पुरोगामी म्हणजे नेमक काय रं भाऊ ?(भाग १)

🌱 वि४🌿व्हॉट्सअप ग्रुपवरून

पुरोगामी म्हणजे नेमक काय रं भाऊ ?(भाग १)

               Source: Internet

पी प्रशांतकुमार ,अहमदनगर:

    ....आजकाल पुरोगामी म्हणजे नेमकं काय हेही ज्यांना समजत नाही ते हेटाळणीच्या स्वरूपात 'फुरोगामी' म्हणून ओरडताना दिसतात..
        बऱ्याच जणांना तर पुरोगामी म्हणजे देशद्रोही किंवा दहशदवादीही वाटायला लागले.. 'देशद्रोही' का? अस विचारलं तर त्यांचं म्हणणं असत ते फक्त हिंदू आणि हिंदू धर्माचा द्वेष करतात ..अखंड भारताला ते धोका आहेत वगैरे वगैरे..
....पण खरंच पुरोगामी म्हणजे नेमके कोण??प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे..मला वाटत पुरोगामी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे लोक..निव्वळ रूढी परंपरा आहे म्हणून डोळे झाकून आहे ते स्वीकारण्यापेक्षा बुद्धीच्या कसोटीवर निरखून मग स्वीकारणारे.. 
खरा पुरोगामी हा नेहमीच सहिष्णू आणि टीका खेळकर वृत्तीने स्वीकारणारा असावा..आणि समोरच्यावर टीका करताना/चुका दाखवताना अनाठायी आक्रस्थाळेपणा न करणारा असावा..
... *बदल* हा जगाचा स्थायीभाव आहे हे मानून ज्यायोगे देशाचं,लोकांचं जीवनमान उंचावेल सामान्यांचं जगणं सुसह्य होईल अशा बदलांना तत्परतेने मान्यता देणारे लोक म्हणजे पुरोगामी..

   ...शिक्षणाचा आणि पुरोगामीत्वाचा तसा फारसा काहीच संबंध नाही.उलट दुर्दैवाने आज शिक्षित समाज जास्त मागास..बुआबाजी रुढीपरंपरात अडकताना दिसतोय
...स्वताच्या धार्मिक भावना बाजूला ठेवून ठाणलेल्याला गंगेच पुजेच पाणी पाजणारे नाथ असुदेत वा बुवाबाजी आणि जोखड बनलेल्या रूढी परंपरांवर टीका करणारे तुकोबा-गाडगे महाराज हे माझ्या दृष्टीने पुरोगामी..

विचारांचा लढाई विचारांनीच लढावी हे पुरोगामी तत्व. मला तुमचे विचार पटत नाही म्हणून मी गोळी घालून तुमचा खून करतो ही मानसिकता असणारा पुरोगामी असूच शकत नाही .. उलट मला तुझे विचार अजिबात पटत नाहीत पण तुला तुझे विचार मांडण्याचं सदैव स्वतंत्र असावं ह्यासाठी मी सदैव लढेन ही पुरोगामी मानसिकता असते

...आता माझ्या बद्दल विचारलं की मी पुरोगामी आहे का??तर उत्तर असेल अजून नाही ..अजून खूप प्रवास बाकी आहे.. पण पुरोगामी व्हायला नक्कीच आवडेल..


संदीप बोऱ्हाडे मावळ,पुणे:

              पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक.
      खरे तर श्रद्धा-अंधश्रद्धा, आस्तिक-नास्तिक, पाप-पुण्य हा वाद सनातन आहे आणि तो सनातन काळापासून चालत आलेला आहे. त्याच्यातील अस्पष्ट सीमारेषा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच समाजातील अज्ञान, अंधविश्वास दूर झाला पाहिजे. कारण त्याचा फायदा घेऊन देवाच्या-धर्माच्या नावाने, तंत्र-मंत्राच्या नावाने, केवळ आर्थिकच नव्हे तर शारीरिक आणि लैंगिक शोषण होत असल्याचे सर्रास प्रकार घडत असतात.
  
