मी आदिवासी की डिजीटल भारताच्या सरकारचा 'वनवासी'!

🌱वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुपवरून
📄 आठवडा 20 वा 📝
17 मार्च ते 23 मार्च 2018
Source: INTERNET

मी आदिवासी की डिजीटल भारताच्या सरकारचा 'वनवासी'!

प्रविण,मुंबई:
आदिवासी समाजाला फार जवळून पहिल आहे. महाराष्ट्रातील ठाणे पालघर भाग ओडिशा मधील बालेश्वर मयुरबंज भाग आणि झारखंड मधील सारंडा फारेस्ट भागातील लोकांसोबत अनेक दिवस राहून त्यांची अवस्था पहिली आहे. अशाच एका आदिवासी तरुणांशी चर्चा करताना सुचलेली कविता.
सरकार अणि नक्सलवाद च्या कात्रीत सपडलेला आदिवासी तरुण मंगतोय प्रश्नांचे उत्तर....

निवडनुकांत केले मतदान
बाळगुण  विकासाची आशा नेत्यांच्या उराशी|

आमच्या मतांवर बांधले त्यांनी बंगले
म्हणून उघड्यावर राहतोय हा आदिवासी||


गावागावात शाळा अनेक जाहल्या
वाटल शिक्षणा तू मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेशी|

पण अजुनही कचरतोय शाळेत पाठवायला मूल मुलीना
म्हणून अशिक्षित राहिला हा आदिवासी||

आमच पोट आहे मजुरिवर
संबंध फ़क्त नावापुरता सरकारी धान्याशी|

हजारो टन धान्य सडतय सरकारी गोदामी
तरीही उपाशी राहिला हा आदिवासी||


सरकारी दरबारात मान फ़क्त builder loby ला
तिथे सदैव नांदत असते थैलिशाही|

मला अन्यायाची जाणीव होउनही मी लढत नाही
म्हणून आजही दरिद्र्यात जगतोय हा आदिवासी||

नेत्यां कडून तर नेहमीच चालू आहे आमची अवहेलना
मग आता आशा बाळगू  कुणापाशी|

नक्षाली पण घेताहेत आमचेच बळी
मग असाच मरत राहिल का हा आदिवासी ?
Source: INTERNET
जयंत जाधव,लातूर:

  "आदिवासी शहर मे आया
   आदिवासी गाव से आया
   उसे कोई समझ ना पाया
   जंगल से हरीयाली लाया
    पहाडोंसे संगीत लाया
   पर उसे कोई समझ ना पाया"
             संकलन-गुगल

