माझा "🌱वि४🌿 ग्रुपसोबतचा आजवरचा प्रवास. भाग 3 ( तिसरा )


 तेजस महापुरे, कराड.
          माझा वि४ ग्रुप सोबतचा आजवरचा प्रवास हा अत्यंत चांगलाच राहिलेला आहे, मला वाटत जगाच्या पाठीवर इतका चांगला ग्रुप कोणता नसेल,सर्वप्रथम मी सौदागर जी यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला या ग्रुप मध्ये ऍड केले.                       आपला वि४ ग्रुप हा एक प्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम बनला आहे, इथे आपल्या सर्वांनाच मनमोकळे पणाने विचार मांडता येतात एवढं स्वातंत्र्य तर कोणत्या चॅनेल च्या संपादकाला पण नाही, दिवसेंदिवस अडमीन टीम ने आपल्या ग्रुप च्या कार्यपध्दतीमध्ये कमालीची सुधारणा आणली आहे त्या सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, मागे ४ वेळा माझे लेख हे ब्लॉग मध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते पण जेव्हा जेव्हा मी अडमीन टीम ला मेसेज केला त्यावेळी तात्काळ माझे लेख हे ब्लॉग मध्ये ऍड केले जात एवढी तत्परता दुसरीकडे क्वचितच आढळत असेल.          माझ्यामते विचार ग्रुप हे नवीन जागतिक आश्चर्य आहे,   कारण आपण सर्वजण फार शिस्तप्रिय झालो आहोत, नव्याने विचार करू लागलो आहोत, या ग्रुप वरील लेख वाचल्याने नक्कीच प्रत्येकाच्या विचाराच्या कक्षा या रुंदावल्या असतील.            या ग्रुप मुळे आणखी एक फायदा झाला म्हणजे इथे सर्व महाराष्ट्र एक झाला भले आपण एकमेकांना भेटलो नसलो तरीही आपल्या सर्वांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध हे नकळत निर्माण झालेच आहेत, आपल्या ग्रुपचा दिवाळी अंक येईल तसेच मला वाटते की आपण वि४ परिषद आयोजित करू, वि४ वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा सुद्धा घेऊ शकतो, वि४ नावाने मासिक देखील सुरू करता येईल यामुळे आपला ग्रुप हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचेल आणि यातून एक सामाजिक वि४ क्रांती होईल.                                मला वाटतंय नक्कीच आपण एका महान कार्याची सुरुवात केली आहे व ती अखंड सुरू राहावी हीच सदिच्छा.......
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीता देशमुख,वसमत.
           "इंटरनेटचे फायदे की तोटे" यावर जेव्हा मी विचार करते तेव्हा वैयक्तिक माझ्या जीवनात याचे फायदेच दिसतात. सोशल मिडियातून  अनेक चांगल्या माणसांचा परिचय मला झाला. आणि न पाहिलेली माणसेही अनुभवता आली. आपल्याच समूहातील अक्षय पतंगे सरांचा परिचय फेसबुकवरून झाला. त्यांच्या गावी मला व्याख्यानासाठी त्यांनी बोलावले होते. तिथे माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण आम्ही संपर्कात होतो. १३जानेवारीला त्यांनी मला आपल्या वि४ या समूहात घेतले. लिखाणाची आवड असल्याने समूहात आले. पण  समूहात पाहिले तर सर्व तरुण मंडळी! मला वाटले,या तरुणांमध्ये आपल्यासारख्या प्रौढ स्त्रीचे काय काम आहे?  मला सुरुवातीला थोडे बावरल्यासारखे झाले कारण आजकाल तरुण म्हटले की डोळ्यासमोर येतो कट्टर धर्मवाद! मला वाटले,इथेही तरुणमंडळीच आहे. असे जर असेल तर आपण फार काळ इथे टिकणार नाही. पण या समूहाची  विचारधारा पाहून मला वाटले की, आपण योग्य समूहात आलोत. खरेतर या समूहातील एकाही व्यक्तीला मी प्रत्यक्ष भेटलेले नाही.  परंतु या समूहाने मला इतकं केव्हा आपलसं केलं ते कळालेही नाही. आज मला वि४ हा समूह वाटत नाही,तो मला एक परिवार वाटतो. आणि पुन्हा एकदा जाणीव झाली की,समविचारी लोकांची अशीच शृंखला जुळत जाते. मी आपल्या परिवारात इतक्या उशीरा आले  आणि त्यात लवकरच ॲडमिनपदाची खुर्ची भेटली. हे जरा अनपेक्षितच होते. कितीही वरवर नाही म्हटलं,तरी खुर्चीचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. आणि ती तर मला विनासंघर्षाची मिळाली. पण ही जबाबदारी पेलण्यास माझ्यापेक्षा समर्थ सदस्य असताना मला ती जबाबदारी दिल्याने जरा अवघड वाटले. मला माहीत आहे,या परिवारात अनेकांचे फारमोठे योगदान आहे. मला सर्वात कौतुक याचे वाटते की,या तरुणांना विचार करण्यासाठी विषय किती चांगले सुचतात. किती ज्वलंत आणि क्रांतिकारक,प्रेरणादायी विषय सुचतात!  मला का तसे विषय सुचत नाहीत,म्हणून हेवाही वाटतो बर!यात शिरीषजी,अक्षयजी,प्रवीणजी,नरेशजी, अनीलजी,सीमालाजी,वैशालीजी,पवनजी,मयूरीजी,सौदागरजी,नरेशजी,करणजी हे सर्व मंडळी प्रत्यक्ष भेटली नसली  तरी  माझ्या कुटुंबातीलच वाटतात.  खरेतर मला दिलेली जबाबदारी मी फार धावतपळत सांभाळते आणि ती या परिवारातील सर्व मंडळी गोड मानून घेतात,हे काय कमी आहे का? पण कितीही मी बिझी असले तरी या परिवारासाठी आवर्जून वेळ द्यावाच वाटतो.
मी फार घाईत आणि प्रवासात हे लिहिले आहे. चूकभूल क्षमस्व:!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पवन खरात,अंबाजोगाई.
  माझा माझा "🌱वि४🌿ग्रुप "सोबतचा आजवरचा प्रवास खरचं आयुष्याला वेगळं वळण देणारा आहे.
घर , ऑफिस आणि संसार यातच संपणारा प्रत्येक दिवस मला रोज नवीन गोष्टी आणि निरनिराळ्या लेखकांच्या लेखांचे वाचन करायची जणू सवयच लागून गेली.

 नकळत कधी या विचार कुटुंबाचा मी जुना सदस्य झालो हे कळलेच नाही.
या कुटूंबाने मला नव्या उमीदेने जगायला शिकवले. ज्या दिवशी ऑफिस मध्ये जर खूप बोर झालं की व्हाट्सअप्प वर विचार ग्रुप वाचतो आणि पुन्हा फ्रेश माईंड ने कामाला लागतो.
    माझा कविता लेखनाचा छंद तर खरं तर सुटलाच होता पण या विचार कुटुंबामुळे कधीतरी पुन्हा कविता लिहायची इच्छा होते.

अबोल माझ्या या मनाला बोलकं केले ,
कोंडलेल्या भावनांना पुन्हा मोकळ आभाळ दिले,
थांबलेल्या विचारचक्राला पुन्हा गतिमान केले.
गंजलेल्या माझ्या लेखणीला पुन्हा धार दिली ।

विचार कुटूंबाचा मी मनापासून आभार मानतो आणि आपली साथ अशीच राहू द्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


महेश देशपांडे,ढोकी, जिल्हा धाराशिव.
           खरच खुप चांगला अनुभव आला...
तस पाहिलं तर शब्दबद्ध करणं म्हणजे अवघड आहे...
मला माझ्या सोबत असलेले सर्वच्या सर्व लोक अस म्हणतात की,
तुम्ही फार गप्प राहता, बोलत रहा, मन मोकळं करत रहा..
माणसाने मनात गोष्टी ठेवल्या तर त्याचा त्रास होतो...
पण मला त्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नव्हतं, पण विचार ग्रुप ने ते मला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे खुप आभारी राहीन...

विषय विविधांगी असतात, अगदी सर्व पैलूंना स्पर्श करणारे असतात...
आणि विशेष म्हणजे ९९.९९% नियमांचं पालन केले जाते, जे की भारतीयांकडून होत नाही सहसा..😊
त्यामुळे ऍडमिन टिम ला 👍👍..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


नरेश बदनाळे,जि.लातुर.
            🌱वि४🌿 सोबत चा प्रवास खरेतर शब्दात मांडणे म्हणजे शब्द सागरातल्या मौल्यवान मोत्यांची माळ तयार करणेच आहे...वि४ सोबत मी विचार च्या स्थापने नंतर ३ ते ४ महीन्यांनंतर सलग्न झालो. विचार हे विचारांचं मुक्त व्यासपीठ व निरंतर वैचारीक प्रवासाची आगीनगाडी आहे जिला समाज क्षेत्रातील विविध पैलुंचे डब्बे आणि विचारवंत रुपी प्रवासी आहेत.आणि ही आगीनगाडी लवकरच
समाजातील विविध कानाकोपऱ्यातुन प्रवास करत समाजातील विवीधांगी पैलुंचा अभ्यास करत तुमच्या आमच्या विचारांच्या सहयोगातुन समाजात वैचारिकतेच नविन चित्र निर्माण करेल हे मात्र नक्की आणि‌ तो दिवस दुर नाही...🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अर्चना खंदारे ,हिंगोली.
         खरे तर या ग्रुप सोबतचा माझा  प्रवास  हा फक्त  पूर्वीच्या  4-5  आठवड्य  पासून  चा आहे .मला या ग्रुप मधील  एका  व्यक्तीची  च ओळख  होती  ते म्हणजे प्रवीण  सर  ते काही काळ  माझे  सिनिअर  सुद्धा  होते ,ते मला  नेहमी  म्हणायचे  मॅडम  तुम्ही  काही लेख  लिहीत असता  का ? मला लिखाणाची  थोडी  आवड  तर होतीच  पण ती स्वतः  पुरतीच  मर्यादीत होती .कारण आपले विचार  मांडायला  असे कुठलेही  व्यासपीठ  नव्हते.माझा वाचन  कक्ष  हा कमी  आहे.
   पण सर नि  मला या ग्रुप विषयी  सांगितले सुरुवातीला  मी  या ग्रुप मधील लेखाचे  वाचनच  केले ,वाचना  वरून लक्षात  आले  कि  खरंच आज च्या तरुणांना  असा च व्यासपीठाची  गरज  आहे कि ज्यामध्ये  आज चा तरुण आपले विचार हे निर्भीड   पणे मांडू  शकतो .त्याच्या  विचारावर  इतर  लोकांस  विचार करण्यास  प्रवृत्त  करतो . इथे  एकमेकांना  न ओळखता  आपण सर्वजण त्याच्या  विचारावरून  त्यान्ना  ओळखतो .
खरंच मी या ग्रुप मधील सर्वांची  आभारी  आहे .🙏🙏कारण मी या ग्रुप परिवारातील  त्याचा  एक हिस्सा  आहे .
धन्यवाद  प्रवीण सर...🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रदिप इरकर,वसई,जि-पालघर.
        माझा वि४ सोबत च्या प्रवासाला तसे 6 महिने होऊन गेले असतील मलाही आठवत नाही.

*मला आवडलेले पुस्तक* ह्या पहिल्याच दिवशी सौदागर सरांनी लिहलेल्या *बनगरवाडी* या लेखावर मी अक्षरशः टाळ्याच वाजवायचो बाकी होतो इतका तो लेख आवडला होता.
त्यांच्यानंतर ग्रुपमधील राजश्री मॅडम यांचे लिखाण मला विशेषतः आवडत असे.
प्रवीण सरांचे प्रत्येक विषयांच्या लेखनामध्ये हास्यरसाचा😅 खूपच वापर केलेला असतो.
 ऍडमिन टीम मधील सर्व सदस्य खरच खूप मस्त लिहितात.

नवलेखक,नववाचक विशेषतः मराठी वाचन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करतोय व दुसरीकडे आपणच तिच्या संवर्धनासाठी काही करताना दिसून येत नाही.
वसई -मुंबई मध्ये तर सध्या अशी परिस्थिती आहे दोन मराठी माणसे परस्परांशी हिंदी मधून संवाद करताना दिसून येतात त्यात दोघांचीही हिंदी अतिशय उत्कृष्ट(?) असल्यामुळे समोरचा मराठीच आहे हे ध्यानात आल्यावर मराठी मधून बोलायला लागतात व त्यासोबत *मराठी माणूस राहिलायच कुठे?* असा संवाद सुरू होतो परंतु इथेच जर आपण स्वतःहून सुरुवात मराठी मधेच केली तर कुठे बिघडतेय? तेच समजत नाही मला.निदान समोरच परप्रांतीय असेल तर मराठीचे एक वाक्य तरी शिकेल तो.
2011 च्या जंगणानेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी च्या वर आहे आणि मराठी बोलणारे फक्त 9 कोटी? हे कसे काय?
कारण आपण मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यात कमी पडतोय.
प्रसार करणे म्हणजे आपले कामधंदे सोडून प्रसार करत फिरवा असा मी कदापि म्हणत नाही परंतु सार्वजनिक ठिकाणी,कस्टमर केअर सोबत,बँकेत,बस-रेल्वे मध्ये आणि इतर सर्व तत्सम ठिकाणी आपण  स्वतःहून प्रथम मराठीच भाषेत बोलले पाहिजे हाही मराठीच्या प्रसारचाच एक भाग आहे.

ह्याचा एकच उपाय आहे आज तरुणांमध्ये (जे स्वतःमध्ये सुद्धा हिंदीत संवाद साधंतात) मराठी भाषा भिनलेली असली पाहिजे ती भिनवण्याचे काम वि४ सारखे ग्रुप खूप चांगल्या प्रकारे करू शकतील असे मला वाटते.

लेखक होण्यापेक्षा मला वाचक होण्यात जास्त रस आहे.ह्या ग्रुप मधील अनुभवी लेखकांचे वि४ जेव्हा वाचतो तेव्हा ते वाचताना खूप प्रश्न मला कधी कधी पडतात
एखादा लेख वाचाताना कळते की अरेच्चा हा विचार तर मी केलाच नव्हता😱
संबंधित विषयाकडे ह्या नजरेनेसुद्धा पाहता येऊ शकते एकंदरीत अगदी खोलवर कसे जायचे हे येथील लेखकांच्या विचार करण्याची पद्धती वरून समजते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अमोल धावडे,अहमदनगर.

माझा वि४ ग्रुप सोबतचा प्रवास खूपच सुंदर आहे. प्रथम मी ग्रुपसोबत आल्यावर ग्रुपमध्ये काय सुरू आहे हे समजत नव्हत सगळेजण लिहियाचे व मी फक्त वाचन करायचो ग्रुपच्या नियमानुसार प्रत्येक आठवड्याला एक लेख लिहिणं बंधनकारक होत परंतु प्रथम मी कोणत्याही प्रकारचे लिखाण न केल्याने ग्रुपमधून मला काढण्यात आले अडमीन साहेबाना विनंती करून मला पुन्हा ऍड करण्यात आले व त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली जसा वेळ मिळेल तसा मी लेख लहीयचो.
विचार सोबतचा माजा प्रवास अत्यंत सुंदर आहे. ग्रुपच्या माध्यमातून खुप नविन शिकण्यास मिळाले. ग्रुपमधील प्रत्येकाचे वेगवेगळे विचार वाचण्यास मिळाले. या माध्यमातून लिखाण करण्यास सुरुवात झाली.
विचार ग्रुप अत्यंत सुंदर आहे येथे एकमेंकाच्या विचारांची देवाणघेवाण होते.
ग्रुपमधील सर्व सदस्यांचे आभार व विचार ग्रुप हा पुढे असाच सुरू राहील ही अपेक्षा।।।।।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अक्षय पतंगे,आ बाळापुर हिंगोली.
        सौदागर काळे, शिवाजी शेंडगे आणि मी बारामती आणि मुंबईमध्ये दोन वेळा भेटलो. विविध विषयांवर चांगली चर्चा घडून आली. त्यानंतर फोनवर महिन्यात कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन वेळा बोलणं व्हायचं. ही चर्चा दोघांनी वाचलेल्या किंवा दोघांपैकी एकाने वाचलेल्या एखाद्या पुस्तकावर, लेखावर असायची. एखाद्या जीवंत आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर असायची. तर कधी कधी बळीराजा पासुन तुकोबांच्या मार्गे गांधीजींपर्यंत यायची. पण यात लिखीत नोंद कुठेच नव्हती. एका दिवशी सौदागर काळे यांचा फोन आला व एक ग्रुप चालु करण्याविषयी ते मला विचारताचं मी होकार दिला. त्यानंतर त्यांनी वैशालीस विचारले, त्यांनीही होकार दिला अन विचारचा श्रीगणेशा झाला. Admin टीमसाठी नवीन सदस्यांची चर्चा सुरू झाली तेव्हा प्रा. संगीता देशमुख Madam यांना मी विनंती करताचं त्यांनी स्विकारली व सामाजिक क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत वेळ काढून दर्जेदार लिखाण व blog नियमीतपणे करतात. करण तर सगळ्या ग्रुपमधील वयाने सर्वांत लहान पण त्याचे blog पाहीले तर कामाची पद्धत किती दर्जेदार आहे, हे लक्षात येते.  त्याचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मला व सौदागर काळे यांना पहिले सहा महिने काही लोकांकडून खुप विरोध झाला. काही काळ blog ची लींक पण बंद केल्या गेली,फेसबुक पेज अडमीन ची अकाऊंट रिपोर्ट करण्यात आले.कारण होतं विचार ग्रुपचे विषय व अभयपणे व्यक्त होणारी तरूणाई.  पण आम्ही आता घेतलेले पाऊल मागे हटणारे नव्हतो. व पुन्हा जोमाने सुरूवात झाली. वैशाली, प्रविण, प्रा.मयुरी देवकर,पवन, श्री गोडबोले, शिरीष, नरेश, बालाजी ही सर्व टीम वेगवेगळ्या जबाबदार्या पार पाडते.

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Admin  टीम गेल्या वर्षभरात सातत्याने सक्रिय राहिली. मी मात्र सक्रिय राहतो हे नेहमी म्हणतो, पण शक्य होत नाही.
यादरम्यान नवीन माणसं जोडल्या गेली. नवीन दर्जेदार लेखन वाचण्यात आले. बघताबघता वर्षे कसे निघुन गेले कळलेच नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


वैशाली सावित्री गोरख,पंढरपूर,सोलापूर.
          खरं तर मला सुरुवात कुठून करावी ते कळत नाही कारण वि४ ग्रुप सोबतच्या प्रवासा आधी सौदागर नि माझ्या जडणघडणीचा प्रवास चालू झाला होता .अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मध्ये शिकून आम्ही येथे पर्यंत मजल मारली ह्याचच मला आश्चर्य वाटतं .मी नि सौदागर दहावी मध्ये एका शाळेत शिकलो , त्यावेळी मला माहित होतं सौदागर एक चांगला वक्ता आहे पण नंतर एक दिवशी लोकसत्ता वाचत होते त्यावेळेस सौदागर ब्लॉग बेंचर विजेता पाहून खूप आनंद झाला व एका उत्तम लेखकमित्र गवसला.मग नंतर हळू हळू संपर्कात ही आलो ते पण एक विचार परिवर्तन होतं असच मला वाटत.मला वाचन व लेखनाची आवड लहानपणा पासूनच होती एखादी कादंबरी वाचली की त्याच्यावर मला काय वाटतं हे लिहून ठेवणं ,होस्टेलला असताना रोजच्या रोज डायरी लिहणं हे सुरू होतचं व त्यातून पुढे जाऊन फेसबुकसारखं प्रभावी माध्यमाची माहिती झाली त्यावरती ही लेख लिहणे,एखाद्या घटनेविषयी स्वताच मत मांडणे हे चालू होतं . मग गेल्या वर्षी सौदागर ने 🌱वि४🌱 ग्रुपविषयी कल्पना मांडली व ती खूप प्रभावी वाटली पण मनात एक भीती ही होती ,एक जबाबदारी होती की बाकीचे जे ग्रुप असतात त्या पद्धतीने आपला ग्रुप होऊ नये. ग्रुप अत्यंत व्यवस्थित चालावा ह्यासाठी खूप कठोर भूमिका ही घ्याव्या लागल्या पण त्यावेळेस, पण त्या भूमिकांच आज सार्थक झालं असं वाटतंय .
त्याचपद्धतीने हा ग्रुप व्यवस्थित चालवण्याचं श्रेय पूर्ण अडमीन टीम ला जात कारण खूप वेळ काडून ग्रुपवरती नियंत्रण ठेवणं ,ब्लॉग तयार करणं ,विषय ठरवणं नि सगळ्यात महत्वाचं एकमेकांना समजावून घेणं हे आहे .आतापर्यंत सगळ्याच अडमीनने खूप छान ग्रुपला सांभाळून घेतलं आहे .
व ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांचं ही खूप अप्रूप वाटत मला कारण एकाहून एक चांगले लेखक वाचायला भेटले ,नि सगळेच अत्यंत काटेकोर पणे ग्रुपचे नियम पळताना दिसतात
पुढे जाऊन ही हा वि४ आपण मोठया प्रमाणात रुजवूयात ह्याच छोटंसं रोपटं आम्ही लावलं होत त्यांच झाडात रूपांतर होताना पाहायचं आहे ,ह्या वेळेस आपण e दिवाळी अंक काढतोय पुढे जाऊन ह्याच्यात खूप प्रगती होणार आहे हा विश्वास आहे व ती प्रगती आपल्या एकमेकांच्या साथीनंच होणार आहे .
विचार सोबतचा प्रवास अत्यंत छान राहिलेला आहे व पुढे ही असाच राहील .🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************