     खरे तर माझ्याच बाबतीत सांगायचे झाले तर मी सुद्धा लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी आजोबांनी सांगत आलेल्या गोष्टी सत्य मानत होतो देव..धर्म या सगळ्या गोष्टी..कालांतराने मी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून सत्यता पडताळून पहायला लागलो आणि समजले की खरच या सगळ्या अंधश्रद्धा आहेत..मागील काही वर्षापूर्वीचा इतिहास देखील पहिला तर आपल्याला समजेल की किती भयानक गोष्टी चालीरीती परंपरा होत्या..कालांतराने त्या हळूहळू बंद होत आहेत पण कायमच्या बंद होतील असे मला तरी वाटत नाही...कारण सर्वच धर्मात या अनिष्ट प्रथा आजही आहेत आणि  त्या हेच कट्टर धर्मवादी अजून खतपाणी घालत आहेत...आपण विरोध करायला गेलो की आमच्या धर्मावर बोललात तुमच्यावर केस करतो असे मलाही एक दोन माझ्या मित्रांनी सुनावले आहे.

  समाज शहाणा व्हावा असे कुणालाच वाटत नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेतील सेक्युलर या शब्दाचा निधर्मी असा अर्थ अभिप्रेत आहे. किमान शासन तरी निधर्मी असले पाहिजे. त्या अर्थाने शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या पूजाअर्चा योग्य आहेत का, सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय पूजा करणे घटनेतील निधर्मी तत्त्वाला धरून आहे का, या प्रश्नांवरही एकदा चर्चा व्हायला पाहिजे. वास्तविक पाहता, सर्वधर्मसमभाव हा विचार उदात्त वाटतो, परंतु त्याचा अर्थ विपरीत होऊ शकतो. सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्माचा आदर करणे, म्हणजे त्या-त्या धर्मातील बऱ्यावाईटासकट सर्व चालीरीती, वर्णव्यवस्था, बुरखा पद्धती किंवा मुले ही ईश्वराची देणगी आहे म्हणून कुटुंबनियोजनाला विरोध करणाऱ्या विचारांचा, प्रथा-परंपरांचाही आदर करणे नव्हे काय?

    आजही अनेक भयानक प्रथा सुरू आहेतच की अनेक म्हणजे सर्व धर्मात या सुरूच आहेत त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न कमीच केले जातात, जातीभेद देखील अजूनही गेला नाहीच..राजकारणी लोक देखील देव धर्मात लोकांना गुंतवून ठेवण्यात धन्यता मानतात..त्यानांही सुधारणा नको आहेत...आणि जर सुधारणा झाल्या तर दोन धर्मात वाद तरी कसा काय लावणार..आणि आपली वोट बँक कशी संभाळणार ??

  उठताबसता आपण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचा डांगोरा पिटत असतो. का तर म्हणे मागासवर्गीयांना सवलती देतो, महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केले, शेतकऱ्यांना कर्जमाफी, रोजगार हमी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य वगैरे, ही सगळी प्रचारकी उत्तरे आहेत.

  खरेतर 'पुरोगामी' होणे म्हणजे काय..?? तर माणसाला 'माणसाची' ओळख देऊन त्याला 'माणसासारखे' वागवणे होय, समानतावादी व विज्ञानवादी बनणे होय !!!

    मला तरी या जीवनात निधर्मी म्हणून मरायचे आहे..आज सगळीकडे धर्मामुळे जातींमुळे दंगल वाद आणि अगदी भारत पाकिस्तान हा वेगळा देश होण्यास धर्मच जबाबदार आहे..आपण सगळे वाट पाहुयात की सर्व लोक धर्माच्या बेड्या झुगारून कधी भारतीय म्हणून स्वतःहाला म्हणवून घेतात याची..
धन्यवाद.

                        Source: Internet

किरण पवार ,औरंगाबाद:
      पुरोगामी म्हणजे सहसा सतत्या जाणून घेतल्यानंतर पडताळणी करून त्या गोष्टीबद्दल मत व्यक्त करणे किंवा ती गोष्ट प्रत्यक्षात अंगीकारणे. सध्यातरी आपल्या देशाच्या कुठल्याही ग्रामीण भागात पुरोगामी विचारांची मंडळी आपापल्या फार कमी आढळतात. याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला दैनंदिन वृत्तपत्रातून अंधश्रद्धेच्या घडलेल्या घटनेवरून येतेच. त्यात नरबळी, करणी वगैरे सारखे प्रकार फार असतात.
          ग्रामीण भागातच सहसा अंधश्रद्धेला लोक बळी का पडतात? याच मुळ कारण म्हणजे स्त्रिया. स्त्रियांना वाटेल की, हा आरोप आहे पण ही सत्यता एक नमुना देऊन स्पष्ट करतो. *स्त्रियांच मन अतिशय संवेदनशील असतं हे सर्वांना ज्ञात आहे.  त्यामुळे होतं असं की, काही अज्ञात लोक स्त्रियांना एक प्रकारची भिती दाखवतात. स्त्रियांच्या मनात भिती घर करून राहते आणि तिला सतत वाटत राहत की, आपल्या कुटुंबातील कोणाचही नुकसान होऊ नये. मग नंतर तिची हीच भिती तिला अंधश्रद्धेच्या आहारी नेते.*
           पुरोगामी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हे जरी खर असलं तरी सध्या पुरोगामी विचार समाजात दृढ करायला ग्रामीण भागातील स्त्रिला सर्वांगाणे सक्षम बनवल पाहिजे. तिला उच्च शिक्षण दिल गेल पाहिजे जेणेकरून *"ती" तिच्या संवेदनेला बळी न पडता, ठामपणे अंधश्रद्धेविरुद्ध ऊभी राहीली पाहिजे.*
          आपण हमखास पाहतो तर *ग्रामीण भागात मुलींना शिक्षण दिल जात आहे पण त्या शिक्षणाने आपण त्यांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून कितपत विचारस्वातंत्र्य देतो?* आपण त्यांना महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम शिकण्यासाठी कितपत पाठवतो? *मुलगी आपण घर बसल्या शिकवतो. फक्त परिक्षेला ती बाहेर पडते. अशाने तिच व्यक्तिमत्त्व कितपत घडणार?*
           या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज आज भासत आहे. कारण अंधश्रद्धेने गेलेले चिमुकल्यांचे नरबळी आता अजून पहावत नाहीत. "पुरोगामी" शब्दाचा सर्वार्थ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सकारात्मकता सकारात्मकतेने पाहिली जाईल.

सदरच्या विषयावरची कविता:-

साधू दारावर आला
तुला भिती दाखवली
दया कर माय
शब्दाने भूल दाखवली,

मुलंबाळं चांगले राहो
अमिशात तुला गुंतवली
करणी प्रकार म्हणत
संपत्ती लुटत चालवली,

त्या चिवल्या डोळ्यांचा
काय हा दोष
अज्ञानी ही जनता
पुन्हा करी रोष,

आधीच सावध हो
"पुरोगामी" शब्दाला समज
अंधश्रद्धा ही मायानगरी
तुला आत ओढू लागली.

मारोती देव्हाडे , बुलढाणा:
            
        खरतर या संकल्पनेची व्यापकता खुप मोठी आहे . पुरोगामी व्यक्ति किंवा समाज म्हणजे आपले जीवन जगत असताना आपली वाटचाल ही सत्सतविवेक बुध्दिच्या आधारे करत असतो.समाजातील वाईट प्रथा,पंरपराची रि-ओढत न बसता कालानुसार मानवपयोगी बदल स्विकारत मार्गक्रमण करत असतो .स्वत:चा विकास करत असताना सोबतच समाजाला,राष्ट्राला घेऊन जाण्याचा प्रयत्न करित असतो .म्हणजेच वाईट गोष्टींना निर्भिडपणे नाकारात ,चांगल्या गोष्टी आनंदाने स्विकारतो,स्वहित साधताना सोबतच समाजहीत,राष्ट्रहित साधत असतो तो खरा पुरोगामी.......   

