मराठी माणसाला उद्योग-व्यापार खरेच जमत नाही का ?

मराठी माणसाला उद्योग-व्यापार खरेच जमत नाही का ?

 

अजय तळेकर जिल्हा -अहमदनगर


मराठी माणसाला पहिला Indian Idol

बनता येते.

मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.

मराठी माणसाला स्वराज्य उभं करतायेतं.

मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची
मुहूर्तमेढ रोवता येते.

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.

मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो..

मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
*लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.

मराठी मानुस हा सर्व गोष्टीत अग्रेसर आहे ,प्रश्न आहे तो उद्योग व्यापार तर असा कोणता मराठी माणुस आहे की तो त्याच्या स्वताच्या कष्टाने जगत नाही सर्व स्वताच्या पायावर उभे राहून आपले आयुष्य जगतात..
त्यांचे विचार धेय हे मोठे असतात, त्यामुळे त्यांना चिल्लर वाटनाऱ्या उद्योग धंद्याकडे वाटचाल करत नाही,त्यांची एकच इच्छा असते जियेंगे भी शानसे मरेंगे भी शानसे,
आणि काम पण असच करणार की समोरच्याने नाव काढलच पाहीजे.

मराठी मानुस हा उद्योग व्यवसायत पण टॉप ला होता आहे पण त्यांची मानसिकता मोठी, काम करण्याची इच्छा मोठी आहे त्यामुळे तो छोठे उद्योग व्यवसाय करने टाळतो.

  व्यापार छोटा असो की मोठा शेवटी ते उपजीविकेचे साधनच आहे.
==============================

प्रमोद पांचाळ  धर्मापुरी ता परळी   जिल्हा बीड

मराठी माणूस हा व्यापारात आपले सर्व काही लावण्यास तयार असतो पण काही आपलेच मराठी माणसे त्याला खाली ओढण्याचे काम करत असतात 

मराठी माणूस कोणताही व्यापार करण्यास लाजत नाही पण त्याच्या  हाती आपयेश च येते


पण तो च जर आपला वेवसाय ग्रामीण भागात चालू केला तर त्या व्यपारात खूप यश मिळवू शकतो

पण  तो शहरी भागात आपली भूमिका आहे ती टिकून ठेवू शकत  नाही
==============================

निखिल खोडे, ठाणे

    
                व्यापार किंवा व्यवसाय हा शब्द आला की डोक्यात येते ते म्हणजे सिंधी, जैन, मारवाडी, गुजराती व पंजाबी कारण ते व्यापारा मध्ये निपुण असतात. आपल्या मराठी माणसाला व्यापार किंवा व्यवसाय जमत नाही असा भाग नाही. फक्त ते लोक मार्केट नुसार दूरदृष्टीने विचार करून नियोजनपूर्वक पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतात.
     
      मी व्यवसाय करायच ठरवले तेव्हा मला लक्षात आलेल्या अडचणी शेअर करतो. व्यवसाय करत असताना महत्वाचं आहे ते व्यवसायासाठी लागणार भांडवल ! घरची परिस्थिती नसल्यामुळे घरून व्यवसाय करण्यासाठी पैसे मिळतील याची अपेक्षा च नव्हती. त्यानंतरचा प्रयत्न केला तो म्हणजे बँकेतून कर्ज घ्यायचा परंतु तिकडे सुध्दा तारण म्हणुन काहीतरी आपली मालमत्ता ठेवावी लागते. शेवटी कुठल्याही बँकेकडे कर्ज न मिळाल्याने स्वतःच जॉब करून पैसे शिल्लक ठेवून नंतर आपण व्यवसाय करायच ठरवले. पीएमआरवाय लोन मध्ये सरकारी भ्रष्टाचारी पध्दतीमुळे त्याचाही नाद सोडुन दिला.

                   मराठी माणसा मध्ये  व्यवसाय करायची धमक आहे. फक्त गरज आहे प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून त्याची अंबलबजावणी करण्याची...

 मराठी माणसाला गरज आहे सहकार्याची कारण टीम शिवाय कोणतेही कार्य पुर्ण होत नाही.  व्यवसायामध्ये रिस्क घेणे महत्वाची आहे परंतु नको त्या ठिकाणी रिस्क घेऊन काही वेळेस आपले निर्णय चुकीचे ठरते...
   
