जगावे... का आणि कशासाठी...?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
📄 आठवडा 5⃣8⃣वा 📝
अभिमानाचे आणि यशस्वितेचे एक वर्ष
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒
09डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018

जगावे... का आणि कशासाठी...?


अनिल गोडबोले
सोलापूर


जन्माला आलो आहे म्हणून जगावं लागत आहे.. एवढंच खर तर याचं उत्तर आहे. पण माणूस हा बुद्धीचा वापर करणारा प्राणी आहे, त्यामुळे असे बरेचसे प्रश्न माणसाला पडत जातात.

आपण आपल्या माणसांसाठी जगतो, आपल्या स्वप्नासाठी जगतो, झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जगतो. ध्येय पूर्ण करण्यासाठी जगतो, आयुष्यात काहीतरी करून दाखवू म्हणून जगतो.

आनंदी राहण्यासाठी जगतो, दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी जगतो. प्रेम करण्यासाठी जगतो तर काही ठिकाणी प्रेम मिळवण्यासाठी जगतो.

तर जे काही आपण विचार करतो त्या पद्धतीने जगतो. कधी कधी विचारशक्ती खुंटते आणि त्रास व्हायला लागतात तेव्हा, त्रास संपावण्या ऐवजी माणूस स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न करतो.

या सगळ्या मध्ये माणूस स्वतः साठी आणि या जगासाठी जगतो का? हा खरतर प्रश्न आहे. आपल्या जगण्याचा आनंद घेताना दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसं करत आहोत का?.एखाद्या साठी निर्व्याज काही करत आहोत का? या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर योग्य मार्गावर आहोत आपण..

आपल्या आयुष्यात आपण अशा काही गोष्टी करू शकतो का? ज्यामुळे इतिहास, विज्ञान, नागरिकशास्त्र आपला उल्लेख भविष्यात सतत करत राहील.

जीवनातील काही उदात्त हेतू ठेवून मानवजातीच्या कल्याणासाठी काही करू शकत असेल तर ते करावं.. .
प्रेम करावे.. भरपूर करावं आणि मनापासून जगावं.... आनंदी जगावं.. या पेक्षा वेगळं काही आयुष्य नसावं, असं माझं मत आहे.

श्रीनाथ कासे, सोलापूर

माणूस का जगतो ?... प्रेमासाठी ? जन्म व मृत्यू या दरम्यान तो ज्या गोष्टी करतो. ते माझ्यामते मुद्दामहून करत असतो. जगण्यासाठी अनेक कारण असतात. मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.


असेच आठवावे कधी तुला मुद्दामहून
बघावे निरखून त्या खुणा मुद्दामहून..

आठवणीत तुज्या मी हरवून जावे मुद्दामहून
नजरेतून माझ्या तू नजर मिळवावे मुद्दामहून..

तुझ्या सोनेरी लटा कानामागे सावरून
मला बघावे, बघून तू हसावे मुद्दामहून..

गालावरील खळी किंचित खूलावे बावरुन
ओठावरील लाली किंचित रूसावे मुद्दामहून..

माझे विचार, तुझे विचार घ्यावे जरा जुळवून
स्वप्नसुंदरी, तुझेच प्रेमगीत मी गावे मुद्दामहून..

जगावे, प्रेम करावे, मरावे सर्वकाही मिळवून
रडावे, प्रेम वाटावे, हसावे, सर्वकाही मुद्दामहून..

ऊमलुन फुलावे, कोमेजून माती व्हावे, नव्याने रुजवून ..
आठवावे, त्यात तुला स्मरावे, प्रेम व्हावे नव्याने मुद्दामहून..

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.


मी शाळेत असताना आमच्या शाळेच्या भिंतीवर अनेक सुविचार लिहिलेले होते त्यातील एक सुविचार होता तो म्हणजे " जगावे परी कीर्तीरूपी मागे उरवे " तसलाच जगणं प्रत्येकाला अपेक्षित असते का बरं?

तर माझ्या बाबतीत कुठल्या प्रकारची कीर्ती निर्माण करावी ह्या बाबत थोडा गोंधळच असतो कारण वेळेनुसार बदल होत जातच आहे माझ्यातही साहजिकच आहे तो सर्वांमध्ये होतच असतो पण माझ्या बाबतीत इतरांना तो जास्तच जाणवतो...असो. मी नेहमी सुखी प्राणी आहे असं माझ्या अप्तांचे म्हणणे आपल्याकडे म्हण आहे " निर्लज्जम् सदा सुखी " तसही काही नाही बरं का.

सर्वांच्या मनामध्ये जगण्याचे अनेक हेतू असतात जसे सैनिकाला देशसेवा साठी जगावे वाटते, डॉक्टर ना रुग्णसेवा, पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था तर गुंडांना त्याच कायदा आणि सुव्यवस्थेचा बिमोड करण्यासाठी असं प्रत्येकाचं जगणं ठरलेलं असत.

पण मला जगावं वाटतं अगदी " तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा " या वाक्याप्रमाने कारण आपल्या एकट्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतात ही सर्व आजूबाजूची मंडळी.

शेवटी जगावे अपार प्रेमासाठी, सेवेसाठी ( वर नमूद आणि इतर ), किर्तीसाठी बस एवढंच...

संगीता देशमुख,वसमत

इथे प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे.प्रत्येक सजीवाने जगलेच पाहिजे. पण इतर सजीवांमध्ये आणि मानवामध्ये एक फरक आहे. तो म्हणजे माणूस जन्माला येताना अनेक ऋण घेऊन जन्माला येतो. त्यामुळे त्याचे जगणे हे एकट्यापुरते मर्यादित रहात नाही. जीवनात ब्रम्हचर्याश्रम,गृहस्थाश्रम,संन्यासाश्रम,वानप्रस्थाश्रम, यातून जाताना त्याच्या आयुष्याची परिपूर्ती आपोआप होते. अशावेळी अनेक संकटे,दु:ख,अडथळे त्याच्या जीवनात आली,जीवनात जीवावर बेतणारे प्रसंग आले,क्षणभर धीर सुटला तरी त्याला एकच मनावर बिंबवावं लागते की,माझ्या जीवनावर जेवढा माझा अधिकार आहे,तेवढाच अधिकार इतरांचाही आहे. अशी भूमिका आपण जेव्हा जीवनात घेतो,तेव्हा आपल्याला आपण "जगावे... का आणि कशासाठी?" याचे उत्तर मिळून जाते.
जगताना निराशा येणे किंवा खचून जाणे एवढेसेही कारण मरण्यासाठी पुरेसे असते परंतु जगावे कशासाठी? याला मात्र अनेक कारणे आहेत. आपल्या नात्यांची गुंतवणूक, आपली इतराना असणारी मानसिक,शारीरिक,आर्थिक,भावनिक,सामाजिक गरज,आपली समाजाप्रति,कुटुंबाप्रति असणारी कर्तव्ये,ही जगण्याची मुख्य कारणे आहेत. पण यातील खूप मोठे सत्य हे आहे की,माणूस प्रेमाशिवाय जगू शकत नाही. प्रेमाशिवाय तो फक्त मरूच शकतो. जीवनात कोणाचेच प्रेम मिळत नसेल तर माणूस मरणाचा विचार करतो. पण अशावेळी आपण धीर देणारी मित्र बनवली असतील तर तीच मित्र तुमच्या जगण्याचे मुख्य कारण बनू शकतात.मला मरण्यासाठी एखादे कारण असले तरी जगण्यासाठी मात्र अनंत कारणे असतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी,"जगणे अर्थपूर्ण बनले पाहिजे तसे मरण सुध्दा अर्थपूर्ण बनले पाहिजे." नाहीतर किड्यामुंग्यांचं जीवन तर कोट्यवधी लोक जगत आहेत.


*जगावे का आणि कशासाठी?*


"आज जगून घे..."
कवी अनिकेत कांबळे

आज जगून घे
उद्या तुझी पावलं स्वतः येतील स्मशानात..
तुला विद्युत यंत्रावर जाळलं जाईल..
रडायला चार माणसे भाड्याने बोलावली जातील..
तू जगून घे आजच...
दोरी हुडकू नको,
ना फिनाईल ना झोरोमाईन...!!
सलाईन लावायची वेळ येईल एवढं करू नकोस, तडफडू नकोस..
कारण हरामी माणूस
खाटावर पडलेल्या मड्यावर वर कमी आणि जिभेवर जास्त जीव लावतो...
तुला भावनेच प्रेमाचं टॉनिक नाही भेटणार,
आजच्या हायब्रीड हॉस्पिटलमध्ये..
घरी गेलास च बरा होऊन तर
तर मला इच्छामरण द्या अस सहजच म्हण...
किती डोळे भिजतात बघ..
आणि भिजलेच तर खुशाल जग..
नाही तर जिवंतपणी मरण बघ...
आज हे सगळं जगून घे..
जगून घे...

अर्जुन गोडगे , सिरसाव ता.परंडा जि.उस्मानाबाद


डोळे पुसायला कुणीतरी असेल तर
रूसायला बर वाटत...

ऐकणारे कुणीतरी असेल तर मनातल
बोलायला बरे वाटते..

कौतुक करणारे कुणीतरी असेल तर
थकेपर्यंत राबायला बर वाटत..

आशेला लावणार कुणीतरी असेल तर
वाट बघायला बर वाटत..

आपल्यासाठी मरणार कुणीतरी
असेल तर
मरेपर्यंत जगायला बर वाटत..

आपल्यासाठी कोणी असेल कोणीच
नसेल तर
आयुष्य गंडल्यागत वाटत..

कोणी असो वा नसो जीवन तर
सर्वाना जगावच लागतं.


विशाल कांबळे. सांगली


   जगणं...

स्वतःसाठी जगणं हे कधीच जगणं नसतं.
ते फक्त स्वतःचा स्वार्थ जपणं असतं..
खरं जगणं तर ते असतं जे दुसर्‍यांसाठी असतं..

स्वतःच्या सुखदःखात गुरफटून जाणं हे कधी जगणं नसतच. ...
खरं जगणं तर ते असतं जे दुसर्‍यांच्या सुखदःखात सामिल होणं असतं....

स्वतःच्या ईच्छा आकांक्षा पूर्णत्वास नेणं हे तरं जगणं
असतच....परंतु..
दुसर्‍यांच्या ईच्छा आकांक्षा पूर्तीत आपला वाटा निर्माण करणं हे खरं जगणं असतं .....

अर्चना खंदारे,हिंगोली

प्रत्येक माणसाचा जन्म झाल्यावर काही कालांतराने त्याला एक प्रश्न पडतो जगावे का आणि कशासाठी? कारण प्रत्येकाचा जन्म हा सारख्याच ठिकाणी होत नाही किंवा प्रत्येकजण हा मानसिक ,शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या सारखा नसतो. प्रत्येकालाच आपल्या जन्म पासून विविध अवस्थांमधून जावे लागते आणि या सर्व अवस्थांमधून जात असताना त्याला आपल्या कुटुंबामध्येही विविध प्रकारच्या भूमिका पूर्ण कराव्या लागतात.

तसेच प्रत्येकाची कोटुंबिक आर्थिक स्थिती हि योग्य असते असे नाही.त्यामुळे जीवन जगत असताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे तरुणांना हा प्रश्न पडतो म्हणजेच कोणी व्यसनाच्या अधीन जातो,कोणी आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे मानसिक ताणास बळी पडतो तर कोणी एखाद्या रिलेशनशिप मध्ये अडकून जातो मग आपण जगावे का आणि कशासाठी ? या विचाराने त्रासून जातो. अस्या परिस्थितीला बळी न पडता त्या परिस्थितीशी झगडून त्यातून मार्ग काढणे महत्वाचे ठरते.
मग जगावे.....का आणि कशासाठी ? हा प्रश्न निर्माण होणार नाही.....
Image source Internet..

1 टिप्पणी:

  1. सध्याच्या व्यस्त आणि तांत्रिक युगात आपण मुलांना इंटरनेटच्या स्वाधीन केले आहे. पण तुमच्या मुलांसोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्यासाठी नैतिकतेवर आधारित गोष्टी वाचून दाखवण्यासारखे दुसरे माध्यम नाही. तसेच त्यासोबत त्यांना शहाणपणाचे धडे सुद्धा देता येतील. आपण आपल्या मुलांना नैतिक मूल्यांसह एखादी गोष्ट सांगू इच्छित असाल, हो ना? ज्या वेळेस लहान मुलांच्या हातात मराठी पुस्तक द्यायला हवे त्या वयात आपण त्यांना स्मार्टफोन मध्ये पबजी,फ्री फायर असे खेळ खेळताना बघतो असे का? याला कारणीभूत कोण? मी प्रदिप बेलदार बेलदार आपल्याला हेच सांगणार आहे की कोणतीही गोष्ट योग्य त्या वेळेस करायला पाहिजे नाहीतर वेळ निघाल्यावर फक्त आठवणी राहतात.....धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************