                  Source: Internet
समीर सरागे ,यवतमाळ:
       सद्या आपल्या कड़े पुरोगामी या शब्दाचा अर्थ हळू हळू बदलू लागला आहे तसे पाहता पुरोगामी म्हणजे शाश्वत परिस्थितिची जाणीव असलेला , आधुनिक विचारसरणी अवलंबलेला ,  चिकित्सक बुद्धि असलेला , बुद्धिज्जीवि , विचारवंत ,जो समाजात तसेच समाज जीवनात एक  सुधारवाद रुजविनारा असा पुरोगामीत्वचा  शब्दशः अर्थ होतो.

परंतु आता  अलीकडे या पुरोगामी  चा अर्थ   हिंदुत्ववादी विचारसरणीला , लोककल्याणकारी  योजनाना , देशभक्ति , आणि देशाच्या हिताला विरोध करणे इत्यादि या पुरोगामीचा अर्थ होऊन बसला आहे.  सर्वात महत्वाची बाब म्हणजे या देशात  हिंदुत्ववादी  विचारसरनिचे सरकार आहे, आणि हेच पुरोगामी मंडळीचे दुखने आहे.  भारतात हिंदुत्ववादी विचारसरणीला विरोध करणे , डाव्या विचारसरनीला प्रोत्साहन देणे,  अभिव्यक्तीच्या नावाखाली देशविघातक कृत्याना समर्थन करणे , देशाच्या विकासकामाना विरोध करणे वैगरे  अशा प्रकारे पुरोगामित्वाचा अर्थ हल्ली होऊ  घातला आहे.  आणि त्यांना तेच अपेक्षितही आहे.

अलीकडे गेल्या वर्षी  डाव्या विचारसरणी असलेल्या पत्रकार गौरी लंकेश यांची काही अज्ञात व्यक्तिनि हत्या केली (कोणाचीही हत्या असो त्याचे समर्थन मुळीच करता येणार नाही )  परंतु तेव्हा  पहिला आरोप हा संशययाच्या दृष्टीकोनातून  हिंदुत्ववादी संगठना वर ठेवन्यात आला. यात बेम्बिच्या देठापासुन ओरड सुरु झाली आणि यात सर्वात जास्त हि  पुरुगामी मंडळी अग्रेसर होती  त्यांच्या हो त हो मिसळनारे स्वताला बुद्धिजीवी  म्हंनवून घेणारे लोक हैश टैग लावून आंदोलने करण्यात आणि कोणत्याही यंत्रने मार्फ़त  शाहनिशा आणि चौकशी न  होता  केवळ संशया वरुण  हिंदुत्ववादी संगठनाना बदनाम करणे सुरु केले  गौरी लंकेश या हिन्दुत्वावर ,त्यांच्या प्रथा ,संस्कृति विरुद्ध लिखाण करायच्या याचा अर्थ  हिन्दूत्ववाद्यनिच त्यांची हत्या केली असा कयास  काही लोंकाकडून लावण्यात आला , मग जेव्हा सत्य समोर आले की गौरी लंकेश यांची हत्या नक्षली वादतुन एका मथेफिरू ने केली आहे. तेव्हा हीच पुरोगामी मंडळी मूंग गिलून  बसली होती  व त्या अनाठाई केलेल्या आरोपावर माफी मागायची तसदी देखील घेतली नाही.  इथे हा प्रसंग  मुद्दामुन  उदाहरणार्थ  विषद करावा लागला, म्हणजे अशी कोणतीही घटना जेव्हा देशात घडते तेव्हा सर्वात आधी  हीच काही  पुरोगामी मंडळी कसलिही शाहनिशा न करता हिंदुत्ववादी संगठनाना आरोप प्रत्यारोपाने  झोड़पुन काढ़न्याचे काम करत असते, आतंकवादी जे धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांचे मूडदे पडतात त्यावर हे पुरोगामी ब्र देखील कढ़ायला तयार नसतात, जम्मू काश्मीर मध्ये कश्मीरी पंडिताचे खून करुण त्यांच्या स्त्रियां व मुलाबाळा वर अत्याचार करून तेथून कश्मीर पंडिताना हकलूंन लावले त्यावर ही पुरोगामी गैंग तोंडात मिठाची गुळणी करून चुप बसतात,  केरळ मधील हिंसाचार असो की बंगाल मधील अत्याचार असे भरपूर उदाहरण देता येईल ,असो , मूळ मुद्या कड़े येऊ या.

