कपडे घाण झाले की कपडे बदलतो,शरीर नाही.मग तुमच्या नजरांसाठी 'ती'ने स्वतःलाच का बदलायचं?(भाग-1)

🌱 *वि४* 🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

(यातील फोटो गुगलवरचे आहेत)

कपडे घाण झाले की कपडे बदलतो,शरीर नाही.मग तुमच्या नजरांसाठी 'ती'ने स्वतःलाच का बदलायचं?(भाग-1)
    
राजश्री,मुंबई:
तिने बदलाव की नाही हे तिला ठरवू द्यावं . स्त्री दाक्षिण्याच्या कुबड्या देणं थांबवावं . ती कणखर आहेच , सिद्ध करण्यासाठी वेळ घेईल थोडा पण बाजी मारेल ती ..नजरा न पडलेली स्त्रीचं पवित्र , तरच स्त्रीत्व अबाधित असा जर तिचाही समज असेल , भवतालच्या स्त्रियांना तीही तसच बघत असेल तर , असो...
 या नजरा वार म्हणून घ्यायच्या की आव्हान म्हणून  , हे जेव्हा ती ठरवेल तेव्हा तुमच्या नजरा , मानसिकता दुय्यम ठरेल ...स्त्रीला देवी किंवा दासी , जो दर्जा द्यावासा वाटतो खुशाल द्यावा... जोवर स्त्री स्वतःच मूल्य जोखणार नाही तोवरच इतरांच्या नजरेत स्वतःला पवित्र योग्य बघण्याची धडपड करेल.. तुलनेने शिक्षणाचा , अर्थाजनाचा अधिकार उशिरा मिळूनही स्त्रियांनी बरीच  कौतुकास्पद मजल गाठली आहे ..  आता फक्त नजरा , शब्द यांना वगळून स्वतः वर लक्ष केंद्रित केलं की तिचा वारू चौफेर उधळणार ...जोवर वाघ गोष्ट सांगणार नाही तोवरच शिकाऱ्याच्या गमजा रंगणार...

आशितोष तरडे,पुणे:
संस्कृतीचा नैतिक आदर्श सांभाळताना तिनं एका चौकटीत राहूनच बदलावं हे मान्य पण वासनेन हापापलेल्या नजरांना तोंड देण्यासाठी किती वेळा तिनंच स्वतःला बदलून सामोर जायच. कारण शरीराची बांधणी जशी आईची असते तशीच ती ताईची असते, तशीच परस्त्री किंवा अनोळख्या बाईची असते.आता जर बदलायचंच असेल तर मरकटलेल्या क्षुद्र नजराच बदलायला हव्या.कारण सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या नजरेत असत.'ती'च्या सौंदर्याच्या पाकळ्या नजरेत समावताना त्या कुस्करून जाऊ नये याची काळजी जर पाहणाऱ्याने घेतली तर तिची इतरांच्या नजरेत बदलायची धडपड नक्कीच कुठेतरी थांबेल...

अनिल गोडबोले,सोलापूर:

एक प्रसंग :- एक मुलगी रात्रीच्या ८ वाजता एका रस्त्यावरून चालली होती आणि एक मुलगा येऊन म्हणतो तिला “काय माल आहे?’ यावर ती मुलगी मान खाली घालून निघून जाते .... भ्तीत मुले किवा उगाचच विषय का वाढवावा म्हणून....  या मध्ये तो काय अर्थ घेतो ... मला घाबरली .. मुली काय अस आणि तस घाबरतात ... हा मेसेज समजा पर्यंत जाऊ नये म्हणून काय कराव?

प्रसंग २ :- एक बाई जी देहविक्री करते आहे.... तिला गिर्हाईक पाहिजे आहे.... एकजण शिट्टी मारतो त्यावर ती म्हणते ... “चल ना साले... XXX मे दम ही तो आ .. पैसा फेक .. उधर से सिटी काय को बाजायला है बे.... यातून नेमक काय बदलल जन अपेक्षीत आहे

प्रसंग ३:- एक मुलगी जी आपल्या मित्रासोबत पार्टी करून रात्री निघाली होती.... एका आमदार पुत्राची नजर पडली त्याने तिचा पाठलाग केला .. तोही कर मधून... शेवटी त्याने तिच्या गाडीला धक्का मारला ती घाबरून जास्त स्पीड ने चालवू लागली... या मध्ये काय बदलायला पाहिजे

प्रसंग क्र. ४ :- एका नाक्यावर ... एक नवीन प्रकारचे कपडे घालून निघाली होती.. त्या कपड्यामधून तिचे शरीर व आकार स्पष्ट दिसत होता.. दोन तीन जनाच्या टोळक्याने तिला बघितले... छेडण्याचा प्रयत्न केला.. तिने उलटून एकाला ठेवून दिली .. भांडण वाढल.. एक मध्यस्थी बाई आली वयस्कर ... ती म्हणते कि “ या पोरानी ताल तंत्र सोडला आहे पण तू तरी कुठे भारतीय संस्कुती ला धरून आहेस... असले कपडे घातल्यावर पोर अशीच वागणार.... या मध्ये नेमक काय बदलायला पाहिजे

प्रसंग क्र. ५ :- लग्न जुळवण्याचे कार्यालय... वधूच्या अपेक्षा... सरकारी नोकरी, स्वताच घर. आईवडील नकोत पगार कमीत कमी १ लाख महिना ... आई वडील शक्यतो नकोत सोबत.. (कारण त्यांना एन्जोय करता येत नाही) अशा ... विविध अपेक्षा मध्ये न बसलेला एक मुलगा वय ३५ .... विचारतो... तुमच्या कडे कोणी माझ्या पगारात बसणारी मुलगी नाही का? नकारार्थी उत्तर घेऊन तो बाहेर पडतो .. मित्र भेटतो.. एका मुलीचा नंबर देतो... म्हणतो.. ऐश कर ... पुढच पुढे बघू.... जिचा नंबर मिळतो ती त्याची बालपणीची मैत्रीण....वय ३५ तीच.. नवरा वारलेला.. चांगल घराणे बघून केलेला... व्यसनी गेलेला आता जगण्यासाठी हा पर्याय... यात काय बदलायला पाहिजे 

...तुमच्या नजरांसाठी तिनच बदलायचं का? तर अजिबात नाही ..पण तिला बदलाव लागेल... पहिल्यांदा घरात बदलाव लागेल .. हि पुरुषांची आणि महिलांची काम अशी वेगळी काम न समजता घरात समान काम देऊन.. आपल्या मुलाला देखील तेवढच जपलं पाहिजे जेवढ मुलीला जप्त येईल तेवढ.. घरातल्या अन्यायाला वाचा फोडून... काही ओष्टी भीतीने गप्प बसून सुटत नाहीत म्हणून ..
तिला नवर्याला हे सांगण हे गरजेच आहे कि मुलगी किती  वाजता येते काय कपडे घालते यावर लक्ष ठेवच पण तिला हा सल्ला नको देऊ कि “ हे आपल्या संस्कृती मध्ये नाही म्हणून घालू नको... तर तुला जे चांगल वाटत आणि जे कपडे.. कपडे घालण्याचा हेतू पूर्ण करतात ते सगळ पेहराव तू करू शकतेस... आणि सासू किवा आई यांना सांगू शकतेस ... कि मुलीने काही कपडे घातले म्हणून मुलांनी नजेरेने त्यांना बलात्कार करण्याचा परवाना मिळत नाही...उलट एवढ्या रात्री नाक्यावर उभा राहून तू काय करतो हे विचार त्या मुलाला व तिला स्वताला समजाव लागेल कि ती एक व्यक्ती आहे ती “माल” नाही... आणि जर तिला कोणी माल म्हणत असेल तर त्याला सांगायला पाहिजे कि तुझी आई किवा बहिण सुधा माझ्या सारख शरीर घेऊन फिरतात त्यातूनच तुझा जन्म झाला आहे... आणि हे न घाबरता स्वतःच संरक्षण करण्याची शक्ती ठेऊन... तिला भेटणाऱ्या श्वापदांना मारायचं नाही आहे... त्या पुरुषाचे चुकीचे विचार आहेत... जे त्याला इतर समाजाकडून आले आहेत ते बदलण्यासाठी संवाद साधावा लागेल... मित्र म्हणून त्याला आदर करायला भाग पाडाव लागेल.
तिला आपल्या मुळीच लग्न ठरवताना योग्य वर जुळवण्यासाठी जाती, धर्म. कुल. पैसा. घर. कुंडली पेक्षा तो मुलगा किती समजूतदार आहे. प्रेमल आहे... संघर्ष करणारा असू  कि माझी मुलगी त्याला साथ देईल आणि ते एक छान स्मराज्य उभारतील... समजत काही स्त्रिया आहेत त्यांना नाईलाजास्तव देहविक्री करावी लागते... पुरुष स्त्री या दोघानाही लैगिक सुखाची गरज असते... ते अस पैसा घालून.. ओरबाडून घेता येत नाही... त्याला नाजूक भावनेने हाताळायला पाहिजे...
बघा खूप अपेक्षा करतो आहे....पण याचा अर्थ असा नाही कि पुरुषांनी अस वागाव.. अस वागताना दिसला कि त्याला जमेल त्या पद्धती ने सांगायला पाहिजे... तू चुतो आहेस.. बरोबर हे आहे कि.. मी एक स्त्री आहे.. जे तू करतो ते सगळ मी करू शकते.. इथून पुढे कमी समजलास तर य्याद राख ... गाठ माझ्याशी आहे...
बघा जमल तर बदलून... मी प्रयत्न करत आहे पुरुष असून .


यंत जाधव,लातूर:
माझे स्पष्ट मत आहे की स्त्रीला पुरूषांच्या विखारी नजरांसाठी अजिबात बदलणयाची गरज नाही.तिला पूर्ण अधिकार आहे तीने काय पोशाख धारण करावा.आता काळ बदलला आहे.जर पुरुषाला काय कपडे परिधान करावे काय करू नये हा अधिकार आहे तसा तिला पण असलाच पाहिजे.गरज आहे पुरुषी मानसिकता बदलण्याची.आजही मला सामाजिक क्षेत्रांत काम करत असताना अनुभव आलेले आहेत.एखाद्या स्त्रीने कपडे कसे घातले आहे यावरून तिचे व्यक्तीमत्व किंवा तिचे चारित्र्य ठरवले गेलेले आहे.आपण कुंटुंबामध्ये नेहमी मुलीला सांगतो चांगली वाग पण किती पालक त्यांच्या मुलांना सांगतात की त्या मुलीकडे चांगल्या नजरेनं पहा.सर्वप्रथम आपल्या घरातून सुरूवात करा.स्त्री ने सुध्दा खंबीर होण्याची गरज आहे.एखाद्या विखारी नजरेच्या व्यक्तीला स्पष्ट शब्दांत सांगता आले पाहिजे की तू ज्याकडे घाण नजरेनं पाहत आहे ते निसर्गाने दिलेले वरदान आहे.सगळ्यांना असते,तुझ्या घरी तुझ्या आई-बहिण व मी फक्त तुझी पाहण्याची मानसिकता बदल.मी स्पष्ट मत मांडत असे सडेतोड बोलल्या शिवाय ही पुरूषी मानसिकता बदलली जाणार नाही.प्रत्येक स्त्री यावर मोकळ्या मनाने बोलायला हवे.हे मत वाचून सर्व षुरूष मंडळीने मला स्त्री धार्जिणा म्हणले तरी चालेल.


संदिप बोऱ्हाडे, पुणे:
भारताला स्वतंत्र मिळून आज बरीच वर्षे झाली परंतू आजही या देशात स्रिया गुलामीचे जीवन जगत आहेत.. स्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिलेल आहे आजही तसच सुरू आहे..
आपल्या भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्या नजरेत स्रीयांची किंमत फक्त भोगवस्तू म्हणून राहिलेली असेल तर स्रियांची परिस्थिती कशी बदलणार..
स्त्रियांना आदर करण्यास तेव्हाच सुरवात होते जेव्हा मुलीची बीजे रोवली जातात आईच्या उदरा मधे..आणि अल्ट्रा सावुंड परीक्षणात दाखविते की मुलगी आहे...मला सांगा किती भारतीय कुटुंबांना आनंद होतो ??आजची स्त्री ही चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे. काही वर्षांपूर्वी परंपरेच्या नावाखाली स्त्रियांना पार जखडून टाकलेलं होतं,त्यात आजही काहीच बदल नाहीच. बाईच्या भावना समजून घेणं,त्यांची कदर करणं ही तर दूरची गोष्ट.आज अनेक स्रिया खूप उच्च पदावर देखील राहिलेल्या आहेत..ग्रामीण भागात आज स्रिया सरपंच किंवा इतर पदे भूषवू लागल्या आहेत पण आजही त्यांचे नवरोबा सगळा कारभार पाहतात आणि तिला फक्त नावासाठी वापरतात..लग्न केल्यावर स्त्री आणि पुरुष बंधनामध्ये अटकतात..मुले वैगेरे झाली की हेच पुरुष त्यांना घटस्फोटाच्या धमक्या देतात त्यामुळे या स्रिया दबल्या जातात..मी म्हणतो की सरळ या महिलेने त्या पुरुषाला घटस्फोट देऊन टाकावा...किती सोसायच तिने... असे म्हणतात की जगात असे एकच न्यायालय आहे की तिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम..आज आई म्हणजेच महिला स्त्री मग ती प्राणी पक्षी पशुची असो तिची माया प्रेम आणि कष्ट सर्वच जण आपण पाहत आहोत..तिची बरोबरी कोणीही करू शकत नाही.पण पुरुषी मानसिकतेपुढे स्रियांच काहीही चाललेले नाही..किती दिवस त्यांनी ही गुलामगिरी सारखे जीवन जगत राहायचे.
मुली या घराण्याच्या दिवा नाही म्हणून काय झाली तुमच्या आणि कित्येक घराण्याच्या त्या पणती आहेत ....
आजच्या माणसांच्या मनातला राक्षस मारायला हवा..जो आपल्या मुलीला, आईला , बहिणीला , बाजूच्या मुलीला, किंवा कोणत्याही नातेवाईक असलेल्या मुलीला अश्लील नजरेने पहातो..त्यांच्या मनात राक्षस नाही तर माणूस तयार होणे गरजेचे आहे..आणि अश्या गोष्टी होण्यासाठी कारणीभूत आहे ती पुरुष संस्कृती मानसिकता.नुसते 50% आरक्षण देऊन फायदा नाही कठोर कायदे आणि शिक्षा असावी..

सौदागर काळे,पंढरपूर:

तिच्यातला मी

मी 'तो'आहे. .
जो कधीच तिच्यासाठी बदललो नाही.
'ती'एक आहे..
जी कधीच स्वतःसाठी बदलली नाही.

वर्षानुवर्षे त्याच्यासाठी ती बदलत
आली निमूटपणे..
असे किती 'हुंदके' गिळले असतील
तिने त्याच्या 'मी' पणासाठी..

तो एक आहे..
तिच्याच उदरात जन्मला
तरीही शोधत राहिला,
तिला शोषणासाठी..

तो 'तोच'आहे..
जो तिला पुरुषार्थ सांगत राहतो..
घडलेल्या,घडवलेल्या
त्याच्या अमानुष गोष्टींचा .

तो नेहमीच सांगत राहिला..
या व्यवस्थेला-'ती'अबला आहे.
मात्र तिच्यासाठी ...
होता तो .. मुक्या माराचा वण.

आता त्यानं पुकार करावा.
तिच्यासाठी..
नव्या व्यवस्थेसाठी...
नव्या उमदीने सांगावं...
मीच 'तो 'जन्मतः असलेला
"तिच्यातला मी"

तेजस्विनी जाधव,इंदापूर:
स्त्रियांना सर्वांत जास्त काय आवडतें तर स्वतःला नटवाईला,छान दिसायला पण फक्त स्वतःचा खोलीत बाहेर नाही आवडत जायला का तर लोक खुप मूर्खा सारखी पाहतात म्हणून, असे पाहतात की आयुष्यात कधी मुलगीच नाही पाहिल्या सारखे .
बुरखा पध्दत बंद झाली पण अजुनही माणसाचा वाईट नजरे पासून स्वतःला वाचवण्यासाठी ती स्वतःच स्वतःला पडद्याआड ठेवत आहे.अजुन किती दिवस तेनेच स्वतःला लपवाईच.
     केवढे छोटं जग असते काही काही स्त्रियाचे ,अहो आणि त्या छोटासा जगात सुद्धा तिला तिच्या प्रमाणे वागता येत नाही.  मुलींना नेहमीच सांगितल जाते की असे कपडे घाल, इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस ,पण ही सगळी बंधणे तिच्यावरच का???स्त्री ही समजुन घेत, का तर वाद नको वाडायला. पण तिच्या या गप्प बसणाने समाजाला असे वाटतेय की ती दुबळी आहे,परावलंबी आहे. पण तिला समजुन घेणारे ,वर मान करून जगायला मदत नाही करत .....स्री ही त्या मोती तयार करणाऱ्या अळी प्रमाणे असते, ती बाहेरचा शत्रू पासून वाचवन्यासाठी  स्वतःलाच त्या शिंपल्यात बंद करून घेते आणि मोत्या सारख्या मौलेवान वस्तीची निर्माती करते,पूर्णे आयुष्य संपते तिचं त्याच्यातच दुसऱ्यासाठी जगणात, घाबरण्यात,तसेच आहे स्रीचं  जीवन तीने स्वतःला किती बदले तरी काही उपयोग नाही कारण जो पर्यंत पाहणाराचा नजरेत चूक आहे तो पर्यंत काही उपयोग नाही,  स्वतःची नजर बदला.जग बदलेल.

When the clothes become dirty, the clothes change, not the body .Then why do you want to change that look for your eyes?

What women like most, if they like to look good, but they just do not like going out of their own room, people see that they are very silly, just like they never saw a girl in life.
The method of shutting down has stopped, but to save itself from the evil eye of the person, she herself keeps the screen underneath. How many days itself she hides herself.
     How many small worlds are there, some women, even in that small world, she can not be treated like her. The girls are always told that they should not wear them, do not go there, do not go there, but all this bond is on her.
Understanding the woman, why not resolve the issue. But with her silence, the community thinks that she is weak, is dependent. But she does not help thinking, respecting her .....She is like a pearl that is made of pearls, she closes herself in the shrimps to save herself from an outside enemy, and produces a mohant like a pearl; the life of her life ends, her life is in the second place, she is scared, as well as the life of a woman. Not because there is no use till the viewer's mind is wrong, himself Badalajaga publication will look.

राज इनामदार,पंढरपूर:
आज जगाने कितीही प्रगती केली असेल , चंद्रावरून आता मंगळावर सुधा पाय ठेवला आहे .इतकी प्रचंड प्रगती करून सुधा एका गोष्टीत आपण मागे आहोत असे मला वाटते .ते म्हणजे स्त्री च्या बाबतीत .

*ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही ,
 मी बहर येथे शब्दाचे सहज उधळलें होते*       

अहो जन्म घेतल्यापासून ती बदलतच आलीय कारण तिला नेहमीच सांगण्यात आल की तूच बदलायला हव .आणी ती बदलत सुधा आली ....वडिलांची लाडकी असणारी छकुली जेंव्हा मोठी होती तीच लग्न ठरते ...लग्न जमते आणी लग्न झाल्यावर सर्व प्रथम ती आपल घर आणी आडनाव बदलते  आणी त्यानंतर आपल्या आवडी निवडी सुधा ....म्हणजे काय तर आयुष्यभर स्वतमधे बदल घडवते ती स्त्री ...स्त्री म्हणजे एक प्रकारचे अनमोल असे एक वरदान आणी परमेश्वराने दिलेली अनमोल भेटच .म्हणुन स्त्री पूर्वीपासुनच पूजनीय आहे .पण जेव्हा अशा अनमोल स्त्रीच्या 50% आरक्षणाच्या आपण भरपूर गप्पा मारतो ....पण स्त्री च्या शंभर टक्के संवरक्षनाची खात्री कोणीच देवू शकत नाही. कारण या मातीमध्ये स्वामी विवेकनंदा सारखे तरुण दिसेनात
मुघल सरदाराच्या सुनेला मातेचा दर्जा देवून चोऴी बाँगडी देवून सन्मान पूर्वक पाठवनारे छत्रपती शिवराय यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयांना सन्मान देणार्याची आजकाल संख्या कमी होतेय .आजपर्यंत खूप बदलत आलीय *ती*.  आता बदलायला आपण हव .चला विचार आपली नजर आणी मानसीकता बद्लुया .विद्येची, धनाची व शक्तीची उगम देवता स्त्री आहे .ती च्या विना सम्पूर्ण जग अधूर आहे .चला आता आपण बदलुया.

करण बायस, हिंगोली:
आपण दररोज बलात्काराच्या घटना tv वर बघतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो. यामध्ये चूक कोणाची असेल. पुरुषाची, स्त्रीची, शरीरामध्ये होणाऱ्या chemically बदलांची?ज्या वेळेस एक बाळ घरी जन्म घेते त्या वेळेस त्याची बुद्धी एका नवीन तयार झालेल्या computer सारखी असते. काहीच माहीत नसते.जसजसं ते मोठं होत त्याला घरचे वडीलधारी लोक त्यांच्या परीने होईल तेवढ्या चांगल्या शिकवणी देत असतात.पण तो त्या वेळेस फक्त घरच्यांचं सानिध्यात नसतो तर तो समाजसोबत पण मोठा होत राहतो आणि समाजातल्या गोष्टी सुद्धा शिकत असतो.मग प्रत्येकाच्या घरी चांगल्या गोष्टी शिकवतात तर मग मुलांमध्ये वाईट गोष्टी कुठून येतात ?सोपं लॉजिक आहे समाजामधुन,ते depend करतं त्या मुलाच्या मैत्री वर. तो मुलगा घरी तर अस नाही बोलणार की बघ ती आयटम चालली,तो बाहेर गेल्यावर मित्रांमध्ये अस बोलणार.तर गरज घरच्यांवर टीका करण्याची नाही समाज सुधारण्याची आहे.मी काही दिवसाधी या group मध्ये एका जन बोलताना बघितलं की आपण समाज बदलू शकत नाही पण मला असं वाटतं की हे सगळं आपल्या mind power & will power वर depend करते.खरं गरज आहे तर समाजात बदल घडवण्याची कारण कोणाच्याही घरचे अस म्हणणार नाहीत की माझ्या मुलाने बाहेर 'ती' च्याकडे वाईट नजरेने बघावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************