    व्यवसाय करण्यासाठी भांडवलसोबत अजुन काही गोष्टी मला आवश्यक वाटतात त्या म्हणजे पेशेंस/ चिकाटी आणि अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन....

 बरेचदा व्यवसायामध्ये लगेच यश नाही मिळालं तर आपण खचुन न जाता आणखी प्रयत्न केले पाहिजे. बँकांचे सहकार्य, घरच्या लोकांनी सोबत, नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याची जिद्द असेल तर *मराठी माणूस नक्कीच यशस्वी पणे व्यवसाय करेल...!!
==============================

मुकुंद बसोळे,लातूर

मराठी माणसाला खरंच व्यापार करता येत नाही का?...हा प्रश्नच खरं तर पचत नाही.कारण  'अटकेपार' झेंडा लावणारा मराठी माणूस आणि शून्यातून 'स्वराज्य'निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा असणारा 'मराठी माणूस',संघर्षाचा 'दैदीप्यमान' वारसा असणारा 'मराठी माणूस' व्यापार नाही करू शकत हा प्रश्नच खरं तर पचत नाही.....
हो मराठी माणूस नक्कीच व्यापार करू शकतो.... पण काही त्याच्याच 'स्वभाववैशिष्ट्या'मूळे तो व्यापारामध्ये मागे आहे.... ती कारणे येथे मांडावी वाटतात....
१) मराठी माणसाच्या स्वभावातील 'आक्रमक'पणा-मला वाटतं मराठी माणूस हा थोडासा 'आक्रमक' असतो.त्याला व्यापार वाढवायचं असेल तर जिभेवर 'साखर'ठेवावी लागेल.त्याला व्यापारामधिल आपली 'रणनीती' थंड डोक्याने आणि दूरदृष्टी ठेऊन तयार करावे लागतील....
२)कामाची लाज- 'कोई भी धंदा छोटा नही होता...और धंदे से बडा कोई इमान नही  होता' हा एका चित्रपटांमधील डायलॉग जरी असला तरी जर आपल्याला प्रगती करायची असेल तर कोणत्याही कामाला न लाजता आपल्याला ह्याच तत्वानुसार काम करावं लागेल...
३)मराठी माणसाची 'खेकडी वृती'-  हे कारण मला मराठी माणसाच्या न झालेल्या व्यापारातील प्रगतीबाबत सर्वात महत्वाचं वाटतं... कारण आतापर्यंत चा इतिहास आहे 'मराठी'माणसाला फक्त आणि फक्त 'मराठी' माणूसच नडलाय...पण आता आपण सर्व जण सुशिक्षित झालो आहोत तर आपली ही वृत्ती आपण सोडायला हवी आणि आपल्यावरील हा 'कलंक' मोडून टाकायला हवा...आणि "एकमेकाला साह्य करू अवघे धरू सुपंथ" ही वृत्ती जोपासायला हवी.......

                        माझं मत आहे की मराठी माणूस नक्कीच उदयोग-व्यापार करू शकतो आणि त्यात 'अटकेपार'झेंडा सुद्धा गाडू शकतो....फक्त गरज आहे एक होण्याची...
==============================

शीतल शिंदे -  दहिवडी

      मराठी माणसाला व्यापार उद्योग जमत नाही हे 50% खरे आहे . 
पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे , ही म्हणीचा जर अव्लम्ब केला आणी जिद्द - चिकाटी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात हे मात्र खरे आहे .
         मराठी माणसांमध्ये ईगो फार असतो .शिवाय त्यांच्यात एकीचा अभाव असतो .एकमेकांची इर्ष्या कारणे हा त्यांचा स्वभाव गुणधर्म असतो , जतीप्रथा तर काही सांगूच नका .
यामुळे माणसांमध्ये आपुलकी राहणे कठीण असते .तूप खाल्ले की रूप लगेच हवे असते त्यांना .प्रत्येक वेळी ताठर भूमिका घेतल्यास व्यवसाय कसा होणार .
          व्यवसाय म्हटले की तोंडात साखर असली पाहिजे .शब्दामध्ये लवचिकता असली पाहिजे .निर्णय घेताना विचार करून घेतला पाहिजे .एकमेकांच्यात  मिळून मिसळून. राहिले पाहिजे .दुसरा आपल्या पुढे गेला तर इर्ष्या न करता त्याला उलट प्रोत्साहन दिले पहिजे ."खेकडा संस्क्रुती सोडून - एकमेका सहकार्य करू "ही भावना ठेवली पाहिजे .
    नफा झाल्यास हुरळून न जाता तोटा झाल्यास त्याला सामोरे कसे गेले पाहिजे याची व्यवस्था करण्याची तयारी ठेवली पाहिजे .अश्या वेळी मोठ्या धीराने सामोरे गेले पहिजे .तसे पहिले तर मराठी माणूस शूरवीर , पराक्रमी असतात मात्र संयमाची पण गरज असते .
  आपल्याकडे कमाई कमी आणी रुबाब मोठा अशी अवस्था असते .कमाई 100 रुपए असते आणी खर्च 200 रूपए . खरेतर जशी  आवक तशी जावक ह्या पद्धतीने खर्चाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे .आणी महत्वाचे म्हणजे कमी नफ्यावर सुद्धा व्यापार केला पाहिजे .या काही गोष्टींच्या अवलंब केल्यास मराठी माणूस नक्कीच पुढे जावू शकतो .
==============================

शिरीष उमरे, नवी मुंबई


मला पडलेले काही प्रश्न 🤔

१)मराठी म्हणजे नेमका कोण ?
ज्याला मराठी बोलता येते तो ?
जो बर्याच वर्षापासुन महाराष्ट्रात वास्तव्य करुन आहे तो ?
असे असेल तर इतर राज्यातुन येऊन इथेच स्थायिक होऊन इथलीच भाषा बोलणारे अमराठी कसे ?

२) कीती मराठी महाराष्ट्रीयन दुसर्या राज्यात कींवा देशात जाऊन यशस्वी उद्योजक झाले आहेत ? भरपुर !! तामीळनाडुचा सुपरस्टार रजनीकांत हा महाराष्ट्रीयन... कीर्लोस्कर ही आंतरराष्ट्रीय कंपनी मराठी माणसाची !! खुप उदाहरणे देता येतील...

३) गुजरात, राजस्थान व पंजाब राज्यातली सगळी मंडळी उद्योजक असतात का हो ? उत्तर आहे नाही... ह्या राज्यातील ठराविक कम्युनिटी व्यवसाय निपुण असतात... त्यांचे वेगवेगळ्या जागी व्यवसाय असतात व स्ट्रांग नेटवर्क असते... जसे पंजाबी धाबा, अॅटोमोबाइल सरदार, कपडा सिंधी, हीरे व शेअरमार्केट गुजराती, कत्तलखाने जैन, कारखाने मारवाडी, सीए अग्रवाल, भंगार मुस्लीम, कंपनी पारशी, दुध युपी वाले भैया... मराठी लोकांमधेही अश्या कम्युनिटी आहेत... शेती व्यवसाय कुणबी मराठा, सोनार व हार्डवेअर कोमटी समाज, कीराणा वाणी समाज....
आता ही मोनोपोली कालांतराने राहीली नसली तरी अजुनही लक्षात येइल अशी युनिटी दिसते...

थोडक्यात व्यवसाय हा भाषेवर नसतो कींवा कम्युनिटी वर आधारित पुर्वीसारखा राहीला नाही. आता व्यवसायाचे स्वरुप बदलले आहे. इंटरनेट व मोबाइल मुळे जगभरात व्यवसाय करणे सोपे झाले आहे. ते समजावुन घेतले तर कोणीही व्यवसायिक होऊ शकतो. मोबाइल अॅपच्या मदतीने कडकनाथ कोंबडी व अंडे ऑनलाइन विक्री करणारा व्यक्ती मराठी च ... आपल्या शेतावर कॉटेज बांधुन वेबसाइट वरुन अॅग्री टुरिझम मधुन
पैसा कमावणारा शेतकरी मराठीच... त्यासाठी उद्योजकासाठी लागणारे गुण व कौशल्य ही आत्मसात करावी लागतील ...
होणार ना मग उद्योजक ? !!
==============================

महेश कामडी,नागपुर


मराठी माणसाला कोणती अशी गोष्ट आहे जे जमत नाही, सर्व काही जमत
पण....... मध्ये येतो तो पण आणि हम
महत्वाचं म्हणजे उद्योग करायचं हा विचार आपल्या मनात आपल्या घरचे किंवा आपल्या आजूबाजूचे लोक कधी येऊ देत नाही कधी व्यापार करायचं असं ही म्हणत नाही तर फक्त आणि फक्त म्हणतात ते म्हणजे
बेटा/ बेटी तुला मोठं होऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील, इत्यादी बनायचं
आणि आता तर सरकारी नोकरी मिळवायची या वेतीरिक्त काहीच दिसत नाही आणि आपली मराठी तरुण पिढी सुध्धा याच गोष्टीवर लक्ष देत असतात
त्यामुळे मला उद्योग करायचा हा विचार डोक्यात थांबतच नाही, आणि असला विचार आलाही तर तो कधी निघून जाते कळतच नाही.

आणि आपले विचार खूप मोठे असतात छोटे उद्योग, व्यापार, व्यवसाय करायची लाज वाटून घेतो.
आणि मोठा व्यवसाय सुरू करायचा म्हतल्यास मोठी भांडवल त्याकरिता सुटेबाल जागा लागते मग यात घेरचे होनाही करतात भीती पैसे बुडण्याची.
एक साधी सोपी गोष्ट, आपल्यापैकी खूप सारे खेड्या गावातील शेतकरी व शेतकऱ्यांची मुले मुली असतील.
तर का कधी आपण बाजारात आपल्या शेतातील माल (भाजीपाला, फळे) कधी स्वतः बसून विकलीत का?
जास्तीत जास्त उत्तरे नाही मध्ये येणार पण का, का नाही विकलित कारण लाज वाटते.
तो माझा मित्र आहे त्याला येथे अस काही विकताना दिसलो तर तो काय विचार करेल, त्याच्या कडे तर माझ्या पेक्षा कमीच आहे तरी पण तो असले काही काम करत नाही मग मीच का करू?

पण तेव्हा आपल्याला आपली कमी पणा वाटते. तो तर मस्त जॉब करतो 10 हजार महिना पडतो टॉप टीप राहतो असते फालतू विचार डोक्यात घर करून बसली असतात.
पण हा विचार नाही करत कधी की तो तर दुसऱ्याचा नोकर आहे, बाधील आहे त्याला त्या कामाकरीता वेळ ठरून दिला आहे.
आणि आपण तर मनाचे राजे 🤺
सायकल, रिक्षा, बाईक यात सुध्धा लाज कपडे खराब होतील🤨
कुक्कुपालन, शेईपलान केलं तर अंगाचा वास येतो 😷 साप ,मांजर कोंबडीची पिल्ले खातात, तर शेई ला चारा नाही.
असे मराठी माणसाकडे उत्तरे तयार मिळतील.

चाप्याच👠👡👢👞👟 दुकान टाक कमी पैशात💰 जास्त फायदा 💵💵💵
नाही मी चांभार नाही मी नाही करणार
' हम पण ' शेवटी मराठी माणूस म्हणा

आमच्या नागपुर मध्ये बघतोना जास्तीत जास्त व्यवसाय करणारे म्हणजे बिहारी, up, mp काही प्रमाणात पण मराठी माणसाचा शोधून पण भेटणे कठीण अशी परिस्थिती आहे.
सर्व महाराष्ट्रा बाहेरचे लोक येऊन येथे व्यवसाय सुरू करतात छोटा आहे की मोठा याचा अजिबात विचार करत नाही.
आणि आपण याच विचाराने व्यवसाय करत नाही.
बाहेरून आलेल्या लोकांकडे काय असतं काहीच नाही येतात काही दिवस MIDC मध्ये कामाला सुरुवात करतात कसही काम कुठलाही काम कधीच नाही म्हणत नाही.
आणि बघता बघता काही दिवसातच एक छोटी हात गाडी घेऊन आपला व्यवसाय सुरू करतात पाणीपुरी, फळे, पकोडे, पोहा, भाजीपाला इत्यादी छोट्या मोठ्या प्रमाणात सर्वात करतात.
आणि आपण याच गोष्टी करायला लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसतो.
शेवटी मराठी माणूस हम पण माझ्या घरी सर्व काही आहे ते मी का करायचं?
माझ्या घरी आहे कामवणारे मला काही कमी नाही.

