चला विवेकी ग्राहक बनुया !!

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
चला विवेकी ग्राहक बनुया !!


शिरीष उमरे, नवी मुंबई
जगासाठी आपला भारत देश म्हणजे करोडो लोकांची मोठी बाजारपेठ... संस्कृती, भाषा, अन्न, वस्त्रे, उत्सव, कला वैगेरे दुय्यम गोष्टी...

कोकाकोला, पेप्सी वैगेरे सारख्या परदेशी कंपन्या त्यांचे ९० पैश्याचे कोल्डड्रींक भारतरत्न मिळालेल्या खेळाडुला  कींवा गंभूर गुन्ह्याचे आरोपी असलेल्या बॉलीवुड स्टारला हाताशी धरुन २० रुपयाला विकते... आपल्याच भुगर्भातील पाण्याचे साठे संपवणार्या व करोडो रुपयाचा नफा कमावणार्या कंपनीऐवजी आपण आपली परंपरागत सरबत, फळांचे रस, नारळपाणी विकणार्या स्थानिक लोकांना दोन रुपये जास्त देऊन स्वत:चे आरोग्य व शेतकरी व छोटे व्यावसायकांचे हीत का करत नाही ??
कुठे जातो आपला विवेकपणा ??

खादी एकतर फॅशन कींवा राजकारण्यांचे दिखाव्याचे कपडे... आपल्या कडल्या ऊष्ण वातावरणात खादी कपड्या इतके सुख नाही पण आउट ऑफ फॅशन वाटेल म्हणुन टेरिकॉट, नॉयलान मिक्स कपडे ज्यामुळे घाम जिरत नाही व त्वचा खराब होते तरीही वापरणे ही कुठला विवेकपणा ??

घराभोवतालचे अंगण व पर्यायाने बगिचा दुर्मिळ झालाय... कोंबडीच्या खुराड्यासारख्या फ्लॅटमध्ये एसी लावुन राहण्यात धन्यता मानण्यात कसला आला विवेकपणा ??

मॉलमधल्या कीमतीचे लेबल पाहुन मुकाट पेमेंट करणार्या लोक जेंव्हा रस्यावरच्या भाजीपाला व फळ विक्रेत्याशी घासाघासी करतांना बघितले की कीव येते ह्यांच्या विवेकपणाची .

विवेकी ग्राहक बना मायबापहो !! गरींबाची घरातल्या चुली जळतात हो तुमच्या थोड्याश्या दीलदारीने


निखिल खोडे, ठाणे.
ग्राहक हा राजा असतो, आणि राजा कधि भाव करत नाही..!
सध्या तरी हे फक्त मोठ मोठ्या शॉपिंग मॉल आणि ब्रँड मध्ये लागु पडते. छोट्या व्यावसायिक किंव्हा दुकानदाराकडे नेहमी आपण भाव करत असतो. उदाहरणार्थ शेतकरी रस्त्यावर भाजी विक्रीला बसला असेल आपण हमखास त्याच्याकडे भाव करतो, आणि तो ही आपल्याला म्हटल्या त्या भावात देतो कारण त्याला त्याच्या वस्तूची विक्री महत्वाची असते. तेव्हा आपल्या मधला विवेक पण कुठे जातो ?

मोठ मोठ्या कंपन्या व ब्रँड हे मार्केटिंग वर अमाप खर्च करून आपल्याला वाटेल त्या भावात त्यांची उत्पादने विकत असतात आणि ते आपण ब्रँडच्या नावाखाली सहजतेने विकत घेत असतो. याचा परिणाम फक्त होतो तो म्हणजे छोट्या व्यावसायिक अथवा दुकानदार वर्गावर !! मोठ्या कंपन्या च्या वस्तूवर फिक्स रेट चा टॅग लागलेला असतो तेथे आपण त्या वस्तु मुकाट्याने खरेदी करतो आणि रस्त्यावर किंवा छोट्या व्यवसाय करणारे याकडून खरेदी करताना आपण *जागो ग्राहक जागो* मधला ग्राहक बनत असतो.

