🌱 वि४ 🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून
गुढीपाडवा : इतिहास ,मीमांसा आणि वास्तव.
सिमाली भाटकर,रत्नागिरी:
गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो दिनदर्शिके प्रमाणे चैञ शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.शालीवाहन संवत्सर शकेचा १ला दिवंत व वेदांत ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहुर्त पैकी हा एक आहे.
तसेच चैञ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक व आंध्रप्रदेशात चेटी-चांद,उगादी नावाने व वेगवेगळ्या पध्दतीने ही साजरा केला जातो.
जगातील विविध देशांमध्ये काठी पूजन नावाने ही हा सण साजरा केला जातो
उदाहरणार्थ 'इव्हाल्युशन आॕफ गाॕड ' या ग्रंथात ग्रेट अॕलेन यांच्या नोंदी प्रमाणे सायबेरीयातील 'सामो यीडस्' दक्षिण अफ्रिकेतील 'दामारा' या जमाती मध्ये काठी पूजन करण्याची परंपरा होती.
पारंपारिक समजुती प्रमाणे ज्या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्यामध्ये प्रवेश केला तो दिवस म्हणजे चैञ शुद्ध प्रतिपदा म्हणून गुढी उभारणी करुन हा दिवस साजरा केला जातो. मग आजच्या घडीला अयोध्येत हा सण का साजरा करत नाही? जेव्हा की ञिपूरा,मणिपूर,राजस्थान इत्यादी राज्यात काठी पूजन केले जाते.
भारतीय व महाराष्ट्रातील उत्सव,सण,परंपरा इत्यादींचा आपल्याला अभिमान असावा पण परंपरेच्या नावाखाली आपण अंधश्रध्देच्या अधीन तर होत नाही ना याचाही कुठेतरी विचार करावाच लागेल.
ज्या बांबूच्या काठीचा वापर आपण गुढी उभारणीसाठी करतो त्या बांबूच्या शेतीचे आर्थिक फायदे शेतकऱ्यांना आपण समजून द्यायला पाहिजे. तर त्यांचा आर्थिक विकास होऊ शकेल.
प्रत्येक वेळी सणांना परंपराना आधार देऊन अंधश्रध्दा वाढविण्यापेक्षा सणांना-परंपराना श्रध्देचा आधार देऊन आपण ज्ञानाचा प्रसार व समाजाचा विकास करु शकलो तर खरे अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा होईल असे मला वाटते.
Source: INTERNET
सौदागर काळे,पंढरपूर:
गुढीपाडवा या सणाच्या बाबतीत खूप कथा,आख्यायिका, नोंदी आहेत.त्यात रामाचे अयोध्येत आगमन असेल, ब्रम्हदेव यांनी सृष्टी निर्मिती केलेला दिवस असेल, वेदामध्ये सांगितलेल्या प्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असेल.या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा इतिहासाच्या नजरेतून याकडे पाहायला हवं.
इतिहास :-
सातवाहन घराण्याची सत्ता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ,कर्नाटक, मध्यप्रदेश यांतील काही भागामध्ये होती. सातवाहन राजा शालिवाहन याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली.जशी शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात शिवशक ही कालगणना चालू केलेली दिसते.म्हणून
शालिवाहन संवत्सरा(शके)चा हा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. असं इतिहासातील नोंदीवरून आपल्याला समजेल.त्यामुळे यांची ज्या भागात सत्ता होती,तिथे वेगवेगळ्या भागात वेगळ्या नावाने हा दिवस साजरा केलेला आजही दिसतो.उत्तर भारतात सत्ता नसल्याने गुढीपाडवा साजरा न होण्याचे व रामायणातील घटनेशी याचा संबंध नसल्याने अयोध्येत गुढीपाडवा साजरा न होण्याची पुष्टी मिळते.(अधिक इतिहास जाणून घेण्यासाठी संजय सोनवणी यांचा हा https://sanjaysonawani.blogspot.com/2012/03/blog-post_1734.html ब्लॉग वाचा.)
वास्तवता:
लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक -संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे .(source: wikipedia)
यावरून एक समजते की इतिहास काहीही असला तरी निसर्ग निर्मितीचा बदल या सणाशी खूपच तंतोतंत जुळलेला दिसतो.चैत्र सुरू झाला की नवीन मराठी महिना सुरू झाला ,असं आपण म्हणतो. वसंत ऋतूमधील सृजनशीलता आपण अनुभवत असतोच.पण जास्त समजून घेण्यासाठी दुर्गा भागवत यांचे"ऋतुचक्र" वाचायलाच हवं.
मराठी साहित्यात गुढी पाडव्याचा उल्लेख खूप वर्षांपासून आलेला दिसतो.त्यात पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,संत तुकाराम, संत चोखोबा,संत बहिणाबाई या संतांच्या साहित्यात आपल्याला गुढीपाडवा या शब्दाचा उल्लेख आढळतो. संत बहिणाबाई आपल्या "गुढी उभारणी" या कवितेत म्हणतात,
"पडी जातो तो 'पाडवा' करा माझी सुधारनी आतां गुढीपाडव्याले म्हना 'गुढी उभारनी'
(पूर्णकविता अर्थासहित http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html?m=1)
समाजाला गुढीच्या मनोगतातून संत बहिणाबाई तिचं स्वरूप बदलायला सांगतात.ग्रामीण भागात आजही या दिवशी परंपरेने पंचांगाच्या आधारे पुढील वर्षाचे पाऊसाचे भविष्य बघितले जाते.आता ते किती खरं होतं हा वेगळा विषय आहे.जसा हवामानखात्याचा.
तिचं स्वरूप आपण आज बदललं आहे का!तेच तिच्याबद्दल मते आहेत जे काल होते.काळानुसार तिचा संबंध जगण्याशी लावायला हवा.
पण सध्या चित्र वेगळेच आहे.
जय महाराष्ट्र या वाहिनीवर " *गुढीपाडवा आणि छ. संभाजी महाराज यांचा हत्येचा संबंध आहे का?* " यावरील चर्चेत बोलताना संजय सोनवणी म्हणतात, ' *गुढीपाडवा आणि धर्माचा काही संबंध नाही"* यांच्या या विधानावरून त्यांनी गुढीपाडवा हा ऐतिहासिक घटनेशी जोडला आहे.
' *संभाजी महाराजांना मारण्यात आले तेव्हा धर्मांतर हे कारण नव्हतं'* ,असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणतात. त्यामुळे हिंदु अस्मितेचा मुद्दा येण्याचा प्रश्नच नाही.
यावरील सविस्तर चर्चा या लिंकवर https://youtu.be/kLeKUGdRIwk पाहावी.
खिलाडूवृत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, जर आम्हांला तिथीनुसार येणारी शिवजयंती मान्य नाही.मग संभाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या बलिदानाचा व गुढीपाडवा या सणाचा आपण का संबंध जोडायचा?
दुसरा मुद्दा म्हणजे काही जणांकडून असा प्रचार केला जातो की,"संभाजी राजांच्या बलिदानाचा आनंद म्हणून ब्राम्हणांनी गुढी उभारण्यास सुरुवात केली,"हे सरळ सरळ न पटण्यासारखे आहे कारण शिवरायांच्या काळात सुद्धा गुढी उभे केल्याचे उदाहरणे आहेत.
त्यातील एक संदर्भ-
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –
“शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”(अजून काही संदर्भ-http://www.inmarathi.com/truth-about-sambhaji-maharaj-gudhipadwa-connection/?amp_markup=1)
म्हणून वरील संदर्भ पाहिल्यास संभाजी महाराजांना 11 मार्च 1689 रोजी मारण्यात आलं हे ध्यानात घ्यावं.हे आपल्या विवेकबुद्धीने वास्तव स्वीकारायला हवं.

अजून एक मुद्दा असा की,गुढीच्या काठीला परंपरेने चालत आलेले साडी/लुगडं आणि उलटा तांब्या असे स्वरूप ठेवायचे की त्या गुढीच्या काठीला भगवा ध्वज फडकावयला हवा.असा एक नवीन वाद सद्या चालू आहे.त्यामुळे भगवाध्वज का?याचं उत्तर सामान्य माणसाला दिलं तरच ते परंपरानुसार साजरा करत आलेले गुढीचे स्वरूप बदलतील.तसेच तो भगवा ध्वज हिंदूंचा,शिवरायांचा की वारकरी संप्रदायाचा असेल याचे सुद्धा स्पष्टीकरण द्यायला हवे.उगीच भगवा ध्वज लावा म्हणून पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करणे हे चुकीचे आहे.त्याची तळागाळात खरी कारणमीमांसा स्पष्ट करायला हवी.
तिथीनुसार पाहण्यास गेले की संभाजी राजांच्या मृत्यूदिवशी म्हणजे ११-३-१६८९ रोजी अमावास्या नसावी,असे दृक्-पंचागाच्या नोंदीवरून दिसते.पंचांग आणि मृत्युदिन बरोबर असतील तर त्या दिवशी पंचमी होती. ज्याचा पंचाग,तिथीवर विश्वास आहे त्यांना पडताळणीसाठी ही लिंक https://www.drikpanchang.com/panchang/day-panchang.html?date=11/03/1689 (source: वरील लिंक Wikipedia)
या पंचांगाच्या नोंदीतील तथ्य बाजूला सारून किंवा संभाजी महाराज व गुढीपाडवा हा संबंध न जोडता हा सण निसर्गाशी संलग्न आहे.हेच वास्तव स्वीकारून साजरा केला तर प्रसन्नता वाटेल.नाहीतर हिंदू-मराठी संस्कृतीत खूप सण आहेत.फक्त याला सणाच्या दृष्टीकोनातून न बघता वेगळ्या चष्म्यातून बघावं.

पी प्रशांतकुमार,
अहमदनगर:
आजकाल अस्मिता इतक्या टोकदार झाल्यात की व्यक्त व्हायची पण भीती वाटावी.. मी सांगतो ते आणि तेव्हडचं सत्य आहे अस प्रत्येकाला वाटतंय..
...छ. संभाजी म. यांचं निधन या दिवशी झाला का?.
समजा झाला असेल
...तर छत्रपतींचा मृत्यू साजरा करण्यासाठी हा सण सुरु झाला असावा का? नाही मला हा तर्क पटत नाही.. एव्हडा महाराष्ट्र असंवेदनशील आजही नाही आणि तेव्हाही नव्हता.. औरंगजेबाच्या भीतीमुळे गावोगावच्या मराठी माणूस अस काही करेल?? अरे हट शक्यच नाही.. बरं भीतीमुळे हा सण एका 50 किमीच्याच पट्ट्यात साजरा होतो असंही नाही ..
...गुढीपाडवा अर्थात बलीप्रतिपदा..शेतकऱ्यांच पीक यायचा काळ..
बऱ्याच ठिकाणी पुढील वर्षाच्या पाऊस-पीक-पिकांवरील अपेक्षित रोग याचा अभ्यास करण्यासाठी गुढी पाडवा ते अक्षय्यतृतीय हा काळ वापरतात..भेंडवळ म्हणतात खास करून बुलढाणा भागात..
जुने संदर्भ पहाता ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्यापासून बऱ्याच संत साहित्यात गुढीपाडव्याच्या उल्लेख आहे..
..दसरा-दिवाळी पाडवा-गुढी पाडवा आणि अर्धा आखत(अक्षयतृतीया) हे आपल्याकडचे साडेतीन मुहूर्त ..
अर्थात आता कालानुरूप सगळेच बदल झाले..
उंच गुढी जाऊन आता फ्लॅटच्या बाहेर छोटी दिसते..पण तोच उत्साह तरीही आजही खेड्यात ..वाड्या तांड्यावर अजूनही जुनी सर्वात उंच उभारलेली गुढी दिसते.. ..
टीप: संदर्भांसाठी इंटरनेट ची मदत घेतलेली आहे.
Source: INTERNET
R. सागर, सांगली:
गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं नववर्ष सुरू होतं. नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. भारतात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक भागात गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसं पाहिलं तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो अशी आख्यायिका लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण अलीकडच्या काळात त्याबाबत नवीनच काही गोष्टी ऐकायला मिळू लागल्या. काय तर म्हणे औरंजेबाने संभाजीराजांची हत्या केली अन् हत्येच्या दुसऱ्या दिवशी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळेपासून आपल्याकडे गुढीपाडवा सणाला सुरुवात झाली.
.
ज्यांचा संतसाहित्याचा अभ्यास आहे किंवा ज्यांना त्याबद्दल पुसटशीही कल्पना आहे त्यांना नक्कीच माहीत असेल की गुढीपाडव्याचा उल्लेख अगदी ज्ञानोबांपासून, तुकोबारायांच्यापर्यंत बहुतेक संत-साहित्यात आहे आणि हे सर्व साहित्य संभाजीराजांच्या मृत्यूच्या आधीचं आहे. त्यामुळं मी तरी हे नाही मान्य करत की संभाजीराजांच्या हत्येचा उत्सव म्हणून गुढीपाडवा सुरू करण्यात आला.
.
*शिवाजी महाराज-शंभूराजेंच्या काळातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल विचार करायचा झाला तर कदाचित असं असू शकतं की सततच्या परकीय आक्रमणांमुळे जिथे आपली मंदिरे किंवा आपली श्रद्धास्थानेच सुरक्षित नव्हती तिथे आपले सण-उत्सव म्हणावं तितक्या प्रमाणात साजरे होत नसतील. पुढे शंभुराजेंच्या हत्येनंतर काही वर्षांनी म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा मराठ्यांनी स्वराज्यविस्तार केला तेव्हा आपले सण-उत्सव पूर्वापार चालत आलेल्या रीती-रिवाजांनुसार साजरे करायला पुन्हा सुरुवात केली असेल आणि त्यातूनच गुढीपाडवादेखील पुन्हा मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला असेल..*
.
तसं बघायला गेलं तर गुढीपाडवा म्हणजेच उत्साहाचं, मांगल्याचं, समृद्धीचं प्रतीक. वसंत ऋतूचं आगमन आणि त्या आगमनाबरोबरच नव्यानं सजणारं सृष्टीचं मोहक रूप. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच निसर्गात होणारे बदल सुखावत असतात. शेतातली आधीची कामं संपवून पुन्हा पुढच्या कामाला नव्याने सुरुवात करणारा आपला बळीराजा. नक्कीच या सर्वांचा पिढ्यान-पिढ्यांचा संबंध आहे. त्यामुळे चला.. गुढीपाडवा साजरा करूया..
Source: INTERNET
संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे :
महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ गौतमीपुत्र सातकर्णीने सुरु केलेल्या संवत्सराचा पहिला दिवस... गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते?
जगातील प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणाला एक धार्मिक कथा, आख्यायिका जोडली जाते आणि सांगितलीही जाते . मग तो सण दिवाळी ,दसरा ,पाडवा , रमजान ईद , बकरी ईद , नवरोज , पास ओवर , पतेती , गुड फ्रायडे, इस्टर संडे इ असु. शकतो . यापैकी कोणत्याही सणाचे महत्व सांगणारी आख्यायिका वैज्ञानिक आधारवर टिकत नाही.
भारतात लादलेले असंख्य देव, सण, व्रत, नवस आणी अजूनही २२ व्या शतकात रस्तो रस्ती घरोघरी काल्पनिक देवांचा सुळसुलाट उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. हेच भारत देशाच दुर्दैव आहे. मानव चंद्रावर, मंगळवार पोहचला तरी यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्धीत जात नाही. काल्पनिकता, विज्ञानाला सुद्धा फाट्यावर मारली जाते.
काही लोक म्हणतात रामाने परशुरामाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत गुढया उभारुन आनंद साजरा केला व तेव्हापासून आपल्या कडे गुढी उभारायला सुरुवात झाली पण मग आज ज्या उत्तर प्रदेश राज्यात अयोध्यानगरी आहे त्या शहरात कुणीच गुढी उभारत नाही मग महाराष्ट्रातच गुढी कशी ?हा प्रश्न अनेकजन विचारत आहेत. काही म्हणतात कृष्णाचे जन्मानंतर गोकुळात गुढी उभारली पण अनेक संताचे वचनात गुढी शब्दांचा उल्लेख सापडतो. उदा.टाळी वाजवावी गुढी उभारावी असे संत चोखोबांचे वचन आहे तर संत तुकारामानी "रोमांच गुढीया डोलविती अंगे"असे म्हटले आहे.
आज ही लोकांना सांगितले जात आहे की, आपले नवीन वर्ष गुढी पाडव्यालाच सुरु होते. अहो,
असेही म्हटले आहे जाते की, याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले तेंव्हा म्हणे गुढी उभारली होती? रामायणातील, महाभारतातील काल्पनिक पात्रांचा साधा जन्म मृत्यू कधी झाला याची देखील नोंद नाही. आज ही गौतम बुद्धांचा अस्थि कलश २५०० अडीच हजार वर्षा नंतर सुद्धा अबाधित आहे. यांनी सांगाव ३३ कोटी देवांच अस्तित्व?
गुढीपाडवा या सणाला विरोध करण्यासाठी संभाजी महाराजाच्या हत्येचा संदर्भ कांही जण देतात. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महारांजांची हत्या झाली. संभाजी महाराजांची हत्या 1689 सालातील पाडव्याच्या अादल्यादिवशी झाली, हे वास्तव आहे. पण त्या दिवसापासूनच पाडवा हा सण सुरू झाला,असे कसे म्हणता येईल ? त्यांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा सणाचा कांहींही सबंध नाही.
धर्मीक प्रथा परंपरेतील शोषणाला विरोध करणे हे योग्यच आहे, पण त्यासाठी वास्तवाचे विपर्यस्त चित्रण नसावे. नाहीतर व्हँलेटाईन डेला विरोध करण्यासाठी कांही वेडे भक्त 14 फेब्रुवारीला भगत सिंगला फाशी दिल्याची धादांत खोटी माहीती मध्यंतरी पसरवत होते. हा तसाच कांहीसा प्रयत्न म्हणावा लागेल.सन 1689 पुर्वीही गुढी उभारली जात असल्याचे अनेक संदर्भ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या लेखनात आढळतात. ईतिहास हजारों वर्षांचा आहे. प्रत्येक दिवशी ईतिहासात कांहीना कांही घडले आहे. अशा लाखो घटना आहेत लाखो प्रसंग आहेत,पण कोणत्याही कँलेंडर मधे दिवस साधारणपणे 355 ते 365 च आहेत.त्यामुळे विविध वर्षातील एकाच दिवशी,तिथीला,तारखेला एखादी आनंदी आणि एखादी दु:खद घटना असू शकते. पण दोन घटनांचा निरर्थक संबध लावणे चुकीचे आहे.
आता महत्वाचा प्रश्न असा कि सातवाहन राज्यांच्या या सणाचा आणि ब्रह्माचा, विष्णूचा , रामाचा संबंध आला कुठून ? राजकारणात नेहमी एक पहायला मिळते. एखादा व्यक्ती लोकप्रिय असला की त्याला आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्वबळावर जनाधार मिळविण्यापेक्षा, जनाधार असलेल्या लोकप्रिय नेत्याला जवळ करणे. गेल्यावर्षी केंद्रात आणि राज्यात झालेल्या निवडणुकीत हे आपण सर्वांनी पाह्यले आहे. धर्मकारणही असेच आहे.महाराष्ट्राचा विचार करता महादेव, खंडोबा, भैरोबा, अंबाबाई, येडाई ई. दैवते ईथली लोकप्रिय दैवते. ब्रह्मा, विष्णु, राम ई. दैवतांना जनाधारच नव्हता. यामुळे घडले असे की, शालीवाहनाच्या विजयाचा हा सण समाजात गेल्या हजारो वर्षाच्या सातत्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेला होता. पुराणातल्या काल्पनिक देवतांना समाजात लोकप्रिय करू पाहणाऱ्या धर्मपंडितीनी, लोकप्रिय सणाची महती त्यांच्या काल्पनिक देवतांच्या कर्तृत्वाच्या आधारे सांगणे चालु केले. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, राम रावणाला मारून अयोध्येत आले, अशा निरर्थक बाबी पसरवून या सातवाहनांच्या त्या विजयी दिनाच्या कर्तृत्वावर, लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला.
गुढीपाडवा आपल्याला शालिवाहन शकाची आठवण करून देतं. परकीय शकांची सत्ता उलथवून लावत महाराष्ट्रात राहणा-या सातवाहनांनी स्वराज्य उभं केलं, त्यांना कसं विसरायचं? पुराणांमधला अर्थ शोधला तर ज्यांनी पुतळ्यांसारख्या बनलेल्या माणसांमधे प्राण फुंकले. शांत बसलेल्यांना देशासाठी लढायला शिकवलं. त्या सातवाहनांना कसं विसरायचं?
Source: INTERNET
आपल्या हिंदू धर्मा मध्ये सन, उत्सव , व्रत समारंभ यांना अनन्य साधारण महत्व आहे सन ,उत्सव हे आपल्या धर्माचीच नव्हे तर आपल्या संस्कृतिची ओळख देखील आहे. सन साजरे करतांना त्यातून चैतन्य निर्मिती होत असते. आणि आपल्या हिंदू धर्मातील असाच एक प्रारंभिक सन म्हणजे गुडीपाडवा वर्षारंभ अर्थात वर्ष प्रतिपदा होय.
वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदा याचा उद्धता वेद आहे .वेद हे अतिप्राचीन वांड:मय आहे वेदाने सांगितले म्हणून ते साऱ्या जगाने मान्य केले. वर्षारंभचा प्रारंभ दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. ज्योतिष शास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपतावर येतो म्हणजे यावेळी हवामान समशीतोष्ण असते शिशिर त्रुतुत झाडांची पाने गळलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडाना नवी पालवी येते अक्खी वृक्षवल्ली टवटवित दिसते. पाडव्याच्या दिवशी कुटुंबातील वडिलधारी मंडळी आपल्याला कडूनींबाची पाने खायला लावतात यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.या कडूनींबाच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारते ,वरुन कडु असणारी ही वनस्पति आरोग्य वर्धक, आरोग्यदायी आणि रोगनाशक आहे. पाचन क्रिया सुधारने, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील किड नाहीशी करणे असे अनेक गुन या कडूनींबा मध्ये आहेत म्हणून वर्षारंभच्या वेळेस याचा वापर करतात.
याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे प्रभु श्री. राम रावण वधा नंतर अयोध्येला परत आले त्या दिवशी प्रभु श्री. रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रम्हध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उच्च असते म्हणून गुढी उभी केली जाते.
गुढी पाडव्याच्या या दिवशी सुरु होणाऱ्या नववर्षाची सुरुवात उगवीणाऱ्या सूर्याच्या देजोमय दिवसाने होते. पाश्चात्य संस्कृति नुसार नववर्ष ३१ डिसेंबरला सुरु होते. आपले सन ,उत्सव हे निसर्ग नियमाला धरून असतात ,निसर्ग नियमशी पूरक असतात तर विरुद्ध केलेल्या गोष्टी या मानवाला हानिकारक असतात म्हणून पश्चात्य संस्कृति नुसार १ जानेवारी हा नव्हे तर गुडीपाडवा नववर्षारंभ हाच साजरा करणे आपले खरे हित आहे.
*खोटा अपप्रचार :-* सन उत्सव ही हिंदू संस्कृतिची ओळख आहे ओळखच नाही तर आमची ति बलस्थाने देखील आहेत. या गोष्टी नष्ट करायच्या असतील तर त्या त्या सनांचा संबंध महापुरुषांच्या हत्येशी किंवा मृत्यशी जोडूंन दयायचा असाच सन वर्षारंभ:-चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा सन हा सन जवळ आला की, काही बरगधी किड्यांचे अति वळवळने सुरु होते या सनाचा संदर्भ इतिहासातील महापुरुष यांच्या हत्येशी जोडण्यात येतो जे धांदात अतिशय खोटे आहे. गुड़ी वर असलेला गड़वा उलटा ठेवणे म्हणजे हे संभाजी राजांचे शिर आहे असा सरार्स खोटा अपप्रचार सुरु आहे.
वास्तविक गुडीपाडवा हा सन रामायण काळापासून निरंतर सुरु आहे. मग याचा इथे हत्येशी संबंध तो क़ाय ? यात काही एक अर्थ नाही. गुड़ी हा ब्रम्हध्वज आहे. गुड़ीवर तांब्याचा गड़वा उलटाच का ठेवतात स्वताला न्यूटन ची औलाद समजनारे ,बुद्धिवादी म्हणवनारे यांना सांगू इच्छितो की, गड़वा उलटा ठेवला तरच तो त्यावर राहु शकेल एवढं साध त्यांना समजत नाही? मंदिरा वरील कळस देखील उलटाच असतो का तोही बघितला नाही ? अश्या प्रकारचे विकृत , बालिश प्रश्न ते मंडतात व हे देखील आजच्या हुशार तरुण पिढीला समजू नए ? प्रभु श्री.राम आणि कृष्ण जन्मलेच नाही , त्यांचे अस्तित्व दाखवा वैगरे असे चघळून चघळून चोथा झालेले प्रश्न ते विचारत सुटतात आणि भ्रम पसरवितात ,१० हजार वर्षे झालेल्या पौराणिक रामयनाला आणि रामयनातील ऐतिहासिक वास्तुला येथील अबुद्धिजीवी काल्पनिक ठरवतात ज्याना रामसेतु, आणि अयोध्येतिल वास्तु बद्दल ज्याना जान नसावी,(जाणून घेण्याची लायकी नसावी) श्रीलंके मध्ये आजही रावणाचा खंडर झलेला महल आहे तसेच दगड़ावर हनुमानाच्या पायाचे खोल ठसे देखील आढळलेले आहेत, जे रामायण घडल्याची वा प्रभु श्री.रामाच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देतात. तरी याकडे हे महाभाग साफ दुर्लक्ष करतात समाजात अफवा व गैरसमज परवितात कारण समाजात असे गैरसमज पसरविण्या करिता त्यांना कुठून तरी पैसे मिळतात.(कोणी तरी पैसे पुरवितो) एका जातीला दुसऱ्या (उच्च)जाती -धर्मा विरुद्ध भड़कविने हेच यांचे प्रभावी अस्त्र आहे जे यांचे पूर्वी पासूनचे षड्यंत्र राहिले आहे. आणि हे एका अजेंडाखाली नियोजनबद्ध रित्या केल्या जात आहे.कारण हिंदू धर्माला ,नष्ट किंवा खिळ खीळी करायचे असेल तर येथील युवकाना त्यांच्याच जाती, धर्म, संस्कृति , सन, उत्सव, परंपरा यांचे विरुद्ध भड़कवायचे खोटा प्रचार करायचा आणि इतिहासाची मोड़ तोड़ करुण आपल्या सोई सुविधे नुसार इतिहासाची मांडणी करायची , खोटी पुस्तके प्रकाशित करुण खोटी व्याख्याने सजवून त्या द्वारे येथील युवकांच्या मेंदू मध्ये बौद्धिक आतंक निर्माण कारायचा. माथी भडकवायची अश्या प्रकारचे षड्यंत्ररूपी कारस्थान अलीकडे सर्रास पाहायला मिळत आहे. आणि हेच तरुण पीढ़ी उद्या आपल्याच धर्मला ,संस्कृति , सन ,उत्सव व परम्परेला शिव्याची लखोळी वाहतिल आणि हेच यांना अपेक्षित आहे. म्हणजे यांना ३१ डिसेंबर रोजी रात्री दारू पिऊन धांगड़ धींगा घालनारे पुरोगामी , सुधारनवादी आधुनिक वाटतात परंतु हेच महामूर्ख(स्वताला बुद्धिजीवी म्हणवनारे परंतु बुद्धि मुळीच नसलेले) निसर्गरूपी ,निसर्गाला पूरक असलेल्या सन ,उत्सव ,वैदिक जीवन पद्धति मध्ये अंधश्रद्धा शोधतात. आणि सर्वात मोठे दुर्देव म्हणजे याला बळी पडतात ते आजचे युवक ज्याणी कधीच आपल्या उत्सव व संस्कृति आणि परम्परे बद्दल असलेल्या इतिहासा विषयी जाणून घेतले नाही. किंवा जाणून घ्यायची इच्छा नाही याची अतिशय खंत वाटते. आणि अशे नतब्रष्ट लोक ज्यांच्या या धर्म व संस्कृतिशी काहीच देणे घेणे नाही ते यावर भाष्य करतात खोटे अज्ञान पसरवितात, स्वताला सुधारनावादी व बुद्धिजीवी संबोधतात म्हणजे किती हा महामूर्ख पणा ? मला तर कधीच आठवत नाही की, हिंदू धर्मातील असा कोणताच सन ,उत्सव ,संस्कृति नाही ज्याला यांनी कधी तरी चांगले म्हटलं असेल ? कारण यांची सगळी शक्ति या सर्वाला टोकाचा विरोध करण्यातच वाया जाते. आणि हो आपल्या धर्मातील सन, उत्सव , व संस्कृतिला या सर्वाना नाव ठेवल्याने यांना समाजात बुद्धिजीवी व चिकिस्तक म्हणून ओळखल्या जातात.(आजकाल अश्या प्रकारचा फार जोरात ट्रेंड सुरु आहे) यामुळे फुकटची प्रसिद्धि तर मिळते वरुन समाजसुधारक असल्याचे लेबल लावले जातात. पुरस्कार वैगरे मिळतो.
*वास्तविकता*:- सन ,उत्सव ,संस्कृति ही आपल्या धर्माच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. अनादी काळा पासून सन उत्सवाचे महत्व वेळोवेळी अधोरेखित झालेले आहे. भारतीय समाज हा पूर्वी पासुनच निसर्ग पूजक राहिला आहे. निसर्गाच्या प्रत्येक त्रुतुत होणाऱ्या बदलाचे एक धार्मिक महत्व आहे. प्रत्येक त्रुतुत आपण त्या निसर्ग बदलाचे पूजन करत असतो, याच्यतहि काही बुद्धिभ्रष्ट अंधश्रद्धा शोधतात वास्तविक ही अंधश्रद्धा नसून तो निसर्गा प्रति असलेली आपली कृतज्ञता होय. परमेश्वर निर्गुण-निराकार असल्याने निसर्गालाच देव मानून आपण त्यांना पूजत असतो म्हणून हिंदू धर्मातील सर्व सन हे निसर्गाशी पुरक आहेत. जे आपल्यातिल प्रत्येकाला या श्रुष्टितिल वृक्ष, पशु , जल, वायु धरती या सदैव प्रति कृतज्ञ आणि आदर करणे शिकविते म्हणून हिंदू धर्मातच वृक्ष, पशु, जल, वायु धरती हे पूजनिय मानले जातात. व शुभ कार्य हे पूजन करूणच सुरु होते.
म्हणून अलीकडे खोट्या अपप्रचारला बळी न पडता आजच्या युवकानी व भावी पिढीनी आपल्या संस्कृति,सन उत्सव व परम्परा जी आपली जीवनशैली बनलेली आहेत या सर्वा विषयी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. .व कश्या प्रकारे या सर्वांचे आपल्या समाज जीवनात शास्त्रीय , वैज्ञानिक, व आरोग्य दृष्टया अनन्य साधारण महत्व आहे हे देखील जरूर जाणून घ्या व त्यांचा नेहमी आदर करा.
क्षितीज गिरी ,सातारा:
श्री.राम रावनाचा वध करून अयोध्येत परत आले या आनंदात मध्ये गुडया उभारल्या जातात. किंवा या दिवशी ब्रमाने सुष्टी निर्माण केली असे म्हणले जाते. तर दुसऱ्या बाजूला अयोध्ये मध्ये का अश्या प्रकारे सन साजरा केला जात नाही .फक्त महाराष्ट्र किंवा त्याच्या आसपास का हा सन साजरा केला जातो. याचा नक्की इतिहास तरी काय आहे. मग पुढे संभाजी महाराजांची हत्या झाल्यामुले हा सन साजरा केला जातो किंवा गुडया उभारल्या जातात असे म्हणले जाते .पण पुरावे तर संतानंच्या काळातले पण मिळतात .मग हि परंपरा चालू कशी झाली. व फक्त महाराष्ट्र व कर्नाटक मध्येच का आहे. पण मी हा प्रश्न बाजूला ठेऊन एका वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयन्त करतोय . बहुदा विषय भरकटलेला असू शकतो.
हिंदूंमध्ये प्रत्येक सणाला घेऊन वाद निर्माण होतो.रामाला देव का मानायचे.त्याच्या कोणत्या विचारांच्या व कृतीचा आदर्श घ्यायचा .इथून प्रश विचारला जातो. ते रावणाचे दहन का करायचे ती तर आमची देवता आहे इथे नेऊन थांबतो .मागे रावणाचे दहन करण्यासाठी आदिवासींनी विरोध केला होता. कारण रावण हि त्याची देवता आहे .ती त्याचे पूजन करतात. हिंदुनमध्ये एकाचे देवत दुसऱ्याचे दुष्मन कसे .विष्णू हि उच्च जातीची देवता मानली जाते. व शिव हि थोड्या हलक्या जातीची देवता मानली जाते. असा देवा देवा मध्ये फरक का आहे .
हिंदूंना विरोध जास्त प्रमाणात हिंदूच का करतात. हिंदूंमध्ये एवढे टोकाचे मतभेद का आहेत. या सर्वांचे मुळात एकच कारण आहे .त्यामुळेच आपल्या वर मुघल इंग्रज आणि सगळ्यांनी राज्य केले .आणि प्रत्येक सणाला या ना त्या कारणांनी होणारा विरोध पण या साठीच आहे. ते कारण म्हणजे हिंदून मध्ये असलेली जातीव्यवस्था.
हिंदू नक्की एक आहे का ?आणि आहे तर प्रत्येकाची संस्कृती थोडी अधिक प्रमाणात वेगळी का आहे? हिंदू हिंदून मध्ये रोटी बेटी व्यवहार का चालत नाही ?त्याला एवढा विरोध का होतो ?हिंदूंच्या जातीमध्ये संपत्तींचे एवढे असमान वाटप का आहे? हिंदू समाजामध्ये प्रत्येक जातीची सामाजिक प्रतिष्ठ सारखी का नाही ?हिंदूंच्या सर्व जातींना राजकारणा मध्ये व त्या राजकीय पदामध्ये का स्थान नाही ?त्यांना यासाठी आरक्षणाचा आधार का घ्यावा लागतो ?हिंदून मध्ये ठराविक जातीच का अल्पसंख्याक आहेत ?हि सामाजिक आथिर्क राजकीय मानसिक समानता हिंदून मध्ये केव्हा येणार ?त्यासाठी काही हिंदुत्तवादि संघटना काही प्रयत्न करतात का ?का त्यांना हा विभागलेला असमान वाटपाचा हिंदू पाहिजे ?मग आम्ही कोणत्या गर्वाने म्हणायचे गर्व से काहो हम हिंदू है ?का आपल्याला या सर्व गोष्टी माहित असून पण आपल्यावर तर वेळ आली नाहि ना. किंवा आपल्याला तर उच्च किंवा मध्यम स्थान आहे ना. म्हणून आपण चुकिच्या गोष्टीचे समर्थंन करतो .सर्व माहिती असून पण आपण प्रबोधनकार ठाकरे किंवा नरेंद्र दाभोलकर का होत नाही? आपल्यात हिम्मत नाही का सत्य स्वीकान्याची .का स्वीकारून पण आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो .का आपला त्यात फायदा आहे म्हणून या शोषणकारी व्यवस्थेचे आपण उघड उघड समर्थन करतो .किंवा म्हणावा तेवढा विरोध करत नाही ?????
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा