खरंच!आपण सुधारतोय का?

🌱वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप.
खरंच!आपण सुधारतोय का?
अनिल गोडबोले,सोलापूर.
मानव हा सर्वात प्रगत प्राणी म्हणून ओळखला जातो कारण इतर प्राण्यांपेक्षा मेंदूचा वापर माणसाने जास्त केला आहे.

'होमो सेपियन सेपियन' म्हणजे सर्वात प्रगत अशी उपाधी असलेला माणूस प्रगत होत आहे ही गोष्ट खरी असली तरी.. सुधारणावादी आहे का?.. हा प्रश्न खरच खूप महत्त्वाचा आहे.

सुधारणा म्हणजे काय? पूर्वीच्या अवस्थे पेक्षा किंवा स्थिती पेक्षा अधिक चांगली स्थिती धारण करण्याची क्षमता ठेवणे..
एकीकडे माणूस चंद्र, मंगळ सोडून सौर यान पाठवत आहे. दुसरीकडे याच ग्रह ताऱ्यांचे अजब हिशोब मांडून आपल्या बंधवांना वेगळ्या गुलाम गिरी मध्ये टाकत आहे.

वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञान तर वापरत आहे पण त्या गोष्टी मुलांना शिकवताना भाकडकथा शिकवत आहोत किंवा "छद्म विज्ञान" शिकवत आहोत.

जगण्याची एक पद्धत म्हणून संस्कृती आणि धर्म निर्माण झाला पण त्या सर्वांना अतिशय ताठर भूमिका देऊन लोकांचे विचार बदलुच देत नाही.

सुधारणावादी लोकांना नेहमी विरोध राहिला आहे. तसेच मानवता वादी विचारसरणी ला देखील..

पुरोगामी विचारांचा प्रसार करणाऱ्याला "फ़ुरोगामी" म्हणून चिडवणारे आणि बुद्धिवाद्यांना नाव ठेवणारे.. झालेल्या सुधारणा मात्र सहज मान्य करतात.

कट्टरवादी विचारांनी, अडमुठ पणाने जगात कधीच कोणाचे भले झाले नाही.. आणि यावर कोणी आवाज उठवला तर.. '.दरवेळी आम्हीच दिसतो का.. त्यांच्याकडे बघा.." म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवत असतात.

आता सती कोणच जात नाही.. पण कायद्याला विरोध झाला होता
आता शिक्षण सर्वजण घेतात पण महिलांना शिक्षण घेताना अजूनही त्रास होत आहे.. त्यावेळी खरच असा प्रश्न पडत आहे की आपण सुधारतोय ना.. प्रगतीची लक्षणच थांबली आहेत.

पर्यावरण असो किंवा इतर कोणतीही नवीन गोष्ट असो.. त्याच्यासाठी काही करताना लगेच त्रास आणि भावना दुखावल्या जातात.. आणि सरकारी मालमत्ता नुकसान करण्यात येते.

इतरांवर निर्बंध घालणे, कट्टरवादी विचारसरणी बाळगणे, उच निचता बाळगणे, इगोवर चालणाऱ्या लोकांना बघितलं की वाटत की खरच आम्ही सुधारतोय का?

वेगवेगळे वाद उपलब्ध करून लोकांना त्रास देणे, मूळ मुद्धा सोडून जेव्हा ज्ञानी समजणारी माणस वागतात तेव्हा.. आश्चर्य वाटत.

सर्वाना समान समजणे, गुलामी बंद करणे, थोड्याशा स्वार्थासाठी सर्वाना वेठिवर धरणे... या गोष्टी सुधारणा थांबवत आहेत.

तर असं जरी असले तरी सुधारणावादी थांबणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे.. जे योग्य आहे ते करणे गरजेचे आहे.

तेव्हा नुसते अंध पणे एखादी गोष्ट न बघता डोळस पणे वागण्याची गरज आहे.
ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी  थांबवल्या पाहिजेत.

सत्य आणि मत यात फरक आहे. मत मांडून उपयोग नाही. सत्य सिद्ध करून सुधारणावादी होण्याशिवाय पर्याय नाही..

उदाहरण मुद्धाम देत नाही.. कारण शब्द मर्यादा आहे.. पण सुधारण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

शुभम राधेश्याम,पंढरपूर.
नक्की सुधारने म्हणजे तरी काय हो.... विचारांचा प्रवास सतसत विवेकापर्यंत जाणे.नदीचा....  समुद्र होणे.भावनांचा प्रवास प्रेमाच्या माध्यमातून विश्वव्यापी करुणेपर्यंत पोहचन.नाजूकश्या कळीचे  रूपांतर सुंदर अश्या फुलामध्ये होणे. शरीराचा प्रवास श्रमाच्या सातत्यपूर्ण प्रयंत्नातून सुदृढतेकडे नेणे.इवल्याश्या बीजाचे परिवर्तन विकसित अश्या वृक्षामध्ये होणे. ध्यानाच्या माध्यमातून तटस्थपणे....
शरिराची नश्वरता,विचारांची(मन) आवर्तने,भावनांमागील सूक्ष्म अपेक्षा व त्याच्या पुर्तीतून निर्माण होणारा मोह तसेच वाढीव अपेक्षातून निर्माण होणारा लोभ किंवा अपेक्षाच्या अपूर्णतेतून निर्माण होणारे दुख जाणून..तन - मन - बुद्धीचे योग्य ते संतुलन साधने म्हणजे सुधरने..
मग ,
आता राहिला प्रश्न?????
आपण सुधारतोय का.....तर  तो प्रश्न आपण आपल्या स्वताला करायला हवा ....
                    आणि हो ...
 ... त्याचे उत्तरही आपणच शोधायला हवे.

शिरीष उमरे,नवी मुंबई
पृथ्वीचे वय ४६० करोड वर्षे ! मानव जातीचे अस्तीत्व ४० लाख वर्षापासुन !! २ लाख वर्षापासुन विकसित मानवाचे पुरावे उपलब्ध ...
आणि फक्त ६५०० वर्षाचा मानवी संस्कृती च्या इतिहासाचा अंदाज आणि फक्त पाचशे वर्षाच्या विकासाच्या नोंदी !!
कुठुन मोजावी सुधारणा ❔

फार मागे न जाता ज्ञात असलेला कींवा डोक्यात भरवण्यात आलेला इतिहास बघता काही हजार वर्षापुर्वी देव, दानव, स्वर्ग, नरक, धर्म, जातपात, गुलामगिरी वैगेरे अस्तित्वात नव्हते.

राजेशाही चा उगम चार हजार वर्षापुर्वी मानला तरी आक्रमण, राज्यविस्तार  वैगेरे सहाशे वर्षापासुन माहीती आहे ..
लोकशाहीला तर फक्त ७० वर्षे झालीत...

अहो... साध्या बँकींग सीस्टीमस् १४७२ मध्ये अस्तित्वात आली.
भारतात टीव्ही, टेलीफोन काही दशकापुर्वी माहीत झाले होते. कॉम्प्युटर मोबाइल वैगेरे तर आता आताची गोष्ट आहे.

ह्या भौतिक व सामाजिक सुधारणेच्या प्रवाहात कमी पडलो ते भावनिक व मानसिक विकासात !!  माणुसकी व निसर्ग ह्यांची प्रचंड प्रमाणात नुसतीच हेळसांडच नाहीतर उध्वस्त करुन टाकली आहे आपल्यापैकी काहीजणांनी .

पाणी विकण्याच्या व्यापाराला राजमान्यता मिळते हे सुधारण्याचे लक्षण आहे काय ?

शिक्षण व आरोग्य सेवा फक्त श्रीमंतांसाठी च असणे ही सुधारणा आहे काय ?

हॉस्पीटल, डॉक्टर, फॉर्मसी व पॅथॉलॉजीचे पिळवणुक करणारे नेटवर्क ह्याला सुधारणे म्हणायचे का ?

स्वरक्षणासाठी शस्त्रनिर्मिती व आता शस्त्रविक्रीसाठी युध्द घडवुन नरसंहार घडवुन आणायचा हा सुधारणेचा भाग आहे का ?

जमीनीवर रेखा आखुन त्याच्यासाठी एकमेकांवर अण्वस्त्रे रोखुन ठेवणे हे सुधारणे होय का ? एखादा सरफीरा नेता ह्या पृथ्वीचे  अस्तित्त्व क्षणात साफ करु शकतो ही सुधारणा आपली आत्महत्या नाही काय ?

बियाणे, खत, भाजीपाला, अन्न, दुध, औषधी मधील भेसळ हा सुधारणेचा बलात्कार नाही काय ज्यामध्ये समस्त मानवी जीवन धोक्यात आणले गेले आहे ?