अलिकडेच केंद्रीय कायदा व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांनी मुस्लिम समाजातील  *त्रिवार तलाक* या  कृप्रथे विरुद्धचे विधेयक नुकतेच संसदेच्या लोकसभा या सभागृहात मांडले गेले लोकसभेत सदर विधेयक सर्वानुमते पास झाले, परंतु हेच त्रिवार तलाक विधेयक राज्यसभेत पास होऊ शकले नाही कारण तीथे विरोधकानी या विधेयकावर गोंधळ घालने  सुरु केले आणि आता हे विधेयक राज्यसभेत अड़कुन पडले आहे.मग प्रश्न असा पडतो की,  हेच स्वताला पुरोगामी म्हणवनारे आज त्रिवार तलाक या बिलाला विरोध करत आहेत कारण यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विरुद्ध जाऊन पूर्व प्रधानमंत्री यानी  हे तीन तलाक बिल रद्द केले होते,   सांगायचे तातपर्य म्हणजे हिन्दुविचारसरणी असलेल्या सरकारने मुस्लिम समाजात असलेल्या त्रिवार तलाक या कृप्रथे विरुद्ध आणि मुस्लिम महिलांच्या सन्मानार्थ  हे विधेयक संसदेत मांडले गेले यावर  पुरोगम्यचा विश्वास बसलेला नाही.

पुरोगम्यना प्रत्येक वेळी केवळ हिन्दू धर्मातच पूरोगामीत्व शोधयाच असत. इतर समाजात किंवा  इतर धर्मातील अनिष्ट रूढ़ी परंपरा विषयी ,जागरुकते विषयी    सुधारनावादा विषयी यांना काहीच देणे घेणे नसते.
सांगायचे तातपर्य असे की, पुरोगामी असणे म्हणजे केवळ हिन्दू धर्मातील रूढ़ी, परंपरा , संस्कृति ,चलिरिती या  विरुद्ध जाऊन केवळ सुधारणांच्या नावाखाली एका धर्मला त्यांच्या उपासना पद्धतिला आव्हान देणे म्हणजे   तुमचं पुरोगामीत्व आहे क़ाय?  पुरागामी म्हणजे केवळ नास्तिक असणे असा त्याचा अर्थ होतो काय?  मग  आज जगात सर्वच धर्म अस्तित्वात आहेत त्या प्रत्येकांची आप- आपली एक उपासना पद्धति, रूढ़ी, परंपरा आणि संस्कृति आहे. मग तीथे कोणी पुरोगामीचा बुरखा घालून सुधारनवाद घडवून आनण्याचे प्रयत्न केलेले एकवित नाही. हे मान्य करायला हवे की कधी काळी आपल्या हिन्दू धर्मात अनिष्ट ,रूढ़ी,  चाली रीति, अस्तित्वात होत्या. जसे  स्त्रीने सती जाने, बाल विवाह , अंधश्रद्धा  वैगरे परंतु आज त्या सर्व चालीरीति काळाच्या ओघाणे , समजसुधारकांच्या पुढकराने संपुष्टात  आल्या आहेत.मग मुस्लिम समाजात असलेल्या बुरखा पद्धति , तीन तलाक या पद्धति ,परंपरा काळाच्या मागणीनुसार संपुष्टात आल्या पाहिजेत मुस्लिम समाजातील स्त्रियांना देखील पुरुषाच्या बरोबरीने जगण्याचे अधिकार मिळायला हवे  असे कोणाला वाटत असेल तर   या सर्वाला हेच पुरोगामी मंडळी तो त्यांचा धार्मिक अधिकार आहे त्यात हस्तक्षेप नको म्हणून तीन तलाक या विधेयकाला  विरोध करतात मग इथे तुमच पुरोगामीत्व कुठ जात?

पुरोगामी या शब्दाचा अर्थ हा सुधारनावादी असा आहे, म्हणजे केवळ धर्म, जाती  आणि  पंथा मध्ये याला न शोधता  भौतिक सुधारनावाद जसे की, देशाचा विकास कसा होईल,  शैक्षणिक बदल, उद्योग व्यवसायाची  कश्या प्रकारे भरभराट होईल, ग्लोबल वार्मिंग ,प्रदूषण समस्या , जल समस्या , लोकसंख्या वाढ , वाहतूक समस्या, अतिक्रमणाची समस्या वैगरे हे खऱ्या अर्थाने पुरोगामी मंडळीचे विषय असायला हवे परंतु दुर्दैवाने त्यांचा याच भौतिक विकासला विरोध असतो आणि यात सुधारणना घडवून
आनण्यांची  त्यांची मुळीच  इच्छा व रुची  नसते. चांगल्या गोष्टीना  विरोध करणारे पुरोगामी म्हणजे कोण ? तर जे राजकीय  , सामाजिक ,साहित्यिक, विचारवंत , माध्यमे (मीडिया) , बुद्धिजीवी , लेखक , कलावंत या क्षेत्रात असलेले किंवा या क्षेत्राशी निगडित असलेले काही लोकच याला विरोध दर्शवितात ते म्हणजे पुरोगामी होय.  आणि हेच लोक भौतिक विकसाला  विरोध दर्शवितात.

म्हणून आज पुरोगामी या शब्दाचा अर्थ आपल्याला बदलवायला हवा  म्हणजे केवळ धर्म,जात, पंथ यातच सुधारना न शोधता 21 व्या शतकात उदभवणाऱ्या भौतिक समस्या आणि गरजा प्रति सुधारना म्हणजे पुरोगामी असा त्याचा आता अर्थ लवायला हवा व तसे होने अत्यंत गरजेचे आहे.
तेव्हाच त्या पुरोगामित्वाला अर्थ राहील. मग पुरोगामीची व्याख्या म्हणजे नेमकं क़ाय तर खऱ्या अर्थाने 21 व्या शतकातील सुधारनवाद म्हणजे पुरोगामी असे  त्याचे उत्तर येईल. परंतु त्या करिता थोड़ी वाट पहावी लागेल.

प्रवीण ,मुंबई:
   महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, महापुरुषांची भूमी. संताच्या थोर परंपरेने पुरोगामी विचारांचा वारसा आपणास दिला. पण आज पुरोगामी म्हणजे काय हा प्रश्न या महान राज्याला पडलाय. सध्या देश्सात कोण कुठल्या विचारांचा याचे प्रमाणपत्र देण्याचा वसा काही ठराविक समूहाने उचलाला आहे हीच या राज्याची शोकांतिका.पुरोगामी चा अर्थ खूपच सोपा पण आचरण्यासाठी खूपच कठीण. अगदी गांधीविचारासारखा. मनाला पटत, समजत पण आचरणात येण्यासाठी कठीण. पुरोगामी म्हणजे वैज्ञानिक दृष्टीबाळगून बदल स्वेकारणारा, कोणताही भेद न बाळगणारा,  कर्मकांड झुगारून व्यावहारिक राहणारा  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विचार आणी आचार यात फरक नसणारा. एकंदर समतोल विचारांचा व्यक्ती.
   महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का ?
पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार यात खूप फरक असतो अस म्हणतात. कदाचित पुरोगामी विचारांचं हि असच काहीस झालय. "पुरोगामी राज्य " असा गौरव हा फक्त भाषानानपुरता आणि इतिहासापुरता मर्यादित राहिला आहे. पण प्रत्यक्षात आपले राज्य किंबहुना देश मध्ययुगीन काळात ढकलला जातोय. डार्विन ने मानवउत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता त्यात तो म्हणाला कि मानव हा जनावर  ते आधुनिक मानव असा विकसित झालाय पण प्रत्यक्षात त्याची वैचारिक अधोगती चालू आहे. मानवाचा मानव ते दानव असा वैचारिक प्रवास चालू आहे. आधुनिक विचारसारणी असलेला माणूस पुरोगांमी असतो अस खूप लोक मानतात.
महात्मा फुले नी स्त्री शिक्षणचा पाया उभारून शिक्षण क्षेत्राला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न केला पण तेच शिक्षण आज धंदा बनला. अशा शिक्षणसाम्राटाना आपण पुरोगामी म्हणण्याचे का?
छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यानी गोरगरीब समाजासाठी, कोणताही जाती भेद न बाळगता, संघर्ष केला. आपण तर त्या महापुरुशाना जातीजातीत वाटून घेतल. महापुरुषांच्या नावाने दंगली धडावाणारे शिवभक्त (?) भीमभक्त(?) यांना पुरोगामी म्हणायचे का?
आज कोणीतरी "इस्लाम खतरे मे है " किवा "हिंदू खतरे मे है" अशी हाक द्यायची आणि कोणताही विचार न करता धर्मयुद्ध (?) साठी रक्त सांडायच. स्वतःच आणि दुसऱ्याची हि. अशा समाजाला पुरोगामी म्हणायचं का?
विचाराचा विचारणेच विरोध व्हावा अस गांधीविचार सांगातो आणि त्यांचाच  विरोध हा त्यांच्या हत्येने होतो. अशा हत्येच समर्थन करणारा पुरोगामी म्हणायचे का?शेतकऱ्यांचे आणि मजूर वर्गाचे हक्क डावलून भांडवलशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या नवीन "neo-bourgouise" वर्गाला पुरोगामे म्हणायचे का?

