विज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण पद्धती येऊ शकते का ?

विज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण पद्धती येऊ शकते का ?

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

विज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण पद्धती येऊ शकते का ?



source: INTERNET
-अभिजीत गोडसे,
सातारा    
                 मुळात आपल्या भारताची शिक्षण पद्धती ही कायम प्रयोगात अडकलेली असते. एक प्रयोग पूर्ण नाही झाला तोपर्यंत  दुसरा प्रयोग चालू असतो. शिक्षणाचा खेळखंडोबा हा एवढा केलाय की याच्यावर शिक्षण पद्धती होऊ शकते. एक तर म्हणावे असे विज्ञान भारतात  होत नाही दहा- वीस वर्षे आपल्याकडे काही नवीन होत आहे , काही घडतंय अशातला, काही भाग नाही खूप कमी टक्का हा शिक्षणाचा संशोधनाकडे वळतो. आय आय टी चा जरी विचार केला तरी त्यातले एक टक्कासुद्धा लोक संशोधन करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जे काही पीएचडी करतात .संशोधन करतात . यातील बरेचसे इतर व्यक्तींचे चोरलेले निबंध असतात हे उघड झाले आहे.अशा व्यवस्थेमध्ये विज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण पद्धती येईल असे म्हणणे दूध खुळेपणाचे ठरेल .आपले विज्ञान हे शालेय विज्ञान मधलं एवढेच काय ते बाकी याच्यापुढे आपल्याला विज्ञान हा विषय आपल्या जीवनाशी निगडित आहे का नाही हेच प्रथम ते माहिती नाही. लाल लिटमस निळा होतो. निळा लिटमस लाल होतो. याच्यापुढे शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान  पाहिजे तेवढे पुढे जात नाही. हे वास्तव आहे संशोधन करणे हे तर फार लांबची गोष्ट खरतर विज्ञान हा आपल्या जगण्याशी निगडित विषय आहे . याचाच सर्व मानवाला विसर पडलाय पण याची पाळेमुळे हे शालेय वयापासूनच घालायला हवी होती. पण ते तितकेसे प्रयोग झालेले दिसत नाहीत सध्याही होतं नाहीत.

        एकतर आपल्या समाजात अध्यात्म ,धार्मिक ,अंधश्रद्धा, रूढी परंपरा  याची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेता . या एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत, अजून शंभर वर्ष तरी  किंबहुना जास्तच पुसल्या जातील का नाही ही शंकाच आहे .जेथे विज्ञान संपते तेथे अंधश्रद्धा चालू होते का, जिथे अंधश्रद्धा संपते तेथे विज्ञान चालू होते यात अजून सुद्धा आपण अडकलेलो आहे . अशा पद्धतीत कसे येऊ शकेल संशोधनावर आधारित शिक्षण पद्धती शक्यच नाही. हे यायला अजून बराच काळ उलटून जावा लागेल . जर संशोधनावर आदर्श शिक्षण पद्धती आलीच तर थोडक्यात काय, होईल तर कार्यानुभवाचा तास!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
source: INTERNET
-क्षितीज गिरी ,
सातारा

नक्कीच.पण त्या प्रकारची मानसिकता इथल्या शिक्षणव्यवस्थेची व शासनाची झाली  पाहिजे.
भारतामध्ये असलेली शास्त्रज्ञांची कमी.खूप कमी शोध संशोधन करून भारताने लावले आहेत.आणखी खूप मोठ्या प्रमाणात लावता आले असते.पुढेही येतील.पण याला प्रमुख कारणीभूत इथली शिक्षणव्यवस्था आहे. संशोधना वर शासनाला करायला पाहिजे तेव्हडा खर्च केला जात नाही.
शाळेमध्ये लहानपणापासूनच मुलांची कल्पक बुद्धी वाढवणे. त्याच्या का? ला योग्य ती उत्तरे देणे.त्याच्या प्रश्नार्थक विचारांना प्रोत्साहन देणे.या प्रकारचे शिक्षण त्यांना देणे चालू केले तर हळूहळू नक्कीच आपण विज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण पद्धत आणू शकतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

source: INTERNET
-दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,
वाशिम

विज्ञान या शब्दाची फोड करायची म्हटले तर ती अशी होईल माझ्या मते तरी
वि - विचार करायला लावणारं... ज्ञान म्हणजेच विज्ञान.

