स्वच्छ भारत अभियान : सेल्फिमय की गांधीमय वाटचाल ?

🌱वि४ 🌿 या व्हॉटसअप ग्रुप वरून
            Source: INTERNET
स्वच्छ भारत अभियान : सेल्फिमय की गांधीमय वाटचाल ?
            Source: INTERNET
पी . प्रशांत कुमार , अहमदनगर :

....कोणत्याही कारणाने का होईना पण 'स्वच्छ भारत' ह्या विषयाकडे सरकारने लक्ष दिलं त्यासाठी सर्वप्रथम सरकारच अभिनंदन...
...फक्त स्वच्छ भारत ह्या मोहिमचं चळवळीत रूपांतर होण्याऐवजी इव्हेंट मधे रूपांतर होत चालल्याची भीती वाटते.. कारण स्वच्छ भारत साठी जे Brand ambassadors (पक्षी:स्वच्छतादूत) त्यातल्या काहींच्या तर बेडशीट साफ करायला देखील बाहेरची कामावाली माणसं असतील. ही विसंगती दिसते आणि हसू येत.. आधीच स्वच्छ असलेल्या रस्त्यावर स्वच्छ कोरडा कचरा टाकून तो सर्व sefty gears (मास्क,हातमोजे,शूज वगैरे) वापरून साफ करतानाचे फोटो काढायचे आणि ते सोशल नेटवर्कवर टाकून आपणही स्वच्छ अभियानाला हातभार लावला याचा ढिंढोरा पिटायचा ..
....कशाला स्वतःलाही फसवायच ? सरळ त्याऐवजी सफाई कामगारांना मास्क/ग्लोव्हज वाटा वापर कसा करावा हे समजवा..
...खरंतर गांधीजींचे स्वच्छतेचे विचार/नियम वाचा ..
मी सार्वनिक टॉयलेट मधे गेलो तर व्यवस्थित पाणी टाकूनच येतो ही सवय आहे..कुणीच आपल्याकडे पहात नसतानाही आपण ज्या सार्वजनिक स्वच्छतेच्या चांगल्या गोष्टी करतो त्याच खऱ्या..
....चार दिवसात स्वच्छता शक्यच नाही.. It's long process ..सार्वजनिक स्वच्छता अंगी भिनवावी लागेल..दंड वगैरे खूप नन्तर आधी प्रबोधनाची गरज आहे. या मोहिमेत 'शाळा' हा खूप महत्त्वाचा घटक आहे.. कचरा स्वच्छ करने वगैरे गोष्टींऐवजी मी कमीत कमी कचरा कसा करू शकेल आणि त्या कचऱ्याचही घाणीत रूपांतर होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी हे शिकवण महत्वाच..
एक उदाहरण आहे ..राहुल मोरे माझा मित्र..माझ्या मित्राची छोटी शाळा आहे .. माणिकदौंडीला..नगर-मराठवाड्याच्या सीमेवरच्या छोट्या खेड्यात .. टॉयलेट बांधले..स्टाफसाठी पण ..स्वच्छता कशी करायची? बरं वेगळा माणूस ठेवणे तर खेड्यात मिळणार पण नाही आणि नवीन शाळा बजेट कमी शाळेचं त्यामुळे परवडणार पण नाही.. तर एक शिक्षिका पटकन म्हणाली,"आम्ही एक-एक दिवस वाटून घेतला आणि तशी कॅलेंडरवर नोंद पण केली उलट तुम्ही आमची इतकी सोय केलीत थँक्स सर.."
....इथेच गोष्ट संपत नाही..माझा मित्र म्हणाला,"मग त्यात एक दिवस माझा आणि एक दिवस सारिकाचा (त्याची पत्नी) पण नोंदवा.. आम्ही पण स्टाफचाच भाग आहोत.." ...आणि विशेष म्हणजे हे त्याने मोठेपण मिरवायला केलं नाही..
....सहल घेऊन जातो तेव्हा ते ठिकाणचं कचरा मुक्त करून येतात ते..
मुलांना स्वच्छतेच चांगलं वळण तेही खासकरून सार्वजनिक ठिकाणच्या हे ठरवून लावता येत नाही.. आसपासच्या मोठ्या लोकांचं ते अनुकरण करत शिकतात..
...असली उदाहरण पाहिली की स्वच्छ भारत अभियानाची गांधींमय मार्गाकडे वाटचाल दिसते आणि बरं वाटत..
        Source: INTERNET
     
