मी देखील एक माणूस आहे...फक्त ‘वेश्या’ नाही

मी देखील एक माणूस आहे...फक्त ‘वेश्या’ नाही

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

मी देखील एक माणूस आहे...फक्त ‘वेश्या’ नाही

Source: INTERNET
-अनिल गोडबोले,
 सोलापूर

          खर तर हा विषय जरा वेगळ्या दृष्टिकोनातून टाकलेला आहे. आज भारतात कोणीही अस्पृश्य नाही किंवा वाळीत टाकलेला घटक नाही. आज प्रत्येक जातीचा किंवा धर्माचा एक 'दबाव गट' आहे. अल्पसंख्याक हे देखील आपलं अस्तित्व टिकवून आहेत.
पण या देशात काही माणसं अशी आहेत की अजूनही खरोखर वाळीत टाकलेली आहेत. मी स्वतः या क्षेत्रात काम करत असताना खूप जवळून काही गोष्टी बघितल्या आहेत.

3 मार्च हा 'सेक्स वर्कर राईट डे'  आहे. आता या दिवसाची गरज का पडली? तर अजूनही भारतात लोकशाही असूनही या महिलांना अजूनही समाजाने वाळीत टाकलेलं आहे.

आता काही जण म्हणतात की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलंबची गरज काय मुळात? किंवा त्या समाजातील खूप मोठा धब्बा आहेत. काहीजण आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी बाईला वापरण्याचा प्रयत्न करतात.... वगैरे वगैरे..

आणखी एक पद्धत मी पहिली की जर एखादी विधवा महिला किंवा लग्न न केलेली महिला असेल तर तिच्या कडे संशयाने बघितले जाते. जर एखादी स्त्री पुरुषाबरोबर कामानिमित्त जरी सोबत असेल (लग्न झालेली सुद्धा) तरी लोक तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. या मधून होत काय... अनेक पुरुषांशी सम्बध असलेली किंवा नसलेली महिला देखील हे लोक 'वेश्या' या नावाने कुजबुजू लागतात.

या उलट काही महिला सर्व काही असताना भरपूर पैसे घेऊन 'कॉल गर्ल' बनतात.
मी आशा कुठल्याही महिलेविषयी बोलत नसून ... मी आशा महिलांविषयी बोलतोय ज्यांना जन्मजात हा 'धंदा' मिळाला आहे किंवा शिक्षण आणि कौशल्य नसल्याने या प्रकारे पैसे कमवावे लागत आहेत. हजारो लाखो रुपये मिळत नाहीत तर कधी कधी फुकट गिर्हाईक करावं लागतं.....

मी अशा महिलांबद्धल बोलतोय ज्यांना न कळत्या वयात त्यांच्या घरातल्या कोणीतरी विकलेलं असत आणि या गावातून त्या गावात प्रवास करत करत कुठे पोहोचतात तेच कळत नाही.

स्त्री ही वापरण्यासाठीच असते... या विचारातून आलेल्या पुरुषांना खरच बाई कशी दिसते किंवा काशी राहते याचा काही फरक पडत नाही. याना फक्त स्त्री पाहिजे..अशा प्रकारे 'धंदेवाली' म्हणून राहणाऱ्या महिलांबद्धल बोलतो आहे.

काही जण तर अजब युक्तिवाद करताना आढळतात, 'या महिला आहेत ना... म्हणून आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत'... पण तो त्यांच्या आया बहिणी ला या ठिकाणी पाहू इच्छित नाही.. अशा महिला..

यांच अस्तित्व कोणी मान्य केलं नव्हतं तर अधिकार, हक्क आणि कर्तव्य असे शब्द कुठे पर्यंत पोहोचणार..
त्यामुळे याना अस्तित्व नाही कागदोपत्री काही भाव नाही. आधार कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, सरकारच्या योजना नाही किंवा रेशन कार्ड नाही.

कधीही पोलिसांनी 'रेड' टाकायची आज उचलून न्यायचं जास्तच झालं तर कोर्टात हजर करायचं किंवा..  मग मिळेल ते आपल्या खिशात घालून वापरून सोडून द्यायचं अस चाललेलं आहे..

