लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-1)

 🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-1)
              Source :Internet

मयुरी देवकर,सोलापूर:
आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकजण आपल्या स्वतः ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे .अनुकूलन क्षमता साधण्यासाठी , सध्याच्या वातावरणामध्ये , वाढत चाललेल्या चंगळवादामध्ये माणूस आकंठ बुडुन चालला आहे . स्वतःवरील , समाजातील अन्याय तो सहन करत नाही व आज तो स्वतःच दु : ख , सुख ही वाटत बसत नाही .आजचा हा माणूस आउटडेटेडच झालाय कारण त्याला जाणीव आहे ती फक्त हक्कांची च ...आणि मग स्वतः च्या कर्तव्याच काय ? जाणिवाची चाड आणि संवेदनहीनतेची चीड आज आम्हांला कुठेच दिसत नाही .आणि म्हणूनच वाहतुकीच्या नियमांकडे आज आम्ही किती गाम्भिर्याने पाहतोय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .वर्तमानपत्र वाचत असताना रोजच कुठेतरी अपघात झाल्याची बातमी आपल्याला वाचायला मिळते .अश्याप्रकारे अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे आणि याला आपण स्वतःच जबाबदार आहोत .आपली कर्तव्ये आज आपण पूर्ण विसरून चाललो आहोत आणि यामध्ये आपल्या लाखमोलाच्या जीवाची सुद्धा आपण पर्वा करत नाहीये ....काय म्हणावे या वेडेपणाला ? ? ?
         
          Source :Internet
सारं काही बेताल असताना आम्ही कस म्हणतोय आमचं कस झकास चाललंय ...रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींनी डाव्या बाजूने जावे की उजव्या हेसुद्धा या उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या लोकांनासुद्धा समजत नाही हीच खेदाची गोष्ट आहे .वाहन चालवत असताना प्रत्येक वाहनचालकाने जर वाहतूकीचे नियम पाळले तर खरंच सिग्नल तोडण्यासारख्या चुका घडतील का ? आज हजारो लोक वाहन चालवत असताना मोबाईल चा वापर करून लक्ष विचलित झाल्यामुळे म्रुत्यूमुखी पडतात .त्याचप्रमाणे वाहनांत बसल्यावर सीटबेल्ट न घातल्यामुळेसुद्धा म्रुत्यूचे प्रमाण वाढले आहे .आणि यामुळेच लाखमोलाचा जीव बाल्यावस्थेतच किंवा ऐन तारुण्यात गमवावा लागत आहे .आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा या वाहतुकीच्या नियमांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला हवी आणि एवड्यारच न थांबता त्याची अंमलबजावनी करायला हवी आणि त्यासाठी कायदे करण्याऐवजी त्या नियमांकडे पाहण्याची आपली मानसिकताच बदलायला हवी तरच हा लाखमोलाचा जीव जतन होईल ......

सागर राडे,सांगली:
अधूनमधून whatsapp, फेसबुक वरून एक विनोद फिरत असतो. "एकदा एक अमेरिकन व्यक्ती भारतीय व्यक्तीला म्हणते आमच्याकडे रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवतात, तुमच्याकडे काय पद्धत आहे? त्यावर भारतीय व्यक्ती उत्तर देते आमच्याकडे तसं काही नसतं. समोरचा कुठल्या बाजूने येतोय त्यावर आमची बाजू ठरते.." यातला विनोदाचा भाग सोडला तरी यातलं कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कारण आपल्याकडे वाहतुकीचे नियम कधीच गांभीर्याने घेत नाहीत.
      Source :Internet
वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नको असं कुणीही कितीही सांगितलं तरी मोबाईलवर बोलायचा मोह आपण टाळत नाही. शक्य तितकी मान तिरकी करून बोलायची आपली कसरत सुरूच असते. सिग्नलवरदेखील बऱ्याचदा अशी स्थिती असते की आपण सिग्नलसाठी थांबलेलो असतो पण शेवटच्या 8-10 सेकंदात आपल्याला घाई होते आणि सिग्नल सुटायची वाट न बघताच आपण पुढे जातो. हीच 8-10 सेकंद धोकादायक ठरू शकतात याची जाणीवही आपल्याला असते पण आपलं सळसळणारं रक्त आपल्याला तिथे थांबू देत नाही. वाहनांचा वेग पाहिल्यानंतर तर "अति घाई, संकटात नेई" हा फलक रस्त्याची शोभा वाढवण्यासाठीच असतो की काय असा प्रश्न कधी कधी पडतो. मद्यपान करून बेफामपणे गाडी चालवणारे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. असाच कधीतरी आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा फटका बसतो तेव्हा मात्र वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळायला पाहिजेत असा साक्षात्कार होतो. पण "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ही म्हण बरेच चालक स्वतःला कधीच लागू करत नाहीत.
या सर्व गोष्टींसाठी प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून आपल्याकडे 'रस्ते सुरक्षा सप्ताह'सारखे उपक्रम राबवले जातात. पण तरीही नियम हे मोडण्यासाठीच असतात हा विचार ज्यांच्या मनात कायमचा ठसलेला आहे त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कायदे आहेत. शिक्षेच्या तरतुदी आहेत पण सोबतच 5-50 रुपयांसाठी त्यांच्या चुकांवर पांघरून घालणारेदेखील आहेत. तरीही एखाद्यावर गुन्हा दाखल झालाच तरी त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी कायद्यातील पळवाटा आहेतच. त्यामुळेच त्यासंबंधी कायद्याचा म्हणावा तितका धाक नाहीच.
       Source :Internet
राज इनामदार,पंढरपूर:
एकदा ऐका जंगलातुन गुरु आणी त्यांचे शिष्य चालले होते .शिष्यानी आपल्या गुरूंना एक प्रश्न विचारला की,  हे गूरूवर्य जीवनातील सर्वात मोठे दुःख कुठले .? ..गुरूंनी शिष्यानकडे पाहून स्मिथ हास्य केले .व म्हणाले जगात सर्वात मोठे तीन दुःख आहेत .व ते पुढील प्रमाणे आहेत .

1) *म्हाताऱ्या आई वडिलांनचा आधार असणारा , घरातील कमवता असा  मुलगा त्यांच्या डोळ्यादेखत मरने.*

2) *मुल लहान असताना त्यांच्या वडिलांनच निधन होने .व मुलांच्या डोक्यावरच पित्याच छत्र हरपने*

3) *एखादया विवाहीतेच्या पतीचे  ऐन तारुण्यात निधन होने.*

हे जगातील सर्वात मोठे तीन दुःख आहेत असे गुरुंनी सांगितले ...
   जरा विचार करा मित्रहो ज्यावेळी एकादी व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळत नाही आणी बेभान होवून गाडी चालवत असतांना त्याचा अपघात झाला तर ? ? ? ? आणी त्यात त्याचा म्रुत्यू झाला तर ?????
मित्रहो वरील गुरुंनी सांगितलेले तिन्ही दुःख त्याच्या घरच्या लोकांवर कोसळणार आहेत .
ह्यापेक्षा मोठ दुसर दुर्दैव काय मग?
मित्रहो गेल्या दोन महिन्यामधील माझ्या समोरील दोन अपघातात तर मोटर सायकल वरील व्यक्तीच्या  अंगाला डोक्यापासून खाली साध खरचटल सुधा नव्हते. पण  त्यांचा म्रुत्यु झाला कारण त्यांच डोक डाम्बरी रस्त्यावर खरचटत गेल व मेंदूला मार लागला व जागीच म्रुत्यू झाला. पण त्याच वेळी ह्या लोकांनी हेल्मेट डोक्यावर घालून प्रवास केला असतां तर ही मेलेली माणसे आज आपल्या परिवारा सोबत दिसली असती.
शासनाने हेल्मेट सक्ती केली पण आपण हेल्मेटच्या ......घो म्हणतो व गाडीला kick मारून सुसाट जातो .
दुसरा अपघात तर इतका भयानक होता की बास ...कानात हेडफोन लावून मस्त गाणी ऐकत चाललेला तरुण गाडीचे दोनी आरसे काढलेले .गाडी 80-90 च्या स्पीडने जात असताना. ह्या तरुणाने वळताना side indicator लावला नाही ..अथवा हात देखील काढला नाही ...आरसे नसल्याने त्याला पाठीमाघुन येणारी ट्रक दिसली नाही .......गाडी सकट तो तरुण ट्रक खाली सापडून अक्षरशा त्याचा चिखल झाला. मित्रहो त्या तरुणाने side indicator लावला असतां .गाडीचे वेग मर्यादित ठेवला असतां .गाडीचे आरसे काढले नसते तर आज तो आपल्याला जिवंत दिसला असतां .
मित्रहो सांगायच एवढच आहे वाहतुकीचे नियम हे आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत .वाहतुकीचे नियम पाळू ...अपघातात टाळू
हे जीवन नाही पुन्हा पुन्हा

           Source :Internet
करण बायस ,हिंगोली:
आपण  विचार केला की खरच आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन करतो का ? जास्तीत जास्त उत्तर नाही असणार.
आपल्या भारतात जास्तीत जास्त खेडी गाव ही महामार्गावर वसलेली आहेत याचा त्या गावातील लोकांनी विचार केला का की आपल्या सुरक्षेसाठी आपण त्या मार्गाच्या थोडं लांब राहील पाहिजे पण नाही लोक काय करतील अतिक्रमण का तर येणाऱ्या जाणार्यासाठी हॉटेल्स उघडतील किंवा रोड च्या बाजूला फळांचे, चॅट चे गाडे लावतील.तस तर सरकार यांच्या विरुद्ध कारवाई करत नाही आणि केली तर लोक त्याचा विरोध करतात.
एखादया शहरात गेलो तर अस आढळून येते की तिथले signal चालू नसतात आणि असले तरी त्याला कोणी follow करत नाही.आधी बघतील तिथं traffic पोलीस आहे का नसला तर ते पळवतील म्हणजे ज्यांचा सिग्नल हिरवा आहे त्यांना त्रास.आणि एवढाच नाही traffic पोलिसांना पण काळजी नसते त्यांना फक्त काढायचे असतात.राहिला प्रश्न traffic signal चा ते बंद असतात मला तर वाटते की तिथं light bill वाचवून भ्रष्टाचार होत असेल.
या गोष्टी साठी सरकारला जिमेदार ठरवता येणार नाही कारण आपण पण तेवढेच  जिम्मेदार आहोत जेवढं की traffic पोलीस department.
आपलं पण हे काम आहे की आपण स्वतःच्या जीवाची काळजी घेणे त्यासाठी आपण हेल्मेट वापरणे,वेग नियंत्रणात ठेवणे,signal follow करणे.
आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेत नाही पण याचा फायदा ambulance वाल्या पासून ते शेवटी जे जे पेशंट ला ट्रीट करतील त्यांना होतो.
त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे कारण आपण आपल्या घरच्यांसाठी खूप महत्वाचे आहोत कमीत कमी त्यांच्यासाठी एवढं तर करणं गरजेचं आहे.आणि आजकाल गाडीवर असताना मोबाईल चा वापर एक वाढला आहे मग ते किती पण traffic मध्ये आपण असलो तरी आपण कोणाचं कॉल आलं की उचलतो किंवा मग कानात headphone टाकतो हे चुकीचं आहे कारण त्यावेळी आपलं नियंत्रण हे गाडी चालवनायवर नसते.
So be carefull while driving ,Wear helmet and follow Traffic rules.


         Source :Internet
ज्ञानेश्वर टिंगरे ,उस्मानाबाद:
एक म्हण आहे, ' पुढच्याच ठेस मागचा शहाणा ' पण आज रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताच्या बाबतीत हि म्हण विडंबन म्हणून अशी होईल..मूलग्यास ठेच बाप शहाणा..
इथं मुलगा व बाप हे मी प्रतीक म्हणून वापरले आहे..
रस्ते, सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलीस, राजकीय हस्तक्षेप, यांना जरा बाजुला ठेउ.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपली काही भूमिका आहे हे बरेच जण विसरले आहेत..घरातील एखादी व्यक्ति अपघातात मृत्यु पावल्याशिवाय कांहीचे डोकं ठिकाणावर येतच नाही अशी बरीच कुटुंब समाजात आहेत.माणूस शिक्षण घेऊन आडानी व्यक्तीसारखे वागतो , डोळ्यासमक्ष कितीतरी अपघात त्याने जवळून अनुभवलेले असतात तरीसुद्धा एखाद्या अंध माणसासारखी त्याची पळापळ चालूच राहते..
कायद्याचे राज्य अपेक्षीनारे कितीजण कायदा पाळतात.( फक्त वाहतूक नियमाबद्दल बोलतोय ).
वाहतूक नियमाचे जरा बाजूला ठेवा..आजकाल काही लोकाना कशाचेच भान राहिले नाही, स्पीड मध्ये गाडी चालवणे, स्टाइल मध्ये वाहतूक नियम मोडने, स्वतःच्या प्रवासात दुसऱ्याचा किंचीतदेखील विचार न करने हे आजकाल एक फॅड आले आहे असे खेदाने म्हणावे लागते.
आपल्यावर कोणाची तरी जबाबदारी आहे याचे भान आज तो विसरत चालला आहे. एखाद्या कुटुंबातील चालती बोलती व्यक्ति अचानक जर या जगातून निघून गेली तर त्या कुटुंबावर काय आभाळ कोसळते हे मी अगदी जवळून पाहिलं आहे.
इथं एक सांगावसं वाटतं कि पालकांनी आपल्या कमी वयाच्या पाल्याना हातांत गाडी देण्याचे लाड करू नयेत, योग्य वयात समज आल्यानंतर सर्व गोष्टींची जाणीव करून देऊन त्याला परवानगी देण्यास हरकत नाही.
कानात हेडफोन घालून गाणी ऐकत किंवा फोन वर बोलत ड्राइविंग करनाराना एकच सांगावसं वाटतं ती गाणी ऐकण्याच्या नादात तुम्हांला पाणी पाजण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्या अन फोन वर बोलत बोलत ड्राइव करतांना तुमचा कॉल डाइरेक्ट यमराजाशी सुद्धा कनेक्ट होऊ शकतो याचं भान राहू द्या..

समीर सरागे,यवतमाळ:
वाहतुक हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेतील अभिवज्य घटक असतो. वाहतुकी शिवाय देशाच्या प्रगत अर्थव्यवस्थेची कल्पना करुच शकत नाही. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुरळीत  चालण्या करीता जशी चलन रूपी साधनांची आवश्यकता असते अगदी तसेच व्यापार ,उद्योग व परिवहन सेवा सुरळीत  चालण्या करिता  रस्ते  व वाहनांची आवश्यकता असते.  रस्ते या वरील तिन्ही प्रणालीचा पाया आहे. देशाच्या ऐकून वाहतुकीचा भार हा रस्ते वाहतुकीवर असतो. आणि  देशाच्या अर्थ व्यवस्थेत रस्ते हे रक्तवाहीन्याचे काम करतात. रसत्यांचे जाळे एकमेकांशी जोडले गेले की, वाहना द्वारे त्यावरून वाहतूक सुरु केल्या जाते. परंतु हल्ली रस्ते अपघातांचे प्रमाण  गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले आहे.  याचा अर्थ वाहनांची झपाट्याने वाढलेली संख्या त्यातही  खाजगी वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या अलीकडे आपल्याला दिसुन येत आहे.

             Source :Internet
देशाची लोकसंख्या जशजशी वाढली त्याच प्रमाणे लोकांच्या गरजा मध्ये देखील वाढ होत आहेत. सार्वजनिक  परिवहन सेवा देखील अपुरी पड़त असल्यामुळे लोकांचा खाजगी वाहन खरेदी कड़े कल दिवसेंदिवस वाढत  चालला आहे. परिणामी रसत्यावर वाहनांच्या सर्वत्र रांगाच्या रांगा असलेल्या आपल्याला दिसुन येईल यामध्ये अपघात होणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या सर्वात जास्त आहे. कारण असे की, आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे वेळ नसतो आणि त्यांना वाहतुकीचे लादलेले नियम मान्य नसतात (किंवा कांटाळा येतो)आणि त्यांना त्यांच्या जीवा पेक्षा एखादे काम महत्वाचे असते.

घाई करण्याच्या नादात वाहनाला over take करते वेळी अपघात संभवतो तसेच कोण कोणत्या वाहनाला tail Light नसने , Head light नसने , Indicater , wiper नसने किंवा यापैकी काही नादुरुस्त असणे हे देखील अपघातांचे मुख्य कारण आहे. म्हणजे वाहतूक नियमां मध्ये वरील बाबीवर प्रामुख्याने भर दिल्या गेला आहे. जर महा मार्गावर प्रवास करताना वाहतूक पोलिसांना एखाद्या वाहनांवर Head light , tail light , indicater नसलेला आढळल्यास तेही रात्रीच्य वेळी तर ते आपल्याला  भारी चालान तर करेलच सोबतच तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतिल की, तुम्ही सुजान नागरिक असून  अश्या प्रकारचा बेजबाबदार पणा कसा क़ाय  करु शकता? आणि तुमचा वाहन परवाना रद्द करण्याची तंबी देखील देईल.
आणि ते एका दृष्टीने योग्यच आहे. कारण जो कोणी नियम कायदे पाळणार नाही त्याला शासन वहायलाच हवे. अलीकडे प्रकाशित झालेल्या एका आकडेवारी नुसार भारतात सन 2016 या वर्षात 1 लाख 51 हजार लोंकाना आपले प्राण गमवावे लागले. तसेच 18 ते 45 या वयोगटातील अपघातात मृत पावलेल्या बाळीची संख्या तब्बल 60% इतकी आहे. यावरून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन होते की नाही व त्याला वाहन चालक  गांभीर्याने घेतात की, नाही याची प्रचिती आपल्याला येईल. वाढती वाहनांची संख्या , अपूरे रस्ते, वाहतुकीची भीषण कोंडी लक्षात घेता सरकारने रस्ते चौपदरी करणाचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. सोबतच शहरात रसत्याच्या दुतर्फ़ा वाढलेले अतिक्रमण हे देखील अपघातांचे मुख्य कारण होऊन बसले आहे.

महानगरा मध्ये हेलमेट सख्ती करण्यात आलेली आहे. परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतानी दिसत नाही. मग अशा वेळी वाहतूक पोलिसांना हेलमेट नसणाऱ्यांना चालान करणे भाग पडले. यावरही देखील काही जनांची ओरड सुरु झाली. परंतु बाबानो कोणत्याही सरकावर  त्यांच्या देशाच्या नागरिकांची  व त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते आणि वाहनांची अवाढव्य वाढत असलेली संख्या त्यात अपघातांचे वाढलेले प्रमाण ,म्हणून  सरकारला काही उपाययोजना अमलात आनने गरजेचे असते. म्हणून हेलमेट सख्ती करण्यात आली.

        Source :Internet
रस्ता सुरक्षा पंधरवाड़ा दरवर्षी  पाळण्यात येतो. राज्य शासनाच्या परिवहन विभागा कडून अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात अपघात कोणत्या कारणा मुळे होतात , अपघात टाळण्या करिता क़ाय क़ाय केले पाहीजे. यावर अधिकारी मंडळी  मार्गदर्शनपर भाषणे देतात.  तरीही वाहन चालका मध्ये या बाबत पाहिजे तशी जागरूकता निर्माण झालेली नाही. आणि अपघातांची संख्या देखील कमी झालेली नाही.वाहनांची इतकी प्रचंड संख्या की , रस्ते देखील कमी पड़त आहे.परिणामी अपघातात वाढ. भारत देशात दरवर्षी traffic मध्ये आपन जवळ जवळ 8 हजार कोटी रूपयाचे इंधन जाळतो,   अपघात आणि इंधनाचा प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर खाजगी वाहनांची संख्या कमी करून  सार्वजनिक वाहनांची संख्या वाढविने आज गरजेचे आहे.आणि सार्वजनिक वाहनांचाच उपयोग नागरीका कडून जास्तीत जास्त व्हायला हवा या करिता उपाय योजना करण्यात याव्यात.  तसेही खाजगी वाहन आज परवडन्या सारखे नाही. इंधनाचे वाढते दर, अरुंद रस्ते, रेंगाळंनार traffic ,RTO विभागाचा ससेमीरा ई.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे पालकने आपल्या पल्याला दुचाकी एवजी सार्वजनिक वाहनांतुन प्रवास करण्याची सवय लावावी अथवा सायकल चा वापर करण्यास सांगावे. यामुळे देखील अपघातात घट होईल कारण या अपघातात युवा जास्त प्राण गमावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चीन सारख्या देशात वाहतुकी संदर्भात कड़क कायदे आहेत. तीथे मुलाचे 18 वर्षे वय होई पर्यंत  वाहन न चालवन्यचे नियम आहेत.
म्हणून आपल्या कड़े वहतुकीचे नियम  अधिक कड़क करणे गरजेचे आहे.

कायदे आणि नियमां पेक्षा नागरिकांनी  आपल्या अमूल्य प्राणाचे आणि  वाहतुकीचे महत्व जाणून  स्वतः सुजान व जागरूक नागरिक असल्याचा परिचय द्यावा आणि अपघात टाळावा  
कारण जीवा पेक्षा वाहन महत्वाचे नाही.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************