शहरी संस्कृतीपासून अगदी दूर व वेगळे राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी. सामान्यपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व शिक्षित समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात.आजच्या विकासाच्या युगात समाजातील सर्वात जास्त आदिवासींकडे दुर्लक्ष झाले आहे.एकीकडे विकासाची अथांग गंगा प्रवाहित झालेली  असताना दुसरीकडे आपले  आदिवासी बांधव एक वेळचे जेवण,छोटे सुख देखील त्यांना मिळत नाही. सुख-आनंद वा विकास हे त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरले आहे.
स्वार्थ हाच परमार्थ स्वभाव असलेल्या आजच्या सुशिक्षित समाजाची पक्की मानसिकता झाली आहे की आदिवासी जंगलात,दरी खो-यात राहिला तर काय फरक पडणार?
काही महिन्यांपूर्वी सध्याच्या सरकारने अगदी ताठ मानेने अभिमानाने  देशातलं पहिलं डिजीटल गाव म्हणून  हरिसाल गावाची निवड केली होती, त्याच गावापासून अगदी जवळ  अंतरावर राहणाऱ्या आदिवासी समाजावर भयानक  स्थिती उद्भवली आहे.रोजगार हमी योजनेत काम करणारे कित्येक आदिवासी मजूरांना त्यांची मजूरीच ३-४ महिण्यात दिली नाही. शहरी भागात १ महिना पगार थकला तर किती हाल सोसावे लागतात मग मेळघाट सारख्या दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे काय हाल होत असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.तेथील आदिवासींपैकी अशोक मन्नू धिकार या आदिवासी तरुणाने शेवटी नाईलाजाने थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे   म्हणजे एकीकडे फडणविस व मोदी सरकार भारत डिजिटल होत आहे याचा  प्रचंड गाजावाजा करत आहे पण त्याच ‘डिजिटल इंडिया’  लागून असलेल्या ‘भारत’ देशातील आमचा आदिवासी बांधव मात्र आजही अंधारात थोडासा प्रकाश मिळविण्यासाठी धडपडत आहे.
ख-या आदिवासींचे हक्क ज्या लोकांनी बळकावले आहेत त्यांना शोधून व कडक सजा दिली पाहिजे.सदयाच्या सरकारने निवडणुकीच्या काळात आदिवासी समाजाच्या विकासासाठी खूप आश्वासन दिले होते, पण त्यांची पूर्तता शुन्य. मात्र दिसत नाही हे देखील खरे! म्हणूनच श्री.अनिल शिदोरे त्यांच्या अनुभव स्पष्ट करताना म्हणतात की आदिवासी समाजाचा हा सामाजिक मागासलेपणा आणि व्यवस्थेने त्यांच्यावर लादलेली हलाखी, दयनीयपण पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली व कीव करावीशी वाटली – सरकारच्या बदलणाऱ्या महाराष्ट्राची, देशाची!
विज्ञानाच्या युगात परग्रहावरील एलियन नावाचा प्राणी आहे किंवा  ते मला माहिती नाही.पण सभ्य म्हणवणारा आपला समाजाने आदिवासी बांधवाना अशी हीन वागणूक दिली आहे की ते पाहून एलियन लोकांनी पृथ्वीवर येणाचा विचारच सोडून दिला असेल.मानव आपले काय हाल करेल हा प्रश्न पडला असेल त्यांना? आणि आदिवासी बांधवाना वाटत असेल आपल्याला  मिळणारी सापत्न वागणूक पाहून आपण एलियन आहोत की काय ?
आदिवासीना 'वनवासी' असेही म्हणतात.वनवासी म्हणजे जंगलात,वनात राहणारा लोकांचा समुह. 'वनवासी'याचा दुसरा अर्थ संसाराचा त्याग करुन साधु बनून वनात राहायला जाणे.
वरील चर्चचा सारांश असा की,आजच्या काळातील आपला आदिवासी बांधवाला एवढी हीन वागणूक समाज व सरकारने दिली आहे कि तो विकासा पासून खूप  दूर राहिला आहे आणि आजच्या डिजीटल म्हणजे तंत्रज्ञान व माहितीचा युगात ख-या आदिवासींचे हक्क काही नकली स्वार्थी लोकांनी हिरावून त्यांना 'वनवासी'केले आहे.त्यांनी कोणत्या अपेक्षेने व आशेने कोणाकडे पाहावे? त्या एलियनकडे की सभ्य समाजाकडे की सरकारकडे!

संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ, पुणे:

    प्रथमतः या विषयाची आपण निवड केलीत त्याबद्दल मी आपल्या या ग्रुपच आभार व्यक्त करतो..

    आदिवासी म्हटले की, जगाच्या समोर उभा राहतो तो म्हणजे डोंगरदऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड-धोबड चेहऱ्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज. आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी या शब्दातच आदि म्हणजेच अगोदरचा पूर्वीचा वासी, म्हणजे निवास करणारा. मग या जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. मग या जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव विकासाच्या पाठीवरून दूर का फेकला गेला?? मोठं प्रश्नचिन्ह आहे ??
Source: INTERNET

   आदिवासींचा इतिहास देखील सुवर्ण असा आहे.. पण काही जातीवादी लोकांनी आमचा इतिहास लिहला नाही याचा अर्थ असा नाही कि तो इतिहास घडलाच नाही...अगदी एकलव्यापासून हा इतिहास सुरू होतो..शिवाजी महाराज यांचे मावळे म्हणून देखील आदिवासींचे योगदान नाकारता येणार नाही..इंग्रजांविरुद्ध सर्वात जास्त लढाया करणारे हेच आदिवासी..ज्या आदिवासी वीरांची माहिती आपल्या सरकार ला माहित नाही त्यांची माहिती इंग्रजानी जपून ठेवली आहे...वीर बाबुराव शेडमाके हे इंग्रजा विरुद्ध लढणारे पहिले स्वातंत्र वीर..
आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते, पण त्यांची कुणालाही आठवण नाही. क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा (धरती आबा), वीर बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांग्रे, बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, झलकरी बाई, कुमरा भीमा, तिलका मांझी, यापैकी एकही क्रांतिकारकांची महाराष्ट्र शासनाने, अथवा भारत सरकारने दखल घेतली नाही. यासाठी आदिवासी साहित्यिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पुढार्यांनी पुढाकार घेतलेला दिसत नाही.

    संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. आज आदिवासी या शब्दाची मानक, परिपूर्ण आणि नि:संदिग्ध व्याख्या नसली तरी आदिवासींसाठी विश्वस्तरावर ‘इंडिजिनस’ किंवा ‘अँबॉरिजनिझ’हेच शब्द प्रचलित दिसतात. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ सप्टेंबर २00७ रोजी आदिवासींचा जाहीरनामा युनोच्या आमसभेत मांडण्यात आला. परंतु भारतात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याच्या बाबतीत आजही उदासिनता दिसून येते. कारण भारत सरकारने युनोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र संघटनने आदिवासींची जी व्याख्या केली आहे, त्यात भारतीय समाविष्ट होत नाहीत.
आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत, हे नाकारता येणे शक्य नाही.

    देशात आदिवासी लोकसंख्येनुसार मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
राज्यात आदिवासी समाजाचे २६ आमदार आणि सहा खासदार निवडून येतात. आदिवासी लोकसंख्येच्या ८१ टक्के लोक आजही दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहेत. आदिवासींची ५० टक्के मुले ही कुपोषित आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर गळतीचे प्रमाण ८० टक्के आहे.
जगातील आदिवासींपैकी 23 टक्के आदिवासी भारतात आहेत.
भारतीय संविधानातील एकूण २२ भाग, १२ अनुसूची आणि ३९५ अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले. यात सर्वात जास्त अनुच्छेद आदिवासी समाजासाठी आहेत. यात प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या संरक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे.
१९७४ च्या कायद्यानुसार आदिवासीच्या जमिनी आदिवासींना घेण्यासाठी जिल्हाधीकार्याची तर बिगर आदिवासींना खरेदी करण्यासाठी राज्य सरकारची मान्यता लागते.

   आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्या रानमेवाव्यावर करीत आहेत.
आदिवासींना फक्त निसर्गाचे जतन करणे व पुजा करणे हाच धर्म माहीत आहे, परंतु आता आदिवासींना ही आपापल्या धर्मात ओढण्याची स्पर्धा सर्व धर्मप्रसारक करत आहेत.

  एकलव्याच्या काळापासून आदिवासी समाज अन्याय सहन करत आला आहे. आज 21 व्या शतकात आदिवासी कसे जगतात हे जर पहायच असेल तर याच उत्तम उदाहरण न्यूटन आणि बाबा आमटे मूवी  जरूर पहावा.
आदिवासी विकासाच्या पाठीवरून दूर फेकला गेला आहे.
आदिवासींच्या विकासाचे अस्तित्व नाकारण्यात आले आहे. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या कलांचा निर्माता आदिवासी आहे. जंगलाचा खरा रक्षणकर्ता हा आदिवासीच आहे. परंतु, जंगलतोड झाली तर त्याची दखल घेतली जाते. नद्या, वनस्पती यांच्यासह पर्यावरणाची काळजी घेतली जाते. परंतु जंगल व पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेला आदिवासी कायम बेदखल असल्याने कुपोषण व शोषण हेच त्यांचे जगणे व भोग आहे. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही राज्यातील दऱ्याखोऱ्यात असलेला आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेला नाही. आदिवासी समाजाचा राजकीय पक्षांनी फक्त मतदानासाठी वापर करून घेतल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा मात्र विकास झाला. खराखुरा आदिवासी आहे, त्याच ठिकाणी आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही उच्च शिक्षणात आदिवासी मुले शोधूनही सापडत नसल्याचे भयावह वास्तव नाकारता येत नाही. आदिवासी विभागाचा कारभार सुधारण्याऐवजी त्यात गोंधळच अधिक मांडला आहे. कारभार आजही अधिकारी आणि ठेकेदारच चालवित असल्याने सर्व काही आलबेल आहे. फरक एवढाच आहे की, दरवर्षाचे बजेट पाच हजार कोटींच्या वर गेले. आदिवासी विभागातील अधिकारी आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या प्रगतीचा आलेख मात्र एव्हरेस्टच्या उंचीलाही लाजवत आहे. आदिवासींचा हक्क मिळवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले असले तरी, त्यांचा हा न्याय आजही कोर्ट कचेऱ्यांमध्येच अडकला आहे. त्यामुळे खरा विकास कोणाचा झाला, असा प्रश्न आदिवासी समाजाला पडला आहे. अजून किती वर्षं आम्हाला विकासासाठी वाट पाहावी लागणार, असा प्रश्न ते आजही समाजाला विचारत आहेत. जोपर्यंत आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मानसिकता पुढारलेला समाज, आदिवासी लोकप्रतिनिधी, अधिकारी करत नाहीत, तोपर्यंत आदिवासी गुलामगिरीतच राहणार, हे आपल्या समाजाचे भयावह वास्तव राहणार आहे, एवढे मात्र निश्चित. आदिवासी समाज आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शासनातर्फे या समाजाच्या विकासावर १९८२पासून आतापर्यंत ३२ हजार कोटी रुपये खर्च झाला.