' असल्या कारणाने मुळे खरच मराठी माणसाला व्यापार - उद्योग करणे खरच अवघड आहे '

आधी मराठी माणसातील विचार बदलायला हवे उद्योग व्यापार व्यवसाय सुरू करण्याबाबत नकारार्थी विचार डोक्यात नावेत.
मग बघा मराठी माणूस उद्योगात किती वर जातो
==============================

रामेश्वर क्षीरसागर, पुणे


खरे तर मला मुळातच विषयावरच शंका घ्यावी वाटते ?? माणूस मराठी असूच शकत नाही...तो एक तर माळी, मराठा, तेली किंवा आणखी कुठल्या तरी जातीचा असू शकतो ! मग तो मराठी असणे ही फक्त कुठल्यातरी राजकीय पक्षाची संकल्पना आहे ! मग, आता आहे त्या विषयाकडे पाहू ! मुळात मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहणारा असे जरी ढोबळमानाने धरून चालले तरी कुठल्याही व्यवसाय करायचा म्हटले तरी आपल्याकडे चातुर्वर्ण्य व्यवस्था आडवी येते . म्हणजे कसे की काही खास व्यवसाय हे त्या त्या जतीच्याच लोकांनी केले पाहिजेत हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा घालून दिलेला नियम आणखी आपल्याकडे जसाच्या तसा  दिसून येतो !म्हणजे जर तो चांभार असेल तर त्याने फक्त चप्पल च शिवायची किंवा त्यानेच चप्पल शिवायची ! मग दुसरा कोणी तो व्यवसाय करायला गेलवतर लोक लगेच त्याला म्हणणार की तू काय चांभार आहेस का?? मग, मोठं मोठ्या व्यवसायाची तर गोष्टच नको...! मग यातूनच लोक स्वतःचा सामाजिक दर्जा टिकवण्यासाठी मग कुठला आपल्या जातीला न दिला गेलेला व्यवसाय करायचा नसेल तर मग नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात! आणि मग नोकरी देऊन देऊन तरी किती देणार हा प्रश्न असल्याने आरक्षण नावाचा विषय आमच्या समोर यायला लागतो ! खरे तर आम्ही काळासोबत त्याच्या बदलत्या संबंधांना जुळवून न घेतल्याने आज असे प्रश्न आमच्याकडे उभे राहतात ! म्हणजे , कुनब्या च्या पोराने जरी त्याचा परंपरागत व्यवसाय सोडून, शेती सोडून तो जरी आज नोकरी करायला तयार असला तरी तो आज व्यवस्थेने घालून दिलेल्या दुसऱ्या जातीचा व्यवसाय करण्यास तयार होत नाही ..जोपर्यंत हे होणार नाही, तोपर्यंत मग आरक्षण वगैरे चे प्रश्न हे ऐरणीवर राहणारच ! आणि दुसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच मित्रांनी मराठी माणसाला कर्ज पुरवठा वगैरे केला जात नाही असे काही काही मांडले ! पण कुठल्याही समाजाची एक मानसिकता असते की आपल्या कमतरता झाकण्यासाठी आपल्यावर कशाप्रकारे अन्याय झालं ये जगाला ओरडून सांगितले जाते ! असे काही नाही, अन्याय वगैरे या गोष्टी राजकीय गप्पा मारण्यासाठी ठीक आहेत, पण त्या बुद्धिवंत लोकांच्या चर्चेत नाहीत शोभत .काळासोबत स्वतःला जुळवून न घेतल्यामुळे मुळात मराठी माणसाला व्यवसाय करणे जाड जत आहे, तो अपयशी ठरत आहे, तो व्यवसाय करत नाही! बाकी , शिक्षण वगैरे हा मुद्दा त्यात आहेच मात्र, मुळात अंगभूत असणाऱ्या इच्छाशक्ती पुढे तो गौण ठरतो !
        आल्फ्रेड बिने नावाचा मानसशास्त्रज्ञ बुद्धीची व्याख्या करताना फार सुंदर म्हणतो की *," बदललेल्या परिस्थितीबरोबर आपण कसे स्वतः लां जुळवून घेऊ शकतो याची क्षमता म्हणजे बुद्धी होय." मला वाटते की, बुद्धीची अशी व्याख्या जेंव्हा मराठी माणूस मान्य करेल तेंव्हा मराठी माणूस कुठल्याही व्यवसायात कमी पडणार नाही !
==============================

अर्चना खंदारे, हिंगोली


सर्वात महत्वाचा अडचण निर्माण करणारा  प्रश्न  म्हणजे  मराठी  माणूस  म्हणजे नेमका  कोण  ?
माळी, कोळी, कुणबी, कुंभार, चांभार, मांग, महार, धनगर  इत्यादी सर्वच  हि या जाति  तील लोक  हि मराठी आहेत का ?कारण पूर्वी  पासून समाजामध्ये जाती  नुसार  काम  करण्याची  पद्धती  रूढ  झालेली  आहे कींवा असे  हि  म्हणता  येईल  कि  ,काम / व्यवसाय  हा वरून   माणसाच्या  जाती निर्मान केल्या आहेत.नाव्ही ने  केश कर्तनाचा व्यवसाय करावा,कुंभाराने  मडकीच  बनवावी,चांभाराने चर्माचाच  काम करावं इत्यादी  असा  किती तरी जाती ह्या पिढयं न पिढया तोच  व्यवसाय  करताना  दिसत  आहेत.
पण  आज  च्या  21 व्या शतकामध्ये  आणि Dr. बाबासाहेब  आंबेडकर  यांनी संविधान अशी  अमूल्य   रत्न आपणास  बहाल  केले  त्यामुळे  कुठेतरी  या  समाजामध्ये  सुधारणा  होताना  दिसत आहेत.
आपल्या महाराष्ट्रा मध्ये  मराठी माणसाचा  मुख्य  व्यवसाय  हा शेती  आहे.व  तो  आपणच  ठरवून  दिला  आहे .कारण   महाराष्टात इतर  व्यवसाय करणारे  हे  बाहेरच्या  राज्यातले  जास्त  प्रमानातं आहेत व  ते  इथे आपलं   ठाण मांडून  बसले आहेत.आपण  आपल्या लोकांना  व त्यान्च्या  कला  गुणांना  वाव  देत  नाही   कारण आपल्याला आपल्याच  लोकांना  चांगलं  म्हणण्याची  सवयचं नाही .मग आपल्याला आपल्याच मराठी माणसाने  केलेला  उद्योग  व्यवसाय कसा  योग्य  वाटेल  ,उलट  आपण  त्यांना  प्रोत्साहन  देण्यापेक्षा  तुला  हा व्यवसाय  जमणार  नाही,आपलं व्यवसाय करणे  कामच  नाही ,आपला  शेती हाच  मुख्य व्यवसाय आहे इत्यादी अमुक  अमुक गोष्टी त्यास  सुनावतो.आपल्या माणसाचे  खच्चीकरण  करण्यापेक्षा  त्यांना प्रोत्साहन द्या ,मराठी माणूस हा सर्वगुण  संपन्न  व्यक्तिमत्वाचा  एक  आदर्श  नमुना  आहे ....
मला तरी वाटते कीं कुठलीच  गोष्ट  हि गर्भजात  शिकल्या  जात  नाही तर  ती  कठोर  परिश्रमाने   शिकल्या जाते अशी किती तरी उदाहरणे  आपल्या समोर आहेत.मग मराठी माणसालाच  का उद्योग व्यवसाय जमणार नाही
नक्कीच  जमेल .......
==============================

अनिल गोडबोले,सोलापूर


उद्योग किंवा व्यापार म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी मराठी माणसाला जमणार नाही.?
मराठी माणूस म्हणजे काही दुसऱ्या ग्रहावरून आलेला वर्ग नाही. इतर लोकांप्रमाणे मराठी माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो.
सर्व काही जमत... त्यात काही अवघड नाही. किर्लोस्कर पासून.. वसंत आबाजी भिसे यांच्या पर्यँत सर्वंनी उद्योग व्यापार केलेला आहे.
आता सुद्धा dsk सारखे उद्योगी आहेत. भले ते चूक किंवा बरोबर कोर्ट ठरवेल.. पण ते देखील मोठे उद्योगपती आहेत.

प्रश्न फक्त दृष्टीकोन बदलण्याचा आणि आधार देण्याचा आहे.

पैसे, वेळ आणि श्रम यांची सांगड घालण्यासाठी मदत करण्याची वृत्ती नाही हा एक वाईट गुण आहे.
त्याही पेक्षा वाईट गुण दुसऱ्याला खाली खेचण्याचा.. तो चांगला जोपासला आहे.. त्याला सोडायला हवं.

बुद्धिमत्तेचा वापर विकासासाठी करायला पाहिजे.
मराठी माणूस पैसे उभे करण्यासाठी कमी पडतो, बँक आणि आर्थिक साक्षरता आपल्या कडे कमी आहे.
ते कमी असण्याचं कारण, आपल्याकडे शिकवण आणि दृष्टिकोन पैशाविषयी खूप चुकीचा आहे.

नाहक गोष्टी मध्ये भरपूर पैसे घातले जातात, मार्केटिंग च्या जगात ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी संवाद कौशल्य आणि जोखीम घेण्याची वृत्ती कमी पडत आहे, अभ्यास कमी पडत आहे..

शेवटी, तात्पुरत्या लाभाचा विचार न करता भविष्यातील दृष्टिकोन लक्षात ठेवून गुंतवणूक करावी लागेल.. थोडा विचार बदलला तर मराठी माणसा एवढा तत्वनिष्ठ (एथिकल) उद्योग जगात दुसरा कोणी करू शकत नाही, याची मला खात्री आहे
==============================

जयश्री खोडे, मुंबई


               कोणताही व्यवसाय करायचा असल्यास त्यासाठी लागणारी मेहनत, जिद्द, चिकाटी, संपुर्ण वेळेचे नियोजन आणि धोके पत्करण्याची हिम्मत असेल तर मराठी माणूस नक्कीच व्यवसायात यश मिळवेल. कारण व्यवसायामध्ये लगेच यश नाही मिळाले किंव्हा तोटा सहन करावा लागला तर लगेच आपण खचून जातो.
                व्यवसाय करण्यासाठी पैश्या बरोबर वेळेचे नियोजन करणे महत्वाचे असते. व्यवसाय विश्लेषण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण करत असलेल्या व्यवसायावर वेळोवेळी तज्ञांचे सल्ले घ्यावे. मराठी माणसा मधील मीपण किंव्हा अहम् पणा मध्ये येतो. बरेचदा आपण एखादया यशस्वी उद्योजकामुळे प्रभावित होऊन उद्योग करावयाचे ठरवतो परंतु त्यामागची त्याने केलेले परिश्रम, मेहनत हे बघायला विसरून जातो. दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमधून शिकायला पाहिजे, आपल्याला त्याच चुका करायला नको.

                   मराठी मानुस उद्योग उकृष्टरित्या करू शकतो फक्त गरज आहे ती सुरुवात करण्याची. मेहनत घेण्याची, चुकांमधून शिकण्याची, मार्केट नुसार नियोजन करून व्यवसाय विस्तृतपणे वाढवण्याची.
            
                   आपण घेतलेले कर्ज हे व्यवसायात आवश्यकतेनुसार वापरावे. कारण ते आपल्याला परत करायचे आहे बरेचदा आपण विसरून जाऊन स्वतःचा नफा समजून वयैक्तिक कामासाठी खर्च करत असतो.
==============================

महेश देशपांडे,ढोकी

हा प्रश्न असेल तर, अस नाही मराठी माणसाला उद्योग व्यापार जमतो आणि तो यशस्वी करूनही दाखवतो..

आधी विचार आणि कृती अस केलं तर नक्कीच होऊ शकतो.

आता उभा केलेल्या उद्योगाचं यश हे मला वाटत तुम्ही किती जोखीम पत्करू शकता यावर जास्त अवलंबून आहे,
इथे एक नमूद करावे वाटते की उत्तर भारतीय हे त्यांच्या उत्पन्नातील २० % रक्कम ही निव्वळ जोखीम समजतात...

मराठी माणूस हा प्रत्येक पैशाला महत्व देतो..


आज अनेक उद्योग मराठी माणूस उभा करतो आहे आणि या पुढेही करत राहील, स्वबळावर असेल किंवा सरकार इतर खाजगी संस्था यांच्या मदतीने असेल..

आपण जर त्याला तोटा झाला तर काय करायचं हा एकच प्रश्न विचारून भंडावून सोडतो..

याउपर उद्योग उभा करताना याचाही विचार केलेला असतोच की... फक्त आपल्या अपेक्षित संख्येपेक्षा जास्त झाला तर खचून जातो किंवा कमी झाला तर वाचल्याचं समाधान...


त्यामुळे उद्योगाला प्रोत्साहन देणे हे प्रत्येकाने करायला हवे..


शिक्षण व्यवस्थेमध्ये याचा कसा समावेश करता येईल याचा जर गांभीर्याने विचार झाला तर आणखी टक्का वाढेल.. आणि ते होताना दिसतही आहे..

यामध्ये अनेक पैलू आहेत बँकेची दिवाळखोरी, फसवणूक किंवा बँकेकडून लुबाडणूक , मग उद्योगामध्ये  परकीय गुंतवणूक, स्थानिक बाजारपेठ, लोकांची मानसिकता, वैगेरे...

या सर्वांपेक्षा आपण त्यात उतरलो तर नक्की यश मिळेल असा मला वाटत..


आज अनेक संस्था , संघटना आहेत ज्या मार्गदर्शन करताना दिसत आहेत, प्रोत्साहन देताना दिसत आहेत..

आपणही यात हातभार लावून आपली, समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती कशी साधता येईल याचा विचार करावा...
==============================

अश्विनी कटकेमोड,नांदेड.

      
        जमत.. हो जमतं! छोटे-मोठे उद्योग/व्यापार/धंदा करतच त्याच रुपांतर उद्योगांमध्ये होत.
       त्याची सुरुवात होती ती गावातल्या छोट्या बाजारापासूनच. मग त्याला लोकांकडून पसंती मिळायला लागली की, मग आपला जोम वाढतो. फायदा आहे या गोष्टींची जाणीव/चटक लागली काही दिवसाने ( मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे ) packing करुन ठेवतो, विकतो व transport करतो.
        मग उद्योगाच्या कला अवगत व्हायला लागतात... त्याच वस्तु तितक्याच quantity च अजुन जास्त किमतीत कश्या प्रकारे विकल्या जातील याचा विचार करून मग आपण त्याला attractive बनवण्यासाठी decorative covering/packing करतो, नाव देतो. प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याच नावाच पुन्हा brand बनतं.. आणि उद्योजक म्हणुन प्रसिध्दी मिळायला लागती.
         व्यापार/व्यवसायामध्ये नम्रपणा लागतो. कितीही मोठे असलो तरी (down to earth )हवं.. पहा ना जर आपण एखाद्या restaurant/hotel मध्ये गेलोत. ऐनवेळी तेथील waiter जरी नसेल, तरीपण त्या restaurant चा मालक पण उठुन विलंब न करता  खाली वाकुन विचारतो.. 'Would you like to order mam'..?
       खंर तर त्यांना एक-दोन ग्राहकांचं काही नको वाटायला हवं...? पण नाही ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात तेंव्हाच व्यापारी पासुन उद्योजक बनतात. (आणि मग त्यांना हव्या त्या किमतीत न बोलता brandchya नावाखाली घायला भाग पाडतात..(यात मराठी पण आहेत म्हणा..पण हव्या तेवढ्या प्रमाणात नाहीत.)
    आणि आपल्या मराठी माणसाच असतं मग 'घायच तर घे, नाहीतर जा...' इथे कुठेतरी आपण कमी पडतो..
     ग्रामीण भागामध्ये म्हातारी माणसांना गुरा-ढोर राखण्यासाठी पाठवलं जातं. आणि ते एका गुरांना पासून १० गुर-ढोर वाढवण्यात आपला व्यवसाय समजतात. पण जर त्यांच्या मुलांनी हा व्यवसाय म्हणुन निवडण्या ऐवजी जर त्यांना दुकान टाकुन दिलं तर त्याच रुपांतर कालांतराने मोठ्या दुकानात होऊ शकत.. अजुन profit वाढु शकतो. निदान या बाबतीत तरी मराठी माणसाने थोडीशी जोखीम घ्यायला काही हरकत नाही.. इथे मात्र courage करायलाच हवं..
धन्यवाद!

(वरील लेख, other state मधली लोक जास्त उद्योग करतात.. मराठी माणसाना जमत. किंव्हा का नाही..??अस comparatively...मी लेख लिहिला नाही...
==============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************