🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
ही माहेरी गेली तेव्हा…
निखिल खोडे, ठाणे
आयुष्य एकदाच मिळते ! मौजेत जगायचं..!!
घरच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे माझी ताई आणि मी मुंबई ला आलो. नवीन काहीतरी शिकुन, जॉब करुन घरच्यांना आर्थिक मदत करायची आहे हे ध्येय समोर ठेवून आमचा मुंबई मध्ये सोबत जगण्याचा प्रवास सुरू झाला. सुरवातीला खुप काही समस्या जाणवल्या परंतु नंतर सर्व काही सुरळीत झाले..
एकदा ताई गणपती च्या निमित्ताने गावाला गेली होती. ताई ला ऑफिस मधुन सुट्टी मंजूर झाली आणि मला सुट्टी मिळाली नाही. सहा महिने गावाला गेलो नव्हतो त्यात गणपती ला घरी नाही त्यामुळे मनामध्ये संपुर्ण निराशा येऊन गेली. एकदा तर वाटल की सर्व सोडुन गावी जाव परंतु नाही जाऊ शकलो.
ताई गावाला गेल्यानंतर घरी एकटाच ! मग काय सकाळी झोपेतुन उशिरा उठणे, मित्रांशी फोनवर मोठ मोठ्याने गप्पा मारणे, मनाला वाटेल ते खाणे, रात्री बाहेर फिरणे, घरी आल्यावर रात्री युट्यूब वरती व्हिडिओ बघणे या सर्व गोष्टी ताई गेल्यानंतर केल्या कारण म्हणायला आणि बोलायला कोणीच नव्हत. दोन-तिन दिवस मजेत गेले.
गावी जाऊन जेव्हा ताई व्हिडिओ कॉल वर आई - बाबांना दाखवले तेंव्हा खुप दिवसांनी त्यांचा चेहरा बघुन मन भरुन आले. घरातील छोटे- मोठे सर्वांना पाहून आपण पण गावी जावं अशी तीव्र ईच्छा झाली. मग सुरुवात झाली होमसिकनेस ची... कश्यातच गोडी वाटेनाशी झाली..
एकट्याने जेवण बनविणे, घरातील एकटेपणा ... घरात बोलण्यासाठी कोणी नाही.... अनेकदा रागावणारी व चुकल तिथे माफ करणारी, लाडाने समजावून सांगणारी, जेवायला नव - नवीन पदार्थ बनवणारी ताई ची कधी नाही ती खुप आठवण यायला लागली व डोळे पाझरायला लागायचे...
एकदा घरच्यांशी फोनवर बोलतांना माझा आवाज थोडासा थरथरला. ताईच्या बहुतेक लक्षात आले असावे. ती तडक रिझर्वेशन नसतांना तीन दिवस अगोदर च परतली... दरवाजा उघडुन बघितला आणि ताईला समोर बघुन लहान मुलासारखा रडत तिच्या कुशीत शिरलो.
तिने आईच्या मायेने कुरवाळले व घराचा झालेला उकीरडा सावरायला घेतला. दुसर्या दिवशीचा गणपती विसर्जन सोहळा सोबत अनुभवला... ते दहा दिवस दर वर्षी गणपती आगमनाला आठवतात व खुदकन हसु येते ....

शिरीष उमरे, नवी मुंबई
अजुनही अंगावर काटे उभे राहतात जेंव्हा आठवते *ही माहेरी गेली होती तेंव्हाची* माझी दयनिय अवस्था ...
सासुबाई पाय घसरुन पडल्या हे निमित्य आणि संकटाची मालिका सुरु झाली... आमची अर्धांगिनी लगेच रवाना झाल्यात दहा वर्षाचे आमचे कन्यारत्न आमच्या हवाली करुन !!
मुलीची शाळा व अस्मादिकांचे ऑफीस ह्या वेळापत्रकासोबत कामवाल्या बाई, स्वयंपाकवाल्या ताई, दुधवाला भैया वैगेरे सोबतची तारेवरची कसरत सुरु झाली. पहील्या दिवशी च डोळ्यासमोर तारे चमकले... पहाटे सात ला उठुन मुलीसाठी ब्रेकफास्ट बनवणे ह्या दिव्य संकटातुन स्वयंपाकवाल्या ताई लवकर आल्या म्हणुन बचावलो... तोपर्यंत ३-४ टोस्ट काळ्या ठीक्कर झालेल्या व वेज सँडविच बनवनाच्या नादात कांदा चिरतांना रडुन लाल झालेले डोळे असा मी असामी... ताईने जॅमरोटी रोल बनवेपर्यंत मुलीला कशीबशी तयार केली व शर्ट प्यांटात कोंबुन दोघेही रवाना झालो...
घाईगडबडीत घराच्या चाब्या शेजारी द्यायला विसरलो. त्यामुळे मुलगी शेजार्याकडे वाट पहात आणि कामवाल्या बाई निघुन गेलेल्या... लंच टाईम ला धावत पळत घरी आलो. बकेट मधल्या भिजवलेल्या कपड्यांचा वास येऊ नये डीओ मारला. दुध गरम करतांना अर्धे उतु गेले... मी व मुलगी जेवलो सोबत व तिला बाजुच्या आजीकडे हवाली करुन मी पळालो ऑफीसला... रात्री बाहेरुन च जेवायचे बोलावले व केंव्हा झोप लागली माहीतच पडले नाही... दुधवाला भैया बेल वाजवुन वाजवुन थकुन निघुन गेला बहुतेक... स्वयंपाकीण ताईजवळ चाबी होती म्हणुन त्यांनी उठवले तेंव्हा जाग आली. तेवढ्यात बेल वाजली म्हणुन दार उघडले आणि पहील्यांदा दारात सासुबाईंना बघुन आनंदाने गदगदलो. ही मिश्कीलपणे हसत म्हणाली *कसा गेला दिवस?* 😅
किशोर शेळके,लोणंद .
अगं ऐकलस का? एक ग्लास भरून पाणी दे ना.
मी माझ्या बायकोला अशी हाक दिली, पण आतून काहीच आवाज आला नाही.
आज कामाचा ताण जास्तच असल्यामुळे खूपच कंटाळा आलेला, आणि घरी यायला थोडा उशीर देखिल झालेला. म्हणून मी बायकोला आवाज दिला पण तीने ओ देखिल दिली नाही आणि बाहेरही आली नाही. थोडा वेळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आज सकाळीच बायको माहेरी गेलीय.
रोज थकून भागून घरी आल्यावर न मागता हातात पाण्याचा ग्लास येतो, हात पाय धुण्यासाठी पाणी मिळतं, टाॅवेल मिळतो, लगेच चहा येतो. पण आज असं काहिच होणार नव्हतं. कारण आज बायको माहेरी गेलीय. आणि त्याच हक्काने मी ही कामे इतर कोणालाही नाही सांगू शकत.
जवळ जवळ सर्वच गोष्टीत हातभार लावणारी, आधार देणारी बायको ज्यावेळी घरात नसते ना, तेव्हा अक्षरशः हात पाय मोडल्यागत होतं. पण कधीच माहेरी न जाणारी बायको अजून तरी आपल्याकडे दिसत नाही. आणि तिलाही तिच्या माहेरी गेलंच पाहीजे ना.
पण हल्ली बायको म्हणजे कटकट हे समीकरण आपल्याला सगळीकडे बघायला मिळतेय. आणि ज्यावेळी बायको घरात नसेल तेव्हा नवरा म्हणजे जेल मधून सुटून आलेला कैदीच. आजकाल विनोदाचा भाग म्हणून पण बायकोची खिल्ली उडवली जाते. पण जेव्हा ती घरात नसतानाची होणारी परवड बघता तिचे महत्त्व लक्षात येते.
एकुण विचार केला तर बायको माहेरी गेलेला काळ हा सेलेब्रेशनचा नसून धावपळीचा आहे.
प्रमोद पांचाळ.धर्मापुरी ,परळी
खरे सांगायचे म्हणजे ही हा शब्द खूप आपले पण सांगून जातो आणि तिच्या समोर जर आपण माहेर हा शब्द उचर केलकी ही लगेच म्हणते मला खूप दिवस झाले जाऊन येते मी आईला भेटून
पण हिला त्याला सोडून पन जावं वाटत नाही जावेतर हा बाहेर गावी राहत असतो हिला त्याची काळजी असते आपण जावे तर ह्याच्या डब्याची सोय कोण करील हिच्या डोक्यात तोच विचार चालत असतो व मग ती कुणाला तरी त्याला सकाळचा डबा बनवून देण्यास व
ही माहेरी जाते तेव्हा त्याची खरी कष्टाडी चालू होते
आणि तेव्हा त्याला कळते की हि माहेरी गेली तेव्हा आपले काय हाल होतात
अमोल धावडे, अहमदनगर.
माझं लग्न झालं नाही त्यामुळे मला काय अनुभव नाय 😝त्यामुळे गप्पा मारत असताना मित्राने सांगितले ते मांडण्याचं प्रयत्न करतो आहे.
तस पाहायला गेलं तर तो आणि मी खुप जवळचे मित्र आहोत आणि वर्गमित्र पण त्याच्या लग्न करण्यामागे माझा खुप मोठा हात कारण लव्ह मॅरेज आहे.
लग्न झाल्यानंतर आमचा मित्र काय आम्हाला भेटायाला ऐइना मग त्याला विचारलं का रे बाबा तू भेटत नाही बायको सोडत नाय ना अस तो बोलला म्हटलं ठीक आहे मग असच एकदिवस अचानक त्याचा फोन आला आणि मला विचारलं कुठे आहे मी बोलोलो की ऑफिस मध्ये आहे तो बोलला की आपण भेटूया का अरे मी बोलोलो सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय नाही रे ही माहेरी गेली आहे. मग आम्ही मस्त आमच्या ठिकाणी भेटलो जुन्या आठवणी आणि पार्टी यात दंग झालो. आजून एका मित्राला बोलून घेतले मस्त पार्टी केली मज्जा केली आणि गप्पा मारल्या बायकोचा फोन आला जेवण करून घ्या बाहेर जेवण करू नका तब्बेत बिगडेल या बायका पण कती प्रेमळ असतात ना काळजी पण किती करतात गेल्या ना माहेरी तरी नवऱ्याची आठवण.
पण मस्त मज्जा केली व रात्रीचे 3 कधी वाजले समजलेच नाही मस्त मग आम्ही त्याचा रामराम घेतला कारण आमचे वांधे होणार होते कारण आमच्या घरचे आम्हला घरात घेतील की नाही हा प्रश्न.🤣🤣
डॉ. विजयसिंह पाटील,कराड.
बायको, पत्नी, सौ , मंडळी, बिऱ्हाड घरवाली, ' ही', इत्यादी नावानं सर्व ब्रह्मांडात प्रसिद्ध असलेली व्यक्ती माहेरी जाणे, हे बहुजनांप्रमाणे मलाही सुखस्वप्न वाटत आलंय.
' यांव करा, त्यांव करा,, हे करू नका ते करू नका , इत्यादी टोमणे वजा बोलण्यांनं आणि त्या मानसिक त्रासाने मेंदू त्रस्त झाला होता.बधिरच झाला होता म्हणा. ( सर्व विवाहित पुरुषांची हीच अवस्था होत असणार याच्यावर माझा ठाम विश्वास आहे.)
आणि तो दिवस उगवला. ' अहो मी काय म्हणते दोन अडीच दिवस माहेरी जाऊ का ?', असा प्रश्न मला विचारला.
मी स्वतःला चिमटा काढून आपण स्वप्नात तर नाही ना ? याचा विचार करत बसलो. आपण जागे आहोत आणि हा प्रश्नही खरा .. माझ्या मौनाचा तिनं गैरसमज करून घेतला. 'बरं राहूदे, बघू मग कधीतरी 'असं म्हणताच मी तात्काळ भानावर येऊन ' जा ना, काही प्रॉब्लेम नाही ' . आणि तो आनंदी दिवस उगवला. बायकोला गाडीत बसवलं आणि ' तेचि पुरुष भाग्याचा (की भाग्याचे ?) ' आठवलं. गाडी फलाटाच्या बाहेर पडताच मी अत्यानंदाने उड्या मारणार होतो, पण गर्दी अभावी ते शक्य झाले नाही..

बायकोला गाडीत बसवून, मी परत येत असताना, हॉटेल लागलं. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्यामुळं माझ्या चेहऱ्यावर एक वेगळचं हसू होतं. आबा ( सुगीच्या कामात व्यस्त असल्याने )वगळता सगळी गॅंग कसल्यातरी गंभीर चर्चेत गुंग झाले होते. ( खरं तर कावळे सर हातवारे करत कशावर तरी व्याख्यान देत होते. बाकीचे जांभया गिळत मनापासून ऐकल्यासारखं दाखवत होते .)
मला आणि माझा चेहरा पाहून, घोलप साहेब म्हणाले, 'लुकिंग हॅप्पी, काय विशेष ? '. बायको माहेरी गेल्याचं त्यांना मी सांगताच, एकदम वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. ' ऑसम, एन्जॉय माय फ्रेंड ' असं गूढ स्मित करत घोलप साहेब म्हणाले. (त्या गूढ हास्याचा अर्थ माझ्या फार उशिरा लक्षात आला, असो.) ' अरे व्वा, मौज आहे बुवा तुमची ' इति. कुलकर्णी साहेब. आपलं भाषण अर्धवट राहिल्यानं चिडलेले कावळे सरांनी चोच मारलीच ' त्यात एव्हडं खुश होण्यासारखे काय आहे ?'.
मी काही बोलायच्या आत , घारे गुरुजी म्हणाले ' अहो कावळेसर उगाच का चिडताय त्यांच्यावर, करूदे की मजा त्यांना, तुमच्या नशिबात हे सुख नाही यात यांचा काय दोष आहे ? (कावळे सरांची सासुरवाडी गावातच आहे, हे मला नंतर कळलं. )
आवरून ऑफिसला जायची गडबड असल्याने मी आता दोन दिवस फिरायला सुट्टी असं बोलून मी त्यांचा निरोप घेतला. घोलप साहेबांच्या चेहऱ्यावर परत गूढ स्मित पसरलं होतं..
परंतु आनंदाच्या भरात मी तिकडं दुर्लक्ष केलं...
त्या आनंदातच ऑफिस मधला वेळ कसा गेला हे कळलंच नाही. पण शेवटी एक चूक झालीच. बोलता बोलता, शेजारच्या टेबलावरील देशमुखांना ही आनंदवार्ता कळलीच.
संध्याकाळी मित्रांसोबत चकाट्या पिटत कुठल्यातरी हॉटेल मध्ये चहाचे कप ढोसत बसलो. मग जवळ च्या एखादया चांगल्या खानावळीत जेवणावर आडवा तिडवा हात मारून, शेजारच्याचं पानपट्टीतुन मसाला पान चघळत रमतगमत घरी आलो. पोट तुडुंब भरल्याने खुर्चीवर बसून बूट काढायचा निष्फळ प्रयत्न करून, शेवटी एका पायाच्या अंगठ्याने दुसऱ्या पायाचे बूट जोरात काढतो. तो बूट जवळच ध्यानस्थ बसलेल्या मांजरावर जाऊन आदळतो. मांजर माझ्याकडे रागानं बघत आणि गुरगुरत आपलं स्थान बदलतं. मग सॉक्स उडून सोफ्यावर विराजमान होतात. कसाबसा टीव्ही सुरू करून ,.बसूनच शर्ट दुसऱ्या सोफ्याच्या दिशेनं भिरकावला जातो.
खुन्नस काढायची म्हणून आगाऊ मांजर हळूहळू कधी माझ्या पांढऱ्या शर्टवर येऊन बसलं ते कळलंच नाही. ( सकाळी पिवळट पडलेला शर्ट आणि सुगंध आलेला बघितल्यावर कळलं, असो ).
बसूनच पॅन्ट भिरकावून देऊन, ऐसपैस माझ्या मस्त डेऱ्या सारख्या पोटावरून हात फिरवत तिथंच कधी गाढ झोपी गेलो ते कळलंच नाही.
उन्हाची किरणं जशी तोंडावर आपला प्रभाव दाखवू लागली. मी हिकडं तिकडं हात करून मोबाइल उघडला. ब्याटरी संपल्यानं तो घोर निंदेतच होता. पुढच्या भिंतीवर नजर टाकली तर नऊ वाजलेले. अवघडून , मी झोपेत कुठं कुठली आसन केली देव जाणे. पण झोपेत केलेल्या योगामुळे माझं अंग बघावं तिथून ठणका मारत होते. दांडी मारायचा विचार क्षणभर मनात आला. पण आज ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम होतं. म्हणून तो विचार मनातून काढून टाकला.
कसंबसं आवरून, धावतपळत ऑफिस गाठलं. चांगला अर्धा तास उशीर. लेट मार्क पडलाच , पण साहेबांची टन भर बोलणी खाल्ली. अंग अगदी चौहुबाजूने आपला विरोध दर्शवत होतं. साधा चहा पण पिला नव्हता राव.
बेलबॉयला सांगून चहा मागवला. चहा पिल्यावर अगदीच कृत्य कृत्य नाही झालं, पण बरं वाटलं. मी चहाचा आस्वाद घेत असताना, शेजारचा , देशमुख कसे म्हणतात ' करा मजा, बायको नाही ना '.. त्याला काय प्रत्युत्तर द्यावं म्हणून विचार करत असताना, साहेब येताना दिसले. देशमुख विजेच्या चपळाईने जाग्यावर बसलेले.
मी अंदाजे दीड टन बोलणी खाल्ली असावीत.
दुपारी कँटीन मध्ये चरलो, (हो , मी नुसतं खात नाही तर चरतो, इति. बायको.)
देशमुखांनी ऑफिस मधल्या सर्व मित्रांना, मी दोन दिवस स्वर्ग सुखात( म्हणजे मी एकटाच घरी ) आहे हे सांगितलेले..
झालं, यांनी रात्री पार्टीचा बेत ठरवून पण टाकला. याबाबतीत सर्व जण भयंकर कार्यतत्पर.. कुणी काय आणायचं, किती वाजता कार्यक्रम सुरू करायचा, जेवण कुठून मागवायचे, याची रूपरेखा ठरली.बायको रविवारी संध्याकाळी येणार होती. शनिवारी रात्री पार्टी. त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता.
अचूक ठरल्या वेळेस सर्व दोस्त मंडळीघरात हजर झाली.
आल्या आल्या, त्यांनी लिव्हिंग रूमचा ताबा घेतला. आणि सरळ खाली बैठक मारली. रात्री उशिरा कधीतरी पार्टी संपली. खोलीतला पसारा तसाच ठेवून एकएक गायब झाला. त्या पसाऱ्याकडे पाहून मला घामच फुटला. पण असुदे, सकाळी लवकर उठून उचलू हा पसारा असा विचार केला आणि स्वतः वर खुश होऊन गाढ झोपी गेलो.
सकाळी सकाळी, जोरजोरात घंटी वाजल्याचा आवाज दोन ब्लॅंकेटमधून माझ्या कानात घुसला. मोबाईलचा गजर वाजतोय असं वाटून मी पांघरुणातुनच हात बाहेर काढून मोबाईल डोळ्यासमोर धरला. तो शांत पडला होता. घंटीचा आवाज वाढतंच चाललेला. एव्हड्या सकाळी कोण आलंय बुवा असा विचार करत , मी दरवाजा उघडला.
तो साक्षात कपाळावर आभाळभर आठया घालून बायको समोर..
मी अजूनही अर्धवट झोपेतच होतो.
बायको आत आली आणि हॉल मधील दृश्य पाहिलं. आम्ही दोघेही एक मिनिटभर ते दृश्य बघत होतो.
सहा दिशेनं बुरुजा प्रमाणे ताठ उभे असलेले ग्लास, गालिच्यावर कलांडलेल्या बिअरच्या बाटल्या, चौहूं बाजूनं विखुरलेल्या उश्या , धारातीर्थी पडलेले शेंगदाणे ,रिकाम्या पाकिटात विझवलेली थोटकं ,इत्यादी इत्यादी..
मला घाम फुटला, झटका बसल्यासारखं डोकं झालेलं..
' अहो काय हे ', वीज कडाडल्या सारख्या आवाजात बायकोनं विचारणा केली. मी विषय बदलण्याच्या उद्देशाने
' अगं संध्याकाळी येणार होतीस ना तू ?, एव्हड्या पहाटे कशी काय आलीस ? ' असं मी अगदी खालच्या आवाजात विचारले.
' पहाटे ? आठ वाजले आहेत.ते राहुद्या , सांगते मी नंतर, अगोदर याचं स्पष्टीकरण द्या '..
' अग आम्ही मित्र रात्री फक्त गप्पा मारत बसलो होतो .' असलं काहीतरी बारक्या पोराला पण पटणार नाही असं कारण दिलं. पण या असल्या कारणांमुळे फसण्याइतकी बायको मूर्ख नव्हती.
मग दांडपट्टा फिरवल्यासारखं जे तिचं तोंड सुरु झालं म्हणता, की बेडरूम बघताचं , तोंडाचा टॉप गियर पडला.किचन बघून लाटणंफेक व्हायचा भीतीनं मी खालमानेनं हळूच व्यायामाचे कपडे घालून तिथून ( डीटयो शाहिस्तेखानासारखा ) पोबारा केला..
चालत कम पळत घरापासून सुरक्षित अंतरावर पोहोचल्यावर कुठं मी दम घेतला. तेव्हड्यात आमचं हॉटेल आलं. आत गेल्यावर आबा वगळता , सर्व गॅंग बसलेली होती. मी हाश हुश्श करत खुर्चीवर बसून घाम पुसायला लागलो.
माझा पडलेला चेहरा पाहून, घोलप साहेबांनी विचारले ' व्हॉट इज द म्याटर , यू लूक ...,(इथं बरोबर इंग्लिश शब्द न सापडल्याने ) ते गप्प बसले.
'सुट्टी संपली वाटतं , हँँ हँ..'' कावळे कुश्चितपणे..घारे ,कुलकर्णी , दळवी माझ्याकडे दयावजा कुतूहलाने बघू लागले.थोडक्यात सर्व वृत्तांत मी सांगितला.. कावळे सरांच्या चेहऱ्यावर खलनायकी हास्य पसरलं.
' अहो जरा काळजी घ्यायची की नाही ' इति घारे कुलकर्णी दळवी एकाच सुरात बोलले.
माझं लक्ष घोलप साहेबांच्या कडं गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर परत तेच गूढ स्मित.
शेवटी घोलप साहेब ' याचं कारण सांगतो, मला सांगा दोन दिवसात तुम्ही किती वेळा सौंना फोन केला ? बिलकुल नाही ना ? , घरभर पसारा करून ठेवला ना ? ,घरात पार्टी केली ना ? '..
मी होकार देताच ' बायको माहेरी गेली की काही पथ्ये पाळायची असतात , अनुभवाचे बोल आहेत हे .'..
' एक ,--रोज किमान बायकोला दोनदा फोन करायचा, चार वेळा केला तरी चालेल, (जास्त नको , बायकोला शंका येते ').. आणि बायकोच्या अनुपस्थितत आपले किती हाल होतायेत हे घडोघडी सांगायचं.
दोन ,--फोनवरून सासुरवाडीतल्या सगळ्यांची अगदी कुत्र्या मांजरांची पण आस्थेने चौकशी करायची..
तीन, -- बायकोच्या गैरहजेरीत आपण एन्जॉय करतोय हे कधीच दर्शवायचं नाही,
चार, -- शक्यतो ऑफिस वगळता , कुठंही इंटरनेट चालू ठेवायचं नाही , कधीही तिचा विडिओ कॉल येऊ शकतो..,
पाच-- घरात हॉल आणि किचन मध्ये जास्त वावर ठेवायचा नाही, किचनचा वापर फक्त पिण्याच्या पाण्यासाठी करायचा,,
सहा-- बाहेर हॉटेलमध्ये कितीही चांगलं जेवण असलं तरी, ' तुझ्या हाताची टेस्टच वेगळी ' , हा डायलॉग न चुकता फेकायचाच..
सात --हिकडं मी किती बोअर झालोय, तुझ्यावाचून करमत नाही ,इत्यादी सिनेमातील टिपिकल वाक्ये मधून अधून टाकायचीच.
आठ-- या कालावधीत कमीत कमी, घरातील साहित्य वापरायचं.
नऊ-- चुकूनसुद्धा फर्निचरची जागा बदलायचा आचरट पणा करायचा नाही."
एव्हडी पथ्ये सांभाळली तर ही वर्षातील एकुतील एक सुट्टी तुम्ही एन्जॉय करू शकतो ' ...
मी ह्या ज्ञानाचा उपयोग पुढच्या सुट्टी साठी करायचो म्हणतोय ..
बघूया कधी योग जुळून येतोय ..
स्वप्नील चव्हाण,मेहकर,बुलडाणा
माझी रचना व्यक्त करायला शीर्षक थोडं बदलतोय......
"जेव्हा ती माहेरी जाते"
आज कुणी जाताना नाराजी नव्हती,
का बरं?जाणारी व्यक्ती तर माझीच होती,
मनात आनंद दडूनही चेहऱ्यावर नैराश्य दिसते,
असं बरंच काही घडत जेव्हा ती माहेरी जाते.....!!
एकटेपणाच्या गर्दीमध्ये हरवुन मी जातो,
एकांताच्या सानिध्यातही खूपच गोंधळ होतो,
भांडकूदळे घर हे माझे निपचीत झोपी जाते,
जेव्हा ती माहेरी जाते.....!!
उद्याचा चहा मीच बनवणार,
जेवायला पण बाहेरच जाणार,
रोज-रोज खाऊन कंटाळलोय मी वांगी ,भोपळा नि भेंडी,
हॉटेल वरती मनसोक्त आज खाणार चिकन हांडी,
नऊ नको नि दहा नको,
रात्री 11 ला अडवायला ही कोणीच नसते,
जेव्हा ती माहेरी जाते.....!!
झोप मात्र आज शांत लागेल,
चेहराही झोपताना त्रासिक नसेल,
कुरकुर ऐकतो रोजच तिची,
आज मी पण बोलू शकेल,
त्रास तिचा तर कालपण कळला,
आज मी पण सांगु शकेल,
अलार्म चा वेळही माझेच मन ठरवते,
जेव्हा ती माहेरी जाते......!!
एवढी मोकळीक असूनही
कमतरता तिची जाणवते,
शांत पडलेल्या या घरात तिचे बडबडणे आठवते,
चिकन हांडी पेक्षा तिची भेंडीच गोड वाटते,
रुसवे-फुगवे तेव्हाचे आज प्रेमचं तिचे भासवते,
आनंदाच्या वातावरणातही तिची उणीव भासते,
जेव्हा ती माहेरी जाते......जेव्हा ती माहेरी जाते......!!
शीतल शिंदे - दहिवडी
तीच ती जी आई वडिलांचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते , आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवते ,काबाडकष्ट करते , आपल्या संसारासाठी कोणतेही काम करायला तयार असते मग त दुसऱ्यांची धुणी भांडी का असेनात ती करते .
ती थोडीशी स्वार्थी असते ते ही आपल्या संसारासाठीच .
जी त्या घराण्याचा दिवा , वंश पुढे नेते , जिच्यामुळे घराला घरपण मिळते , जी घरातील सर्व मंडळींचा त्रास सहन करते , जिच्या वर अन्याय होतो , जिचा पावलोपावली अपमान केला जातो , जी सर्वांना जेवू घातल्यावर शेवटी राहिले तर खाते अशी ती माजी माय माऊली माता , बहीण मुलगी ........
असे जर तिच्या बरोबर कोणी वागत असेल तर असे वाटेल की अश्या लोकांचा जीव घेवू की काय 🤕 बरोबर ना ?
मग तिथे अर्धांगिनी असेल तर वेगळा विचार का ? तिला नाही का मन , नाहीत का भावना , तिला नसेल काय राग येत , तिला नको का विसावा 🤔.तिला नाही का वाटत आपण पण चार दिवस आराम करावा, निवांत फिरावे .
बायको म्हटले की हष्याचा विषय , टिंगल टवाळकी .ही प्रथा आपणच बंद केली पाहिजे तेव्हाच कुठे आपली बहीण , मुलगी भावी आयुष्यात सुखी होईल .
पहा ती घरात नसेल तर काय उजेड पडतो घरात ते .पण पुरुष जातीला ईगो फार असतो मोडेण पण वाकणार नाही असा .
महेश कामडी, नागपुर
माझं तर अजून लग्न झालेलं नाही तरी पण .......
"ती माहेरी गेली तेव्हा?"
माझ्या मित्र परीवरांवर आधारित.
माहेरी जाण्याचे ही काही ठराविक वेळ प्रसंग असतात उदा. सण, नात्यातील लग्न इत्यादी.
बायको माहेरी गेली की नक्की 3 ते 4 मित्रांना सहज न. मियतो मो. मध्ये, त्या आधी ही असतोच न. पण ........... मध्ये असतो तो पण ➡ ( बायको)
मित्रांना फोन जाताच मित्र मंडळ लगेच तयार होतात.
आमच्याकडे माहेरी गेली तर मज्जा तेव्हा असते ते दिवस म्हणजे पोळा
कारण कस असते की आधी श्रावण त्यामध्ये नो ड्रिंक नो मास - मटण पण श्रावण संपला की 🍗🍖🥃🍾🍾🍻🥩🍗🍖😋😋
सुरू पण चान्स कधी मियेल बायको राहली तेव्हा सर्व लिमिट पेक्षा ही कमी.
मग लिमिट च्या वर मज्जा म्हणजे ' बायको गेली तेव्हा ' 👉🏼 माहेरी हो😆मग 4 - 5 मित्र मंडळ ज्याची बायको माहेरी गेली त्याच्या घरी 🍾🍖🥩🍗🥃 👈🏻 या सर्व तयारी सोबतच 🃏♦♠♥♣ कार्ड पण
रात्र भर फुलं धमाल "खाव - पियो बिवी नहीं तबतक बिनधास्त जियो"
हॉटेल किंवा एखाद्या मित्राच्या शेतावर जाऊन पार्टी
वेळेवर पार्टी फुल रंगात असताना होममिनिस्टर चा फोन आला की सर्व मज्ज्याच निघून जाते😦
सर्वात जास्त खोटं बोलण्याची वेळ हीच असते खर तर😂😂🤣
जवळपास असाच प्रकार दिवाळीला सुध्दा असतो त्या वेळी काय तर खण्याच अजिबात टेन्शन नसत कोणाच्या हि घरी 10 मिन बसलात की फरायच मियताच😂😉 आणि घरी पण बनून ठेऊन असतंच
प्रोब्लेम तेव्हा होतो जेव्हा आवडीचे पदार्थ संपायला लागतात.
अरे मग काय वेड्यासारखं अख्ख्या घरातील डब्बे सोधायला सर्वात कुठे लपून तर नाही ठेवलं म्हणून.
सर्व घरभर चिवडा, लाडू, चकली, इत्यादी पदार्थाचे कण बघायला मिळतात मग ते किचन, बेड रूम, सोपा असो सर्वी कडे मियते
कारण साफ करायच्या जीवकडे येत
काही दिवस बाहेर जाऊन जेवाव लागत तर कधी मित्र कडे
आणि पोळा, होळी सारखे प्रकार अधेमधे बायको माहेरी गेली की सुरूच राहतात.
पण बायको माहेरी काही दिवस बरी वाटते.
नंतर मात्र ते कधी येते याचीच वाट असते कारण👇🏻
ऑफिस मध्ये डब्या विना जाणे😔
घराचा कायापालट झालेला अवतार पाहून झोप न येणे
किचन मध्ये जाण्याची इच्छा होत नाही
वेळेचे नियोजन नाही
मग होते ते म्हणजे पैशारी उधळणी भूक लागली की बाहेर चाय बाहेर नाश्ता बाहेर
मित्र मंडळ सोबत 🏨 हॉटेल
आता हे तर 5 - 7 दिवस बर वाटत👆🏻👆🏻
मग आठवत ते म्हणजे बायको च्या हातचे जेवण, चाय, तिचा तो वारंवार येणारा आवाज ' जरी ती घरी आल्यावर नकोसा वाटत असेल, पण ती घरी नसल्यावर एकावासा वाटणारा तिचा आवाज '
चाऱ्यावरील तेज नाहीस होत जात
मग असते ती एकच गोष्ट होम मिनिस्टर च्या आगमनाची वाट
वापस आल्या नंतर पुन्हा एकदा हा विचार मनात येतोच
ही माहेरी कधी जाईल....

संगीता देशमुख,वसमत
सकाळची साखरझोप कोणाला आवडत नाही! रात्री गाढ झोपही लागली. आज झोप जरा जास्तच गोड आणि पूर्ण वाटत होती. म्हणून असाच या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडलो. आज जरा जास्तच प्रसन्न वाटत होतं. कधी नव्हे एवढी शांतता जाणवली! पण काय माहीत,अचानक लखकन वीज चमकावी तसा डोक्यात विचार आला की,बायको माहेरी गेलेली आहे... आज आपल्याला उठवायला कोणी येणार नाही.... आणि भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे सात वाजलेले... सूर्यनारायण बरेच वर आलेले... शाळेला सव्वासातला पोहोचणे शक्यच नव्हते... बायको माहेरी गेल्याच्या आनंदावर क्षणात विरजण पडले.... ब्रश नाही,आंघोळ नाही,तोंडावरून पाण्याचा हबका मारला... गाडीला किक मारली... शाळेत पोहोचलो तर प्रार्थना आटोपलेली... गेल्याबरोबर सहकाऱ्यानी मला दंड म्हणून सेवकाला चहाची ऑर्डर द्यायला सांगितली... झालं... एकतर सकाळचाच चहा माझ्या पोटात नव्हता... त्यात आता हा चहाचा दोनशे रुपयांचा खर्च... देण्याशिवाय पर्याय नव्हता... वरून आज घरचा ताजा डबा नाही म्हटल्यावर हॉटेलचाही खर्च आलाच... तिथेच जाणवलं की,बायकोला एवढ्या खर्चात एक साडी घेतली असती तर बिचारीने किती प्रेमाने जेवू घातले असते... पण इलाज नव्हता... घरी गेलो... अंथरूण-पांघरूण तसेच विस्कटलेले... माझ्याकडून आ वासून पहात असलेले... घरात कोणीकडेही लक्ष गेले की,कचरा आणि अस्ताव्यस्त पडलेला पसारा मला खाऊ की गिळू या नजरेने पहात असलेला दिसला... नाहीतर एरव्ही बाहेरून आल्याबरोबर थकले असाल या भावनेने हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी बायको असते... आता आंघोळ करावी की,झाडझूड करावी की,अंथरूण-पांघरूण नीट करावेत की,दुपारच्या जेवणाची सोय पहावी...? ही फक्त एक दिवसाची दैना... अजून काही दिवसाची मी कल्पनाच करू शकलो नाही...या सगळ्या विचारचक्रात कमी की काय म्हणून सोबतच रात्रीचाही विचार आला. मग "बायको गेली माहेरी,काम करी पितांबरी" या जाहिरातीतील फोलपणाही जाणवला... पितांबरी काय काय काम करणार आहे?? ती जेवण देणार आहे की जेवलेले भांडे घासणार आहे? बरं हॉटेलच खाणं एखादं दिवसापुरतं बरं वाटलं... दुसऱ्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला... त्यात बाथरूममधले अंडरवियर्स धुण्यासाठी माझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलेले...
ती माहेरी जाते म्हणाली तेव्हा मला झालेला आनंद लपविता आलेला नव्हता... म्हणून की काय की,तिने कामवालीला सुध्दा सांगून ठेवले की,मी नसल्यावर घरी कामाला येण्याची गरज नाही ... त्यालाही जबाबदार आपलेच कर्तृत्व.... स्त्रियांच्या सौंदर्योपसनेचा हा प्रसाद... आपला नवरा कोणत्याही बायकांच्या सौंदर्याचे वर्णन करतो म्हटल्यावर ती कामवालीला तिच्या गैरहजेरीत येऊ देण्याचे धाडस करणारच नव्हती...
शेवटी विचार केला,कोणाच्याही सौंदऱ्याचे कितीही कौतुक केले,बायकोला कितीही नावबोटं ठेवली तरी आपली काळजी घेणारी... आईइतकी मायेने जपणारी,विचारपूस करणारी बायकोच असते... आईनंतर आपल्याला हक्काची असणारी व्यक्ती म्हणजे आपली बायकोच असते... मग जरा डोळसपणे विचार केला,बायको माहेरी गेली की स्वातंत्र्य असते,ही अंधश्रद्धा आहे... प्रेमाच्या बंधनात अडकवणारी कोणी तरी असावीच लागते... मग हेच पटले की,बायको गेली माहेरी,घरात शून्यता उरी....
पी.प्रशांतकुमार,अहमदनगर
पप्पा मला नाही ही पोळी आवडत.. मीठ नाहीये त्यात.. माझी आठ वर्षांची मुलगी तक्रार करत म्हणाली .. हे बघ श्रिया मीही तीच खातोय ना .. थोड adjust कर ना 8-10 दिवस मम्मी नाही तर .. मलापण कंटाळा येतोय आता तुझ सगळ करायचा.. लगेच मुलगी रुसुन दूर जात म्हणाली मला नाही जेवायच मला नाही भूक ... आता ही रडायला लागली तर .. ह्या कल्पनेनेच अस्वस्थ झालो .. मग जरा आवाजाचा टोन बदलून .. अगं मी पण जेवतोय ना .. बर संध्याकाळी तुझ्या आवडीच जेवण करु .. काय खाणार बोल ? नूडल्स मंचूरियन काय काय पाहिजे ? ... मम्मीच्या हातची पोळी ...पोरीनं अडचणीत आणलं ... ते सोडून बोल आज शनिवार आहे आणि मम्मा 3-4 दिवसांनी येणार आहे ... पण पप्पा आठ दिवस झालेत ती जावून ...
.. खरच मुल संभाळन हे आव्हान असत. . तू ते कस करतेस कोण जाणे . तशी खुप समंजस वागतेय मुलगी .. तुला जेव्हडा त्रास देते त्याच्या 1% देखील त्रास देत नाही अगदी खोट खोट वाटण्या इतपत .. एका आवाजात उठते. केस वगैरे स्वत:च आवरते वेळेआधी शाळेत ..नाहीतर लेटलतीफ म्हणून शाळेत आम्ही फेमस.. काहीही डबा दिला तरी चालतो .. ती त्रास नाही देत पण त्रास होतो कारण पूर्ण वेळ तिच्या तैनातित रहायची सवय नाही ... शाळा ..कथ्थक..कराटे सोडायला जा आणायला जा .. दूध ,डबा ..
... आज भरपूर कपडे धुवायचे वाशिंग मशीन कधीच वापरल नाही मी .. श्रियानेच सगळ केल .. वाटर लेवल बदलने .. प्री वाश टायमिंग..मम्मी ने शिकवल मला.. अशावेळी वाटत किती मोठी आणि हुशार झाली चिमुरडी .. मम्मीने किती शिकवल.. पप्पा gas बघा मागच्या वेळी चालू ठेवला होता .. दार लावल का.. मम्मीने संगीतलय आठवण करुन देत जा . उद्या रविवार असला तरी सकाळी शाळेत क्लास आहे दूध आहे का ?
रडरड करणारी हट्टी श्रिया खरी की मम्मी नाही तर सगळ समंजस पणे करणारी ? ..
तरी पण अधून मधून चालूच असत .. ...आता काय करू ..करमत नाही ..भूक लागली ...कुणीच खेळायला नाही ही चार वाक्य झाली की पाचव वाक्य हटकून मम्मी कधी येणार हेच असत... माझ्याही मनात तेच असत तू कधी येणार ...
मुकुंद बसोळे,लातूर.....
खरं तर मी अविवाहित.... म्हणून मला काही याचा अनुभव नाही....पण आपल्या ग्रुपवरील सर्वांचे ह्या विषयावरील लेख वाचले आणि मन एका वेगळ्याच 'स्वप्नात' वावरतंय....(वो बोलते है ना की 'मन मे लड्डू फूट रहे है' असंच काहीसं वाटतंय...) हा झाला विनोदाचा भाग.......
पण थोडंस व्यक्त व्हावं वाटलं ह्या विषयावर....म्हणजे विषय वेगळाच घेतला आहे मी...पण ह्या विषयात आणि वरील विषयात एक समान धागा आहे...अस मला वाटतंय....म्हणून हा लेखन प्रपंच......वरील विषयावर सर्वांचे लेख मी वाचले आणि जवळपास सर्वचं लेखात मला असं आढळलं की 'स्त्रियांना' फक्त काम कारण्यापूरत मर्यादित का समजतो...म्हणजे सर्वानी सांगितलं की "ती" माहेरी गेल्यावर आमची किती तारांबळ उठते,आम्हाला किती त्रास होतो वैगरे ,वैगरे....पण कोणी असा विचार नाही केला की 'ती' माहेरी गेल्यानंतर तिला किती आनंद भेटत असेल,किती खुशीत ती असेल....कारण इतके दिवस केलेल्या कष्टामुळे आलेला 'शीण'ती माहेरी घालवत असते....आपल्या आईबाबा सोबत काही आनंदाचे क्षण जगत असते आणि त्यात आपल्याला आनंद नक्कीच वाटायला हवा....आणि तिच्या त्या 'आनंदापुढे'आपल्याला दोन दिवस होणारा त्रास आपल्याला 'नगण्य' वाटायला हवा....कारण 'woomen empowerment' सारख्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे आम्ही कुठेतरी 'women empowerment' ची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी.....एवढच मला वाटत....बाकी मी व्यक्त होताना कुठे चुकलो असल्यास 'क्षमस्व'......
(यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा