मोबाईल गेम मध्ये अडकलेली तरुणाई.

मोबाईल गेम मध्ये अडकलेली तरुणाई.
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,
वाशिम.
    २१ वे शतक हे मानवी इतिहासातील खूप महत्वाचे शतक राहील असे मला नेहमीच वाटते याचे कारण या शतकाच्या सुरुवाती पासूनच अनेक विशेष घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे...

मोबाईल म्हटले की हा विषय आता सर्व सामान्यांपासून ते उच्च भ्रू सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातले गेम म्हटले तर सांगूच नका, कारण या गेम नी आजच्या तरुण मंडळींचा चांगलाच 'गेम' केला आहे असं म्हटल तर वावगे ठरणार नाही.

गेम ( खेळ ) हे मनोरंजनाचे साधन आहे पण आज मोबाईल च्या गेम नी मनोरंजन ना करता व्यसनाधीन पिढी निर्माण करण्याला सुरुवात केव्हाची झाली आहे असं नाईलाजाने म्हणावे लागेल कारण या मोबाईल च्या गेम ने शारिरीक कसरतीचे खेळच हद्दपार केलेत.

आजकाल कुठले मोबाईल गेम जास्त चालतात याची मला नेमकी माहिती नाही पण तो ' पब - जी ' विशेष माहितीचा कारण या दिवाळीत त्या गेम चा नमुना बघून मी थक्क झालो कारण गावाकडील शहरात शिकणारी माझी काही तरुण मित्र तो खेळण्यासाठी गावच्या 3 किमी दूर पाटी वर जात कारण हा गेम खेळायला इंटरनेट लागत आणि गावात नेटवर्क नसल्याने त्यांना ही उचापत करावी लागे कारण या गेम मध्ये ' चिकन दिनर ' भेटते अशे पोट्टे सांगतात...

आजची वास्तविकता आहे तरुणाई आभासी दुनियेत जगू लागली आहे याचं मूळ कारण आहे जिवाभावाची मैत्री आज कुठेही नाही ती निर्माण करून हे मोबाईल गेम चे नेटवर्क वेळीच तोडले तर सार्थक नाही तर तरुणाईचा ' गेम ' पक्का बसणार आणि हेच तरुण पुढे आपल्या जगाचा गेम बसविणार.

शेवटी खेळा भरपूर खेळा पण मोबाईल विसरून... कारण खेळाल तरच तंदृष्ट राहाल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सैनपाल पाटील,
आजरा जि. कोल्हापुर.
         आपली पिढी या मोबाईलचा त्रासांपासून दूर होती या विचाराने थोडे बरे वाटते, पण त्याचवेळी आपल्या मुला-मुलींचे काळजीही वाटते. माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट योग्य प्रकारे वापरले तर माणसाचे जीवन बदलून जाऊ शकते, पण आजच्या अजाणत्या पिढीच्या हाती लागलेले मोबाइल, टॅब आणि त्यावर आधारित गॅजेट्स यांच्या गैरवापरामुळे या नव्या पिढीच्या मुलांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

या वयात शारीरिक आणि मानसिक विकास जलद गतीने होत असतो. अशावेळी मुलांच्या हातामध्ये मोबाईल त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास रोकू शकतो. मोबाईलचे रेडिएशन इलेक्ट्रॉमॅगनेटिक लहरी या मानसिक वा शारिरिक वाढीला घातक ठरू शकतात. यात हेडफोन मुऴे कान दुखणे, कमी ऐकु येणे, सतत गेम खेळल्यामुऴे अंगठे आणि बोटे दुखणे इत्यादि समस्या होतात. रेडिएशनमुळे तर डोळ्याना त्रासलेले चष्मेबहाद्दर पाहायला मिळतात.

सतत मोबाईल वापरल्यामुळे मुलांचा शैक्षणिक विकास मंदावतो. त्याचा मोबाइल अवलंबुन राहण्याने त्याची अभ्यासातील रुचि कमी होते.संगणकप्रणालीचा जास्त वापर केल्यामुले शैक्षणिक पाया कमजोर होवु शकतो. मग परिक्षा पास करण्यासाठि गैर मार्गाचा अवलंब केला जावु शकतो.

आजकाल मुले पोर्नोग्राफिच्या जंजाळात अडकून भरकटत जातात. यावयात योग्य अयोग्य या द्वंद्वात मुले एकटी एकटी राहतात। फक्त क्षणिक व हव्याश्या वाटणाऱ्या आनंदामुळे यात रुतत जातात. मग त्यांची या कचाट्यातून सुटका करणे अवघड होऊन जाते. सहाजिकच मग अश्या मुलांच्या बौद्धिक शारीरिक आणि मानसिक विकासावर झालेला परिणाम गंभीर स्वरुपाचा असतो.

आता इतके सगळे मोबाईल वापराचे गैर परिणाम जाणवतात म्हटल्यावर मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळावा का? मोबाइल वापराचा अतिरेक टाळून त्याचा योग्य कारणासाठीच जर वापर केला तर तो फायदेशीर ठरू शकतो. मोबाईल मुळे आपली मुले नेहमी आपल्या संपर्कात राहतात. काही प्रमाणात ती स्वतःला सुरक्षित मानतात कारण अडचणीच्या वेळी ते आपल्या आई-वडिलांना संपर्क करू शकतात. आज-काल सोशल नेटवर्किंग चा वापर करून मुले  माहितीची देवाणघेवाण करू शकतात. बऱ्याचदा अभ्यासात सुद्धा मोबाईलचा वापर केला जातोय. अवघड प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. थोडक्यात काय मुलांना मोबाईल द्यावा पण पालकांनी याही गोष्टीकडे लक्ष द्यावे की मुले त्याचा योग्य वापर करत आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

किरण पवार,
औरंगाबाद.

               "पब जी" सध्याचा लेटेस्ट ट्रेन्ड झालेली मोबाईलवरची गेम. मागे त्या व्हिल माश्याने आत्महत्येचं थैमानं घातलं होतं. आणि आता ही गेम तरूणाईच्या वेळेच्या अपव्ययाच साधन झाली आहे. मोबाईल गेम मध्ये तरुणाई का अडकते? आपल्या आयुष्याचे निर्णय ज्या वयात धडाडीने घेतले जायला हवेत; त्याच वयात तरूणाईला बेफिक्र होण्याच एक साधन मिळालं. ताण-तणावातून गेमिंगमुळे मानसिक स्वास्थ लाभतं, हे सहसा सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा मुद्दा केवळ तात्पुरत्या क्षणांसाठी असतो. तेथून पुढे तरूणांना आयुष्यात स्वत:च मूव्ह ऑन करावं लागतं. काहीतरी नक्की चुकतयं. मागे पॉकीमॉनने नाहक कितीतरी बळी घेतले होते. या बाबींची दखल घेण्यासारखीच आहे. कारण मानवनिर्मित गोष्टी मानवाचाच विकास अंताला घेऊन जात आहेत. बाहेरच्या देशातील तरूणाई गेमिंगचा वापर करत नाही असं नाही; पण त्यांचा त्यासाठी ठराविक आणि लिमीट असणारा वेळ असतो. आपल्याप्रमाणे आली लहर केला कहर असं नसतं. आयुष्याच्या जडणघडणीत जिथे एके काळी शाळा महत्वाच्या केंद्रस्थानी होती आज तिथे मोबाईल आणि  आधुनिक उपकरणे येऊ पहात आहेत. साहजिकच यामुळे मानवी प्रवृत्ती चंगळवादाला जन्म घालत आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिताराम पवार
           मला एकदा सरांच्या घरी झोपायला बोलावले होते मग त्यादिवशी त्यांचा मुलगाही आला.बाहेरगावी असतो शिकायला मला वाटले आल्यावर काही बोलेल, बसेन निदान वडिलांशी. आमच्या घरी मी गेल्यावर आमची सगळी वस्ती धुंडून ,सगळ्या म्हाताऱ्या माणसांना भेटून परभणी काय मंतय पाऊस पाणी, झाल्या का नाही पेरण्या?अशी चरच्या ठरलेली. पण हा भैया आला आणि थोडंच बोलल्यासारखं करून त्याच्या रूनमध्ये गेला. आणि थोडयाच वेळात आवाज येऊ लागला "फायरिंग करलवकर, अरे खाली बॉम्ब आहे,आलं बग ,मारमार, ओ ओ"
मी सरांना विचारलं अहो असं कसा आवाज करतोय भैया. तर सर मणले अरे "ती पिस झालंय. आमला कलंक आहे कारण मी शारीरिक शिक्षनाचा शिक्षक आणि हे पोरग कधी व्यायाम करत नाही झोपतोय 3 ला आणि उठतोय 8ला.सर ग्रामीण भागातील आहेत त्यांनी गावरान शब्द भरपूर वापरले. कारण एकदा त्याला दूध गरम करायला ठेवलं होतं गॅस बंद करायला सांगितले तर त्याच्या लक्षात नाही पूर्ण पातेलं दुधाने करपून काळ झालं.मग मी त्याच्याकडून गेम बद्दल माहिती विचारली त्याने सांगितले माझा मित्र तिकडून मी आणि अजून 2 असे 4 जण लागतात ऑनलाइन गेम ह्मणे.
ह्या गेम मुळे मुलं वेळेवर जेवत नाहीत, व्यायाम नाही,पूर्ण झोप नसल्याने चिडचिडेपणा वाढला आहे. विशेष म्हणजे त्यांची सहनशीलता व समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची मानसिकताच राहिली नाही. कथा, कादंबरी,कविता आणि इतर ऑफलाईन साहित्य वाचनाची आवड कमी होते आहे.मैदानी खेळ आणि मर्दुमकी दाखवायच्या वयात हे तरुण मागे पडत आहेत.  आजची कॉलेजची काही मुलं फक्त सिल्याबस चा अभ्यास करतात आणि मोबाईल वर बिझी असतात अवांतर वाचनही करायला हवं .तरुणाई जर अशी गेम मध्ये अडकली तर त्यांच्या आयुष्याचा तर गेम होईल पण देश, समाज यासाठी त्यांनी वास्तवाचे भान ठेवून लवकर ह्या गेमचा नाद सोडला पाहिजे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संदेश पाटील,
धुळे.
खरं म्हणजे मोबाईल हे प्रगतीचे माध्यम आहे की , अधोगती चे माध्यम आहे असं कधी कधी वाटायला लागले आहे.कारण आज काल तरुणाई ही मोबाईल मध्ये इतकी अडकली आहे की , त्याना इतर बाहेरील जगात काय सुरू आहे हे सुद्धा डोळे बंद केल्या सारखे वाटायला लागले आहे.पूर्वी सुरुवातीला टेम्पल रन ,मग पॉकेमोन गो , मग ब्लू व्हेल गेम , आणि आता सध्या च्या काळात सर्वात प्रसिध्द असलेला गेम म्हणजे पब'जी'.
    पब"जी" हा नुसता गेम नाही तर ते तरुणाईला लागलेलं एक व्यसन जरी आपण म्हटलं तरी ते वावगे होणार नाही.कारण त्याची परिस्थिती अशी असते की , ते पब'जी' खेळत असतांना जर कोणाचा फोन आला तर साधा फोन उचलणे सुद्धा महत्वाचे समजत नाही.पूर्वी मोबाईल हे फक्त संभाषण करण्याचे माध्यम होते.परंतु जस जशी प्रगती होत गेली तसे मोबाईल चे स्वरूप देखील बदलत गेले परंतु तरुणाई ने मोबाईल गेम मध्ये अडकून राहणे हे येत्या काळात पालकांन साठी चे खुप मोठे आव्हान होऊन बसणार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निखिल खोडे,
ठाणे.

            आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे.  इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजाना आपल्याला एका मिनटात मिळतो. त्याचबरोबर मोबाईल गेम्स व त्या गेम्स ना आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोबाईल गेमच्या अती वापरामुळे तरुणांमध्ये डोळ्यांवर परिणाम, मानसिक, शारीरिक आजार, चिडचिड पणा, उशिरापर्यंत जागणे अशा बऱ्याच समस्या वाढत आहे.
 
              मोबाईल कंपन्या मध्ये चालु असलेल्या स्पर्धा, ग्राहकांना आकर्षित सुविधा देण्यासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे नवनवीन गेम तयार होत आहे. अलीकडे कँडी क्रश, टेम्पल रन यांसारखे गेम कमी वेळात लोकप्रिय झाले. खेळायला सोपे असल्यामुळे हे असे गेम लहान मुलांपासून तर प्रौढ वर्गापर्यंत बरेच लोक खेळताना दिसतात. स्मार्टफोन च्या माध्यमातून एका क्लिक वर अनेक गेम उपलब्ध होत असल्याने तरुण वर्ग अलगदपणे मोबाईल गेमच्या मोहात अडकत आहे. दर चार- पाच महिन्याने एखादा गेम तरुणांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करताना दिसते.

           सध्या पबजी हा गेम तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. पबजी हा गेम मुले सामूहिक रित्या खेळत असल्याच समोर आले आहे. मोबाईल मधील खूप सारे गेम विनाशुल्क डाऊनलोड करता येतात परंतु त्यामधील काही गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. तरुणांना मोठ्या प्रमाणावर लागलेल्या सवयी मुळे काही लोक त्यासाठी पैसे सुद्धा मोजतात.

              मोबाईल गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुलांमधे एकटेपणा, स्वतःच्या विश्वात हरवणे अशी लक्षणे दिसून येतात. सतत मोबाईल वापरल्यामुळे मुले शारीरिक दृष्ट्या कमकुवत होत आहे. मोबाईल रेडिएशन मुळे मेंदुवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मोबाईल गेम च्या अतिरेकामुळे मुले अभ्यासापासून लांब चालली आहे. मोबाईल गेमचा अतिवापर केल्याने अशे अनेक परिणाम होण्याची शक्यता आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिध्देश्वर आघाव,
जालना.

समाज हा अन्न ,पाणी,निवारा या तीन मूलभूत गरजा शिवाय जगू शकत नाही असे आपण म्हणतो परंतु अजुन एक गरज  आणी ती म्हणजे मोबाईल. ज्याकाळी आमच्याकडे मोबाईल नव्हता त्या
काळी आम्हालाही त्यात रस नव्हता .
परंतु आजची तरुण मंडळी समाजात समाधानकारक जीवन जगण्यासाठी मोबाईलचा आधार घेऊ पहाते आहे परंतु समाधानकारक जीवन जगण्यासाठी असमाधानकारक  व नसंपनार अशा मोबाईल मधील खेळ म्हणजे (गेम) चा आधार घेत
आहे . तासन तास त्या भुलभूलैयाच्या खेळापाई  आयुष्यातील वर्तमान व भविष्य देखील पणाला लावतांणा आपल्याला दिसत आहेत  याचे भाण देखील आजच्या तरुनाईला राहीले नाही .
देशाचा तरुण हा त्या देशाचे भविष्य आसते हीच बाब तरुणाईच्या ध्याणात नाही आणी यासाठीच सरकारने व वडील मानसांनी या मध्ये लक्श द्यायचीगरज आहे.
तासन् तास गेम खेळत बसलेल्या तरुण वर्गातील सर्वात मोठा प्रश्न म्हनजे बेरोजगारी होय. आणी याचेच रुपांन्तर पुढे गुन्हेगारी प्रर्वतीतत होते वा समाज हा कितीतरी दशक पुन्हा एकदा मागे जातांना पहावयास मिळतो.
आणी याच कारणांनी तरूण आपण दिशा भटकुण जातो. .
या आणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

करण बायस,
जि. हिंगोली.

मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाजक अंग बनत चालला आहे. नकळत त्याच व्यसन माणसाला लागत आहे.दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो ते कसं संपवता येईल यात जास्त वेळ जातो.कारामणुकी म्हणून खेळले जाणारे आऊटडोअर गेम्स आता मोबाईल वर खेळता येतात,पण हे गेम्स एक व्यसन लावतात ते कशाप्रकारे त्यामध्ये ते आपल्याला काही टास्क देतात ते जर आपण पूर्ण केले तर आपल्याला काही रेवॉर्ड मिळतो/किंवा पुढची स्टेप अनलॉक होते हाच आपला उत्साह आपल्याला त्याच आपल्याला व्यसन लावतं. बरेच मोबाईल गेम्स आलेत टेम्पल रन, कँडी क्रश, लुडो, काही स्ट्राटेजिक गेम्स ज्यांनी तरुणाईला खूप अडकवल ते म्हणजे clash of clans आणि PUBG बरेच टास्क पूर्ण करत वेळेचं भान न ठेवता तरुणाई यात जास्त अडकली.आणि यु ट्युब वर तर हे सध्या पैसे कमावण्याचं एक साधन आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सानप बालाजी,
बीड.
       माझ्या 2 3 मित्रांना आमच्या ग्रुपपासून तोडणारे Clash of clans, Pub g हे दोन गेम आमच्या ग्रुपचे सर्वात मोठे शत्रू आहेत अस बोलले तर काही वावगे ठरणार नाही. अगोदर मस्त गप्पा गोष्टी व्हायच्या पण जशे त्या गेम ने एन्ट्री केली तसं सगळंच बंद आता कधी रात्री मित्रांना कॉल केला तर ते डायरेक्ट बोलतात भावा नंतर कॉल करू का पब जी चालू आहे. सांगण्याचा तात्पर्य इतकाच की या गेममुळे पूर्वी होणारा सवांद हरवत चालला आहे.
        भारतातील संपूर्ण नाही पण अँड्रॉइड मोबाईल वाफरणाऱ्यांमधील बऱ्यापैकी युवक हे या गेम च्या नादाला लागून त्यांचा अमूल्य आज वेळ वाया घालत आहेत.
       पॉकेमोन का कोणत्यातरी गेममुळे मागे बऱ्याच मुलांनी आत्महत्या केली या गोष्टीवरून आपण अंदाज लावू शकतो की नक्कीच गेमच व्यसन किती घातक आहे ते.
       गेम खेळायला काहीच हरकत नाही पण त्या गेमच व्यसन लागू नये अशी अपेक्षा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अंजली मालुसरे,
नवी मुंबई.

                         काही दिवसापुर्वी एक बातमी वाचनात आली की, पबजी गेममुळे एक तरुण इतका अस्वस्थ झाला कि त्याला हॉस्पिटलमध्ये न्याव लागलं.. पबजी हा गेम येण्याआधी ब्लु-व्हेल गेमने धुमाकुळ घालुन अनेक तरुणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल होतं.. रस्त्यातुन चालताना आजही काहीजण कँडी क्रश खेळताना दिसतात.. यातुनच आजची तरुणाई ही मोबाईल गेम मध्ये किती अडकलेली आहे हे दिसुन येते....
                      आज पहावं तिथे लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतात. खरंतर या वयात त्यांना मैदानी खेळांच आकर्षण असायला हवं. मोबाईल कंपन्या स्वतच्या फायद्यासाठी अनेक सुविधा देतात आणि आपण त्यांच्या जाळ्यात अलगद अडकतो आणि तेथुन बाहेर पडणंही मुश्किल होउन जात. तसेच या परिस्थितीला काही अंशी पालकसुद्धा तितकेच जबाबदार असतात. कारण जर पालकांच्याच हातात सतत मोबाईल असेल आणि मुलांशी संवाद साधायला त्यांच्याकडे वेळच नसेल तर माञ फक्त मुलांनाच संपुर्ण दोषी मानुन नाही चालणार..
                     मला अजुनही आठवतय कि ज्यावेळी मोबाईल नसताना आई आम्हांला पञ लिहायला सांगायची आणि ते लिहुन झाल्यावर समोरच्या व्यक्तिला कधी पोहचेल याची शाश्वती नसतानाही ती खुप समाधानी असायची, पण आता मोबाईल आल्यानंतर माणसं एकमेकांच्या जास्त संपर्कात आली आणि ते समाधान वाढण्याऐवजी पार लयाला गेल..
           मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.. ज्यांनी या देशाचे रक्षण करायला पाहिजे, देशाचे भवितव्य ज्यांच्या हातात आहे तेच जर मानसिक आणि शारिरिक सक्षम नसतील तर भविष्याच्या दृष्टिने हे खुप घातक आहे. म्हणुनच या तरुणाईला मोबाईल गेममध्ये एवढ खोल अडकलेल पाहुन आपण मोबाईल बनवलेला आहे कि मोबाईलने आपल्याला हा प्रश्न पडल्यावाचुन रहात नाही. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसं जवळ आली पण माणसातलं प्रेम, आपुलकी कायमसाठीच दुरावलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अपेक्षा मानाजी,
मुंबई.
         मोबाईल आजच्या युगात वरदान ठरत असलं तरी त्यातील हिंसक गेम्स सबंध मानवजातीला लागलेले ग्रहण आहे.गेम्स जे तरुणाईचा वास्तवापासून दूर आभासी दुनियेच्या खोल दरीत कडेलोट करीत आहेत.त्यातही दुर्दैवाची गोष्ट अशी की ही अफू खुद्द  सुशिक्षित आईवडिलांकडून मुलांना दिली जात आहे.अगदी एक वर्षांपर्यंतच्या मुलांच्या हातात ही मोबाईल दिला जातो.ज्या वयात मुलांचा शारीरिक, बौद्धिक व भावनात्मक विकास सर्वात जास्त होतो,त्या वयात गेम्स मुळे त्यांची भावनात्मक व बौद्धिक वाढ खुंटली जाते.
ऑनलाईन मोबाईल गेम्स खेळताना जास्तीत जास्त रेडिएशन उत्सर्जित होत असतात,त्यातूनच लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये कॅन्सर च प्रमाण वाढत चाललं आहे.गेम्स मुळे दृष्टीवर परिणाम होतो व दृष्टीचे अधुपण मुलांच्या वाट्याला येतं आहेत.गेम्स च व्यसन पराकोटीला गेलेल्या मुलांमध्ये गेम न मिळाल्यास अस्वस्थ वाटणे,दृष्टीचे अधूपण,मायग्रेन,शारीरिक स्थूलता अशी लक्षणं दिसून येतात. पब जी सारख्या गेम्स मुळे मुलं नकळत हिंसक होत चालली आहेत
सुदैवानं आम्हाला आमचं बालपण मिळालं.शाळेतून घरी आल्यावर मैदानात पळण्यात,लंगडी,पकडापकडी,डोंगर पाणी, लपाछपी,लगोरी खेळण्यात,आई चा कुशीत शिरून गोष्टी ऐकण्यात ,जे सुख होत ते ह्या गेम्स मध्ये नक्कीच नाही.मैदानी खेळांमुळे शारीरिक कसरत व्हायची,मातीशी संबंध असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिक रित्याच वाढायची,परंतु ह्या गेम्स च्या नादात तरुणांनी व लहान मुलांनी मैदानी खेळांकडे जी पाठ फिरवली आहे ते त्यांचं दुर्दैव च म्हणावं लागेल.
गेम रूपी राक्षस किती मातला आहे ह्याची झलक ब्लू व्हेल सारख्या गेम्स मुळे पाहायला मिळाली,तो कमी होता म्हणून मोमो सारखा गेम ही त्याचे बळी घ्यायला पाठोपाठ आला आणि ह्यांसारखे अनेक गेम्स अस्तित्वात आहेत आणि तरुण आंधळेपणाने त्याला बळी पडत आहेत.गेम्स मुळे मुलं एकलकोंडी होत चालली आहे,शिकलेल्या पालकांना ही ह्याच गांभीर्य समजत नसेल तर अशा शिक्षणाला काहीच अर्थ नाही.मुलांना गेम्स च व्यसन लागू नये ह्यामध्ये पालकांची फारच महत्त्व पूर्ण भूमिका असते.मुलांना गप्प करण्यासाठी किंवा गुंतवून ठेवण्यासाठी बऱ्याचदा गेम ची अफू स्वतः पालक देतात.अशा वेळेस पालकांचा मुलांशी प्रेमळ व मैत्रीपूर्ण संवाद महत्त्वाचं असतो.पालकांनी बौद्धिक व शारिरीक वाढीस पूरक अशा कार्यांमध्ये गुंतवून ठेवले तर मुलं फक्त हुशार होणार नाहीत तर त्यांच्यात नैतिकता ही वाढीस लागेल.सरतेशेवटी गेम्स वाईट आहेत हे सिध्द करणे हेतू नाही परंतु त्यांचा अतिरेक मात्र माणसाला अजगरासारखा तणावाच्या विळख्यात जखडत चलाला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************