जुन्या बाटलीत नवी दारु! मग नव्या वर्षांत काय करु?


🌱वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून

(फोटो:गुगल)

विषय:
जुन्या बाटलीत नवी दारु!
मग नव्या वर्षांत काय करु?  


तेजस महापुरे ,कराड:
...खरतर आपल्यात बदल हा नेहमी होतच असतो... त्यामुळे आपण काही जुनी बाटली राहत नाही... वेगवेगळ्या माध्यमातून आपण रोज शिकत असतोच...नव्या वर्षात आपण हे प्रमाण आणखी वाढवायला हव...त्यामुळे आपण जीवन जगताना त्याचा खरोखरपणे निखळ आनंद घेऊ शकू...माझ्या मते प्रत्येकाने आपण जे काही वर्षभर केले असेल त्याच आत्मचिंतन करायला हव...आपल्या कडून आधी काही चुका झालेल्या असतील तर नवीन वर्षात ते होता कामा नये... नवीन वर्षात नवनवीन गोष्टी करायलाच हव्यात कारण आपण कधीच PERFECT नसतो...सध्याचे युग हे ज्ञान युग आहे दरवर्षी आपण अधिक ज्ञानाची लालसा वाढवायला हवी...तरच आपण आपल्या आयुष्यात आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षात स्वतःची प्रगती साध्य करू शकू..... 


मनोज वडे:-
 खरंच हा विषय जरा यमकरुपी असला तरी तो स्वतःला विचार करण्यास भाग पाडतो.प्रत्येक वर्षी मी नवीन ध्येय ठरवतो पण त्याचे यशाचे प्रमाण खूपच कमी असते.याचा अर्थ सरळ सरळ होत राहतो की आता नवीन प्लॅन न आखता स्वतः आंतरिक विचार करण्याची खरंच गरज आहे.यावर्षी मी नवीन कोणतेच प्लॅन न आखता जे आहे ते व्यवस्थित पुढे चालू करण्याचे ठरवल आहेे.थोडक्यात , *"एक ना धड भाराभर चिंध्या" ही* म्हण माझ्यासाठी अयशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 ‎
समाधान देवडे,बुलढाणा:
खरतर या विषयाला स्पर्श करत असताना मला सद्यस्थितीकडे कटाक्ष टाकावासा वाटतो...३१ डिसेंबर हा दरवर्षिच येत असतो ..प्रत्येकजण आपापल्यापरिने नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तत्पर असतो ...असे काहींना वाटू शकते ..पन आपन उघड्या डोळ्यांनी जर बघितले तर    गट१-एकीकडे  चंगळवादी  व्यक्ती कुणी आपल्या स्वतःच्या कमाईतील तर कुणी आई वडिलांच्या कमाईतील आपला चंगळवाद जोपासण्यासाठी तयार असतो... आणि हा सर्व प्रकार थर्टी फस्ट सेलिब्रेशन, नवीन वर्षाचे स्वागत, स्पेशल दिवस... असे गोंडस नावे देऊन  पार पाडत असतो. अर्थात यात काही गैर आहे असे काही नाही. कुणाला कस जगायचं झाले. ज्याचा त्याचा प्रश्न. पण हे सर्व करत असताना त्यामधून काही सकारात्मक परिणाम जाणवतोय का? का नुसते काही क्षणिक आनंदासाठी एवढा सारा खटाटोप? आणि राहिला प्रश्न आनंद (इन्जाॅय), मौज मस्ती,,आनंद सेलिब्रिट करण्यासाठी हाच दिवस का?या सर्व प्रश्नांची उत्तर जर सकारात्मक असेल तर हे सर्व करायला काही हरकत नाही. पण जर उत्तरच नसेल किंवा नकारात्मक असेल तर यावर थोडी चिंतन करण्याची गरज आहे..                                     गट२- दुसरीकडे स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नान् करत फिरणारे, तर काही आजच भागल.. उद्याच कसं या चितेंत असणारे.. तर काही उपासमारीचे बळी ठरलेले.. त्यांना नवीन वर्ष काय?आणि ते कशासोबत खायचे असते याचा लवलेशही नसतो,त्यांची पोटाची भूक भागवण्यासाठी धडपड असते, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखाच असतो.., त्यांना कसल न्यू इयर सेलिब्रेशन.... त्यांची ही स्थितीसाठी दारिद्र्य, अज्ञान यासारखे अनेक कारण असू शकते...शेवटी ते पण माणूसच ना...           या दोन गटातील तफावतील विचार केला असता असा प्रश्न निर्माण होतो नेमका दोष कोणाचा.? पहिल्या गटातील व्यक्तीचा? का दुसऱ्या गटातील व्यक्तीचा? का व्यवस्थेचा? का अज्ञान, दारिद्र्य इ.चा?अशी तोकडी उत्तरे आपल्याला मिळू शकतात... पण यावर योग्य उत्तर शोधून ही विषमता दूर करण्यासाठी विचाराबरोबर कृती गरजेचे आहे....आता प्रश्न उरतो तो नवीन वर्ष साजरे करावे का? यावर माझे वैयक्तिक मत आहे... प्रत्येक दिवस हा नवीन वर्षाप्रमाणे साजरा करावा.. तो एकच दिवस का?..... वरील आपल्या विषयाप्रमाणे.. नविन वर्षांत काय करु... प्रमाणे - प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही ध्येय असते, ध्येयावाचून जगणे निरर्थक असते.. मग ते करिअर संदर्भात असो कि जीवना संदर्भात असो, प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते... ते साध्य करण्यासाठी विषयाच्या अर्थाप्रमाणे... घेतला तर सकारात्मक किंवा नकारात्मक पण निघू शकतो.. जुन्या बाटलित नवी दारु - तुम्ही आता पर्यंत जे करत आलात, त्याच फलित तुम्हाला आता पर्यंत मिळाले.. पुढे तेच केले तर आता पर्यंत जे मिळाल तेच मिळेल... तुम्हाला जर नवीन काही मिळवायचे असेल तर नवीन काही करावे लागेल.... म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटनांचे परिक्षण करून भविष्यातील आव्हानांना आनंदाने तोंड देण्यासाठी सज्ज रहा अन् आपले सुंदर जीवन अजून सुंदर बनवा....          

अमर चिखले,पुणे:
  स्वामी विवेकानंदांनी आणि डॉ. कलाम यांनी उद्याच्या महासत्ता भारताचे स्वप्न आपल्या सारख्या युवकांकडून पाहिले . परंतु हे युवक 31 च्या रात्री बियर ची पार्टी करताना दिसतात .आणि जवाणीच्या नादात भवानिच्या मागे दिवानी होऊन कॉलेज कट्ट्यावर बसून आयुष्याचा सट्टा लावताना दिसतात . म्हणून नवीन वर्षात अशी पार्टी न करता काही तरी असे संकल्प करावेत की ज्यांच्या आधारे स्वतःचे आयुष्य ही सुधारेल आणि समाजालाही तसेच त्यावर गर्व होईल .नव्या वर्षात एक अशी आदर्श व्यक्तींची साखळी तयार करा की कोणालाच मदतीची कमी जाणवणार नाही . आणि जुन्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात दारूच्या नशेत न करता विचाराच्या नशेत करूया .
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************