महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागील राजकीय हेतू

महापुरुषांचे पुतळे उभरण्यामागील राजकीय हेतू

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

Source:- INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

  "बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका"
कवी कुसुमाग्रज यांच्या वरील कवितेच्या ओळी आजच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागील राजकीय हेतू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत.

चांगला समाज निर्माण व्हावा यासाठी योग्य प्रेरणा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.मग ती एखादी  महान व्यक्ती असू शकते अथवा तिचे स्मारक किंवा त्या व्यक्तीचा पुतळा.महान व्यक्तींच्या जीवन चरित्र यातून मिळणारा आदर्श शिकवण व प्रेरणा ही सतत प्रवाहित राहवी ह्या उद्देशाने  पुतळ्यांची निर्मिती केली जाते. हे काम चांगले आहे. पण फक्त पुतळे उभारुन आपली जबाबदारी संपते का? थोर व्यक्तींच्या शिकवणीतून समाजाला योग्य संस्कार,शिस्त लागते. आता आपल्या विषयाच्या मुद्दयाकडे वळू. कोणत्या विषयावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी हे राजकारणी लोकांना छान समजते.
 अनेक वर्षांपासून छञपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भोवती गल्ली पासून ते दिल्ली पर्यत  राजकारण चालते आहे.त्यांचे आचार-विचार साधारण जनता अमलात आणत आहे.यातूनच एक अस्मिता व भावना निर्माण झाल्या.राजकीय लोकांनी ही नस ओळखून आपल्या स्वार्थ साध्य करण्यासाठी पुतळे उभारण्याची अघोरी अशी पद्धत चालू केली.
पुतळ्यांवरुन गलीच्छ राजकारण सुरु झाले.समाजात फुट फाडून दंगली घडविल्यात व कायदा सुव्यवस्थेला बिघडवल्या गेली आहे. अशाने पुतळा निर्माण करण्यामागचे मुळ उद्देशांना तडे गेले आहेत.महापुरूषांचे आम्हीच खरे वारसदार म्हणून प्रत्येक संघटना व राजकीय पक्षांची चाललेली भांडणे, राडेबाजी हा आपल्या  भारतीयांसाठी शरमेची बाब आहे कौतुक किंवा गौरवाची नाही.ह्याचे अलीकडील उत्तरम उदाहरण  म्हणून दादर, शिवाजी पार्क येथे इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर महामानव, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय  दर्जाचे स्मारक  उभारण्यासाठी गेल्या वर्षी बाबासाहेबांच्या शत्तकोत्तर जयंती उत्सवाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताने भूमिपूजन उरकण्यात आले.मात्र पुढे या स्मारकासाठी एक वीट तरी रचली गेली का? यावर राष्ट्रवादी पक्षाने दिनांक १९.२.२०१८ एक अनोखे आंदोलन केले.त्यांनी दुर्बिनीमधून अरबी समुद्रात शिवाजी राजेंचे स्मारक कुठे दिसते का?अरबी समुद्रात शिवाजी राजेंच्या स्मारकाचे ही भवितव्य अंधकारमय आहे?
पण भोळ्या स्वभावाची भारतीय जनता कुटील राजकारणींचा हा अघोरी खेळ  केंव्हा समजेल.माझ्या मते समजून देखील परंपरागत आंधळी भक्ती किंवा एक  बाटली दारु व थोड्या रुपयांसाठी लोक दुर्लक्ष करतात.
मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते  ॲड. असिम सरोदे यांनी परखड पणे म्हणतात,'भारतीय राजकारण्यांनी पुतळ्यांचे राजकारण करून ठेवले आहे.त्यामुळेच आपण समाज म्हणून मागासलेले आहोत.पुतळे नको विचार पाहिजे, हे लोक ज्यावेळस म्हणतील, त्या वेळेस विकास व्हायला सुरूवात होईल.'
भारतात अलिकडे महाराष्ट्रात औरंगाबाद येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुतळ्यावरुन बरेच राजकारण घडले.एकीकडे विद्यार्थ्यांना राहायला पुरेशी वस्तीगृहे नाहीत,त्यासाठी पैसा नसल्याचे सांगितले.नंतर ह्याच विद्यापीठात एक अवाढव्य पुतळा उभारणीसाठी ४० लाख रुपये एका ठरावात मंजूर केले गेले.अशा दुटप्पी धोरणाला काय म्हणावे? देशाचे भवितव्य घडवणा-या विद्यार्थ्यांपेक्षा  लाखो-करोडो रुपयांचे निर्जीव पुतळे महत्त्वाचे काय? यावर विचार करावाच लागेल.
प्रत्येकाला सकारात्मक व रचनात्मक विचार करता आला पाहिजे.मानवी हक्काचा भाग आपण बनले पाहिजे.विचारांना कुंपण घालण्याचा अधिकार कोणाला नसल्याचे सरोदे यांनी यावेळी म्हटले.तर समाजात एकमेकांना शंकेने पहायला सुरूवात झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात होत असलेल्या स्मारकाबाबत बोलताना ते म्हणाले की, अशी स्मारके तयार होत असताना पर्यावरणाचा विचार करायला हवा होता.कोळी लोकांचे जीवन यामुळे उध्वस्त झाले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराज यांचे पुतळे निर्माण करून विकास होणार नाही.त्यांचे विचार आपण घेतले पाहिजेत.


Source:- INTERNET
-प्रवीण,
 मुंबई

महापुरशांचे पूतळे बांधून त्यांच्या अनुयायांची मने जिंकने आणि त्यांचे रूपांतर मतात करने हा वर्षानुवर्षे चालत आलेला ट्रेंड आहे.
तसेच ह्या पुतल्यांचा, ते बंधनार्याचा आणि त्याचे समर्थन करणार्यांचा महापुरुषांच्या शिकवानीशी दूरं दूर पर्यन्त सम्बन्ध नसतो. आज बौद्ध धम्म हा मुर्तीपूजा मानत नाही आणि जगात सर्वात जास्त मुर्त्या या गौतम बुद्धांच्या. हा कसला विरोधाभास.म्हणजे अपण त्यांची शिकवानुक किती आत्मसात केलेय हे कळते.
महाराष्ट्रात पण हा विरोधाभास दिसतो. रयत उपाशी असताना करोडो खर्च करून महाराजांचा पुतळा जर बांधला जाणार असेल तर याला नक्की काय म्हणायचे?
शिवजीमहाराजांना विषयी चे भोले प्रेम की त्या प्रेमाचे भांडवल करणारे राजकारण?
शेवट एका महान क्रांतीकरकच्या विधानने करेन

क्रांतिकारक जीवन जगत असताना सत्ताधारी त्याचे अतोनात छळ करतात. त्याची पद्धतशीर बदनामी करण्याच्या कारवाया चालू असतात परंतु हा क्रांतिकारक मरण पावल्यानंतर मात्र तो  ज्या पददलित जनतेच्या सुखासाठी धडपडत असतो त्या जनतेला समाधान लाभावे म्हणून हेच चतुर सत्ताधारी या क्रांतिकारकाचे निरापुद्रवी स्मारके उभारतात. त्या क्रांतिकारकांच्या शिकावणूकीचा खरा अर्थ लोकांच्या स्मृतीतून कायमचा पुसला जावा यासाठीच हि दिखाऊ स्मारके उभारलेली असतात.

- ब्लामिदीर लेनिन
(रशियन क्रांतिकारक )


Source:- INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
उस्मानाबाद

या आठवड्यात लिखाणासाठी घेतलेले दोन्ही विषय महत्वाचे आहेत व काळाची गरज ओळखून ते समोर ठेवलेत त्याबद्दल ग्रुप अडमीन चे आभार...
महापुरुषांचे पुतळे व हे पुतळे उभारण्यामागील राजकीय हेतू खरंच विचार करण्यास भाग पाडणारा विषय आहे पण आजकाल काही ठराविक लोक वगळता सर्वच जण या चक्रव्यूहात अडकून पडलेले आहेत असं आपणास दिसतं..
आणि आता याविषयी परखड मत व्यक्त केले कि जनभावना दुखावत आहेत हे आपण पाहतोय.
पुतळे उभा करून महापुरुषांचे विचार लोकांच्या गळी उतरवता आले असते किंवा त्या पुतळ्यांच्या दर्शनाने सामाजिक सुधारणा झाल्या असत्या तर संबंध जगात शाळा महाविद्यालय ऐवजी पुतळ्याचे राज्य पहायला मिळाले असते.ठराविक समाजाला पुतळ्यांच्या भोवताली फिरवून आपल्या मतांची झोळी वर्षानुवर्षे भरली जाऊ शकते हे राजकिय लोकांनी केंव्हाच ओळखले आहे, पण हे कुटील राजकारणी या पुतळ्यांच्या नावानं राजकारण करून नागरिकांचं भविष्य उज्ज्वल होण्यापासून रोखत आहेत हे सुजाण नागरिकांना कधी कळणार.
आज पुतळे उभारण्यासाठी देशभर अनेक आंदोलन झाली, आज पुतळ्यांच्या नादात नागरिक आपल्या प्राथमिक गरजा सुध्दा राजकीय लोकांकडून पूर्ण करून घेऊ शकला नाही हे देशाचं दुर्दैव आहे.
आज देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतोय म्हणे अन आपण अडकलो आहोत पुतळ्यांच्या अस्मितेत.
पुतळे प्रेरणा देतात हे मान्य आहे पण आज पुतळ्याच्या नादात किती पद्धतीने समाज जातीधर्मा मध्ये विभागला जात आहे किती द्वेष निर्माण होत चालला आहे हे कुणी पहात नाही.
आज देशात भूकबळी जाणाऱ्या किंवा दारिद्र्याने त्रस्त लोकांची संख्या किती आहे हे तुम्हाला आकडेवारी लिहून सांगायची गरज नाही, तरी देखील आज देश पातळीवर एखादं अन्नछत्र का उभारलं जात नाही, कमी किमतीत अन्न मिळवण्यासाठी का एखादी योजना आजपर्यंत एका ही सत्ताधारी मंडळी च्या मनात अली नाही हे प्रत्येकानं पाहावं.
काही लोकांना पुतळे हवे आहेत तर काहींना दोनवेळेच अन्न..
आपली गरज भागली म्हणून दुसर्याकडे काणाडोळा करणारी काही निष्ठूर लोकं याच समाजात वावरताना दिसतात.
समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी, त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी पुतळे उभारले जातात हा दावा धादांत खोटा आहे,
या पुतळ्याच्या नादात कोट्यवधी खर्च करायला सरकार कडे पैसा व वेळ आहे पण लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडे ना पैसा आहे ना वेळ , याला कोणताच पक्ष अपवाद नाही.

असं म्हणतात कि माणूस धर्मासाठी मरायला तयार असतो पण धर्माप्रमाणे वागायला तो कधीच तयार नसतो अगदी त्या प्रमाणे आजकाल लोक व राजकीय मंडळी महापुरुषांच्या पुतळ्यासाठी काही पण करतील पण त्यांचा एक ही विचार आचरणात आणण्यास तयार होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे..
नागरिकांना सुध्दा राजकीय लोकांनी पुतळ्या सारखं बनवून सोडलंय असं खेदाने म्हणावं लागेल.


Source:- INTERNET
-जगदीश लोंढे,
 मुंबई

                  देशात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.पुरोगामी म्हणजेच प्रत्येक नव्या विचाराला सोबत घेऊन समाजाची योग्य ती प्रगती करणे.समाजातुन जुनाट आंध्रश्रध्दा , चालीरीती , प्रथा नष्ट करून समाजात सर्व लोकांमध्ये समता प्रस्थापित करणे.त्याची महाराष्ट्रला मोठी परंपरा आहे.शिवराय , फुले , शाहू , आंबेडकरी विचारधारा महाराष्ट्र मानतो. ही विचारधारा ही चळवळ आजही लोकांमध्ये जिवंत आहे.हे  महाराष्ट्रचे  महापुरुष आहेतच.
           प्रत्येक समाजाचे स्वतःचे महापुरुष आहेत.आणि प्रत्येक समाजाला त्याचा अभिमान आहे.आणि तो असलाच पहिजे.आजच्या काळात  महापुरुषांचे मूळ विचार बाजूला ठेवून तरुण युवक जाणीवपूर्वक वळवले जातंयत.राजकीय लोक स्वतःचे लक्ष्य साधण्यासाठी महापुरुषांच्या नावाने समाजची मूळ प्रश्नापासून दिशाभुल करण्याचे काम करत आहे.आजकल भावना भड़कवन्यासाठी आणि आपल्या सोयीनुसार जाती धर्माच्या भिंती उभारण्यासाठी काही पातळयांत्रि लोक लोकपुरुषांच्या  नावाचा वापर करून सारासार  राजकारण करतात.लोकं कसं जगत असतील रोजचं आयुष्य याची काहीही फिकर न करता धडाधड योजना राबवण्याने तुम्ही आज मोठे व्हाल. कारकीर्द संपल्यावर खतम खेळ. उद्या दुसरे राजे येतील अशीच शिवाजी महाराज, टिळक, आंबेडकर, फुले, सावरकर, गांधी, नेहरू यांच्या नावांच्या ढाली घेऊन. या सगळ्यांनी काय केलं ते माहीतीये हो लोकांना.. तुम्ही यातल्या कुणाचंही नाव न घेता काय करणार ते बोला. काय खरं नाही. जनतेला नकोयत स्मारकंनफिरकं. गरीबाला भरकटवण्याचे त्यांना आशा दाखवून स्वार्थ साधण्याची कामं आहेत ही सारी.महापुरुषांच्या नावाने पुतळे उभारून होणार आहे,  का गरीबी कमी.आजही मोजक्या टुट्क्या पगारावर जगणारी 60% लोकसंख्या आहे आपली.त्यांच दैनंदिन आयुष्य कसलीही हौस मौज न करता फक्त पोट भरण्यातच त्यांच आयुष्य खर्ची जातंय.ही त्यांची ही चूक असेलच की,  पण त्यांना योग्य ती संधी वेळेवर उपलब्ध करून देने यासाठी मुळात राजकीय इच्छाशक्ति लागते.आणि आपले राजकीय लोक बसलेत महापुरुषांचे पुतळे उभारत.यामध्ये जनता खरंच भावनिक होते त्याचा पुरेपूर फायदा राजकीय लोक घेतात.लोकांनीच भावनांना आवर घालत कोणता  राजकीय नेता आपला खरा उद्धार करेल , याची जाणीव ठेवून ती लोकप्रतिनिधी निवडला पहिजे.आपण निवडलेला लोकप्रतिनिधी जर नुसतंच महापुरुषांच्या नावाने लोकांची दिशाभुल करत असेल तर त्याला योग्य तो रस्ता दाखवायला हवाच...
           
                  ‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************