माझी शाळा आणि बालपणीच्या सुखद आठवणी (भाग:-1)

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
📄 आठवडा 21वा 📝
24 मार्च ते 30 मार्च 2018

माझी शाळा आणि बालपणीच्या सुखद आठवणी (भाग:-1)

(स्वप्निल नामेकर,जळगांव,प्रशांतकुमार,अहमदनगर,राज इनामदार,पंढरपूर,अभिजीत गोडसे,सातारा,योगेश्वर पाटोळे,सोलापूर ,संदिप बोऱ्हाडे,पुणे,किरण पवार,औरंगाबाद,सिमाली भाटकर,रत्नागिरी,संदिप भंडारे,अहमदनगर,प्रदिप इरकर,पालघर. यांच्या शाळेच्या आठवणी कशा वाटल्या,नक्की कळवा खालील कमेंट बॉक्स मध्ये.)
(यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेटवरून घेतली आहेत)


स्वप्निल नामेकर,जळगांव
मी पहिली ते चौथी पर्यंत एका वस्ती शाळेत शिकलो आहे, कारण आमच्या घरापासून आमचे गाव 3 किलोमीटर लांब होते. आमची शाळा ही एक लहान 20 × 30ची रूम असलेली होती,आणि पहीली ते चौथी पर्यंत एकत्र असा वर्ग एक एक वर्गाची  वेगवेगळी रांग,आणि सर्व मुलांना एकाच शिक्षक. पण आमची शाळा ही निसर्गाच्या सानिध्यात असल्याने आम्ही सर्व मुले वर्गात कमी आणि बाहेर जास्त असायचो कारण आम्हाला प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे भेटायची जसे चिंच,बोरं,आंबे, सिथाफल,रामफळ,पेरू,अंजीर इत्यादी. आमच्या शाळेची सुरवात सकाळी परिपाठा पासून व्हायची शिक्षक नसल्याने परिपाठ मीच घायचो आणि मग परिपाठ पूर्ण झाल्यानंतर  आमचे शिक्षक यायचे,आणि मग एकत्र वर्ग भरायचा आमचा चौथी चा वर्ग बाहेर असायचा. शिक्षक प्रत्येक वर्गाला कहितररी वर्गपाठ देऊन आम्हाला शिकवत असत. कधी कधी शिक्षक मला लहान मुलांना चित्र काढयला सांगत मग मी त्याना पोपट,हरण,गाय,कमळ,इत्यादी.असे चित्र काढत असे आणि मग नंतर जेवणाची सुटी होत असे. जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व मुले बाहेर खेळत असू व काही खोडकर मुले झाडावर चढत असत.आणि 2 वाजता आमची शाळा सुटत असे मग सर्व मुले आप आपल्या घरी जात असत. अश्या प्रकारे आमची वस्तीवरील शाळा पूर्ण निसर्गाने वेढलेली,आम्ही खूप मजा करायचो,असो पण आता स्वातंत्र वर्ग झले 2 शिक्षक असतात, पण तरीही पहिल्या सारखे वाटत नाही कारण लहान पण हे लहानpanch असत . कारण तेव्हा आपली मनं निर्मळ असतात, आपल्याला परिपुर्ण स्वातंत्र्य असत, कारण तेव्हा आपल्याला कशाचीही चिंता नसते न करीअर ची आणि न नोकरी ची कारण आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नसतात.आता तसे नाही राहिले, आणि आताची मुलं सुद्धा तशी नाही राहिलि, त्यांना आता खेळ माहितच नाही फक्त मोबाइल वरच खेळ खेळत असतात. असो ती तर काळची गरज आहे  पण आज जेव्हा मी बालपण आठवतो मला खूप आनंद होतो.  मला वाटते की मी लहानच राहिलो असतो तर किती छान झाले असते आज तर कॉलेज आणि अभ्यास आणि करिअरची चिंता या व्यतिरिक्त काहीच नाही, ना हिंडणे ना निसर्गाच्या सानिध्यात जाणे ह्या गोष्टी तर  जणू काही मी अनुभवल्याचं नाही असे वाटते. कारन आज जग फार फास्ट झाले आहे स्पर्धा वाढल्या आहेत म्हणून सर्व काही विसरुन जगांबरोबर चालावे लागते.पण लहान पण नाही विसरता येणार कारण त्याच्यावरच आपलं भवितव्य ठरत असत.


पी.प्रशांतकुमार,अहमदनगर
मी मुलीच्या शाळेत गेलो ..
सर सांगतात मुलगी हुशार खूप आहे..येतही सगळं पण वर्गात फार बडबड करते ..थोडी शिस्त लावा..
.......माझं बालपण आठवत...मला नेहमी भाषणं चालू असताना वेगळ्या रांगेत सर्वात पुढे पुढे बसवलेल असायचं... पहिल्या 5 मिनिटातच पप्या पुढं ये...
वर्गात गोंधळ असला की मी गैरहजर असलो तरी गुन्हेगारांच्या यादीत माझं नाव असायचं इतका सगळ्यांना माझ्याबद्दल विश्वास होता :)
वर्गाबाहेर भिंतीकडे तोंड केलेली शिक्षा भोगणारी प्रजा पाहिली की मन भरून येत..तरी हल्ली आमच्या वेळी फेमस असणारी व्हरांड्यात अंगठे धरण्याची शिक्षा दिसत नाही..