                    भारत हा लोकसंख्येचा बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अर्थातच बाजारपेेठ प्रचंड मोठी आहे. विदेशातील प्रतिबंध झालेल्या वस्तु आपल्या देशात सहजतेने विकल्या जातात. त्या वस्तु आपल्यासाठी हानिकारक आहे की चांगल्या याचा विचार न करता आपण त्या वस्तु खरेदी करत असतो. यामागे आपल्याला त्या वाजवी भावात मिळतात बरेचदा परंतु यामध्ये भरडल्या जाते ते म्हणजे छोट्या प्रमाणावर उत्पादन करणारे व्यावसायिक, शेतकरी, गृह उद्योग करणारे इत्यादी....

                   पुढील काही दिवसांत मोठे सण उत्सव येत आहे त्यासाठी आपण खरेदी नक्की करणार तर यावेळेस  दिवाळी साठी लागणारे दिवे आपण चायनीज बनावटीची न घेता मातीचे घेऊया दोन पैसे जास्त जाईल तरी !!
जेणेकरून आपल्याच लोकांना रोजगार व नवीन काहीतरी करण्याची संधी मिळेल. आणि आपल्या मधला विवेकी ग्राहक दिसेल.


शिरीष मेढी,ठाणे.                       

हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पण मी थोडक्यात लिहीत आहे.                     १) जगण्यासाठी अनेक वस्तू व सेवा मानवांस लागतात. यांची संख्या मर्यादित आहे.
२) समाजातील काही लोकांकडे अति पैसा जमा होतो, परिणामी अनेकांना गरिबीत रहावे लागते.अति पैसेवाले त्यांचे पैसे चैनीच्या वस्तू व सेवा उपभोगण्यासाठी वापरतात.  (चैनी अमर्यादित आहेत ) ३) उत्पादक त्यांच्या वस्तू विकल्या जाण्यासाठी जाहिराती, डिसकाउंट, कर्ज उपलब्ध करणे इत्यादी मार्ग अवलंबवितात. परिणामी समाजातील चैनीच्या वस्तू व सेवांचा उपभोग वाढतो.       ४) या चैनीच्या उपभोगामुळे पर्यावरणचा विनाश होत आहे. उदाहरणार्थ प्लँस्टिकच्या वस्तू, पँकेजींग, बाटल्या, इ. या प्लँस्टिकचे विघटन होत नसल्याने , अंतिमतः समुद्रांत जमा होते. नंतर ते माश्यांवाटे आपल्या पोटात जमा होते.      
५) चैनीच्या उपभोगातून वातावरणात कार्बव डाय आँक्साईड जमा होते. या वायुंमुळे जगात तापमान वाढ होत आहे, परिणामी हवामानात भयानक धोकादायक बदल होत.आहेत. जगात वाळवंटीकरण वाढत जाणे , वादळांची वारंवारता व तीव्रता वाढणे , अति पाऊस (केरळा) , जंगलांना प्रचंड आगी लागणे , समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, अनेक प्रजाती कायमचे नष्ट होणे व अंतिमतः मानवजात नष्ट होणे यांसारखे संकटे प्रुथ्वीवर आली आहेत. ६) म्हणून विवेकी ग्राहक होण्यासाठी आधी समाजात समानता असणे आवश्यक आहे. *म्हणजे तेव्हा जगण्याच्या हेतुमध्ये बदल शक्य होईल व विनाशकारक उपभोग टाळता येतील* . निसर्गाचा उपयोग जगण्यासाठी केला पाहिजे. जर निसर्गाचा उपयोग  संपत्ती जमा करण्यासाठी केला तर निसर्गाचा विनाश अटळ आहे.

जयश्री खोडे, मुंबई.
   
          आपला भारत देश लोकसंख्येचा बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकवर आहे अर्थातच बाजारपेठ सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. देशात मोठ्या प्रमाणात सण- उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक जण या सण उत्सवासाठी आप आपल्या परीने खरेदी करत असतो.
  
            देशात याच सण उत्सवाच्या काळात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याचाच फायदा मोठ मोठे व्यापारी, कंपन्या घेतात. यावेळी खरेदी करताना ग्राहक म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो? खूपदा आपल्याला एखादी वस्तु वाजवी भावात मिळत असेल तर आपण त्या वस्तूचे फायदे तोटे काय आहे हे विसरून खरेदी करत असतो. बरेचदा हे आपल्याला भौतिक सुख देणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत घडुन येताना दिसतात. मोठ्या कंपन्या आपल्याला त्यांच्या वस्तु ब्रँड च्या नावाखाली विकत असतात. आणि हव्या असलेल्या वस्तु आपण त्यांनी ठरवलेल्या भावात खरेदी करत असतो.

                आपल्या मधील जबाबदार ग्राहक हा छोट्या व्यवसाय करणाऱ्या, शेतकरी, रस्त्यावर वस्तु विक्री  करणारा व्यक्ती यांच्याकडून वस्तु खरेदी करताना आपण जागृत होतो. छोटे व्यावसायिक जवळ गुंतवणुकीची क्षमता कमी असल्याने ते आपल्याला भाव तोडून वस्तु विक्री करत असता कित्येकदा.

                 आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी/वस्तु आपणास छोट्या व्यावसायिक जवळ खरेदी करू शकतो. उदाहरण म्हणुन शेतकऱ्या जवळील फळभाज्या, ई. खरेदी केले तर आपल्या मधील विवेकी ग्राहक नक्की दिसून येईल.

अनिल गोडबोले,सोलापूर

ग्राहक हा देव आहे, अशी एक संकल्पना आपल्याकडे मानली जाते.. त्यामुळे इतर ठिकाणी देवाला आमिष दाखवून फसवलं जात त्या प्रमाणे या देवाला देखील फसवलं जात.
जग मार्केटिंग वर चाललेलं आहे. त्यामुळे स्पर्धा आणि चढाओढ त्यामुळे दर्जावर झालेला परिणाम या काही गोष्टी देखील आहेत.

विवेकी ग्राहक ही संकल्पना आपल्या कडे रुजायला पाहिजे..
तेव्हा ग्राहकांची कर्तव्ये आणि अधिकार आपल्याला कळली पाहिजे.

विवेकी म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करून वस्तू आणि सेवा घेणारा वर्ग तयार झाला पाहिजे.

ग्राहक संरक्षण कायदा आणि त्या साठी स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे परंतु त्याचा वापर योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे.

आपण ग्राहक आहोत तेव्हा आपलं "गिर्हाईक" होणार नाही याची काळजी घेतली तर नक्की आपण जगातली सर्वात मोठी विवेकी बाजारपेठ होऊ.. आणि त्याचा फायदा आपल्या अर्थ व्यवस्थेला नक्कीच होईल


सानप बालाजी,बीड.

       विवेकी ग्राहक म्हणजे नेमकं तरी काय तर माझ्या मते विवेकी ग्राहक तो असतो जो आपण स्वतः घेऊ  इच्छिनाऱ्या मालाची पूर्ण खात्री करून घेतो.
       खात्री करून घेणे म्हणजे तरी काय तर त्या मालाची गुणवत्ता तपासून घेणे, त्या मालाची एक्सपायरी date तपासून पाहणे, त्या वास्तूमध्ये असलेल्या कंटेंट ची तपासणी करणे. ही झाली मूळ माहिती.
       ग्राहक म्हटल्यावर प्रत्येकाची कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असेलच, पण खूप लोकांना ग्राहक तक्रार मंच याविषयी माहिती नाही, जरी माहिती असली तरी त्याविषयी तक्रार कोठे करावी व पुढची प्रक्रिया काय आहे या विषयी माहीत नाही, त्यामुळे सर्वांनी या बेसिक गोष्टी माहीत करून घ्याव्यात अशी नम्र विनंती.
       ग्राहक तक्रार मंचविषयी अनेक सामाजिक संस्था समाज प्रबोधन करत आहेत, पण अनेक लोक त्यामध्ये जास्त रस घेत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे.

प्रविण, मुंबई.
ग्राहक म्हणजे केवळ एखाद्या वस्तूचा किंवा सेवेचा खरेदीदार असा सर्वसामान्यपणे अर्थ घेतला जातो. विवेकी ग्राहक हा कोणतीही सेवा किंवा वस्तू चांगली की वाईट आणि त्याचा भविष्यातील होणारा परिणाम यावर तोलमोल करून त्यांचे योग्य भावात ग्रहण करतो किंवा नाकारतो. सध्यस्थीतीत विवेकी ग्राहक ही जात दुर्मिळ झाली आहे. यासाठी काही उदाहरणे देऊन माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो.
1. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वेड प्रचंड आहे. विध्यार्थी आणि पालक वर्ग हा इथे ग्राहक असतो आणि केवळ इंग्रजी माध्यम म्हणून हा वर्ग मोठी फीस भरतो पण त्याचा दर्जा हा शाळेच्या इमारती वरून ठरवतो.
2. कोचिंग क्लास न लावता ही मुलं पास होतात पण स्टेटस आणि दुसऱ्यांनी लादलेली गरज म्हणून स्वतःचा विवेक गमावून पैसे भरतो आणि अर्थातच फसतो.
3. शेतकरी बांधव सुद्धा अनेक रसायन औषध गरज (अर्थातच लादलेली)  वापरतात, कर्जबाजरी होतात पण सेंद्रिय शेतीकडे फार कमी लोक वळतात. शेतकरी ग्राहक सुद्धा "नाव मोठं लक्षण खोट" अश्या कंपनी च्या उत्पादनांना फसतात.
4. मतदार राजा (?) हा सुद्धा ग्राहक च आहे पण तो सुद्धा अव्यवहरिक आणि फसव्या जाहिरानाम्यांना फसतो.
दिखावेपे मत जा, अपनी अकल लगा हे एकच तत्व आहे विवेकी ग्राहकच. एकदा का खरी गरज आणि लादलेली गरज यातला फरक कळला की फसवा फसवी होणारच नाही
प्रदिप इरकर,वसई,पालघर.
दृश्य १.
Xyz मॉल.
500 रुपयांची पॅन्ट 2000 रु. देत हसत खर्च करून घेतली
त्याच मॉल मधील ABC हॉटेल जी प्लेट 150रु.ना मिळते तीच इथे 300 रु. काही प्रॉब्लेम नाही हसत एन्जॉय करत ते संपवली व येताना 50 रु.वेटर ला टीप सुद्धा देताना मोठेपणा वाटलं खूप.
बाहेर येतानाच खेळण्यातील फुगा दिसला भला मोठा ,मुलाने हट्ट केला म्हणून घेतला 80 रु. ला होता.सुट्टे नव्हते म्हणून 20 रु.राहू दिले तसेच.
बाहेर आलो मॉल च्या.वॉचमनने कार च्या आजूबाजूला असलेली मुलांची गर्दी दूर केली. त्याच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन अजून 20 रु पार्किंग चे जास्ती दिले.

