घरकाम फक्त बाईनेच करावं का?

घरकाम फक्त बाईनेच करावं का?

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

घरकाम फक्त बाईनेच करावं का?



Source: INTERNET
-मुक्ता जाधव
सोलापूर

      पूर्वी घरातील सर्व कामे बायका करत,घर सांभाळणे हा बायकांचा धर्म असे, घरकाम बायका आणि बाहेरची कामे पुरुष करत कारण पूर्वी बायकांना बाहेर पडण्यासाठी परवानगी नव्हती.
       पूर्वी बाई म्हणजे चूलं आणि मुलं असं असे, पण आता बायका पण बाहेर पडत आहेत.बायका पण नोकरी करून पैसे कमावतात  तरी पण बायकांना घरातील सर्व कामे करावी लागतात हे चुकीचे आहे, बायकांना आता नोकरी करून घरातील सर्व कामे करावी लागतात आणि पुरुष फक्त नोकरी करतात हे आता बदललं पाहिजे.
      बायका मुलांना सांभाळणार, घरातील सर्व लहान- मोठ्यांचा आदर,मान करून त्यांची काळजी कामे करतात आणि नोकरी पण....मग पुरुषांनी घरकामात तरी मदत केली पाहिजेच पुरुषांनी आता पुरुषीपणा जरा कमी करावां दोघांनी मिळून मिसळून एकत्र सर्व कामे करावी बायकोला खरंच कामात मदत करावी असं झालं तर बायकांच आरोग्य पण चांगल राहिल त्यांना पण आराम भेटेल ....
      घरातील सर्व कामे बायकांनी केलीच नाही  पाहिजेत!....


Source: INTERNET
-वाल्मीक फड
महाजनपूर नाशिक

अवश्य करायला हवे परंतु ज्या स्रीया कायम घरीच असतात व ज्यांना नोकरी किंवा धंदा नाही अशा स्रीयांनी अवश्य घरकाम करायला पाहिजे त्या स्री ने नवर्यावर घरकामासाठी आजिबात अवलंबून राहू नये.
तसेच एखादी स्री जर काही नोकरी धंदा करीत असेल तर आणि नवरोबा जर बिनकामी असतिल तर त्यांनी बायकोला घरकामासाठी मदत केलीच पाहीजे.समजा नवरा बायको दोघेही जर नोकरी किंवा धंदा करत असतिल तर माझ्या मते दोघांनीही जे शक्य असलेले काम करण्यास काहीच हरकत नसायला पाहिजे.नोकरी करणारा नवरा असो किंवा बायको असो,आपल्या नोकरीचा तोरा मिरवू नये.
सध्या तरी बायांचे दिवस खुप चांगले आलेले आहेत.मि आईला पहायचो त्या वेळेस फक्त आंथरूणावर पडले तेवढ्याच वेळेस फक्त स्रीला काम नसायचे.राञीच्या दहाला झोपले की,पहाटे तिन वाजताच दळण दळणे,शेण गोळा करणे,दुर विहीरीवर जाऊन पाणी आणणे पाणी काही थोडेथिडके नाही तर खंडीभर माणसांना पुरेल इतके.मग स्वयंपाक आवरुन साधारण सकाळी ८ते९ च्या दरम्यान लगेच शेतीकामासाठी हजर असायच्या.इतके काम करुन सुद्धा कधि रूसणे नाही फुगणे नाही आणी वरून सासूचे टोमने ऐकायचे.
एकट्या बाईने काही घरातील सगळ्याच कामांचा मक्ता उचलेला नाहिय परंतु घरातील सर्वच सदस्यांनी आपल्याला जे काम जमतात ती मुकाटयाने केली पाहिजे आणी ते कामे करताना आपण कुणावर ऊपकार करतो आहोत हि भावना नसावी कारण माझ्या मते स्री हि कायम राञंदिवस कामच करत असते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-अनिल गोडबोले
सोलापुर

घरात राहणारे सर्वजण घराचा भाग आहेत. त्यामुळे घरकाम सर्वांनी करावं, एकट्या स्त्रीवर सगळी जबाबदारी पडते. ते चुकीचे आहे.

पुरुष, महिला, लहान मुलं सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे. पुरुषी मानसिकता आणि कृती बदलायला पाहिजे.

मी माझ्या घरात सगळी कामे करतो, माझे वडील करतात. आणि ही काम बायकांची व ही पुरुषांची अशी वर्गवारी देखील करत नाही.

त्यामुळे घरातील कामांची जबाबदारी एकट्या बाईची नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-त्रिशूल दत्तात्रय निर्मला
पुणे

साधारणपणे खाजगी संपत्तीच्या उदयासोबत *पितृसत्ता* नावाची व्यवस्था मूळ धरू लागली. त्यापूर्वी देखील घरातील कामांची विभागणीचं निरीक्षण केल्यास असं दिसून येतं की *अन्न गोळा करण्याच्या प्रक्रियेत सर्व लिंगाच्या व्यक्ती सामील असायच्या.* परंतु बाळंतपण त्याकाळी नियोजनबद्ध पद्धतीने करता येत नव्हतं. त्यामुळे अनेक *स्त्रिया एकावेळी गरोदर* राहायच्या. सहाजिक घराजवळील कामात जास्त लक्ष देणं त्यांना शक्य होतं. त्यामुळेच *शेतीचा शोध स्त्रियांनी लावला* असं  कोणी म्हंटल तर आश्चर्य वाटायला नको. पण त्यावेळी उदयात येत असलेल्या व्यवस्थेशी मिळतीजुळती कारणं होती. *खाजगी संपत्ती*च्या उदयासोबत पुरुषांनी त्यावर *मालकी हक्क* गाजवायला सुरुवात केली. निर्माण झालेली संपत्ती पुढच्या पिढीला द्यायची म्हणजे कोणाला द्यायची असा प्रश्न स्वाभाविक निर्माण होतो. त्याकाळी संपत्ती सामुहिक मालकीची असे! आज आपण त्याचं अगदी सूक्ष्म स्वरूप पाहतो. उदा. माझा पेन, घर, बायको इ. वरील इतिहास अगदी थोडक्यात मांडला आहे, आजची परिस्थिती समजून घेण्यासाठी.
जर आज सर्व लिंगाच्या व्यक्ती मेहनत करतात आणि व्यक्तिगत संपत्ती जमवतात अशा समाजात घरकाम हा दोघांच्या *परस्पर संमतीने* ठरवण्याचा मुद्दा ठरतो. परंतु आपल्या समाजातील सर्व लिंगाच्या व्यक्तींमध्ये ठासून भरलेल्या पितृसात्तेमुळे स्त्रियांच्या *संमतीचा मुद्दा फारच गौण* मनाला जातो. आणि मग परंपरागत पध्दतीने घरकाम स्त्रियांनीच केले पाहिजे हा अट्टाहास धरला जातो. जर दोघेही नोकरी किंवा व्यवसायामुळे घराबाहेर जात असतील तर अशावेळी घरातील कामांची *जबाबदारी* दोघांची आहे.
घरकामाला अजून एका गोष्टीची किनार आहे. घरकाम करणाऱ्या व्यक्तीला(बायकोला) पैसे मिळत नाही. त्यामुळे पुरुष ज्या कामातून पैसे मिळवू शकत नाही ते करणं टाळतात. पण तेच काम पैसे देऊन कोणी करायला सांगितलं तर लगेच तयार असतात. उदा. आचारी, सफाई कामगार, वेटर, हाउस कीपिंग इ. यात *पुरुषांची दांभिक भूमिका* असते.
साधारण आठ हजार वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पितृसात्तेमुळे काही नवीन परंपरा तयार झाल्या ज्यात कमावण्याची जबाबदारी पुरुषांकडे तर घरकामाची स्त्रियांकडे आली. आज समाज ज्या स्तरावर आहे तिथे घरकाम हे कोणत्याही *एका लिंगाच्या व्यक्तीची जबाबदारी नाही* तर त्या घरात राहणाऱ्या सर्व व्यक्तींची आहे.
*मदत* ही ऐच्छिक असते आणि *जबाबदारी* ही पारच पाडावी लागते. त्यामुळे मी घरकामात पुरुषांनी ‘मदत’ केली पाहिजे या मताच्या विरोधात आहे. या गोष्टी कदाचित लिहायला फार सोप्या वाटतात. परंतु ज्यावेळी पुरुष खरंच घरातील काम जबाबदारी म्हणून स्वीकारतील त्याचवेळी कळेल की हे *एका रात्रीचं काम नाही.* काही वर्ष सर्व लिंगाच्या व्यक्तींच्या भूमिका जाणीवपूर्वक बदलाव्या लागतील.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-संगीता देशमुख,
वसमत

स्त्री आणि पुरूष ही संसाररथाची दोन चाके आहेत. असं आपण म्हणतो. पण वागताना मात्र एका चाकावर जास्त जबाबदारी टाकतो. पूर्वीच्या काळी पुरुषाने कमवावं आणि स्त्रीने शिजवावं अशी पध्दत होती. आणि तेव्हा पुरुषाने जशी बाहेरची पूर्ण  जबाबदारी स्वीकारली होती तशी घरकामाची पूर्ण जबाबदारी ही स्त्रीची होती. पण आज काळ बदलला. आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने बाहेर काम करत आहे. इथे आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. म्हणजे जर एखादी स्त्री बाहेर कामाला जाते तेव्हा आपण असे म्हणत नाही की,ती नवऱ्याला मदत करत आहे. म्हणजे बाहेर काम करणे ही जशी तिची जबाबदारी काळानुसार मानली. तीच मानसिकता आपल्याला पुरुषांच्या संदर्भात मानावी लागेल. संसार हा दोघांचा आहे.  तो कोणाही एकट्याचा किंवा एकटीचा नाही. म्हणून त्यासंबंधीत ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्याही दोघांच्या आहेत. त्यामुळे घरकाम ही जबाबदारी ही एकट्या स्त्रीची नाही. घरकाम हे त्या घरातील दोघांची जबाबदारी आहे. त्यामुळे पुरुष एखादा घरकाम करत असेल तर तो स्त्रीला मदत करत नाही,तो स्वतःची जबाबदारीच पार पाडतो आहे. म्हणून आपल्याला आधी ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे की,पुरुषाननी स्त्रियांना घरकामात मदत करावी. मदत ही दुसऱ्यांना असते. स्वतःच्याच घरात तुम्ही एखादी जबाबदारी पार पाडत असाल तर त्याला आपण मदत कशी काय म्हणू शकतो?जर संसार दोघांचा आहे,तर ती जबाबदारी दोघांची आहे. त्यामुळे घरातील कामे फक्त बाईनेच करावे,असं म्हणणं गैर ठरेल. पण समजा ती स्त्री गृहिणी असेल,तर नवऱ्याने अर्थार्जन आणि स्त्री घरकाम करण्यात काहीही गैर नाही. पुरुषाचे काम स्त्रियांनी करणे,म्हणजे धाडसी समजल्या जाणे आणि स्त्रियांची कामे करणे म्हणजे त्याची टवाळी करणे हे गैर आहे. स्त्री असो अथवा पुरुष यांच्या कामाला समान दर्जा मिळायला हवा. यासाठी कोणताही कायदा करून उपयोग होणार नाही तर त्यासाठी पूर्ण समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मग अशावेळी घरकाम फक्त बाईनेच करावे की करू नये, यावर समाजात सारासार विचार केला जाईल. आणि काळाची हीच गरज आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-अर्चना खंदारे,
हिंगोली....

                संसाराचा गाडा चालविणारी  दोन चाके म्हणजेच स्त्री आणि पुरुष होत.मग घरकाम  फक्त स्त्री च्या च वाट्याला का?
पूर्वी स्त्रियांना  फक्त चूल आणि मूल या  विश्वाभोवती फिरत राहावे  लागत होते त्यांना एवढेच काम करावे  लागत होते.आणि त्यावेळी घरकाम फक्त स्त्रियांनीच  का करावे? ह्या विषयी कोणी विचार सुद्धा करत नव्हते.कारण पूर्वीची  स्त्री हि पुरूषांवर आधारलेली होती.तिला स्वतःचे व्यक्ती स्वातंत्र नव्हते मग सर्वानुमते  असे ठरविले कि ,घरकाम फक्त स्त्रियांनीच करावे .
         
          पण वेळे मध्ये बदल  होत गेला त्याचबरोबर    स्त्रियांच्या मान - सन्मान, हक्क - अधिकार  यामध्ये दृढता निर्माण केली गेली आणि झाली.आज ची स्त्री हि पुरुषाच्या  बरोबरीने कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत आहे.निसर्गाने स्त्री ह्या व्यक्ती ला खूप मोठ्या प्रमाणात विचारशक्ती ,सहनशीलता,प्रेमळपणा ,नियमितता  आणि दृढता प्रदान केली आहे.आणि तिच्या तुलने मध्ये कुठलेही काम हे छोटे किंवा मोठे मानणे हे चुकीचे आहे मग ते घरकाम असो किंवा इतर व्यावसायिक काम असो.
              
