लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-2)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-2)

         Source :Internet
बालाजी सानप,बीड:
माझ्या मते वाहतुकीच्या नियमांच्या म्हणावे तसे न होणाऱ्या पालनाला आपण तर जबाबदार आहोतच पण भरपूर लोकांना बेसिक नियम सोडले तर बाकी नियमच माहीत नाहीत, या अज्ञानाला जबाबदार कोण हा प्रश्न वेगळा आहे. परंतु माहीत असलेल्या नियमांपैकी आपण किती नियमांचे पालन करतो हेही पाहावे लागेल, आणि यामुळेच 99% अपघात घडत असतात.
      आमचे सर एकदा *New Zaland*  या देशांमध्ये त्यांच्या जावयाकडे गेले असताना बाहेर फिरायला जाताना त्यांच्या  गाडीने 80 ची लिमिट फक्त एक मिनिट पार केली, लिमिट तोडल्यामुळे त्यांना त्यांच्या मोबाईल वर 500 डॉलर दंडाचा त्यांना मेसेज आला, इतके महत्व तेथे सुरक्षेला देण्यात येते, सांगण्याचा तात्पर्य इतकाच की आपण  सुरक्षेच्या दृष्टीने खूपच मागे आहोत, आपल्याकडे अपघात झाल्यावर उपचाराअभवी अपघाती व्यक्ती मरण पावतो यापेक्षा आणखी दुर्भाग्य ते काय असणार.
      लोंकांची जनजागृती करण्याच काम ट्रॉफीक पोलीस (पोलीस खाते) "रस्ता सुरक्षा सप्ताह"द्वारे करते, पण पुन्हा वर्षभर त्याकडे दुर्लक्ष केले जाते ही शोकांतिका आहे.आपणही वाहतुकीच्या नियमांकडे सुरक्षेच्या  दृष्टीने तर पाहवेच पण एक आपली गरज म्हणून जर पाहिले तर अपघातांचे प्रमाण बरेच कमी होईल यात तिळमात्र शंका नाही.
      ‎             
       Source :Internet
रविराज आकोस्कर,लातूर:
भारताच्या फक्त काही निवडक शहरांत वाहतुकीचे सर्व नियम पाळले जातात.बाकी शहरांत आपण खरंच आपली उद्दाम व्रुत्ती सहजच एकमेकांना दाखवतो..हे सर्वानी अनुभवलं पण असेन .पण मग हा उद्दामपणा आपल्याला कुठेतरी नक्कीच भोवतो जसे की रोड आक्सिडेंट किंवा ट्रेफिक जाम..हे घडतं कारण आपला उद्दामपणा आणि निष काळजी पणा...मग तेंव्हा खरंच आपल्याला नियमांचा महत्व कळतं.पण तोवर खूप उशीर झालेला असतो ..
त्यामुळं आपल्या प्रत्येकाने स्वतः मध्ये बदल आणून मग समाजाचा विचार करावा..जर सर्वानी नियमानुसार वाहने चालवली तर खरच खूप छान समाज निर्माण होईल..
           Source :Internet
जयंत जाधव,लातूर:
एखाद्या गोष्टीचे मूल्य आपल्याला तेंव्हाच कळते जेव्हा ती गोष्ट  हरविल्यावर विकत घेण्याची गरज भासते.उदाहरणार्थ निसर्गाने मानवाला बरेच काही अगदी फुकट दिले आहे पण त्याचे उपकार ठेवेल तो माणूस कसला?अब्जावधी रूपये किंमत असलेले शरीर बाजारात कुठं ही मिळणार नाही.अर्थात वाहतूक नियमांचे पालन करणे आपल्याच उपयोगाचे ठरते.टाळी एका  हाताने कधीच वाजत नाही.आपण नियम तोडून ट्रॕफिकवाल्या पोलिसांना पैसे देऊन भ्रष्टाचारास खतपाणी घालतो. तसेही सध्या आर.टी.ओ सारखे खाते हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरत आहे.विनोदाने म्हणा किंवा खरेपणाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी काही दिवसापूर्वी स्वतः म्हणाले की आर.टी.ओ विभाग कायमचा बंद करायला पाहिजे.
सारांश देशांत रस्ते वाहतूक नियमन व संचालनासाठी RTO विभागाला पूरक अशी नविन व्यवस्था अंमलात आणली पाहिजे व वाहतूक परवाना बाबतचे नियम कडक करुन नियम तोडणारे लोकांना शिक्षा ही कडक व्हायला पाहिजे.चिरीमिरी द्यायची व सुटका करुन घेण्याची पध्दती बंद झाली पाहिजे.तेवढा धाक कायद्याने करायला पाहिजे.
राहुल आनपट,मंगळवेढा:

