बदलती जीवनशैली…हानिकारक की लाभदायक!
🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
बदलती जीवनशैली... हानिकारक की लाभदायक!
Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर
आपण आज ताण तणाव असलेल्या आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असलेल्या जीवनशैली मध्ये आहोत.
लहानंतल लहान मूल देखील 'टेन्शन आलाय' अस म्हणत. आपण जरा या जीवनाची 50 वर्षांपूर्वीच्या जीवनशैली सोबत तुलना करून बघुयात. एवढंच कशाला.. 20 वर्षा पूर्वीची जीवनशैली आठवा, एवढी स्पर्धा एवढं राजकारण, एवढी भीती आणि मोठेपणाची हौस बाळगून आपण जगतो आणि पैसे कमावतो... पुढे त्या पैशाचा उपयोग्य किती होतो आणि दुरुपयोग किती होतो... हा एक वेगळा संशोधनाचा मुद्धा.
तर जीवनशैली आपली चुकीची आहे... म्हणजे नेमकं काय? हे जरा आपण बघू.....
आपल्या कडे तंत्रज्ञान आलं आणि त्याने खूप सुखसोयी आणल्या, पण त्या सुखसोयीच्या आपण किती आहारी गेलो... ते आपल्यालाच कळलं नाही..
आपण सकाळी उठतो, प्रातर्विधी आटोपले की चहा घेतो, जो सकाळी सकाळी आपल्याला तरतरी देतो... तरतरी म्हणजे काय?.. टॅनिन नावाचं विष आहे जे रक्तात मिसळत त्यासोबत साखर शरीरात एकदम घेतली जाते.. जी खरतर आवश्यक नाही कारण पुन्हा जास्त झालेली साखर कमी करण्यासाठी लगेचच इन्सुलिन तयार करावे लागते.. पुन्हा डायबेटीस .. होण्याच्या करणामधील एक कारण.
त्यानंतर सोशल मीडिया(या बद्दल बोलेल तेवढं कमी आहे) इतर ताण तणाव... त्या मध्ये नाष्टा (जो संतुलित असणं अपेक्षित आहे.. आपल्या आहारात पिष्टमय पदार्थ सोडले आणि कॅलरीज सोडल्या तर बाकी पोषण काही मिळत नाही)
त्या नन्तर ऑफिस मध्ये काम (😳) असत खूप आपल्याला... जे शारीरिक पेक्ष्या मानसिक रित्या दमावणार असत.
दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, बिस्किटे रात्रीच (लाईट) जेवण या मध्ये आपण "संतुलित आहार" किती आणि कस घेतो!हे सांगताच येत नाही.
पुन्हा व्यसन असतील बोलूच नका.. रात्री टिव्ही उशिरा झोप आणि उशिरा उठणे... पुन्हा दुसरा दिवस..
यात आपण जीवन कुठे जगत आहोत?? आपले आनंद आपले छंद यावर काही काम करतो का?.. मित्र(व्यसन लावणारे नव्हे) आपल्या बाजूला किती असतात आणि स्वार्थी लोक किती असतात?
राजकारण, पैसे, रोजचे प्रश्न , आरोग्य, शिक्षण, महागड्या वस्तू, गाड्या अशी बरीच लिस्ट आहे जी मिळवण्याच्या किंवा ओरबाडून घेण्याचा नादात आपण आपलं जीवन एन्जॉय करत आहोत का?
जर वरील प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर मला अस वाटत की नक्कीच आपलं काहीतरी चुकतंय....
तेव्हा विचार करा आणि बदल घडवा
Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
हिंगोली
"बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे", "बदल ही काळाची गरज आहे", असं म्हटल्या जाते. पण तो बदल योग्य की अयोग्य हे त्याचा मानवाच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावर अवलंबून आहे. मानवाचा इतिहास पाहता आजची बदलती जीवनशैली ही मानवास अतिशय घातक अशी बनलेली आहे. माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा आपल्या जीवनात अतिवापर केल्याने त्याचा मानवास फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत आहे. मानवाची आजची बदलती जीवनशैली मानवाच्या मानसिक,शारीरिक,सामाजिक विकासास घातक अशी ठरत आहे.
पूर्वीच्या काळी सकाळ ही ४ते ५ च्या दरम्यान व्हायची. घरातील स्त्रीपासून तर बाकी सर्व आबालवृद्ध ही एकामागोमाग सूर्योदयापूर्वीच उठायचे. स्वच्छ,निरोगी,शुद्ध हवा सगळ्यांना मिळायची आणि सकाळच्या सर्व कामातून सगळ्यांना योग्य तो व्यायाम आपोआपच व्हायचा. पूर्वी सकाळी शौचास बाहेर जाणे,हे सुध्दा नैसर्गिकपणे मॉर्निंग वॉक व्हायचा. आणि आज यंत्राचा वापर इतका वाढला की,चार पावले सुध्दा आजकालची मुलंमुलीच नाहीतर स्त्रिया सुध्दा बाइकचाच वापर करत आहोत.घरात वॉशिंग मशीन,मिक्सर,ग्राइंडर,ओव्हन या सर्व यंत्राच्या वापरामुळे लठ्ठपणा ही घराघरातील आजची मुख्य समस्या बनली आहे. तसेच आजची पिढी अतिशय कमी वयातच मधुमेह,रक्तदाब अशा आजाराला बळी पडलेली आपल्याला दिसत आहेत.प्लास्टिकचा वापरही इतका वाढला की,कॅंसरसारखा आजार तर तीन घरापैकी एका घरात आढळतो. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आजूबाजूची हवा,पाणी,माती,यात भयानक असे प्रदूषण वाढले आहे. आज ग्रामीण भागातील लोकसुद्धा वॉटर फिल्टरचेच पाणी पिताना आढळून येतात. आपल्या शरीराला मिळणारे क्षार आपण असे कमी करून हाडांचा ठिसूळपणा करून घेतला. आज तरुणाईतील व्यसनाचे वाढते प्रमाण हाही एक चिंतेचा विषय आहे. आजचे व्यसन ही तरुणाईची फॅशन झाली आहे. आणि याला आवर घालण्यात आजकालची पालक असोत अथवा शिक्षक हे हतबल ठरले आहेत. त्यात आपल्याला विशेषतः शहरातील लोकांना मिळणारा भाजीपाला,फळे ही सुद्धा रासायनिक खतांचा,औषधींपासून,पावडर पासून पिकवलेली मिळत आहेत. पण आजची मुलंमुली ही इंटरनेटवर रात्री उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपतात. घरचे जेवण घेण्यापेक्षा सकाळपासूनच फास्टफूडवर नास्तापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत दिवस संपतो. शीतपेयांचा वापरही अतिप्रमाणात वाढलेला आहे. याचे व्हायचे ते दुष्परिणाम दृश्यरूपात आहेतच.
विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे आहे. मानवी विकासासाठी त्याचा आपण सदुपयोग करून घ्यायला हवा. पण त्याचा दुरुपयोगच आपल्याला जास्त दिसून येतो. आज एका वर्षाच्या लेकराच्या हातात आपण मोबाईल देत आहोत. त्याच्या कोवळ्या डोळ्यावर आणि मेंदूवर काय विपरीत परिणाम होत असेल,याचा सुध्दा विचार आपण करत नाही. ऑफिसमध्ये कंप्युटरचा वापर हा अनिवार्य आणि हिताचा आहे परंतु सोशल मिडियामध्ये व्हाट्सॅप,फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो! तरुणांची सर्व शक्ती व वेळ हा यातच जातो आहे. त्यात आपण नागरिक इतके अडकलो की,देशात बेरोजगारी किती वाढली,हेही रवीश कुमारसारख्या पत्रकाराला लक्षात आणून द्यावे लागते. दिवसाला दिला जाणारा १.५ जीबी मोफत डाटा हा तरुणांना दिशाभूल करत आहे. पण याचे भान ना युवकांना आहे, ना सरकारला.... ही किती खेदाची बाब आहे!
आज माणूस भौतिक सुखाच्या अधीन झाल्याने झटपट पैसा कसा कमावता येईल,यासाठी तो प्रयत्न करतो आहे. त्यापायी मानसिक स्वास्थ्यही तो गमावून बसला आहे. आजचा काळ म्हणू म्हणू घरातील थोरामोठ्यांचा आदर,प्रेम या बाबी क्षुल्लक ठरत आहेत. चौकोनीच काय पण त्याही पुढे जाऊन आज त्रिकोणी कुटुंबपद्धती आली. त्यातूनच वृध्दाश्रम आणि पाळणाघर यांचे नको तितके पेव फुटले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे एक किंवा दोनच लेकरांचे निकोप संगोपन करणे कठीण होऊन बसले आहे. मोठी पालकच आपल्या लेकरांच्या मन:स्वास्थ्याला जपायचे म्हणून लेकरानाच भिऊन रहात आहे. माणूस माणसाच्याच प्रेमाला पारखा होत चालला आहे. शेवटी माझ्यासारख्या सामान्य बाईच्या डोक्यात प्रश्न येतो,आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवायचा असे म्हणतो,तेव्हा वाचलेला वेळ आपण कोठे वापरत आहोत?वाचलेल्या वेळातून आपण ना समाजविकास साधत आहोत ना आत्मविकास! चौकोनी कुटुंबातील चौघांचे तोंड चार दिशेला झाली आहेत. चिडचिड,पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा,पाल्यांचा उद्धटपणा,यात आईवडिलांची कुचंबणा! मग एवढे धावायचे तरी कशासाठी? हे सर्व पाहत, बदलत्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर किती विपरीत परिणाम होतो,हे सुज्ञांस सांगणे न लगे.
Source:- INTERNET
-श्रीपाद वडे,
सोलापूर
हा विषयास अनुसरून खरंच जेवढी लाभ दायक आहे तेवढी तोट्याची आहे पण माझ्या दृष्टीकोनातून खूप हानिकारक आहे .असं मला वाटत खरंच आपण Social मीडियाचा खूप अति वाईट हेतूने वापर करत आहोत असं मला वाटत ह्या मुळे बरेच आजर जडताण दिसत आहे.
आणि फार कमी दृष्टीने त्याचा वापर होताना दिसतो
जास्त प्रमाणात सर्वाना च हेच वेसण लागलेलं दिसत
त्यामुळे बद्दलणारी जीवन शैली ही लाभकारक न म्हणता हनिकरकच आहे..मी एका विषयास धरून बोललो पण असे खूप विषय आहेत की बद्दलणारी जीवन शैली तोट्याचीच आहे…
Source:- INTERNET
-महेश देशपांडे,
ढोकी
जि. उस्मानाबाद
सर्वप्रथम, हा विषय निवडला त्याबद्दल मी एडमिन टीम चे आभार मानतो..🙏🏻
खर पाहिल तर बदलती जीवनशैली हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी आहे. आपण कोन आहोत? आपल्या अस्तित्वाच नेमक प्रयोजन काय आहे? हे दाखवून देणारी आहे. अस्तित्व यासाठी की, दैनंदिन जीवनात आपली स्वतःची मूल्य संभाळुन आपण खरच जगु शकतो का? याच उत्तर जर होय असेल तर लाभदायक आणि जर नसेल तर हानिकारक. उदाहरण द्यायच झाल तर अगदी साध घ्या सकाळी उठल्यावर आपण आई वडिलांना नमस्कार करतो का? ज्यांच्यामुळे आपल अस्तित्व आहे त्या व्यक्तिना आपण रोज नमस्कार केला पाहिजे हे एक जगण्याच मूल्य आहे ना... मग जर नसेल करत तर का नाही याचा शोध जाने त्याने घ्यावा...
दूसर उदाहरण द्यायच झाल तर, आपल्या आरोग्या बाबतीत घ्या... प्रत्येकाची शरीर पकृति वेगळी असते, मग त्यानुसार प्रत्येकजन काळजी घेतो का? या whatsapp वर असंख्य मेसेजेस येत असतात शरीर स्वास्थ्यसाठी काय चांगल आहे, काय नाही किंवा Do's and Dont's येत राहतात...
पण कधी स्वतःच्या शरीराशी संवाद साधला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खर आहे की तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट अनुभवु शकता... जर तेवढे ध्यानमग्न झालात तर.. आणि मग नियंत्रित सुद्धा करू शकता.... कोणी लक्ष देत नाही.. अरे खरच बघा एकदा प्रयत्न करून शरीराशी संवाद करून..
नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट अगदीच संवेदनशील झालीय. म्हणजे नव्या नवरिचे नउ दिवस अस आपण आजकाल वागतो आहोत का? एवढी माणस झालीत की कोनाकोणाल वेळ द्यायचा हाच प्रश्न पडतो... मग आपल मोबाईल घ्यायचा आणि चालू मेसेजेस. मोबाईल दिवसातुन किती वेळ वापरायचा हा एक गंभीर प्रश्न झालाय.. Addicted झालोय अस म्हणालात तरी चालेल.... ज्यांना जमत ते राहतात नियंत्रित.
अजुन बऱ्याच गोष्टी आहेत, समजजीवन, मानसिक आरोग्य, येणाऱ्या पीढिसमोरिल आदर्श... ही यादि न संपनारी आहे.
या सगळ्या गोष्टिंचा विचार केलात, तर काही बाबतीत बदलती जीवनशैली लाभदायक वाटेल, तर काही बाबतीत हानिकारक...
शेवटी गाण्याच्या दोन ओळी आहेत
*जीवन गाणे गातच राहावे, पुढे पुढे चालावे ।*
*रुसवे फुगवे विसरून जावे, पुढे पुढे चालावे।*
सर्वप्रथम, हा विषय निवडला त्याबद्दल मी एडमिन टीम चे आभार मानतो..🙏🏻
खर पाहिल तर बदलती जीवनशैली हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी आहे. आपण कोन आहोत? आपल्या अस्तित्वाच नेमक प्रयोजन काय आहे? हे दाखवून देणारी आहे. अस्तित्व यासाठी की, दैनंदिन जीवनात आपली स्वतःची मूल्य संभाळुन आपण खरच जगु शकतो का? याच उत्तर जर होय असेल तर लाभदायक आणि जर नसेल तर हानिकारक. उदाहरण द्यायच झाल तर अगदी साध घ्या सकाळी उठल्यावर आपण आई वडिलांना नमस्कार करतो का? ज्यांच्यामुळे आपल अस्तित्व आहे त्या व्यक्तिना आपण रोज नमस्कार केला पाहिजे हे एक जगण्याच मूल्य आहे ना... मग जर नसेल करत तर का नाही याचा शोध जाने त्याने घ्यावा...
दूसर उदाहरण द्यायच झाल तर, आपल्या आरोग्या बाबतीत घ्या... प्रत्येकाची शरीर पकृति वेगळी असते, मग त्यानुसार प्रत्येकजन काळजी घेतो का? या whatsapp वर असंख्य मेसेजेस येत असतात शरीर स्वास्थ्यसाठी काय चांगल आहे, काय नाही किंवा Do's and Dont's येत राहतात...
पण कधी स्वतःच्या शरीराशी संवाद साधला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खर आहे की तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट अनुभवु शकता... जर तेवढे ध्यानमग्न झालात तर.. आणि मग नियंत्रित सुद्धा करू शकता.... कोणी लक्ष देत नाही.. अरे खरच बघा एकदा प्रयत्न करून शरीराशी संवाद करून..
नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट अगदीच संवेदनशील झालीय. म्हणजे नव्या नवरिचे नउ दिवस अस आपण आजकाल वागतो आहोत का? एवढी माणस झालीत की कोनाकोणाल वेळ द्यायचा हाच प्रश्न पडतो... मग आपल मोबाईल घ्यायचा आणि चालू मेसेजेस. मोबाईल दिवसातुन किती वेळ वापरायचा हा एक गंभीर प्रश्न झालाय.. Addicted झालोय अस म्हणालात तरी चालेल.... ज्यांना जमत ते राहतात नियंत्रित.
अजुन बऱ्याच गोष्टी आहेत, समजजीवन, मानसिक आरोग्य, येणाऱ्या पीढिसमोरिल आदर्श... ही यादि न संपनारी आहे.
या सगळ्या गोष्टिंचा विचार केलात, तर काही बाबतीत बदलती जीवनशैली लाभदायक वाटेल, तर काही बाबतीत हानिकारक...
शेवटी गाण्याच्या दोन ओळी आहेत
*जीवन गाणे गातच राहावे, पुढे पुढे चालावे ।*
*रुसवे फुगवे विसरून जावे, पुढे पुढे चालावे।*
Source:- INTERNET
-पवन खरात,
-पवन खरात,
अंबेजोगाई
माणसाच्या उप्तत्ती पासून माणूस स्वतःला गरजे नुसार बदलत गेला आहे. विज्ञानाच्या जोरावर अनेक सुख सोयी निर्माण करून अथांग प्रगत झाला.
आयुष्याची शंभरी गाठणारा एकेकाळचा माणूस आज क्षणभंगुर झालेला आहे. कारण आज माणूस आज भाकरीच्या तुकड्यात समाधानी राहिलेला नाही. दारू ,सिगारेट,ड्रग्स या सारख्या गोष्टीच्या आहारी गेला आहे. त्याचा बरोबर खानपानातील बदलामुळे एक वेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल पण औषध मात्र घ्यावीच लागतात.
बदलत्या काळानुसार गरजा सुद्धा बदलत गेल्या . घरातील वयस्कर माणसाला घरात उच्च स्थान असल्याचे कारण त्यावेळी त्याला त्यांची गरज असायची . पण आज घरातील वयस्कर माणसांची गरज फक्त वृध्दाश्रमांना राहिली आहे, कारण स्वतःची मुलं जन्मदात्याला घराबाहेर हकालताना सुद्धा विचार करत नाहीत.
माणूस आज खूप सुखी आहे फक्त इंटरनेट व मोबाईलच्या आभासी जगात . चार मित्राचं बोलणं ,भेटणं तर व्हाट्सअप्प ने कधीच बंद केले आहे, कारण समोरासमोर बसले चार मित्र सुद्धा एकमेकांना बोलण्या पेक्षा मोबाईल मध्ये जास्त बिझी असतात.
पण जेव्हा या खऱ्या दुनियेशी ओळख होते,एकटेपणा जाणवतो ,तेव्हा मात्र आत्महत्या शिवाय पर्याय उरत नाही.
आज या गोष्टीची खात्री पटली कि,
" पूर्वी माणूस माणसं जपायला आणि पैसा वापरायला शिकला,
आणि
आज माणूस पैसा जपायला आणि माणसं वापरायला शिकला । "
Source:- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर
ज्या वेगानं विज्ञानाने प्रगती करुन आपल्याला वेगवेगळ्या सुख सुविधा निर्माण करुन दिल्या आहे.पण त्यात वेगानं असंख्य प्रकारच्या आजार व रोगांनी माणसाच्या शरीराला स्वतःच्या हक्काचे वस्ती बनविली आहे.नैराश्य व मानसिक तणाव,मधुमेह,हृदयरोग,अस्थमा इत्यादी रोग हे आधुनिक जीवनशैलीची देणग्या आहेत.सर्वात गंभीर बाब ही लैंगिक समस्या कित्येक जणांचे जीवन खराब करत आहे .
सामाजिक मुल्यांमध्ये झपाटयाने होणारा बदलाचे परिणाम म्हणजे लग्नाच्या पूर्वी लैंगिक संबंध ही रोजची साधी बाब बनली. लैंगिक स्वैरपणामुळे एच.आय.व्ही,सिफिलीस सारखे गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
आजची तरुण पिढी करियर बाबतीत खुप विचारी आहे.त्याला प्रचंड महत्त्व दिले गेल्यामुळे लग्ना आधी लैंगिक संबंध व नंतर गर्भ राहू नये यासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेकी वापर यामुळे मुले होण्यात खूपच समस्या निर्माण झालेल्या आहे.
कित्येक सलग तास संगणकावरील कामाने हृदयविकार,उशिरा पर्यंतच्या पार्टी मधील धुम्रपान,दारु इ.मुळे नपुंसकता तसेच स्त्रीयांमध्ये मॕनोपॉज सारखे मासिक पाळी संदर्भातील आजाराच्या समस्या वाढत आहे.
उद्योग धंद्याच्या स्पर्धेत बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामाची आधुनिक पध्दतीने माणसांची जीवनशैली खूप प्रभावित झाली.दिवसाचे स्वरूप रात्रीत तर रात्रीचे दिवसात बदल झालाय.धावपळ वाढली.प्रत्येकाला पुढे जाण्याच्या घाई लागली. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण शॉटकटची मदत घेवून काही पण करण्यास तयार आहे.इंटरनेट व मल्टीनॕशनल कंपनीच्या मायाजाळाने तर जीवनशैलीला फारच बदलून टाकले.फास्ट-जंकफुड हे खाण्यास पोषक तर नसतात पण सर्वात महत्त्वाचे अस्वच्छ असतात.त्यातून अनेक रोगांची भीती असते.भारतात १०ते २५ वयोगटातील सुमारे २३ लाख युवा दर वर्षी अकाली मरण पावतात.त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत.युवा म्हणजे देशाचा आधारस्तंभ व ऊर्जा असते.पण तेच असे पंगू झाले तर त्या देशाचे भवितव्य अंधारातच राहिल?(संदर्भ -जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद केले)
भारतात एकूण लोकांच्या ६५% हे ३५ वयोगटा खालचे आहेत.सर्वात मोठी अडचण युवकांच्या आरोग्य साठी परिणामकारक असे धोरण नाही.त्यामुळे युवा भारता ऐवजी आजारी भारत म्हणून आपल्याला ओळखले जाऊ लागू शकते.
Source:- INTERNET
-समीर सरागे,
नेर
जि यवतमाळविज्ञानाने जस जशी प्रगति केली तस तशी आपल्या जीवन शैलित देखील बदल होत गेले , पूर्वी आजच्या सारखी भरपूर वाहने नव्हती तरी देखील प्रत्येक व्यक्ति वेळेवर पोहोचत असे, आजच्या सारखे प्रगत वैद्यकीय उपचार नव्हते तरी देखील कोणी आजारी पड़त नसे , आजच्या सारखे माहिती तंत्रज्ञानाचे युग नव्हते तरीही प्रत्येकाचे समाजमन एकमेकांशी जुळलेले असायचे ,आजच्या सारखी प्रगत शैक्षणिक व्यवस्था नव्हती तरीही प्रत्येकाला शिक्षण मिळत असे, आजच्या सारखा औद्योगिक विकास नव्हता तरीही प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत असे, वैगरे असो
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळीकडे वैज्ञानिक प्रगति झाली आहे. त्यामुळे मनुष्यजीवनात सुख सुविधाची फार मोठ्या प्रमाणात रेल चेल वाढली आहे.
आज प्रत्येक मनुष्य पैशाला केंद्रस्थानी ठेऊन आपले जीवन जगत आहे. म्हणजे पैसा भरपूर कमावला किंवा भरपूर संचय केला की आपला येणारा भविष्य काळ हा सुखात जाईल, असे वाटन्यात काही गैर नाही कारण सर्वानी आपल्या करिता सुखाची आणि समृद्धिची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे.
परिस्थिति नुसार मनुष्याला बदलावे लागते आपल्या सवयी ,स्वभाव , कामाच्या पद्धति राहनीमान ,जीवनमान यात कालांतराने बदल होत गेले आणि होत देखील राहणार कारण बदलाव हा निसर्गाचा आणि जगाचा नियम आहे. अलीकडे आपल्याला शहरी जीवन पद्धति कड़े बघितल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जानवेल की, शहरी भागातील जीवनमानात आजकाल अतिशय विरोधाभास आपल्याला दिसून येईल , शहरी भागाचा विचार करता आज तेथील प्रत्येक व्यक्ति रोजच्या धावपळी च्या व्यस्त दिनचर्येत कर्तव्या बरोबरच स्वतःच्या कुटुंबच्या उदरनिर्वाहचा डोंगर देखील वाहत असतो रोज सकाळी कर्तव्यावर जाने तेथील कामाचा व्याप, वाहतुकीची पायपिट, कौटुंबिक जबाबदार्या या सर्वांच्या विवंचनेत त्याची मानसिक पातळी इतकी खालावून जाते की, त्याला डिप्रेषन, हाइपर टेंशन सारख्या व्याधीने तो ग्रस्त होऊ लागतो कारण कोणाच्यही जीवन कार्यात सुख हे केंद्रस्थानी असते आणि या सर्व गरजा भागविन्या करिता पैसा हा घटक महत्वाचा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे, आपल्यासारखे हाल-अपेअष्टा माझ्या मुलांच्या नशिबी नको , म्हणून बरेचसे पालक हल्ली आपल्या पाल्याणा दुचाकी वाहन, मोबाईल, लैपटॉप वैगरे वस्तु खरेदी करून देतात आणि खरेदी करुण देणे यात काही गैर नाही परंतु आपल्या पाल्याला त्याने कष्टाच्या पेशाने कमाऊंन दिलेल्या या वस्तु तो गरज किंवा आवश्यकता म्हणून त्याचा वापर करतो की नाही याची शाहनिशा आजकालच्या सुज्ञ पालक वर्गाने करणे अनिवार्य आहे. माहिती तंत्रज्ञाना च्या या युगात नवनवीन उपकरणें हाताळने वा त्याचा वापर करणे योग्य आहे.परंतु केवळ मनोरंजन म्हणून त्याला उपयोगात आणने आणि आपला बहुमूल्य वेळ दवडने हे आजच्या तरुण आणि सुशिक्षित पिढीकड़ून कदापिही अपेक्षित नाही.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धति अस्तित्वात होती किंबहुना आजही काही अंशी ती नावा पूरती अस्तित्वात असेल असो, या संयुक्त कुटुंब पद्धति मध्ये कुटुंबात एक प्रौढ़ व्यक्ति कुटुंब प्रमुख म्हणून असायची आणि या व्यक्तीचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर असायचा (कारण कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या काही कर्तव्ये आणि जबबदरया असायच्या) त्यांच्या वर सामाजिक जबाबदारी देखील असायची ,सर्व कुटुंबातील मंडळी त्यांच्या आज्ञा चे पालन करायचे लहान मुले आणि नातवंडावर त्यांचे प्रामुख्याने लक्ष असायचे कारण यांचेच संस्कार रूपी शिक्षण भविष्यात त्यांना ऊपयोगी पड़त असे, सर्व आपापली कामे चोख करायची ,कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण असायचे , संवादाच्या माध्यमातून एकमेकांशी जिव्हाळा आणि प्रेम राहत असे परंतु कालांतराने एकल कुटुंब पद्धति अस्तित्वात आली वाडयाची हस्त्या खेळत्या घराची जागा फ्लैट ने घेतली , जिव्हाळा आणि प्रेम हे प्रसंगावधान ठरू लागले आणि वडीलधारी मंडळी वृद्धाश्रमात धाडल्या जाऊ लागली याचे मुख्य कारण म्हणजे तशे संस्काररूपी शिक्षण आम्हला मिळणेच आता कायमचे बंद झाले आहे. आणि कॉन्वेन्ट व पाश्चात्य संस्कृतिचा प्रभाव दिवसेंदिवस आमच्यावर होत चालला आहे.
आजकाल ज्या पद्धतीने समाजाचा विकास झाला आहे त्यात संयुक्त कुटुंबाची जागा एकल कुटुंबाने घेतली आहे यामुळे आजच्या तरुण पिढीला ते वातावरण मिळत नाही पूर्वी घरच्या मंडळी सोबत भोजन करतानी गप्पा ,गोष्टीच्या माध्यमातून वेळ घालवून प्रत्येकाला एक स्वस्थ जीवनशैली मिळत असे, परंतु एकल कुटुंबातिल व्यक्ति फार कठिन परिस्थितीत किंवा क्वचितच एकमेकां करिता वेळ काढतात आणि आपला एकटेपना घालविन्या करिता ते पार्टी, पब किंवा बार याचा सहारा घेतात परिणामी ,दारू, सिगारेट, ड्रग्स,कोकेन सारख्या मादक पदार्थांच्या आहारी जाऊन आपले स्वास्थ्य बिघडवून घेतात. यात बहेरगावाहुन शिक्षण आणि रोजगारच्या शोधात येणाऱ्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
कॉल सेंटर ,इंटरनेट नंतर आता सोशल मिडियानेही आपली जीवनशैली बदलून टाकली आहे. रात्रभर जागरण करणे, मग उशिरा उठने आणि त्यानंतर कामाला जाने हेच अलीकडे आपल्या सर्वांचे जीवन होऊन बसले आहे. यातही आजचे तरुण रोजगार आणि करिअरच्या शोधात इतरत्र भटकंति करत असतात यामुळे वेळी अवेळी खान-पान करणे फास्टफूड , डब्बाबंद किंवा होटेलातील खाने, कोल्ड्रिंक्स चा अतिवापर याकड़े आजचा तरुण वर्ग आकुष्ट झाला उलट ती एक फैशन बनली आहे. अलीकडे आपल्याला हर एक चौकात ,चायनीज , तळलेले पदार्थ असलेल्या स्टॉल वर तरुणांची गर्दी सहजच दिसून येईल, जिभेचे चोसले पुरविन्या करिता आपण हे पदार्थ खात असतो परंतु असले पदार्थ पोषनवीहिन तर असतातच सोबतच ते अनेक रोगाचे माहेरघर देखील असतात. परिणामी असले न-पचनारे पदार्थ खाऊन वजन वाढ, लट्ठपणा(Obecity) जे अनेक रोगांचे मुख्य कारण देखील आहे. खऱ्या अर्थाने हा रोग कुपोषणा पेक्षाही भयंकर आहे, यामुळे हृदयरोग, मधुमेह, कंबर आणि घुटने दुखी, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे प्रमाणात वाढ, अनिद्रा वैगरेची संभावना अधिक प्रमाणात असते. मग यावर मात करण्या करिता तरुण वर्ग वेगवेगळ्या औषधिच्या आहारी जातात यात अनिद्रे करिता झोपेच्या गोळ्या घेणे, मधुमेह कमी करण्या करिता इन्सुलीनचे इंजेक्शन वैगरे घेणे ,पैन किलर आणि एंटीबायोटिक यांचा अतिवापर यामुळे शरीरातील इतर अवयवा वर विपरीत परिणाम होऊन अधिक स्वास्थ्य बिघडवून घेतल्या जाते.
पूर्वी घरातील स्त्रियां पहाटे उठायच्या तेव्हा पासून त्यांची कामाची दिनचर्या सुरु व्हयची ते अगदी रात्री पर्यंत चलायची स्त्रियां सतत घरकामत असल्याने त्यांना त्यांना व्याधि आणि आजार होत नसत किंवा झाले तरीही ते क्वचितच होत कारण त्यांच्या या घरकाम करण्यामुळे एकप्रकारे व्यायाम होत असे परंतु आजची परिस्थिति बघता बऱ्याच कुटुंबात आपल्याला घरकाम करणाऱ्या स्त्रियां किंवा पुरुष नजरसे पडतिल
एवढेच नव्हे तर बाळाला जन्म देणाऱ्या मातेला देखील तिच्या स्वतःच्या बाळा करिता वेळ नसतो मग त्या बाळाच्या संगोपन व पालनपोषणा करिता या महिला आया (Sarogate Mother) ठेवतात मग क़श्या प्रकारे त्या मुलांवर मातृत्वाचे -पितृत्वाचे संस्कार होतील ? म्हणजे यांना मोबदला देऊन Sarogate Mother ठेवणे चालतील परंतु घरामध्ये वडिलधारी वृद्ध मंडळी नको आणि ती असतीलही एक तर वृद्धाश्रमात नाहीतर मग दूर गावी, आणि हीच पद्धत व आधुनिक जीवनशैली मग कायमची परंपरा बनत जाते परिणामी वृद्धाश्रमा मध्ये अलीकडे आपणास वृद्धाचिं संख्या वाढलेली दिसून येत आहे व भविष्यात अधिक प्रमाणात दिसून येईल. कारण ही पद्धत अनुकरणीय होऊन जाईल ,आणि यात नवल वाटायला नको.
असो ,
प्रत्येकाने आपाआपली जीवनशैली ,राहनिमानाचा दर्जा ,सवयी आपल्या सोईनुसार व काळानुरूप बदलून घेतल्या आहेत किंवा बदलने अनिवार्य आहे. आजचे २१ व्या शतकातील युग हे धावपळीचे आणि स्पर्धेचे आहे. त्यानुसार प्रत्येकाने आधुनिक जीवनशैलित आपल्या सवयी व कामाच्या पद्धति देखील बदलवायला हव्यात
बदल होने हा नियम जगाला, श्रुष्टिला व तंत्रज्ञानाला देखील लागू आहे. त्याच प्रमाणे तो मनुष्यला देखील लागू आहे यात दुमत नाही , परंतु या बदला बरोबर आपली नीति मूल्य , आपलेपन,प्रेम- जिव्हळा , नाते व संवाद या बाबी जपने देखील तितकेच महत्वाचे ठरते. या धकधकीच्य तनावपूर्ण जीवनात ज्ञान धारणा (Maditation), योगासने, प्राणायाम इत्यादिने आपण आपले कामाचा तान- तनाव दूर करु शकतो या आधुनिक जीवनशैलित या उपरोक्त बाबी दररोज अमलात आणल्यास आपण एक स्वस्थ जीवन तर जगूच त्यासोबतच सामाजिक स्वास्थ्य टिकुण ठेवन्यास देखील तितकीच मदत होईल व ती काळाची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा