Youth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Youth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

युवक आणि विवेक


@vichar4
श्रद्धा काट्रे,सातारा.
भारत देश जगामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.त्या युवकांची आज काय अवस्था आहे , हे आपण जाणतोच. आजच्या युगात तरुणांचे दोन प्रकार दिसून येतात.एका बाजूला राष्ट्रप्रेम ,वाचक,विज्ञानवादी ,आपण समाजाचे काय तरी देणं लागतो हा विचार असणारे तर दुसऱ्या बाजूला व्यसन ,वासना, गुंडागिरी, मुलींची छेड काढणे यामध्ये भुरकटलेले दिसतात.यामध्ये दुसऱ्या बाजूच्या तरुणाईचे प्रमाण खूप वाढतच चाललेलं आहे.यावर मात करण्यासाठी आजच्या तरुणांनी विवेकशील राहिले पाहिजे. त्यांच्यातील विवेक जागा झाला पाहिजे.
          युवक हा देशाचा कणा असतो. जर कणाच बरबाद झाला तर देशाचा भविष्यकाळ खूप बिकट आहे.आपण जर इतिहास पहिला तर जगामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या ,जी काही परिवर्तने घडून आली ,तर ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच. मग आजच्या युवकाने आपण कुठे चाललो आहे,याची त्या तरुणाला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्यातील विवेक जागा केला पाहिजे. या 21व्या शतकात बदलत्या जगाचे साक्षीदार होत असताना आपण जातपात आणि द्वेषभाव विसर्जन करून देशकार्य केलं पाहिजे.

डॉ.कौस्तुभ कल्पना विलास,पुणे.
           खरे पहायचे झाल्यास विवेक हा बर्याच गोष्टींवर अवलंबून असतो. विवेक हा माणसाने घेतलेल्या निर्णयातून प्रतिबिंबीत होतो. अगदी लहानपणाच्या संस्कारांपासून ते उपजत ज्या नैसर्गिक प्रेरणा आणि प्रसंग समोर असतो त्यानुसार, तसेच माणूसाची ध्येय्य धोरणे आदी माणसाचे निर्णय (म्हणजेच विवेक) नियंत्रित करत असतात. माणसाला विवेकी तेव्हाच म्हणता येते जेव्हा त्याचे निर्णय हे कर्तव्य, सामाजिक भान, अपेक्षित क्रिया आदींवर योग्य ठरत जातात. एका क्रियेने माणूस विवेकी ठरत नाही. तो त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा भाग असतो. विवेक हा जोपासावा लागतो. बुद्धीप्रामाण्यवाद अंगी हळूहळू बाणवावा लागतो. स्वतःला विवेकी समजणारे बहुतेकवेळा अविवेकी कृत्ये करून जातात. ज्याचे निर्णय दूरगामी व अल्पगामी दोन्हीकडे निदान दुरगामी तरी स्वतःचा व समाजाचा फायदा करतात किंवा नुकसान करत नाहीत त्याच्या त्या निर्णयांना व त्याला विवेकी म्हणता येईल. माणसाचे मन चंचल असते व चंचल मनामागे धावणारे विवेकी निर्णय घेऊ शकत नाहीत. पण चंचल मन आणि सहृदयता यांत खूप फरक आहे हे मी सहेतूक नमूद करू इच्छितो. चंचल मन हे विषय व गरजा बदलत राहते व विचारांना पर्यायाने माणसाला त्यामागे पळवते. तर सहृदयता हा माणसाचा एक गुण असतो. ज्या कशानेही मन अशांत होते, उद्विग्न वा उत्तेजित होते (व्यसन, राग, कामवासना, दया, प्रेम, भीती, वा काहिही) ते पहिल्यांदा विवेकीपणावर आघात करते. तसेच जे जे तुमच्या तार्किकतेवर आघात करते मग ते काहिही धर्मांधता, आळस वा काहिही ते ते तुम्हाला विवेकीपणापासून दूर नेते. विवेकी असणे हि तारेवरची कसरत आहे. त्यात तारूण्य म्हणजे ऊर्जेचा अखंड प्रवाह, एक प्रकारचा उद्रेक असतो, हार्मोन्स आपल्या अत्युच्च पातळीवर असतात. म्हणूनच आयुष्यातली हिच वेळ जास्त धोकादायक असते अविवेकीपणे काहितरी हातून घडून आपले व इतरांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता जास्त असते. अगदी खून, बलात्कार वैगेरे खूप लांबची गोष्ट फक्त मजा म्हणून गाडीचा वेग अनियंत्रित वाढवून अपघातात जीव घालवणारे व घेणारे अविवेकी तरूण आपण पाहतोच. तारूण्य म्हणजे मस्तवाल अश्व धरला तर विवेक म्हणजे लगाम असते, जीचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजे. शेवटी जेवढी विवेकशीलता समाजात वाढेल तितका तो समाज परिपुर्ण विकासाकडे मार्गक्रमण करेल यात शंका नाही.

किरण बंडू पवार,औरंगाबाद.
        युवक आणि विवेक हा अत्यंत समर्पक विषयच म्हणावा लागेल. कारण युवक हा विवेक बुद्धी ठेवून चालणारा असावा सोबतच जोड अशी की, त्याची आदर्शसरणी कार्याबाबत ही स्वामी विवेकानंद यांच्यासारखी असावी. स्वामी विवेकानंदांनी जी युवकांची ताकद समाजासमोर उघड केली तिला खरच नवाजावचं लागेल. पण सध्याच्या घडीला महत्त्वाचं आहे ते, युवकांनी विवेकबुद्धी ठेवून आपापल्या ध्येयमार्गांवर चालत राहणं. पण सध्या देशात आपल्या युवकांची एवढी मुबलक क्षमता झाली आहे आणि नेमक्या ऐनवेळी देश विकसनशील वरून विकसीतमधे प्रवेशाच्या मार्गावर जाण्याऐवजी विकसनशीलच्याच यादीतून वगळण्यात आला. डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या मिशन 2020 ची तर तरूणांना भूल ते जाताच पडली, ह्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं? आमच्या तरूणाईला रोजगार हवाय म्हटलं तर सोशल मिडीयावर भारत-पाकीस्तान अशा मुद्द्यांवरून भरकटवलं जातं आणि आमची तरूणाई ही आज प्रलोभनांना बळी पडलेली आहे. त्यामुळे आजच्या युवकाला विवेकाची फार गरज आहे. सध्या एवढ्यावरच थांबतो.

चैतन्यकुमार देवकर,माळशिरस (सोलापूर)
           योग्य आणि अयोग्य काय हे माहिती असणं आणि आपला फायदा असो किवा नुकसान समाज देश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवता या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून एखादी निवड करणं म्हणजे विवेक .यौवन हा आयुष्याच्या प्रवासातील राजमार्ग असतो विवेकशील असण्याची या काळात खूप गरज असते.एकीकडे मोबाईल व इतर व्यसनांच्या नादी लागून युवकामधील विवेकाचा अंत होताना दिसत आहे .हाताला आणि बुध्दीला  काम नसल्यामुळे झटपट पैसा कमविणे अन् आभासी जगतात वावरणे यातून अस्वस्थता शिवाय घरच्या लोकांनी जाणीव करून दिल्यावर मग विवेक सोडून वाम मार्गाने पैसा कमविणे ,असंगाशी संग धरल्यामुळे खून ,चोऱ्या, बलात्कार असे प्रकार घडत आहेत. मोबाईल हे एक शस्त्र आहे त्याचा वापर आपण कोणत युद्ध लढण्यासाठी करतो हे महत्त्वाचं आहे.तर दुसरीकडे चला विवेकाचा आवाज बुलंद करू म्हणून धडपडणारे युवक देखील आहेत. वाट चुकलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींना आपण योग्य वाट दाखविली पाहिजे.मी माझ्या २ मित्रांना pubg पासून परावृत्त करू शकलो.अशाच छोट्या गोष्टींनी आपण इप्सिताकडे वाटचाल करून विवेकशील युवकामार्फत देश घडवू शकतो.आपण आता २०२०मध्ये जगत आहोत डॉ अब्दुल कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांना कुठपर्यंत पूर्ण करू शकलो?? किंवा आपण स्वतः पाहिलेल्या स्वप्नांना कुठपर्यंत पूर्ण करू शकलो याचा विचार व्हायला हवा. आणि युवकांनी विवेकाची कास धरून मार्गक्रमण करायला हवे.

….वि४ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

तरूणांना नेमका राग येतो तरी कशाचा?

🌱वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

तरूणांना नेमका राग येतो तरी कशाचा?
वाल्मीक फड ,नाशिक.   
सध्या अनेक तरूण आपला रस्ता भरकटताना दिसताय. कोण जाणे त्यांना एखादा वाईट मार्गाकडे घेऊन जणारा माणूस आपला मित्र वाटतो आणी जे आईवडील त्यांना सन्मार्ग दाखविण्याचे काम करतात ते मात्र शत्रु!काय म्हणावं या अशा तरूणांना?आणी अशाच प्रकारच्या गोष्टींना जसे वाईट वर्तन करणे,एखादी चांगली गोष्ट किंवा एखादा चांगला सल्ला दिला,समजा एखादे गरीब कुटूंब आपल्या मुलाच्या काही बिनकामाच्या गरजा जसे की,मोबाईल घेणे रिकामे मोटरसायकल घेऊन फिरणे अशा अनेक गोष्टींना नकार दिला की,आजच्या तरूणाला लगेच राग येतो.माझ्या मते जे तरूण आपली ऐैपत नसताना असे काही ऊद्योग करत बसतात की,ते त्यातून आयुष्यभर सावरत नाही.आणि यावर जर कोणी काही चांगलं सांगायला गेलं की त्यांना लगेच राग येतो.काही वेळेस एखादा शिक्षणक्षेत्रात पारंगत असणारा पालक तरूणाला जर म्हणाला की, तु ह्या क्षेत्रात करीयर कर कींवा तुला हे केले तर तुला चांगले राहील की लगेच त्याला राग येतो.ह्यांचा राग हा काही वेळेस इतका भयंकर असतो की, ते स्वताला संपवायला मागे पुढे पहात नाही काय करणार अशा ह्या राग येण्याला?

हरीश पोटे,पुणे.
मी आजचा तरूण राग येतोय मला, खुप राग येतोय...
राग येतोय मला या गढूळ झालेल्या मानसिकतेचा आणि ढवळून निघालेल्या वातावरणाचा...
राग येतोय मला माझ्या बहीनींवर झालेल्या, होत असलेल्या बलात्काराचा आणि त्यांचा आवाज दाबून मारणाऱ्या गिधाडांचा...
राग येतोय मला माझचं घर जातीच्या नावावर फोडणाऱ्यांचा आणि धर्माच्या नावावर जाळनाऱ्यांचा...
राग येतोय मला घुबडासारख्या डोळ्यांनी गर्दी करणाऱ्यांचा आणि किळसवाणी होत चाललेल्या माणुसकीचा...
राग येतोय मला पुरूषसत्तकपणा मिरवणऱ्या माजूर्ड्यां जमातीचा आणि जगदंबेलाही गाभाऱ्यात डांबणाऱ्यांचा...
राग येतोय मला पांडूरंगाच्या नावावर समाज नासवणाऱ्या दलालांचा आणि विवेक गहान ठेवून लाळ चाटणाऱ्या भक्ताचा...
राग येतोय मला जिवंत सरण बघणाऱ्या डोळ्यांचा आणि काळीज जळत असलं तरी पुढं न सरसावणाऱ्या हाताचा...


सिताराम पवार,पंढरपूर.
आज आपण सहज बोलताना म्हणतो की ,आजची पिढी खूपच चंचल निघाली आहे .खूप हुशार पण आहेत. सगळ्या गोष्टींचा पुरेपुर माहिती साठा त्यांच्याकडे आहे .पण बारीक लक्ष दिले तर अस दिसून येत आजच्या तरुण पिढीला राग खूप येतोय. समोरच्या व्यक्तीचे मत शांतपणे ऐकून घेण्याची मानसिकताच राहिली नाही. सहनशीलते बद्दल जर आपण जास्त बोललो तर लगेच सांगणाऱ्या ला वेड्यात काढतोय आजचा तरुण।
"सोडी रे "मी"पण तोचि सुखी।सुखी ज्याने व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी"  यानुसार आजच्या पिढीला"मी" पणा चा खूपच अभिमान वाटतो आहे .आणि हेंचमुख्य कारण आहे वाढत्या रागाचा.
वाढती बेरोजगारी,चुकिची सरकारी धोरणे ,वाढता भेदभाव याबद्दल राग नक्कीच यावा पण ""राग अन भिक माग" एवढा राग काय कामाचा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शीतल शिंदे.दहिवडी,सातारा.
आजच्या तरुणांना लहान सहाण गोष्टींचा राग येतोय .कर्तुत्व मात्र शून्य आणी रुबाब मात्र मोठा .
तेव्हा राग येण्यापूर्वी प्रत्येकाने हा विचार करणे गरजेचे आहे की आपण त्या पातळीचे आहोत काय ? नाहीतर राग येण्याचा आपला हक्कच नाही .आपण  आधी ज्या गोष्टीचा राग येतोय त्या गोष्टीच्या लायक बनने गरजेचे आहे मगच राग येवू देणे .
पालकांनी नकार दिला आला राग
मुलीने नकार दिला आला राग !
परीक्षा फेल झाला आला राग !
नोकर लागेना आला राग !
शेजारी पुढे निघाला आला राग !
शेती पिकेना आला राग !

अरे कर्तुत्ववान बना !
जबाबदाऱ्या घायला शिका नाही येणार राग !
आपल्यापेक्षा कमी -असलेले -  आर्थिकदृष्ट्या , शारीरिक द्रुष्ट्या, मानसिकदृष्ट्या मागासलेले पहा ! पहा त्यांची परिस्थिती आणी मग येवूदया राग !
विचारांची कमतरता असेल,  सण्कोचीत व्रुत्ती असेल रागच येणार की .
जेव्हा राग येतो तेव्हा स्वतःतील त्रुटी पहा  !
मग नाही राग येणार !

⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯
     
क्लिक करा..वि४ दिवाळी अंक २०१८





⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭

राग यायचाच असेल तर येवूद्या भ्रस्ठाचाराचा , बेइमाणीचा , जातीयवादयाचा ,  आतंकवादाचा, लूटमारीचा , चुकीच्या न्याय पद्धतीचा , देशातील राजकारणाचा , शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा , दुष्काळाचा आणी करा काहीतरी त्यासाठीच .
लागू दया तुमचा राग सत्कारर्मी .
घर सोडून जावून , आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतात .
भुषण निलगिरवार पहापळ,यवतमाळ.
 माझा पहिलाच लेख विषय पण तसाच मिळाला मी पण तारूण्य वयात आणि मला राग येणे साहजिकच आहे,  लहान पणा पासुन ऐकत आलो आहे कि राग येणे हा माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे पण नेमका राग कशाचा यावा हे आजचा तरूण विसरत चालला आहे शिवाजी महाराजांना राग येत असे जुलमी राजवटीमुले लोकांना होत असलेल्या त्रासाचा जोतिबा फुले राग येत असे देशात अशिक्षीत असलेल्या समाजाला शिक्षित करण्यसाठी आणि आज तरूणांना राग येतो येतो बांबानी मोबाईल घेऊन दिला नाही बाबांनी गाडी दिली नाही यासाठी या धकाधकि जीवनात कित्येक आईवडीलांना आज आपल्या मुलांना वेळ द्यायला पण मिळत नाही अशातच लहानपणीच शैक्षणिक जीवनाला सुरवात इतक्या इवल्याशा मेंदुवर धावत्या रेस मध्ये शामिल केल जात आणि आजकाल आईवडिल पण पैशांच्या भरवश्यावर आपल्या मुलाबाळांची मने जिंकण्याची प्रयत्न करतात । आज हट्ट पुरवतात मग एखादा हट्ट पुरवण्यात असफल ठरले मुलाच्या रोषाला सामोरे जावे लागते , इथे निर्माण झालेल्या रोषामुले कधिकधि मुलांना मार पण मिळतो   पण नेमकी ही चिडचिड ( राग) कुठून तयार झाला असेल ?? ते जिद्द नाही मला हे पाहीजेलच
हि जिद्द शिवाजी महाराजांच्या काळात पण होती पण ते जिद्द अनायाविरूद्ध लढायची आणि आता ति जिद्द झाली आहे तु किती पँक मारू शकते *व्यसनासाठी* *स्वार्थासाठी* कारण माणसाला  र्सव काही चटकन हवय रिमोटवर चँनल बदलवल्या सारखे ।
 माझ्या या लेखातून हेच सांगायचे कि राग येणे स्वाभाविक आहे पण राग कशाचा येतोय हे महत्वाचे आहे.  राग यायला हवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी , राग यायला स्वताची पिळवणूक थांबवण्यासाठी राग यायला हवा देशाच्या विकासासाठी बाध्य येत असलेल्या प्रत्तेक गोष्टीसाठी लढण्यासाठी. व्यसनाच्या आहारी जाऊन मस्तकात आणि वाणीवर जो राग ताताथैया करेल त्याला देशाच्या उन्नतीमध्ये कवडीची पण किंमत असणार नाही .

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.)



सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************