आमदार- खासदारांचे पेंशन.

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 51वा 📝 

सुवर्ण महोत्सवोत्तर आठवडा

21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2018

आमदार- खासदारांचे पेंशन.


अभिजीत गोडसे,सातारा

           ज्याला मनापासून लोकसेवा करायची आहे . त्याला कोणत्याही प्रकारच्या  फळांची अपेक्षा , लोभ नसावा. बरेच ज्येष्ठ  समाजसुधारक सरकारात नसताना सुद्धा चांगली कामे केलेली आपण पाहिले आहे . काही करत आहेत. जे आपल्या जिल्हाचे , तालुक्याचे खासदार , आमदार म्हणजेच लोकप्रतिनिधी आपण जर पाच वर्षेनी निवडून देतो. ते संसद आणि विधानमंडळ यांन मध्ये सेवा करण्यासाठी. ही एक संधी आपण त्यांना  दिलेली असते. आपल्या जिल्ह्याचा ,  तालुक्याचा विकास करण्यासाठी सरकारने दिलेली कामे , योजना प्रशासनाला हाताला धरून हे करणे गरजचेचे असते. ही एक जबाबदारी मतदारांनी विश्वासाने दिलेली असते. यासाठी सेवा हाच एक निकष राहीला हवा पगार किती , पेंशन किती  या नंतरच्या गोष्टी .


पण होते उलट संसदेमध्ये आणि विधानमंडळामध्ये अधिवेशन होतात .जनतेच्या प्रश्नांसाठी. ते न होता जास्त प्रमाणात आमदार आणि खासदार यांच्या प्रश्नांवर त्याच्या पगार आणि पेंशनवर चर्चा आपण वरचेवर पाहतो. मुळात प्रश्न निर्माण होतो या लोकप्रतिनिधींना  येवढ्या सर्व सुविधा असताना पेंनशची काय गरज आहे. दवाखान्या पासून विमान प्रवासा पर्यत सोयीसुविधा असणारे . हे मतदार संघात अलिशान गाड्या वर्षीतुन किमान दोन - तिन वेळा बदलतात. येवढच नाही  यांच्या मुलाकडे , नातवाकडे पाहिले तर सामान्य वर्गाचे डोळेदिपतील. या लोकप्रतिनिधीचे वाढदिवस तर सामान्य माणूस स्वप्नात सुद्धा करु शकणार नाही . देशातील ८२ टक्के खासदार करोडपती आहेत. एका सर्वे नुसार महाराष्ट्रातील १०० आमदारांची संपत्ती १० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. काहीनी पुढच्या पिढीची सोय करून ठेवली आहे. अशांनी पेंशनची मागणी करावी ? आणि समजा एखाद्या लोकप्रतिनिधीं पाच वर्षीनी पुन्हा कदीच निवडणू नाही आला तर .अशांना आयुष्यभर पेंशन द्यावी ? तिही अर्धा लाख भर . अगोदरच सरकारवर कर्जाचा डोंगर . त्यात कर्ज माफी , दुष्काळ निधी , आपत्ती व्यवस्थापन , विविध विकास कामे यासाठी ही पैसा जातोय. आणि आगोदरच सर्व सुख- सुविधांनी आयुष्य पुढे ढकलत असताना यांना निवृत्त झाल्यावर पेंशनचे चोचले पुरवण्यासाठी हे सर्वजण मागणी करतात. वैशिष्ट्ये म्हणजे अशा वेळी सर्व  एकत्र येतात. मग कोण - कोणत्या पक्षाचा असा काही भेदभाव करत नाहीत ही मंडळी. पेंशनसाठी  दाखला देताना हे सर्व  बाहेरच्या देशाचा दाखला देतात. पण आपली आणि इतर देशाची अर्थव्यवस्था यात खूप फरक आहे.


