शब्द

वाल्मीक फड,नाशिक. 
मी शब्द दिलाय काही काळजी करु नको तु बिनधास्त त्याला जाऊन भेट तुझं काम नक्कीच होणार,असं आपण कित्येकदा व्यवहारात बोलत असतो.माझ्या शब्दाला किंमत आहे म्हणूनच आज सगळं व्यवस्थित चाललय असेही आपण बर्याच वेळेस बोलतो ऐकत असतो.
शब्द काय आहे?तर माझ्या मते शब्द जादू आहे,शब्दांची जुळणी केली तर काव्य तयार होतं,शब्दाला शब्द जुळला की लेख तयार होतो आणी शब्दाला अगदी मोठ्या समूहात जर जोडले तर एखादी कादंबरी,पुस्तक,आणी मोठमोठे ग्रंथ तयार होतात.
किती वेळेस आपण बोलताना अनेक वेळेला समोरून जर कोणी काही उद्धट बोलत असेल तर आपण म्हणा की कोणीही असो त्याला सांगतो शब्द निट वापर.
शब्देची आम्हा धन हे फार पूर्वी संतवाङमयात लिहून ठेवलेलं आहे.शब्द चांगला वापरला तर माणूस आपली प्रतिमा अधिक ऊजाळू शकतो आणी वाईट शब्दाचा वापर केला तर शब्द आपल्याला माणसात बसून देत नाही.शब्दांच्या जोरावर सिकंदरासारखा राजा पुरु राजासमोर नतमस्तक झाला तो कशामुळे तर पुरु राजाच्या शब्दकौशल्यामुळे.
म्हणून माणसाच्या जीवनात शब्दाला खूप किंमत आहे मग शब्द आपण बोलताना लिहीताना कसे वापरायला हवेत हे आपणा सारख्यांना सांगण्याची गरज नाही.

मयुर डुमणे,उस्मानाबाद. 
एखाद्या भाषेतून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक म्हणजे शब्द. शब्द हे भाषेचे सामर्थ्य आहे. कोणतीही भाषा शिकायची म्हंटल की भाषेच्या व्याकरणाआधी त्या भाषेचे शब्द समजून घेणं महत्वाच आहे. आपली मातृभाषा मराठी. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी शब्द समजून घेण्याची विशेष गरज पडत नाही मात्र इंग्रजी सारखी एखादी परकीय भाषा शिकायची असल्यास त्या भाषेचे शब्द शिकून घ्यावे लागतात. 5 वी ते 10 पर्यंत इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजी शब्द पाठ करावे लागायचे. त्यासाठी शब्दकोषही होता. हे तुम्हाला आठवत असेलच. आपली भाषा जसजशी विकसित होत जाईल तसतसे शब्द पाठ करण्याची अजिबात गरज भासत नाही. भाषेचे आकलन होऊ लागलं की आपोआप शब्द लक्षात रहायला लागतात. 

आपण लहान होतो तेव्हा शब्दांना भाषा शिकण्यापूरत महत्व होतं. पण आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसं या शब्दाच सामर्थ्य आपल्याला कळायला लागलं. बंदुकीतील गोळी पेक्षाही हे शब्द नावाच हत्यार डेंजर असतं. वर्गातील छडी केवळ शारीरिक इजा पोहचवते मात्र शिक्षकांनी दिलेला शाब्दिक मार थेट मनाला लागतो. तो आपण कधीच विसरत नाही. 

वाचन वाढत जाईल तसं आपोआप आपल्या तोंडी भाषेतील वेगवेगळे शब्द येऊ लागतात. या शब्दांमुळे आपण भाषेवर प्रेम करू लागतो. मराठी भाषेत तर काय दर्जा शब्द आहेत. लिहिताना बोलताना आपण या दर्जेदार शब्दांचा आपण नेहमीच वापर करत असतो. मृगजळ, प्रतिभा, सौंदर्य, गुणवत्ता, मधुर, गेला बाजार, तृणधान्य, साहसी, खट्याळ, विलोभनीय काय एकापेक्षा एक भारी शब्द मराठी भाषेमध्ये आढळून येतात. अशा शब्दांमुळे भाषेला वजन प्राप्त होत. हे शब्दच तुमचं व्यक्तिमत्त्व घडवायला मदत करतात. तुमच्या तोंडी कोणते शब्द येतात यावरून तुमचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं राहतं. हे झाले मराठी प्रमाण भाषेतील शब्द. बोली भाषेतील नादमय शब्द तर अस्सल मराठी भाषेचे सौंदर्यच जणू. खूप मोठा ही प्रमाण भाषा बोली भाषेत याला लई मोठा म्हणतात. तो नाद खूपच सुंदर असतो. पाऊलापाऊलावर भाषा बोलण्याची पद्धत वेगवेगळी आढळून येते. सोलापुरी, पुणेरी, नागरपुरची भाषा, कोकणी, अहिराणी,  मराठवाड्यातील भाषा अशा बोली भाषांतील शब्द भाषेची विविधता सांगतात. 

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू

तुमच्याकडे पैसा, धनसंपदा असेल तर ती चोरीला जाऊ शकते. तिचा केवळ भौतिक वापर होऊ शकतो. मात्र शब्दांची कमावलेली संपत्ती कधीच चोरीला जाऊ शकत नाही. ती तुमच्याजवळ राहणारी, तुम्ही कमावलेली संपत्ती मरेपर्यंत तुमच्याजवळ असणार आहे. भाषा आपण वाचत जातो आणि नवनवीन शब्द सापडत जातात. नवनवीन शब्द आपल्या ओठी येत राहतात. 

जागतिकीकरणामुळे भाषेची सरमिसळ झाल्याचे आपल्याला पहायला मिळतेय. इंग्रजी भाषेतील शब्द मराठी भाषेत घुसडले आहेत. इंग्रजी शिकण्याच्या नादात मराठी भाषेतील शब्दांचा विसर पडत चालला आहे. बोलताना मराठी शब्दच लवकर आठवत नाही ही समस्या बऱ्याच लोकांना सतावतेय. मराठी भाषेत चार ओळी लिहिताना किंवा बोलताना इंग्रजी शब्द आपोआप तोंडात येतात. हे अस का होतंय. याच उत्तर एक,च आपण स्पर्धेसाठी धावत असल्यामुळे रोजचे वर्तमानपत्र वाचायलाही आपल्याकडे वेळ नसतो. आपल्याला इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषा देखील अवगत करायची आहे. त्याला वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही.

अनिल गोडबोले,सोलापूर.
"शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी" अस एक गाणं आहे.. ते ऐकलं नाही विचार केला.. आपण सहज व्यक्त व्हायला शब्द वापरतो.. पण हे शब्दच नसतील तर किंवा कधी कधी असा प्रश्न पडतो की हे शब्द मी बोललो नसतो तर... 

शब्दच जगवतात आणि मारतात 
शब्दच वाढवतात आणि थांबवतात

शब्दच पेटवतात आणि विझवतात 
शब्दच हळुवार फुंकर घालतात शब्दच वादळ बनून फेकून देतात

शब्द फुटत नाहीत निशब्द झाल्यावर
भावना देखील परत नाहीत शब्दात

शब्द प्रेम करतात.. शब्द तिरस्कार करतात

शब्दच जवळ घेतात आणि सांत्वन ही.

शब्दांचीच प्रेरणा देतात शब्दच बनवतात हतबल कधी कधी

शब्द दिला की पाळला जातोच अस नाही
शब्द सुद्धा बोलला नाही म्हणून मन खट्टू होत कधी कधी

पाहिजे ते शब्द योग्य वेळी मिळावेत सर्वाना
नको ते शब्द सहन करायची शक्ती मिळो सर्वाना..

तर.. अस काही वाटत गेलं ते शब्दात मांडत गेलो..

(संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

प्रेम

🌱वि४☘️ या व्हाट्सअप ग्रुपवरून



-रत्नाकर सातपुते

" हो, रखमा सारखा सगळ्यांचा माथा भडकलाच पाहिजे नाही तर मग असे तोंड झोडून घ्यायची वेळ येते... " कोंडाजी ने रखमाची बाजू घेत म्हटले.
" जग बदलले आपण पण बदलून घ्यावा आता...पण सायबुला हे अजून कसे पटत नाही काय माहित."
सखाच्या या मतावर रखमाने सखालाच विचारले,
" तुझ्या पोरीने असे केले असते तर सहन झाले असते का तुला ?"
" तुला काय झाले येवढे भडकायला..."
सखा गोंधळात पडला...तेव्हा कोंडाजी समजावत म्हणाला,
" ह्या गोष्टी घडायला आई बाप पण कारण असतात...मी,माझी बायको आणि माझी पोरे या पेक्षा इतरांचा विचारच करायचा नाही...पोरांना सांगायचे कोणाकडे लक्ष द्यायचे नाही,आई बाप सोडून कोणाला घाबरायचे नाही,लोकांना आपले चांगले झालेले देखवत नाही..."
त्यामुळे मग पोरे बेफिकीर होऊन वागू लागले.दुसऱ्या कोणाला घाबरणे संपले.पोरांची वाईट वर्तणूक कोणी बापाला सांगायला गेले तर बाप त्यालाच खस्कुन मोकळा व्हायचा,मग कोण कशाला काही सांगेल...साऱ्या गावाला आधी माहित होते,सायबुची पोरगी पर जातीच्या पोरा बरोबर पळून जाणार आहे म्हणून...पण कोणी सांगितले नाही.आता बसले हाय तोबा करीत...



- संदिप बोऱ्हाडे
   (वडगाव मावळ , पुणे)

     अस म्हणतात जग जिंकता येते प्रेमाने. पण फक्त ते प्रेम निस्वार्थ असायला पाहिजे..
जे रंग, रुप, जात, धर्म, श्रीमंती , गरिबी पाहून केले जात नाही त्याला ‘प्रेम’ म्हणतात.

    जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच सर्वांना माहिती असेलच पोटच्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली होती...
प्रेम करांव भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
प्रेम करावे बाबा आमटे यांच्यासारखं कुष्ठरोग्यांसारखे..
प्रेम कराव संत गाडगेबाबा यांच्यासारखे गरीब, दीन, दुबळ्यांवरील केलेले प्रेम..
प्रेम कराव  साने गुरुजींसारखे विद्यार्थ्यांनवरील प्रेम..

     प्रेम म्हणजे प्रेम असतं..
वडिलधार्यांवरच प्रेम , वास्तूवरच प्रेम , झाडांवरच प्रेम , प्राण्यांवरच प्रेम , भाषेवरच प्रेम , गावावरच प्रेम , माणसांवरच प्रेम ,
आणि हो प्रेमाला वय, वस्तू, विशिष्ट गोष्ट, किंवा कशाचीच गरज नसते...ते कोणावरही, कश्यावरही आणि कधीही होऊ शकते त्याला वेळ , काळ , मर्यादा कसलेही बंधन अजिबात नाही.

    आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोड म्हणजे जेवणातल्या मीठ एवढ... कारण ते जास्त झाल तरी खल जात नाही आणि कमी झाल तरी जाणवत ... आणि महत्त्वाच आहे ते प्रमाणात असण!.. हे प्रमाण देखील ज्याच्या त्त्यच्या चवीनुसार!.

    प्रेम ही भावना किती सुंदर आहे. मातृप्रेम, देशप्रेम, बंधुप्रेम, पुत्रप्रेम अशा कितीतरी परी तिला लाभल्यात. परंतु प्रेम म्हटले की आम्हाला आधी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील शरीर पातळीवरची प्रेमभावनाच दिसू लागते.

     प्रेम करावे कोणीही कुणावरही, त्याला नसाव तारखेचे बंधन, प्रेम करावे स्वतःवर , समाजावर , देशावर, सृष्टीवर , विचारांवर ,
प्रत्येकाने प्रेम करावे माणुसकीवर ..



-वाल्मीक फड
नाशिक.

प्रेम हे अनेक प्रकारचे असते.आईचे मुलांवर,पत्नीचे पतीवर,गुरुचे शिष्यावर,एका शेतकऱ्याचे आपले बैल व शेतीवर,ज्या देशात आम्ही रहातो त्या देशावर,प्रेमीकेचे प्रेमीकावर असे अनेक गोष्टींवर आपण प्रेम करत असतो.ज्या वस्तू किंवा व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडून आपल्या फार मोठ्या अपेक्षा असतात.चुकून त्या व्यक्तीकडून आपला काही अपेक्षाभंग झाला तर आपण खूप गंभीर होतो.म्हणूनच मला वाटतं पहील्यांदा  प्रेम देशावर करावं कारण ह्या देशात जन्म होणे म्हणजे एका सुसंस्कृत समाजात असल्याचा भास होतो.कारण इतर देशांत आपल्याला अशी संस्कृती बघायला मिळणार नाही.पण आजकाल काही लोकांना काय वेड लागलय काय माहीत माझ्या ह्या सुंदर देशाच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहेत.
आणी दुसरे म्हणजे आपले आईवडील कारण त्यांच्यामुळेच आज आपण ह्या सुंदर जगात दिसत आहोत म्हणून त्यांच्यावर आपण जिवापाड प्रेम करावं.तसंच पशुपक्षी झाडे यावर तर खूपच प्रेम करावं कारण सुष्टिचे सर्व बदल हे भगवंत त्यांच्याकडे बघुनच करीत असतो.
आणी जीव गहाण टाकून प्रेम करावं देवावर कारण देवाने ही सृष्टी निर्माण केली नसती तर हा नरदेह आपल्याला मिळाला नसता आणी ह्या सुंदर देशात जन्म मिळाला नसता.म्हणूनच खूप खूप प्रेम करावं देवावर.



-अनिल गोडबोले
सोलापूर

पोथी पढी पढी जग मूआ
पंडित भया न कोय

ढाई आखर प्रेम का
पुढे सो पंडित होय..।।

कबिरांचा दोहा सगळं काही प्रेमबद्दल बोलून मोकळा होतो.

प्रेम ही भावना आहे, शुद्ध आहे चांगली आहे आणि ती असली पाहिजे.. तिला स्वार्थी पणा पेक्षा करुणेची जोड मिळाली तर ते प्रेम पवित्रच..
आम्ही प्रेम म्हणजे फक्त मुलं- मुली यांच्या बाबतीत बोलत नाही बर का..! 
पण" प्रेमाचा सप्ताह" चालू आहे ना.. तेव्हा शृंगारिक प्रेमबद्दल बोललेच पाहिजे..
ते भेटणं, ती हुरहुर, ती नजरानजर.. ते एकमेकांसाठी असणं.. दिसणं... फसण.. रुसणं.. हसणं.. बसणं.. आणि अजून बरच काही..
आपल्या साठी कोणीतरी आहे किंवा आपला विचार कोणीतरी करत आहे.. ही भावनाच इतकी भारी आहे..!!
मग हद्दी आणि सरहद्दी कसल्या लावता.. फक्त फरफट नको, नुसतच फिरवण् नको, खोटारडे पण नको..
त्याला/ तिला सांगू ना आपण.. मला तू फक्त या एवढ्या पुरती आवडतेस.. प्रेम वगैरे नंतर बघू..!
पण तेवढं डेरिंग यायला समाज ???
असो.. तरीही पूर्वी बागबगीचे नंतर लॉज, आता ओयो रूम भरून वाहतच आहेत.. सम्पूर्ण वर्षभर.  पण फक्त निमित्त पाहिजे हा आठवडा..

मस्त.. खुमासदार.. जीव तोडून प्रेम करा ना..!! बघा .. तुटलं तरी आपलं आहे ते..
ते पाडेल आणि सावरेल..
फक्त जरा जपून..
गुलाबी इश्क होऊन जाऊ दे..!

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************