मला वाटत प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत ...।

१) फोन चालू असताना गाडी चालवू नये.....
      आमचे मित्र बंधू  हेच उलट करत असतात ...मुद्दाम फोन वर बोलतात...। *समोर जर पोरी दिसल्या तर मग विचारू पण नका*

२) वेगाला आवरा......जीवाला सावरा ।
      *आमच्या मित्राना हे कधीच जमत नाही. Speed व्यसन झालं आहे त्यांच. आता हे सुधारणार नाहीत(सत्यता आहे)*

आई ची काळजी तर नाहीच नाही पण स्वतःची पण नाही .....।

       Source :Internet
चेतन दुबे, मुंबई:
मला अस वाटत की
कोणी दुसरा अपघाता साठी जवाबदार नसुन आपण स्वत असतो....

बस ५ मीनीट मधे पोचेन...
पोचलो रे....

अस बोलताच वाहन सुसाट पळवत सुटायच जनु काही स्पर्धा उसेन बोल्ट सोबतच आहे

जस जिंकल्या नंतर
गोल्ड मेडल भेटनार आहे

मात्र मेडल च्या नादात
आपल्या वर अवलंबीत असलेल्या माणसांचा विचार करतो का?

मला अस वाटत की भारतात
पश्चीम सांसकृती जाेरात पसरत आहे  आणी बरेच लोकांन ते आवडत आहे़ ़
युवा तर जास्तच आहेत

मग ह्या लोकांनी त्यांची
वाहतुकीचे नियम सुधा आचरले पाहीजे

स्व अनुषासन ( self discipline) सुधा तेवढच महत्वाच आहे

हिंदी मधे म्हण आहे
दुर्घटना से देर भली..
त्या मुळे आपण नियम पाळले पाहीजे

       Source :Internet
तेजस्विनी जाधव,इंदापूर,पुणे:
वाहने माणसाचे जीवन सोपे व सोयीचे व्हावे यासाठी अस्तित्वात आली, पण आज हिच वाहने आता माणसाच्या जीवावर बेताईला लागली आहेत. सर्वांना आज लवकरात लवकर खुप सारी कामे करायची आहेत खुप पैसा कमवायचा आहे नाव मिळवायचे आहे, पण या घाईत तो स्वतःला स्वतःचा देह किती महत्वाचा आणि मोलाचा आहे हे अजुन त्याला समजत नाही. नियम माणसाचा सुरक्षेसाठी असतात हे आजकाल माणसे विसरायला लागली आहेत. नियम तोडणे म्हणजे काय तरी खुप साहसी पणा दाखवत असलासारखं वाटते काही लोकांना पण हे चुकेच आहे.
आज खरी परिस्तिथी म्हंटली तर खुप लोकांना वाहतुकेच्या नेयमाबद्दल माहिती नसते पण काही नियम तर रस्स्यावर अगदी स्पष्टपणे असतात तरी त्याचं पालन लोकांकडून होत नाही आणि मग आपण पाहतोच रोज दहा ते बारा लोक मरतात वाहतीकेचे नियम न पाळल्यामुळं.
सर्वांनी वाहतोकेचे नियम पाळायला पाहीजेत आणि आपल्या या अनमोल देहाची जरा किंमत करायला शिकलं पाहिजे.
वाहने सावकाश चालवा आणि स्वतःचा जीव वाचवा .....

कृष्णकांत राईलकर,पालघर:
लाखमोलाचा खरोखरच आहेच हा जिव।
हल्लीच्या तरूण पिढीची येते  मात्र किव।
टुव्हिलरवर तर किती सुसाट घेतात धाव।
किती सांगूनही ना जातसे सेल्फिची हाव।
त्यापायी आज दुखाःत बुडाला एक गाव।
दुर्दैवाने"डहाणू"आहे त्या गावाचे हो नाव।
चाळीस विद्यार्थ्यांनी भरली होती ती नांव।
सेंडाँफ नंतर घेई सागरसफरीचा अनुभव।
लाटांवर भले होडी खात होतीच हेलकाव।
पण त्यातच सेल्फी चा म्हणे करुया सराव।
फोटोसाठीआला एका बाजूसमित्रसमुदाव।
नावाड्याने त् केला पोटतिडकीने मज्जाव।
पण सर्वांनाच लागली होती सेल्फिची हाव।
अश्यावेळी काळाने मात्र साधलाच हो डाव।
नाव उलटून सर्वांवर काळाचा पडला घाव।
अरेरे!पालकांच्या तर घेतला ह्रुदयाचा ठाव।
काळा समोर सगळे  सारखे,रंक किंवा राव।