हे लोकप्रतिनिधी मतदार संघात विकासकामा एवजी राजकारण करत बसतात. पाच वर्षे हे फक्त आमदार - खासदार यांची भांडणे, पक्ष्यांची अंतर्गत भांडणे , याने त्याच्यावर आरोप कराचे. त्यांने त्याच्यावर आरोप करायचे यातच यांची पाच वर्षे निघून जातात. पण यांचे कार्यकर्ते यांच्या विकास कामावर प्रचंड खूष असतात. दवंडी पेटवायचे हेच तर काम करतात. आणि जोडीला पञकारीतेचा अर्थ न कळलेले पञकार असतात. पण विकास कामे  फक्त  कार्यकर्त्यांना दिसतात. मतदारांना नाहीत. प्रत्येक जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूकीत हे लोकप्रतिनिधी दिसतात. त्या नंतर ते पाच वर्षीनी दिसतात. तिकडे संसद किंवा विधानमंडळामध्ये यांच्या तोंडातून प्रश्न विचारायला कधीही 'ब्र' निघत नाही . काहीतर तिकडे फिरकत देखील नाहीत . विकास कामे आणि यांचा दुरतक संबंध नसतो. पण मतदारसंघात हेच लोक प्रतिनिधी पोपटागत बोलतात. स्वतःच्या सुखसुविधे साठी माञ एकञ येताना आणि बोलताना दिसतात. कित्येक तास अधिवेशनाचे वाया घालवले महाराष्ट्रत यांनी. नियम तोडणे , वाटेल तसे वागणे , वाटेल तसे विधाने करणे हे काही लोकप्रतिनीधी वरुण आलेली परवानगीच असावी ! आता तर खासदार आणि आमदारांची निवडणूक खर्च मर्यादा वाढवली आहे. खासदारांची ४० लाखावरून ७० लाख मर्यादा झाली तर आमदारांची १६ लाखांवरुन २८ लाख झाली आहे. निवडणूकीत येवढा खर्च ही करत नसतील तो भाग वेगळा. पण  प्रचंड पैसा आलाय. येतो. पण याचा विकासाठी वापर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.


पूर्वीच्या लोकप्रतिनिधीनां लोकशाही बद्दल प्रचंड आदर होता. ते सरकारकडे काही मागण्या पेक्षा आम्ही सरकारला काय देवू शकतो हे पाहत होते. मी जनतेचा सेवक आहे आणि शेवट पर्यत सेवकच राहिन अशा पद्धतीने ते वागत . महाराष्ट्रातील पूर्वीच्या आमदारांनी दिड रुपाया माणधण घेऊन उत्कृष्ट सेवा केली आहे. पण आज कोणतीच सेवा जास्त पैसा घेतल्या शिवाय किंवा काहीतरी मिळाल्या शिवाय होत नाही. हे वास्तव आहे. अशी परिस्थिती  बदलण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधीची  गरज आहेच. पण त्या पेक्षा जास्त सुजान नागरिकांची जास्त गरज आहे.
==============================

संदिप बोऱ्हाडे. ( वडगाव मावळ , पुणे)


    राजकारणी, नेते मंडळी हे शब्द जर ऐकले तर माझ्या तोंडात तर शिव्याच येतात यांच्याबद्दल..अपवाद जर वगळला तर काही नेते नक्कीच प्रामाणिक आहेत.. पण यांची संख्या किती 100 राला 5 पण मिळणार नाहीत. काही बोटांवर मोजण्या इतके आहेत मनोहर पर्रीकर, माणिक सरकार, गणपतराव देशमुख, बच्चू कडू अजूनही असतील पण सध्या मला हे नेते खूप आवडतात

    मागे काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचायला मिळाली होती , ब्रिटन मधील ..एक मिनिट उशीर झाला संसदेमध्ये यायला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा.
मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो," असं म्हणत ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला होता..

आणि आमच्या देशात अधिवेशनात 98% गैरहजर राहणाऱ्या सदस्याला उत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार देण्यात येतो. आणि पवित्र संसदेत हजर न राहता महान पंतप्रधान होता येते. तसेच संसदेत झोपा देखील काढता येतात. आमच्या भारतातले मंत्री खासदार देशाचे प्रश्न मांडण्यासाठी जातात आणि संसदेत porn film बघतात बरका. आणि हे वास्तव आहे.
जनतेचे सेवक ना तुम्ही मग सेवा करायची सोडून लुटायचे धंदे करता का..?? मग शिव्या नाही येणार तोंडात तर काय येईल तुम्हीच सांगा. 15 दिवसांपूर्वी दिल्ली ला पेपर ला जाऊन आलो आणि एका महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यावर दिल्लीत रहायला मिळाले मी त्या मंत्र्याचे नाव नाही घेत पण वास्तव सांगतो मंत्र्याच्या बंगल्यावर राहायचा तपास नाही पण दोन- तीन गाड्या 10-20 नोकर चाकर प्रशस्त बंगला.. आणि अजूनही बऱ्याच सुविधा कशाला हवय हो हे सगळं.. ते ही जनतेच्या पैश्यांमधून.

   आमदार , खासदार यांची देशातील संख्या हजारोमध्ये आहे..पगार देखील लाखो मध्ये घेतात, इतर भत्ते नोकर, चाकर , घरभाडे, फोनबील आणि अजून एकदा फक्त निवडून यायचं नंतर मरेपर्यंत पेन्शन पण मिळते बर का ?? का बरं देशाने म्हणजेच सर्वसामान्य लोकांच्या पैश्यातून या अश्या लोकांचे लाड का
पुरवावेत.. असे कोणते दिवे लावतात हे महाभाग.. माझ्यानते हे तर अट्टल चोर असतात.................हे कधी चो-या करुन जातात; सामान्य माणसांना कळत सुद्धा नाही. यांच्यामुळेच देश कर्जबाजारी झाला आहे आणि आपण यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हटली तर लगेच यांच्या तिजोरीवर बोजा येतो...अरे प्रत्येकाने तुमच्या सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री संत्री लोकांनी एक महिन्याच्या पगार दिला ना तरी सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ होतील आणि आमची ही आमदार खासदार पगार वाढीसाठी नुसते रडत असतात पगार वाढीला कोणताही पक्ष मला विरोध करताना दिसला नाही. महाराष्ट्र विधानसभेने काही वेळात 50 हजारांवरून एक लाख पगार वाढ केली कोणत्याही आमदाराने विरोध केला नाही बच्चू कडू आणि अजून असतील 1 2 अपवाद. म्हणजे आपण दोघे भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ
देश कर्जबाजारी झाला आहे तो याच लोकांमुळे पण आपल्याला ते समजून येत नाही..एक आमदार बच्चू कडू यांचे वाक्य नेहमी आठवते नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा
आपल्यासारख्या पुढा-यांनाच गोळ्या घालायला हव्यात.

     भारतातील नेत्यांनी जर ब्रिटन चे त्या बातमीचे अनुकरण करायचे ठरविले तर ते फक्त लाजून लाजून मरून जातील. निगरगट्ट, अप्पलपोटी , नालायक , बेशरम वगैरे ' गुण ' आहेत इथल्या आमच्या भारतातल्या राजकारणी लोकांमधे. आणि अश्या बातम्या वाचल्यावर आपल्या संबंधित लोकांसाठी एकच शब्द आठवतो........... हरामखोर.. अजूनही खूप आहे पण तूर्तास इतकेच..
==============================

शिरीष उमरे, नवी मुंबई


स्वातंत्र्यापासुन फक्त खासदार मोजले तर अंदाजे ८००० असतील पेंशनधारी. तशी फार काही मोठी संख्या नाही पण एडीआर ह्या राजकीय संशोधन संस्थेच्या रिपोर्ट नुसार  ९०% खासदार हे करोडपती आहेत. बरेचसे फर्जी पॅन कार्ड होल्डर व क्रीमिनल रेकॉर्ड वाले आहेत. हीच गत आमदारांची !!

मग खरेच ह्या आमदार- खासदारांना पेंशन ची गरज आहे काय ? असा प्रश्न केला तर  सगळेजण नाही असेच उत्तर देतील. बहुतांशी खरे पण आहे. मग विचार येतो १०% प्रामाणिक, भ्रष्टाचार न केलेले वयस्कर व भरपुर विकासाचे काम  केलेल्या खासदारांचा... ह्या अंदाजे हजार लोकांचे काय ? ही लोक बरेचदा मृत्यु शिवाय रिटायर्ड होत नाहीत. ही आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यांचा सांभाळ करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी नियम बदलवावे लागेल.  कॅगप्रमाणे एखादी ऑटोनॉमस संस्था ह्याकडे लक्ष देऊ शकेल.

 भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हीस करणार्यांना सुध्दा पेंशन असते. माझ्यामते देशाच्या प्रत्येक नागरिकाला निवृत होण्याचे स्वातंत्र्य व पेंशन मिळायलाच हवी. अशी आपल्या सिस्टीममध्ये व्यवस्था करणे गरजेचे आहे.
असे मला वाटते
==============================

सागर राडे, सांगली

.
भारतात सध्या पेन्शन घेणाऱ्या आमदार-खासदारांची एकत्रित संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यापैकी जवळपास 70-80 % तरी करोडपती नक्कीच असतील. मग खरंच त्यांना पेन्शनची गरज आहे का?
खरंतर पेन्शनची तरतूद निवृत्तीनंतरचं उदारनिर्वाहाचं साधन म्हणून केलेली असते. आमदार असो वा खासदार निवृत्तीनंतरदेखील पूर्णपणे निष्क्रिय न होता कुठल्या ना कुठल्या पदावर नेहमीच असतात. त्यातून त्यांना उत्पन्न मिळत असतं. अशा व्यक्तींना पेन्शनची गरज आहे का?
दुसरं महत्वाचं म्हणजे आमदार/खासदार पदावर असताना अधिवेशन काळात किंवा इतर वेळी संसदेत/विधिमंडळात ते उपस्थित असतातच असं नाही. त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तरीही त्यांना पेन्शनची सोय आहे. अशा व्यक्तींना पेन्शन का द्यावी?
संपूर्ण आयुष्यात एखादी व्यक्ती  वर्षभरासाठीदेखील आमदार/खासदार पदावर असली (फक्त 1दा जरी निवडून आली असेल) तरीदेखील ती व्यक्ती पेन्शनसाठी पात्र ठरते. अशा वेळी खरंच पेन्शनची गरज आहे का?
==============================

सचिन कंन्नाके रा.पिंपळखुटी

  
    आजच्या आठवड्याचे विषय खूप छान निवडले आहे तरी त्यातून मला आमदार खासदार पेंशन हा विषयावर विचार मांडावे वाटत आहे.
      आज मित्रानो इकडे लोकांना काम मिळत नाही आहे.मनुन गावातील माणसे शहराकडे जात आहे आणि अजून समस्या म्हणजे आज शेतकऱ्यांना पीक होत नाही आहे. आणि कर्ज शेतकऱ्यांनवर भार वाढत आहे ते पण कर्ज माफ नाही करत आहे* .😢😢
                   त्यात अजून दुष्काळ पडत आहे त्यावर त्याचे लक्ष नाही आहे. पण स्वतःचे पेंशन कसे वाढवायचे त्यावर त्याचे लक्ष आहे.
                      *माझ्या मते पूर्वी आमदारांना दरमहा  पंचवीस हजार मिळत होते. आणि त्यात त्यांना सुविधा

 देण्यात येते. विमान, रेल्वे, एसटी त्यामध्ये त्यांना प्रवास मोफत असते.आज त्याच आमदारांना पंचात्तर हजार दरमहा देण्यात येते.
           त्यामध्येही त्याच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा मोफत आहे.अनावशक खर्च करत आहे आणि सरकारची म्हणजे आपलेच जनतेचे पैसे खर्च करत आहे.

     _माझ्या विचाराने पूर्वी आमदार खासदाराना जास्त लाभ मिळत नव्हता पण आज निवृत्ती वेतन त्यांना कायला त्यांना जर निवृत्ती वेतन दिले तर आपल्या भारतात वीस हजार आमदार खासदार आहे त्यांना सगळ्यांना निवृत्ती वेतन दयावे लागेन.
    त्यातही पूर्वी पेक्षा आज त्यांना वेतन दरमहा अंशी हजार आहे. आणि निवृत्ती वेतन चालू झाले तर चाळीस हजार दरमहा द्यावे लागेल. त्यामुळे आपल्या सगळ्या नागरिकांवर त्याचे परिणाम पाहवयास मिळेल. कारण प्रत्येक वस्तू मध्ये पैसे वाढेल. त्याचा परिणाम गरीब,मध्यम ,सगळ्यास होईल._
 😞😔😟☹😔😟😔
   
          पूर्वी स्वतंत्र काळात जे महान नेते होते. त्यांनी केव्हा ही स्वतःचे पाहिले नाही फक्त दुसऱ्यासाठी झटले ते महान नेते महात्मा फुले, छत्रपती शाहु, महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर थोरमोठ्या नावाची सर आजच्या मंत्र्यांना येणार नाही.
🏳🏳🏳🏳🏳🏳🏳
  _तरी2014-2015 मध्ये तो आमदार झाला पण त्याने पहिले आश्वासन खूप केले पण साडे तीन वर्ष होत आहे. पण आजपर्यत जेकाही सांगितले ते आज पर्यंत पूर्ण झाले नाही.
 फक्त प्रधानमंत्री राज्य मार्ग आता जोमात चालू आहे कारण आता2019 चा निवडणूक येत आहे.त्याचे मत असे होते की तीन पंचवार्षिक निवडून नाही आले तरी चालेल एक वेळा आलो तर तीन पंचवार्षिक ची कसर पूर्ण करू शकतो._
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
            आणि त्यांला हे पद म्हणजे एक प्रतिष्टित नागरिक वाटते. म्हणून तो त्या पदासाठी करोडो रुपये खर्च केला. आणि त्यानंतर तो आता आमदार बनला,
💰💸💰💵💰💷💰💶
           *पण खरा प्रश्न आहे आमदार खासदाराना पेंशन ही समस्या थंबवायांचे आसेल तर मंत्र्यांना पेंशन मिळायला नाही पाहिजे.जो मंत्री पाच वर्षे त्या पदावर राहतो तर त्याला पेंशन.आणि जो 35 ते40  वर्षे सरकारी नोकरी करतो.त्याला पीएफ असे का. तरी हा प्रश्न माझ्या मते गंभीर आहे.
=============================

शीतल शिंदे .दहिवडी - जि सातारा


लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले , लोक कल्ल्यनासाठी  तात्पुरत्या - ठराविक कालावधीसाठी निवडून दिलेले लोकनेते सेवक म्हणजे आमदार , खासदार , आणी इतर सर्व मंत्रीमहोदय  .
  मात्र वर्षानुवर्ष ही मंडळी आपल्या पिढीजात व्यवसायासारखे आपल्या पुढच्या पिढीची सोय पण करून ठेवतात .ह्यांना पासपोर्ट - विसा , वाहन सुविधा सर्व काही ऐश.कुठून आले एवढे अब्जावधीची सम्पत्ती , टोलेजंग इमारती , व इतर प्रॉपर्टी . आरामदायी जीवन एवढ्या सोयी सुविधा की त्यांना आपण जनतेचे सेवक आहोत की मालक ह्यातला फरकच कळू दिला जात नाही .ह्याला जबाबदार आपले शासनच आहे .

जनतेचाच पैसा खावून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेवर अन्याय , जतीजतीमधे तेढ , दंगली घडवून आणायच्या आणी जाब विचारायचा म्हटले की समिती नेमायची  मग ती समिती चार - पाच वर्षे लावायची तोपर्यंत दुसऱ्या पक्ष निवडून येतो .

सर्वसामान्य जनतेकडून त्यांनी कमावलेला पैसा त्याचा टेक्स, व्यापार टेक्स हा म्हणजे काळा पैसा आणी ह्यानी न कमावता जमा केलेल्या सम्पत्तील काहीच नाही .

🌟 खरेतर ह्यांना पेन्शन ची आणी एवढ्या भत्त्याची काहीच गरज नाही . एवढे नोकर सेक्यूरिटी नको एवढ्या सोई सुविधा आरोग्य विमा .सरकारच्या केवढा मोठा तोटा .

ह्यानेच देशा ची आर्थिक व्यवस्था डबघाईला यायची .येवढ्या खर्चात कितीतरी कुटुंब जगून निघतील .एकिकडे  कुपोषण ,गरिबी ,  बेरोजगारी आणी उपासमार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या 😔.

 निवडणुका जवळ आल्या की विकास कामांना सुरवात करायची म्हणजे पाच वर्षे काय उद्योग केले ते जनता विसरते आणी पुन्हा नव्याने निवडून देते .विसरभोळे- दुसऱ्यांच्या मतांचा फुटबॉल बनणारे आपले  लोक .

ज्येष्ठांनो जागे व्हा.आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणाचे  विचार भरा .जबाबदार नागरिक बनवा .

नवयुवकानो - मतदारांनो झोपेतूण जागे व्हा.तुम्हा प्रत्येकाला राज्यकर्ता बनन्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेने दिला आहे .आधीही आणी या पुढेही  प्रामाणिक पणे कार्य करण्यासाठी .आणी मत देताना चांगला नेता निवडा .नवीन लोकांना संधी दया .तुमचे एक मत तुमचे , देशाचे भविष्य घडवू शकतो कारण तो तुम्हांला अधिकार आहे .त्यामुळे मत विकताना विचार करा .जागे व्हा नव्या पिढिनो जागे व्हा.
===============================

मुकुंद बसोळे,लातूर


स्थळ- गावातील वडाचं  झाडं आणि त्या वडाच्या भोवती असलेला पार....
वेळ- 11.30....गण्या त्या पारावर पेपर वाचत बसला होता....आणि मन्या नुकताच जेवण  करून आपल्या तुडुंब भरलेल्या पोटावरुन हात फिरवत पाराकडे येत होता.....
मन्या- ( गण्याच्या पाठीत एक धपका घालून...) ऐ 'हिरो' काय करायला बे....भर दुपारी......

 गण्या - आबे जनमल्यावर 'डोक्यावर' पडला होता का बे तू?..... दिसत नाही का पेपर वाचतोय ते....

मन्या-  ते दिसतंय बे...काही विशेष आहे का आज पेपर मधी....

गण्या- विशेष म्हणजे बघ....भारत आजचा सामना हरलाय वेस्ट इंडिज बरोबर....आणि ते 'राफेल' चा मुद्दा चांगलाच चघळत आहे की राव....आणि हे बघ हे काय...(मोठ्याने वाचत) आता आमदार आणि खासदारांना पेन्शन सुरू होणार आहे म्हण....

 मन्या- (ख्या ख्या हसत) आबे जोक करायलेत का म्हणतो मी आजकालचे राजकीय नेते....

गण्या- कस काय बे?...

मन्या-  (गंभीर होऊन)अरे गण्या मायला तुला खरंच वाटतं की ह्या आमदार आणि खासदारांना  खरंच ह्या पेन्शन ची गरज असलं म्हणून....आबे पुढच्या 10  पिढ्या सुद्धा बसून खातील एवढं 'भ्रस्टचार' करून कमावलेलं असतं ह्यांनी....( थोडं जास्तच गंभीर होऊन आणि भूतकाळात रमल्यासारख करून)  अरं गण्या काय सांगू तुला माझा बाप शाळांमास्तर.... इंग्रजी जिचा लै भारी शिक्षक...तो होता डोंगरगावात.... मास्तर  म्हणून ......आजसुद्धा मी तिथे गेलो की तेथले लोक म्हणतात की गुरुजींनी  आम्हाला घडवलं..आजपर्यंत तसा शिक्षक झाला नाही...पण काही गोष्टी 'नियतीला' सुद्धा मान्य नसतात...पाठवलं तिने माझ्या बापाला देवाकडे...( हे सांगताना डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या असतात).......त्यांनी 20 वर्ष सेवा केली शिक्षक म्हणून...अजून 10 वर्ष होती सेवेची.... पण शासन आम्हाला त्यांची सेवा पूर्ण नाही झाली म्हणून अर्धीचं पेन्शन देतंय... आम्ही कसे दिवस काढलेत आम्हालाच माहीत...भावा....आणि यांनी 5 वर्ष जरी आमदारकी केली तरी लगेच यांना पेन्शन...बरं ते जाऊदे....आमदारकी आणि खाजदारकी हे लोकसेवा ना बे...लोकसेवेचं माध्यम ना हे...पण आजकालचे आमदार- खाजदार तुला माहीत आहेत ना... हो एक काळ होता जेंव्हा आमदार- खाजदार लोकांसाठी तळमळीने काम करायचे...लोकनेते होते ते....पण आजकालचे आमदार खाजदार....फक्त प्रचारात वापरलेला पैसा कसा दुपटीने तिपटीने वापस कसा मिळवायचा याचाच विचार करतात....काही अपवाद असतील पण त्यांची संख्या नगण्य....मग अश्या वेळेला विचार करावसा वाटतो भावा की यांना पेन्शन ची खरंच गरज आहे का?....

 गण्या- पण 'मन्या'आपण काय करू शकतो यार...यावर...

 मन्या- हो भाई...हे सुद्धा बरोबर आहे म्हणा....पण विचार ग्रुप वर आपले विचार तर मांडू शकतो ना....

गण्या- हो ते करू शकतो.... चल आता चहा पाज....'कल का चहा उधार है तुम्हारे उपर'

 मन्या- चल भावा....
==============================
IMAGE SOURCE--INTERNET

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************