प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का ?(भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का?(भाग:-२)


Source: Internet

-वैशाली पंडित,
हिंगोली

        ती म्हणजे खरच प्रेम असतं का प्रश्नच आहे कुणाचेही असो . प्रेमाची परिभाषा प्रेमाचा अर्थ अजून कुणाला समजलेच नाही. अनाकलनीय भावना असमज  विचार म्हणजे प्रेम . विल्यम शेक्सपियर यांनी म्हटल्याप्रमाणे ,,खरे प्रेम म्हणजे काय आत्तापर्यंत कोणाला समजू शकले नाही. परंतु साधारणतः प्रेम म्हणलं की समोर एकंद जोडपं किंवा मग लग्नाचा प्रेम असंच चित्र डोळ्यासमोर तरंगत. प्रेम हे एका सेकंदात किंवा एका दिवसात किंवा एकाच वेळी होण्याचे नाव नाही तर प्रेम एखाद्या झाडा प्रमाण असतं परिस्थिती वातावरण यांची सांगड घालून वाढत जातो तसंच प्रेमाचाही बाबतीत होतं प्रेम हे हळूहळू होत जातो हळूहळू वाढत जातो घट्ट होत जातं कालानुरूप परिस्थितीनुसार ते वाढत जातं पण ते कधी बदलत नाही. लहानपणी आपल्या आईचा आपल्यावर आणि आपल्या आईवर आपलं प्रेम असतं तेव्हापासून जेव्हा आपल्याला काही कळत पण नसत. पण थोडी समज यायला लागल्यावर हे प्रेम अजून घट्ट होत जात. प्रेम करण्यापेक्षा प्रेम निभवणं महत्त्वाचं असत. आई जन्मभर प्रेम निभावत असते तीच प्रेम कधीच बदलत नाही ते आहे  खरं प्रेम.
          दुसरा मुद्दा लग्नाचा किंवा सध्याच्या gf bf( प्रचलित) प्रेमी युगुलांचा. हा प्रश्न आजकाल फार वाढला आहे, फार लांब जाण्याची गरज नाही आजकाल समाजाचं हुबेहूब वर्णन चित्रपटांत दर्शविला जात आहे. याचं उदाहरण म्हणजे 2 वर्षांपूर्वी आलेला सैराट "हा चित्रपट.
       काय होतं? चित्रपटातील नायक-नायिका एकमेका खूप प्रेम करत असतात खुप प्रेम करतात (खर आहे की नाही हा वादाचा विषय) मंग काय होतं पण घरच्यांच्या विरोधामुळे ही दोघं पळून जाऊन लग्न करतात. काय गरज पडली त्यांना पळवून जाण्याची? चित्र
घरच्यांचा विरोध,,, आणि फक्त चित्रपटातच नव्हे तर खऱ्या आयुष्यात सुद्धा खर्चांचा विरोधामुळेच प्रेमीयुगुलांना असे सेराट निर्णय घ्यावे लागतात. आणि मग बेघर बेकारी लाचारी अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. इथे खर प्रेम नव्हतं कुणाच्याच खरं प्रेम नव्हतं,, ना त्यांच्या आई-वडिलांचा या दोघांचं. कारण त्यांनी आई-वडिलांना सोडून दिली काल-परवा मिळालेल्या प्रेयसी साठी प्रियकरासाठी. पण त्यांच्या आई-वडिलांचेही प्रेम नसेल कदाचित त्यांच्यावर कारण समाज आणि इतर त्यांना मुलीच्या सुखा पेक्षा जास्त महत्त्वाची होती.               आजकाल "लव जिहाद" नावाचा पण एक  प्रकार चालतो. फार काही माहिती नाही याबद्दल पण त्यामध्ये मुलगा मुलीला फसवतो, इथेही खरं प्रेम नाही कारण जर आपण आपल्या प्रेमाला ओळखू शकलो नाही ,समजु शकलो नाही तर ते खर प्रेम करू शकत. प्रेम हे दोन सारख्या व्यक्तींसाठी नसून दोन असामान्य व्यक्ती ने हा निर्णय घेऊन जगण्याच नाव आहे.  
            जर दोघही एकमेकांवर खरंच प्रेम करत असतील , आणि ते आपल्या आई-वडिलांवर पण प्रेम करत असतील  , तर त्यांच्यामध्ये त्यांना राजी करण्याची क्षमता असते हे पटवून देण्याची क्षमता असते की ते दोघे एकमेकांच्या लायक आहेत. ते दोघे आयुष्य सुखात घालवू शकतील. आणि त्याच्या आई-वडिलांचं पण त्यांच्यावर खरंच प्रेम असेल तर ते स्वतःच्या स्वरचित प्रतिष्ठेची काळजी न करता लग्नाला राजी होतील. मुलगा बेरोजगार आहे ,तर त्याला रोजगार ,व्यवसाय उभारण्यासाठी हातभार लावतील .कारण त्यांनी जर स्वतःच्या पसंतीनुसार मुलींचे लग्न केलं असतं तर आला नसता खर्च? दिला नसता हुंडा ? (हुंडा कायद्याने गुन्हा असला तरी) हे आहे का खरं प्रेम???? नाहीतर मुलगा काहीच करत नाही बेरोजगार आहेत मुलीला कस जायचं याप्रकारचे मायबाप,,,🤔 आणि इकडं मुलगी 18 वर्षाची कमवता मुलगा शोधला चाळीस वर्षाचा, कुरूप वयस्कर असला तरी चालेल ,मुलीला पसंद नसला तरी चालेल,( रूपाला महत्त्व नाही पण) तरीही हुंडा दिला 10 lakh ,20 तोळे सोनं, भांडीकुंडी ,हिरो होंडा गाडी ,सगळीकडे धुमधडाक्यात वरात डीजे, हे सगळं काय आहे खरं प्रेम की दिखावा.
विषय खूप खोल आहे पण शब्दाला मोल आहे ,त्यामुळे एवढाच की प्रेम ही खूप सुंदर आणि पवित्र भावना आहे. आणि ते आणखी सुंदर बनवता येत. पण समाजातील प्रतिष्ठा ,अहंकार ,न झुकण्याची  प्रवृत्ती या सर्व बाबी प्रेमाचा खूण करत आहेत.
          प्रेम खूप सुंदर आहे फक्त ते समजून घेता आलं पाहिजे , पारखता आलं पाहिजे, सगळ आयुष्य सुंदर बनून जाईल जर प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले तर ,,,,
       