आता काही धोरणात्मक बदल झाले आहेत पण कायदे तर सरसकट सर्वाना त्रास दायक ठरण्याएव्हढे बदलून टाकले आहेत.
मानवी तस्करी विरोधी कायदा वेगळा आणि पोटासाठी व्यवसाय करणारी महिला वेगळी हे देखील पोलिसांना पटत नाही .

या साठी आज राष्ट्रीय स्तरावर संघटन उभे आहे पण महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन काही बदलत नाही
कोलकाता येथील 'दूरबार महिला संघ' या साठी खूप मोठं काम करत आहे.

मुळात शोषण, व्यसनाधीनता, आरोग्याची काळजी घेण्याची नसलेली ईच्छा, गुप्तरोग आणि एड्स याचा विळखा, गुन्हेगारी लोकांसोबत संबंध या मुळे आधीच या महिला बदनाम आहेत...

गेल्यावर्षी तर आम्ही कर्मचारी म्हणून संस्थे तर्फे कार्यक्रम करण्यासाठी गेलो असता ... पोलिसांनी धरपकड चालू केल आणि सोडून दिलं..
मुकी बिचारी कोणीही हाका... आशा पद्धतीने चाललेलं आहे

काही मुद्वे असे आहेत की ज्यांचा विचार करणं आवश्यक आहे.
40 वर्षा नंतर यांच अस्तित्व राहत नाही म्हणून मग यातल्या काहीजणी आपल्या हाताखाली मुली ठेवून उदरनिर्वाह करतात. या साठी जण जागृती करणे आणि त्याना पैसे साठवण्याचा महत्व पटवून दिले पाहिजे
मुलांच्या शिक्षणासाठी प्रबोधन केले पाहिजे.
सर्वाना एकत्र आणून सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे

कायदेविषयक संरक्षण दिले पाहिजे. (गुन्हेगाराला पाठीशी घालणे नव्हे तर अन्याय होण्यापासून वाचवणे)

आर्थिक साक्षरता देणे गरजेचे आहे

आरोग्यविषयक सेवा मिळणे गरजेचे आहे.
निरोध वापरणे या बाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

माणूस म्हणून जर मान्यता मिळाली तर त्या इतर व्यवसाय किंवा नोकरी करू शकतील
दृष्टिकोन बदलला तर समाजात सन्मान मिळेल आणि सन्मान मिळाला तर कुठलाही माणूस वाईट कृत्य करण्यासाठी पटकन धजावणार नाही

माणूस म्हणून फक्त समजून घेण्याची गरज आहे


Source: INTERNET
-प्रवीण

          खलील लेखात वेश्या असलेल्या एका मुलीच्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. यात कही आक्षेप घेतायेतील अश शब्द वापरले आहेत पण त्या ची गरज वाटली म्हणून तसे केले आहे