किरण पवार , औरंगाबाद :

             ही जरी सध्यस्थिती असली की आपण सध्या स्वच्छतेचे उपक्रम फार मोठ्या  प्रमाणात राबवत आहेत. तरी बऱ्याच वेळा आपण केवळ दिखाव्यासाठी काही गोष्टी करतो. कुठेतरी त्या गोष्टींबद्दल प्रामाणिकपणे आपण स्वत:ला विचारल पाहिजे. पण या *सेल्फिमय कल्चरचा आपल्या देशात कुठेतरी चुकीचा उपयोग करोत आहोत. आणि त्याचा थेट परिणाम लहान लहान मुलांवर होतो आहे.* ही गोष्ट बदलनं आपल्या हातात आहे.
             काही ठराविक शिल्लक व्यक्ती फक्त प्रामाणिकपणे स्वच्छता अभियान राबवतात. जे खरोखरच सेल्फिचा उहापोह करत नाहीत. त्यामुळे भारत जर खरोखर स्वच्छ पुर्णपणे करायचा असेल तर सेल्फिची क्रेझ बंद व्हायला हवी.
       Source: INTERNET
मयुरी देवकर , पंढरपूर :

           भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आम्हांला भारत  अजूनही स्वच्छ झाला  नाही  याचीच खूप खंत वाटते .खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत काय ?प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढी प्रगती करूनही आजही आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत एवडे अडाणी कसे ?  
          प्रत्येक व्यक्ति आज स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकली आहे अस मला वाटत .प्रत्येकाने जर स्वतः च्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला तरी एवड्या मोठ्या स्वच्छ भारत अभियान ची सुरवात झाल्यासारख होईल .आज आम्ही स्वत ला सुशिक्षित समजतो आणि स्वतः च्या घरातील कचरा रस्त्यावर फेकतो आणि आणि पुन्हा तीच स्वच्छता करण्यासाठी सगळे मिळुन जमतो आणि हातात झाडु घेतो आणि सेल्फी काडतो .....आणि काय मग स्वच्छ भारत मिशन कडे वाटचाल ......झाल .....अस हे अजून किती दिवस चालणार ? आणि हे जर असच चालू राहिले तर भारत स्वच्छ कधी होणार ?
            आज आम्हांला स्वच्छतेचे , स्वच्छ पर्यावरणाचे महत्व सर्वांनाच पटले आहे .तरीही ही उदासीनता का ? मग जर खरंच स्वच्छता करायची नसेल तर  हे अभियान नुसते वर्षोंवर्षे चालवत ठेवायचे असेल तर मग सेल्फी तरी कशाला काढायचा ?  
            आज वातावरणच असे झाले आहे की आम्हांला आमच्याच चुकीच्या कामांचा अभिमान वाटतोय आणि म्हणूनच कधी कधी तर आम्ही कचरा नसला तरी हातात झाडु घेवुन सेल्फी काढतोय कशासाठी ?... तर दुसऱ्याना दाखवण्यासाठी ? ...
हेच मिरवने हारतुरे बंद करून खऱ्या अर्थाने स्वच्छतेची  सुरुवात स्वतः च्या घराच्या परिसरातून करने हीच खरी काळाची गरज झाली आहे ....आहे आणि हीच योग्य वाटचाल होय .....

     Source: INTERNET
आर. सागर ,  ,सांगली:
परवाचीच गोष्ट. सकाळी घरून ऑफिसला निघालेलो. जाताना नेहमीच्या चौकात गेल्यावर पुढे एक मोठं डिजिटल लागलेलं. तसंही रोज कुणाचा ना कुणाचा विशेषतः स्वयंघोषित नेत्याचा वाढदिवस वगैरे असतोच त्यामुळे चौकात डिजिटलची गर्दी नेहमीचीच. पण हे डिजिटल नेहमीपेक्षा थोडं वेगळं होतं. सध्या जे स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे (4 जानेवारी ते 10 मार्च) त्यासंबंधीचं डिजिटल होतं ते.. गेल्या 4 वर्षांपासून राबवल्या जात असणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या यशापयशाचा आढावा घेण्यासाठीचं सर्वेक्षण.. विशेषतः शहरी भागासाठी..
.
त्यानिमित्ताने या स्वच्छता अभियानाबद्दलच्या यापूर्वीच्या योजना आठवल्या. 1999 साली स्व. आर. आर. पाटील (आबा) महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं. साधारण त्याच सुमारास केंद्र सरकारनेही संपूर्ण स्वच्छता अभियान देशपातळीवर सुरू केलं. 2012 साली त्याचंच नाव बदलून निर्मल भारत अभियान या नावाने ते सुरू ठेवलं. 2014 साली मोदी सरकारने 2 ऑक्टोबरचा गांधी जयंतीचा मुहूर्त स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. त्याद्वारे 2 ऑक्टोबर  2019 पर्यंत हागणदारीमुक्त गावे, सार्वजनिक रस्ते व पायाभूत सोयी-सुविधांची स्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला.


म्हणजे एकंदरीत गेल्या 8 ते 9 वर्षांपासून स्वच्छतेसाठी देशपातळीवर वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रापर्यंत विविध दिग्गजांची निवड केली आहे. पण तरीही त्याबाबत आपले नागरिक जागरूक आहेत का? फक्त सामान्य नागरिकांच्याबाबतच न बोलता ज्यांनी यासाठी योजना बनवली, ज्यांची प्रचार-प्रसारासाठी निवड झाली ते तरी समर्पित भावनेने त्यात कधी सहभागी झालेत का किंवा होताहेत का हाही प्रश्न आहेच..
.
हातात झाडू घेऊन रस्ता साफ करणारे नेते तर नेहमीच झळकत असतात. बऱ्याचदा सामाजिक बांधिलकीच्या गोंडस नावाखाली हे कार्यक्रम सुरू असतात. पण खरंच त्यांचा त्यामागे स्वच्छता करण्याचा हेतू असतो की फक्त फोटोसाठीच हाती झाडू घेतलेला असतो हेच समजत नाही. कारण अपवादात्मक एखादा फोटो सोडला तर कुठल्याच फोटोत नेत्याच्या कपड्यावर एखादा डागही दिसत नाही किंवा कपड्यांची इस्त्रीची घडीही मोडलेली नसते. मग खरंच ते स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरतात का हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
.
सरकारी कार्यालयांमध्येदेखील फारशी वेगळी स्थिती नसते. सरकारची योजना म्हणून बहुतांश कर्मचारी सहभागी होतही असतील. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या सरकारी इमारतीत जाता त्यावेळी तिथल्या जिन्याच्या बऱ्याच भिंती पिचकाऱ्या मारूनच रंगवलेल्या दिसतात. हे होऊ नये म्हणून जिन्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात देव-देवतांचे फोटो लावावे लागतात हे तसं दुर्दैवच.

                Source: INTERNET
अशी परिस्थिती असताना स्वच्छ भारत अभियानाचं प्रतीक म्हणून चष्मा आणि योजना राबवण्याचा कालावधी गांधी जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत ठेवलाय हा तसा विरोधाभासच.. कारण गांधीजींच्याच मार्गानं जायचं असेल तर त्यासाठी फक्त चष्मा उपयोगाचा नाही तर त्या चष्म्याआडची दृष्टी आणि विचारही तितकेच महत्वाचे आहेत.. नेते असोत किंवा सेलेब्रिटी त्यांना आधी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. स्वतःपासून , स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आधी केले मग सांगितले या विचारातून काम केलं पाहिजे. काम करत असताना फक्त फोटोसाठी न करता *मी राबतोय तुम्हीही राबलं पाहिजे तरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो* हा मंत्र आपल्या कृतीतून दिला पाहिजे. तरच सर्वसामान्य जनता तुम्हाला मनापासून साथ देईल. मातीत राबताना मातीचाच टिळा कपाळी लावून जर प्रत्येकजण काम करत राहिला तर कुठल्याही योजनेला यश नक्कीच मिळेल.
.
(सगळेच नेते किंवा सरकारी कर्मचारी फक्त सेल्फीसाठीच काम करतात असं नाही. काहीजण तळमळीने राबत असतातच. त्यांच्या कार्यासाठी त्यांना सलाम..)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************