मानसिक आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन

 मानसिक आजाराकडे  पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन

- क्षितीज गिरी,  (सातारा)

खूप लोकांना आपल्याला मानसिक आजार आहे याची कल्पना पण नसते.कारण खूप प्रकारचे मानसिक आजार असे आहेत ते लवकर कळून येत नाहीत. मानसिक पण आजार असतात हे मुळात खूप जणांना माहितीच नसते.त्यामुळे त्याची लक्षणे दिसू लागली की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.जसे की बायकांच्या अंगात येणे हे पण एक मानसिक आजाराचे लक्षण आहे.आणि असे भरपूर मानसिक आजार आहेत त्याला आपण देव धर्म चमत्कार या प्रकारे बघतो आणि अंधश्रद्धेला बळी पडतो.काही सुशिक्षित लोक पण याला बळी पडतात.
अचुत गोडबोले यांनी आपल्या मनात या पुस्तकात याबद्दल खूप खोल वर जाऊन माहिती दिली आहे.
गावात काही लोक हे वेडे असतात.म्हणजे गावातील लोक त्यांना वेडे म्हणतात,पण खर तर त्यांना योग्य प्रकारच्या उपचाराची गरज असते आणि त्यांस बरोबर आपल्या व समाजाच्या मानसिक आधाराची.ती त्यांना भेटते का.हा खरा प्रश्न आहे.मध्यंतरीच्या काळात काही सामाजिक संस्था या कामात पुढाकार घेऊन त्यांनी पुण्यातील रस्त्यावर फिरणारे  मानसिक रुग्ण बरे करण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले.पण मुख्य प्रश्न समाजाची मानसिकता बदलण्याचा आहे.काही ठिकाणी तर लोकांना संमोहित करून खून सुद्धा करवून घेतले आहेत.नंतर पोलीस रिपोर्ट मध्ये त्याचा खुलासा लागला.
प्रत्येक ठिकाणी जेव्हा काही चमत्कार घडतो तेव्हा तिथे देव नाहीतर भूत असेल आसा विचार करण्यापेक्षा आपण त्या चमत्काराच्या खोलात जाऊन असे कसे घडू शकते काय असेल याच्या पाठीमा गचे  कारण असा  विचार केला पाहिजे.पण जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा बाकी लोकांची  उत्तरे खूप सोपी असतात जशी की 'अरे त्याच्या अंगात भूत शिरले आहे म्हणून तो वेड्या सारखा करत आहे' असे म्हणून ते आपले मोकळे होतात.हा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.आणि त्याची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे.
____________

 किरण पवार, औरंगाबाद.

             सहसा समाजाचा मानसिक आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रात तरी खेड्यात नी शहरात थोड्या शिकलेल्या लोकांचा वेगवेगळा असलेला जाणवतो. सहसा ग्रामीण भागात मुळात असा आजार असतो; याची तितकी जाणीवच नसते. आणि एखाद्याला मानसिक त्रास होतोयं तर त्यालाही ते लवकर उमजत नाही. अशात बऱ्याचदा काहींना नंतर थेट वेड घोषित केल्या जात. गावात याचे पडसाद चित्रविचित्र उमटलेले पहायला मिळतात. मी आमच्याच गावात असे दोन मानसिक रूग्ण पाहिलेत ज्यांच्यावर जर वेळीच काही उपचार झाला असता तर आज परिस्थिती काही वेगळी असती. आणि मुळातच आपल्याकडे ग्रामीण भागात एखाद्या जिल्ह्यात फार फार तर एखादा डाॅक्टर मानसिक आजारासाठी असलेला पहायला मिळतो. त्यातही त्याची ख्याती त्या एकाच शहरापुरती मर्यादित असते. खरतरं या गोष्टीबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात होणं आज गरजेचं आहे. एवढे अंधश्रद्धेचे मेसेजेस फिरतात व्हाॅट्स-अॅपवर एखादा मानसिक आजारावर लेख का असू नये? ग्रामीण भागात तालुक्यातील सरकारी रूग्णालयांमधे प्रत्येक तालुक्यात किमान एक डाॅक्टर सरकारने मानसिक आजारावरील नेमायला हवा. आता या गोष्टींची एखाद्या सरकारला जाण कधी येईल, आपल्याला नाही माहित.
           शहरांच म्हणाल तर, त्या त्याबाबतीत शहरे थोडी नशीबवान. पण इथेही विचारांची मोठी आडकाठी आडवी येतेच बऱ्याचदा. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटतं की, यावर चांगला उपाय जनजागृती ठरू शकतो. मानसिक आजारातून जो जात असतो त्याची खरी कसोटी पणाला लागलेली असते नी जनता मात्र त्याची टिंगल करत राहते, किती हे विदारक म्हणायचं? तूर्तास एवढ्यरच थांबतो. धन्यवाद!
________________


अंजली प्रविण, नागपूर.

मी कारागृहात काम करते.  समाजात ज्यांनी अगदी क्रूरतेने निर्घुण हत्या करणाऱ्या कैद्यांशी माझा संबंध असतो.  मी त्यांच्या सोबत त्यांना मिळायला हवे असणारे समान मुलभूत  हक्क आणि अधिकारासाठी काम करते. यामध्ये बहुतेक स्वतःच्या आई, वडील, पत्नी, मुल यांचा खून करणारे कैदी असतात.  यांच्या मानसिकतेचा अभ्यास करताना लक्षात आले कि, यात बहुतेक मानसिक आजाराचे बळी आहेत. त्यांच्या बालपणापासूनच्या जीवन घडणीचा हा परिणामाने त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो.  एका उदाहरणातून सांगायचं तर एक २८ वर्षाच्या मुलाच्या मानसिकतेचा अभ्यास करत असताना लक्षात आले. लहानपणापासून त्याने  सतत आई वडिलांचे भांडण बघितले, त्यांचा तुटलेला विस्कळीत संसार बघत मोठा झाला,  वडील रोज दारू पिऊन आईला पूर्ण गावात रस्त्यावरून मारत फिरायचे हे तो रोज रोज बघत होता. वयाच्या नवव्या वर्षी वडिलाने दुसरे लग्न केले. ते घर सोडून निघून गेले.  त्याच्या मोठ्या भावाला पण वडील तिकडून घेऊन गेले. पण मध्येच आठवण आली कि पुन्हा येऊन आईला दारू पिऊन तशीच मारहाण सुरु होते. त्या आईला सतत डोक्यावर मारून मारून वेड्यासारखे वागायला भाग पाडले.  त्याचे वडील व त्या भावाने कधीच कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. या सर्व जीवन घडणीत न त्याचे कधी शिक्षण झाले न कोणी मित्र झाले न कोणी नातेवाईक त्यांच्याकडे यायचे.  मजुरी काम करत असताना हि ३ ते ४ वेळा उंच झाडावरून डोक्यावर पडल्याचे अपघात झाले पण या साठी  गावातील छोट्या सरकारी रुग्णालयात त्या बाहेरील जखमेवर उपचार झाले. पण मेंदू वरील आघाता वर उपचार झाले नाही.  अखेरीस तो हि सतत चिडचिड –शिवीगाळ करू लागला  – व्यसनाच्या  अति आहारी गेला – अगदी जसे वडील त्या आईला रस्त्यावरून मारत असे तसेच तो हि करू लागला. छोट्या छोट्या रागामुळे कुत्र्यांना कुऱ्हाडीने मारू लागला. आणि अखेरीस आईलाही कुऱ्हाडीने मारून टाकले.  आज तो स्वतः ची दैनंदिन सर्व कामे स्वतः करतो म्हणून तो मानसिक रुग्ण नाही असे समाज, शासनयंत्रणा आणि न्यायव्यवस्थेने घोषित केले. 

 आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा मानसिक आजाराचा रुग्ण आहे हे सिद्ध करायला त्याने वेड्या सारखे म्हणजे अंघोळ न करणे, कपडे नीट न घालणे, स्वतः ची दैनंदिन काम स्वतः न करणे अश्या काही  सवयीनुसारच मानसिकतेचे निदान होते. अश्या सवयी असणारी व्यक्ती म्हणजे मानसिक रुग्ण आणि यावर उपचार म्हणजे मनोरुग्णालय आणि तेथील गोळ्या व इलेक्ट्रिक शॉक पद्धती.   आपल्याकडे अत्यंत कमी  प्रमाणात सायकेट्रिक आणि सायकोलॉंजीस्ट आहेत देखील पण त्यांच्याकडे कधी व का जावे ? हे देखील साधे अजून समाजात कोणाला माहिती नाही. एकीकडे  ती उपचार पद्धती हि परवडणारी नसते.   तसेच दुसरीकडे त्याच्या उपचाराच्या वेळी त्याला साथ न देता कुटुंब समाजापासून  वेगळे केले जाते.

 खूप अवघड आहे समाज आणि न्यायव्यवस्था या दोघांचा हि मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे.  पण आज मला इतकं कळले कि बघण्याचे दृष्टीकोन बदलण्याचे प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत.
_______________________

संगीता देशमुख, वसमत.

       मानसिक आजार म्हणजे आजार आहे,तो एक रोग आहे हे मानायलाच तो रोगी आणि समाजही तयार नसतो. आपल्या देशात तर ९०% मानसिक आजार हे  अंधश्रध्देचेच बळी ठरलेले आहेत. अशिक्षित,मध्यमवर्गीय कुटुंबात  करणी,भूतबाधा,भानामती या  सर्व मानसिक आजाराना आजार न मानता,यावर  कुठलेही शास्त्रीय वैद्यकीय उपचाराविना
भोंदूबाबा,धूप अंगारे याचे बळी ठरतात. सुशिक्षित कुटुंबात  अनेकजण मानसिक आजार आढल्यास ते बाहेर सांगणे म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न समजून त्याचे दमनच करतात. एकदा असा आजार झाला की तो जीवनभर बरा होणारच नाही,असाच भ्रम समाजाने करून घेतलेला आहे.  या सर्व प्रकारामुळे मानसिक रुग्णाला जे समजून घेऊन उपचार भेटायला पाहिजे ते उपचार भेटतच नाही. त्यामुळे मानसिक आजार ही  आपल्या देशातील सध्याची  ज्वलंत समस्या आहे. मानसिक रुग्णाकडे पाहण्याचा सर्वप्रथम त्याच्या कुटूंबातील लोकांना,मित्रमैत्रिणीना आणि  समाजाला निकोप दृष्टीकोण स्वीकारावा लागेल. मानसिक रुग्णाचे जेवढे समुपदेशन महत्वाचे आहे तेवढेच त्या रुग्णाच्या सहवासात येणाऱ्या लोकांचेही समुपदेशन आवश्यक आहे. मानसिक रुग्णाला वैद्यकीय उपचारासोबतच सहानुभूती,प्रेम,सामंजस्य याची जास्त गरज असते,जी आज आपल्या समाजात नाही.
माणसामाणसातील दुरावा,संवादाचा अभाव,भौतिक सुखाचा अतिरेक,चंगळवाद,राक्षसी महत्वाकांक्षा, त्यासाठीची स्पर्धा,आहार विहाराच्या चुकीच्या पध्दती, ही सगळी कारणे मानसिक आजाराची प्रमुख कारणे आहेत. समाज निकोप बनवायचा असेल तर या सगळ्या कारणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
_______________________________
-करण बायस, हिंगोली.

प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात आणि नैराश्याला सामोरे जावे लागते.अशा गोष्टींचा जीवनावर खूप परिणाम होतो. अशा परिस्थितीतुन सवरताना सतत एक विचार येतो की माझ्यावर पुन्हा ही परिस्थिती येऊ नये.कारण अशा परिस्थितीना सामोरे जाण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते.तणाव हाताळण्याची क्षमता वेगळी असते.
जास्त तणावामुळे शरीरावर दुष्परिणाम होतातच.आजच्या या धावपळीच्या जीवनात मानसिक आजरांचे प्रमाण वाढत आहेत. माणूस आता डिजिटल होत आहे,म्हणजेच माणूस बाहेरील जगाच्या, निसर्गाच्या, मित्रांच्या, कुटुंबाच्या दूर जात आहे आणि एका आभासी जगात हरवत चालला आहे. ज्यामुळे मानसिक आजार वाढत आहे.
एखादा मनोरुग्ण मनोरुग्णालयात भरती होतो त्यावेळेस तो घरच्यांपासून, आपल्या माणसांपासून, एकटे न पडू देणाऱ्या मित्रांपासून दुरावतो,कारण हे सगळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात, आणि मनोग्णालयाच्या चार भिंतीत तो कैद होतो.
मनोरुग्णाला खरंतर गरज असते ती आपल्या माणसांची ज्यांच्या सोबत तो मोकळेपणाने राहू शकतो.जर हा आपलेपणा ह्या मनोरुग्णाना मिळाला तर त्यांचा आजार कमी होण्यास मदत होईल.

विजया दशमी...नेमका विजय कशावर.!

📄 आठवडा 1⃣0⃣0⃣वा 📝
विजया दशमी...नेमका विजय कशावर.!


श्रीनाथ कासे , सोलापूर


भारत देश खूप विशाल आहे. यामध्ये विविध धर्म, विविध जाती, विविध भाषा आढळतात, पण ' सांस्कृतिक एकता ' आणि ' उत्सव ' आपल्याला एका धाग्यात राहायला मदत करतात.
उत्सव आपल्या जीवनात आनंद, उत्साह, सर्जनशीलता आणण्याचे काम करते. कालिदास यांच्या मते, " उत्सव प्रिय: मानवा: "  माणूस हा उत्सव प्रिय असतो.
आज विजयादशमी (दसरा) महिषासुर या दैत्याला देवीने हरवले हा तो दिवस, राम आणि रावण यामध्ये प्रभू रामाचा विजय झाला हा तो दिवस, यादिवशी रावणाचे पुतळे बनवून जाळले जातात. हा दिवस वाईट विचारावर विजय दर्शवणारा, सकारात्मक ऊर्जा देणारा, नवचैतन्य आणणारा आहे.
या दिवशी सरस्वती पूजा, शस्त्र पूजा केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे शुभ मानला जातो त्यामुळे नवीन वस्तू, सोने खरेदी या दिवशी केली जाते.
या दिवशी आपट्याची पाने ' सोने ' म्हणून दिले जाते. यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. याविषयी कौत्स आणि रघुराजा यांची कथा प्रसिद्ध आहे.