*वेश्या*
           नमस्कार, मला ओळ्खल का? नाही ओळखल वाटत. चल तुला एक क्लू देते , माझी ओळख हि सभ्य समाजातील एक शिवी आहे. कोणासाठी चमेली कोणासाठी ज्युली माझ्या केसात नेहमी गजरा असतो पण त्याला मजबुरीचा गंध असतो. माझ्या गालावर लाली असते पण तिला काळ्या भविष्याचा रंग असते. ओळखल? बरोबर ……मेरे को शरीफ लोग वेश्या बोलते है और पब्लिक में रंडी बोलते है .
पण इथे मी एक वेश्या म्हणून नाही तर एक वेश्याच्या पोठी जन्मलेली मुलगी म्हणून बोलयच आहे. तसा माझा जन्म हा वेश्या वस्ती झाला. मी जन्म घेतला ती  एक मुलगी म्हणूनच पण मला वेश्या म्हणून जन्म दिला तो या समाजानाच. समाज हा माझा बाप होता आणि वासनेची वृत्ती हि माझी आई. वासनेच्या तृप्ती साठीच मला जन्माला घातल गेल.माझ जन्म झाला पण बाप कुणाल बोलयच ते कळत नव्हत. खर सांगायचं झाल तर आमच्या dictionary मध्ये बाप हा शब्द फक्त शिव्या देण्यासाठी वापरतात आणि आमच्या बापाला आम्ही कस्टमर म्हणतो . काही लोक असतात जे अनाथ असतात आणि मी अनेक बाप असून पण अनाथ अहे. बाहेर अस ऐकलय कि मुलीना जन्म दिला कि तिला लगेच मारतात म्हणे. काय ते स्त्री भृणहत्या म्हणतात ना ते. पण आमच्या वस्तीत तस नसत मुलगी म्हणजे पैसा. इथे ह्याबाबतीत थोडा मान (?) आहे. पण अस मनापासून वाटत कि भृणहत्या बाहेर पाप आहे पण ते जर आमच्या वस्तीत केल तर ते पुण्यच ठरेल .
लहानपणी मी इतर मुलीन पेक्षा खूप हुशार होती ते पण शाळेत न जाता . ज्या वयात इतर मुलीना ना चोकलेट चे रेट सुधा नीट कळत नव्हते. पण मला माझ्या आईचा रेट माहित होता.
ज्या वयात इतर मुली आईच्या खुशीत निजतात त्या वयात मी मात्र कस्टमर ची चादर गरम करत होतॆ.
ज्या वयात इतर मुलीना बोलायला शिकवलं जात होत त्या वयात माल इशारे शिकवले जात होते. आज काळ भाषे वरून भांडणारे अनेक नेते आहेत पण आम्हाला त्याच काय घेण देन. आम्ही तर इशार्यानीच बोलवतो.
ज्या वयात रात्र जागून अभ्यास करायचा होता त्या वयात रात्री बस stop वर मी उभी राहत होती.
ज्या वयातहातात मेंदी लावून बोहल्यावर चढायच होत त्या वयात मी गालावर लाली लावून कस्टमर ला कस खेचायच ह्याचे डावपेच आखत होती .
ज्या वयात मुली त्याच्या सख्या बरोबर मधुचंद्राची रात्र अनुभवत होती त्या वयात मी  लॉज वर कोण्या मर्दा (?) ची रात्र रंगीन करत होते.

ज्या शारीरावर केवळ माझाच हक्क असायला हवा माझ्या मर्जी शिवाय जिते कोणीही पोहचायल नाही हव. तेच शरीर  आज मर्दांच्या (?) ,दलालांच्या , ह्या समाजांच्या हातच बहुल झालाय . आजकाल आत्महत्या करायची नविनच फॅड आलय. परीक्षेत नापास करा आत्महत्या , प्रेमात अपयश करा आत्महत्या , नोकरी नाही करा आत्महत्या , कर्ज फिटत नाही करा आत्महत्या ……….  अरे अत्म्हत्येचा  विचार करण्या आधी जर एकदा माझ आयुष्य बघा …… जेव्हा एका पुरुषाने अल्पवय असतानाच माझ चरित्र हनन केल , जेव्हा  पहिल्यांदा एक पुरुष वासनेन सार्या शरीरावर नको नाको  तिथे  त्याचा घाणरेडा स्पर्श करत होता, ज्यावेळी अजाण  वयात मी आई झाले , ज्यावेळी माझ्या समोरच माझा भाव ठरवला जात होता त्यावेळी मी पण आत्महत्या करायला हवी होती पण नाही केली .ह्या पेक्षा पण जर तुमच आयुष्य खडतर असेल तर करा आत्महत्या.
आपण रागात म्हणा किवा मस्करी म्हणा एखाद्या ला "रंडीच्या " अस सहज बोलून जातो पण त्या शब्दाच्या खाली दडलेलं वास्तव कोणी पाहत नहि. समाजातल्या कामवासनेच्या तृप्ती साठी जन्म या समाजानेच दिला , त्याच समाजाने मला 'रंडी" हे नाव दिल. पापी पण मलाच ठरवल . स्वताला मर्द म्हणवणारे येतात माझ्याकडे मोकळ व्हायला , मी तर पोटासाठी शरीर विकते पण तो मर्द………  आणि पापी पण मलाच ठरवल .

आजही कुठल्या जुलीने , चामेलीने , माझ्यासारख्या मुलीने जन्म घेतला असेल , आज कोणीतरी मनाविरुद्ध शरीर विकत असेल , कंठत असेल, रडत असेल, मरणाची वाट बघत असेल. आता वय झालय , जवानी होती तोवर मार्केट मध्ये भाव होता पण आता मरणाची वाट बघत दिवस काढतेय.
धन्यवाद.



Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे
     ‎
     खरंतर माझ्या मते या स्त्रीयांना सर्वप्रथम "वैश्या" असे संबोधू नका.
कारण माणूस वाईट नसतो .. परीस्थिती वाईट असते..
आणि तिच माणसाला वाईट काम करण्यास भाग पाडते.. ..
नाहीतर मला सांगा .. कोणत्या स्त्रीच्या कपाळावर जन्मताच लिहीले असते की.. ही स्त्री "वैश्या" आहे.. नाही ना.. पण परिस्थिती तिला तसे करण्यास मजबूर करते..

    अमेरिकेत एखादी महिला जर वेश्याव्यवसाय करत असेल तरच तिला वेश्या मानतात आणि जर तो व्यवसाय सोडला तर तिला सामान्य स्त्री मानतात
आपल्या भारतात तसे नाही.

 भारतात गाईला " राष्ट्रमाता " म्हणून संबोधल जात तर पोटाची खळगी भरणाऱ्या मजबूर " स्री " ला वेश्या . पाळी आलेली " स्री " मंदिरात चालत नाही का तर दगडाच्या देवाला " विटाळ" होतो पण तीच " स्री " त्याच मंदिरातील पुजाऱ्याला एकटी सापडली तर तो मजेत तिचा उपभोग घेतो .
या देशात गाय नावाचे जनावर माता होऊ शकते आणि स्त्री वेश्या .गायीला देशात संरक्षण आहे पण स्त्री नाही
अवघड आहे बाबा या आपल्या भारत देशाच.

  वैश्या ह्या शब्दाकडेच लोक किती तुच्छतेने बघतात.अस
का कारण ह्या स्त्रीया आपला देह विक्री करतात म्हणूनअशा स्त्रीया॑ना आपल्या समाजात तुच्छतेने पाहीले जाते
पण मग अशा स्त्रीया॑कडे जे पुरुष जातात त्याना॑ही तुच्छच
लेखल पाहीजे पण अस होत नाही तुच्छ त्या वैश्येलाच ठरवल
जात तीच्याकडे जानार्या पुरुषाला नाही.

तुकोबारायांचे शिलभ्रष्ट करण्यासाठी रामेश्वर भटांने एक 'वेश्या' कलावंतीन तुकोबाकडे पाठवली होती.
तेंव्हा तुकोबारायांनी
"पराविया नारी ! आम्हा रखुमाई समान!!"
असे सांगून त्या स्ञीला रूक्मीनीचा दर्जा दिला.

 कोणत्याही स्त्रीला स्वतःहाचा देह विकायला आवडत नाही..
मजबुरी , नकळत , दलाल , पळवुन, फसवुन ,जबरदस्ती यांमुळे या स्रिया या व्यवसायात ओढल्या गेलेल्या असतात..
 
अशा स्त्रीया॑शी समाजात
कोणी लग्नकरत नाही त्या॑ना कोणीही आपल मानत नाही
का तर ??
ती देह विक्री करणारी स्त्री आहे म्हणून पण तीदेहाने
जरी अपवित्र झाली असली तरी ती मनाने पवित्रच आहे
तिच्या डोळ्यात आईच वात्सल्य आहे प्रेमाची छाया आहे
आणि हे जेव्हा त्या स्त्री मध्ये आपण हे पाहू
तेव्हाच तिला समाजात मान मिळेल.

 आज आपण आपली मानसिकता बदलणार आहोत का?? आजही मी स्वतःहा सुद्धा एखादया वेशेबरोबर लग्न करू शकत नाही.. आपल्या ग्रुपमध्ये देखील कोणी नसेल..का आहे कोणी परंतु लग्न नाही पण कमीत कमी तिला एका स्त्रीच्या नजरेतून तरी जरूर पहा..ती पण एक माणूसच आहे. पण आपल्या या महान भारतात मला तरी या स्त्रीला स्त्री म्हणून माणूस म्हणून बघितले जाईल असे अजिबात शक्य नाही कारण आम्ही महान भारतीय आहोत..ती कायम वेश्या आहे आणि वेश्याच राहील.


Source: INTERNET
-संकेत अ. पवार,
 मुंबई

   वेश्या, रूपाजीवा, पण्यस्त्री, गणिका, वारवधू, नगरवधू ,लोकांगना, नर्तकी,अश्या अनेक नावांनी तिला ओळखले जाते.तर हा पेक्षा हीन नावांनी सुद्धा दिला कधी-कधी बोलले जाते. विविध लोकांच्या शय्या सजवणारी म्हणजे ”वेश्या”. पूर्णपणे मानव असणारी हि स्त्री. पण मानवजातीपासून नेहमी दूर असते. हीन समजुती मुळे तिची वस्ती सुद्धा गावाबाहेर कुठे लांब,अगदी कोपऱ्यात ,अडगळीत असते . जीथे सकाळच्या सूर्यप्रकशात कोणी पाउल ठेवत नाही तिकडे रात्री ह्याच काही सभ्य लोकांचा दरबार सुद्धा भरत असतो. “वेश्या एक स्त्री”. मजबुरी मुळे खचलेली. समाजाच्या बंधनांत अडकलेली, मनानी आणि शरीराने पूर्णपणे तुटलेली अशी स्त्री.

भारतात बेश्या स्त्रीला खूपच हीन समझले जाते.खूप खालच्या स्तराची बाई म्हणुन तिला ओळखले जाते. पण तिच्या ह्या परिस्थितीला किती आणि कोणती करणे आहेत हे आपण समजूनच घेत नाही. पैसे मिळवण्याचा हेतू मनात ठेवून स्वशरीराचा उपभोग एकाहून अनेक पुरुषांना देणारी स्त्री हिलाच वेश्या म्हंटले जाते.पण खरच वेश्या असणे खूप वाईट असेल का??कारण आपण महाराष्ट्रीयन जरी ह्या वेश्याव्यवसायस हीन समजत असलो तरी. आशिया खंडामधील सर्वात मोठ 2 नंबर वर असणारा वेश्याव्यवसाय हा म्हणजे “बुधवारपेठ”  हि आपल्या महाराष्ट्र मध्ये आहे. मुंबई मध्ये सुद्धा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालत असतो. पण मग प्रश्न असा पडतो कि वेश्यानां  समाजामध्ये दुय्यम स्थान का दिले जाते.  खर म्हंटले तर एक स्त्रीचा वापर सभ्य समाज करून तिला मात्र वेश्या नावं देत . पण ती स्त्री सुद्धा एक माणूस आहे आपण हे विसरतो.  ज्याप्रमाणे आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार त्यांना आहे. *वेश्या बनने हि हौस नसून मजबुरी आहे* . परिस्थिती  त्यांना हे काम करायला भाग पाडते  हे आपण लक्षात घेत नाही.
*आपल्या सामाजिक आणि आर्थिक असफलते मुळेच  एखादी स्त्री वेश्या बनते अस माझं  वैयक्तित मत आहे. काही सभ्य समाजाच्या अभिमाना मुळे  किवां  कर्मकांडा मुळे भरडली जाते ती  फक्त स्त्री. *“स्त्रीचा उपयोग करून स्वतः पवित्र, मात्र स्त्री हि वेश्या”*, *स्वतः मानव आणि वेश्या दानव”*  अश्या आपल्या मानसिकते मुळे आज वेश्यानां आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.   कुठे *देवदासी पद्धत*, तर कुठे *कृष्णादासी* पद्धत, तर कुठे देवांना नवसाला सोडणाऱ्या बायका, ह्यानां  सुद्धा शरीर व्यवसाय करण्यासाठी सोडले जाते.  हाच सभ्य समाज त्यांना अश्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडत असतो. *कधी धर्माच्या नावाखाली तर कधी परिस्थिती मुळे वेश्या बनते ती केवळ एक स्त्री*.

सध्या अनेक NGO , सरकार ह्यांनी वेश्याची हि जीवघेणी परिस्थिती जाणली आणि वेश्याव्यवसाय ह्या वर बंदी घातली. तरी सुद्धा आजही हा व्यवसाय लपून छपून चालत आहे.  वेश्या स्त्रीला माणसा मध्ये बसवण्याचे काम अनेक लोकांनी केले आहे. काही वेळा धर्मानी सुद्धा वेश्या ला समान वागणूक देण्यामध्ये पुढकार घेतला.   
*दुर्गा पूजे वेळी  वेश्याच्या अंगणातील माती घेवून दुर्गा मूर्ती बनवणे हि सुद्धा एक क्रांती म्हणावी लागेल.* तसेच तथागत बुद्धांनी २५०० वर्ष आधी ह्या वर आपले तर्कवादी मत मांडले होते. आम्रपाली  नावाची एक गणिका, सुंदर स्त्री एकदा बुद्धांना भेटायला येते. तेव्हा अनेक भिक्षु तिला बुद्धांजवळ जावून देत नाही.कारण ती एक वेश्या असते. *तेव्हा बुद्ध उपदेश देतात.कि, वेश्या (गणिका) बनण्यामागे केवळ ह्या स्त्रीचा दोष आहे का ??, ह्या समाजाचा दोष नाही का? , जर हि स्त्री वेश्या असेल तर, तिला वापरनारा तो समाज सुद्धा दोषी आहे. पुढे बुद्ध सांगतात कि,    *“स्त्री तेव्हाच चारित्र्यहीन असू जेव्हा पुरुष चारित्र्यहीन असेल”*.खरच खूप तर्कवादी विचार आहेत  हे. कारण स्त्रीला वेश्या हा एक पुरुष करतो.मात्र स्वतः  नेहमी पवित्र असतो पण कलंक लावतो तो स्त्री ला.  सर्वांनी हे समजून घेतले हवे कि वेश्या हि सुद्धा आपल्या सारखी सामान्य स्त्री आहे. तिच्यावर सूर्याचा समान प्रकाश पडतो, पावसाचे समान पाणी तिच्यावर पडते ,हवेचे समान स्पर्श तिला होतात. मग जर निसर्ग कधी वेश्या सोबत भेदभाव करत नाही.मग आपण मानव का बरे भेदभाव करत असतो. वेश्या हि एक मानव आहे म्हणूनच मानव ह्या नात्याने आपण तिला ह्या परिस्थिती मधून बाहेर काढणे हि आपलीच जबाबदारी आहे.  ज्या ज्या मानवी सुविधा एखाद्या स्त्रीला लागतात त्या पूर्ण करण्याचा आपण मिळून प्रयत्न केला तर ह्या पुढे भारतात खूप कमी वेश्या जन्माला येतील. ह्या सोबतच तर्कवादी आणि विज्ञानवादी विचार करणे आणि  स्त्रीकडे वाईट नझरेने न  बघणे ह्या सारख्या गोष्टीनी सुद्धा वेश्यांवृत्ती ला आपण संपवू शकतो.



Source: INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

           विषयाची गांभीर्यता फारच तीव्र आहे. कारण समाज  या गोष्टी समजून घेणं तर दूरच पण कुणाच्या तोंडून ऐकायला जरी लागला ना तरी त्या व्यक्तीला नावं ठेवतो. फार महत्त्वाचं सांगायच म्हटलं तर आपल्या समाजाला *तन आणि मन या गोष्टी वेगळ्या आहेत* हे लक्षात येतच नाही. तनाचा उपयोग फक्त बाह्यतःच असतो. पण आपण बघितलं तर लक्षात येतं की , सर्व दृष्टीने आपण बाह्यांग गोष्टींनाच महत्व देतो.
               स्त्री मनाची केली गेलेली विटंबना किंवा तिच्यावर झालेल्या अन्यायाकडे फार तर लाखातला एखादाच संवेदनशील दृष्टीने पाहतो. आणि तिची मानसिकता सहज करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला वाटेल अशे एखाद-दोन पुरुष आहेत का की जे वेश्यांना एक माणूस म्हणून समजून घेऊ शकतात, तर आहेत. काल कुणीतरी प्रश्न केला की, आपली मानसिकता अजूनही अशीच आहे की जेणेकरून आपण *वेश्येबरोबर लग्न करायला तयार होणार नाही. हे खर असेल तर बदल घडवणाराही कुणीतरी एक असतो.* तो कोण? हे वेळेलाच ठरवू द्या. पण एक माझ मत म्हणून सांगतो, आपण एखाद्या वेश्येला जरी काहीच देऊ शकत नसलो तरी किमान *मानसिक आधार तर नक्कीच देऊ शकतो.* *आपण आयुष्यभर एक मित्र या नात्याने फक्त सहानुभूती द्यायची आहे.*
          मी मान्य करतो, कदाचित ही गोष्ट अवघड असेल पण जर दृष्टिकोन *बदलाच्या वाटेवरच आम्ही चाललो नाही तर बदल घडणार कसा?* बदलाच्या दिशेने एक पाऊल मी टाकलं तर सुरूवात नक्कीच त्रासदायक ठरेल पण येणाऱ्या भावी पिढीला आपण काहीतरी योग्य देऊ शकू. बाकी एवढंच सांगावस वाटतं की, तुमच्या-आमच्या प्रमाणेच *वेश्यांना सुद्धा एक मन आहे ज्यात फक्त आणि फक्त माणूस आहे.*
धन्यवाद!



Source: INTERNET
-राज इनामदार,
 पंढरपूर

    *एक तवायफ (वेश्या) ने आत्मकथा लिखनेकी क्या सोची*

*शहर के सारे शरीफोने खुदकुशी करली*

वेश्यागमन करनारी व्यक्ती वेश्यपाशी जावून आपली कामवासना शमवून परत समाजात सभ्यवक्ती म्हणुन जगत असेल तर ...आपली पोटाची , परिवाराची खळगी भरण्यासाठी अथवा इतर कुठल्याही मजबूरीने या व्यवसायात ओढ़ल्या गेलेल्या महिलेला सुधा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे
ती माणूस पहिल्यादा आहे .....



Source: INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

     " राम तेरी गंगा मैली
      हो गई पापीयो के पाप
      धोते धोते "
तुम्ही समदे जन म्हणत अश्याल म्या कोन, इशय कणचा आन म्या हिंदी गाण कायले गाऊन राहिली.पर काय कराव जमानाच तसा झालाय.माय नाव चंदा.कोन रंडी म्हणत कोन रातो की रानी तर कोन गरम जवानी काय पण म्हणतात.गंगा नदी मायचा जनम हिमालयात होवून बंगाल उपसागरात जाऊन तीच आयुष संपत म्हणे. हर माणूस आपल पाप गंगेत धुत.समद्याचे पाप धुत ती माञ खुद्द घाण झाली हाय.आमच पण आयुष गंगेवाणीच हाय.आजच्या दिसात कोणतच कस्टमर म्हणा की म्होरले तुम्हा लोकांच्या मार्डन भाषेत ससायटीत आम्हां धंदा करणाऱ्या बायांना माणूस म्हणून कोणीच पायत नाय,समद्याच्या तोंडात एकच नाव असत ते म्हणजी वेश्या नाय तर रंडी.
पण आमी काय मायच्या पोटात वेश्या म्हनून जन्माला नाय आलो.मजबुरी नाय तर पापी पोट भरायसाठी असल्या धंद्यात आमी लोटले जातो पण आमच्या मरजीनं यत नाय.आव दुनियेतल्या कोणत्याच बायला असल आवडणार नाय.तस या दुनियतली कोणतीच साधी घरगुती बाई स्वतंत्र नाय कारण निसरगांन तीला बनवल तस. तीला शरम वाटते तसल्या त्या स्वतंत्र चे सोबाजीची.पण आमच्या सारख्या वेश्या धंद्यातल्या बाया नाय घाबरत कणच्याच समाजाच्या आन् धरमाच्या बंधनाले.तेच्यापासून कोसो दूर असत्यात आमी.
तस सांगायला बसले तर महाभारत पेक्षा आमची कहानी मोठी होईल.आज समदीकड काय दुनियेतले बायाचा डे साजरा करत आसताना मला इक सवाल इचारा वाटतुया. तुमचा ती समाज आमाला हीन,खालच्या टाकणीतील म्हणतात आन् याच बायाकड तुमची वरिष्ठ मंडळी पैक दिवून कईक राती आमच्या जवानीच भुकेल्या लांडग्यावानी लचके तोडून येतात ते चांगल्या कुळातल का? याच कुणाकड बी काय उत्तर नाय.माय इकच इनंती हाय आमाला पण इक माणूस समजा.



Source: INTERNET
-डॉ. कौस्तुभ कल्पना विलास

हो, पण कितीजण हे समजतात आणि अंमलात आणतात? बोलण्यासारखे भरपूर आहे, इतिहासापासून वर्तमानापर्यंत, आणि सामाजिक-राजकिय-आर्थिक परिघ आहे. कुंटणखाण्यात विकलेल्या, पळवून आणलेल्यांपासून ते स्वमर्जीने व्यवसायात आलेल्या high profile escorts परियंत बरेच आहे. भले ते न जाणा पण परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल? हा विचार महत्त्वाचा वाटतो.
    मुळात लैंगिकतेला हिन लेखून जेथे जेथे पाप वा घाणेरडी गोष्ट समजून दमन केले जाते तेथे तेथे संबंधात अनैतिकता, बलात्कार, वेश्याव्यवसाय वाढतो. घरंदाज स्त्रीया संभोगात आनंद घेण्याऐवजी कर्तव्य म्हणून निरसपणे करतात परिणामी गरिबांच्या मुलींना श्रीमंतांच्या सुखासाठी वेश्याव्यवसायात आणले जाते. हि एक बाजू आहे जी विचारात घेतली पाहिजे. संभोगाला हिन लेखणं वा त्याबद्दल अनभिज्ञ असणारी स्त्री म्हणजे घरंदाज व त्याबद्दल ज्ञान असणारी स्त्री म्हणजे चारित्र्यहिन असल्या जुनाट, चुकिच्या व टाकावू संकल्पना सोडल्या पाहिजेत. योनीसुचितेचा सोळाव्या शतकातली मानसिकता सोडली पाहिजे.
    दुसरे म्हणजे वेश्याव्यवसाय पुर्णपणे बंद करणे जलळजवळ अशक्य आहे. पण तो बेकायदेशीर असल्याने त्यातील मुलींचे अस्तित्व कोणत्याही सरकारी कागदपत्रावर नसते, भोगण्यापुरत्या त्यांचे शरिर उपलब्ध असते पण माणूस म्हणून त्यांचे अस्तित्व नसते. कारण ते taboo असतात. मग जर हा व्यवसाय कायदेशीर केला तर? परवाने देता आले तर? हे ऐकताच बर्याच जणांचे कान टवकारतात. ते म्हणतात कि याने चुकिच्या गोष्टीला आपण सरकारी परवानगी देत आहोत. त्यांचे म्हणणे चुकिचे नाही. पण याची दुसरी बाजू हि आहे कि कायद्याच्या कक्षेत एखादी गोष्ट आली कि ती कायद्यानुसार चालवायचे बंधन येते. म्हणजेच त्यातील मुलींचे प्राणांतीक होणारे शोषण बर्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते. या बाजूचाही विचार व्हावा. मुलींच्या वयापासून त्यांच्या सेवा नाकारण्याच्या अधिकारापर्यंत बर्याच गोष्टींचे कायदेशीर संरक्षण मिळू शकते. एक अपवाद म्हणून त्या मुलींच्या सुरक्षेसाठी व शोषण कमी करण्याच्या दृष्टीने याचा गांभीर्याने विचार व्हावा असे वाटते.



Source: INTERNET
-रामदास हांडे,
पुणे

पुण्यातील बुधवार पेठेचा
रस्ता तुम्हास ठाऊक आहे
कधी माणूस म्हणुनी भेटा मला,मी देखील एक माणूस आहे.

तरुण येतात म्हातारे येतात
येतातही बिना लग्नाचे
देहावरती स्वार होऊनि
लचके तोडतात अब्रूचे

वेदनांचा तो करून आवाज
तू Enjoy करत घेत आहेस
कधी माणूस म्हणुनी भेट मला,मी देखील एक माणूस आहे,

इच्छा नाही माझी इथे
इशारे तुम्हास करण्याची
पण मजबुरीने गळा आवळलाय,
सवय पडलेय गुदमरण्याची

ग्राहक म्हणुनी सगळे येतात,,, तुम्ही माणूस म्हणुनी या
माणसातल्या माणुसकीचे
दर्शन मजला द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************