रस्त्यावर उतरलेला शेतकरी.

रस्त्यावर उतरलेला शेतकरी.
वाल्मीक फड,
महाजनपूर, नाशिक.   
            शेतकरी तर आज सरकारचे हातातील बाहुले झाले आहे.कोणताही तोटा असो तो कायम शेतकर्याचाच बोकांडी बसतोय.मागिल काळात थोडाफार कांद्याला भाव वाढला तर देशातील प्रसार माध्यम इतके बोंबा मारायला लागले तर सरकारला छुप्या मार्गाने कांदा आयात करावा लागला.कांदा पाकिस्तानचा पण आणला  अफगानिस्थानच्या नावाने ,आणि आपल्या देशात कांदा शिल्लक असताना केवळ मिडियाच्या कारणाम्यामुळे देशातील कांदे आज शंभर,दोनशे रुपयाला क्विंटल असा खरेदी केला जातोय.ऊसाच्या बाबतीत पण तसेच घडले इकडे ऊस भरपूर साखर भरपूर प्रमाणात तरीसुद्धा पाकिस्तान कडून साखर आयात केली मग सांगा,शेतकर्यांनी घाम गाळून, भांडवल ओतून ऊभा केलेला माल असा बेभावात,मातिमोल किमतीत विकल्यावर राग नाही येणार का शेतकर्याँना ?का नाही उतरणार शेतकरी रस्त्यावर ?                          शेतकरी रस्त्यावर येतो म्हणजे तो रिकामटेकडा असतो म्हणून नाही तर ती त्याची मजबुरी असते.कोणत्याही मालाला भाव नाही.कांदा करा,वांगी करा,पालेभाज्या करा ऊत्पादन खर्च सुद्धा बाजारात नेल्यावर निघत नाही. काय करनार शेतकरी?मागच्या वर्षी कर्ज माफी जाहीर केली तिही फसवेगिरी निघाली कारण त्यांना माहित आहे की,शेतकरी कधिच कर्ज बुडवत नाही.म्हणून त्यांनी थकबाकीदारांना कर्ज माफ करायची घोषणा केली.आणि जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी माञ वंचित राहिले.त्यातच दुष्काळ आ वासुन ऊभा राहीला.मग ह्या सरकारचे काम नाही का त्यांना कर्ज माफी द्यायचे.हो..हो असतील काही शेतकरी धनदांडगे पण ते तुम्ही तपासून द्या ना शेतकर्याँना कर्ज माफी.हे काम शासनाचे आहे.म्हणे शासकीय कर्मचाऱ्यांना ह्या  योजनेचा लाभ घेता येऊ नये म्हणून आम्ही आॕनलाइन अर्ज भरुन घेतोय पण प्रत्यक्षात तसे नाहिय कारण मी एका सरकारी कर्मचार्याला लाभ होताना पाहिलाय.म्हणजे हे फक्त नाटकच होते शेतकर्याँना शांत करण्यापुरते? अहो नोकरवर्गाला सातवा वेतन आयोग मिळतोय मग राञीच्या वेळी पाणि देऊन जो माल शेतकरी कमवतोय त्याला त्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नको का भाव मिळायला? बरं हे राहु द्या स्वामीनाथन आयोग का चालू करत नाही सरकार?ह्याच गोष्टींमुळे शेतकर्याँना रस्त्यावर उतरावे लागते आहे.सरकारने वेळीच लक्ष नाही दिले तर फार वाईट परीणाम आपल्याला भोगावे लागणार आहे.कारण निराशेपोटी शेतकर्याची मुले आज शेती सोडून मिळेल ती मजुरी करण्यासाठी शहरात पलायन करीत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुक्ता जाधव,
सोलापूर.
           "शेतकरी रस्त्यावर उतरलाय". ते गरजेचच आहे, शेतकरी रस्त्यावर त्याच्या हक्कासाठी उतरलाच पाहिजे.
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी,मला माहित आहे शेतकर्याच दु:ख खूप जवळून पाहतेय.
      आज नोकरदारांच्या गलेलठ्ठ पगारी,त्यांचे मोठ- मोठे बंगले, गाड्या,नुसता ऐशआराम ८-९ तास काम करुन!
     आणि आमच्या ह्या गरीब शेतकरयाला दिवस रात्र काम  करून,साध्या घरात रराहता येत नाही,स्वताच पोट नीट भरता येत नाही, नुसती गरीबी.
       शेतकरयाच्या या गरीब अवस्थेला कारणीभूत अवेळी पडणारा पाऊस आणि दुष्काळ तर आहेच पण जास्त शासन आहे.शासनाचा दुष्काळ निधी सुकाळांनच्या घरात,कर्ज माफी श्रीमंताची,शेत- तळी ह्यांच्याच  शेतात.शेतमालाचा भाव कमी आणि शेतीला लागणारा खर्च मात्र दुप्पट.मग आहे ना शासन जबाबदार?
      आज शेतमाल वापरून बनवलेले पदार्थ त्यांच्या किंमती मात्र भरमसाठ आणि ही वाढत चाललेली महागाई म्हणन्या पेक्क्षा वाढवत चाललेली महागाई ही तर शेतकरयाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे.
     कधी संपणार हे? का उतरणार नाही शेतकरी रस्त्यावर? शेतकरी रस्त्यावर उतरला नाही तर त्याची गरीबी कधीच संपणार नाही. आणि गरीबी संपवायची असेल,स्व: ताचा हक्क घेयचा असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरलाच पाहिजे! शेतकऱ्यांनो हक्कासाठी लढा, लढतच रहा, एकत्र येऊन, रस्त्यावर उतरून सरकारला जागं केलं पाहिजे.
  कधी जाग येणार सरकारला? आणि कधी करणार शेतकरयाचा विचार?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीता देशमुख,
वसमत.
        भारत कृषीप्रधान देश असला तरी देशाचा मुख्य कणा शेतकरी हा सुलतानी आणि अस्मानी संकटाचा बळी ठरत आहे. पाऊस हा लहरीच असतो तो कधी इतका  प्रचंड कोसळतो की,शेतकऱ्यांच्या शेतातील पीक सगळे धुवून नेतो. या पावसामुळे ढोरावासरांना,निसर्गाला आणि माणसांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो पण शेतकऱ्यांपुढे मात्र अनेक प्रश्न उपस्थित करत असतो. यातही शेतकरी खंबीरपणे नैसर्गिक संकटांना तोंड देत देत तो आयुष्य पुढे सरकवतो. पण जेव्हा निसर्गाच्या कचाट्यातून वाचून  शेतकऱ्याच्या पदरात जे पीक येते त्यालाही मात्र भाव मिळत नाही,तेव्हा शेतकऱ्याजवळ कोणता पर्याय उरतो? एकतर सर्व शेती विकून शहरात जाणे किंवा आत्महत्या करणे. पण कल्पना करा सर्वच शेतकऱ्यांनी बिल्डर्सला शेती विकायची ठरवली तर तुम्ही आम्ही खाणार काय? आपण कितीही श्रीमंत असलो तरी शेवटी अन्नावाचून तर धकणार नाही. आधुनिकीकरण,यांत्रिकीकरणाकडे  लक्ष देणं जसं महत्वाचं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही पांढरपेशे लोक एवढे संवेदनाहीन झालोत की,सगळ्यांच्या हक्काचे मोर्चे,संप,आंदोलनं आम्ही समजुतदारपणे स्वीकारतो पण शेतकरी जेव्हा आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो,तेव्हा मात्र आपण त्यावर कडाडून टिका करतो. माय भाकर देत नाही अन् बाप भीक मागू देत नाही अशावेळी आत्महत्या करावीशी वाटते. पण आत्महत्यानेही समाजाला शासनाला आता काही वाटेनासे झाले तेव्हा तोच शेतकरी हक्कांसाठी रस्त्यावर उतरला तर त्याचे चुकले कुठे? म्हणतात की,रडल्याशिवाय आईही स्वतःच्या लेकराला दुध पाजत नाही. तशीच अवस्था आज शेतकऱ्यांची झालेली आहे. आम्ही पांढरेपेशे लोक आजच्या पॅकिंगच्या युगात दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतो आहे. आणि शेतकऱ्याजवळच्या ५ रु.च्या कोथिंबिरीला मात्र घासघिस करतो आहे. इतर वस्तूंची  प्रचंड भाववाढ झाली तरी कुरबुरत का होईना स्वीकारतो आणि शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढला की,शेतकऱ्यांचे कष्ट विसरून सरळ शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. आज शेतकऱ्यांना कोणी वाली उरला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित होऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा माझा बळीराजा मात्र जगला पाहिजे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिताराम पवार,
पंढरपूर .
वसंतराव नाईकांनी नागपुर येथील काँग्रेसच्या अधीवेशनमध्ये एकदा असे मटले होते की," शेतकरी मोडला तर लोकशाही मोडेल" त्यामुळे आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर शेतकरी टिकला पाहिजे, अशी आंतरीक तळमळ असलेला विचार, मानसिकतेचा सत्ताधारी/विरोधक नसल्याने आज शेतकरी रस्त्यावर उतला आहे. पण आपल्या महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली त्याची शासनाने वेळोवेळी दखल घेतली, आता मात्र बेधकल, आंदोलन चिघळून टाकणे, फक्त अश्वास देने, आंदोलनामागे विरोधक आहेत असं म्हणून, स्वतःच्या मिरचु-भाकरी घेऊन आलेल्या माझ्या शेतकरी मायबापाची थट्टा केली जात आहे. अर्थशास्त्र नुसार पुरवठा जास्त झाला की किंमत घसरते पण याचा समतोल साधण्यासाठी तर सरकार आहे ना.आणि शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा कुणावर आपल्या पंतप्रधानाणीं तूर लागवडीसाठी आवाहन केलं मग शेतकऱयांनी हमीभाव व हमखास खरेदीसाठी तूर पिकवली आणि त्याचं काय झालं, दुसऱ्या देशातील तूर आयात करून आपली तूर सडली.
मला मात्र शेतकऱ्याची सहनशीलता, न्याय मिळेल ही आशा थक्क करनारी वाटते. शेतकरी संप, दूध आंदोलन, उसाचा दर, कापूस, धान, सोयाबीन आणि सर्वाना रडवतो तो कांदाआंदोलन. हे झालं सनदशीर मार्ग पण ह्या जुन्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना हे मार्ग कुचकामी वाटत आहेत. त्याची उदा.विजेच्या डेपोवर चढणे, उसाच्या गव्हाणीत उडी मारणं, पाण्याच्या टाकीवर चढणे, ट्रॅक्टरच्या टायर मधील हवा सोडणं ,मंत्रालय विष घेणे यात रूपांतर होत आहे, आणि आशा जहाल कृत्याची दखल लवकर घेतली जाते असा समज आहे.  म्हणून या गांधीमार्गाचा आदर, सन्मान शासनाने करावा ,हीच विनंती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************