आपल्यामध्ये जे वाईट विचार, फाजील धर्माभिमान, कामचुकार गुण, आपल्यातील क्रोध, मत्सर यावर विजय मिळवून आपण विजयादशमी साजरा करावा एवढीच अपेक्षा.
------------------------------------------

संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ, पुणे

रावण ज्याला जगातील
सगळ्या वाईट गोष्टींचे प्रतीक मानतात..आणि म्हणूनच या राजाला दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जाळून वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून नेहमीच सांगीतले जाते..

     रावणाबद्दल आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा सांगितल्या जातात त्या सगळ्या वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायण यामधून..परंतु देशात या दोन रामायणा व्यतिरिक्त अनेक रामायणे आहेत.. त्यातून  रावणाची वेगळीच ओळख सांगितलेली आहे.

   सीतेचे अपहरण या एका कारणासाठी जर रावण इतका मोठा खलनायक ठरू शकत असेल..
तर..
कृष्ण का नाही..?? ज्याने रुक्मिणी चे अपहरण केले होते.
अर्जुन का नाही..?? ज्याने सुभद्रेचे अपहरण केले होते..
आणि भीष्म का नाही..?? ज्याने काशीराज यांच्या तीन मुलींचे अपहरण केले होते..
वृंदेला फसवून तिचा विनयभंग करणारा विष्णू का नाही..??
अहिल्येचा विनयभंग करणारा इंद्र का नाही..??
वालीला मारून जबरीने त्याच्या पत्नीला तिच्या दिराच्या हवाली करणारा, शूर्पणखेचे नाक कान कापणारा  लक्ष्मण का नाही..??
सख्ख्या आईची चारित्र्याच्या भंपक कारणावरून हत्या करणारा परशुराम का नाही...??

   अजून एक सांगितले जाते रावण वाईट कारण तो क्रोधीत स्वभावाचा होता एका भावाच्या बहिणीचा अपमान केल्यावर साहजिकच कोणीही कोणालाही राग येणारच..
रावण क्रोधीत होता तर मग दुर्वासा का नाही दुर्वासा च्या बद्दल कालिदास आपल्या ज्ञान शकुंतलम या ग्रंथात लिहितात सुलभकोपो महर्षी..
प्रत्येक गोष्टीत लक्ष्मण पण क्रोधीत होत होता मग लक्ष्मण का नाही..??

अजून एक संगीतले जाते रावण घमंडी होता..
घमंडी तर मग परशुराम पण होता मग परशुराम का नाही...??

 थोडक्यात, आमचा तो देव...तुमचा तो बलात्कारी राक्षस...पण मी सांगतो रावण एक न्यायप्रिय , समानतावादी असणारा एक लोकप्रिय राजा होता..परंतु कोणतेही ऐतिहासीक पुरावा नसल्यामुळे रावण हे पात्र एका वेगळ्या पध्दतिने दाखविले गेले. महाराजा रावण चे चरित्र मुळात असे नाहीच की दरवर्षी वाईटांचे प्रतीक म्हणून दरवर्षी त्यांना जाळले जावे..थोडा जर आपण बुद्धीचा वापर केला तर नक्कीच रावण इतका मोठा खलनायक नाही की, दरवर्षी त्याला जाळले जावे ही मानवता नाही. नैतिकता आणी न्यायाच्या दृष्टीने हे चरित्र कायम निर्दोष साबीत होते.

      तुम्ही जाळलं त्याला, राक्षस, दृष्ट, वाईट म्हणून हिणवल..तो संपला म्हणून अतिषबाजी केलीत..पण तो पुन्हा उभा रहाणार ताठ मानेने.. कारण तो मरत कधीच नाही.आयुष्यात संघर्ष करणारा, शून्यातून साम्राज्य उभं करणारा, आईच्या अपमानाचा बदला घेणारा.. बहिणीच्या सुखासाठी सगळी दुनिया उलथापालथ करणारा..रावण आपल्या सगळ्यांमध्ये जीवंत राहो.

नेमका कशावर आपण हा विजय साजरा करत आहोत याचा विचार जरूर सर्वांनी करवा..!!
------------------------------------------

प्रविण, मुंबई


विजय नेमका कोणावर मिळवायचा यावर विचार करत असताना पहिला हाच विचार डोक्यात आला. प्रत्येकला कुठे तरी पोहचायचे आहे, प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे. पण नेमक कुठे पोहोचायचं आहे किंवा नेमक कोणावर/ कशावर विजय मिळवायचा आहे हे अस्पष्ट आहे.

धर्माच्या निर्मात्यांनी माणसांसाठी धर्म बनविला, धर्माने माणसाच्या जीवन पद्धती ठरवल्या,  खान-पिन उठण-बसण  यावर प्रभाव टाकला , मग जाती भेद, धर्मभेद, वर्णभेद, लिंगभेद, कर्मकांडे आली , धर्माने माणसातल्या माणूसपणावरच घाव घालायला सुरवात केली आणि माणसांसाठी बनलेला धर्माचा माणूस गुलाम झाला. दुसर्याच्या धर्मावर विजय मिळवला या उन्मादात असलेला माणूस स्वतःशी च हरला.

माणसाने स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी अगदी निसर्गावर विजय मिळवून अनेक गोष्टींचा शोध लावला. प्रत्येक शोधाबरोबर त्याची भागलेली एक गरज अनेक गरजांना जन्म देऊ लागली आणि माणूस तेवढ्याच जोमाने गरज भागवू लागला; विज्ञानावर आरूढ होऊन गरजांवर विजय मिळवू लागला. या विजयोन्मादात निसर्गाचा ऱ्हास होत होता पण विजयाच्या नशेत स्वतः पराभूत होत राहिला.

सामाजिक माध्यमांनी कैक मैलांच्या भौगोलिक अडथळ्यांवर विजय मिळवून जग जोडले. पण जग जोडणारी हि माध्यमे मन जोडण्यात अपयशी ठरली किंबहुना असत्या, अफवा पसरवण्याची साधने बनली. या अफवांना बळी पडणारी माणसे पुन्हा एकदा स्वतःशीच हरली.

सुखाच्या पाठी लागून सुखाचा चुकीचा अर्थ काढत अनेक गोष्टींची निर्माती झाली. दारू, सिगारेट, जुगार , देहव्यापर इ सामाजिक व्याधिचा जन्म झाला, ती वाढू लागली आणि समाजाचा अविभाज्य भाग बनू लागली. सुखी होताहोता व्यसन आणि वासनेच्या सागरात हा माणूस बुडू लागला आणि स्वतःशीच हरू लागला.

निसर्ग, समजा, देश आणि माणूस जपायचा असेल तर विजयादशमी ला प्रत्येकाने स्वतः मधील जातीवाद, स्वतः मधील सामाजिक आणि आर्थिक भेद तसेच वासना, मत्सर, द्वेष इ चा पराभव करून स्वतः वर विजयमिळवण्याचा संकल्प करावा. विजयादशमीला नेमका विजय कोणावर तर तो स्वतःवर, स्वतःमाधल्या रावणावर .
------------------------------------------

संगीता देशमुख,वसमत

          विजयादशमी म्हटलं की डोळ्यासमोर येते महिषासुरावर देवीचा विजय,रावणावर रामाचा विजय! त्या अनुषंगाने अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला भेटतात. त्यात तथ्य किती हे त्या त्या साहित्यिकालाच माहीत! आम्ही मात्र परंपरा म्हणून त्यावर काहीही विचार न करता संस्कृतीरक्षण म्हणून अंधानुकरण करत असतो. अंधानुकरण यासाठी म्हणतेय की,कदाचित काही परंपरा त्याकाळी गरजेच्या किंवा कालानुरूप योग्य असतील परंतु आज  मुठीत तंत्रज्ञान घेऊन फिरणारी ही  विज्ञानयुगात देखील अनेक अनिष्ट रुढीपरंपरा पाळत असते. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीचा नवरात्री महोत्सव साजरा करतो. पण त्यातही चपला सोडणे,अंगात येणे,लिंबू उतरविणे,नऊ दिवस विना अन्नपाण्याचे उपवास करणे,अजून बऱ्याच अंधश्रद्धा यानिमित्ताने खेडूतासह शहरी लोक,अशिक्षितांसोबत सुशिक्षित(?)लोक जोपासताना दिसतात. मूठभर लोक अशा बाबींना विरोध करतात,तेव्हा त्यांच्यावरच  धर्मविरोधी म्हणून टिकास्त्र सोडल्या जाते. त्याबरोबरच रावणाचे दहन हेही असेच अंधानुकरण! दहा मेंदूइतका अत्यंत कुशाग्र बुध्दीचा समजला जाणारा रावण फक्त सीतेचे अपहरण करतो आणि रामाकडून पराजित होतो एवढ्या कारणाने त्याचा दरवर्षी पुतळा जाळून पैशाचा,वेळेचा अपव्यय करत प्रदुषणाला खतपाणी घालत ही संस्कृती(?)जपल्या जाते.
           आज या बाबी किती योग्य आहेत,याचा कोणी विचात करतो का? जर देवीने महिषासुराचा वध केला असेल तर गर्भापासून वृध्दावस्थेपर्यंत असुरक्षित असणाऱ्या स्त्रीला किंवा एखाद्या बंडखोर स्त्रीला आज समाज काय वागणूक देतो!! रावणाने सीतेचे फक्त अपहरण केले. त्यानेही त्याच्या बहिणीवरच्या प्रेमापोटी आणि कर्तव्यापोटीच केलेले हे कृत्य होते. एवढच आपल्याला सीतेबद्दल प्रेम आणि आदर असेल तर हलक्या कानाच्या रामाने सीतेचा सर्वश्रुत जो छळ केला त्यासाठी तर रामाचाही पुतळा जाळायला हवा. आपण इथेच चुकतो. आम्हाला स्त्रीशक्तीबद्दल आदर दाखवायचा असेल तर पुराणातल्या स्त्रियांबद्दल प्रेम दाखविण्याऐवजी आज आम्ही स्त्रीला काय वागणूक देतो हे पहायला हवे. रावणापेक्षा नीच वृत्तीने आज स्त्रियांवर,बालिकेवर करणाऱ्या बलात्काऱ्याला भर चौकात जाणण्याचे धाडस करावे. पण असं काहीही घडणार नाही. दरवर्षी रावण जाळण्यापूर्वी  आम्हाला खरच विजय कशावर मिळवायचा हे एकदा तरी विवेकाने विचार करायला हवा. असे कागदी पुतळे जाळण्यापेक्षा समाजातील आज दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला शोधून,त्याला  जाळून त्यावर विजय मिळवायला हवा.
हे खरे संस्कृतीरक्षण !
------------------------------------------

सचिन पाटील


अर्चना आणि सचिन अगदीच लक्ष्मी नारायणाचा जोडा.चार महिन्यापुर्विच संसार बंधनात अडकलेत,आनंदाचा संसार आणि विशेष म्हणजे एकाच शाळेत शिक्षक म्हणून कामावर.अगदीच सर्व आनंदी आनंद...
त्यात झाल असं,
दसर्याला शाळेत रामालीला करायच प्राचार्यांनी ठरवल आणि अर्चनाला त्यात सीतेचा रोल मिळाला,पण नेमक घोड अस अडलं की सचिनला रावणाचा रोल मिळाला.मग काय विचारायच जणू दोघांच्या मनात आणि संसारात सुंदरकाड संपुष्टात येऊन फक्त काय सीता हरणच सुरु झाला....

तिला माझ्या विषयी काय वाटत असेल.चार-सहा महिन्याच्या संसारात तीने माझ्यात रावण तर पाहीला नसेल,तीच अपहरण नाटकात करतांना वैयक्तिक आयुष्यात एका मुलीची लग्नानंतर होणारी ताटातुट तर तीला दुःखद करणार नाही ना? ह्या विचारांनी सर्वांना नेहमीच वैचारिक वाटणाऱ्या सचिनच्या मनात गोंधळ सुरु झाला.अर्चना आपली नेहमी सारखी शांत, मितभाषी आणि फारस मनावर न घेणारी.म्हणजे एकूणच नेहमी गृहीत धरली जाणारी त्यावरुन तीच्या मनाचा ठाव लागणेही शक्य नाही..अश्यातच वेळ जात राहीली आणि रामालीलेचा दिवस उजाडला......

आधीच नाट्यप्रेमी असणाऱ्या  सचिनने रावणाचा रोल अतिशय चांगला सुरु केला पण सीता हरण करण्याआधी त्यांचा मनाची घालमेल त्यालाच माहीत...
सीताहरणाचा प्रसंग सुरु झाला आणि अहो आश्चर्य सीतेच्या रुपात असणारी सीता रावणाच्या रुपातल्या सचिन सोबत हसत हसत जाऊ लागली आणि सर्वांनाच हसू आले.....
पण सचिनच्या मनात सुरु झाले प्रश्नाचे थैमान...त्याला वाटू लागलं की एकदाच अर्चनाला विचारतो...

संध्याकाळी एकांतात अर्चनाला विचारलं तेव्हा अर्चनाची प्रगल्भता अवाक करणारी होती..
अर्चना- सर्वांनाच सीतेचा राम मर्यादा पुरोषोत्तम भासतो पण खरी मर्यादा सांभाळली ती रावणाने.खर्या अर्थाने ईद्रियावर विजय मिळवणारा रावण हा उत्तम शासक,राजकारणी,निष्ठावंत आणि शुध्द चारित्र्याचा परम शिवभक्त होता.तुम्ही रावणाच्या रुपात माझ हरण करत असतांना चार महिन्याच्या संसारतला तुमच्यातला राम मला आठवला तेव्हा मला बर वाटलं पण रावाणाच रुप साकारतांना बहिणीच्या अपमानाचा बदला घेऊण्यासाठी सीतेच हरण करणारा,सीतेसारखी स्त्री आपली बंदी असुनही आपली मर्यादा सांभाळणारा,अफाट वैभव असतांनाही भक्तीत तल्लीन होऊन सर्वश्रेष्ठ भक्त ठरणारा,भाऊ विरोधात जाऊनही बंधूप्रेम जोपासणारा मर्यादा पुरोषोत्तम रावण मला दिसला,म्हणून हसत हसत मी रावणासोबत आले.....अगदी काव्यात्मक भाषेत सांगायचं तर नितीन देशमुखांच्या शब्दात

सीतेने दिली अग्नीपरीक्षा
तेव्हा चारित्र्य खरे रावणाचे उजडले

नेहमीच गृहीत धरली जाणारी अर्चना/बायको/ स्त्री अंतकरनातून बोलत होती आणि नेहमीच वाचाळ असणारा,स्वतःला वैचारिक समजणारा सचिन/नवरा/पुरुष फक्त ऐकत होता एकाच विचाराच्या तंद्रीत...
की विजया दशीमत नेमका विजय कशावर ...
------------------------------------------

फेसबुक वरील समाजसेवा



प्रविण, मुंबई

महाराष्ट्राला सामाजिक सुधारकांची फार मोठी परंपरा आहे, अगदी संत ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते डॉ दाभोळकर, अण्णा हजारे पर्यंत. या मातीं देशकार्य आणि समाजकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पण त्याच बाजारीकरण मात्र या परंपरेतील नाही. आज फेसबुक वरची समाजसेवा म्हणजे बाजारीकरण आणि कथित सामाजिकबांधिलकीच जाहीर प्रदर्शन झाले आहे. अगदी क्षुल्लक प्रसंगाचे फोटो टाकून कोणावर तरी उपकार केल्याचा आव आणला जातो. काही स्टेटस तर असे भन्नाट असतात का कळताच नाही नेमकं काय म्हणावं  ते "पूरग्रस्तांना मदत केली फीलिंग शोषली रिस्पॉन्सईबाल विथ करण, प्राची अँड 13 अदर्स"
या सोशल मीडिया च्या मायाजालात एक कळलं की फेसबुक कधीच फेस (चेहरा)बुक नव्हतं नाही आणि नसेल
________________________________________


            अभिजीत गोडसे , सातारा

              सामाजिक कार्य हा आपल्याकडे फारसा चर्चेत नसणारा विषय. दरवर्षीचा मॅगसेस पुरस्कार जाहीर झाल्यानंतर थोडीफार आपल्याकडे झालीस तर एक-दोन सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा होत राहते. कारण आपल्याला राजकीय गप्पातून सामाजिक गप्पांनकडे यायला मुळात वेळच नसतो.असो..शाहू, फुले , आंबेडकर , आगरकर , अलिकडचे आमटे , हजारे , कोल्हे इ. सामाजिक कार्य करणारी फळी होती / आहे.. शाश्वत विकासाकडे या सर्वांचे लक्ष होते.. आगरकरांनी तर राजकीय सुधारणा ऐवजी अगोदर सामाजिक सुधारणा झाल्याच पाहिजेत हाच मुद्दा रेटून धरला होता.. कारण या सर्वांनी देशहित आणि समाजहित हेच पाहिले आणि पाहत आहेत.. यांची महती पिढ्यानपिढ्या चालूच राहील.
        भारतामध्ये १९९१ नंतर खर्या अर्थाने दूरसंचार क्रांती उदयास आली.. भारत नवीन क्षेत्रांमध्ये चमकू लागला. आत्ता अलीकडे आलेले फेसबुक या माध्यमाने तर निवडणुका कशा जिंकायच्या हेसुद्धा दाखवून दिले.. या माध्यमाचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटा देखील आहे. संपूर्ण जग या माध्यमाने व्यापले. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत या फेसबुकने प्रत्येकाला जोडले, देशात परदेशात मुखवटा नसणारी माणसं यांचे आचार-विचार चांगल्या वाईट घटना फेसबुकने पादक्रांत केल्या. आणि खऱ्या अर्थानं याच्यामुळे हा फेसबुकचा चव्हाटा चांगलाच फुलला. अलीकडच्या सात-आठ वर्षांमध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशा भावनेने प्रेरित झालेली नवयुवक या फेसबुकच्या वाटेवरून समाजसेवा करू लागले.. कारण कमी कालावधीमध्ये कमी कामांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे हा फेसबुक चव्हाटा.. अलीकडच्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना बाबा आमटे कोण आहेत हे देखील माहीत नसेल पण ते फेसबूक वर फार मोठे सामाजिक कार्यकर्ते असतात.. अर्थात स्वयंघोषित देखील.. हे सामाजिक कार्यकर्ते फेसबुक वरील लाईक आणि कमेंट या आभासी माध्यमातून आपण किती थोर सामाजिक कार्यकर्ते आहोत याची त्यांना जाणीव होत राहते.. मागील महिन्यात पूरग्रस्तांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी खूपच तळमळीने फेसबुक चव्हाट्यावर मदत केली आहे असो.
       आपल्याकडे समाधानी माणूस कोणाला म्हणावे तर आपली एक ठराविक व्याख्या असते. ज्याच्या कडे गाडी, स्वतःचं घर, चार पैसे  आहेत.म्हणजे तो समाधानी पण त्याच्यापलिकडेही जग आहे हे त्याला आयुष्य संपलं तरी सुद्धा कळत नाही किंवा त्याच्या गावी ही नसते.. तसेच फेसबूक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम त्याच्यापलिकडेही जग आहे. हे अशा माध्यमातील चव्हाट्या मध्ये खेळणाऱ्या आणि त्यातल्या त्यात चव्हाट्यात राहून सामाजिक कार्य कर्त्यांना हे कळायला हवे. नाहीतर या फेसबुकच्या रंगीबेरंगी दुनियेत स्वतःचा बेरंग झालेला कळणार देखील नाही. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर आपण  वेळ किती घालवला..हे सर्व वर्ष मोजून   त्याचा स्वतःला आणि  समाजाला काही उपयोग देखील होणार नाही.
________________________________________


 अनिल गोडबोले
सोलापूर

समाज सेवा करणे हा आनंदाचा किंवा व्यवसायाचा भाग असू शकतो. आज व्यवसायिक समाज कार्यकर्ते समाजकार्याचे शिक्षण घेऊन काम करत आहेत.

काहीजण इतर सर्व व्यवसाय सोडून समाज कार्यामध्ये भरपूर जण येत आहेत... कारण काय ... तर तयार होणारी समाजातील प्रतिमा आणि  आणि वारेमाप प्रसिद्धी..

समाज सेवा करण्यासाठी निस्वार्थ राहून कार्य करता येईल पण भुकेल्या पोटाने कोणच समाजकार्य करू शकत नाही.. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व आता होणे नाही.

तर मुद्धा आहे फेसबुक वरील फोटोचा तो टाकावा किंवा न टाकावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..

काम करण्याला पैसे मिळतात ही बाब जरी खरी असली तरी.. पैसे मिळण्यासाठी प्रसिद्धी करावी लागते..

पूरग्रस्त मदत करताना आपण पाहिले की सर्वांनी केलेली मदत आपल्याला कळाली..
आता याच्या आड काही लोक... खोटे फोटो किंवा थोड्या कामाची मोठी प्रसिद्धी मिळवून मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात..

काहीजण खोट्या हृदयद्रावक कथा मांडत असतात हे केल्या मूळे खर काम करणारे मागे पडतात, हे देखील खरे आहे..

पण तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम असणारच.. पण खरे आणि खोटे समाज सेवक ओळखल्या शिवाय आपण विश्वास ठेवू नये.

बाकी समाज सेवा करण्यासाठी फेसबुकची गरज नाही, हे सत्य आहे.

एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक : शिक्षक


दत्तात्रय तळवडेकर सिधुदुर्ग

       शिक्षक म्हटलं की आपणास    वाटत की सगळा समाज घडविण्याचा ठेका घेतलेला व्यक्ती पण आपण हे विसरून जातो की पालक या नात्याने आपलीही तेवढीच जबाबदारी आहे ती सुसंस्कृत समाज घडविण्याची .असो पण शिक्षक आणि शैक्षणिक धोरण असा विषय हवा होता कारण सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर शिक्षकांसोबत शैक्षणिक धोरण ही महत्वाचे आहे पण आज कालच्या राजकर्त्यांनी शिक्षणाचा बाजार केलाय असे खेदाने म्हणावे वाटते  आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय मराठी शाळेतील विध्यार्थी संख्या त्या शाळेतील शिक्षकांपेक्षाही कमी झाली आहे.  आणि त्याव्यतिरिक्त  आपल्या शिक्षकांवर दिलेले अतिरिक्त कामाचा ताण म्हणजे जनगणना, आहार देने हिशोब ठेवणे , निवडणुकीची कामे देने वैगेरे . त्यामुळे शिक्षक आपले मुख्य काम सोडून बाकीच्या कामाकडे लक्ष देऊ लागलेत आणि त्यात मुलांच्या परीक्षाही बंद झाल्यात . मग अश्या अवस्थेत समाज घडेल कसा? आणि तो घडला नाही तर त्यास जबाबदार कोण ? शिक्षक की सरकार ?

–----------------------------------

रुपाली आगलावे,
सांगोला

 शिक्षक म्हणून समाजात वावरताना खरंच एक वेगळीच प्रचीती येते ती म्हणजे नेहमी जबाबदारीची जाणीव होत राहते की, आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना एक शिक्षक म्हणून खूप विचार पूर्वक करावी लागते.
      शिक्षकाला सुसंस्कृत समाज घडवायचा एक मूलभूत घटक मानला जातो आणि ते तितकंच खरं आहे... मान्य आहे की समाजातील इतर मंडळींवर पण ती जबाबदारी आहे पण एका शिक्षकाची जबादारी ही जरा जास्त असते मुलाच्या जडणघडणी मध्ये. पण प्रत्येक वेळी एखाद्या मुलाने काही चुकीचं केलं तर त्यावेळी फक्त शिक्षकाला जबाबदार धरण चुकीचं आहे... कोणताच शिक्षक कोणत्याही मुलाला चुकीचं किंवा वाईट मार्गावर जाण्यासाठी कधीच सांगत नसतो... त्यामुळे आशा वेळेस शिक्षकाला वेठीस धरण चुकीचच...
      शाळेत आलेला विध्यार्थी शिक्षकाकडे एका अपेक्षित नजरेने बघत असतो.. आणि ती अपेक्षा पूर्ण करणं ही एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे... एका मातीच्या गोळ्याला कसा आकार द्यायचा हे त्या शिक्षकावर अवलंबून असत... आणि म्हणूनच एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं.
--------------------------------------------


   किरण पवार
   औरंगाबाद,
 
             "शिक्षक" या शब्दाला अर्थ आणि भारतीय संस्कृतीत स्थान आपण तितकचं दर्जात देत आलो आहोत आजवर. कारण शिक्षक नाही म्हणजे सरळसरळ दिशाहीन भरकटणं, आणि हे भरकटणं कधीही न संपणार लवकरात लवकर साहजिकच अंताकडे जाणारं असतं. पण सध्या महाराष्ट्रात तरी किमान या शिक्षकावर अन्याय होताणाच दिसतोय. काही ठिकाणी एकीकडे शिक्षक बिनपगारी मुलांना शिकवून स्वत:च पोट भागवण्याकरता भाजी विकत आहेत तर कुणी अंड्याचा व्यवसाय करत आहे. खरतर शिक्षकभरती आणि रखडलेली प्रक्रिया एकदाची आत्ताकुठे मार्गी येऊ पाहतेय पण त्यातही सरकारची संथ गती चालूच असल्याचं निदर्शनास येतय.
            काही शिक्षकांना परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागलं तर काही शिक्षकांनी नव्या प्रयोगांना राबवून समाजापुढे नवे आदर्श निर्माण केल्याच आज पहायला मिळतयं. एका ठिकाणी शिक्षकांनी नक्षलवाद्यांना दररोजच्या विश्वास संपादनातून सध्याच्या राहणीमानात आणून ठेवल. ही मोठी गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल. आजवर ज्या शिक्षकांनी स्वावलंबनाचे विद्यार्थ्यांना केवळ धडेच दिले त्यांनीदेखील यावेळी स्वत: स्वावलंबनत्वाचे तीव्र धोरण हाती घेतल्याच पहायला मिळालं. पण एकूणच सारासार विचार करता शिक्षकांवर जी काही सध्याची वाईट परिस्थिती ओढावली आहे त्याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे, हे मात्र निश्चित. बाकी शिक्षकांबद्दल मनात आदर व प्रेम कायम राहिल; एवढं नक्की.
धन्यवाद!

गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..

 गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..


अनिल गोडबोले, सोलापूर

सगळेच उत्सव आपल्याला प्रिय असतात परंतु गणेशोत्सव मात्र अत्यंत मनापासून वेगळा उत्सव वाट
तो कारण, हा उत्सव नसून मराठी माणसाची जगण्याची रीत आहे असे मला वाटते

मला आठवतो तो कोकणातला गणेशोत्सव, घरातील गणपती, दीड दिवस ते 11 दिवस वातावरण निर्माण व्हायचं ना... ते पुढच्या वर्षी पर्यंत जगण्याला बळ द्यायचं.

लहान पणी जेवढा आनंद होत असे तेवढा आनंद आता देखील होत असतो. तुम्ही कोणीही असा पण वातावरण मात्र तुम्हाला मरगळ झटकायला मदत करते.

आता गावी गणपतीला जाणे होते. खर तर सर्वाना भेटायला मिळणार या आनंदाने जावे लागते.
सगळे मुंबईकर गावाकडे येतात.. भजन आरती चालू असतात.

गावाकडे गणपती आणल्या पासून विसर्जन करेपर्यंत जे वातावरण असते ते काही निराळेच असते.

गावाकडे एखादी म्हातारी विचारते, " झीला, बरो आसय मा. नोकरी काम बरा चालला ना. चांगला होयत रे बाबा तुझा. आवशी बापाशी चा नाव काढशीत  , सगळा चांगला होतला." हे ऐकून मनाला उमेद येते.

भजन आणि आरती करण्यासाठी घरोघरी रात्री उत्साहाने फिरतात मुलं.

नवी उर्मी येते आणि मंत्र मुग्ध करून जाते. तुम्ही कोणीही असा, आस्तिक, नास्तिक, विचित्र, चमत्कारिक, प्राकृतिक... तुम्हाला गणेशोत्सव अवडणारच... कारण बालपण तिथे फिरत असते ना.

आज जरा बदलत आहे सगळं.
वातावरण, प्रदूषण, नको असलेल्या चाली रीती या मात्र बदलत नाहीत.
थोडं कालानुरूप बदललो तर अजून मजा येईल...

तर सर्वाना जगण्याचे बळ देणारा गणेशोत्सव सर्वांच्या घरात साजरा होवो, ही सदिच्छा
*---------------------------------------------*

संगीता देशमुख,वसमत

         हिंदूंच्या अनेक सण उत्सवापैकी गणेशोत्सव हा एक महत्वाचा आणि चैतन्यदायी सण असतो.यात  विशेष बाब म्हणजे सेलेब्रिटी  हा उत्सव सर्वधर्मसमभावाने साजरा करतात.  महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणूनही गणेशाचा उल्लेख होतो. श्रध्दा आणि अंधश्रद्धा यापलीकडे जाऊन निर्गुण निर्विकार अशा एका प्रतिकाचे हे पूजन वाटते.  यात गणेशाची निर्मिती,त्यामागची मिथके हे सर्व जर पाहिले तर हे पूजन निरर्थक वाटते. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात एका विशिष्ट हेतूने भारतीयांना एकत्र आणण्याचा जो उद्देश होता तो महत्वाचा आहे. आज भारताला स्वातंत्र्य असले तरी काळानुसार आजही ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भारतीयांना एकत्र येणे आणि संविधानात्मक कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आज अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करू शकतो. परंतु आजची तरुण पिढी ही मात्र दिशाहिन आहे. या उत्सवाला आलेला भडकपणा,सवंगपणा जास्त प्रभावी झालेला आहे. त्यातून शांतता व सुरक्षिता व्यवस्थापन यावर पडणारा ताण,कर्णकर्कश आवाजातून होणारे प्रदूषण व आबालवृध्दांवर होणारे दुष्परिणाम,जनतेकडून होणारी  वर्गणीतून लूट,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांतून होणारे जलप्रदूषण,हे सर्व पहाता आजचा गणेशोत्सव हा आनंददायी वाटत नसून तो तापदायक वाटायला लागला आहे. आजच्या तरुणांनी थोडे औचित्यपूर्ण व विवेकाने साजरा करायचे ठरवले तर हा उत्सव नक्कीच आनंददायी वाटेल.
*---------------------------------------------*

दत्तात्रय तळवडेकर,सिंधुदुर्ग

 आमच्या कोकणात गणपती उत्सव जोरात साजरा केला जातो.  पण हा उत्सव  आला की मला भीती ही तेवढीच वाटते कारण हा उत्सव खरा सुरू झाला तो लोकांना एकत्र आणायला पण यावेळी मात्र भजनी मंडळातील ग्रुप बाजी जोरदार दिसते आणि वाडीतील हेवेदावे सुद्धा  यातही सात्विक भावना न राहता यात सुरू होत ते राजकारण.
        आपण या उत्सवासाठी खूप पैसे खर्च करतो पण मला वाटत एक गाव एक गणपती ही चांगली संकल्पना आहे ती जर अमलात आली तर या उत्सवा साठी होणार खर्च सुद्धा गावातील गरीब  व होतकरू याना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केला तर दरवर्षी जरी 1 कुटुंब उभं राहिलं तरी या उत्सवात आणखी आनंदाची भर पडेल . काही  चुकलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा .
*---------------------------------------------*


पी.प्रशांतकुमार सावेडी,अहमदनगर

.. मला वाटत ..वरच्या विषयाच्या पुढे एक प्रश्न चिन्ह हवं होतं..
...आजही घरगुती गणेशोत्सव म्हणजे प्रचंड आनंद आहे.. आता आमच्याकडचच पहा ना.. देव देव न करणारा मी पण मुलीला हौसेनं शाडू माती आणून देणार.. तिच्या चित्रकलेचा,शिल्पकलेचा श्री गणेशाच तीने गणेश मूर्ती बनवून केलाय.. ह्यावर्षी असा गणपती बनवायचा हे ठरवणार (फक्त ठरवायचा पण शेवटी तो वेगळाच होतो) ... त्याचे रंग त्यासाठी सजावट ती धावपळ.. सगळी मजा
... त्यात आपण देशावरचे त्यामुळे चुकत माकत मोदक करायचे..
सगळी मजा... मजाच मजा
पण हा झाला एक भाग आता त्याचा दुसरा पैलू म्हणजे सार्वजनिक उत्सव..
दुर्दैवाने आपल्याकडे सर्व धर्मियांचे सार्वजनिक उत्सव हे सार्वजनिक उच्छाद झाले आहेत..
DJ डॉल्बी आणि ढोल-ताशांचा दणदणाट..
त्यातही पूर्वी कातडी ढोल होते ते जाऊन कर्कश वाजणारे प्लास्टिक सदृश्य मटेरियल चे ढोल असतात.. त्या गोंगाटाने डोकं उठणाऱ्या आवाजात ज्याला सौंदर्य दिसत तो काय त्याला पिंडात ब्रह्मांड दिसेल..
'मद्य' आणि 'वाद्य' ह्या दोन 'द्य' चा उन्मात नसेल तर सर्वच कार्यक्रम सहज सुन्दर लोकांना त्रास न देणारे होवून वेळेवर संपतात ..... पण सद्य परिस्थितीत असे बोलणे हे निंद्य मानले जाते.
एकेकाळी समाजप्रबोधन आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असे गणपतीत पण आता निव्वळ भावी राजकारणासाठी एक मंच बस एव्हडच आहे..
... मला मित्र म्हणाला..असा विचार कसा करतो चांगलं काम करणारी पण सार्वजनिक मंडळ आहेतच ना..
हो असतील ना पण एक तर ते आमच्या जवळ नाही आणि त्यांची संख्या इतकी इतकी तुटपुंजी आहे की उपयोगही नाही..
आमचा एक मित्र पोलीस आहे तो म्हणतो गणेशचतुर्थी जवळ आली की पोटातच गोळा येतो..कधी विसर्जन होतं असं होत .. 10-12 दिवस कुठेही झोपा,काहीही खा अंघोळ प्रतिर्विधी ते विचारूच नका :(
... आजूबाजूला अस चित्र दिसत ना तेव्हा आनंदाचा उत्सव अस म्हणताना जीभ चाचरते..
... एका tv वाहिनीवर ऐकलं भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे.. मला वाटत आपण अतिरेक प्रिय समाज आहेत आपल्याला कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करायला प्रचंड आवडत आणि मग अराजकतेकडे वाटचाल होते... जस की 15 ऑगस्ट ला तरुणांचे जथ्थे ट्रिपल सीट बसून त्यातले काही अतिउत्साही चालू गाडीवर उभे राहत कर्कश हॉर्न वाजवत सिग्नल वगैरे मोडत वेगाने जाताना दिसतात .. सिग्नलवर गाडी थांबलेली आणि पोरगी विचारते 'पप्पा ते कोण', म्हणावंसं वाटत ते दिखाऊ आणि आपण खरे देशप्रेमी. पण अस न म्हणता तिला म्हणतो अरे लहान आहेत त्यांना समजत नाही अजून
.
तेव्हा हे बुद्धीच्या देवा गणराया आम्हा सर्वांना समज दे.. चांगलं नागरिक होण्याची बुद्धी दे ...
*----------------------------------------------*

टीव्ही न्युज चॅनलवर लगाम गरजेचा?


वाल्मिक फड, महाजनपूर नाशिक .

खरोखर लगाम हा फार गरजेचा झाला आहे.कारण जेव्हा कधी बातम्या ऐकाव्या म्हणलं की,यांच्या चॕनलवर कायम वाद निर्माण होतील अशाच बातम्या चालू असतात.आणी हे पहा सामान्य माणसाला काय करायचे हो हे ऐकून की ह्या हिरोईनला मुलगा झाला मुलगी झाली,हि पळून गेली,ती परत आली सांगा काय करायचय सामान्य माणसाला आहे का काही गरज ह्या बातम्यांची?
अहो मला तर असं ऐकायला मिळालं की,हे चॕनेलवाले ज्याच्याकडून पैसा मिळाला त्याच्या बाजूने परत परत बातम्या देऊन सामान्य लोकांना टिवी नकोसा करतात.आत्तापर्यंत ज्या ज्या शेतकर्याच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून हे पैसे घेतल्याशिवाय मुलाखती घेत नाही.सरपंच असताना अशा एका चॕनेलवाल्याला फोन केला म्हटलो पंचवीस वर्षापूर्वीची गावकर्यांची व्यथा मांडावी सरकारसमोर परंतु गावात येण्याच्या बदल्यात आम्हाला विस हजार खर्च लागणार असल्याने आम्ही त्या गोष्टिकडे पाठ फिरविली.शेवटी पेपरला दिले आम्ही पण त्याचा एवढा काही परिणाम झाला नाही.
सांगायचे तात्पर्य इतकेच कि,हे न्युज देतात ना प्रामाणिकपणे द्या ज्यांच्यावर अन्याय होतोय ते सत्य जनतेला कळू द्या.नुसती कर्जमाफीची बातमी तुम्ही दाखवता पण प्रत्यक्षात गावांत येऊन गरीब शेतकर्याँना विचारा की झालीय का तुम्हाला कर्जमाफी.नुसता एखाद्या मंञ्याने शब्द काढला कर्जमाफीचा की तुम्ही दिवसभर जनतेला वेड्यात काढता आणी शहरातील जनतेला ते खरं वाटतं,सरकारला खरोखर कर्जमाफी करायची होती तर जे २०१७ जून मध्ये थकबाकीदार झाले त्यांना करायला हवी होती कारण हे सगळे शेतकरी नियमीत कर्जफेड करत होते.ह्या बाबतीत कधी न्युज चॕनेलवाले कधी मंञ्यांना प्रश्न विचारता का?नाही विचारत कारण गरीब शेतकरी त्यांना काही देऊ शकत नाही.सरळ असलेली बातमी ऊलटसुलट सांगून जातीय तेढ मोठ्या प्रमाणात हे न्युज चॕनेल करतात आणी म्हणूनच अशा गोष्टि थांबविण्याकरीता सर्वच टिवी न्युज चॕनलवर लगाम गरजेचा आहे असं मला वाटतं.जय हिंद.
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

प्रेस स्वातंत्र ह्या घटकावर १८० देशाच्या जागतिक यादीत आपला देश १४० व्या क्रमांकावर !!
१००+ भारतीय न्युज चॅनल पैकी बहुतांश बड्या कार्पोरेट हाऊसच्या मालकीचे !!
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या रिर्पोर्टनुसार भारतिय मिडीया जगात सगळ्यात जास्त भ्रष्ट !!

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, संविधानाचा रक्षक, लोकांचा आवाज वैगेरे आता अंधश्रध्दा झाल्या आहेत.

हा एक धंदा झालाय... भ्रष्टाचाराला बढावा देणारा, भ्रष्टाचाऱ्यांना लपवणारा, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणारा आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रसिध्दी देऊन त्यांचा उदो उदो करणारा !

हा संघटीत गुन्हेगारी चा अड्डा झालाय ज्यात ब्लॅकमेलींग, खंडणी वसुली, पेड न्युज, मनी लाँड्रींग, आर्थिक घोटाळे, टीआरपी साठी फेक न्युज, नोकरवर्गांचे लैंगिक शोषण सारखे गंभीर गुन्हे सर्रास होत आहेत.

 ह्याला पाठींबा आहे राजकारण्यांचा, धार्मिक संघटनांचा, सरकारचा व मालक कार्पोरेटचा....

जे खरेखुरे पत्रकार होते त्यांचा आर्थिक व मानसिक छळ आणि हत्या करुन एका पध्दतीचे दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले आहे.
बाकी उरलेले कणाहीन, चरित्रहीन, लाळघोटे, पाय चाटणारे कुत्रे व लचका तोडण्यास टपलेले गिधाडे आहेत.

अश्या वेळी आपण नागरिक म्हणुन काय करु शकतो ?
आंदोलनातुन अश्या न्युज चॅनलसाठी कठोर नियम तयार करण्यास व अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडु शकतो. बकवास टीवी चॅनल पाहणे बंद करु शकतो. खोट्या बातम्या फॉरवर्ड करणे बंद करु शकतो.
 माहितीच्या हक्कावर व सत्य बातमी साठी काम करणाऱ्या विसल ब्लोअर पत्रकारांच्या मागे ठामपणे उभे राहु शकतो. ह्या गंडागर्दीला आता विरोध नाही केला तर अनर्थ होऊ शकतो... जागे व्हा...सध्या संसदेत माहीतीच्या अधिकाराच्या कायद्यात जो बदल केल्या जातोय त्याला विरोध करा... ह्यावेळेसही शांत राहाल तर पुढची पीढी माफ करणार नाही तुम्हाला...
_____________________________________________

शिवकुमार म.पत्रे
कर्वे नगर,पुणे
                    प्रसार माध्यमाचे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण केले जाते त्यातील एक महत्वाचा गट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया होय,आणि आपल्या चर्चेच्या विषयातील न्यूज चॅनेल हा एक त्यातील छोटासा परंतु अत्यंत महत्वपूर्ण घटक होय म्हणून या विषयावर चिंतन मंथन करणे काळाची तसेच या देशाची तथा त्या अर्थाने सामाजिक गरज बनली आहे .

 २०१ सदस्य असलेल्या या अत्यंत छोट्यास्यां ग्रुप वर या प्रदीर्घ विषयावर विचार होतोय यापेक्षा अजून श्रेष्ठ गोष्ट कुठली नसेल,आणि या समुहाचा मी एक घटक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.खर तर या विषयावर प्रेतेकाने सामाजिक माध्यमांवर वेक्त होणे गरजेचे आहे त्याचा प्रभाव मोठ्याप्रमाणावर पडेल व टीव्ही न्यूज चॅनेलवर बंधने येतील ज्या मुळे आपला खरा मोटो ,अंजेडा उद्देश पूर्ण होईल. आता खऱ्या अर्थाने याची गरज का आहे यावर चर्चा करूया ,सध्या सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेली भारतीय खेळाडू हिमा दास जिने स्वर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आणि झाले काय आपल्या न्यूज चॅनेलवर तिचा जसा उल्लेख असावा तसा उल्लेख कुठल्याच न्यूज चॅनेलवर दिसत नव्हता पण सामाजिक माधामनवर जेव्हा तीच्या नावाने हॅच टॅग मारून बऱ्याच जणांनी न्यूज चॅनेलेवल्याना धारेवर धरले तेव्हा कुठे तिची ब्रेकिंग न्यूज बनली आणि तिचा संघर्षमय प्रवास यशोगाथा संबंध जगाच्या पुढे आली.

 जर २६/११  चा हल्ला आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत असेल तर आपल्याल्याला एक गोष्ट नक्की आठवत असेल ,
ज्यावेळी पॅरा कामांडोज त्या हॉटेलच्या बिल्डिंगवर उतरत होते तेव्हा आपल्या सो कॉलड न्यूज चॅनेलवर त्यांचा लाईव्ह रिपोर्ट दाखवला जात होता त्यामुळे ते सावध झाले .ज्यामुळे भारतीय जवान व अनेक नागरिक मारल्या गेले.
अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये न्यूज चॅनेलवर  वेगवेगळी बंधने लादली आहेत , अमेरिकेत न्यूज चॅनेलवर  कुठली बातमी दाखवायची जी बातमी दाखवली जातीय तिचा कन्टेन्ट कसा असला पाहिजे ,
असे बरेच सुंदर व अत्यंत महत्वाचे नियम आहेत.एखादी बातमी जर सामाजिक तेढ निर्माण करणारी असेल तर ती दाखवली पाहिजे का जर दाखवली जातीय तर ती कश्यापद्धतीने दाखवावी असे बरेच विषय या मध्ये आहेत.

 प्रसार माध्यमे ही समाज मनाचा आरसा असतात आणि जर याच अरश्यामध्ये दाखवला जाणारा चेहरा हा खोटारडा असेल तर पाहणाऱ्या प्रेतेकलाच ते समजेल असे नाही.
निमूट पने डोळे झाकुन न्यूज चॅनेलवर जे काही दाखवलं जातंय ते त्रिकाल बाधित सत्य आहे अश्या मानसिकतेत असलेल्या सामाजिक भारत देशा मध्ये खऱ्या अर्थाने न्यूज चॅनेलवर बंधने असणे अत्यंत आवश्यक आहे.
मागच्या काही  वर्षांमध्ये प्रत्येक बातमीला एखाद्या विशिष्ठ जात,धर्म किंवा सांप्रदाय तथा विशिष्ट समुदयाशी जोडणे आणि आपल्या न्यूज चॅनेलचा टी आर पी वाढवणे एवढ्यापुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित झाले आहेत हे प्रकर्षाने जाणवतंय. सर्रास पणे प्रत्येक विषयाला धार्मिक ,सांप्रदायिक रूप देऊन नुसत्या वायफळ गप्पा भरवणे
 इतक्या पुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित नाहीयेत .

समाज मनातील वेगवेगळ्या समस्या,अडचणी व प्रश्न आपल्या न्यूज चॅनेल च्या माध्यमातून समोर आणून त्यावर कार्य करण्यासाठी प्रशासनास व सरकारला भाग पाडणे ,वंचित पीडित व शोषित समुदायाचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देणे हा आपला खरा धर्म,कर्तव्य दायित्व तथा जबाबदारी आहे हे न्यूज चॅनेल चे तथाकथित भामटे मालक व सुटबुटात वावरणारे खोटरड्या अफवा व बातम्या सांगणारे खऱ्या अर्थाने गुन्हेगारीस पाठीशी घालून भ्रष्टाचारास बढावा  देणारे सुशिक्षित भ्रष्ट कर्मचारी विसरून गेले आहेत म्हणून त्यांना याची वेळोवेळी जाणीव करून देण्यासाठी कायद्याच्या
बेड्या घालून लगाम घालणे गरजेचे नव्हे तर महत्वाचे आहे.
____________________________________________

सौदागर काळे,पंढरपूर.

आपल्याला जशाच्या तश्या गोष्टी स्वीकारण्यास मजा नसते.काहीही करून तेल-मीठ लावलेल्या गोष्टी बघायला,ऐकायला आवडतात.मग त्यात भर टाकून पुढे पाठवल्याशिवाय आपला आत्मा तृप्त होत नाही. प्रसंग,वेळ कोणतीही असो.तशी आपल्याला सवय झाली किंवा करवून घेतली आहे.याला जुना साथीचा रोग म्हटलं तर चुकीचे वाटणार नाही.

खाजगी चॅनेल सुरू होण्यापूर्वीचा काळ आणि सुरू झाल्यानंतरचा काळ आपण जरा एकांतात बसून आठवून पहा.मग कळेल नेमकं लगाम कुणाला लावणं गरजेचे आहे?

मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम. आपल्याला खाणं चवीचं लागतं तिथं न्यूज कशा अपवाद राहतील!तशा न्यूज पुरवण्याचे काम खाजगी चॅनेल करत असतात.आपल्याला अशा न्यूज बघायला आवडतात.ते दाखवत राहतात.आता हा पण थोडासा भूतकाळ झाला.आताच्या अवस्थेत न्यूज आपल्यावर लादल्या जात आहेत.आपल्या चवीचा ,मागणीचा विचार न करता."जनता मालक असते" फक्त मतदानादिवशी.आता त्या मतदान प्रक्रियेवरही संशय आहे.म्हणजे मालकाला गंडवले जात आहे.पध्दतशीरपणे.हा वेगळा मुद्दा असला तरी सध्या जनता मालक ना नोकर.भिकारी झाली आहे!जे झोळीत पडेल ते लाचार बनून स्वीकारायचे.अन अशावेळी आपण एकमेकांना विचारत आहोत....लगाम उगरायचा का? त्यासाठी अगोदर मालक बनायला हवं ना...मालक होणं  जमत नसेल तर...आपल्या सरकारच्या न्यूज वाहिन्या बघत चला...तिथेही मनासारख्या न्यूज नाही आल्या तर टीव्ही बंद करून टाका.जास्त डोकं आउट झालं तर विकून-फोडून टाका.पण लगाम आपल्या हातात राहिला नाही.हे सत्य स्वीकारा.

दुसरं म्हणजे पत्रकारांनाही पोट आहे.ते आपल्याने भरणं होत नाही.मग उपाशी राहण्यापेक्षा त्यांनी चाकरी केली तर काय वाईट !
______________________________________________

संगीता देशमुख,वसमत.

         फारपूर्वीचा काळ नाही परंतु आपल्याच पिढीने पाहिलेला तो काळ! आपण किशोरवयीन होतो. तेव्हा फक्त दिल्ली दूरदर्शन आणि सह्याद्री दूरदर्शन अशा दोनच वाहिन्या होत्या. त्यातही आपल्याला चॉइस नव्हता. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवरच्या बातम्या पहायला मिळायच्या. आजच्या न्यूजचॅनलच्या बातम्या पहाताना मला त्या दिवसाची आवर्जून आणि सातत्याने आठवण होते. किती संयतपणे,धीराने बातम्यांचे निवेदन होते! निवेदक कोणत्याही बातमीचा "इव्हेंट" न करता त्याचा फक्त वृतांत  आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ते करायचे. ती बातमी राजकीय वादळाची असो अथवा नैसर्गिक वादळाची,त्याचे फक्त वृतांतकथन व्हायचे. तज्ञांच्या चर्चा मसलती शांतपणे व्हायच्या. मग आपण प्रेक्षक त्यावर आपली भूमिका बनवायचे.  आज मात्र बातम्यांच्या वाहिन्यांचा सुळसुळाट झाला. स्पर्धा वाढली. आपला टीआरपी वाढून घेण्यासाठी बातम्यांचे निवेदक(?) मात्र अत्यंत कर्कशपणाने,अतिअविर्भावात साभिनय व्यक्त होताना दिसतात.  बातम्या निवेदन करताहेत की ते आपल्यावर लादताहेत,हेच क्षणभर आपण विसरतो. प्रेक्षकांनी भूमिका बनविण्यापूर्वीच ते स्वतःला जे योग्य वाटेल तसेच  ठासून मांडतात. पर्यायाने यातून प्रेक्षकांची दिशाभूलच होते. वादविवादमध्ये तर हे निवेदक इतके मध्ये मध्ये हस्तक्षेप करतात की,वक्त्याचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याऐवजी त्यांचाच आवाज जास्त होतो. त्याचप्रमाणे यातही त्यांचीच मनमानी चालते. ज्या बाबींवर फोकस व्हायला हव्या त्या बातम्या दूरच रहातात. अनेकदा ज्या बाबींची गुप्तता पाळायला हवी असते,ती गुप्तता राखली जात नाही. त्यामुळे खरच या वृत्तवाहिन्यांवर कोणाचा लगाम असायलाच हवा. नाहीतर हे लोक  यांच्या आततायीपणामुळे येणाऱ्या पिढ्यांची दिशाभूल करू शकतात. किंवा शत्रूराष्ट्राला आयते कुरण मिळवून देऊ शकतात.
______________________________________________
टीप-( सर्व छायचित्रे गुगल इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

पावसाळ्यातील ती आणि तो….

पावसाळ्यातील ती आणि तो….

राजश्री ठाकूर,मुंबई.
ती तशी बहुगुणी वगैरे ,ऋतूंचा वगैरे विचार न करता जमेल तशी कामात गर्क , तो मात्र काहीसा छंदी , स्वप्नाळू आभाळ पाहून काम करणारा ..
तिला रिमझिम पावसात चालत जाण प्रिय तर तो बाइक वर स्वार होऊन हवा भरून पसार  ..
भिजून अवगुंठून ती कोपऱ्यात उभी,
तर तो निडर उभा ठाकलेला ..
सवयीची म्हणून तिची बडदास्त नाहीच , त्याचा मात्र खास म्हणून थाट ..
परिटघडी चे जिणे मात्र दोहोंच्या नशिबी नाही . इतक्या गर्दीत त्यांचे सोबत असणे हरवून जाई ..
एका छताखाली असूनही सहवास असा नाहीच ..
ती छत्री तो रेनकोट जोडी जमतच नाही ..

प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली.
खुप दिवस झालेत, अगदी त्याच्या वाटेला डोळे लावून बसली होती ती. तो शेवटचा भेटून इतका काळ उलटला ना तरीही त्याची आठवण त्याचा ध्यास एक क्षणही तिच्या मनातुन जाईना. जवळ-जवळ एक वर्ष लोटेल ह्या गोष्टीला, तो जेव्हा तिला भेटायला आला होता ना तेव्हा हट्टाने तिने जाऊच दिलं नव्हत त्याला काही दिवस. ते 'काही' दिवस चिंब भिजत राहिली होती ती त्याच्या सहवासात.
या वेळीही त्याची किती आतुरतेने वाट पाहत होती ती. त्याच्या आठवणींत काळीजचं कोरडं पडलं होतं तिचं, मनाला जनु खोल चिरे पडले आहेत असं वाटत होतं. सगळं कसं भकास वाटु लागलं होतं...
पण शेवटी तो आलाच! केवढा तो आनंद अन् केवढा तो उत्सव!
तो येतोय हे लगेच कळलं होतं तिला. त्याने घातलेली साद दाही दिशांत घुमत राहिला. सगळी कडे गारवा जानवत होतं तिला. तिच्या आनंदाचं सुगंध दरवळत राहिला होता मळ्या-शेतात.
आता एवढ्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर भेटले ते दोघं आणि आनंदाला सिमाच रहिली नाही त्यांच्या.
त्याचं प्रेम कोसळत राहिला तिच्यावर, अगदी तिच्या नसानसातुन ते ओसंडुन वाहु लागे पर्यंत. ती तृप्त झाली त्याच्या भेटीने आणि तो पार रीता झाला तिची आतुरता शमवुन.
ह्या वेळीही ती फुलून गेलीए, भिजून चिंब झालीए आणि अगदी टवटवीत दिसु लागलिए.
तो आहे अजुही इथेच, तिच्या भेटीला. पण फार वेळ थांबता यायचं नाही त्याला कारण तो जर आणखी जास्त थांबला.. तर..
तर पूर येईल! हो!
तो समजवेल तीला, म्हणेल " अगं राणी, माझे प्रिये धरणी... येईन ना मी परत पुढच्या वर्षी."
मग ती रागवेल त्याला, "अरे खोडकर पावसा, वाट पाहावी लागेल मला परत तुझी रे अन् हेच होतं सहसा".


यशवंती होनमाने,मोहोळ.
  आज मात्र हद्दच झाली , तिच्या संयमाचा अंत झाला होता .तो नेहमीच असं करायचा आत्ता लगेच येतो म्हणायचा आणि तिकडेच .ही बिचारी बापडी तो येणार , फिरायला जायला मिळणार म्हणून नटून बसायची .अहो करणार काय शेवटी नवपरिणीता वधू बावरी ती .तो रोजच हुलकावणी द्यायचा .तीही बिचारी कंटाळून गेली होती .असाच रोजचा आला दिवस जात राहिला .श्रावणाची सुरवात झाली .....आणि ......
     माहेरून बोलावणं आलं श्रावण आहे सणाला पाठवा ....मुराळी आला आणि तिला घेऊन गेला माहेरी .मग काय सासरी बावरलेली नववधू माहेरी आल्यावर हास्याचे कारंजे उडवू लागली , मन पाखरू पाखरू गाऊ लागली .....
     आत्ता त्याची मात्र पंचायत झाली .तिची सतत आठवण येऊ लागली .मग याने ठरवले अगदी फिल्मी स्टाइल ने सरप्राईज द्यायचे ठरवले .call केला मेहुणीला आणि सांगितल मी येतोय ते सांगू नको तूझ्या ताईला .तो  पोहोचला तिच्या घरी .ती न्हवती घरात , ती होती घरच्या टेरेस वर हातात कॉफी घेऊन पावसात उभी राहून गाणं म्हणत होती ' हाय हाय ये मजबूरी , ये मौसम और ये दूरी , तेरी दो टकिये की नौकरी , , , , , , ' तो तिला बघतच राहिला .......पिच colour ची साडी आणि त्यावर golden colour चा slivless ब्लॉउज , मोकळे केस , , , , अप्रतिम रूप पाहून हा दंग झाला .त्यानं तिला पाहिल पडत्या पाऊसात .....आणि तिच्या समोर गेला आणि गाऊ लागला ' भीगी भीगी रातो में , भीगी बरसातो में कैसा लगता हैं ' ? ? ?
      त्याने त्या दिवशी जे अनुभवल तेच तो अजूनही अनुभवतोय .....म्हणूनच त्याला पावसातली ' ती ' आणि तिला ' तो ' खूपच आवडायला लागले .....आत्ता ते दोघं गुणगुणत असतात ' टीप टीप बरसा पानी  , पानी ने आग लगा दि , आग लगी जो दिल में दिल को तेरी याद आयी ....

शिरीष उमरे,मुंबई.
पावसाच्या सरींमधे मनसोक्त वेड्यागत आसमंतात नाचणारा तो !! आपल्या काळ्याशार  शरिराला ओलेगच्च करुन दिवसभर तसाच रानोरान भटकणारा तो !!

बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांनी उमलणारी ती !! आपल्या गुलाबी कांतीवर थेंबांना मोती बनवणारी ती !!

सायंकाळच्या मदमस्त वेळेतही धुडगुस घालणारा तो !! सांजवेळी त्याची वाट बघनाऱी ती !!

अलगद तीच्या मिठीत शिरुन विसावलेला तो !! त्याला मखमली अलिंगनात कैद करणारी ती !!

रात्रभराचा त्याच सहवास आणि पहाटे सैल झालेली तीची मिठी..

परत आकाशी भरारी घेणारा पाउसवेडा तो भुंगा
आणि
लाजेने गुलाबी झालेली ती कमळपुष्पाची पाकळी !!

जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...



शिरीष उमरे, मुंबई

विषयार्थ हा की एखाद्याबद्दल जाणुन घ्यायचे असेल तर त्याच्या भुमिकेत खोल शिरल्याशिवाय कळणार नाही त्याच्याबद्दल....

जसे की डॉक्टर ! बऱ्याच लोकांना वाटते की हे नुसते बसुन, ऐकुन व तपासुन चार ओळी कागदावर खरडुन लाखो रुपये कमावतात. पण त्यांनी आयुष्यात डॉक्टर बनण्यासाठी घेतलेली मेहनत, जवळपास सात आठ वर्षे डीग्री मिळवण्यासाठी केलेला अभ्यास व त्यानंतरही स्वत:ला नविन संशोधनामधुन शिकत राहण्याची लावलेली सवय, २४ तास ड्युटी करण्याची मानसिक व शारिरीक ताकत बघता काही हजार कमवणारे डॉक्टर जास्त आहेत. फारच थोडे वाममार्गाने लाखो कमावणारे असतात...

तीच गोष्ट लागु पडते आपल्या शिक्षकांना, बॉर्डरवरच्या सैनिकांना, शेतात राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांना व घरात काम करणाऱ्या गृहीणींना. त्यांच्याएवढे सचोटीने काम करणे म्हणजे अवघड असते हे जोपर्यंत आपण स्वत: ते अनुभवत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही.

बरेचदा हा गैरसमज व्यापारी वर्गाबद्दल व शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल आणि खाजगी जॉब करणाऱ्या लोकांबद्दल ही असतो. प्रत्येकाला दुसऱ्याचे काम सोपे वाटते. काही फायदे पण त्यासोबत काही नुकसान हे प्रत्येक कामात असते. ह्याची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत ते काम आपण स्वत: करत नाही.

प्रत्येकाला दुसऱ्याचे आयुष्य छान, हीरवेगार, विना समस्याचे व आनंदी वाटते... प्रत्यक्षात असे नसते... समस्या सगळ्यांनाच असतात.. बहुतांश त्यातुन जगण्याचा मार्ग शोधतात... काही थोडे च असतात ज्यांना कायम दुसऱ्याबद्दल असुया, हेवा, मत्सर वाटत राहतो...

ह्यातुन एक नक्की शिकण्यासारखे आहे की एखाद्याबद्दल मत ठरवण्या अगोदर हा विचार करावा की मी त्याच्या जागी असतो तर काय केले असते !!

आपल्यातला चांगला माणुस जिवंत ठेवणे हे आपल्या हातात आहे. आपल्यातला वाइट माणसाला वेसण घालण्याचे काम ही आपलेच आहे.

ह्यातुन नक्कीच एकमेकांबद्दल चा आदर वाढेल. गैरसमज दुर होतील. समोपचाराची भावना वाढेल. हीसकावण्याची इच्छा मरुन वाटण्याची इच्छा वाढेल...  शेवटी हीच आपली खरी संस्कृती नाही का ?
____________________________

        मनोज वडे , पंढरपूर.

        ‎हा विषयच काही जणांना समजण्यास जड गेला असेल तसाच मला ही गेला होता.परंतु माझ्याच साथीदाराने हा खूप छान स्पष्ट केला. तरी ही ह्यात माझं व्यक्त करताना काही चुकत असेल तर आपण व्यक्त होऊन मला स्पष्ट सांगितले तरीही आवडेल .
        ‎कस आहे .आता बगा आपण एकाद्या office मध्ये गेलो तर आपल्याला तीत थोडा जरी जास्त वेळ जास्त गेला तरी आपण लगेच त्याला म्हणतो .काय राव इतका वेळ का कामाला? परंतु त्याच व्यक्तीला माहिती असत की, त्या कामाला किती वेळ लागणार आहे  .म्हणजेच जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.बघा एकदा गाडी वरून पडला तर आपण म्हणतो काय सहज पडला होता की, एवढं का आकड ला आहेस.पण जो पडला आहे .त्यालाच त्याच दुखणं कळू शकते ना म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्याकडे  पाहून कधीच  बोलत नाही परंतु इतरांचं म्हटलं की , लागलीच हाताच्या भाया वर करून बोलतो .तर तो कधीही म्हणतो त्याचं चांगले चालले असेल  परंतु त्यालाच माहीत असत.आपण ह्यात किती समाधानी आहोत. ह्या म्हणी प्रमाणे जावे त्याचा वंशा तेव्हा कळे ,त्याच व्यक्तीला माहिती असत आपल्या क्षेत्रात किती अ, ब,क,ड आहे ते .म्हणून जो तो आपल्याप्रमाणे करत असलेले काम हे योग्यच असत .पण काय हे असंच करतो तसच करतो .त्यामुळे आपण जर त्यात नसेल तर आपल्याला त्या गोष्टींचे काय कळणार? पण कळायचे असेल तर जावे त्याच्या वंशा कळेल त्यात काय राम आहे आणि काय लक्षीमन हे नक्की .
____________________________

   निखिल खोडे, पनवेल

एक दिवस काढा राजस्थान सीमेवर तळपत्या उन्हात कींवा लडाखच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत... हातात रायफल घेवुन

एक दिवस काढा नांगरण, वखरण पेरणीसाठी शेतकऱ्यासोबत ... हातात कासरे घेवुन...

‘रक्ताचे पाणी अन् घामाची माती’ करून पिकवलेले रस्त्यावर ओतून तुमच्या नावाने ‘शिमगा’ करताना त्या कष्टकऱ्याच्या मनाला होणाऱ्या वेदनांनी काळीज चिरत गेलं पाहिजे तुमचे. वातानुकूलित वातावरणात बसल्यानंतर त्याच्या व्यथा, वेदनांचा विसर पडत असेल तर तुमचा ‘पाषाण’ झाला समजावे का?

सोपे आहे एसी मधे बसुन सल्ले देणे व दर महीन्याला पगार उचलणे...
जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे !!
____________________________

लग्न पहावे करून.


अनिल गोडबोले
सोलापूर

लग्न ही गोष्ट एकाच वेळी गंभीर आणि गमतीदार झालेली आहे.  हल्ली टी. व्ही. वर देखील वेगवेगळे चॅनल वाले लग्न लावून देण्यात पुढाकार घेताना दिसतात.

पूर्वी लग्न ठरवताना पत्रीला, वंश, जात, गोत्र, कुंडली आणि गुण जुळवायचे. हे सर्व पाहत असताना घराणे, खानदान, हुंडा, मानपान हे सर्व मुलीच्या वडिलांकडून करून घेणाऱ्याला प्राधान्य दिले जायचे.

आता नवीन जमान्यात कदाचित चित्र बदलले असेल. मुलगा आणि मुलगी आपला जोडीदार शोधत असतील अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. आता फक्त पद्धत बदलली आहे. आता टेक्नॉलॉजी चा वापर होत आहे. पण पत्रिका... पासून कुंडली जुळवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो एवढंच..

वधू- वर सूचक मंडळ हा अतिशय विनोदी कार्यक्रम आहे. मी एकदा एका मंडळाचे पुस्तक वाचले...मला फार हसू आले. "मुलीला गाता आलं पाहिजे, मुलाला तबला वाजवता आला पाहिजे." हे एकवेळ मान्य असेल पण "मुलगी फेसबुक वापरते... मुलीला माणसांची आवड आहे (मग बाकीच्यांना जनावरांची असते का?...  असो)" अशी विधान वाचली आणि हसावं की रडावं ते कळेना.

पुण्यात नोकरीला मुलगा पाहिजे, शक्यतो सरकारी नोकरी पाहिजे, स्वतःच घर पाहिजे, आई वडील सोबत येणार का?,.... असे प्रश्न मुली कडून येत असतात. मुलांकडून तर विचारू नका. "गोरी (हल्ली उजळ रंगाची अस म्हणतात) व अनुरूप वधू पाहिजे." अनुरूप... म्हणजे कशी? याची व्याख्या कोणाकडे असेल तत सांगावी.

मॅट्रिमोनियल साईट वर आता लग्न ठरवतात. या साईटवर देखील आपल्या गोत्राचा, जातीचा, अनुरूप जोडीदार शोधता येतो. काही ठिकाणी तर ओळखपत्र पण दाखवले जातात.. असा सगळा लग्न जुळवण्याचा फंडा आहे.

मूळ मुद्धा असा आहे की, लग्न कशासाठी करायचे? या बद्दलची उद्दिष्टे लग्न करणार्या जोडीदारांना आणि घरच्यांना कळली आहेत का... असा प्रश्न पडला आहे. "चांगल्या घराण्यातील मुलगा-मुलगी" हे देखील मला तरी कोड उलगडलं नाही. मग वाईट घराण्यातील मुलं- मुली कसे असतात?.. त्यांचं लग्न कस होत असेल..?

अपेक्षा आणि त्या प्रमाणे जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण कधी कधी अपेक्षा अवास्तव होत आहेत का? या बद्दल विचार करायला पाहिजे.

पैसा, पद, प्रतिष्ठा बघून व्यवहार केला जातो परंतु लग्न करण्यासाठी दोघांना मनाने आणि विचाराने एकत्र येणे गरजेचे आहे, त्याचे गुण मिलन नक्की कसे होत असेल?.. पत्रिका आणि कुंडली सारख्या छदम विज्ञानाच्या मागे न  लागता वैद्यकीय सल्ला व चाचण्या करून घेण्याचे प्रमाण किती आहे?... हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे..

एकीकडे लग्नाची वय वाढत आहेत, अपेक्षा वाढत आहेत... आणि मग योग्य वय निघून गेल्यावर मिळेल त्या जोडीदार बरोबर आयुष्य काढावे लागते किंवा मग लग्नच होत नाहीत तेव्हा मग प्रचंड तणाव येतो.

लग्न व्यवस्था कोलमडते आहे आणि त्याचा तोटा कुटुंब व्यवस्थेवर होता आहे.. त्यामुळे यावर विचार करणे फार गरजेचे आहे. 'मागणी आणि पुरवठा' या तत्वावर लग्न केली जात आहेत.. खर तर काही ठिकाणी लग्न न करता "लिव्ह इन रिलेशन" राहण्याचा निर्णय घेतला जातो.. तो देखील चांगला आहे, पण त्याला समजूतदार पणा आणि जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे आहे...

शेवटी, मग प्रेम विवाह, आंतरजातीय विवाह, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडणे, विचारांनी योग्य निर्णय घेणे व ते कुटुंबातील मोठया व्यक्तींना मान्य असेल का?..असे बरेच प्रश्न उभे राहत आहेत.

लग्न पहावे करून... व घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे... कारण दोन्ही ठिकाणी आपण काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे आहे..
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

हींदीत एक म्हण आहे की " शादी का लड्डु खाये तो पछताये और ना खाये तो भी पछताये " ह्यातल्या खतरनाक विनोदामुळे तरुणाई अजुनच संशयी व भयभीत असते लग्न म्हटले की...

त्यामुळे जगातील सगळ्यात जास्त तरुण असलेल्या देशात म्हणजे आपल्या देशात युवांनी एक मध्यममार्ग शोधुन काढलाय... सहजिवनाचा !! लीव इन रिलेशनशिप !!

ह्यात सध्यातरी जरुरी तेवढे शिक्षण संपवुन कुठेतरी काम करुन पैसे कमावणारे तरुण जास्त आहेत. आपल्या वरिष्ठांकडुन लग्नाबद्दल चांगले वाइट अनुभव व विचार ऐकुन पहीलेच धास्तावुन गेलेले असतात. त्यातच घरच्यांचा लग्नासाठी रेटा सुरु झालेला असतो तर काही ठीकाणी घरचे हात धुवुन मागे लागलेले असतात... खास करुन मुलींच्या घरचे !!

अश्या वेळेला विष कींवा अमृत पिण्यापेक्षा त्याची चव घेउन त्यातल्या त्यात कमी विषारी व उत्तमातले उत्तम अमृत निवडता येइल असा सोइस्कर  व व्यावसायिक विचार करुन सहजिवनाचा मध्यममार्ग तरुणांना पसंद पडतोय.

एकंदरीत गाजराची पुंगी वाजली तर वाजली कींवा मोडुन खाल्ली...  आयुष्यभराचा तुरुंग नको... नंतर काडीमोडाचा भुकंप नको... असा विचार ह्यामागे असावा.

पुर्वी आईवडीलांच्या पसंतीने व नातेवाइकांनी सुचवलेले स्थळ व त्यातुन लग्नबंधनाचा सोहळा शक्यतो विकोपास जात नसे.

 आता व्यक्तीस्वातंत्र, प्रेम, आर्थिक स्वातंत्र, करिअर ओरियंटेड जीवनशैली, साथिदाराकडुन वाढलेल्या अपेक्षा वैगेरे वैगेरे मुळे तीशीपर्यंत लग्नाच्या बेडीत अडकण्याची कोणाचीच तयारी नाही... कारण लग्न म्हणजे जबाबदारी !! लग्नानंतरच्या सुमधुर तीन वर्षानंतर येणाऱ्या संभाव्य पालकत्वाची जाणीव ह्याची पुर्वकल्पना असल्याने सध्या तरुणाई " जी लो अपनी जिंदगी" ह्या ब्रीदवाक्याला अनुसरुन  जगतेय...

तसे योग्य च आहे कारण लग्न केल्यानंतर एकदुसऱ्यासाठी करावा लागणारा त्याग व त्यानंतर  आयुष्याच्या बागेत रोपटे लावुन त्याला जगवणे व वाढवणे ह्याची अनुभती व असे स्वर्गीय जगण्यासाठी मानसिकरित्या टफ व अथक शारिरीक मेहनतीला तयार होण्याशिवाय पर्याय नाही..

  आपली कुटुंबव्यवस्था ही आपल्या संस्कृतीची जगाला दिलेली खुप मोठी गिफ्ट आहे...
म्हणुन उशिरा का होइना... " लग्न नक्कीच पहावे करुन!! "
____________________________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

आयुष्यात आपल्या कोणीतरी असावं,
जेव्हा आली आठवण नजरेसमोर दिसावं,
मनात आले असता हळूच पाहावे दुरून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

कोण असते कोणासोबत आयुष्यभरासाठी,
त्यासाठी तर जुळवून आणल्या जातात सोनेरी रेशीमगाठी,
अशा क्षणी तर येतात सर्व नाती गोती मिळून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

जेव्हा येतो मनामध्ये लग्नाचा पहिला विचार,
सुरू होतो तेव्हा पत्रिका जुळवण्याचा प्रचार,
बरीच जुळतात नाती, दुरच्याही अंतरावरून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

मानामनामध्ये उमटू लागतात आनंदाचे भाव,
कोणी कोणी म्हणतो देवा एकदा तरी पाव,
सहवास हवाहवासा वाटतो जेव्हा कळवळून,
तेव्हाच तर वाटते लग्न पाहावे करून।
___________________________________________

पवन खरात,अंबाजोगाई.

बापानं पै पै जमवून जणू
लेकी साठीच सार कमवलं होत ।
लग्नात लेकीच्या,काळजा सोबत,
बापानं सार सुखं ही गमवलं होत ।
_____________________________________________
टीप (सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य...



शिरीष उमरे, मुंबई

१३५ कोटी लोकांचा देश आपला... आर्थिक अभ्यासकार सांगतात की देशाची ५०% पेक्षा जास्त संपत्ती फक्त १% लोकांकडे आहेे.  देशाच्या एकुण मालमत्तेपैकी ७७% मालमत्ता फक्त १०% लोकांच्या ताब्यात आहे. बाकीचे ९०% लोकांचे काय अस्तित्व ?

कोण असतील हे १% लोक ? आणि कोण आहेत हे १०% लोक ? १% लोक आपल्यासमोर कधीच येणार नाहीत... एक करोड ची ही आबादी माझ्या मते व्हाइट कॉलर कार्पोरेट गुंतवणुकदार असतील... ह्यातले काही चांगले सुध्दा असु शकतात.

 पण बहुतांश वाइट धन्याडांना सपोर्ट करणारी ही १०% वाली बारा करोड ची विषारी पिलावळ माणुसकी साठी धोकादायक असते... उरलेल्या ९०% लोकांना कायम गुलामगिरीत ठेवण्यासाठी ह्यांचा सक्रीय सहभाग असतो...
ह्यात भ्रष्टाचारी राजकारणी, धार्मिक नेते, सरकारी नोकरशाही,  कंत्राटदार, दलाल, मिडीया, शिक्षणसम्राट, डॉक्टर, सीए, सीएस, वकील, जज, कारखाणदार, बिल्डर्स, माइन ऑपरेटर, गुन्हेगारी क्षेत्रातले दादा व मोठा व्यापारी वर्ग हे सगळे सामील असतात...

सगळे स्वार्थापायी कायम एकमेकांच्या जिवावर उठलेले असतात तरीही संघटीत असतात...यांचा वरती पण रिमोट कंट्रोल असतो...

ह्यात पिसले जातात गरीब, असंघटीत, अशिक्षीत, अंधश्रध्दाळु व कमकुवत ९०% लोक...

ह्यातील बऱ्याच जणांचे अख्खे आयुष्य दोन वेळच्या जेवणाची सोय करता करता मोलमजुरीत निघुन जाते...
काहीजण काळ्या मातीतुन धान्य पिकवण्याच्या फीकरीत स्वत:चा जीव पणाला लावतात...
काहीजणांचे जीवन दुसऱ्यांसाठी नोकऱ्या करता करता मुलांच्या शिक्षणासाठी व घराच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात संपुन जाते..

जे प्रतिकार करतात ते एकतरी नक्षलवादी, आतंकवादी बनतात व संपवल्या जातात कींवा कालांतराने सामदामदंडभेद च्या  माराखाली झुकुन वरच्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातातले बाहुले बनुन आपल्याच लोकांवर अन्याय करतात...

भाकरीसाठी वणवण फीरणाऱ्या लोकांना अस्तित्व च नसते... ह्याला कारणीभुत भुकेची जाणीव नसणारा, निष्क्रीय, षंढ, कणा नसलेला, लाचार ८० करोड लोकांचा मध्यम वर्गीय समाज....
___________________________________________


सीमाली भाटकर ( गंधेरे )  रत्नागिरी

नमस्कार मंडळी विचार च्या व्यासपीठावर आज प्रथमच विषय आलाय भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य. काय वाटत तुम्हाला या विषयी असा प्रश्न विचारला तर वाईट वाटू नये. कारण फक्त गरीबी भाकरीच्या शोधात आहे असं नाही आहे. सुशिक्षित तरुण देखील स्वतःच पोट भरण्यासाठी नोकरीच्या मागे धावत आहे. कुणी व्यवसायासाठी झगडत आहे तर कुणी तो टिकवण्यासाठी.
          अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत हे आपण पहिली पासून शिकलो पण त्याचा अर्थ कळला तो पदवीधर झाल्यानंतर, ही झाली सुशिक्षित माणसांची गाथा. आज मला सांगायचे आहे ते जगातल्या सर्व स्तरातील माणसाविषयी भारत शेतीप्रधान देश आहे पण इथला शेतकरी अजूनही भुकेलाच आहे. आपण ऑफिस मध्ये, देवळात जातो आपल्याला खुप सारे भिकारी दिसतात. खूप लहान मुले देखील असतात. ज्या वयात त्यांनी पुस्तक हाती घ्यायची त्या वयात ती मंदिरा बाहेर किंवा सिग्नल समोर उभी दिसतात. फक्त एक वेळच्या जेवणासाठी. त्यात फायदा कुणा तिसऱ्याचाच असतो. भीक मागणे हा काही लोकांच्यासाठी व्यवसाय बनतो आहे, पण आवाज मात्र कुणीही उठवू शकत नाही. कारण डोळ्यांना आणि मनाला वाटत अरेरे ही किती गरिबीतून आलीत. प्रत्यक्ष दर्शी परिस्थिती तीच असते पण त्या पलीकडकाहीतरी वेेगळ घडत असते ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आणि मग आपण चार चाकी गाडीतून फिरणारे मात्र त्यांना चिल्लर काढून देऊन बाजूला होतो. पण कधी आपण त्यांच्या शिक्षणाचा विचार केलाय.... नाही?
           फटाक्यांच्या कंपनी मध्ये काम करणारी झोपडपट्टीतील मुलं अचानक एका स्फोटात भस्मसात होतात कशासाठी दोन वेळच्या जेवणासाठी. पण कमी पैशात कामगार नाहीत, आणि एखाद्याच्या गरजेचा फायदा कसा करून घ्यायचा हे आमच्या व्यापारी वर्गाला जमलेलं उत्तम गणित आहे. कारण ती लहान मुले त्यांचे आई बाप भांडायला कधीच येणार नसतात किंवा त्यांचा विमा मागणारे कुणी नसतात आणि असले तरी ते व्यापारीच खातात ही आहे लोकशाही प्रधान भारतातील भाकरीच्या शोधात फिरणाऱ्यांची अवस्था.
            आज प्रत्येक शहरात एकतरी अनाथ आश्रम आहे वृद्धाश्रम आहेत. ह्यांचा खर्च कसा चालतो कुणी पाहिलंय का कधी? सरकारी अनुदान कमी पडतंय पण आजची पिढी मात्र नको असलेले उद्योग करून अनाथ आश्रम भरायचे बंद करणार नाहीत. मला एक प्रश्न करावासा वाटतो त्या माणसांना ज्यांनी अनैतिक संबंधातून निर्माण झालेल मुलं अनाथ आश्रमात नेऊन टाकलंय, रस्त्यावर फेकलय कधीतरी तुमच्या मनात हा विचार येतो का तो कोवळा जीव काय खात असेल? तुम्ही हॉटेलात घरात पार्टी करून सण समारंभ साजरे करतात छान छान खाता तंदुरुस्त राहता. पण ज्या नरकात आपण आपलं छोटस अस्तित्व टाकून दिलंय ते काय करत असेल काय खात असेल? ते भले कुठेही असो पण एक माणूस म्हणून कधी वाटत का तुम्हाला जाऊन तिथल्या मुलांसोबत खेळावं त्यांना खाऊ पिऊ द्यावं. तुम्ही गुन्हेगार आहात त्या बाळाचे असा जराही लवलेश नसतो बरं या माणसांमध्ये.
             या देशातील प्रत्येक माणसाने माणूस म्हणून त्यांना थोडी जरी मदत केली ना तर दसरा दिवाळी ईद ख्रिसमस सारखे सण प्रत्येक अनाथ मुलं आनंदाने साजरे करेल. आणि हो फक्त अन्न नाही त्यांचे शिक्षण ही झाले पाहिजे ज्यातून ते स्वावलंबी बनतील. आयुष्यात अस एकदा नक्की करून पाहा कारण यातून मिळणार समाधान आणि आनंद तुम्हाला एक नवीन दिशा देईल जे तुम्हाला जगायला शिकवेल.
           आपण माणसं प्रचंड डिगऱ्या घेतो पण आजची परिस्थिती पाहता नोकरी मिळवणे देखील खूपच कठीण होऊन बसलय. स्टार प्रवाह ने एक सुंदर मालिका दिली मोलकरीण बाई खरंच खूप अभिमान वाटतो त्या कष्टाळू माऊलीचा ज्यांना पोटासाठी स्वतःच्या घरात आणि इतरत्र राबावं लागत तरी त्या थकत नाही. पोटासाठी कष्ट करावे पण बेईमानी नको असा सल्ला यांच्या कडूनच मिळतो कारण पैशाच्या हव्यासापोटी वाम मार्गाला जाणारी पिढी घडतेय यांना एकच सांगावस वाटत आहे तुम्हाला जगायच आणि जगवायचं असेल तर भाकरीच्या शोधात फिरणाऱ्या त्या कामवाली पहा ती तुम्हाला बळ देईल.
           तुम्ही प्रचंड शिकता नोकरी नाही म्हणून निराश होता. आजच युग स्पर्धेचं युग आहे. पण म्हणून खचून जाऊन आत्महत्या करणे हा त्यावरचा पर्याय नक्कीच नाही. भाकरीच्या शोधात आयुष्य सावरू शकत पण निराशेने संपवलं तर शोधाची प्रक्रियाच संपुष्टात येते आणि जिथे शोध आणि संशोधन संपत तिथे नवीन काहीच उमलत नाही. गरज ही शोधाची जननी आहे हे नेहमी लक्षात असू द्या.
           वाईट वाटून घेऊ नका पण मतिमंद असणाऱ्या त्या बाळाकडे पहा परमेश्वराने त्यात काहीतरी दिलेलं असत. त्यांच्या कलाकृती इतक्या अप्रतिम असतात. की त्यांना ते जगवतात. तुम्ही म्हणाल आम्हाला कोणतीच कला अवगत नाही पण प्रत्येकाने स्वतःमध्ये काहीतरी शोधा जे पोटापूरत का होईना तुम्हाला जगवेल. महागाई वाढली झोपडपट्टी तिथल्या लोकांचे अन्नवाचून होणारे हाल पाहिले. उपासमारीत राहणारा शेतकरी पाहिला की कीव येते आणि चीड येते या लोकशाही प्रधान भारताची हाच आहे का 2020 मधील अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत, कदाचित नाही?
             भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य खूप कठीण आहे पण आपण ठरवलं तर ते सोपं नक्की होईल. सिग्नल च्या कडेला पावसात भिजणाऱ्या मुलाला छत्री सोबत एक पुस्तक आणि चपाती भाजी देऊन पहा. 50 मधले 5 विद्यार्थी नक्की असतील. उभं राहून पैसे मिळत नाहीत तर ते कसे कष्टाने मिळतात याच ज्ञान त्यांना दिल पाहिजे. मंदिरांना श्रीमंत करून महाप्रसाद वाटण्यापेक्षा एका अनाथ आश्रमाला ते अन्नदान करा जास्तीच पुण्य पदरात पडेल.
         आज भाकरीच्या शोधात सगळेच फिरतात फरक इतकाच आहे. जे चार वेळा खातात ते लोकांना लुबाडून सुद्धा खातात आणि एकवेळ ची भ्रांत असणारा चार वेळा कष्ट करून इमानदारीने एकवेळ खातात..... यालाच म्हणतात आयुष्य...... गरिबीत देखील इमानदारीने जगणार.
        धन्यवाद।
___________________________________________


पवन खरात,अंबाजोगाई.

पोटाची खळगी भरण्यासाठी,
आयुष्याशी संघर्ष करत होतो ।
जगण्याची काय उमेद बाकी,
जिथं मी रोजच मरत होतो ।

स्वप्नांची ही हिम्मत नाही,
भाकरी पलीकडे जाण्याची ।
पैशा पुढे किंमत नाही,
माणुसकी सुद्धा पाहण्याची ।

भाकरीच्या शोधत हे सार,
आयुष्य ही करपून गेलं ।
माणसाच्या काळजातल ते,
माणूसपण ही हरपून गेलं ।
____________________________________________


   निखिल खोडे, पनवेल.

जीवन हे संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नांनी गुंतलेले असते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विचारात गुंतलेला असतो. श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीत आणखी कशी वाढ होईल हा विचार करत असतो तर हातावर पोट असणारे लोकं रात्रीची भूक कशी भागेल या विचारात असतात.

भूक प्रत्येकाला असते त्यासाठी सर्वांची धडपड चालू असते. भुकेने व्याकूळ झालेले लहान मुले ट्रॅफीक सिग्नलवर, बस स्टॉप वर व रेल्वे स्टेशन वर बघायला मिळतात. हे सुकलेले, कासावीस झालेले चेहरे अनवाणी पायांनी इकडे तिकडे भुकेच्या शोधात फिरत असतात तेंव्हा असे वाटते की गरीब असणे हा जणू गुन्हाच आहे..

अनेक लहान मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाचे दिवस भाकरीच्या शोधात निघून जात आहे. आपल्या मुलभूत गरजे मध्ये मोडणारा अन्न हा महत्वाचा घटक आणि त्यासाठी दररोज लाखो लोक उपाशी  कींवा अर्धपोटी उद्याच्या भाकरीच्या शोधात रात्री झोपी जातात.

ह्यासाठी शहीदांनी आपले आयुष्य उधळुन टाकले होते का स्वातंत्र्य लढ्यात ? का लाजा वाटत नाही सऱ्हास आपल्याला अन्न उष्ट टाकायला ? का आपल्या संवेदना मेलेल्या आहेत आपल्याच देशातील गरीब नागरिकांसाठी? का परत परत भ्रष्ट राजकारण्यांना निवडुन देतो आपण ? का भ्रष्टाचारी नोकरशाही सहन करतो आपण ?
कधी उत्तरे मिळतील ह्याची की की असेच मुडद्याचे जीवन जगणार आपण ....
_____________________________________________


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

जन्माला आलो तेव्हा लहान होतो बाळ,
किती लवकर आयुष्यातून निघून गेला तो काळ।

त्यानंतर पुढचं आयुष्य विद्यार्थी दशेत गेलं,
तेव्हाही आई-बाबांनी खुप सांभाळून नेलं।

मोठा झालो होतो आली मग स्वतःवर जबाबदारी,
काम शोधायला सुरुवात केली तेव्हा कळली बेकारी।

आयुष्य संपायला लागल जेव्हा माझं उतारवयात,
तेव्हा कळलं भाकरीच्या शोधात निघून गेली सगळी हयात।
_____________________________________________


यशवंती होनमाने .
मोहोळ.

  विषय वाचला आणि मन भूतकाळात गेल .माझी आज्जी नेहमी म्हणायची लोक पोटाची खळगी भरायला पर मुलखाला जातात अनं आपण इथंच .त्यावेळी समजत न्हवत, पण आत्ता कळतय .वडील नेव्ही मध्ये असल्याने बरीच वर्ष मुम्बई मध्ये राहीलो आणि वडील रिटायर झाले की गावाकडे आलो .माझ शिक्षण सगळ गावाकडे झाल .मी msw केल आणि नोकरीला लागले .....
        आत्ता खरी फिरती सुरू झाली होती माझी .इतभर पोट भरण्यासाठी ची वणवण .आत्ता कळत होत की भाकरीसाठी किती फिराव लागत ते .म्हणतात ना विंचवाचे बिरहाड त्याच्या पाठीवर अशी अवस्था .
        पण एक आहे या भाकरी न माणुसकी शिकवली , माणस जोडली , हक्काची घर झाली , मन मोकळ करता यावं अशी माणस मिळाली .या भाकरीच्या फिरती ने आयुष्य जगायला शिकवल .
___________________________________________

प्रशांत देवळे,बीड.

दिवसाची सुरवात, आणि शेवट भाकरीच दारावरची टकटक भाकरीसाठीच
काँलेजात मित्राची नजर डब्यावर भाकरीसाठीच ,त्याचा बदला तसाच भाकरीसाठीच
मित्राचा वाढदिवस , मोठ्या ढाब्यावर
ऑर्डर घरगुती पध्दतीची भाकरीच
प्रवासाची सोबत , सहप्रवाशास आग्रह भाकरीचाच
सणाच जेवण ,जन्माच स्वागत ,मृत्यु नंतर ही सर्वांना द्यावी भाकरीच
बाँसची चिडचीड ,सहकार्यांचा रागराग आपलीच कामासाठीची धडपड सगळं शेवटी भाकरीच
माया,प्रेम,माणुसकी,समाजसेवा सर्वांचा शेवट इतभर पोट त्यात मावणारी भाकरीच
मुलाला मार अभ्यासासाठी, कोकरानं मोठ व्हाव साहेब व्हाव, पुढच्या सुखाच्या जीवनासाठी
मुडद्या दहा वाजले घरी ये ,मायेची तळमळ
माझ्या साठी पोटात जावी भाकरी..
आता वाट आहे दहा वाजण्याची ....
__________________________________________


संगीता देश,वसमत

           " सगळं चालतं कशासाठी?" या प्रश्नाचं उत्तर येतं-"पोटासाठी"... माणसाची पहिली गरज आहे पोटाची! त्यानंतर सुरु होतात त्याच्या इतर गरजा. ह्या गरजा अवलंबून आहेत आपल्याला आर्थिक स्टेटसवर. पण हीच पोटाची गरज माणसाचं संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधातच फिरवते.
                माणसाला ही भाकर काय करायला भाग पाडत नाही? चोरीपासून तर कितीही निम्नदर्जाचे काम याच भाकरीसाठी करावे लागते. ही भाकर कधी सन्मार्गाने मिळते तर ह्याच भाकरीसाठी वाममार्गाचाही अवलंब करावा लागतो. अनेकांच्या जीवनात खूप बदल होत जातो,त्यांच्या घरात आधीच्या  लोकांनी जरी ही भाकर फार कष्टाने मिळवली असली तरी पुढच्या पिढीला तेवढे कष्ट करावे लागत नाही. परंतु काही समाजघटक असे आहेत की,पिढ्यानपिढ्या त्यांचे संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधापलीकडे जातच नाही. आयुष्यात पहिली आणि शेवटची गरज तीच ठरते. देशात हरितक्रांती झाली तरी काहीजणांचा अजूनही मुख्य भाकरीचाही प्रश्न मिटलेला नाही. म्हणूनच कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान आले तरी मॅनहोलमध्ये यंत्राऐवजी  अजूनही आपल्या देशात भाकरीसाठी लाचार असलेल्या माणसांनाच उतरावे लागते.  ही किती खेदाची बाब आहे!
___________________________________________


नरेश शिवलिंग बदनाळे, लातूर.

असं म्हणतात की,ह्या पृथ्वीतलावर ८४ लाख जीव आहेत.त्यापैकी कोणीही उपाशी राहत नाही आणि आणि माणसाचं पोट कधी भरतच नाही. भाकरी खूप काही दडलं आहे ह्या भाकरी मध्ये माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा त्यात पहिल्या स्थानी अन्न म्हणजे भाकरी आता नव्याने काही गरजा त्यामध्ये आल्या आहेत जसे की मोबाईल. पण भाकरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही  तिच्या शोधात तर राव ही आहे आणि रंक ही किती कमाल आहे ना वित भर पोट आणि त्या साठी आयुष्यभर त्या भाकरीच्या मागे फिरावं लागतं बहिणाबाई म्हणतात
अरे संसार, संसार
जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके
मग मिळते भाकर
ह्या भाकरी साठी काय काय नाही करावं लागत कोणी साता समुद्रापलीकडे गेलंय तिला मिळवायला तर कोणी ह्या राज्यातून त्या राज्यात, कोणी राना वनात तर कोणी मोठ्या मोठ्या शहरात.मुंबई आर्थिक राजधानी,अर्थ नगरी ,माया नगरी जिथे रोज लाखों लोक ह्या भाकरीच्या शोधात एक नवीन स्वप्न घेऊन येतात, कोणी शोधातच होरपळून जातात आणि कोणी मिळवत राहतात, पण भाकरीच्या शोधात फिरणारे तर सर्वत्र सर्वचजण आहेत तुम्ही आम्ही पण या पैकी दर दहा सेकंदाला कोणीतरी या जगात शेवटचा श्वास घेतो सरासरी दहा लक्ष लोक दरवर्षी या भाकरीच्या अभावाने मरतात आणि आपण असणारे त्या भाकरीची कदर करत नाहीत ,पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिच्या शोधात फिरतोच बहिणाबाईंनी म्हणल्याप्रमाणे हाताला चटके मिळाल्यानंतरच भाकरी मिळते म्हणजे त्यासाठी काहीतरी करावं लागतच पण ती मिळाली तरी आत्मा तृप्त होत नाही ना शरीर शेवटच्या श्वासा पर्यंत शोध चालूच असतो वित भर पोट, त्याला भरण्यासाठी मिळवावे लागतात नोट. मोबाईल आपल्या मूलभूत गरजांमध्ये आला,आणि कोणी आपल्याला त्यातलं काही मागितलं तर आपण लगेच शेअर इट सारख्या तंत्राने देतो तसेच आपल्या कडे असलेली भाकरी पण त्याच खुशीने द्यायला शिकलो तर खूप छान होईल शेअर इट सारखं तंत्र भूक भागवण्यासाठी पण असत तर कदाचित हा शोध संपला असता... आयुष्याचा शेवट आणि शेवटचा श्वास कधी ह्या शोधातून बाहेर निघेल का हो..?
___________________________________________


किरण पवार
औरंगाबाद,

भाकरीसाठी वणवन भटकत आलेले आयुष्य
नेमका शेवट काय करावा
याचे नसलेले उत्तर भाकरीच्या शोधातले आयुष्य

कधी जहाल वागावयास भाग पाडणारे
कधी देहाला विक्री करायला लावणारे,
कधी या न कधी त्या
पण बऱ्याचदा खूणही करवणारे,

भाकरी हा प्रश्न जेव्हा आस्तित्वावर घाव करतो
तेव्हा तरूणाईला स्वप्न तोडून कमवायला लावणारे,
न जाणो कोण भिकारी कोण संपूर्ण वेडे असलेले
पण आतड्याला चिकटलेले पोट घेऊन
रस्त्यांवर धुळीत लोळायला लावणारे,

गावासारखा स्वर्ग सोडून
नालीच्या किनाऱ्याला शहरात
घर वसवायला लावणारे,
पोरांपासून बापाला अन माईला
लहानपणी बऱ्याचदा वेगळं रहायला लावणारे,

काय आहे सर्व शेवटी समजतं नाही
अन् भाकरीच्या प्रश्नापोटी माणूस कधीच फिरणं थांबवत नाही.
________________________________________

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************