शिरीष उमरे, यवतमाळ
लोकपाल च्या नियुक्तीनंतर व अमंलबजीवणीनंतर सिंगापुर सारखा टीकली एवढा देश जगातल्या विकसीत देशाच्या यादीत मानाचे स्थान मिळवले व आजगायत टीकवुन आहे. त्यापासुन प्रेरणा घेउन भारतात लोकपालसाठी बरेच वर्षापासुन आंदोलने सुरु आहेत.
लोकपाल साठी झालेल्या उग्र व मोठ्या जनआंदोलनाने मागील लोकसभेच्या निवडणुका गाजल्या. नेहमीप्रमाणे जेवढे लोकपाल निष्क्रीय करता तेवढे करुन तसे विधेयक मागील सरकारने पास केले पण भ्रष्टाचाराच्या प्रचंड अनागोंदी कारभारामुळे लोकांनी त्यांना नाकारले.
न्यायलयाने बरेचदा फटकारुनही नविन सरकारने लोकपाल नियुक्ती जेवढी लांबवता येइल तेवढी लांबवुन सिध्द केले की त्यांची ही इच्छाशक्ती नाही आहे. शेवटी निवडणुकीच्या आधीची लितापोती म्हणुन समिती सदस्य नावे दीलीत पण अंमलबजावणी शुन्य !!
आता लोकांच्या पण आशा मावळल्यात. मागील काही राज्यातील निवडणुकांमधे नोटा ला मिळालेले मतसंख्या बघता लोक कंटाळले आहेत राजकीय पक्षांना... भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेरोजगारी, महागाई वाढतच चालली आहे. शिक्षण व आरोग्य व्यवस्था ढासळतच चालली आहे.
लोक तिसरा पर्याय म्हणुन चांगला उमेदवार निवडुन देतील तर काही बदल होण्याची शक्यता आहे. नाही तर आहेच ये रे माझ्या मागल्या !!
_______________________________
किरण पवार, औरंगाबाद,
लोकपाल आणि सामान्य माणूस यांच नात काय? किंवा लोकपालमुळे सामान्य माणसाच्या आयुष्याय खरचं कितपतं फरक पडेल? अशी बरीचशी प्रश्न आज समोर ऊभी आहेत. पण एक मात्र खरं आहे की, लोकपालची आज भ्रष्टाचारलेल्या जगात न्याय मिळवण्यासाठी गरज आहे. मागे आपल्याच ग्रुपवर विषय झाला होता की, लोकपाल हे एक मृगजळ आहे का? माझं मत होतं नक्कीच नाही. कारण लोकपालसाठी जे आंदोलन झाली ती तेवढ्याच पोटतिडकीने झाली आणि या कायद्यात सविस्तर गोष्टी मांडणारी सर्व मंडळी नक्कीच उच्चशिक्षीत होती, मग त्यात केजरीवालांचा समावेश असो वा प्रशांत भूषण यांचा. लोकपालचा मुद्दा अगदी इतका गाजला होता की, लहान मुलही "मै भी अण्णा" अशा टोप्या घालून फिरायचे. भलेही त्यांना नेमकं काय? हे माहित नव्हतं पण एक आशा होती, काहीतरी बदलणारं आहे आणि चांगल घडणार आहे.
मुळात लोकपालमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चोप लागणार ही गोष्टच फार उल्लेखनीय होती. पण एक मुद्दा लोकपालचा महत्वाचा होता तो म्हणजे, एखाद्या खटल्याचा निर्णय दिलेल्या कालावधीतच लवकरात लवकर लावणे, असं झाल नाही किंवा कामात कुचराई दिसल्यास तो लोकपालचाही अधिकारी निलंबित केल्या जाणार. आजतागात मुळात सरकारी कामकाज इतकं संथ गतिनं चालत की, कुठलीच गोष्ट सर्वसामान्यांना न्यायाच्या बाबतीत योग्यवेळी मिळत नाही. पण लोकपालमुळे हे शक्य होणार; हे मात्र नक्की आहे. लोकपालची बारकाइतली बाजू लक्षात घेतल्यास समजेल की, जो वेळ आज कोर्ट निकाल द्यायला दहा पंधरा वर्ष सहज घालवून टाकतो तो वेळ तेवढा लागणारं नाही. लोकपाल खूप वैचारिक, अनुभवी व सामंजस्यातून निर्माण केलं गेलं आहे. त्यामुळे लोकपाल नक्कीच सर्वसामांन्यांच संरक्षण करण्यास सक्षम आहे, असं मला प्रांजळपणे वाटतं.
धन्यवाद!
_______________________________
वाल्मीक फड निफाड नाशिक.
लोकपाल लोकपाल असं पाच वर्षापूर्वी मला ऐकायला मिळालं.खरं पाहीलं तर ह्या लोकपालबद्दल सामान्य माणसाला आजीबात माहीती नव्हती पण ज्यावेळी आण्णांनी लोकपालबद्दल आंदोलन केले त्याचवेळी लोकांना कळाले की,लोकपाल नावाची काहीतरी संकल्पना कायद्यात ऊपलब्ध आहे.आण्णा करताहेत म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे असे समजून लोकांनी आण्णांना भरभरून प्रतिसाद दिला.पण लोकपालबद्दल कोणालाही काही माहीत नव्हते.
काय झालं आण्णांनी लोकपाल साठी एवढा संघर्ष केला पण ह्या गोष्टीचा फायदा घेऊन अनेक राजकारणातील आंबट शौकीनांनी फायदा घेऊन राजकारणात सक्रीय होऊन आज ते मोठे पद सांभाळत आहे.
इतकी माहीती मला लोकपालबद्दल नाही पण लोकपाल चालू जर केले तर भ्रष्टाचाराला आळा बसतोय व भ्रष्ट आधिकारी घाबरतात असं ऐकलंय म्हणून लोकपाल चालू व्हावं असं मला मनापासून वाटतय.सामान्य माणसाच्या न्याय व हक्कासाठी लवकरात लवकर लोकपाल जनतेला मिळावा ही प्रामाणिक इच्छा.जय हिंद .वंदे मातरम्.
________________________________
टीप- (संबधित छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा