🌱 वि४🌿या व्हॉटसअप ग्रुप वरून
Source :Internet
पुरोगामी म्हणजे नेमक काय रं भाऊ ?
(भाग-2)
(भाग-2)
क्षितिज गिरी ,सातारा:
प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन विचारसरणी आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात.प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांचा आपल्या संस्कृतीवार धर्मावर रूढी व परंपरेवर खुप विश्वास असतो त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात अगदी मरायला पण आणि मारायला पण ....
कुठली गोष्ट बरोबर कोणती चूक हे त्याचे अगूदरच ठरलेले असते फक्त ती कशी बरोबर किंवा ती कशी चुक हे पटूऊन देण्यासाठी ते आपली बुद्धी खुप वापरतात त्यामुळे हे हुशार नसतात आसे आजिबात म्हणता येणार नाही ।
पुरोगामी मात्र कोणतीही गोष्ट पडताळून पाहतात आणि पटली तरच स्वीकारतात।
सामान्य माणूस एखादी गोष्ट चुकीची आहे हे समजले त्याविरुद्द बंड करत नाही कारण ते करण्याचे धाडस फक्त पुरोगामीच करु शकतात अगदी समाजाच्या विरोधात जाऊन पण हे विरोध करतात आणि आपल्या विचारावर शेवट पर्यंत ठाम असतात त्याच्या मुळे तर समाजाव्यवस्थे मध्ये अमूळाग्रह बदल होतात आणि आपण म्हणतो जग बदललंय
मी लहान असताना आमच्या गावात भविष्य सांगणार आला होता त्याने माझे खुप चांगले भविष्य पण सांगितले आणि पुढे तुझ्या वाईटावर आहे आणि त्याला बाजूला केलेस कि झाले म्हणून माझ्याकडून खुप पैसे उकलले होते घरी कुणीच नसल्यामुळे त्याला पण आयती संधि मी मात्र आता माझी खुप प्रगती होणार या विचारत खुप खुश होतो।
आता मात्र जेव्हा असे कुणी मला माझे भविष्य सांगते किंवा गावात पोतराज येतो तेव्हा मनात एकच विचार येतो केव्हा सुधारणार या जाती कधी होणार यांचाही विकास यासाठीच झाला होता का भारत स्वतंत्र्यं।हा बदल फक्त पुरोगामी
विचारसरणीत वावरत असल्यामुळेच झाला।
पुरोगामी नेहमी स्वताचा विचार कमी आणि समाजचा विचार जास्त करतो
पुरोगामी हि एक मानसिकता किंवा विचार करण्याची पद्दत आहे खुप अभ्यास केला शिकला डिग्री मिळवली म्हणजे तो पुरोगामी झाला असे आजिबात नाही आडाणी माणसेही पुरोगामी असतात । संत गाडगेबाबांचेच उदाहरण घ्याना ।
प्रतिगामी नेहमी धर्म जात पंथ लिंग भाषा प्रांत यावर भर देतात तर पुरोगामी कायम गरिबी बेरोजगारी महागाई तसेच माणसाला रोज भेडसावणाऱ्या समस्या वर भर देतात ।
लोकमान्य टिळक प्रतिगामी विचारांचे होते तर नरेंद्र दाभोलकर पुरोगामी विचारांचे होते।
पुरोगामीचे विचार सामान्य लोक समजून घेऊ शकत नाहीत कारण ते काळाच्या खुप पुढे निघून गेले असतात महात्मा फुलेंच्या काळात झालेला स्त्री शिक्षणाचा विरोध आणि आजच्या काळात झालेला शनी मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशासाठी विरोध हे सारखेच आहेत।
Source :Internet
जयंत जाधव ,लातूर:
A progressive change happens gradually over a period of time.कालांतराने एक प्रगतीशील बदल हळूहळू होतो.मानवाचा सर्वात मोठा शिक्षक म्हणजे निसर्ग.निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही विचाराला कधीच पूर्णपणे समर्थन करता येत नाही.तो विचार काही काळा त्या व्यवस्थेचा भाग राहू शकेल.परिवर्तन हा जगाचा नियम आहे.व्यवस्था मधील दोन्ही बाजूवर सातत्याने काम करणारे घटक,बदल घडवणारे कधीच एकमेकांचे वैरी नसतात . ते बदल सूचवतात,परिणाम देतात आणि ते कोणत्याही प्रवाहाचे असू द्या व्यवस्थेचा कायमचा भाग होतात.याऊलट सामाजिक परिवर्तनाच्या स्तरावर मात्र हे घडत नाही.परिवर्तनातून समाजपरिवर्तन व त्यातूनच चालू व्यवस्थेत बदल घडून आणने अपेक्षीत असते फक्त ते परिवर्तन वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेले ,काळाच्या गरजेनुसार सुसंगत हवे. In the system, with retrograde thoughts, work is going on with a combination of sensualism, partiality, and it is going on for a long time. Sometimes the dimensions of progressive on a black screen, sometimes even when it may appear blurred, will not be the same arrangement .
अक्षय पतंगे ,हिंगोली:
पुरोगामी म्हणजे बोलाचीचं कढी नाही तर अंधश्रद्धेची जोखडं झुगारून देत, जुनाट वाईट प्रथा परंपरांना फेकुन देत, आधुनिकतेच्या भट्टीतुन बाहेर निघालेले बावन्नकशी सोन्याचे देशाच्या प्रगतीचे अन् समाजाच्या उन्नतीचे विचार म्हणजे पुरोगामी. काही जण भंपक प्रसिद्धीसाठी पुरोगामीत्वाचा आव आणून नौटंकी करतात. स्वतः चे अस्तित्व शाबुत ठेवण्यासाठी वारंवार महामानवांना आठवतात. यामुळं पुरोगामीत्व नावाचं लेबल लागत नसतं, त्यासाठी कधी गाडगेबांबाच्या हातातील झाडु, राष्ट्रसंताची खंजिरी, साने गुरूजींची लेखणी, कबीरांची वाणी अन् जोतीबांनी सांगीतलेला आसुड व्हावं लागतं, बाबासाहेबांसारखं लोकशिक्षक, तुकारामांसारखं विद्रोही ,अन् बुद्धांसारखं प्रेमळ झाल्यास आपण अभंग होऊ, ते असेल पुरोगामीत्व.
Source :Internet
अनिल गोडबोले,सोलापूर:
दोन शिष्य एकदा रस्त्याने चालले होते. त्यांना वाटेत एक नदी लागली. नदी तशी फार खोल नव्हती पण माहितगार व्यक्ती शिवाय दुसर्या कोणालाही पार करणे अवघड असे. त्या दोन्ही शिष्यांना नदी पार करताना एक सुंदर स्त्री भेटली. त्यांना तिने विनंती केली कि मला नदी पार करावयाची आहे आणि त्यासाठी आपण मला मदत करू शकाल का?... त्यावेळी त्या दोघांपैकी एक शिष्य जो काही वर्षांनी दुसर्या पेक्षा मोठा होता त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या स्त्री चा हात धरला आणि तिला पाण्यात घेऊन गेला. ज्याठिकाणी ती स्त्री चालू शकत नव्हती तिथे त्याने तिला उचलून घेतले आणि आणि त्या तिघांनी नदी पार केली. पलीकडच्या काठावर तिला त्या शिष्याने खाली सोडले तिला नमस्कार केला आणि ते पुढे चालू लागले.
थोड्यावेळाने जो दुसरा शिष्य होता तो खूप विचारात दिसत होता त्याने या मोठ्या गुरुबंधूला विचारले कि, आपण असे कसे काय करू शकला आपण तर ब्रम्हचारी आहोत शिष्य आहोत एका परस्त्रीला खांद्यावरून उचलून घेताना तुम्हाला काहीच वाटल नाही त्यावर तो मोठा शिष्य हसून दुसर्या शिष्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ... ‘ अरे मी तर तिला केव्हाच खांद्यावरून उतरवली तू अजून तिला उतरवली नाहीस’.... या कथेचा बोध एवढाच कि आपण आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीकडे कुठल्या नजरेतून बघतो त्या नुसार आपल्याला जग दिसत असत...
असो तर ... या कथेचा आणि या विषयच संबध देखील असाच आहे... कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित आहेत चुकीच्या आहेत किवा आपल्याला त्रास होतो आहे किवा या अशा गोष्टी मुले समाजातील काही वर्गाच शोषण होत आहे व तरी देखील आम्ही ते जोखड मनावर बाळगून चाललो आहोत... अशी मानवारची जोखड समूळ उखडून फेकून देण्याचा विचार म्हणजे पुरोगामी विचार... इंग्लिश मध्ये त्याला progressive विचार म्हणतात.. अशा विचारातून ज्या भावना जन्माला येतात व त्या भावनांना धरून ज्या व्यक्तीचे वर्तन असते त्या व्यक्तींना पुरोगामी म्हणतात.
देव मानवा कि न मानवा हा वेगळा विषय आहे खर तर पण देव या विषयाला धरून किवा अमुक एक केल्याने माझे कल्याण होईल किवा नुकसान होईल अशा खुळचट कल्पनांना धरून काहीतरी खोट्या किवा छद्म विज्ञानाचा आधार घेऊन किवा पुराणात एवढ प्रगत तंत्र्द्णन होत यावर वाद घालणाऱ्या व्यक्तींना पुरोगामी कसे म्हणावे? हाच मोठा प्रश्न आहे. ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर व विद्ण्यावर मान्य ठरतात त्या गोष्टीना मानणे म्हणजे पुरोगामित्व!. पण असे होताना दिसत नाही. पुरोगामित्वाच्या गप्पा मारताना आम्ही काही तेवढे देवभोळे नाहीत .... पण विषाची परीक्षा कशासाठी घ्यायची... असा युक्तिवाद करणारे अनेकजण भेटतात. तेव्हा मला खर्च प्रश्न पडतो कि आम्हाला पुरोगामित्व कळाल आहे का?
महर्षी कर्वे यांच्यापासून जर विचार केला तर आधुनिक काळात खूप अशा सुधारणावादी व्यक्ती महारष्ट्रात होत्या आणि आहेत पण प्रखर विचार ठाम वर्तन आणि बुद्धीप्रामाण्य वादी जीवनशैली फार थोड्या व्यक्तीकडे असते आणि तेच खरे पुरोगामी ...
पुराना मध्ये चार्वाकांचा सिद्धांत सर्वाना माहित आहेच... तेव्हा पासून कालानुरूप प्रत्येकाने आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी पसायदान कोणाकडे मागितल ... विश्वात्मके देवे... म्हणजे १२व्य शतकात हा विचार करणे हे पुरोगामित्वाच लक्षण निश्चित आहे.संत मंदिलिनी जे विचार मांडले ते सगळे पुरोगामी आहेत... पण त्यांना मानणारा वर्ग त्यांना फक्त follow करतोय .. तो कुठे डोळस झालाय?.. जेव्हा हे प्रत्येकजण आपल्या आपल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून विचा करायला लागतील तेव्हा ळूप मोठा बदल होईल.