Source: Internet

-नामदेव जाधव,
 जि. कोल्हापूर

             प्रेम म्हणजे खरचं प्रेम आणि फ़क्त प्रेम असतं. प्रेमा सारखी शुध्द सात्विक, भावना या जगात नाही.प्रेम आहे म्हणून माणूस माणसाला जोडला गेलाय.माणसाचे आयुष्य परिवर्तन करायचे असेल तर प्रेमासारखा दूसरा दुवा नाही.आजच्या काळात अनेक वेळा आपण तरुणांकडून प्रेमासाठी टोकाची पावले उचलेली पाहतो.पण ते कितपत योग्य आहे हे त्यांनाचं माहीत. प्रेम ही गोष्ट दाखवण्याची नसून ती अनुभवायची आहे,याचा जणु हल्ली विसर पडत चाललाय,. प्रेमात त्याग ही तितकीच महत्वाची भावना आहे. कधी कधी आपण आपल्या जोडीदारासाठी स्वतःला विसरायला हवं,व याची जाण जोडीदाराने ठेवायला हवी.मग अश्या प्रेमासाठी महागड्या वस्तूची गरज नाही की सुविधांची ,नात्यांतहवा तो फक्त विश्वास आणि प्रेमाचा ओलावा मग बघा हे प्रेमरुपी वृक्ष कसा भरतो ते.! सर्वाना जोडीदाराकडून ,आयुष्याकडून भरभरून  प्रेम मिळो या आशेसह इथं थांबतो.
             ‎धन्यवाद.



Source: Internet

-राज इनामदार,
 पंढरपूर

*प्रेम करांव  भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं*
*मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं*