क्लायमेट चेंज ही थांबवता न येणारी गोष्ट पण निसर्गाला ओरबाडुन ऑइल, गॅस, रेती, खणिज, लाकुड, जानवरांच्या त्वचा ह्यासाठी कत्तल करुन आपण आपल्या मृत्युला बोलावणे पाठवणे नाही का ?
कहर म्हणजे मानवी देहामधील अवयवासाठी लहान मुले व स्त्रिया यांचा व्यापार हे सुधारणे ह्या संकल्पनेला कलंक नाही का?

सुधारणा हा एक आभास आहे. एक दिवास्वप्न आहे. जोपर्यंत आपला वैयक्तीक आत्मिक विकास होत नाही तोपर्यंत सुधारणा हे मृगजळ च राहणार.


निखिल खोडे,ठाणे.
"चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतोय तो देवमाणूस." लहानपणी पुस्तकांमधून हे शिकवल्या गेले. परंतु यात कितपत सत्य आहे माहिती नाही. कारण चुक केल्यानंतर ही आपण खुपदा ती चुक‌ दुरुस्ती करत नाही. कारण त्यामध्ये आपल्याला आपला कमीपणा वाटत असतो.

              प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार, शरिराला हानिकारक असणारी अन्नातील भेसळ, स्त्रियांवरील वाढत चाललेले अत्याचार, पर्यावरण हानी, रासायनिक शेतीचे वाढते प्रमाण, मारामाऱ्या, आपआपसातील भांडणे, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मोठ मोठे राजकीय घोटाळे, फसवणूक करणे,  या सर्व गोष्टी करणे आपण टाळतो का? की या गोष्टी माहिती असुनसुद्धा करतो,? खरच आपण सुधारतो का? हाच प्रश्न यावरून पडतो.

               सुधारणेची सुरुवात स्वतः पासुन करायला हवी म्हणजे बाकी आपोआप सुधारेल. "लगे रहो मुन्नाभाई" चित्रपटामध्ये संजय दत्त रेडिओ जॉकी बनून सांगत असतो. आपण केलेली चूक मान्य करण्याचे धाडस करणे आणि ती चूक पुन्हा नाही करणे यामुळे आपण आपल्यामध्ये सुधारणेला सुरुवात होईल. "माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावे", या म्हणी नुसार वागलो तर परिस्थिती बदलायला सुरुवात होईल.


प्रवीण,मुंबई
डार्विन ने मानव उत्क्रांती चा सिंद्धांत मांडला. जनावर ते मानव असा उत्क्रांतीचा प्रवास त्याने वर्णन केला होता. पण हा सिद्धांत शारीरिक दृष्ट्या खरा असला तरी नैतिक दृष्ट्या खोटा ठरला आहे. नैतिक दृष्ट्या मानव हा मनुष्यत्व ते पशुत्व असा उत्क्रांत झाला. त्यामुळें कोणी म्हणाल की "जग सुधारतेय " की खूप हसू येत.
लोकांच्या अंगावर मॉडर्न कपडे आले पण विचार आजही मध्ययुगीन काळातील आहेत. अशी "सुधारलेली मॉडर्न" माणसे समाजाला वैचारिक दुबळेपणा आणत आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे इंटरनेट वरून गणपतीला ला नवस करू लागले. असे देवभक्त एक वेगळ्याच "अंधश्रद्धेला" खतपाणी घालत आहेत.आजही शिकलेला पुरुषवर्ग बायको ने घरचूल संभाळायच अस मानणारा आहे. असे पुरुष हे समाजाला पशुत्वाकडे नेत आहेत.सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेऊन अनुयायी झालेले भक्त समाजाला आराजकतेकडे नेत आहेत.
   दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणी व्यभिचार हे प्रतीक आहे मानवाच्या पशुत्वाकडे चालणाऱ्या प्रवासकडे. या प्रवासाला खीळ घालण्याचा हर प्रकारे प्रयत्न हा समाजसुधारकांनी केला पण सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवलेल्या त्यांच्या अनुयायांनी त्यांनाच वाटून घेऊन त्यांचे विचार दडपून टाकण्याच्या प्रस्थपितांच्या कटाला खतपाणी देण्याचे कामं केले आणि अजूनही करत आहेत. लोक म्हणतात की जग सुधारल , माणूस सुधारला पण ही सुधारणा फक्त देखावा आहे. माणूस दिवसेंदिवस हिंसक, विकृत, व्यभिचारी आणि भ्रष्ट बनत चालला  आहे.प्रत्येक माणसातला माणूस जिवंत राहणं ही काळाची गरज आहे आणि या समाजाची शोकांतिका आहे.

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************