..सर लोक तीच कौतुक करतात... क्लास न लावता स्कॉलरशिप मिळवल्याच..इतर सर्व परीक्षात भाग घ्यायची आवड.. IMO वगैरेत घरीच अभ्यास करून मेडल मिळावल्याच.. तिच्या swimming च.. सगळीकडे भाग घ्यायची आवड.. चित्रकलेच .. मला भरून येत.. शाळेत कौतुक हा प्रकारचं माहीत नसल्याने मीच बुजतो..
.....
मला तिला शाळेत आणायला जरा उशीर झाला की ती लगेच ऑफिस मधे जाऊन मला फोन करते.. मी माझ्या शाळेत ऑफिस मधे फक्त बाजू मांडायलाच गेलेलो (आरोपी म्हणून)...

.....  ..मग मी मुलीला येताना म्हणतो बाळं वर्गात धिंगाणा घालू नये..ती ऐकणार नाही हे माहीत असूनही ..

मी दहावीत असताना ..क्लास मधे सरांनी बिंदु P येणारी AB रेषा काढून विचारला PB काय आहे?..मी सीरियस आवाजात.....सर माझ एनिशियल आहे  ... ... माझ भूमिति चांगल होत पण मी वात्र्य होतो :) .. बहुदा हुशार मुलांपेक्षा टूकार मुलं जास्त लक्षात राहतात.
...आज मागे पहाता वाटत .. शाळेचा अजून उपयोग व्हायला हवा होता आयुष्यात.. खूप वर्ष हातातून निसटली.. तेव्हा आपण अस का वागायचो याच आजही उत्तर नाही मिळत.. कदाचित *पैगांडावस्था* वगैरे कारण असतील.. किंवा सांधे बदलताना होणारा खडखडाट.. किंवा insecurity ची भावना असू शकते..
...आपण किती मजा करायचो..परत तशी बॅच झाली नसेल..अस प्रत्येक बॅचच्या मुलांना वाटत असतं..


राज इनामदार, पंढरपूर
हा विषय निवडल्याबद्दल धन्यवाद. आपण जेंव्हा लहान होतो तेंव्हा आपल्याला आपले नातेवाईक , घरची माणसे , मित्र मंडळी हमखास एक प्रश्न सतत विचारत ..की , तू मोठा झाल्यावर काय बनावे असे तूला वाटते ..त्या वेळेस नेमके समजत नव्हते की आपल्याला काय बनायचे ते .पण मित्रांनो आज़ मी मोठा झालो लग्न झाले , मुल झाली आणी लहानपणी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज़ खूप दिवसांनी मिळालं की ...मला मोठ *झाल्यावर परत लहान व्हायचय*

माझ गाँव भीमा नदीच्या कुशीत सामावलेलें ..जस आईने आपल्या मुलाला जपावे तस नदीने आम्हांला जपलेल .बाराही महीने पाणी असल्याने सगळीकडे हिरवळ व गाँव आर्थिक द्रुष्टीने सधन .पण शिक्षणाच्या बाबतीत खुप खुप मागास .
    मी लहानाचा मोठा होवू लागलो. त्यातून अनेक मुलानंतर मी व माझी बहीण दोघंच वाचलेलो म्हणुन आई वडील परस्थिती नसताना भी अती लाड करायचे . त्यातूनच अंगात उधट्पना वयाबरोबर वाढत चालला होता .
तो इतका वाढला की मी वडिलांना सुधा एकेरी नावाने हाका मारत असे ...अरे तुरे बोलत असे .लहान आहे अजून काय कळतंय म्हणुन सर्वजण सोडून देत पण .ऐन माणसात मी अपमान केला की मग विचार करी आता ह्याच वय झालय याला शाळेत घातला पाहिजे .
पण फक्त शाळेत घालायचा विचार करण्यातच दिवस पुढं सर्कायच .
आम्हीं रानात राहायला होतो ..शाळा गावात होती ..गाँव ते घर चार किमी अंतर रस्ता नीट नव्हता त्यामुळे वडीलही लक्ष देत नव्हते .   काही दिवसांनी आमच्या वस्तीवर वस्ती शाळा सुरू झाल्याच आमच्या घरच्याना कळलं ...मग काय आठ दहा दिवस मला लाडूगुडी लावून आमच्या शेजारची माझ्याच वयाची मुलगी बायजी (शेवन्ता)व मला वस्ती शाळेत आई सोडून आली .देवधर मालक यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली ही शाळा भरलेली .   तिथं आमच्या वस्तीवरची गावात जाणारी मुल सुधा आता तिथंच शाळेला आलेली .मी आणी बायजी गपचुप माघ जावून बसलो ..गुरुजी तब्येतीने जामजुम होते वय होत आल्याने त्यांना चश्मा लागलेला व डोक्याची केसहि पांढरे झालेली ...गुरुजींनी थोडा वेळ झाल्यावर सगळ्यांना सांगितले की एक दोन अंकलपीतील पाठ करा मी सर्वानकडून म्हणून घेणार आहे .जे गावात शाळेत जाणारी मुल होती त्यांना माहीत होत की एक दोन म्हणजे काय पण , मी आणी बायजी आमचा पहिला दिवशी असल्याने आम्हांला या एक दोन कस असत याची कसलीही माहिती नव्हती ...
गुरुजींनी प्रत्येकाला उठवून विचारन्यास सुरवात केली ..प्रत्येकजण थोडेफ़ार काहीतरी म्हणायचे गुरुजी खेकसायचे ..मुल रडायला लागायची अस सर्व चाललेले ...आता माझा नंबर होता मी शांत उभा राहिलो गुरुजी गरजलें अरे माकडां म्हणना एक दोन मला नेमके एक दोन हे काय असत हेच मुळात माहिती नव्हत तर मी म्हणणार काय ? गुरुजींचा रागाचा पारा वाढत होता ....गुरुजींनी धोंड्याला छड़ी आणण्यास सांगितली , धोंड्याने चांगला वेलताराचा फोकच आणला ...गुरुजींनी मला त्या दिवशी मनोसोक्त धुतले .मला मारताना बघून बायजी तर माज्या पेक्षाही जास्त मोठय़ाने रडू लागली .गुरुजींनी थोड्या वेळाने शाळची सुट्टी केली गुरुजींनी सायकलवर टांग मारून निघून गेले .मी आणी माझी मैत्रीण बायजी घराकडे येतांना बोलू लागलो मास्तर लय कडू हाय ..मारतय जनावरांसारख मी नसतो उद्यापासून शाळेत येत .पण बायजी म्हणाली आरपण शाळेत नाही गेलो तर घरची मारत्यालकी आपल्याला ..मी विचार केला आणी तीला म्हणालो आग आपण शाळेत नीघालोय म्हणून घरंण येयच पण शाळेत नाही जायच .  ती म्हणाली मग कुटं जायाच  मी म्हणालो आपण बसू शेंडग्याच्या आंब्याखाली .
मग निर्धार पक्का झाला .आमच घर ते शाळा याच्यामधे शेंडग्याच शेती होती आजूबाजूला सगळीकडे ऊस होता .उसाच्या मधोमध आंब्याचं झाड होत.आम्हीं दररोज शाळेला म्हणून येयचो आणी शाळेला न जाता आंब्याच्या झाड़ाखाली जावून बसायचो ....असेच महीनाभर झाल असेल .
एके दिवशी गुरुजी गावाकडे जाताना आईला दिसले .आईने गुरुजीना थाम्बवून विचारल की ..मुलगा अभ्यास करतो का म्हणुन ..या प्रश्नावर गुरुजी म्हणाले अहो तुमचा मुलगा एकच दिवस शाळेत आला परत आलाच नाही .आई भी चकीत झाली व ती गुरुजींना म्हणाली अहो एक महीना झाल दररोज जातात घरून .मग आई मला शोधत हाका मारत आली ..तीला कोणीतरी सांगितले की मी झाड़ापाशी आहे म्हणुन .आई आली तीने  मला घरी आणलं व जेवण वाढून शाळेविषयी विचारू लागली ..मी जेवण करता करता सर्व रडून सांगितल वडीलही ऐकत होते ..ते पण म्हणाले जावू नकोस उद्या पासून , मी खुप आनंदित झालो .भरपूर जेवण करून आनंदात जावून बायजीला सांगून आलो .दोघंही खुष .
पंधरा वीस दिवस झाले असतील माझा मामा आमच्या घरी आला होता .मामाने रात्री जेवण झाल्यावर आईला विचारल की अग ताई राजाला शाळेत घातलं की न्हाय अजून ..आईने सर्व व्रूतान्त मामाला सांगिलते .मामाने थोडा वेळ विचार करून आईला म्हणाला काळजी करू नकोस मी नेहतो शाळेत त्याला माझ्याकडे .त्याचे कपड़े वगैरे भरून ठेव .उद्या लवकर st ने निघावे म्हणतोय .पहाटे लवकर उठुन सर्व आटपून मी आणी मामा पंढरपूर वरून कुर्डुवाडी बस धरून निघालो .माझ आजोळ लव्हे हे गाँव कुर्डुवाडी पासून दहा km अंतरावर .
मी आजीच्या गावाला आलो ..आजोबांनी मला शाळेतील गणवेष घेवुन आले ..दुसऱ्या दिवशी मला शाळेत घेऊन गेले ..ती मराठी शाळेची इमारत जुनी कौलारु भव्य दिव्य होती .मोठी प्रशस्त अशी ती शाळा .पहिलीला शिकवायला माझ्या नशीबाने आदर्श असे खराटें गुरुजी होते .माझ नावं शाळेत घातले .मग दररोज पार्थना म्हणणे .मूल्यशिक्षणाचा तास व नंतर आपापल्या वर्गात जाने .खराटें गुरुजी अगदी प्रेमाने बाराखडी , उजळणी शिकवू लागलें .जो पर्यंत आम्हांला समजत नाही तो पर्यत ते पुढील अभ्यास शिकवत नसत.
हळूहळू आमच्यात खुप बदल होत गेला चांगल शिक्षण मिळू लागल ..आत्मविश्वास वाढत चालला आम्हीं घडत गेलो .
आज़ खुप आठवण येतेय त्या शाळेची व त्या दिवसांची 😢😥😢

अभिजीत गोडसे,सातारा
        'वडील रयत मध्ये  माध्यमिक शिक्षक असल्यामुळे बदली झाली की शाळा बदलावी लागत असे .पहिली  ते दहावी पर्यत चार वेळा शाळा बदलावी लागली.सर्वच शिक्षण हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या "रयत शिक्षण संस्थे" मध्ये झाले .पण लक्षात राहीली ती श्री.पाणलिंग विद्यालय वावरहीरे ता.माण, जि.सातारा येथील शाळा.
        शिक्षकांची मुले म्हणजे थोडा माण-सम्माण असतो तसा तो मला ही होता. वडील त्याच शाळेत असल्यामुळे तर जास्तच लाड होत असे. शाळेत तसा मी आभ्यासात जेमतेम  होतो. फारसा हुशार वगैरे अस काही नाही. सातवीत असताना शाळेत साडी घालून स्टेजवर "मुंबई ची सफर" हे ऐकपाञी नाटक तसेच "सोनु तुझा माझ्यावर भरोसा नाय काय"  या गाण्याचा ठेका धरला होता. 15 आँगस्ट , 26 जानेवारी , 22 सप्टेंबर कर्मवीर जयंती. या वेळी प्रभातफेरीत "झांजपथकात" असे. अंगात वार आल्या सारखं नाचत होतो. "एक रुपाया चांदीचा सारा देश गांधीचा , भारत माता की जय , वन्दे माञंम , कर्मवीरांचा विजय असो , स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" अशा कित्येक घोषणां ओरडून ओरडून देत असे. रोज सकाळी 11 ते 5 खाकी चड्डी , पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी हीच आमची ओळख असे. शनिवारी शाळा सुटली की असे वाटे आता सोमवार लवकर येऊच नये. कारण आभ्यास आणि माझ नात त्यावेळी जास्त जूळतच नसे. रविवार सकाळी दुरदर्शन वरील "रंगोली" पाहून सुरू होत असे.शक्तीमाण, रामायण, महाभारत, दामिणी, मराठी चित्रपट त्यातील लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ हे सर्व मला आवडायचे. याच बरोबर शिक्षक काँलनीत छोट्या 'गाड्या' खेळणे हा माझा आवडता छंद. त्या वावरहिरे गावच्या बाजूने सात वेगवेगळ्या वाड्या असल्यामुळे.एक आठवडी बाजार येथे भरत असे. तो जर वेळी पाहण्या सारखा असे. "गंझी" नृत्य हे तेथील फेमस म्हातारी माणसे धोतर, हातात लेझीम  आणि डोक्याला पटका गुंडाळून ताल धरत असत.
       लहानपणी राग,मस्सर,लोभ अशा कोणत्याही गोष्टी मला चिकटल्या नाहीत पण जसजसे मोठे होत गेलो तसतसे हे सर्व "रोग"  चिकटले ! कसे ते अजून तर माहिती नाही. शाळेत असताना रोज म्हणून घेतलेली प्रार्थना, राष्ट्रगीत , मूल्यशिक्षनाचे धडे आता कुठे विसरले आत्तातर या सर्व गोष्टींची गरज आहे. लहानपणी वाटे कधी मोठे होऊ आता वाटते पुन्हा लहान व्हावे .प्रत्येकालाच बालपणात रमायला आवडते. खुप आठवणी असतात. काही आठवतात तर काही धुसर होतात. त्यावेळचा सर्व भाबडा आणि भोळा मिञ परीवार आता नाही. शेवटी "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"
योगेश्वर पाटोळे ,सोलापूर
ठाकरवाड्यातील माझ्या बरोबरची भऊतेक पोर दुसरी तीसरीतच शाळेत यायची बंद झालीत मि व आणखी दोघे माझ्या बरोबर येत होती तस सहाव्वी पेर्यंत काहीच कळत नव्हत पण एक चुलत भाऊ तेव्हा सैन्यात भरती झाल व तो प्रशिक्षण घेओन सुट्टी साठी आला व त्याने आम्हचा एकदा अभ्यास घेतला त्याने आम्हाला पाडे म्हणाय सांगितले तर कोनालाच 2च्या पुढे पाढे येत नव्हते व ABCD च तर विचारुच नका ABCD येवढच बस मग काय आमच वरात शाळेत दुसरया दिवशी भाऊ शाळेत व वर्ग शिक्षकाना विचारले कि किती मुलाना त्या गोष्टी येतायेत तेव्हा शिक्षकानी अस काय झोड्पुन काढल व नंतर घरी वडलानी पण त्यामुळेच आम्ही घड्लो मग खरी शाळा सुरु झाली मग सातवित  माझा दुसरा नंबर आला तेव्हा तर खुपच आनंद झाला मग मात्र शाळा खुप आवडाय लागली कधी कधी खुप लाजल्यागत होत होत ते गरीबी मुळे कपडे फाट्की घालाय चप्पल नाही वही आहे तर पुस्तक नसायची मग कोना मित्राकडुन तात्पुरते घ्यायचे व कमी वेळेत जस्त वाचन करायचे घर कुडाच घर कसल पाल्याच झोपडी होती पत्र्याच दार त्यात लाईट नाही रत्रीत झोपेत केव्हा त्या कुडातन बाहेर पडायचो कळायच नाही खेळाय खुप आवडायच खुपच खेळ खेळायचो त्याचा पुढे उपयोग झाला. मला माझे आगदी बालवाडी ते कॉलेज पर्यंतचे सर्व गुरुवर्य आठवतात आगदी नावा सकट शाळेत नुस्ताच अभ्यास नाही केला मस्ती तर त्याहुन अधीक करत होतो खुप मार खाल्ला पण माझी शाळा खुप छान आहे आजुन कधी गेलो तर खुप बळ मिळत . खरच खुप आहे सांगण्या सारख खर तर मि आपल्या सगळ्यांचा खुप आभारी आहे कि मला तुम्ही आपल्यात सामाउन घेतलाय बोलायच खुप आहे मित्रानो पण आपली शब्दाची अट आहे ते ही योग्य  आहे या गृप मुळे खुप काही शिकाय मिळतय पण जे आपले विचार अभिप्रायांची देवाण घेवान होतेय ते खुप महत्वाची आहे .

संदीप बोऱ्हाडे,पुणे
ही आवडते मज मनापासुनी शाळा....
लाविते लळा ही...जसा माऊली बाळा....

    ज्याप्रमाणे आयुष्यात काही गोष्टी विसरू शकत नाही, त्याप्रमाणे मी माझी शाळा प्राथमिक शाळा कधीही विसरू शकत नाही.  जिल्हा परिषदेच्या माझ्या जीवनात आतापर्यंत दोन शाळा झाल्या पिंपरी आणि माळेगाव खु.!!

   शाळेनं लिहायला, वाचायला, सोप्पी गणितं करायला शिकवलं. पण मित्रांबरोबर खेळताना, वाढताना जे काही शिकलो त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. आजही सोबत करत आहेत. किंबहुना व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्याचं महत्त्व किती मोठं असतं ते आज जाणवायला लागले आहे. सकाळी लवकर उठुन तयारीची लगबग, मग छान पाठीला दफ्तर ( पिशवी ) अडकवुन रोजच्या ठरलेल्या मित्रांसोबत शाळेची वाट धरायची. शाळेत पोहोचल्यावर आपापल्या जागेवर दफ्तर ठेउन प्रार्थनेला मैदानात जाऊन आपल्या वर्गाच्या रांगेत उभे रहायच. राष्ट्रगीत आणि प्रतीज्ञा झाल्यानंतर तेवढ्याच शिस्तीने रांगेत वर्गात जायच. वर्गात गेल्यावर हजेरीला उत्सुकतेने आपला क्रमांक येन्याची वाट पहायची. शाळा सुटली कि जसे काही खुप मोठ्या टेन्शन मधुन सुटलो या जोश मधे धावत घराकडे सुटायच. नंतर पुर्ण दिवस खेळलो, हुंदडलो तरी दुसऱ्या दिवशी शाळेत जायची तेवढीच ओढ असायची, बळजबरी नाही तर एक जिव्हाळा म्हणुन.
   
  माझी शाळा ही पूर्णपणे आदिवासी भागातील तेव्हा कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. तेव्हा माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची.
आजही मला ते सगळे दिवस जसेच्या तशे आठवतात. शाळेत जाताना कधीही ( १ली ते ७ वी ) चप्पल किंवा दप्तर मिळाले नाही. चौथी पर्यंत आमच्या गावातच शाळा पुढे ५ वी ते ७ वि ला ४ किलोमीटर पायी जाव लागत असे याकाळात कधीही चप्पल किंवा छत्री किंवा स्वेटर काहीही मिळाले नाही पण या साधनांची कधीही कमतरता वाटली नाही बाजाराची पिशवी आज आपण वापरतो त्यात  मी माझे दप्तर  घेऊन जायचो उन्हाळा पाऊसाळा आणि हिवाळा दररोज पायी प्रवास करून मी शाळा पूर्ण केली. कितीही पाऊस असुद्या ओढा पार करून शाळेत जात असायचो. कधीही बसने प्रवास केला नाही त्याला काळात वाघ,  चोर आणि पूर या तिघांचीही भीती परंतु शाळेला कधी दांडी मारली नाही. त्या काळात आंबे, फणस चोरणे ही मजाच वेगळी होती..माझे संपूर्ण शिक्षण म्हणजे डी.एड आणि M. A (अर्थशास्त्र) पर्यंतचे हे आदिवासी आश्रमशाळा आणि वस्तीगृहांमध्येच झाले आहे आज आमच्या आदिवासी समाजाला शिक्षणात काही सवलती आहेत म्हणून मी इथपर्यंत का होईना शिकू शकलो. नाही तर माझीतरी ऐपत नव्हतीच इथपर्यंत शिकण्याची.

   माझ्या शाळेत मला माझ्या दोन शिक्षकांची नावे आवर्जून इथे घ्यावी लागतील अजय ढोरजे सर आणि कोंडीबा लांडे सर (महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ) यांचे खूप मोठे योगदान माझ्या जीवनात राहिलेले आहे..या दोन व्यक्ती वर वर कितीही कठोर असल्या तरीही मनातून नाजूक पकळ्यांसारख्या आहेत. विद्यार्थ्याना घडवणारे, जोपासणारे व जीव लावणारे हे दोन शिक्षक शैक्षणिक ज्ञान सांगताना संस्काराचे धडे ही देणारे. नेहमीच गरिब विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव होती आणि आहे ....कारण याचे खूप सारे उदाहरण, मी माझ्या डोळ्यादेखत  अनुभवले आहेत.
मला अजूनही ठाम विश्वास आहे सरांच्या कर्तृत्वावर....सांगायचं म्हणजे सरांच्या कर्तृत्वावर मी काही लिहावं एवढी माझी योग्यता नाही, परंतू या नावाच्या ज्योत जोपर्यंत जळत राहील तोपर्यंत त्या त्या शाळेतील विदयार्थी यशाचे शिखर गाठत राहतील हे निश्चितच.... हे सांगताना अभिमान वाटतो या दोन माझ्या आवडत्या शिक्षकांचा. आज माझीही आमच्या या सरांप्रमाणे एक चांगला शिक्षक होण्याच स्वप्न आहे आणि कायम राहील पुढे पाहुयात काय होतय ते ??
त्या काळात मोबाईल किंवा कसलीही साधने आमच्याकडे उपलब्ध नसल्याने यातील सध्या लांडे सर संपर्कात आहेत..ढोरजे सर यांचा शोध मी खूप आजही घेतो आहे परंतू आजपर्यंत त्यांचा संपर्क किंवा शोध म्हणा लागला नाही. असतील कुठेतरी आणि एक दिवस भेटतील मला अशी आजही मनात आशा बाळगून आहे.

  शाळेचे ते दिवस आठवले की आजही डोळ्यात अश्रू येतात...खूप काही घटना या काळात घडल्या..
एक प्रसंग काळजात कायमचा घर करून बसलेला आहे. सहावीला होतो परीक्षेचा काळ होता पण नियतीला काही वेगळंच मान्य होत या काळात माझ्या आईचे निधन झाले पण शाळा सोडावी किंवा परीक्षा देऊ नये असे कधीही वाटले नाही. आईच्या उपचारासाठी मदत करणारे देखील हेच शिक्षक आणि पुढेही काळजी करू नको म्हणून पाठीवर हात ठेवणारे सुद्धा हेच शिक्षक..साधा एक फोटो किंवा मोबाईल क्रमांक सुद्धा  शिक्षकांचा ठेवू शकलो नाही याची मनात खंत आहे. आज माझे चांगले मित्र म्हणजे जीवाला जीव देणारे म्हणतात ना ते पण याच प्राथमिक शाळेतील आहेत आजही..१ ली ते ७ पर्यन्त माझा नेहमी १ ला किंवा २ रा क्रमांक असायचा..निकालाच्या दिवशी खूप उत्सुकता असायची..याच काळात सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला सर्व १ ली ते ७ वि च्या विद्यार्थ्यांमधून एका मुलाला आमच्या इकडील माजी सभापती यांच्याकडून २५ रुपये मिळायचे मला खूप आनंद वाटतो की मला हे २५ रुपये तीन वेळा मिळाले होते...आणि त्या २५ रुपयाची किंमत आज मला २५ हजारापेक्षी कमी वाटते.

  शब्दांची मर्यादा असल्यामुळे आवरत घेतो पण आज एका गोष्टीच खूप वाईट वाटत एकेकाळी ज्या ठिकाणी मुलांच्या किलबिलीने परिसर गजमजून जायचा तो आज नाहिसा होत आहे त्याचे कारण म्हणजे पालकांची इंग्रजी माध्यमाकडची ओढ 😢
किरण पवार,औरंगाबाद
वेळ खरंच खूप पटकन निघून जातो नाही?  विचारही केला नव्हता की, मला एखाद्या दिवशी अशा काही आठवणींबद्दल लिहाव वगैरे लागेल. पण जीवन असच असतं प्रत्येक क्षणात अनिश्चितता असते. म्हणून तर आपल्याला सांगितल जात वर्तमानाचा आनंद घ्या. आता थेट मुळ मुद्द्याकडे येतो. माझी शाळेच नावं *विद्याभवन प्राथमिक व हायस्कूल कळंब* हे होत.  शाळा आणि बालपण दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर चालू राहतात.
लहानपण होत ते शेवटी काही केल तरी. एक शांतता जाणवायची मला नेहमी माझ्यामधे. मला आठवतंय मला क्रिकेट हा खेळ मी इयत्ता तिसरीत असताना आवडायला लागला होता. मला त्यावेळी संघ वगैरे काही फार कळत नव्हतं. पण आॅस्ट्रेलिया देश क्रिकेटमधे आवडता होता माझा त्यावेळी. एकदा तर मी चक्क एका दादागिरी करणाऱ्या मित्राला प्लॅन करून चांगलाच चोपला होता. मला कधी मी शाळेत असताना कुठल्या गोष्टीची उत्सुकता अजीबातच नसायची. *जे चाललंय ते चाललंय.* एक गोष्ट माझ्या लक्षात आहे ती म्हणजे, जेव्हा जेव्हा अभ्यासातल काही घरच्यांना करून दाखवायचो तेव्हा तेव्हा मला नातेवाईकांकडून पैसे मिळायचे. अगदी पहिलीतून पाचवीत जाईपर्यंत माझ्या गल्यात तब्बल सतराशे रुपये जमा झाले होते. त्या पैशातून माझ्या आजोबांनी जाऊन माझ्याकरता सायकल आणली होती. त्यावेळी याच अप्रुप नव्हतं की जाण नव्हती हे माहीत नाही पण आज खूप आनंद आणि समाधान मिळतं ते सर्व आठवलं की.
             आणि आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचाय त्याशिवाय माझ बालपण अधुर ठरेल. *ती गोष्ट आहे माझं घड्याळ.* इ. चोथीमधे स्काॅलरशिपच्या परिक्षेसाठी माझ्या काकांनी मला टायटनच घड्याळ आणून दिलं होतं. तुम्हाला विश्वास नाही बसणार आज तब्बल बारा वर्षे उलटून गेली तरीही ते घड्याळ मी आजही दररोज वापरतो. *माझ्या घड्याळाशी एवढ्या दिवसांत मी काहीतरी नात आणि भावना जोडल्यात एवढं मात्र नक्की* शेवटी आजवर त्याने प्रत्येक क्षण आयुष्यातला माझ्यासवे जगला आहे. शाळा म्हटलं की, अभ्यास करावा लागायचा. पण त्या अभ्यासाने घाबरवल मात्र नाही. आणि आता जरा जाणता झालोय तर समोर आलेला प्रत्येक अभ्यासक्रम घाबरवतो आता. पावसाळ्यात आम्ही मुलं पायाच्या टाचांनी मैदानात घसरगुंडी करायचो तेव्हा त्यात बरेच जण पडायचे. मज्जा वाटायची. एकदा सरांच्याच मुलाला पाडल्यामुळे माझी खैर झाली होती. खर सांगायच तर त्या काळी मनाला कुठलाही थोतांडाचा विषय स्पर्शून जात नव्हता. *म्हणजे जे जस आहे ते मान्य करायचो आपण.* *खरेपणा असायचा पुरेपूर भरलेला ध्यानीमनी.* आत्ता बदललंय सर्व काही. अभ्यासाने काळजी वाढवली, विचारांनी कक्षेसोबत नाहकता दाखवली, निष्पाप मनाची जागा आज खोट्याने घेतलीयं.
               दिवस अपुरा पडेल त्या बालपणीच्या एकेक सुखद आठवणी लिहायला. कारण तिथे प्रत्येक सेकंद सुखाचा होता.

सिमाली भाटकर,रत्नागिरी
       शाळा म्हणजे विद्येचे एक  मंदिर.अशीच माझी नगर परिषद शाळा क्रमांक २० मुरुगवाडा,रत्नागिरी.प्रत्येका सारखे माझेही बालपण इ. ४थी पर्यंत दुसऱ्यांचे शेतातील बोरे चोरणे,चिंचा पाडण्यात मजेत   गेले.५वी पासून सुरू झाला तो खरा प्रवास.सौ.गोंदूताई जांभेकर महिला विद्यालयातून.परिस्थितीमुळे फार मोठ्या शाळेतून शिकता नाही आले.तिथल्या गुरुजणांनी अस घडवलं की शब्दांत मांडता येत नाही.त्यांनी शाळेत खूप सुविधा दिल्या.पण जेव्हा एस.टी.चा पास संपायचा तेव्हा मात्र रोज ८ कि.मी.पायी जात १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ८ ते १० वी पर्यंतचे शिक्षण तर रोजगार सांभाळून करणे नशिबी आले.उन्हाळ्यात इतर मुले सुट्टीचा आनंद घ्यायला मामाच्या गावाला जात.मी मात्र पुढील शिक्षणाची पुस्तके इत्यादी साठी पैशाची  तजवीज करण्यात व्यस्त असे.त्यासाठी रोज २ तास रतांबे फोडण्याचे काम करावे लागतात होते.तरी मी आनंदाने शिक्षण पूर्ण केले.नंतर आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला.

       शिक्षण पाहिजे तर त्यासाठी  पैसा लागतो.आईनं मला फाटक कॉलेजात प्रवेश घेऊन दिला आणि ठरवलं आता मागे वळून पाहायचे नाही.वयाच्या १३व्या वर्षी पासून कामाची सवय होती ती पुढे तशीच चालू ठेवली. डॉ.अनिकेत पाटील यांच्याकडे पंचकर्म शिकली व रुग्णसेवा घडली.अशा प्रकारे १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले.नंतर पैशांअभावी शिक्षण थांबले. इच्छा तिथे मार्ग म्हणी प्रमाणे मला आत्त्याने भक्कम पाठिंबा दिला.त्या म्हणत,तुला शिक्षणाची इच्छा आहे ना मग स्वतःचे हिंमतीवर शिक.देवाने बुद्धी दिली.दोन हात आहे,पाय सर्व दिले आहे ना.घरातच टॉनीक होते मग काय ? गद्रे मरीन एक्स्पोर्ट सारख्या कंपनीत आत्यांसोबत ३वर्ष  दिवस रात्री  काम केलेव मेधा देवस्थळी मॅडम यांनी दूरशिक्षण पध्दतीची माहिती दिली.अशाप्रकारे माझ्या आयुष्यात काही अशा व्यक्ती आहे,ज्यांनी मला आयुष्य जगण्याची पध्दती शिकवली.त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही.          
             २०११-१२ हे वर्ष माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेले.मला सेंट्रल एक्ससाईज इनक्म टॕक्स रत्नागिरी मध्ये कंत्राट पध्दतीने काम करण्याची संधी मिळाली.तिथल्या अधिकारी यांनी खूप मदत केली.विशेषतः दिप नारायण प्रसाद यांच्या रुपाने मला चांगले गुरू मिळाले.     बी.ए. भाग १ मध्ये प्रवेश घेतला असतानाच नौकरी देखील मिळाली. फार थोड्या माणसाच्या आयुष्यात अशी भाग्यवान संधी येते.
       शिकण्याची आवड असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत शिकू शकतो फक्त ते आत्मसात करण्याचे कौशल्य तुमच्यात असले पाहिजे.हे दिप सरांनी मला शिकवलं.बी.ए./एम.ए. समाजशास्त्र बहिस्थ पध्दतीने पूर्ण केले कला शाखेची विद्यार्थीनी असूनही टॕक्स,अकांऊट इत्यादीचे काम मला याच सरांनी शिकविले.
   ३१ऑगस्ट २०१७ ला माझी कंत्राट पध्दतीवरील माझे काम संपले व सर्वांना वाटले आता पुढे काय? मला तर माझ्या आयुष्यात अंधार दिसायला लागला.अशा परिस्थितीत दिप सर माझ्या पाठिशी भक्कम उभे राहिले.ते मला म्हणाले की टॕक्सचे काम करायला सीएच कशाला लागतो?तुला ते काम जमते तेच यापुढे कर.गेली ४-५ महिन्यात उत्तम पद्धतीने टॕक्सचे काम करत असून स्वतःचे नवीन विश्व निर्माण केले आहे.
          माणूस फक्त शाळेतच शिकतो असे नाही.माझे आयुष्य हीच माझी शाळा आहे.जिने मला खूप काही शिकवले आहे.
         माझी परिस्थिती माझी गुरू बनली. अपेक्षांचे ओझे,माझे हाल,माझी आंतरिक इच्छा,आयुष्याच्या पैंजेने जगायला शिकवले. कवी विं.दा.करंदीकर यांच्या कवितेतील ओंळीचा उल्लेख करत आहे.घेणाऱ्याने घेत जावे,देणाऱ्याने देत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.असेच मी देखील दुसऱ्यांना मदत करत आहे.
       आपल्या विचार गृपने हा विषय देऊन मला माझ्या आयुष्याची शाळा  लिहण्याची संधी दिली.त्याबद्दल मी आपली  खूप आभारी आहे.
संदीप भंडारे,अहमदनगर
कोणी तरी बोललेलं आहे ही आवडते मज मना पासून शाळा लाविते लळा ही जणू माऊली बाळा .
माझा शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंडोली तालुका श्रीगोंदा  7 पर्यंत शिक्षण घेतलं पुढे 7वि ते 10 पर्यंत मी सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा एरंडोली मुद्दे शिक्षण घेतले . इथं पर्यंत मी कधी शिक्षना च कधी टेंशन घेतल नाही .
शाळे मुद्दे मी सगळ्यात खोडकर आणि हट्टी होतो रागीट पण होतो . शाळेत सगळ्या मुद्दे माझा दबदबा होता कारण माझा चुलत मोठा भाऊ हा तिथे शिक्षक होता म्हणून सगळे मूल माझा मागे असत . आज पण तो दिवस आठवला की खूप छान वाटत थोडं वाईट पण वाटत की माझा रागात माझा हट्टी पण मुळे मी खूप मित्रांना गमावलं तीच चूक परत नको म्हणून मी स्वतःला पुर्ण बदललं. म्हणून आज पण मित्र नवीन जोडून ठेवायची भूक आहे ... शाळेतील बाल पण माझा साठी खूप छान आणि खूप कठीण होत . माझे वडील हे सरकारी अधिकारी होते तर मला त्यांच्या बर जास्त वेळ कधी भेटलाच नाही मग तो राग मी शाळेत काढत . आणि मग एक मस्त मित्र भेटला देवराम त्याच्या मुले मी खूप काही प्रमाणात बदलत गेलो. लहान पण किती दिवस अस्त हे जरी लिमिटेड असाल तरी ते नेहमी नेहमी यावं अस मला वाटत करण त्या वेळेस नाही कोणाला मिळवण्याची इच्छा आणि नाही कोणाला गमावण्याची भीती ...
.... खुप खुप आभारी सगळ्या ग्रुप सदस्यांना ...
खूप खूप बोलायचं आहे पण मी माझं शाळेतील बाल पण या अश्या तोडक्या मोडक्या शब्दात सांगितलं ... मला माझं दुःख दुसऱ्याला सांगायला नाही आवडत तरी ... जेवढं जमल तेवढं बोललो ...
प्रदिप इरकर ,पालघर
शाळेबद्दल काय लिहू तरी नक्की मी???
कारण मी जगलेले शाळेचे आयुष्य जसेच्या तसे (90℅) माननीय मिलिंद बोकील सरानी त्यांच्या शाळा या पुस्तकात वर्णन करून ठेवले आहे.(म्हणूनच की काय ते पुस्तक आतापर्यंत 9 वेळा वाचून झाले आहे).
शाळांमध्ये वर्णन असणारी आमची पण एक गॅंग होती.त्यात वर्णन केल्याप्रमाणे माझीपन एक *शिरोडकर* होती.(शाळा मध्ये वर्णन केलेले असल्याप्रमाणे माझ्या शिरोडकरणें मात्र मला कधी भाव दिला नाही ही गोष्ट थोडी वेगळी आहे पण😜).
बाकी (almost)सर्व शिक्षकांचा आवडता असणारा विद्यार्थी मी कधी फक्त अभ्यासाच्या नादला नाही लागलो.
सर्व विद्यार्थ्यांना हवे असणारे *मॉनिटर*हे पदही मला कधी मिळाले  नाही म्हणूनच की काय मॉनिटर ह्या पदावर असणाऱ्या बद्दल आमच्या ग्रुपमध्ये जरा जास्तच चीड होती.
व वर्गातील मॉनिटर पेक्षा जास्त मार्क्स मिळत असल्यामुळे साहजिकच तीचेपन माझ्याबद्दल काही चांगले मत नव्हते हे नक्कीच..त्यातच माझ्या शिरोडकरच नाव सरानी बोलणाऱ्यांची नावे लिहायला।सांगितल्या वर लिहून आम्हाला सर्वांनाच वर्गाच्या बाहेर काढून ग्राउंड वरचा कचरा उचलायला लागण्यास कारणीभूत अशी व्यक्ती मानून पहिल्या मधल्या सुट्टीत मित्रांसोबत मिळून मॉनिटरच्या सायकल च्या दोन्ही टायर मधील हवा काढणे तेवढ्यावरच मन न भरता दुसऱ्या मधल्या सुट्टीत त्या टायर च्या दोन्ही (valve-tube) खिशात घेऊन येणे हे सगळे कु-पराक्रम नकळत झालेच आहेत😢😢

मस्तीखोर असल्यामुळे दोन मुलींमध्ये बसायला मिळालेली शिक्षा(?😒) भोगलेलो असा काही रेकॉर्ड असता तर माझे नाव त्यात नक्कीच गोल्ड मेडल साठी स्पर्धेत असते इतके नक्की आहे😝

नावानेच *निर्मळ विद्यालय*असणारी आमची शाळा खरेच निर्मळ होती.आमच्या शाळेइतके ग्राऊंड खूप कमी शाळांना मिळाले असेल हे नक्की.व त्या ग्राऊंडचा आम्ही पुरेपूर उपयोग केला.
इयत्ता 10वीला असताना सुद्धा प्लस्टिकच्या बॉल ने *आबाधुबी* हा खेळ।खेळणारे आम्हीच होते😅

हा विषयच असा आहे की ह्यावर मिलिंद सरानी एक कादंबरी लिहिलंय त्यामुळे आतासाठी बस इतक्याच 2-3 आठवणी😢😢

पण हा लेख लिहताना संपूर्ण शालेय जीवनाचा slideshow डोळ्यासमोरून गेला त्याबद्दल समूहप्रशासकांचे आभार मानतो.

३ टिप्पण्या:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************