प्रेम म्हणजे अनोखी ओढ़ ..त्याचाच द्यास ...प्रत्यक्ष भेंट जरी नाही झालीना ....तरीही स्वप्नात आणी विचारानच्या महेफलित होणारी साखर भेट ...आणी त्याच भेटीच्या  गोडीची चव चाखत प्रत्येक्श भेट होईल याची मनाला काढलेली समजूत .प्रेम म्हणजे प्रार्थना आणी प्रेम म्हणजे त्याग ...प्रेम म्हणजे पूजा ...प्रेम म्हणजे ह्रुदयाच्या गाभाऱ्यात आपण जपून ठेवलेला हीरा .
प्रेम म्हणजे ..आपण जिच्यावर् प्रेम करतो ती आपल्याला मिळो न मिळो तिचे आपल्यावर् प्रेम असो नसो ..पण दररोज परमेश्वराच्या दरबारात डोळ्यांत अश्रु अनावर होवून देवाजवळ केलीली प्रार्थना... हे ईश्वरा सुखी ठेव त्याला ..उदंड आयुष्य लाभो त्याला ..त्याची सर्व दुख मला मिळो व माझे सर्व सुख त्याला मिळो ...अशी प्रियकराविषयी असणारी सदभावना ..
     मित्रहो प्रेम हे कधीच करून होत नसत ...प्रेमात सुंदरता ...श्रीमंती ..जातपात ..रंगरूप याला काहीही किंमत नसते प्रेम आंधळ असत ...कोणावरही होवू शकत
प्रेम ही गोष्ट अंतकरनातून निर्माण होत असते ...प्रेमाची ओढ़ अतिशय तीव्र असते ..तो एक विषाचाही प्याला आहे पंचवताही आला पाहिजे .
*खयालें यार तो हर गमको भुला देता है*
*जिसको पीना है ओ पिये जाम से  औरसागर से*
*मेरा साकी मुझे आँखोंसे पीला देता है*

आयुष्यात कितीही दुःख आली संकटे आली तर ..जेंव्हा जगण नकोस वाटत त्या वेळेस तिचा चेहरा आठवला की हलकीसी स्माईल ओन्ठावर यावी व सर्व दुःख विसरून जावे तिच्या आठवणीत.
मजनू आपल्या लैला ला भेटन्यासाठी जंगलातील वाटेवरून जात होता ...तो बेभान होवून चालला होता ...पायात काहीही घातलेलें नव्हते तरीही भर उन्हात चालला ..काँटे कुंटे तुडवून अनेक दगडांच्या ठेचा लागून पाय रक्तबम्बाळ झाल पण याला कळलच नाही ...हा  फक्त लैला लैला करत निघालेला ...
त्या वाटेत ऐक फकीर नमाज पढ़त होता ..हा मजनू त्या फकिरां समोरुण गेला ....फकिर लाल बूंद झाला व तो मजनू शिव्या देवु लागला ....तेंव्हा मजनु हसु लागला व म्हणाला ...माझ्या लैला ला ईश्वराने बनवल ती एक साधारण स्त्री असून सुधा ..तिच्या प्रेमात मी इतका व्यापून गेलोय ..इथंका आंधळा झालोय की तिच्या भेटीची ओढ इतकी आहे की ये फकीरजी तुंम्ही नमाज पढ़त आहात हे सुधा मला दिसलं नाही .
तुंम्ही तर मग लैला ला बनवनार्या ईश्वरावर् जर प्रेम करतो असे म्हणता तर मग तुमी नमाज पठण करत असतांना मी तुम्हांला दिसलोच कसा ? हे सांगा ...फकीर नीरुत्तर झाला ...
*तेरे प्रीत मे सुधबुध सब बीसरी*
*कबतलक रहेगी ये बेखबरी*

असे ऐका ठिकाणी अमीर खुसरो म्हणतात .

मजनु लैला वर् इतका प्रेम करत होता की त्याला जिकडे तिकडे फक्त लैलाच दिसायची
अर्जुनाची धनुष्यविद्यावर् इतके प्रेम होते की त्याला फक्त पक्ष्याचा डोळाच  दिसला
पुंडलिक आई वडिलांनवर् इतक प्रेम केल की साशात भेटायला आलेल्या पांडुरंगालाही भेटायला त्याच्याकडे वेळ नाही .
पोट्च्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली .
आम्हीं प्रेम मुलांवर करू  , आई वडीलानवर् , ईश्वरावर् करू आमच्या प्रेमाचा आलेख किती उंचीचा आहे हे पाहणे गरजेचा आहे .

प्रियशीला प्रियंकर पत्र लिहतो मी तुझ्यासाठी चंद्रसूर्य तोडून आणेल म्हणतो ..
जेंव्हा प्रियशी याला भेटीसाठी बोलवते तर हा म्हणतो सॉरी जानू आज़ आभाळ आलंय पावसाची शक्यता आहे त्यामुळे तूला भेटायला येवू शकत नाही ....😣...अरे जो माणूस आपल्या प्रियशीसाठी पावसात भिजू शकत नाही ..तो ..काय चंद्रसूर्य तोडून आणनार .
दररोज कपड़े बदल्याप्रमाणे प्रेम बदलणार्याना काय समजणार प्रेम ...नुसता कामं वासनाचा बाजार .....
प्रेम आतड्यावर असावे ...कातड्यावर् नको ....

ऐक शिकारी जंगलात हरनीची शिकार करताना हरनी च्या माघे धावत असतो ....काहीही करून त्याला त्या हरनीची शिकार करायचिंच होती ...पण अचानक पुढील वळणावर ते हरिण झुडपातूण गायब होत ..शिकारी खूप उदास व निराश होवून चालु लागतो ..त्याला समोर आदीवाशी लोकांची वस्ती दिसते तो तिथं जातो ...तेथील लोक त्याचा पाहूनचार करतात व त्याला सांगतात की आज़ रात्री आमच्या वस्तीवर उत्सव आहे तुंम्ही थाम्बा ......शिकारी त्यांच आमंत्रण स्वीकारून थांबतो ...
रात्र होती सगळीकडे शेकोटि पेटवून रोशनाई केली जाते ..व ती आदीवासी लोग विविध आभूषण घालून एका शेकोटि भोवती बेभान होवून नाचत असतात ..गाणी म्हणत असतात ...हे पाहून ढोल वाजनारा आणखीन जोराने ढोल वाजवत असतो .....तेवढ्यात तिथे हरिण येत शिकारी बघतो ...हरिण आयातिच सापडली म्हणून त्याला आनंद होतो ...बन्धुक उचलतो ..नेम धरतो ..गोळी झाड़नार तोच त्याला तेथील एक आदीवाशी माणूस त्याला अडवतो ...शिकारी म्हणतो ही माझी शिकार आहे .मला सोड मला शिकार करूदे नाहीतर तूला गोळी घालेन ...आदीवाशी म्हणतो मला गोळी घाल पण येकुन घे .
ही हरिण गेली पाँच वर्षे झाली इथे येतीय ...कारण पाँच वर्षापूर्वी हे हरिण याच्या प्रियकर हरणाबरोबर फिरत असतांना एका शिकार्याने हिच्या प्रियकर हरणांची शिकार केली ..त्या हरणाच्या कातड्यापासून ढोल बनवला गेला व तो ढोल आमच्याकडे आहे जेव्हा जेंव्हा त्या ढोलावर थाप पडते ...तेंव्हा तेंव्हा ती हरणाची कातडी या हरनीच्या आतडयाला साद घालते व हरिणी बेभान होवून अश्रु ढाळत आमच्या वस्तीत येते ...जो पर्यत ढोलचा आवाज़ बंद होत नाही ...तो पर्यंत थाम्बते  ........
मित्रहो एक प्राणी इतक पवित्र प्रेम करू शकत तर आपण का नाही
आता आपण आपल्या मनाला विचारू की खरच आपल प्रेम हे ..नक्की प्रेमच आहे का ?

खूप खुप फरक असतो खऱ्या प्रेमात व खोट्या प्रेमात .

आजकाल केल्या जाणाऱ्या प्रेमाला नक्की प्रेम म्हणता येईल का ? हेच समजत नाहीये .

चूक भूल झाल्यास शमा असावी 🙏



Source: Internet

-अनिल गोडबोले,
 सोलापूर

          “प्रेम” हा विषयच असा आहे कि त्यावर आपण कतीत बोलू तेवढ कमीच! या हिंदी चित्रपट सृष्टीने आणि एकंदरीत सर्व फिल्म वाल्यान हा विषय सतत वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय अगदी ‘जिवंत” ठेवला आहे. तर सुरवातीला हा जो प्रश्न विचारला आहे त्या मागील कारण सुधा खासच आहे आणि ते नुसत १४ फेब्रुवारी ‘व्हॅलंटाईन डे’ पुरत मर्यादित नसून त्या मागे एक अर्थ दडलेला आहे.
आपण प्रेमाच्या खूप गप्पा मारतो. आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे  कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोड म्हणजे जेवणातल्या मीठ एवढ... कारण ते जास्त झाल तरी खल जात नाही आणि कमी झाल तरी जाणवत ... आणि महत्त्वाच आहे ते प्रमाणात असण!.. हे प्रमाण देखील ज्याच्या त्त्यच्या चवीनुसार!.. तर जास्तीतजास्त वेळा स्त्री आणि पुरुष यांच्या मधील प्रेम संबंध बद्दल जास्त बोलाल गेलेलं आहे. शृंगार रस नावाचा एक रसच मुळात मराठी व्याकरण मध्ये आहे आणि तो रस ‘प्रणय’ या भावनेवर आधारित आहे. स्त्री आणि पुरुषांनी एकत्रित येणे ही निसर्गाची गरज आहे कारण त्या शिवाय प्रजनन होणार नाही. माणूस हा एक प्रगत प्राणी आहे त्यामुळे त्याच काही इतर प्राणी पक्ष्य प्रमाणे जीवन नाही त्यामुळे हे जीवन जगताना त्याने काही नियम घालून घेतले आहेत.
मानवी जीवन जगण्यासाठी घालून घेतलेल्या बंधनामध्ये माणूस एवढा गुरफटला आहे कि तो काही काल्पनिक गोष्टी त्या मध्ये मिसळून मूळ प्रेम भावनाच विसरला आहे. सता आणि शक्ती यांची लालसा माणसाला कुठलेही विधिनिषेध पाळायला लावत नाही तसेच काही लोकांना एवढी बंधन आहेत कि त्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
प्रेम एक सुंदर भावना आहे जी एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीवर व्यक्त करत असतो. आता इथे जाणून बुजून व्यक्ती हा शब्द वापरला कारण शास्त्राच्या मते समलिंगी शरीरसम्बन्ध मध्ये hi प्रेम असते असे सिध्द झाले आहे. कोणी मानो किवा न मानो समलिंगी जोडपी सुधा “नॉर्मल” आहेत असे शास्त्र म्हणत आहे. प्रेम व्यक्त करताना व्यक्ती च्या भावनांचा आदर केला पाहिजे एवढ एकच सूत्र जर पाळल तर काही अवघड होत नाही.. पण अस होत नाही आणि तिथे समस्या निर्माण होते.
व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने सोशल मेडिया वर येणारे मेसेज वाचले किवा आजूबाजूला जर चित्र बघितले तर दोन्ही प्रकारची माणसे दिसतात. प्रेम करणारी आणि द्वेष करणारी आता या मध्ये अजून एक तिसरी अवस्था अशी आहे कि प्रेम करणार्याचा तिरस्कार करणारी ......
काही व्हिडिओ आले ग्रुप वरती या लोकांनी प्रेमी युगुलांना मारहाण केली.. किवा लग्न लाऊन दिल... आणि शेअर करणारे पण आनंदाने शेअर करत होते.. प्रेम करणे ही काही आपली संस्कृती नाही किवा प्रेम कशासाठी पाहिजे? पाश्चात्त्य लोकांच अंधानुकरण, किवा तरुणांना मजा मारण्यासाठी मोकळ केलेलं रान आहे.. अशा प्रतिक्रिया या तथाकथित “संस्कृती रक्षकाकडून” ऐकायला मिळतात. आज भारता मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या बघितली तर त्या मध्ये जास्तीत जास्त आत्महत्या ह्या “अपेक्षा भंग” या मानसिकते मुळे होतात. आपल्याला जर आपल्या मनाप्रमाणे जगता येत नसेल प्रेम करता येत नसेल तर केवळ बहर मोकळे पाने फिरणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का? असा देखील प्रश्न पडतो.
या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या मुले असा प्रश्न पडला कि खरोखर हे प्रेम गरजेच आहे का? फक्त प्रजनन करणे एवढाच उद्देश मनुष्य जीवनाचा आहे का? निश्चितच नाही! त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. डोपामाईन नावाच्या संप्रेरकामुळे प्रेम होत अस म्हणतात पण जीवन जगण्याच्या भीती पोटी पुढच्या पिढीत हा आढळून येईल किवा नाही असा प्रश्न पडतो कधी कधी....
खर प्रेम माणसाला माणूस म्हणून विचार करयला भाग पाडते. एकटेपणा दूर होतो, अपेक्षा भंग हा पचवता देखील येतो, आपण आपल्या आयुष्यात काय मिळवलं पाहिजे हे कळत... प्रेम बंडखोरी करायला शिकवत. प्रेम माणसाला नवीन गोष्टी करायला भाग पाडत. आईनस्टाईन ला तर म्हणे आपण जेवलो आहोत कि नाही हे सुद्धा लक्षात राहत नसे एवढ तो त्याच्या विषयावर प्रेम करत असे.
या मध्ये मात्र एक सीमा रेषा आहे ती सगळ्यांनी समजून घेण गरजेच आहे. जबरदस्ती, अत्याचार. पैशाच्या जोरावर किवा दुसर्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन प्रेम मिळवणे हा काही माणूस असल्याचा पुरावा नाही.
व्यक्ती स्वातंत्र्य भारताने मान्य केलेले असताना देखील अशा प्रकारे “moral पोलिसिंग” करणारे हे नेमक काय साध्य करत आहेत हे कळत नाही
तरी hi भावना हे प्रेम खरोखर आहे आणि ते त्यच अस्तित्व दाखवत राहत ... कधी रोमिओ आणि ज्युलियेट आणून कधी सैराट होऊन कधी कोणताही रूप घेऊन.... अजूनही इज्जत कशाशी खातात हे न कळलेल्या लोकांना अस समजावणार हा देखील प्रशन  आहे. मुलगी प्रेम केली तर इज्जत जाते, दुसर्या धर्मातली मुलगी किवा मुलगा असेल तर इज्जत जाते, पैसा कमी असण्याने इज्जत जाते ... पण बलात्कार क्र्नार्यामुळे इज्जत जाते हे कधी कळणार? अत्याचार करणारे भ्रष्टाचार करणारे या मुले किती नुकसान होत आहे हे अजूनही कळलेलं नाही
शेवटी एवढच सांगतो..... प्रेम होतच राहणार कानीही कितीही प्रयत्न करा.. पण या मध्ये विकृती ला थारा नाही. एक जोडीदार किवा अनेक जोडीदार हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. “त्याने प्रेम केळ किवा तिने प्रेम केल.. मला सांगा तुमच्या बापच काय गेल... “ या प्रश्नाच उत्तर पाडगावकर यांना अजूनही कोणी दिलेलं नाही
“एक आग का दर्या है.... और डुबके जाना है” हेच खर !!!!!



Source: Internet

-करण बायस,
हिंगोली

प्रेम म्हणजे...💓💓💓............?
      कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.प्रत्येक बाळाचं पाहिलं प्रेम असते आई.कारण आई बाळाला जन्म देते तेंव्हा पासून आई आणि बाळाचं प्रेमच नात तयार होते.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.बाबा पण आपल्या मुला/मुली साठी एक अस पात्र असते ज्यांच्या प्रेमाची तुलना करता येत नाही.

मैत्री हे एक अस नातं असते जिथे आपल्याला आपल्या भावा बहिणीसारखं प्रेम करणारे मित्र मैत्रिणी भेटतात.

आपल्या घरातील आजी आजोबा असतात आपल्या वर प्रेम करणारे.

प्रेम हे प्रत्येक नात्यांमध्ये असते.आज माणसांचे एकमेकांशी जे चांगले संबंध आहेत ते प्रेमामुळेच आहेत.
पण प्रेम म्हंटल की सर्वात आधी आपल्याला couples आठवतात.आपल्या समाजात लोकांना या गोष्टींशी खूप problem आहे.कारण त्यांना वाटते यामुळे आपल्या संस्कृतीवर वाईट परिणाम होईल.ते सर्व अवलंबून असते ज्याच्या त्याच्या mentallity वर.

प्रेम म्हणजे फक्त एक शारीरिक attraction नसते.

आज काल आपण बघत आहोत की प्रेमाच्या नावावर होणाऱ्या वाईट घडामोडी.खरं प्रेमात अस काही होत नाही.प्रेमात हे एकमेकांना समजून घ्यावे
लागते, कोणी जर चुकत असेल तर एकाला समजूत काढावी लागते.जवळ असो वा लांब असो एकमेकांवर विश्वास पाहिजे.

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यावेळेस आपण ‘I Love You’ अस बोलतो, या I चा खूप deep अर्थ आहे.म्हणजे ज्यावेळेस आपलं मन हे एखाद्या मनाशी पूर्णपणे मिळतो( by heart,not by mind)
ते प्रेम खर असते.एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि तो/ती आपल्याला आवडलं की आपला mind हे dopamine नावाचं एक chemical secrete करते जो आपल्या brain ला आवडतो आणि समोरची व्यक्ती by mind आपल्याला आवडते जे की खरं प्रेम नसते.mind न प्रेम हे स्वार्थ साठी असतो.

एक उदाहरण देतो,प्रत्येक आई आपल्या बाळावर प्रेम करते ते प्रेम पूर्णपणे तिच्या feelings, emotions ने असते.ते प्रेम करावे लागत नाही ते पूर्णपणे by heart असते.आणि त्या heart च heart म्हणजे तिच्या बाळाचं heart.

