खरंच आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला आहे का ??(भाग:-१)

खरंच आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला आहे का ??(भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून


Source: INTERNET
मयुरी देवकर , पंढरपूर

     शाळेत असतानाच अगदी आठवी - नववीपर्यंत  आम्हाला मुल्यशिक्षण हा विषय होता .या मुल्यशिक्षणा  च्या तासाला जीवन जगण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या मुल्यांची शिकवण दिली जात असे .वक्तशीरपणा , नियमितता , संवेदनशीलता याबरोबरच तेव्हाच आम्हांला वैज्ञानिक दृष्टिकोन हे ही शिकवले .पण तेव्हापासून आजपर्यंतचा प्रवास पहिला आणि सभोवतालचे वातवरण पाहिले तर आजही प्रश्न पडतो खरंच आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला आहे का ? ? ?
            मुळात वैज्ञानिक दृष्टिकोन ही संकल्पनाच सुशिक्षित व अशिक्षित लोकांनाही समजली नाही असेच वाटते , कारण आजही आम्ही व्हॉटसअप , फेसबुक च्या काळात एखाद्या देवाचा मंत्र पुढील ग्रुप वर पाठवा , 10जणांना पाठवा , चांगली बातमी कळेल अन्यथा वाईट घडेल हे असलं फॉरवर्ड करताना पाहतोय आणि तेही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समुहाकडुन याचच नवल वाटतं .....आजही भोँदु बाबांचे स्तौम वाढलेलेच आहे....आजही आमच्या देशात अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यक्रमांच आयोजन कराव लागत आहे याचीच खंत वाटते ....  
                  कोणत्याही गोष्टीकडे चौकसपणे बघण्याची द्रुष्टी आपल्याला शास्त्रज्ञानी दिली . विज्ञानाचे अनेक शोध लागले त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कष्ट कमी झाले , नवनवीन संशोधनामुले नवीन गोष्टींची जगाला ओळख झाली .पण तरीही आज आम्ही विज्ञानाचे नियम , सिद्धांत मानायला तयार नाही आणि आजही चमत्कारांवर विश्वास ठेवतोय ....खरंच याला मग प्रगती म्हणायची का ? ? ? ?
         आज जे काही शोध लागले आहेत त्याआधीची परिस्थिती आपल्याला माहीत नाही म्हणून आपल्याला त्या शोधांची किम्मत नाही .उदा. ज्यावेळी शून्याचा शोध लागला न्हवता त्यावेळी दहा ही संख्या लिहायची असेल तर ती ती गोष्ट दहा वेळा लिहावी लागत होती , आणि  शोध लागल्यानंतर एकदाच दहा लिहिले की काम झाले आता यामध्ये वेळ , काम किती वाचले याची किम्मत त्याच काळच्या लोकांना माहीत आहे .... त्यावेळी शुन्याचा शोध लागला ही गोष्ट किती आनंददायक होती याचे मोल आज आपल्याला समजणारच नाही कारण आज आपल्या समाजातील लोकांचा दृष्टिकोनच नष्ट झाला आहे तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन कुठून येणार ? ? ?  
               हे सर्व आज बोलायचे आहे कारण येत्या 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे .थोर शात्रज्ञ डॉ .सी .वी .रमन   यांनी आपल्या संशोधनातून इ.स.1928 मध्ये रमन इफेॅक्टचा शोध लावला आणि या शोधाचे महत्व लक्षात घेवुनच 28 फेब्रुवारी 1987पासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो .आणि म्हणूनच आज आपण असे दिन साजरे करत असताना विज्ञान , विज्ञानाचे नियम , शोध यांवर चौकसपणे विचार करायला हवा आणि यातूनच संशोधनव्रुत्ती वाढीस लागेल आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच या दिनाचे सार्थक होईल .......
 

Source: INTERNET
जयंत जाधव , लातूर

   येणाऱ्या २८ फेब्रुवारी २०१८ सर्वत्र भारतीय वैज्ञानिक दिवस साजरा करणार आहेत.  सी व्ही रामन यांनी याच दिवशी आपला शोध जाहीर केला होता.त्यांच्या  स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या प्रसंगी एक शोकांतिका व्यक्त करावी वाटते ती म्हणजे आजच्या युगात देखील अंधश्रध्देचा जनमाणसावर प्रचंड पगडा आहे.अशिक्षित लोकांचे समजू शकतो पण सर्वात खेदाची बाब सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या लोकांमध्ये देखील अंधश्रध्दा खूप जास्त आहे आजही सुशिक्षित समाज सामाजिक माध्यमातून उदा. व्हॉटसअप , फेसबुकवरुन काॕस्मो किरण अमूक ग्रहावरुन पृथ्वीवर येणार आहे तेंव्हा आपले भ्रमणध्वनी बंद ठेवा, हनुमान,साईबाबा इत्यादी देवांचे छायाचित्रे पुढील ग्रुप वर पाठवा , 10 जणांना पाठवा , आनंदाची वार्ता  कळेल अन्यथा वाईट घडेल हे असले कोणतीही शहानिशा किंवा चिकित्सा न करता संदेश एकमेकांना पाठवताना पाहतोय हे आश्चर्यकारक  वाटतं ना?याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणावे का? Whatever happens in our life today, there is pre-accumulated, destiny, destiny, sin is ancestral.
Understand that this is a runaway.
This is not a substitute for pain, it says a scientific approach.
दुसरा एक मुद्दा येथे असा मांडता येईल तो विज्ञानाचा उपयोग व वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ वेगवेगळा ठरतो.सविस्तर स्पष्ट करून असे म्हणता येते की विज्ञानाच्या मदतीने  तथ्यांचा अभ्यास करून काही आधारांची निश्चिती केली जाऊन आधारांचा वापर करुन घडलेल्या घटनेच्या मागील  कार्यकारणभाव भाव माहिती करणे ही गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून अपेक्षित असते.पण आपण याकडे लक्ष देत नाही.आपल्या सुशिक्षित समाजाची परिस्थिती मेंढयाच्या कळपासारखी झाली आहे.मेंढीचा कळप पुढे मागे न पाहता एका पाठोपाठ खड्ड्यात  पडतात.अगदी त्याच सारखे एखादी गोष्ट का घडली? तीची सत्यता न तपासता लगेचच अंगीकार करतात.उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी २१ सप्टेंबर १९९५ मध्ये गणपतीच्या मुर्ती दूध पिऊ लागल्या होत्या.अफवांचे पेव ऐवढे पसरले की जो तो मी मुर्तीला दूध पिताना पाहायलाचे टि.व्ही समोर सांगू लागला.त्यात  मोठे राजकीय नेते,डॉक्टर ,प्राध्यापक सारखे सुशिक्षित महाभाग देखील पुढे होते.काय म्हणावे याला? वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक साधी घटना होती.दुधाने भरलेला चमचा ९० अंशाच्या कोनात झुकलेला अवस्थेत गणपती  मुर्तीच्या संपर्कात येताच मुर्तीचे दूध पिणे बंद व्हायचे.अगदी या उलट दूधाचा चमचा झुकवला तर वाटायचे की मुर्ती दूध पित आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील लोंकाचे औषधी दुकानात अमावस्येला लिंबू-मिरची दोरी लटकवणे,एम.बी.बी.एस,एम.एस. सारखे विद्या विभूषित डॉक्टर लोक त्याच्या हाॕस्पिटलच्या शुभारंभ करताना पंचाग व सत्यनारायण सारख्या  भाकड कथा ऐकवतात.
मानवाच्या आयुष्यातील पहिली शाळा म्हणजे त्याचे कुटुंब होय.याच वेळी पासून मुलांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवाजणारे उपक्रम राबविले पाहिजे.येथे एक सुजाण पालक श्री.चंद्रशेखर यांचे मते व्यक्तीला जन्मजात चिकित्सक वृत्ती ही असतेच. कोणतेही लहान बालक या क्षमतेवर तर  ते मुल जीवनास आवश्यक ते ज्ञान आत्मसात करत असते. आजच्या संपूर्ण शिक्षण पद्धतीने हे जन्मजात कुतुहूल नष्ट केले जाते व त्या जागी घोकंपट्टीने प्राप्त केलेले ज्ञान आणले जाते. या शिक्षण पद्धतीने माणसाची विचार करण्याची शक्तीच खुंटली जाते. अशी प्रवृत्ती एकदा बळावली की माणसाच्या मनावर अंधश्रद्धांचा पगडा सहज बसू शकतो. जर सुधारणा करायची असली तर शिक्षणपद्धती पासूनच केली पाहिजे.चंद्रशेखर यांच्या या मतावर नक्कीच विचार करावा लागेल.
एकुणच ईस्ञोचे अणुऊर्जा कार्यक्रम, अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांत आज आपण लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळवले आहे आणि संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. परंतु तरीही आपण १०० टक्के वैज्ञानिक दृष्टिकोन न अगीकारल्याने अजूनही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत मागे आहोत ही कटू पण खरी परिस्थिती आहे.
 प्रा. य. ना. वालावलकर यांच्या मते,अनेक महाविद्यालयीन प्राध्यापकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वावडेच आहे. एखाद्या तत्त्व-नियमाची चिकित्सा कशी करावी, ते वास्तवाशी कसे तपासून पाहावे, मूलभूत विचार कसा करावा, तर्कशुद्ध युक्तिवाद कसा मांडावा, याविषयी ते विद्यार्थ्यांना काहीच सांगत नाहीत. तसेच देव-धर्म-श्रद्धा यांनी सतत दुमदुमत असणारे आपले सामाजिक वातावरण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी पूरक नाही, हानीकारक आहे.


Source: INTERNET
सिताराम पवार , पंढरपूर

"आपल्या राज्यघटनेत ,मार्गदर्शक तत्वामध्ये सायंटिफिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही. खरं कितीतरी वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभांगत मटले आहे,"नवसाने जर पोरं होती,तर कशाला करणे लागतसे पती।"मणजे संतांनी सुद्धा हा वैज्ञानिक दृष्टीकोन मांडला पण ,लोकांनी ऐकलं नाही,आज आपण बडे,बडेराजकीय पुढारी देवांची नवसे सरकारी तिजोरीतून फेडतात. आज लहान वयापासून च मुलांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टीकोन बिंबवला पाहिजे.,
काही राजकीय लोक सगळे शोध भारतातच लागले मनतात, ते क्षणिक बोलून जातात पण त्यामुळे वैज्ञानिक लोकांना नामहोरण करतात, त्यांचे मानसिक खच्चीकरण करतात यांचे भान त्यांनी राहत नाही.खरे तर लहान मुलांचे वागणे हे अनुकरणीय असते, मोठे जसे वागतील तसे ती वागतात, पण एकदा मंत्री, पंतप्रधान जवळी मतांसाठी आपल्या संस्कृतीचा, पूर्वजांचा मोठेपनमध्ये आपली भावी पिढी नामहोरण करत आहोत याची जाणीव ठेवण ही काळाची गरज आहे.
वारकरी संप्रदायाच्या लोकांनी खरंच जे लोकांची जागृती करणारे अभंग पुढे आणावे ,जसे, तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात मानतात,"आली सिहस्थ पर्वणी न्हाव्या भठा झाली झणी।वरी वरी बोडी डोई। पापं गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण(कुंभमेळा संदर्भात).
अशाप्रकारे आपल्याला प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीकडे चौकस दृष्टीने बघितले पाहिजे नाहीतर येणारी पिढी या जगामध्ये टिकेल नाही तर जग एकीकडे आणि आपण मागेचं, मग आपली पुढची पिढी आपल्याला दोष देईल, ते टाळण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन बदलावा लागेल,

Source: INTERNET
पी . प्रशांत कुमार , अहमदनगर

   व्याख्यान आहे 26 फेब्रुवारी 2018 ला आणि विषय आहे विज्ञान आणि अध्यात्माचे अद्वैत
ॐ = mc²
आणि आश्चर्य म्हणजे व्याख्याते आहेत
अविनाश धर्माधिकारी(माजी सनदी अधिकारी,चाणक्य बंडलवाले)
ते या विषयावर व्याख्यान देणार असतील तर आश्चर्य वाटणे सहाजिकच आहे.. अध्यात्म महान आहे,आध्यात्मिक अनुभूती श्रेष्ठ आहे वगैरे म्हणावे पण उगीच वैज्ञानिक भाषेचा मुलामा देऊन दुसरंच काही सांगण्याचा अट्टाहास का?
IAS,IPS लोक अस का करतात? डार्विन थेरीबद्दलच अगाध ज्ञान मागेच एक माजी IPS आणि आजी मंत्री बोलले..
..तर एक सद्गुरू IIT त प्रवचन देताना fluent English madhe सांगतात, Water has memory...मी जर अशा प्रकारे पाहिलं तर त्या पाण्याचे तुमच्यावर वाईट आणि तशा प्रकारे पाहिलं तर चांगले परिणाम होतात..आणि लोकही माना डोलावतात
असले प्रकार पाहिले की *तेजातून तिमिराकडे* आपण चाललो तर नाही ना? असा प्रश्न पडतो.
आमचे डॉ दाभोलकर अशा प्रकारांना psudo-science म्हणायचे .. म्हणजे scientific शब्द वापरून पसरवलेल्या तद्दन आणि फालतू अवैज्ञानिक गोष्टी..
....भूत वगैरेंची बाधा झाली म्हणत राजस्थान सरकार विधान भवनात यज्ञ आणि पूजा करणार म्हणे..
असल्या प्रकारांना सरकारी पातळीला समर्थन मिळणं मला धोकादायक वाटत..
...
सार्वजनिक पातळीवर होणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार धोकादायक वाटतो ..

मला वाटत वैयक्तिक पातळीवर आपण वैज्ञानिक दृष्टिकोणाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे?
...आपल्या मुलांमधे जागरूकता आपण आणू शकतो..
का?कस?कशामुळे? असले प्रश्न मुलांना पडू द्या..
कुठली गोष्ट का करावी?त्यामागचं कारण काय असेल अश्याच छोट्या गोष्टींमधून जागरूकता वाढीस लागेल



Source: INTERNET
अनिल गोडबोले , सोलापूर

  तसे आम्ही (भारतीय किंवा त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन) खूप वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे समजतो..... आहोत का नाहीत हा वेगळा संशोधनाचा विषय!
तर आम्ही खूप वैज्ञानिक आहोत
कारण आम्ही मूल जन्माला आल की पहिल्यांदा ज्योतिष कडे जाऊन पत्रिका तयार करतो आणि त्यानुसार आकाशात असलेल्या ग्रहांची "शांती" करतो..
तोच पोरगा जेव्हा थोडा मोठा होऊन विचारतो की 'खरोखर आकाशात ग्रह तारे आपल्याला चांगलं किंवा वाईट घडायला जबाबदार असतात का?" तेव्हा आम्ही हाच दृष्टिकोन ठेऊन आपल्या कडील प्राचीन शास्त्रानुसार हे सगळं आहे.... अस छाती ठोकून सांगतो.

मग पोराच्या बारशाच्या मुहूर्ताच म्हणू नका, नवीन घर आणि दिशा याला धरून असलेलं "वास्तुशास्त्र" म्हणू नका,, अशी *शास्त्र* आम्ही पाळतो आणि एवढंच नाही पोरांनाही दाखवतो की आम्ही किती शास्त्रीय आहोत..

आम्ही मॉडर्न आहोत त्यामुळे पोरांचं करिअर एखाद्या बाबा कडे विचारतो आणि बाबा सांगतील त्या शाळेत घालतो... सायन्स साईडला पोराला घालण्याचा निर्णय सुद्धा घरातल्या एखाद्या गुरु ने दिलेला असतो


अरे एक गोष्ट राहिलीच की इतरांना नाव ठेवण्यात पुढे असलेले आम्ही ...  मुलांची नाव सुद्धा ठेवण्याचं काम जोतिशी तज्ञ याना देऊन ठेवलं आहे

आम्ही वैज्ञानिक आहोत म्हणून मग " डोक्यात (कपाळावर ) कुंकू लावल्याने आज्ञा चक्र कस पवित्र वेव्ह सोडत आणि भारतीय स्त्री कशी ग्रेट आहे किंवा बांगड्या का भराव्यात , स्वप्नात कोण आले तर काय होत असे मेसेज किंवा पुस्तक वाचून आपलं शास्त्र पाजळत असतो

आणि हो आम्ही मांजर आडवं गेलं म्हणून आता 9 पावलं माग जात नाही फक्त थांबतो जग्यावर.. आम्ही अजिबात अंधश्रद्धा पाळत नाही... पण पोरगा परवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेत खूप भारी दिसत होता ... त्यामुळे त्याची चिडचिड होत होती लगेचच आमच्या ही' ने मीठ मिरची ओवाळून टाकली आणि तो शांत झाला की लगेचच..

गाडी घेताना आम्ही लकी नंबर बघून घेतो कारण नुमरोलॉजि नुसार आमचा लकी नंबर आम्हाला माहीत आहे
मुलाच्या नावात एक्स्ट्रा "a' लावला आहे आम्ही त्याच स्पेलिंग बदललं आणि तो "शहाण्यासारक्षा" वागायला लागला...


आम्ही मुलाच्या लग्नाच्या वेळी त्याला अजिबात फोर्स केला नाही आज कालची पिढी आहे आम्ही मुलगी सुद्धा आमच्या ओळखी मधली, शिकलेली, आमच्या समाजातली बघितली आणि विशेष म्हणजे आमची काही बंधन नाहीत तिला ... तिच्या मनासारखे कपडे परिधान करू शकते ती फक्त सणावाराला तेवढं साडी नेसली पाहिजे, विशेष म्हणजे घरच आवरून 'नोकरी' सुद्धा करते...


आता वयोमानानुसार मातोश्री घरात बसून कंटाळतात... आई 'सत्संग' करायला जाते... तेवढाच तिचा वेळ जातो आणि मुलाना पण देवा धर्माच्या गोष्टी कळतात..

आता आम्ही फार काही खाण्या पिण्याची बंधन पाळत नाही, एरवी खातो 'सगळं'.. फक्त गुरुवारी मटण नाही खात आणि सोमवारी न चुकता मंदिरात जाऊन येतो

*आम्ही* वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आहोत पण ग्रहण काळात काही खात नाही आणि नंतर अंघोळ करूनच पिठलं भात खातो

अस खूप आहे... आम्ही आता पुढारलेले आहोत पण आहेत काही लोक "इतर" त्यांना यातलं काही कळत नाही

*we the people of India*

विज्ञान दिना च्या शुभेच्छा..

चला तर आता मला जरा थांबू द्या कारण 'आता 3 तास माझा वाईट काळ आहे कालच कॅलेंडर मध्ये वाचलंय.....



Source: INTERNET
संदीप बोऱ्हाडे , वडगाव मावळ , पुणे
प्रथमतःहा आज २८ फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिनाच्या
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

  विज्ञानामुळे आज अनेक नवनवीन शोध लागले गेले आहेत की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो..

आणि हो पुष्पक विमानाचा शोध लावणाऱ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा!!

डार्वीनचा सिद्धान्त चुकीचा आहे व तो शालेय पुस्तकातून बदलला पाहिजे आमच्या देशाचे  केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग सांगतात त्याचबरोबर न्यूटन चा नियम देखील चुकीचा आहे असे देखील हे महाशय आज बोलत होते..

 अंधश्रद्धा माणसाला गायीचे मूत्र प्यायला आणि शेण खायला प्रवृत्त करू शकते.. म्हणून तर आपल्या देशात वैज्ञानिकांची नाही तर बुआ, बापू, अम्मा, टम्मा, योगी, साध्वी, महाराज, महंत, फादर, उलेमा, सुलेमा यांची राजरोस पैदास सुरु आहे. इथे शनीच्या दगडातुन 'फक्त स्त्रियांसाठी घातक' किरणे उत्सर्जित होतात म्हणे.

  कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे, आणि इतरांनी तो आपण पाहिल्यासारखे वागायचे..सदैव वास्तव नाकारत जगायचे..

 माफी असावी कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर पण वास्तव स्वीकारा मित्रांनो.
ज्या देशात माचीसच्या काढीचाही शोध लागलेला नाहीये अश्या आमच्या भारत देशात..
  अंजनीने वायूचे वीर्य गिळले आणि तिच्या पोटी मारुती जन्माला आले यावर सहज विश्वास ठेवायचा. कारण तेंव्हा आपण पुढारलेले होतो ना.. म्हणूनच ते शुक्राणू "वरच्या तोंडाने" गिळले तरी अपत्यसंभव व्हायचा म्हणे.. अवघड आहे. मारुतीच्या घामाचा थेंब  एका सुसरीने गिळला आणि त्याला मकरध्वज नावाचा पुत्र झाला… पूर्वी आमचे देव आणि साधू संत विमानात फिरायचे म्हणे!!
आणि ज्या काळात दरवाजाला कडी लावायची सोय नव्हती त्याकाळी गणपतीला हत्तीचे तोंड बसविण्याची अवयवरोपण शस्त्रक्रिया अस्तित्वात होती, याचा आपण अभिमान वाटून घ्यायचा..

  या देशात इतके संत देव जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा आपला देश अधिक सुखी झाला असता..

यापुढे जय जवान , जय किसान आणि जय विज्ञान...हा अटलबिहारी वाजपेयी यांचा नारा देऊनच आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे.
आणि मला वाटते की वास्तव स्वीकारल्याशिवाय काहीच शक्य नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************