दुर्दैवाने महावीर, बुद्ध, ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, तुकोबा पासून सोक्रेतीस, मार्टिन ल्युथर किंग, गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर व अगदी आताच्या दाभोळकर यांच्या पर्यंत पुरोगामित्वाची एक लाट आपल्याकडे आहे.. काही लोक आपल्या स्वार्थासाठी पुरोगामित्वाचा तिटकारा करतात किवा स्वर्थापुर्त पुरोगामी झाल्यासारखं दाखवतात. ज्या राज्यात शाळेत मुली शिक्षण शिकवणारा शिक्षक सकाळी विअद्न्यनिक दृष्टीकोन शिकवतो आणि रात्री सूर्यग्रहणाचे वेध पाळतो.. तिथे तो मुलावर काय पुरोगामित्व शिकवणार... !! आणि फक्त या मुले पुरोगामित्व मागे पडत नाही तर खोट कस वागायचं याचा उत्तम धडा आपण पुढच्या पिढीला देत असतो..
शेवटी एवढच सांगतो.. आपण सगळे classically conditioned आहोत (पाव्ह्लोव चा कुत्र्याव्रचा प्रयोग) म्हणजे कशाला उगाचच आपण त्या विचारात पडायचं... आपल्याला काही त्रास होतोय का ... नसेल... तेवढ करायाल काय जात आहे आपल.... आणि आपण फक्त मोद्र्ण कपडे आणि खान सोडून बाकी काही करत नाही. असच जर हे सुधारणावादी करत राहिले असते तर ?????.....
उठ जागे व्हा आणि आपल्या विचारावर आणि बुद्धी प्रमाण्यावर विश्वास ठेऊन वागा.... म्हणजे पुरोगामित्व सहज येईल
ज्ञानेश्वर टिंगरे , उस्मानाबाद:
समाजाच्या बदलत्या प्रवाहात नेमकेपणाने पुरोगामी ची व्याख्या करणं तसं जरा अवघडच वाटतं, कारण समाजपटलावर घडणाऱ्या ठळक घडामोडी, व्यक्तींना येणारे अनुभव मग ते प्रशासनातील असोत कि दैनंदिन व्यवहारातील याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या मनावर या विविध संकल्पनांना आकार देतो.
बुरसटलेल्या विचारांचे जोखड फेकुन देऊन बदलत जाणारा काळ व समाज यांना अनुकूल अशा नव्या विचारांना अग्रक्रम देणे अन त्याच बरोबर समाज एकसंघ ठेवण्यास कारणीभूत असणाऱ्या व पूर्वापार चालत आलेल्या विचारांना तितक्याच सजग, उदार मनाने जतन करून ते पुढे हस्तांतरित करणे म्हणजे पुरोगामी असं मला वाटतं.
आणखीन नव्याने बोलायचं झालं तर प्रतिगामी विचारांच्या मंथनातून निघालेले सार व आजच्या परिस्थितीला संतुलित राहण्यास आवश्यक अशा विचारांची सरमिसळ करून एक नवा विचार किंवा प्रवाह समाजात प्रस्थापित करने म्हणजे पुरोगामी…
Source :Internet
गणेश भंडारी ,अहमदनगर:
आपण अनेकदा जाता-येता 'पुरोगामी' हा शब्द ऐकतो, वाचतो. अमुक एक व्यक्ती पुरोगामी विचारांची आहे, सरकारची धोरणे पुरोगामी आहेत, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, तो नेता पुरोगामी चळवळीशी संबंधित आहे; ही आणि अशी असंख्य विधाने आपल्या कानावर पडत असतात. हे 'पुरोगामी' म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, पुरोगामी असणे म्हणजे काय याचा विचार आपण करूयात.
'पुरोगामी' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ 'प्रगतिशील, अग्रगामी, पुढे जाणारा' असा आढळतो. म्हणजे जो सतत पुढे जातो, प्रगती करतो तो पुरोगामी असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. पण अजून बारीक विचार करायचा झाल्यास नेमके कोणत्या क्षेत्रात, कोणत्या बाबतीत पुढे जाणे, प्रगती करणे म्हणजे पुरोगामी? उद्या मी म्हटले की मी लोकांना फसवण्यात खूप पुढे गेलो आहे, त्यासाठी नवीन तंत्रज्ञान मी विकसित केले आहे. या क्षेत्रात मी अफाट प्रगती केली आहे, म्हणून मला पुरोगामी म्हणा! हे चालेल का? नाही ना? याचा अर्थ अशी काहीतरी ठराविक क्षेत्रे, ठराविक बाबी असल्या पाहिजेत, ज्यात पुढे गेलात, प्रगती केलीत तरच तुम्ही पुरोगामी या संज्ञेस पात्र व्हाल. मग कोणती आहेत ही क्षेत्रे?
आपण मिळवलेल्या ज्ञानामुळे, साधलेल्या प्रगतीमुळे, मांडलेल्या विचारांमुळे समाज पूर्वी होता त्यापेक्षा अधिक सुखी होत असेल, अधिक स्वातंत्र्य, शांतता व मुक्ततेचा अनुभव घेत असेल, समाजातील विविध भेद व त्यामुळे समाजाला होणारा मनःस्ताप यांचे प्रमाण कमी होत असेल, समाज अधिक तार्किक विचार करायला शिकला असेल तर अशा प्रगतीला, पुढे जाण्याला पुरोगामी निश्चितच म्हणता येईल. या अर्थाने समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा यांविरुद्ध बोलणारे, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झटणारे, समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे; थोडक्यात माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी प्रयत्न करणारे सर्वच पुरोगामी म्हणता येतील.
समाजाने केवळ भौतिक व आर्थिक प्रगती करून चालत नाही. त्यामुळे समाज सुखी होईलच याची खात्री देता येत नाही. भौतिक व आर्थिक प्रगती आवश्यक आहेच, यात वाद नाही; पण केवळ तितकेच पुरेसे नाही. त्याच्या जोडीला समाजाची मानसिकता बदलणे, तिला कालानुरूप आधुनिक वळण लावणेही तितकेच महत्वाचे व आवश्यक आहे. लोकांची मानसिकता व सवयी बदलणे, त्यांना कालसुसंगत व तार्किक रूप देणे हेच पुरोगामी चळवळींचे ध्येय असते.
Source :Internet
समाजातील मध्ययुगीन प्रवृत्ती, रूढी- मग त्या सामाजिक असतील वा राजकीय- यांचे निर्मूलन करून त्याजागी आधुनिक प्रथा व पद्धती प्रस्थापित करणे यासाठी पुरोगामी कार्यकर्ते सतत झटत असतात. त्यांचा हा संघर्ष दुहेरी असतो. एका बाजूला त्यांना समाजाला आपल्या बरोबर घेऊन चालायचे असते, समाजाला त्यांचे हित-अहित याबाबत सचेत करायचे असते, लोकांचे प्रबोधन करायचे असते; तर दुसऱ्या बाजूला प्रतिगामी शक्तींचा, त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचा मुकाबला करायचा असतो, या हल्ल्यांपुढे टिकून राहून पुढे जायचे असते. समाजात जागृती करणे, लोकांना आपल्या बाजूने वळवणे, त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना आपले विचार अंगिकरायला भाग पाडणे हे एक कौशल्यच असते. लोकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या पातळीवर जाऊन आपला मुद्दा पटवून देणे, सतत पाठपुरावा करणे, त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवणे, लोक ज्या पद्धतीने घटनांकडे पाहतात, ज्या प्रकारे विचार करतात, त्या पद्धतीने आपण विचार करायला शिकून त्यातून योग्य तो मार्ग शोधणे याप्रकारे लोकांचे प्रबोधन करावे लागते.
जुन्या रूढी-परंपरा, कालबाह्य विचार यांमध्ये ज्या घटकांचे हितसंबंध गुंतलेले असतात ते घटक या गोष्टी सहजासहजी कशा नष्ट होऊ देतील? लोक अंधश्रध्दांतून मुक्त झाले, तार्किक विचार करू लागले, आपापसांतील भेद विसरून एकोप्याने नांदू लागले तर त्यांचे हितसंबंध धोक्यात येतील, त्यांची दुकानदारी व पर्यायाने त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे असे घटक हरप्रकारे पुरोगामी चळवळीला व पुरोगामी विचारांचा लोकांना बदनाम करण्याचा, त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा, त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात. इतके करूनही जर पुरोगामी लोकांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत तर असे प्रतिगामी लोक त्यांचे अस्तित्वच नष्ट करण्याचा मागे लागतात. त्यासाठी वाटेल त्या मार्गाचा आधार घ्यायला ते मागेपुढे पाहत नाहीत. आजकाल आपण सहज सामाजिक माध्यमे, जसे फेसबुक, व्हाट्सअप यांवर चकजार मारली तर पुरोगामी लोकांची, त्यांच्या विचारांची हेटाळणी कशा प्रकारे केली जाते हे आपल्या लक्षात येईल. या प्रतिगामी शक्तींच्या कृपेने आज या माध्यमांवर 'पुरोगामी' ही एकप्रकारे शिवीच झाली आहे. पुरोगाम्यांचा उल्लेख फुरोगामी, पुरोघाणी, पू रोगा मी अशा विकृत पद्धतीने करणे हेतर सर्रास दिसून येते. याच्या जोडीला पुरोगामी व्यक्ती व संस्थांचे जमेल तेवढे चारित्र्यहनन करणे, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करणे, त्यांच्या नावाने कपोलकल्पित गोष्टी पसरवून समाजाचे त्यांच्याविषयीचे मत कलुषित करणे हेही दिसून येते. या प्रयत्नांचा आणखी एक भयानक प्रकार अलीकडे दिसून येत आहे. प्रतिगामी लोक पुरोगामी चालवळींत, संस्थांत शिरकाव करतात, त्यांना पद्धतशीरपणे हायजॅक केले जाते. आपली विचारसरणी त्यांच्याद्वारे लोकांवर लादली जाते.
आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख एक पुरोगामी राज्य अशी आहे. आता 'आहे' म्हणण्यापेक्षा 'होती' असे मानणे अधिक सयुक्तिक ठरेल. कारण अलीकडे घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्राने आपली पुरोगामी ओळख गमावली आहे असे वाटते. किंबहुना महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे हा एक विनोद झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. तसे पाहिले तर महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा, पुरोगामी विचारांचा मोठा वारसा मिळाला आहे. अगदी संत ज्ञानेश्वर-तुकारामांपासून तर शिवरायांपर्यंत आणि फुले-शाहू-आंबेडकरांपासून तर अगदी अलीकडच्या दाभोलकर-पानसरेंपर्यंत अनेकांनी या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या विचारांनी, काळाच्या पुढे असणाऱ्या दृष्टीने ही परंपरा विकसित केली आहे. खरे तर या सर्वांचे आपल्या राज्यावर अनंत उपकार आहेत. आपण या उपकारांची परतफेड मात्र त्यांना गोळ्या घालून, त्यांची बदनामी करून करत आहोत ही किती शरमेची बाब आहे! अलीकडे वाढत असलेला जातीय हिंसाचार, अंधश्रद्धांनी नवीन नवीन रूपांत वर काढलेले डोके, जाती-धर्माच्या भक्कम होत जाणाऱ्या भिंती, विरोधी मत ऐकून घेण्याची आपण गमावत असलेली क्षमता यांमुळे आपण आपला हा वारसा मातीमोल तर करणार नाही ना अशी भीती दाटून येते आहे. हा वारसा जपणे, त्याचा आणखी विकास व प्रसार करणे हे आपल्याच हातात आहे. सध्या आपल्यासाठी ही करो या मरोची स्थिती आहे. पुरोगामी विचार जपण्यास आटा आपण अपयशी ठरले तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत हे मात्र नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा