या पलीकडे आपण जाणार नाहीत तोपर्यंत तिरंगा आपल्याला कळणार च नाही,आणि यानेच फावताय राजकारण.
राजकारण हा शब्द नवा नाही पण आज काल "राज" करायचं कारण च समजून घेतलं नाही आणि यात येत ते जातीचे राजकारण आरक्षण,थोर पुरुषांचे पुतळे,त्यांच्या जयंत्या आणखी खूप कारण हे यांना जातीचे राजकारण करायला पुरेसे पडतात.कोणता मुद्धा तापला असला की तो किती तापवायचा हे राजकारणी ठरवतात आणि आणि आपण फक्त हातात वेगवेगळे झेंडे घेऊन भिडतोय एकमेकाला.एका टोकाला एखाद्या जातीच्या माणसाला काय झालं की दुसऱ्या टोकापर्यंत ती आग पसरत जाते यात होरपळतात ती सामान्य जन आनि यावर पोळी भाजतात ते राजकारणी.जेव्हा मुंबई बॉम्बस्फोट झाले तेव्हा भारतामध्ये एकूण वातावरण खूप बिघडलं होत,पुण्यात त्यावेळी सवाई गंधर्व कार्यक्रम घ्यायचा का नाही त्याचा विचार चालला होता आणि पहिली जुगलबंदी होती झाकीर हुसेन यांची पण,कार्यक्रमात जेव्हा झाकीर हुसेन म्हणाले की मी जो तबला वाजवतो तो माँ सरस्वती की देणं हे तितच जात संपली.आपण जर एकमेकांच्या जातींचा आदर केला तर राजकारणाचा प्रश्न च उरणार नाही.
जातीचा अभिमान असावा पण अहंकार नसावा तरच भारत खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव होईल नुसता कागदावरचा समभाव मनामना मध्ये रुजला पाहिजे.
*=============================*

आकाश थिटे, उपळाई  (खुर्द ).

           आपला भारत देश हा लोकशाही असलेला देश आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले सरकार होय .  आपल्या देशात लोकसभा व राज्यसभा यांमार्फत राजकीय पक्ष, राजकीय नेते संघराज्य पद्धतीने शासन चालवले जात आहे.
राजकारण हे देशाच्या विकासासाठी, देशातील जनतेसाठी, व्हायला पाहिज, परंतु आजच्या राजकारणाचे स्वरूप खूपच बदलून गेले आहे. आजचे राजकारण हे जातीयता, धर्म, भ्रष्टाचार, अशा मुद्यावर चालते. याचे जे काही परिणाम होतात ते पुढीलप्रमाणे आहेत;
   ज्या वेळेस जातीचे राजकारण होते तेव्हा होणारे परिणाम हे देशाच्या विकासासाठी मारक ठरतात. यामुळे देशाची प्रगती खुंटली जाते.देशाची प्रगती खुंटणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकांची प्रगती थांबणे असे आहे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
जातीच्या राजकारणाने जाती-जातीत तेढ निर्माण होऊन नंतर त्याचे रूपांतर दंगल,हल्ले, यात होऊन मोठी हानी होते. यामध्ये जास्तीत जास्त होणारा त्रास हा सर्व सामान्य जनतेलाच सोसावा लागतो. याविरुद्ध जनतेने आवाज उठवला पाहिजे व लोकशाही च्या माध्यमातून अशा  राजकारणारण्यांना धडा शिकवला पाहिजे.
  राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्रही नसतो व शत्रूही नसतो. याचा वापर करूनही जातीचे राजकारण केले जाते. राजकारणी लोक आपल्या विरोधीपक्ष यांवर टीका टिप्पणी करून आपली बाजू योग्य आहे हे जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टींचा उपयोग करून त्यांना कसेबसे सत्ता मिळवाची असते. त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता फसते.
    अशा जातीच्या राजकारणात  मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या युवाशक्ती चा र्हास होतो. ही शक्ती देशाच्या विकासासाठीच्या कार्यात वापरता येते.
        समाजात होणाऱ्या अशा जातीचे राजकारण, तसेच जातीविषयक काही गोष्टी जेव्हा लहान बालकांच्या कानी पडतात तेव्हा त्यांच्या मनात जातीबद्दल विचार येतात आणि जेव्हा हीच बालके मोठी होऊन देशाचे नागरिक होतात तेव्हा यांच्या कडून जातीच्या राजकारणाला हातभार लागला जातो. तर यावरून असे वाटते की आज असे जातीचे राजकारण करणारे राजकारणी लोक आपल्या देशाच्या पुढच्या काही पिढ्यानपिढ्या या जातीयतीच्या संघर्षा खाईत ढकलून देण्याचे काम करत आहेत.

आणि या सर्व गोष्टींत आपल्याला व कोणालाही काहीच साध्य होत नाही परंतु प्रत्येकाचा बहुमोलाचा, परत न येणारा, विकतही न मिळणारा वेळ मात्र नक्की वाया जातो.
   समाजातील लोक शिकले, सुशिक्षित झाले तरीही "जात" या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.सर्वांनी याचा विचार करायला हवा.
सर्व जाती नष्ट करून "मानव- माणूस "हीच एक जात मानली पाहिजे.
*=============================*
*Image source INTERNET*

मराठी साहित्याच्या प्रसारातील इंटरनेट चे योगदान


आव्हाड ज्ञानेश्वर, दापूर सिन्नर.

प्रसारमाध्यमाची जी जी साधने उपलब्ध अाहेत ती सर्व माध्यमे भाषेचा प्रसार करण्यास हातभार लावत असतात.अगदी माणवाची उक्रांती झाल्यापासून भाषा प्रसारासाठी मोठे प्रयत्न झाले.
मासिके,पुस्तके,वर्तमानपञे,रेडीओ,टि व्ही यातून भाषेचा प्रसार झाला.परंतू यात अाधुनिक इंटरनेट सारख्या साधनाने भाषा संस्कृतीची देवाण घेवाण वेगाने होऊ लागली.लिखित साहित्य वेगाने सेवा पुरवू लागले.अावश्यक लेख,पुस्तके,कविता,नाटक,चिञपट एका क्लीकवर पाहता येउ लागली.सुविचार,विनोद,प्रार्थना,उपदेश यांची देवाणघेवाण यामुळे वाढली.इंटरनेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना क्षणात उपलब्ध होत अाहे.यामुळे इतर भाषांप्रमाणे मराठी भाषा समृद्ध होत अाहे.खेळ,प्रसिद्ध ठिकाणे,महत्वाच्या व्यक्ती यांची माहिती घरबसल्या मिळत अाहे.अायुर्वेदीक औषधे,वनस्पती,प्राणी,पक्षी,शहरी व ग्रामिण जीवन शैली यांचा अभ्यास करण्यास मदत झाली.
इंटरनेटचा वापर अशा विधायक कामासाठी होत असल्याने त्याला मराठी भाषेत अांतरजाल म्हणणे वावगे ठरणार नाही!!!
==============================

पवन खरात,अंबाजोगाई

आज आपण पाहतो आहेत की मराठी साहित्यापेक्षा वाचकांना इंग्रजी साहित्या वाचायला आवडते. काही जण म्हणत असतील मी तर मराठीच साहित्य वाचतो.
आजही अनेक प्रकाशन संस्थेच्या माहितीनुसार ते नवीन मराठी साहित्य छापताना शंभर वेळा विचार करतील पण एखादे इंग्रजी साहित्य मराठीत भाषांतर असेल तर ते डोळे झाकून छापायला तयार होतात. याचे कारण आपण काय समजायचे , मराठी साहित्य दर्जेदार नाही की मराठी साहित्यात काही रस उरला नाही.
     मराठी साहित्य हे आज पुन्हा नव्याने भरारी घेत आहे. यासाठी खूप मोलाचे योगदान आहे ते इंटरनेटचे, कारण आजचा तरुण वर्ग कागदी पुस्तकापेक्षा pdf स्वरूपातील पुस्तके वाचायला जास्त प्राधान्य देतात.
मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार हा इंटरनेट मुळे खूप  कमी वेळात ते वाचकांना वाचण्यास उपलब्ध होत आहेत.
   इंटरनेट चे योगदान जर आपण पाहिले तर खालील उदाहरणे पाहता येतील.
1. विचार व्हाट्सअप ग्रुप
        आज आपण विचार ग्रुप मध्ये आहेत, सर्व नवीन व जुनी लेखक या ठिकाणी जे विषय दिलेले आहेत त्यावर व्यक्त होतात. या ठिकाणी लिखाण करताना तुम्ही तुमच्या भाषेत पण वाचणाऱ्या व्यक्तीला समजेल अशा भाषेत लिहू शकता .प्रत्येक लेखकाने लिहलेले लेख आपण याठिकाणी वाचतो त्यावर प्रतिक्रिया सुद्धा देतो.
त्यामुळे आपल्याला सुद्धा लिखाण करण्यास प्रेरणा मिळते. आणि आपण सुद्धा दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतो.

2. प्रतिलिपी
       प्रतिलिपी हे मराठी वाचकांसाठी खूप छान अस माध्यम आहे, यामध्ये लाखो लेखक दररोज आपले लेख लिहितात व लाखो वाचक ते आनंदाने आणि कमी वेळेत वाचतात. विविध कथा, कविता, शायरी इ. वाचायला मिळेल.

3. मराठी माती वेब साईट
      या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला छान कविता असतील विविध घटकावर लेख असतील ते वाचायला मिळतील.

4.मराठी कविता वेबसाईट आणि अँप
        मराठी कविता ही वेबसाईट तशी मला खूप आवडते, कारण या वेबसाईटवर कधीकाळी मी सुद्धा कविता लिहायचो. या वेबसाईटवर तुम्हाला प्रेम, विरह, प्रेरणा, व्यंग इ. प्रकारच्या अतिशय सुंदर आणि अर्थपुर्ण कविता वाचायला मिळतील.

       ही फक्त उदाहरणे आहेत, यासारख्या अनेक वेबसाईट आणि अँप आहेत , जे मराठी साहित्यात मोलाचे योगदान देत आहेत.
      मराठी साहित्य नेहमीच श्रेष्ठ राहिले आहे, त्यासाठी इंटरनेट चे योगदान खरच मोलाचे आहे,
      त्याचेच योगदान म्हणून आपण आज आपण उत्कृष्ट लेखकांचे विविध लिखाण आपण सहज पणे वाचू शकतो आणि ते आपल्याला उपलब्ध झाले.उदा. पु.ल.देशपांडे, प्र. के.अत्रे, वि.स.खांडेकर,भालचंद्र नेमाडे, वपु काळे.इ.
=============================

वाल्मीक फड निफाड नाशिक

योगदान सांगायचे झाले तर फार मोठे योगदान हे इंटरनेटचे आहे.आजकाल कोणतेही पुस्तक असो इंटरनेट वर पुस्तकाचे नाव टाकले की,पुस्तक आपल्याला वाचण्यासाठी ऊपलब्ध होते.तसेच जे काही आपले धार्मिक ग्रंथ काही पौराणिक पुस्तके आपल्याला इंटरनेट वर सहज ऊपलब्ध होतात.आज इंटरनेट म्हणजे एका देवदुताप्रमाणे काम करतोय.मागिल काळात टिव्ही रेडीओ तसेच मोबाईल ह्या गोष्टिंमुळे बराच वाचक वर्ग वाचनापासून दुरावला गेला होता.पण जेव्हापासून अँडराँइड मोबाईल आणी त्यामध्ये इंटरनेटची सुविधा त्यामुळे बरेच वाचक आता इतर गोष्टि सोडून ऊदा.गेम खेळणे,सिनेमा पहाणे अशा अनेक पर्याय सोडून देऊन फक्त मराठी पुस्तके वाचत असतात.
इंटरनेटमुळे माझ्या मराठी भाषेची ओळख जगाला पटलेली आहे.माझ्या भाषेतील असलेले अलंकार ,व्याकरण,आणी एका शब्दात अनेक अर्थ असलेली माझी मराठी भाषा फक्त आणी फक्त इंटरनेटमुळे इतर देशांतही पोहचलेली आहे.
इंटरनेटमुळे माझ्या मराठी भाषेला इतका बहुमान मिळाला की,माऊलींची ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी आज माझ्या महाराष्ट्रातील अनेक शिक्षक युरोपियन देशात जाऊन तेथील लोकांना मराठी भाषा शिकविण्याचे काम करत आहेत.
बघा आज जर इंटरनेट ऊपलब्ध नसते तर माझ्या मराठी भाषेचा बोलबाला सातासमुद्रापार गेला नसता.आत्तापर्यंत आपण फक्त महाराष्ट्रातच म्हणायचो "इये मराठीयेची नगरी"पण आता इंटरनेटमुळे पूर्ण जग म्हणेल असे मला वाटते.
=============================

अनिल गोडबोले,सोलापूर

इंटरनेट आलं आणि दुनिया बदलून गेली... आणि हे खरंच वाटायला लागलं आहे. मराठी भाषा आणि साहित्य या बाबतीत देखील बरेच बदल झाले. पारंपरिक पद्धतीने लिखाण आणि वाचन करणारे यांना हा सर्वात मोठा धक्का असला तरी त्याने बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी केल्या.

आता आपला विचार ग्रुप हे एक आश्चर्यच आहे. यातील खर तर कोणी कोणाला भेटलेल नाही पण सर्वजण एकमेकांना ओळखतात, लिखाण करतात, कौतुक करतात, ब्लॉगवर प्रसिद्ध करतात, मत मांडतात, भांडतात, चुका झाल्या की कान धरतात, आणि हे सर्व नुसत्या बोटांच्या टोकावर.....

त्या मुळे मराठी ने फार कात टाकली अस झालं नाही... दुर्दैवाने.! ते होणं गरजेचं आहे.. आपल्या ब्लॉग आणि ग्रुप सारखे अनेक ग्रुप आहेत काही वेबसाईट आहेत..
आज दर्जेदार लिखाण नाही वाचक नाही.. अस म्हणणाऱ्यांना मात्र चपराक बसलेली आहे.. पण त्या बरोबर वाङ्मय चौर्य देखील वाढत आहे.. दुसऱ्याचे लेख स्वतःचे म्हणून  ढापुन प्रसिद्ध केले जातात..

नाण्याला दोन बाजू आहेत त्या प्रमाणे तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. इ- साहित्य, किंवा मराठीमाती, अक्षरनामा, विकास पीडिया सारखे ब्लॉग आणि वेब साईट फार उत्तम दर्जाचे साहित्य आणि माहिती पुरवतात..

मला वाटत की या इंटरनेट च्या माध्यमातून पुस्तके वाचणे आणि लिहिणे या बद्दल प्रेम वाढण्यासाठी प्रयत्न केले तर साहित्यिक असणं... ही मक्तेदारी राहणार नाही.

लिहा, व्यक्त व्हा, वाचा भांडा.. पुन्हा एकत्र व्हा.. हे फक्त काय.. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्हायला पाहिजे का?... अजिबात नाही..

मराठी च्या अभिवर्धनासाठी, अभिजात दर्जा साठी इंटरनेट चे योगदान चांगले आहे पण ते अजून वाढले पाहिजे.
============================