तसेच शब्द संशोधन ची पण फोड केली तर ती काही अशी असेल माझ्यामते
सं - संशय घेऊन,
शोध - घेणे आणि
धन - प्राप्ती ( नवीन शोध हक्क )

  समस्त मानवजातीला पूरक आणि उपयोगी अशा वस्तू , बाबी निर्माण करण्याची जबादारी मूळ या विज्ञान आणि संशोधनावर आहे हे म्हणणे सार्थक ठरते ते थेट लागलेल्या वैज्ञानिक शोधांमुळे.

असेच शोध भविष्यातही लागतीलच आणि आणखी प्रगल्भ होत जातील, आजची शिक्षण पद्धती विकसित होत आहे अजून बरच काही करायचं बाकी आहे कारण जसं तो ईश्वर अनंत अफाट आहे तसंच विज्ञान ही अनंत आणि अफाट आहे.

भविष्यात मानवाला जगण्याच्या अनेक समस्या भेडसावणार आहेत ( पर्यावरण, प्रदूषण, हवा, अन्न, पाणी, निवारा ई )  त्या समस्यांवर मात करण्यासाठी विज्ञान आणि संशोधन हाच एक पर्याय असणार आहे म्हणून मला वाटते की विज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण पद्धती येऊ शकते. तशी ती आली तरच मानव जातीच कल्याण आहे, नाही तर ओम फट स्वाहा व्हायला वेळ लागणार नाही!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



source: INTERNET
-शीतल शिंदे
दहिवाडी
जि.सातारा.

मुळात म्हणजे आपल्याकडे  मुलांना विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहान्यास  मज्जाव केला जातो. म्हणजे जे रुढिपरम्परेने चालत आलेले विचार ,सवयी,व्यवसाय ह्याचाच अवलंब करायचा.
वडिलांनी केलेला व्यवसाय मुलाने करायचा.त्याने प्रश्न विचारायचा नाही. विचारला तरी  लहानपना पासून रागावून तू गप्प बस असे सांगून त्याला गप्प बसविले जाते.

मग कशाला पुनः मुले विचरतात .जे जसे आहे तसेच स्विकारतात.परिणामी विज्ञान आणि संशोधन याकडे मुलांचा कल फार कमी असतो.
पहाना आपल्या ग्रंथात सांगितले की दहा तोंडाचा रावण होता , चार हातांची देवी होती , कोणाचा कानातून जन्म जहाला,कोणाचा मळ काढून जहाला आणि आपण ते मानतो आणि नाही मानले तर तो धर्माच्या विरोधात वागतो. आणि त्यावर सर्वांचे फार शहाणा आहे असे समजने.
जेव्हा पालक या प्रशांची उत्तरे शोधन्यास मुलांना प्रोस्थाहन देतील तेव्हा मुले पण चिकिस्तक होतील .आणि अशी मुले जेव्हा प्रशासनात येतील तेव्हा सरकार विज्ञानवादी आणि संशोधक वृत्तिचे होईल. पण त्याला खुप वेळ जाईल. त्यासाठी सरकारनेच विज्ञान आणि संशोधन वर आधारित अभ्यासक्रम दिला पाहिजे.

पण मग राजकारण कसे करायचे हा प्रश्न उरेल ना?

मग  जोहोपले आहेत तर जोहोपु दया! अशी परिस्थिति आहे सध्याची!

जागे व्हा, जागे करा ,आणि जागे रहा, प्रोस्थाहन दया ,पाठ पुरावा करा, नक्कीच येईल .आणि नाही आले तर करण्यास, देण्यास भाग पाडा विज्ञान आणि संशोधनावर आधारीत अभ्यासक्रम!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



source: INTERNET
-अनिल गोडबोले
सोलापूर

शिक्षण पद्धती म्हणजे 'एका व्यक्ती कडून किंवा पिढी कडून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत ज्ञान पोहोचवण्याची व प्रगती साधण्यासाठी उद्युक्त करणारी व्यवस्था' असं मला वाटतं.

पुस्तकी माहिती किंवा पुढच्या वर्गात जाण्यासाठी मेंदूला त्रास देणारी परीक्षा किंवा..आता तर "सक्तीच्या" शिक्षणाचा कायदा आला म्हणून शाळा .. म्हणजे शिक्षण का?

शाळा.. हे माध्यम आहे, पण ते साध्य झाले आहे. मुलांना टेन्शन येत आहे. शाळा आनंददायी होत नाही.. प्रगती पुस्तक असते परंतु खरोखर प्रगती होते का? मुलांचे व्यक्तिमत्व विकास होत आहे का? हाच खरतर संशोधनाचा विषय आहे.

आता मूळ मुद्धा:- आपले शिक्षण हे विज्ञान व संशोधन या वर आधारित आहे असे तांत्रिक दृष्ट्या वाटते. पुस्तके, नवीन नवीन शिक्षण देण्याच्या पद्धती, प्रकल्प करणे, पुस्तकातील शिकवणे हे सर्व तांत्रिक बाबी संपूर्ण बरोबर आहेत.

पण शिक्षक मात्र वास्तविक तेच पुढच्या पिढीत पाठवतात का?.. त्या मध्ये पारंपरिक पण खुप आहे. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले". असं तुकाराम महाराज 300 वर्षांपूर्वी म्हणून गेले आहेत. आजचा शिक्षक तसा वागतो का?.. आपण पुढच्या पिढीला नेमकं काय देतो?

संस्कार म्हणजे आपण केलेली कृतीच पुढे मुलं करत असतात.. एखादा शिक्षक मुलांना शिकवतो.. तसा तो वागत नसेल तर मुलांना ते पटेल का? मग मुलं पण पाट्या टाकतील ना..

नवीन विषय मुलांना डोळ्यासमोर दिसतात का? त्यांच्या डोळ्यासमोर अणू प्रतिकृती उभी राहील का? दांडी यात्रेला निघालेले गांधीजी समजतील का? सदाहरित वने.. नुसती पाठ न करता त्याच्या डोळ्यासमोर उभी राहतील का? गणित हा विषय आनंददायी होईल का? परिक्षे पेक्षा विषय जास्त जवळचे वाटतील का? त्यांना प्रश्न पडतील का? पडलेल्या प्रश्नांना शिक्षकांकडून उत्तर मिळतील का? भविष्यातील नवीन संशोधक तयार होतील का?

सी. व्ही. रामन नंतर विज्ञानातील नोबेल भारतात येईल का? संशोधन व खरोखर नवीन ज्ञान मिळेल का? शिक्षण करणे म्हणजे फक्त नोकरी नाही किंवा पैसे कमावणे नाही तर जीवन आनंदी बनवणे होईल का?

पुढची पिढी निर्भय होऊन प्रश्न विचारेल का? खोट्या आणि भ्रामक गोष्टी च्या मागे न लागता खरोखर मानव जातीचे कल्याण होईल का?... या प्रश्नाचे उत्तर "हो" असे आहे .. फक्त त्या साठी मुलांनी शिक्षण अतिशय मनापासून घेतले पाहिजे.

ज्या दिवशी "असं का आहे?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ज्ञान प्राप्त करणे हे लोकांना कळेल तेव्हा.. माणूस खरच प्रगत होईल.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


source: INTERNET
-ऋषिकेश सोपान खिलारे,
मेळघाट.             

... हो नक्कीच अश्या पद्धतीची शिक्षण पद्धती निर्माण केली जाऊ शकते.खरं पाहिल्यास अश्या शिक्षण पद्धतीचे अनेक उदाहरणे आपल्या प्राचीन इतिहासात पहायला मिळतात.ही सर्व प्रक्रिया एवढी उच्चकोटीची होती की हे विज्ञान प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी वेगवेगळ्या स्थरावर त्या त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रयत्न केले.यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक , दार्शनिक, न्यायशास्र, नीतिशास्त्र वैदिक,व महत्वाचे म्हणजे राज्यशास्त्र व लोकमानस या क्षेत्रातील ज्ञानी व्यक्तींनी मिळून जल,जंगल व जमीन म्हणजे भारत भूमीचे जीव,भौतिक व रसायन स्थितीचे अद्ययन करून भारतीय जीवन शैली निर्माण केली.यासाठी शेकडो वर्षांची अद्ययन  प्रक्रिया करून मिळालेल्या प्रायोगिक अनुभूतींवर आधारित शैक्षणिक प्रक्रिया विकसित केली होती.जिच्यामुळे विविधतेने नटलेल्या संस्कृती समन्वयाने निर्माण झाल्या , फुलल्या व वाढल्या तसेच टिकल्याही.

हा सर्व संशोधनात्मक अनुभव पाठीशी घेतला तर हे शक्य आहे.येणाऱ्या काळात आपण जर हे करू शकलो तर आपण कल्पना करू शकत नाही असा सृजनशील व उज्वल भारत आपण निर्माण करू शकतो.                             यासाठी काही गोष्टींवर आपणाला सखोल काम करावे लागेल हे नक्की. हे कार्य एका व्यक्तीचे नाही यासाठी सर्वाना सर्वतोपरी राष्ट्र निर्माणाचे कार्य *राष्ट्र सर्व प्रथम* या भावनेने करावे लागेल.

यासाठीचे अनेक मॉड्युल आपल्यासमोर  उपलब्ध आहेत. हे मी अनुभवांनी लिहीत आहे.महाराष्ट्रातील 45 व भारतातील 150 आदिवासी समाजाबरोबर  पारंपरिक ज्ञान या विषयात संशोधन करताना अश्या अनेक पद्धतींचा शोध लागला.त्याचे पायलट प्रकल्प पूर्ण झाले आहेत.या संदर्भात एक अभ्यास यात्रेत सौदागरजी काळे माझ्यासोबत होते.आपल्याला आश्चर्य वाटेल! की आपल्या कल्पनेच्या पलीकडे आदिवासी समाज हा मूल्य,विज्ञान आधारित जीवनपद्धती व तंत्रज्ञान या गोष्टीनी आपल्यापेक्षा फार पुढे आहे.फक्त त्याचे मापन करण्या एवढे आजचे विज्ञान व तंत्रज्ञान  विकसित झाले नाही . म्हणून मेटाफिजिक्स व न्यूरो सायकॉलॉजी यांच्या मध्ये फार मोठे संशोधन आपल्याला करावे लागेल.

विज्ञान,पर्यावरण व संशोधन यांचा मेळ घालणारे *ज्ञानाचे पंचशील हे*  ऍडव्हान्स मॉडेल मेळघाट मध्ये तयार होत आहे आहे.हे मॉडेल माझे गुरू डॉ.अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाने पायलट फेज पूर्ण करत आहे.जी 3 वर्षाची असेल आज देशात मुलांच्या क्षमता मोजणारे भारतीय टूल मानस शास्रात उपलब्ध नाहीत.इव्हन सरकार ज्या कल चाचण्या घेत आहे त्या ही शास्त्रीय आहेत का? मी फार स्पष्ट बोलणार नाही पण आपण सुजाण आहात. म्हणून स्वप्नगत वाटणारा हा आपला विषय सत्यात आणण्यासाठी काही आवश्यक गोष्टी...                                      
1.शिक्षण क्षेत्रातुन संपूर्ण राजकारण हद्दपार केले पाहिजे.  2.संशोधनासाठी आवश्यक सामग्री व वातावरण निर्माण करून निधीची व्यवस्था शासनाने केली पाहिजे.समाजानेही आपले हात अश्या कार्याला बळकट करण्यासाठी दिले पाहिजेत .
3.प्रयोगशील शिक्षणासाठी आज आहेत ,त्या शिक्षकांना ट्रेन करावे लागेल व D.Ed,B.Ed,M.Ed. व सलग्न प्रशिक्षण संस्थेत मोठया स्थरावर बदल करने आवश्यक.       4.सर्व शिक्षा संस्था शासकीय नियंत्रणात असाव्या लागतील.
...असो खूप काम बाकी आहे राष्ट्र  निर्माणची ही प्रक्रिया कठीण,त्यागाची व संघर्षमय आहे. आणि हो मला आजही स्वामी विवेकानंदांचे वाक्य अहोरात्र काम करण्याची प्रेरणा देते.  *जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी |*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************