खरंच माणुसकी हरवत चाललेली आहे का ?

महेश देशपांडे,ढोकी, जिल्हा धाराशिव.

माणुसकी हा शब्द माणूस या शब्दापासून तयार झाला. अगदी साधी गोष्ट विचार करून पाहिले तर जगायचं असेल तर फक्त इच्छाशक्ती लागते, प्राणवायू हा शरीर चालू ठेवतो. पण त्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हायचा असेल तर, प्रत्येकामध्ये माणुसकी जिवंत असायला हवी.
माणुसकीची व्याख्या करण्यापेक्षा ती जगणं अधिक महत्वाचं वाटत. आज माणुसकी-माणूसपण इतकं हरवत चाललं आहे की, आपण कोणाला बोलतो आहोत , काय बोलतो आहोत याची जरासुद्धा जाणीव राहिलेली नाही. यातूनच मग नैराश्य आणि इतर नकारात्मक गोष्टी घडतात... माणुसकी जर जिवंत ठेवायची असेल तर मला वाटत प्रत्येकाने सहकार्याची भावना जागृत ठेवायला हवी. कुठल्याही नातेसंबंधामध्ये चांगले पण जर टिकायचे असेल तर माणुसकी-सहकार्याची भावना मनात रुजायला हवी. आपण ओळखीच्या लोकांना नीट वागणूक देऊ शकत नसू तर अनोळखी व्यक्ती च्या बाबतीत तर गोष्टच निराळी, त्याकडे नेहमी संशयी वृत्तीने पाहिलं जातं. जगामध्ये फक्त ४% लोक हे चांगुलपणा असणारे आहेत अस एका अभ्यासात लक्षात आलं आहे. मग आपण जर असा विचार केला की १०० लोकांमध्ये फक्त ४ जणच *माणुसकी* असणारे असतील तर त्यांच्यावर इतरांचा किती प्रभाव होत असेल आणि तरीही ते टिकून आहेत. या अस्तित्वातच त्या चांगुलपणा-माणुसकी च यश, महत्व, सामर्थ्य आहे... मी ग्रामीण भागामध्ये वाढलो आहे आणि शहरी भागात शिक्षण, नोकरी असल्यामुळे माझा अनुभब अस सांगतो की शहरी भागात माणुसकी फार फार कमी आहे. ग्रामीण भाग त्यामानाने बरा आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना या शहरी भागात जास्त प्रमाणात घडतात. याचा अर्थ असा नाही की ग्रामीण भागात सगळं आलबेल आहे. ग्रामीण भागात सुद्धा आता हा प्रभाव वाढतो आहे. लोक एकमेकांकडे संशयी नजरेने पाहू लागले आहेत, काळजीने विचारपूस करण्याऐवजी भीती घालत आहे.
पन यासर्व गोष्टींना पुरून उरण्याची ताकद ही *माणुसकी* मध्ये आहे.आपण इतरांचं दुःख देखील वाटून घेऊ शकतो हे दृढ विश्वास हवा. इतक्या मोठ्या डिजिटल युगात सर्वांना सोबत घेऊन जाता येईल असा आत्मविश्वास हवा तरच  *माणुसकी* टिकेल अन्यथा...
सर्व गोष्टी व्यर्थ..

सर्वांनी सहकार्याची भावना ठेवली तर नक्की तर नक्की चांगला समाज समाज घडवू ही आशा!
*==============================*

वाल्मीक फड,महाजनपूर,नाशिक.
                        खरोखर हरवत चाललेली आहे .बघा जुन्या काळात आपल्या घरी जर कोणी पाहुणा आला तर असे वाटायचे कि कोणीतरी देव आपल्या घरी आल्याचा आनंद घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर असायचा.पाहुण्याची ऊठबस चालायची,जेवायला पक्वानाचा बेत असायचा थोडक्यात म्हणजे पाहुणा आपल्या घरी येऊन आनंदी व समाधानी राहिल हृयासाठी सगळे प्रयत्न.तसेच रानात एखादा शेतकरी माणूस आपली शिदोरी घेऊन जेवायला बसला असेल आणी त्या वेळेला एखादा अनोळखी माणूस जर त्याच्याजवळून जात असेल तर हा अशिक्षित शेतकरी ओळख नसताना,शिदोरी कमी असताना त्याला जेऊ घातल्याशिवाय जाऊ देत नसायचा.                            खरीखुरी माणुसकी केव्हा ओळखता येईल तर आपण आपले जे शेजारी आहेत त्यांच्या दुःख प्रसंगाला आपण किती कामा येतो?सुखात तर सगळेच आपल्या जवळ येत असतात पण जो दुःखात जवळ येतो तो खरा माणूस असतो.तुकाराम महाराजांचे एक चरण आठवतय "भुतदया गाई पशूंचे पालन/तान्हेल्या जीवन वनामाजी"ह्या ओविचा आपण जर अर्थ समजून घेतला तर आणि त्याचा अवलंब केला तर दुसरी कोणती माणुसकी होऊ शकते.                       एखादा माणूस रस्त्याने जात आहे आणि त्याचा जर अपघात झाला तर ज्याची माणुसकी जिवंत असेल ति व्यक्ती जखमी माणसाला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाईल परंतु ज्याच्याकडे माणुसकी शिल्लक नाही तो व्यक्ती पाहून न पाहिल्यासारखा करून तेथून निघुन जाईल.               खेड्यात तरी आज बरेचसे लोक एकमेकांना मदत करताना दिसतात परंतु शहरात माञ परीस्थीती वेगळी आहे .काही घटना घडली तर फक्त मोबाईलद्वारे चिञीकरण करत बसतात.त्या जखमी व्यक्तीला ऊचलावे असे कोणाला वाटत नाही.म्हणून मला वाटतंय माणुसकी हि हरवत चाललेली आहे असं मला नेहमी वाटत असतंय.
*==============================*
अनिल गोडबोले,सोलापूर.
                संपूर्णपणे माणुसकी हरवत चाललेली नाही परंतु माणूस स्वार्थासाठी कुठल्याही टोकाला जातो त्या मध्ये बाकीच्या व्यक्तीला काय त्रास होईल याचा विचार केला जात नाही, आणि याचे प्रमाण वाढलेले आहे.

वाढत चाललेल वाईट राजकारण व गुन्हेगारी याचा विचार करता कधी कधी वाटत की माणुसकी हरवत चाललेली आहे.

यावर उपाय मात्र आपण करू शकतो. मी माझ्या पासून सुरुवात करीन. मी माणुसकीने विचार करीन.. आणि इतरांना देखील त्या प्रमाणे वागायला भाग पाडेन.

पुढच्या पिढीला तरी आपल्या वागण्यातून माणुसकी शिकवूया. ओरबाडून घेण्याची वृत्ती जर कमी केली तर निश्चितच माणुसकी वाढेल. माणूस एका वेगळ्या थरापर्यंत जाऊन समाधानी राहू शकतो..

तर प्रयत्न करून माणुसकी वाढवता येते.. चला मग आपण वाढवूया तर...!
*==============================*

सानप बालाजी,बीड.
        कधी कधी विचार केला ना तर मला तरी अस जाणवत की जगातली बऱ्यापैकी माणुसकी संपलेली आहे, आणि जी काही माणुसकी राहिली आहे ती थोड्या थोडक्या लोकांमध्ये शिल्लक राहिलेली आहे, आणि त्यांच्यावरच जगाचा कारभार चालला आहे अस मला वाटत.
        काही काही जण(नग) असे सुद्धा आहेत की फक्त  जगाला दाखवण्यासाठी माणुसकी आणि समाजकार्य करत असतात. माझ्या मित्राच्या जवळचे एक तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आहेत, जगासाठी तर ते साक्षात दुसरे बाबा आमटेच आहेत, पण त्यांचे आई बाबा मात्र वृद्धाश्रमात असतात आणि त्यांना भेटायला 6 6 महिन्यानंतर जातात. सांगण्याचा तात्पर्य इतकाच की, जी काही आपल्यात माणुसकी दयाभव शिल्लक आहे तो जास्त दिखावा न करता जगाच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा.
*=====================================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************