दिपाली वडणेरे , नाशिक

      मराठी साहित्याच्या प्रसारामध्ये इंटरनेटचे योगदान हे अतिशय महत्वपूर्ण  ठरत आहे असे म्हणायला हरकत नाही . आज इंटनेटच्या माध्यमातून  का होईना पण आपल्यासारख्या तरूण पिढीमध्ये मराठी साहीत्य  वाचण्याची  आवड  निर्माण  झालीये..... आज इंग्रजीचे सावट सगळीकडे पसरलेले असतांना ,  इंग्रजी साहीत्य,  रचना ,इत्यादीकांचे... आकर्षण  असताना देखील आपण इंटनेटच्या  माध्यमातून  मराठी साहीत्य वाचण्याला अधिक प्राधान्य  देतोय....तुम्ही  कोणतीही भाषा अभ्यासा ,  वाचा ,  लिहा, पण जो उत्साह मराठी साहीत्य  वाचण्या - बोलण्यात,   ऐकण्यात ,  लिहीण्यात योतो ना तो इतर कोणत्याच भाषेत येत नाही .. मराठी भाषा जिकडे  वळवली तिकडे वळते समजण्यासाठी  देखील अत्यंत सोपी महाराष्ट्रामध्ये 6  प्रशासकीय  विभाग आहेत सर्वच  विभागांतील  भाषा मराठीच परंतु प्रत्येकाची आपली बोलीभाषा ही वेगवेगळीच पण ऐकायला ,  बोलायला आणि महत्वाचे म्हणजे  ती समजून घ्यायचा  प्रयत्न  जर केला ना तर खरचं एक वेगळाच  आनंद आणि उत्साह असतो .... पण  शेवटी काहीही असो मराठी महाराष्ट्राची  मायबोली आहे ती....
हो मध्यंतरीच्या  काळात थोडेफार कुठेतरी  वाटत  होते की इंग्रजी चे सावट पसरल्याने  मराठी भाषा कुठेतरी मागे पडतेय ....पण असे काहीच नाही उलट आज इंटनेटच्या  माध्यमातून  तरूण  पिढीचा  अनेक मराठी साहीत्य असो वृत्तपत्रे  असो वा अजून काही  सविस्तर  माहीती असो सर्व  हे PDF स्वरूपात  वाचण्याकडे जास्त  कल आहे ... एखादे साहीत्य  वाचायचेय पण मिळत नाहीये....एखादे काम अडलेय पण कसे करावे ?  कुठुन सुरूवात करावी हे कळत नाहीये मग काय इंटरनेट वर एका क्लिक  वर आपल्याला  हे सर्व  अगदी सहज उपलब्ध  होऊ लागलेय त्यामुळे  मराठीकडे बरचसा कल हा सर्वांचाच  वाढत चाललाय असे मला स्वतःला तरी वाटतेय कारण मी स्वतः हे नेहमीच अनुभवते .... मी ग्रामीण  भागातील  असल्याने बऱ्याचदा  मलाही सर्वच  उपलब्ध  होते असे नाही मग काय इंटरनेट  वर शोधते आणि मिळवते जे हवयं ते.... महाराष्ट्रातील मराठीच पण  वेगवेगळ्या  बोलीभाषा  आहेत त्या मला वाचायला आणि ऐकायला खूप आवडतात.....एक वेगळाच आनंद असतो त्यातही ....
आज इंटनेटमुळे मराठी साहीत्य अभ्यासण्यास , म्हणा कींवा मराठीचा झेंडा उंचावण्यात , त्याचा प्रसार होण्यास खूप मदत होत आहे आज मराही साहीत्यांचे अनेक संमेलने भरतायेत ,अनेक पुरस्कार  यामध्ये  देण्यात येताय....
आधी काही बातम्या असो वा कुठे काही  संमेलन असो वा अजुन काही  हे सर्व  आपल्याला वृत्तपत्रांमधून दुसऱ्या - तिसर्‍या  दिवशी  समजायचे  पण आता इंटरनेट  मुळे चुटकीसरशी सर्व  बातम्या आपल्या बसल्याजागी समजतात....एखादी बाब आपल्याला समजली नाही तर त्याविषयी सुद्धा  आपण सविस्तर  अशी सखोल माहीती आज सहज शोधून काढून अभ्यासतोय....आणि  हे सर्व  आज आपल्याला  सहज शक्य  होतंय... आणि त्यातच वि-४  गृप च्या माध्यमातून लेख लिहीले जाताय , ते ब्लॉग  वर  प्रसिद्ध केले जाताय ,  यातुन वाचनाची व लिहीण्याची सवय , आवड , गोडी तर लागतेच आहे पण बरोबरच यामुळे मराठी भाषेचे लेखक सुद्धा लवकरच  तयार होतील ... यामधुन सुद्धा  मराठी भाषेचा /  साहीत्यांचा  प्रसार हा होतच आहे....
शेवटी इंटरनेट  वर मराठी टायपिंग करणे खूप अवघड आहे असं सर्वच  जण  म्हणतात पण वाटते तितकी अवघड मुळातच नाहीये.. मला स्वताःला मराठी टायपिंग करायला आणि लिहीण्याची सवय ( आवड) ही इंटरनेट  मुळेच लागली.....

थोडक्यात  मराठी साहीत्य  प्रसारात इंटरनेट चे योगदान हे अनमोल आणि खूपच महत्वपूर्ण  आणि फायदेशीर व यशस्वी  ठरत आहे.....!
=================================

माझा आवडता उद्योजक.

         निखिल खोडे, पनवेल.

              माझा आवडता उद्योजक अमेरिकन गुंतवणूकदार व व्यावसायिक वॉरन बफेट हे आहेत. कमी वयातच म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. जगात तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत असुन सुद्धा त्यांची काटकसरीचे राहणीमान असणारे वॉरन बफेट यांना कसलाही गर्व नाही. पाच दशकापूर्वी घेतलेलं घरात आजही ते  वास्तव्यास आहेत. स्वतःची गाडी स्वतः चालवतात. शेअर मार्केट बद्दलचे सर्वात मोठे जाणकार मानल्या जातात. कोणताही वायफळ खर्च करत नाही. वॉरन बफेट त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा चॅरिटी ला देतात. 
              
             वॉरन बफेटचे गुंतवणुकी संदर्भात अफलातून विचार आहेत. शेअर बाजारात मंदी च्या वेळेत गुंतवणूक करायची. गुंतवणूक ही दीर्घकालीन असायला पाहिजे. कोणत्याही एका उत्पन्नाच्या आधारावर राहायला नको. उत्पन्न वाढविण्यासाठी दुसरीकडे बचत करायला हवी. गरज नसलेल्या वस्तू विकत घ्यायला नको नाहीतर तुमच्या कडे असलेल्या वस्तू विकण्याची वेळ तुमच्या वर येईल. तुम्हाला जितक्या वेगाने पैसा गुंतवता येईल तेवढ्या लवकर गुंतवणूक करा.
                
              बचत कशी करावी यावर बफे यांचे विचार आपण खर्च केल्यावर उरलेल्या पैश्याची बचत करतो, आपल्याला याउलट करायला हवे. आधी बचत करून उरलेल्या पैसा खर्च करावा. आपली बचत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी. पैसा ठेवला की कुजतो आणि  गुंतवला की वाढतो. पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज लागत नाही. स्वतः मध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. 

                  व्यवसायात येणारे धोके यासाठी बफेट सांगतात की, आपण करत असलेल्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते व आपण काय करतो ह्याची कल्पना नसते  तेव्हा धोके निर्माण होतात.
 ह्या उद्योजकाकडुन बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

____________________________

शिरीष उमरे यवतमाळ

औद्योजकतेचे प्रणेते जमशेदजी टाटा पासुन आताचे विजय गोडबोले पर्यंत ....औद्योगिक क्रांती, नंतर हरीत क्रांती, मग दुग्ध क्रांती .... दुरसंचार आणि  संगणक सॉफ्टवेअर.... ऑटोमेशन, नॅनो टेक्नाॅलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉर्मा, करमणुक, फायनांस सेक्टर ह्यामधे बेंच मार्क सेट करणारे हजारो उद्योजकांच्या  यशस्वी जीवनगाथेने प्रेरीत झालेला मी ह्या विषयावर विचार करायला बसलो तेंव्हा मला आठवला जोती !!

आता कोण हा जोती ? एक कुरळे केसाचा रापलेला गौरवर्णी सडपातळ हसतमुख तरुण ज्याची सगळ्यात पहीली भेट आजपासुन अठ्ठावीस वर्षापुर्वी झाली. मी मुंबई ला मॅजेस्टीक आमदार निवासात राहायला गेलो तेंव्हा भेटलेला बाजुच्या ग्राहक भंडारासमोरील मोकळ्या जागेत छोटीसी चाय टपरी चालवणारा जोती !! 

पाच-सहा भारतिय भाषा लिलया बोलणारा सदा मोहवणारे स्मीत हास्य चेहऱ्यावर बाळगणारा, सकाळी पाच ते रात्री दहा अशी कामाची वेळ... असा रोज पंधरा तास वर्षभर राबणारा हा जोती थकत कसा नाही ह्याचे मला नेहमी नवल वाटायचे. सदैव दुसऱ्याच्या मदतीला धावुन जाणारा त्यामुळे ह्याच्या हीतचिंतकांची गणती हजारोत असायची. कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो, सढळ हाताने मदत करणारा हा अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा धनी मला नेहमी त्याच्या अषटपैलु गुणांनी आश्चर्याचा धक्के देत राहायचा. त्याच्या सीए ने सांगितले की त्याचा महीन्याचा पंधरा लाखाचा टर्नओवर आहे तेंव्हा मी तोंडात बोटे च टाकली. त्याच्या टपरीवर चहा कॉफी वेज सँडवीच एवढेच असायचे पण त्याचा सप्लाय जवळपास एक कीमी च्या परिघात असायचा. क्वालिटी, टेस्ट, स्वच्छता, कींमत व क्वांटिटी ह्यात तो कधीच कॉन्परमाइज करायचा नाही. त्याच्या फोर्टपोलियो मॅनेजर ने त्याच्या इनवेस्ट च्या नॉलेज व विजनची तारीफ केली तेंव्हा मी अवाक च राहीलो. करोडो ची गुंतवणुक तीही इतक्या गुतागुंतीची पाहुन माझी मती गुंग झाली. जोतीच्या म्हणण्यानुसार त्याने सगळ्यात जास्त व योग्य इनवेस्टमेंट त्याच्या २० जणांच्या टीममधे केली आहे. ते स्टाफ नाही तर माझी फॅंमिली आहे. अजुन नवल म्हणजे त्याने सगळ्यांना त्याचे बिझनेस पार्टनर बनवले आहे. 
आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला काय कोणालाच अजुनही त्याची जातापात, धर्म, मुळ गाव, मातृभाषा, नातेवाइक, शिक्षण ह्याबद्दल काहीच माहीती नाही ना त्याच्या टीमची !!
मानवतेचा सच्चा उपासक सदैव कामात गुंतलेला  हा पक्का मुंबईकर मला नेहमी आदर्श वाटत आला आहे. 
तुमचा जोती कोण ? लिहा चार ओळी 

____________________________


गणेश नारायणराव फाळके.

माझा आवडता उद्योजक या विषयावर लिहायचं ठरलं तर डोक्यात सगळे टॉपलेवलचे उद्योजक यायला लागले.. ज्यांचे बरेच किस्से पुस्तकांतून.. लेखांतून.. आणि चर्चासत्रातून ऐकायला मिळाले..

शिरीषभाऊंनी लिहिला तो विषय.. दोन तीन दिवसांपासून डोक्यात येतोय.. पण लिहावं की नको.. याच पेचात अडकून बसलो..शिरीषभाऊंचा लेख आला.. आणि पेच सुटला..

आपल्या अवतीभवती बरीच मंडळी आहेत..जे दोन चार तास नुसती गर्दी खेचत असतात..

कुणी अगदी थोड्या पैशात गावठी औषधोपचार करतात,कुणी एखादी पानटपरी टाकतात, कुणी भेळपुरीची गाडी, कुणी चहानाश्त्याचा गाळा,कुणी साधा भेळीचा ठेला लावतात..
पण यातला प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला यशस्वी उद्योजक असतोय..
म्हणून तर शिवाजीनगर रेल्वेस्टेशनच्या बाहेरच्या एका कोपर्‍यातल्या छोट्याशा दुकानात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येणारा श्री यदुनाथप्रसाद यादव *झटका भेळवाला* असतो.. आणि लोणावळयातल्या गर्दीच्या ठिकाणापासून दूरवर एका बाजूला श्री दगडूबुवा गायकवाडांची *बुवांची मिसळ* पस्तीस वर्षे फेमस असते..

ही आपापल्या क्षेत्रात छोट्याशा व्यवसायातून वर आलेली गरीब जनता.. माझ्यामते आवडती उद्योजकंच आहेत..

___________________________

अनिल गोडबोले,सोलापूर

माझा आवडता उद्योजक या विषयावर खरं तर मला दोन नाव समोर येत आहेत.
एक आदरणीय रतन टाटा आणि बिल गेट्स.

टाटा यांचं नाव खर तर सर्वाना माहीत आहे.. पण मला आवडतात कारण अजूनही त्यांच्या धोरणात मानवता आणि उदारमतवादी पणा आहे. कुठेही लुचेपणा किंवा फसवेगिरी नाही.. सामाजिक कार्य आणि माणसांना महत्त्व दिल्यामुळे ते अजूनही बऱ्याच वरच्या पदावर आहेत.. बाकीचे किस्से सांगण्यात फार काही अर्थ नाही.

बिल गेट..  दुर्दम्य इच्छाशक्ती, मार्केट ओळखण्याची आणि तयार करण्याची शक्ती यामुळे अख्ख्या जगात मायक्रोसॉफ्ट पोहोचवली आणि निवृत्त होऊन समाजकार्य करत फिरत आहेत..

मार्क झुकरबर्ग हा देखील आहे.. पण अजून त्याच्या कारकिर्दीचा बराच टप्पा शिल्लक आहे.. त्यामुळे त्याबद्दल नंतर कधीतरी

____________________________

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************