  (हाच माझा लेख वाचून मला डावा विचाराराचा माणूस ठरवून माझी आई-वडिलांचा उदधार करणारे शब्दप्रयोग केले जातील. असे करणार्याला पुरोगामी म्हणायचे का)
      
      ही परीस्थीती पाहून आजही प्रत्येक महापुरुषाच्या डोळ्यात पाणी असेल. त्यांचा आत्मा आजही तडफडत असेल. महाराष्ट्रात संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यानी पुरोगामी विचारांचे बीज रोवले पण त्याचे वृक्ष झालेच नाहीत.
universal acceptance आणि tolerance ची शिकवण विवेकानादानी दिली पण हिंदुना विवेकानंद नाही कळले.
शिवछत्रपतीनी कधी धर्म-जात भेद नाही केला पण त्यांच्या रयतेला महाराज नाही कळले.
   
     आंबेडकरांनी पददलितांसाठी सत्ताधर्यान्विरूद्ध बंड केल पण त्या दलीताना पण आंबेडकर नाही कळले.
शांततेचा संदेश बुद्धांनी दिला पण त्यांच्या अनुयायाना बुद्ध कळला नाही.
तरुण वयात फासी वर भागात सिंघ गेले पण आजच्या तरुणाला भागात सिंघ कलाल नाही.

पुरोगामी व्यक्ती कोणत्याही धर्मात किवा जाती बंधनात अडकलेला नसतो. सर्वाना समान पातळीवर तोलणारा विचारंच युद्ध विचारानेच करणारा पुरोगामी असतो. समतोल समाज हवा असेल तर पुरोगामी विचारांची कास पकडून चालन महत्वाच आणि गरजेच आहे. भगवा निळा  हिरवा या रंगात न अडकता तिरंगा चे भाले कसे होईल याचा विचार करावा.
शेवटी एकाच प्रश्न ठेवेन. मनुस्मृती , कुराण, बायबल कि संविधान ? ह्याच उत्तर ज्याच त्याने ठरावाव आणि  दुर्मिळ होत असलेल्या "माणूस" नामक जातीला वाचवाव.

राजश्री ,मुंबई:
        पुरोगामी  progressive ... या शब्दाची इंग्रजी व्याख्या अधिक मार्मिक वाटते.... Happening or developing gradually or in stages
   हळूहळू विचारांती घडत गेलेलं स्थित्यंतर म्हणजे पुरोगामित्व...
एखादा विचार केवळ आधुनिक आहे , किंवा पुरोगामित्वाची लाट आहे म्हणून स्वीकारणे हे प्रभावित (अ) पुरोगामित्व , याउलट , स्वतः च्याच विचारांशी कधी झगडत , कधी सहमत होऊन जे कृतीत उतरत ते पुरोगामित्व...
पुरोगामित्व हे कालसापेक्ष आणि व्यक्तीसापेक्षस्वांत्रपूर्व काळात , स्त्रीशिक्षणास पाठिंबा देणे हे पुरोगामी समजले जायचे आता ती एक नैत्त्यिक बाब आहे .

       सती जाण्यास विरोध ,  विधवा पुनर्विवाहास पाठिंबा यासाठी कितीतरी महापुरुषांना त्या काळात पुरोगामी म्हणून हिणवले गेले , आज त्याच पुरोगामित्वाची मधुर फळे आपण चाखत आहोत.. म्हणजेच आपले आजचे पुरोगामी धोरण पुढच्या पिढीला लाभदायी ठरले तरच ते काळाच्या कसोटीवर उतरेल म्हणून ही एक प्रकारची नैतिक जबाबदारी पुरोगामी असणाऱ्यांवर असते ,

    विचार केवळ वेगळा किंवा नवा आहे म्हणून स्वीकारण्यापेक्षा त्यावर चर्चा , विचार मंथन , चिंतन , खलबते , वाद होऊन सहमत होऊन स्वीकार..
  " तुका म्हणे , होय मनासी संवाद , आपुलाची वाद आपणासी " , हे मनात बिंबले पाहिजे .

  खर तर , आपल्या धोरणानुसार वागणारी व्यक्ती ही मनस्वी म्हणून जगत असते , पुरोगामी , प्रतिगामी ही इतरांकडून चिकटवण्यात येणारी लेबले . त्याकडे दुर्लक्ष करून ' हा माझा मार्ग एकला ' म्हणत वाटचाल करणे श्रेयस्कर..
  संक्षिप्त विवेचन द्यायचे झाले तर '- वादिंच्या' या वादात उदारमतवादी
( liberal ) असणे हे सध्याच्या काळातील पुरोगामित्व ठरू शकते .

1 टिप्पणी:

  1. पुरोगामित्वाच्या नावाखाली फक्त हिंदू विषयी असणारा राग दिसून येतो. मूळ चौकट आहे तशी ठेवून धर्मामध्ये सुधारणा व्हायला हवी यांनाही मताचा नक्कीच आहे मात्र आपल्या धर्माला नावे ठेवणे याला पुरोगामीत्व म्हणता येत नाही म्हणून तर पुरोगामी या शब्दाची थकित थट्टा केली जाते. ख्रिश्चनांच्या मध्ये किती पुरोगामी चळवळ आहे मात्र ूळ तत्व परमेश्‍वर याचे विषयी वाद नाही मुस्लिम समाजात देखील पुरोगामित्व आहे मात्र अल्लाह आणि त्याचे सर्व प्रभुत्व याचेही वाद नाही मात्र आमच्या हिंदू पुरोगामी लोकांना मूळ हिंदू म्हणवून घेण्यातच रस नाही ठीक आहे. माझ्या धर्मात दोष असतील देखील मात्र महर्षी दयानंद सरस्वती यांचे तत्वज्ञान वाचल्यानंतर कुठेतरी जाणवतं की काहीतरी चूक झालेली आहे. विवेकानंदांचे तत्वज्ञानात याची झाक दिसून येते मात्र त्याचा कोणताही न विचार करता आमच्या तोडलेल्या मोडलेले इतिहासाच्या ज्ञानावरून आमच्या सनातन धर्माला नावं ठेवणे हे भारतीय म्हणून मला अजिबात पटत नाही. एके वेळी संपूर्ण जगभर भारतीय मताचा प्रसार होता कंबोडिया येथील विष्णू मंदिर हा त्याचा एक चांगला पुरावा आहे मग काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे हा देश परकीयांच्या ताब्यात गेला आणि त्या कारणांचा शोध घेऊन आतापर्यंत भारताला सर्वशक्तिमान बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना मला पुरोगामी म्हणायला आवडेल. असे पुरोगामी व्हायची इच्छा असेल तर स्वतःला अभिमानाने भारतीय म्हणा आणि आपल्या भूतकाळाचा विचार करून उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू करा

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************