        Source :Internet
गणेश भंडारी,अहमदनगर:
मनुष्य जीवन किती मूल्यवान आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक मनुष्याची काही न काही किंमत ही असतेच. भले एखादा बाह्य समाजाच्या दृष्टीने निरुपयोगी असेल, पण त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने तो लाखमोलाचा असतोच असतो. अशा या बहुमूल्य जीवनाची किंमत प्रत्येकाने जंलीच पाहिजे-स्वतःसाठी नसली तरी इतरांसाठी तरी!

आपण नेहमी ऐकतो, की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. अगदी प्राचीन काळापासून म्हणजे माणसाच्या उत्पत्तीपासूनच त्याची इतर माणसांशी संपर्क ठेवण्याची भूक दिसून येते. त्यासाठी, इतरांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, व्यापार व तीर्थाटनासाठी त्याला पूर्वीपासूनच वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. अगदी सुरुवातीला त्याचे पाय हेच त्याच्यासाठी वाहतुकीचे साधन होते. पुढे तो यासाठी प्राण्यांचा वापर करू लागला. वाहतूक क्षेत्रातली सर्वात क्रांतिकारी घटना घडल्यानंतर म्हणजे चाकाचा शोध लागल्यानंतर या क्षेत्राचा चेहरा आमूलाग्र बदलला. पुढे पुढे जशी जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली, तसतसा वाहतुकीच्या साधनांचा वेगही वाढत गेला. जसजसा वेग वाढत गेला, तसतसे अपघातांचे प्रमाणही वाढत गेले.

वाहतुकीच्या साधनांचा वाढलेला वेग, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची वाढती गरज, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वाहनांच्या सामान्यांच्या आवाक्यात आलेल्या किमती व त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या यांमुळे वाहतुकीच्या नियमनाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली व जनतेच्या जीविताचे व मालमत्तांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी बनल्याने सरकारला वाहतुकीच्या नियमनाची, नियंत्रणासाठी काही कायदे व नियम तयार करणे भाग पाडले.

          Source :Internet
आपण एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वाहतुकीचे नियम हे आपल्याला त्रास देण्यासाठी नसून आपले रक्षण करण्यासाठी म्हणजेच आपल्या भल्यासाठीच आहेत. त्यांचे पालन करण्यात आपलेच हित आहे व त्यांचे उल्लंघन करणे आपल्यासाठीच धोकादायक आहे. ही गोष्ट एवढी स्पष्ट आहे, तरी मला अनेकदा याचे आश्चर्य वाटते, की आपल्या भल्यासाठी असलेली ही गोष्ट लोक सहजतेने का स्वीकारत नाहीत? माझ्या मते याला अनेक कारणे आहेत. नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम हे सरकारचे असते आणि सरकार ते पार पाडतही असते. आता सरकारकडून या अंमलबजावणीच्या कार्यात काही चुका या होतच असणार, जसे की यंत्रणेतील समन्वयाचा अभाव, भ्रष्टाचार इ. पण नियमांप्रति नागरिकांच्या उदासीनतेसाठी सर्वस्वी सरकारला जबाबदार धरणे सरकारवर अन्याय करणारे होईल. नागरिकांच्या या उदासीनतेमागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मानवी प्रवृत्ती. मानवी स्वभाव हा मुळातच काहीसा बंडखोर आहे. एखादी सक्ती तो फार काळ खपवून घेत नाही. नियमांची बंधने त्याला जाचक वाटतात. दुसरे म्हणजे त्याचा अहंकार. आपण एखादा नियम मोडला म्हणजे आपण किती श्रेष्ठ, या भावनेने त्याचा अहंकार सुखावत असतो. त्यातही एखादा नियम मोडून त्यातून आपल्या 'वरच्या' पातळीवरील संपर्कांचा उपयोग करून सहीसलामत सुटणे ही तर त्याच्या अहंकारासाठी पर्वणीच! अजून एक म्हणजे, वेगाप्रति वाटणारे आकर्षण होय. काहीतरी धोका पत्करणे यातही आकर्षण वाटत असावे.