              जर आजची स्त्री हि कुठल्याही क्षेत्रामध्ये कामातील  भेदभाव न बघता आपल्या कार्याचा ठसा उमटवत असेल तर पुरुषांनी सुद्धा या कामाचा  आदर्श घेऊन एका जबाबदारीने स्त्रियांना त्याच्या घरकामामध्ये मदत करायला पाहिजे .स्त्री आज चूल आणि मूल सांभाळून  कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून पुरुषांना आर्थिक मदत करण्यासाठी काम करत असेल तर पुरुषांनी ही तेवढ्याच जबाबदारीने स्त्रियांना घरकामामध्ये मदत करणे महत्वाचे आहे....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-अनिकेत कांबळे
 शिवाजी विद्यापीठ             
 कोल्हापूर.

माझं मत कुणीही फेमिनिष्ट ठरवू नका,किंवा स्त्रीवादी लेखन म्हणून तर मुळीच नको,समानता हा विषय येतो तेंव्हा स्त्री पुरुष समानता हा विषय नेमका येतोच पण खऱ्या अर्थाने 21 व्या शतकात जगत असताना हा समानता विषय बाजूला पडतो,स्त्री हा कोणत्याही पुरुषाचा खांदा समजला जातो,घरचा आधारवड.काय बिघडले थोडं काम किंवा पूर्णच काम पुरुषाने केलं तर पण हे करा काम पण आपल्या पुरुषप्रधान चारोळ्या बंद करूनच बर का!!!
     कुठे बिघडलं सकाळ चा चहा केला म्हणून,
किती तीनच सहन करायचं, आधीच घरादारापासून लांब झाली आहे,बापाचं छप्पर नाहीस झालेली ती ,तुझा आधार च मागते ना,मग कुठे अडलं, कधीतरी म्हण तिला  आज जेवण मी करतो,पुढं तुला ती करायला सुद्धा लावणार नाही,जिव्हाळा शिकतो ते तिच्यापासूनच मग थोडं तिला निवांत राहू दिलं तर चुकत कुठे.थोडं तीच ही आयुष्य आहे जगू द्या तिला मनमोकळं🙏

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Source: INTERNET
-अर्जुन गोडगे
सिरसाव ता.परंडा जि.उस्मानाबाद

काळ बदलला आहे...
स्त्री यांनी काबीज केलं असं कोणतंच क्षेत्र नाही. त्याही आता पुरुषांच्या खांद्याला लावून काम करत आहे. पण एक अवगड प्रश्न निर्माण झाला पुरुष आपला पुरुषीपणा कमी करायला तयार नाहीत. याला काही अपवाद ही आहेत.

परवा एका मित्राच्या ऑफिसात भेटलो तो समुपदेशन करतो. त्याच्याकडे एक केस आली होती. नवरा -बायको दोघही आले होते.दोघीही चांगली शिकलेले म्हणजे CA होते. दोघंही ऑफिसमध्ये काम करतात.
तो खूप मारहाण करतो, असं तिचं म्हणणे होत.

कशामुळे घटस्फोट देणार असं विचारलं असता.?

तो सांगत होता आमच्या लग्नाला दोन वर्ष होऊन गेली तिने कधीही माझी अंडरवेअर धुतली नाही. अरे तीही जॉब करते तिने कधी तक्रार केली नाही. आई वडिलांच्या नावासाठी तिने खूप सहन केलं. सर्व अन्याय सहन करत कामही जोरात चालू होतं.

जोपर्यंत आपली पुरुषी मानसिकता नाहीशी होत नाही तोपर्यंत तरी घरातील सर्व कामे स्त्रियांना करावी लागणार. लोक शिकली म्हणजे लय शहाणी होतात असे नाही. स्त्रियांना सर्वात जास्त त्रास शिकलेल्या लोकांकडून होत आहे. हे वेळच्यावेळी दिसून येते.

जोपर्यंत पुरुष अहंकार सोडून घरातल्या कामासाठी वेळ देत नाहीत. तोपर्यंत काही कायदे करून उपयोग नाही. बदला रे मानसीशीकता दोस्तांनो सुरुवात करू स्वतःपासून करा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Source: INTERNET
-शीतल शिंदे
दहिवडी

भारतीय संस्कृतिप्रमाने स्त्रिला दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक आणि रूढ़ी परंपरा हा सर्वात मोठा पैलू आहे.

या रूढ़ी परंपरेने अजूनही स्त्रिला या गुलामगिरीतून मुक्त केले नाही शरीराने आणि मानाने सुद्धा !
जरी डॉ. बाबासहेबांनी  घटनेद्वारे 71 वर्षापुर्वी  प्रत्येक स्त्रिला सामान ते चा अधिकार  दिला आहे तरी सुद्धा!

घरकाम म्हटले की स्त्रीच दिसते याला आपणही अपवाद नाही आहोत अजुनसुद्धा !

दुसरी गोष्ठ घरातील वरिष्ठ महिलां कडून दिली जाणारी वागणुक, पिळवणुक आणि लेकि - सुनेकडे बघण्याचा , वागवन्याचा वेगवेगळा भाव-दृष्टिकोण.

घरात सुन आली की तिने सर्व कामाच्या जबाबदारी पार पाडल्या पाहिजेत अशी सर्वांची सदिछ्या अगदी नावरोबसाहित. मग पत्नी ,सुन, भावजई , जाव, काकी शिवाय सर्वांच्या आवडी -निवडी जपायच्या तिने.

उलट स्वताच्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा बगा कसा -  " अहो आताच तिचे शिक्षण पूर्ण जाहले आहे त्यामुळे तिला अजुन स्वयंपाक येतच नाही ! जरा सांभाळून घ्या ह!  "

आणि दुसर्याची मुलगी काय रस्त्यावर सपडलेली असते काय? की आभाळ आभाळातुन पडलेली असते !

दूसरी गोस्ट  _ एक म्हण मी ऐकलि आहे की

" खात्या पित्या   दवाणीला बांधली आहे हो "
मला एक कळत नाही दावणीला बांधली की दवाणीला बांधलेल्या जनवरांना चारा पानी घालन्यासाठी करुण आणली ?

हे जाहले सर्व सामान्य स्त्री बद्दल.
आता म्हणे घरीच असते की काम करते दिवसभर ?
असे  म्हणाणाऱ्यांनीआठ दिवस घरातील सर्व स्वयंपाक  दळण, धूणी -भांडी ,स्वच्छ्ता, मुलांचा अभ्यास, डबा  , आली गेलेली पाहुणे मंडळी. पहा दिवसभर तिच्या हाताला हात असतो काय? नोकरी करणारे पुरुष सायंकाळी निवांत असतात. काही पुरुष रात्रि सुद्धा वेगळा व्यवसाय करतात हे ही खरे आहे.मग त्यांचा किती उदो उदो होतो.
जोहोपेपर्यंत तिच्या हाताला हात नसतो.

तिने पैसे मागयचे म्हणजे अवघडच.मग बगा प्रश्न _ पैसा काय फुकट येतो काय?  बागा की कमवुण !

मग हा का नाही विचार केला जात की त्यातल्या दोन तिन कामा साठी एखादी बाई चार पाच हजार रुपये घेते मग आपल्या घरातील स्त्रिला का नको? असो,

आता नोकरी करणाऱ्या स्त्री बद्दल मत ऐका!

हं ! आमच्या उपकाराला नोकरी करतेय काय ! करतेय तिच्याच संसारासाठी !
बिचारी सर्व जबाब दाऱ्या पार पाडत असते गुप चुप  ! कोणालाही ब्र शब्द न काढता.उपाशी तर उपाशी जाते स्वता. पण घाईघाईत सर्वाना जेवु - खावु घालते ! याची जाणीव कोनालाच नसते. ना तिचे मन कोण जानते ना कोणाला पर्वा तिची. बिचारीच्या मनात विचारांचे काहुर उठलेले असते की "माजे हे काम जाहले आहे पण ते काम राहिले आहे " होईल की नाही वेळेत , मला गाडी  मिळेल काय? ड्यूटीला उशीर तर होणार नाही ना ? बॉस रागवेल काय ? त्यात काही ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी !! तिला नाही कोण विचारत डबा घेतलास का? जेवलीस का ? कल्पनेच्या पालिकडचे आहे हे सर्व !

सायंकाळी उशीर जहाला तर मनात विचारांचे काहुर तीच्या ! मुले काय करत असतील आणि बस कधी येणार! मला उशीर तर नाही ना होणार ? पण तिच्या विचारांची जाणीव कोणाला?
त्यात स्वयंपाक करणे बाइचा जन्मसिद्ध हक्क आहे ना? मग कोणाला दया येत नाही की आपन काहीतरी मदत करावी! हो पण त्यासाठी माणसाचे काळीज असावे लागते प्राण्यांना काय त्याचे!

आता स्वयंपाक बाई नेच करावा का ? हे प्रत्येकाने ठरवावे!

पूर्वी प्रमाणे स्त्रीया फक्त घरच नाही  संभाळत आता त्या सर्व काही करतात.ती जर एक चाक संभाळत असेल तर घरातील सर्वानी का नाही हातभार लावायचा तिच्या कामला ?

शेवटी जाता जाता सांगेन की आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या सर्वांनाच आल्याच पाहिजेत.

आणि प्रत्येक स्त्रिला स्वयंपाक येणे आवश्यकच आहे आणि ते तिच्यासाठी खुप चांगली आणि आनंद देणारी गोस्ट आहे.
काहि चुकल्यास क्षमा असावी!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-राजश्री ठाकूर ,
मुंबई .

घरकाम बाईनच करावं जर ,

 १. घरात राहणारी एकमेव व्यक्ती बाई असेल तर ,
  २. मदतनीस नसेल तर ,
  ३. पती , मुले इतर कुटुंबीय काम सांगूनही करत नसतील त्यामुळे फक्त मनःस्ताप वाट्याला येणार असेल प्रकरण शिस्त लावण्या पलीकडे असेल तर
 ४. यदाकदाचित कुटुंबीयांनी मदत केलीच व त्या करण्याने कामे वाढून ती शेवटी स्वतः लाच करावी लागणार असतील तर
  अशा परिस्थितीत घरातील कामे बाईनचं करणे योग्य .
 
 घरकाम पुरुषांनीच करावं का ? भविष्यात हा हि प्रश्न असेल
 
 १. घरात राहणारी एकमेव व्यक्ती पुरुष असेल तर ,
  २. मदतनीस नसेल तर ,
  ३. पत्नी , मुले इतर कुटुंबीय काम सांगूनही करत नसतील त्यामुळे फक्त मनःस्ताप वाट्याला येणार असेल प्रकरण शिस्त लावण्या पलीकडे असेल तर
 ४. यदाकदाचित कुटुंबीयांनी मदत केलीच व त्या करण्याने कामे वाढून ती शेवटी स्वतः लाच करावी लागणार असतील तर
  अशा परिस्थितीत घरातील कामे पुरुषांनीच करणे योग्य .

   ' घर दोघांचे असेल सुंदर , स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ' अशी जर संसाराची कल्पना असेल तर स्त्री पुरुष भेदाभेद न मानता जे काम जमेल , उत्तम येईल ते करावे .. कुटुंबासाठी येत नसलेली कामे शिकण्याचा प्रयत्न करण्यासही हरकत नाही .
  नवरा अर्थार्जनासाठी बाहेर असेल आणि स्त्री गृहिणी असेल तर घरची आघाडी सांभाळण्यास ना नसावी , अशावेळी हा प्रश्न फक्त बाईने  का घरकाम करावं हा असू नये . घरकामासाठी कमावता पुरुषही घरी थांबला तर दोघांना मिळून तेच करावे लागेल हि नजीकच्या भविष्यातील शक्यताही लक्षात घ्यावी .
  हिच बाब पुरुषांना . विचारांच्या कक्षा रुंदावल्याने , वसतिगृहात राहण्याच्या अनुभवाने ,  सिरियल , चित्रपट , साहित्याचा प्रभाव किंवा सौभाग्यवतींचा दरारा अशा कारणांनी असेल पण आशियातील पुरुष वर्गाचा घरकाम व बाल संगोपनातील सहभाग कौतुकास्पद रित्या वाढत आहे . जीवनावश्यक व जगणे सोयीचे करणाऱ्या कुठल्याही कामाची विभागणी स्त्री पुरुष यांच्यात न करता जो त्या वेळेस उपस्थित असेल तो व त्या कामात कुशल असेल तो अशी झाली तर अवघाचि संसार सुखाचा झाला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************