आपण प्रेमाची व्याख्या काय करतो हे महत्त्वाचं आहे.
बऱ्याच जणांचं म्हणणं असते की love marraige हे यशस्वी होऊ शकत नाही पर्याय फक्त arrange marraige च आहे.पण मला वाटते की इथं प्रेम खरं असेल तर काही problem नाही येणार.Arrange marraige मध्ये आधी सगळ्यांच्या संमती ने लग्न होत आणि नंतर प्रेम,पण जर दोघांचे विचार वेगळे असतील तर खूप प्रॉब्लेम्स येतात.

एकदा प्रेम केल्यावर ते आयुष्यभर टिकवला पाहिजे,लग्नानंतर पूर्ण आयुष्य काढायचं असते ते पूर्ण आयुष्यभर टिकवून ठेवलं पाहिजे,प्रेमात एकमेकांनी एकदुसर्याल समजून घेतलं पाहिजे.

अस म्हणतात प्रेम झाल्यावर माणसात खूप काही बदल घडलेले दिसतात, मग ते प्रेम सजीव गोष्टीवर असो वा निर्जीव गोष्टीवर उदा. जर एखाद्याला music आवडत असेल तर त्या गोष्टीत स्वतःला पूर्णपणे झोकून देईल,त्याला त्या गोष्टींशी एक attachment तयार होईल.

जर आज आपल्या पिढीने प्रेम या विषयाचा अर्थ समजून घेतला तर येणाऱ्या पिढीत खरा बदल होईल आणि जे काही आज देशात वाईट गोष्टी होत आहेत त्या कमी होण्याच्या भरपूर शक्यता असतील. आणि जर  आपण आपल्या पुढच्या पिढीला अशाच प्रकारे टॉर्चर केलं आपल्या सारख बनवण्यात तर खुप प्रॉब्लेम्स होतील त्यांना त्यांच्या स्वतंत्र मनाने/बुद्धीने विचार करू दिले पाहिजे.

जर तुम्ही आमच्या मनाप्रमाणे वागला तरच तुमच्या वर आमचे प्रेम आहे, हे चुकीचं आहे हे वडीलधारी मंडळींनी समजून घेतलं पाहिजे.

ज्या वेळेस एखादा व्यक्ती relatinship मध्ये असतो त्याने समोरच्या व्यक्ती वर बंधन टाकणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण ते आपले विचार आपण दुसऱ्यावर थोपणं हे बरोबर नाही.
आपण म्हणतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे.पण किती जण देश स्वछ ठेवण्यास पुढं येतात,मनापासून?किती जण रस्त्यावरचे सिग्नल follow करतात?किती जण curroption करतात?

किती जण देशात शांतता टिकवतात?




Source: Internet

-जयंत जाधव,
 लातूर

       प्रेमाची व्याख्या करणे तसे खूप अवघड काम आहे व कोणाच्या सोबत तुलना करणे ही शक्य नाही.प्रेमात अपेक्षांची यादी फार कमी असावी लागते व देण्याची यादी मोठी असावी.सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच आपल्या मुलांच्या विषयी असलेले प्रेम आहे .शाळेत असताना शिकायला मिळाले की ऊर्जा ही अक्षय असते .अगदी तसेच खरे प्रेम हे अक्षय म्हणजे न संपणार असते.आपल्याला जीवनात कोणी यावे हे जरी नशिब ठरवते पण आलेल्या माणसाला थांबून ठेवणे आपल्या मनाच्या  हाती असते.
प्रेमाच्या प्रवासात जीवनाचे बंध हे नेहमी पुढे घेऊन जाणारे असावेत.मागे ओढून नेणार हे प्रेम नसते ते असते स्वार्थ.
शेवटी Love means a person's face, on her motives, on the role, vision. To sacrifice love for proving love, to bear exploitation- compulsion, to sacrifice excessive sacrifice - these are wrong ideas. Because love means respect for the person's mentality, self-respect. Love means acceptance of qualities and conflicts -deficiencies. To know about the person's problems and to take the initiative to solve them, to make his life happy.