आपण नियमांप्रति उदासीनतेची कारणे पाहिली. यातूनच आपल्याला नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास प्रवृत्त करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय सापडतील. सरकारने यासाठी खरोखर माणसाच्या मानसिकतेचा अभ्यास केला पाहिजे. आवश्यकता भासल्यास त्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली पाहिजे.

आपण वर पाहिलेच, की मानवी प्रवृत्तीला नियम गे जाचक वाटत असतात. सरकार शक्यतो काय करते, की वाहतुकीचे नियम बनवते व त्यांचे जे लोक उल्लंघन करतील त्यांना शिक्षा करते, दंड ठोठावते. यामुळे लोकांच्या मनात या अंमलबजावणी यंत्रणांविषयी क्षोभ निर्माण होतो. यावर उपाय म्हणजे लोकांना दंडाने न समजावता प्रेमाने प्रवृत्त केले तर? म्हणजे कसे पहा: समजा जे हेल्मेट घालत नाहीत, त्यांना शंभर रुपये दंड करण्यापेक्षा जे हेल्मेट वापरतात त्यांना एक प्रमाणपत्र देऊन बघा! हे निश्चितच लोकांना हेल्मेट वापरण्याची प्रेरणा देईल.

माणूस हा समाजशील व पर्यायाने कुटुंबवत्सल प्राणी आहे, हे आपण जाणतोच. त्याच्या या कुटुंबवत्सलतेचा फायदा करून घेता येईल. नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातात होणारे मृत्यू, त्यामुळे मृताच्या कुटुंबावर कोसळणारे आभाळ, त्याच्या कुटुंबियांची होणारी अवस्था यांची हृदय हेलवणारे दृश्ये जाहिराती, पथनाट्ये यांतून जनतेला दाखवली तर ती खूपच परिणामकारक ठरतील.

वाहनांसाठीचे विविध परवाने मिळवण्याची किचकट पद्धत भ्रष्टाचाराला जन्म देते. त्यातून पैसे देऊन अपात्र लोकांनाही परवाने मिळतात. तसेच परवान्यांचे, विम्याचे कागद सतत सोबत बाळगणे लोजांना गैरसोयीचे वाटू शकते. त्यातून मग लोक त्या नियमांप्रति उदासीन होतात व पळवाटा शोधतात, लाच देतात. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कागदपत्रे सतत वाहनाबरोबर राहतील अशी व्यवस्था करता आली तर? वाहनाला चिप जोडणे यासारख्या उपयांद्वारे हे शक्य आहे.

         Source :Internet
लोकांमध्ये या नियमांविषयी जागृती निर्माण करणे हे खूपच महत्वाचे आहे. लोक वेळेवर त्यांच्या गंतव्य स्थळी पोचण्यासाठी वेगाने वाहने चालवत असतील तर त्यांना पाच दहा मिनिटे घरातून लवकर निघून सावकाश वाहन चालवूनही वेळेवर पोचता येते हे दाखवून देणे, वेळेचे नियोजन कसे करायचे याविषयी प्रशिक्षण देणे असे छोटे छोटे उपाय करता येतील. अजूनही खूप काही करता येईल. मनुष्याला नाविण्याचे आकर्षण असते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे जागृतीसाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे महत्वाचे आहे.

वाहतूक पोलीस नियमांची अंमलबजावणी करण्याच्या यंत्रणेतील एक खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे मनोबल वाढवले तर त्यांच्याकडून उत्कृष्ट कार्य करून घेता येईल. त्यासाठी त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यांचे कामाचे तास, त्यांब मिळणार मोबदला यांचा अभ्यास करून त्यात योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत. वाहतूक पोलीस उद्धट असतात असे आपण अनेकदा म्हणतो, पण ते असे का वागतात याचा कधी कोणी विचार केलाय? तो प्राधान्याने केला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन काळानुसार त्यांच्यात व्यावसायिकता व सॉफ्ट स्किल्स मुरावली पाहिजेत. याचा खूप फायदा होईल.

एकंदरीत काय, तर लोकांसाठी नियम पाळणे ही शिक्षा न वाटता तो एक आनंददायी अनुभव व्हावा!

२ टिप्पण्या:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************