दृश्य २.
बायकोसोबत संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो.
फुटपाथवर एक आजीबाई पणत्या,रांगोळी,ठिपक्यांची कागद विकत बसल्या होत्या.होम मिनिस्टर ला दिवाळीची खरेदी करायची होती मग धावत्या लोकल ची चैन खेचून गाडी थांबवल्यासारखी ती थांबली व भाव विचाराने सुरू झाले.मी ही बाजूलाच उभा राहून विचारले,
"मावशी ह्या पणत्या कशा दिल्या?"
"साहेब त्या 30 रु डझन"
"आणि त्या?"
"त्या डिझाईन वाल्या आहेत 40 रु डझन"
"बरं मग त्या डिझाईन वाल्या 25 रु डझन ने द्या"
"नाही हो साहेब,खरेदी सुद्धा नाही इतकी आमची"
"हे बघा द्यायचे असतील तर द्या जास्तीत जास्त 30 रु डझनने घेईल नाहीतर असे।खूप जण आहेत पुढे ते नक्कीच देतील"
आजीबाईने आजूबाजूला बघितले व कसलासा विचार करून किती डझन।पाहिजेत असा विचारून 30 रु त दिले.


ही दोन्ही दृश्ये आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात.आपण नाही त्या ठिकाणी वायफळ खर्च करत असतो मात्र जिथे नको तिथे भावतोल करून आपण त्यांनाच ग्राहक न्यायालयांची आठवण करून देत असतो.
सिनेमागृहात एक ग्लास कोक 50रु.ला घेणारे आपण बिनबर्फाचा उसाचा रसाचा ग्लास 12 च्या ऐवजी 10 ला दे म्हणत अडून राहतो.
आज सकाळी हा लेख टाईप करत असताना बसमधून जात असताना मॅक्डोनाल्डस उघडायच्या आतच त्याच्या बाहेर गर्दी दिसली परंतु हीच मंडळी दुधाचा भाव 1 रुने जरी वाढला तरी टाहो फोडतात.
आपण नाही त्या ठिकाणी जागो ग्राहक जागो बनतो तर जिथे गरज नाही तिथे वायफळ खर्च करतो.
खरंच आपल्या सर्वांना विवेकी ग्राहक बनण्याची गरज आहे.


शीतल शिंदे ,दहिवडी
आपण उठल्या पासून झोपेपर्यन्त आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने ग्राहकाचे काम करत असतो .मात्र आपल्या वेळेअभावी आपण खरेदी करत असलेल्या मालाचे , वस्तूचे निरीक्षण किंवा पाहणी करत नाही आणी नेहमी आपल्या घाई मुले आपण फसलो जातो .

काही वेळेस आपण विचार न करता कोणत्याही वस्तू खरेदी करतो ज्याचेमूले वाईट परिणाम होवू शकतो , अपायकारक होवू शकतो .हे आपण घाईघाईत घेतलेले निर्णय असतात मग      पच्याताप होतो , नुकसान होते .

कोणत्याही जाहिराती , देखावा पाहून विचार न करता पैसे गुंतवणे , खासगी विमा कम्पनी , ऑफर , दोन वर दोन फ्री इत्यादी गोष्टीस बळी न पडणे गरजेचे आहे .  
       
 मार्केट मधे,  मंडई मधे , शॉपिंग करताना , मॉल्स मधे, षेयर्स घेताना , वाहन घेताना , व इतर ठिकाणी मोठी गुंतवणूक करताना  आपण विवेकी बुद्धीने खरेदी करणे गरजेचे आहे .

व्यापाऱ्याचा माल घेताना आपण न चुकता , न घाबरता चोखंदळपणे घेतला पाहिजे तेथे आपल्या हलगर्जीपणामुळे आपण फसलो जातो .

  मात्र शेतकऱ्याजवळ खरेदी करताना बार्गेनिन्ग न  करता घेता येतील येवढ्या घ्याव्यात .आपल्या भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचा आपण वापर करत नाही .ग्राहकन्याय मंच आपल्याला मदत करते मात्र तिथे वेळ वाया जातो मग हे टाळन्यासाठी  आपण लक्ष जागेवर ठेवून खरेदी - विक्री चा अंदाज घेतला पाहिजे .कधी कधी काही वस्तूंची मूळ किमंत किती असू शकते हे ही आपल्याला महित नसते त्यामुळे मोठ्या वस्तु खरेदी करताना अंदाज घेणे खरेदी करणे गरजेचे आहे .

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************