४ टिप्पण्या:

  1. I am really surprised by the quality of your constant posts.You really are a genius, I feel blessed to be a regular reader of such a blog Thanks so much..I’m really enjoying the design and layout of your site. It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire out a designer to create your theme? Excellent work!
    Onlinekaj.com
    Mobile price bd plz sir Don't delate my comment, It’s dependent my future Thank you.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्यक्षात प्रेम ही काही एकच घटना नाही किंवा एकच मन स्थीती नाही. प्रेम एकाच व्यक्तीवर, वस्तूवर,स्थिती वर होते असेही नाही.आपला आपल्या मित्रावर आणि परीवरावर आसतच किप्रेम.पण प्रे म, आवड, काळजी घेणे/वाटणे या गोष्टींचा जवळचा संबंध आहे. प्रेम हे कधी हितचिंतक असू शकते. प्रेमाचे हि प्रकार आहेत. आसं म्हणतात की प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे, पण माझा देवानंद शिंदे चा आणुभव सांगतो की ही गोष्ट फक्त भासणापुर्तीच मर्यादित आहे, महाराष्ट्रात मात्र प्रेमात स्वार्थ आहेच, मग तो आईवडिलांच्या, भावंडांच्या, जोडीदाराच्या किवा मित्राच्या पण.
    प्रेमळ व्यक्ती सर्वांवरच प्रेम करतात. ज्यांना फायदा पाहिजे ते सर्वांचाच फायदा घेतात मग तो परिवार आासो वा परके. फसवणूक करणारे कधी ना कधी मोका शोधून फसवणूक करणारच. प्रेमाचं पण तसाच आहे.

    तरूणांसाठी लग्नानंतर प्रेम करणे आधिक योग्य आहे कारण तिथे वचनबद्ध ता आसते, जबाबदारी असते, सामजिक दबाव असतो, चार लोकांना या गोष्टी माहीत असतात आणि त्याचे फळांतर पण आसते.
    शाळा कॉलेजात तरुण तरुणींना आत्मनिर्भता नसते. त्यामुळे ते ना जबाबदारी घेऊ शकतात ना वचन पळू शकतात. त्यांची वाचणे मुळात तोडण्यासाठी दिलेली असतात. या गोष्टी समजल माहीत नसल्याने ते लवकर तुटतात एकमेकांच फायदा घेऊन. थोडक्यात तिथे फसणुक जास्त होते.

    अजकाल बड्या बड्या बाता आणि टींब टिंब खाईं लाता आशीच परिस्थिती आहे प्रेमात.

    11/01/20 4.03 pm Bharuch, gujrat
    (एक बिडकर)

    प्रतिक्रिया कळवा shindedevanand265@gmail.com
    धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्यक्षात प्रेम ही काही एकच घटना नाही किंवा एकच मन स्थीती नाही. प्रेम एकाच व्यक्तीवर, वस्तूवर,स्थिती वर होते असेही नाही.आपला आपल्या मित्रावर आणि परीवरावर आसतच किप्रेम.पण प्रे म, आवड, काळजी घेणे/वाटणे या गोष्टींचा जवळचा संबंध आहे. प्रेम हे कधी हितचिंतक असू शकते. प्रेमाचे हि प्रकार आहेत. आसं म्हणतात की प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे, पण माझा देवानंद शिंदे चा आणुभव सांगतो की ही गोष्ट फक्त भासणापुर्तीच मर्यादित आहे, महाराष्ट्रात मात्र प्रेमात स्वार्थ आहेच, मग तो आईवडिलांच्या, भावंडांच्या, जोडीदाराच्या किवा मित्राच्या पण.
    प्रेमळ व्यक्ती सर्वांवरच प्रेम करतात. ज्यांना फायदा पाहिजे ते सर्वांचाच फायदा घेतात मग तो परिवार आासो वा परके. फसवणूक करणारे कधी ना कधी मोका शोधून फसवणूक करणारच. प्रेमाचं पण तसाच आहे.

    तरूणांसाठी लग्नानंतर प्रेम करणे आधिक योग्य आहे कारण तिथे वचनबद्ध ता आसते, जबाबदारी असते, सामजिक दबाव असतो, चार लोकांना या गोष्टी माहीत असतात आणि त्याचे फळांतर पण आसते.
    शाळा कॉलेजात तरुण तरुणींना आत्मनिर्भता नसते. त्यामुळे ते ना जबाबदारी घेऊ शकतात ना वचन पळू शकतात. त्यांची वाचणे मुळात तोडण्यासाठी दिलेली असतात. या गोष्टी समजल माहीत नसल्याने ते लवकर तुटतात एकमेकांच फायदा घेऊन. थोडक्यात तिथे फसणुक जास्त होते.

    अजकाल बड्या बड्या बाता आणि टींब टिंब खाईं लाता आशीच परिस्थिती आहे प्रेमात.

    11/01/20 4.03 pm Bharuch, gujrat
    (एक बिडकर)

    प्रतिक्रिया कळवा shindedevanand265@gmail.com
    धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************