   आदिवासी समाजाने निसर्गाच्या विरुद्ध कधी पाऊल टाकले नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी आपले जीवन जगत असतो. म्हणून इतरांनीही निसर्गाला समजून घेणे आवश्यक आहे. आदिवासींची संस्कृती, आचारविचार समजून घेण्याऐवजी आदिवासींची होळी करून, पोळी खाणारे जास्त आहेत. आजही आदिवासींना कोण मित्र नि कोण शत्रू हे कळत नाही. आधुनिकतेचा बुरखा घातलेल्यांना जंगलाचे महत्त्व काय समजणार? आदिवासींनी खर्या अथाने जंगलाचे रक्षण केले. समतोल राखण्याचे काम केले. म्हणून आदिवसी हेच जंगलचे राजे आहेत. जंगलाशी आदिवासी समाजाचे अतूट नाते आहेत. आज आदिवासींची चारही बाजूने छळवणूक होताना दिसते. या छळाचा परिणाम म्हणून तो नक्षली चळवळीत सामील होत असतो. 99% आदिवासी हे नक्षली बनले आहेत. पण ते या क्षेत्रात का आले याची कारणे मात्र कोणालाही शोधाविशी वाटत नाहीत.

   मेक इन इंडिया , डिजिटल इंडिया, चे स्वप्न बघणाऱ्या  राज्यकर्त्यांनी जरा आदिवासी भागात दौरा करा..आजही या भागात वीज, रस्ते, शाळा अगदी छोट्या छोट्या मूलभुत सुविधा उपलब्ध नाहीत. 8 दिवसा पूर्वीचीच घटना आहे मधु या आदिवासी युवकाला 2 किलो तांदूळ चोरले म्हणून त्याचा खून करण्यात आला आजही आदिवासी लोक उपाशीच आहेत. बाकी या राज्यकर्त्यांनी या लोकांच्या जीवावर स्वतःचे खिसे मात्र भरून घेतले..21 व्या शतकात देखील हा समाज कोसो दूर राहिलेला आहे.
Source: INTERNET
    आज आमची आवस्था जरी दयनिय असली तरी आम्ही राज्यकर्ती जमात बऩू शकतो. तर ते कसे .आमच्या प्रत्येक युवकाने देव धर्म,पुराणपोथ्या ,दैव नशिब पाप पुण्य हे शब्द कायमचे काढून टाकले पाहीजेत. चुकूनही या शब्दांना आपल्या जवळही भटकू द्यायला नको .मी आदीवासी आहे ,गरीब. लाचार आहे.असे मनातले विचार काढून टाकले पाहीजेत.. सतत वैज्ञानिक विचार घेवून पुढे सरकत राहीले पाहीजे...आमची जमात एक अशी जमात आहे ती वाघाची शिकार करू शकते. वाघालाही परास्त करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे..पण लाजरे बुजरेपणा सोडला पाहीजे. क्रांती करण्याचं सामर्थ्य फक्त तरूणांमध्येच असतं. याला इतिहास साक्षी आहे.
सिमाली भाटकर, रत्नागिरी:
आदिवासी म्हणजे मुळ निवासी असा अर्थ आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे.संस्कृत भाषेत त्यांना आत्विक किंवा वनवासी असेही म्हटले जाते.संथाल,गोंडा,मुंडा,खडीया,हो ,बोजे,भिल्ल,खासी,गरसिया,सिररीया,मीणा,उनाव,बिरहोर अशा विविध आदिवासीच्या जाती-जमाती आढळून येतात.उडिसा,मध्यप्रदेश, राजस्थान,गुजरात, झारखंड, छत्तीसगड ,बिहार ,मिझोरम या राज्यात ते दिसून येतात.
स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे उलटली तरी आदिवासी बांधव अजूनही उपेक्षित आहे.महात्मा गांधीनी त्यांना गिरीजन म्हणजे पर्वतावर राहणारे असे संबोधले आहे.पहाडांवर राहणारे हे जंगलातील राजे आज मात् इमारतींच्या आधुनिकीकरणात एकटा पडला आहे.
     आपण नेहमीच म्हणतो मानव चंद्रावर-मंगळावर पोहचला.मग त्यांचे  विचार तितके  श्रेष्ठ का नाही झाले?एका बाजूला आधुनिकीकरणाने विकसित झालेला भारत तर त्याचवेळी  दुसऱ्या बाजूने मागासलेला आदिम समाज असा विषमता आढळते.समाजशास्ञीय दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या पुष्कळ समस्या आपल्याला दिसून येतात.
   जंगलात राहत असल्याने त्यांच्या पर्यंत सुविधा पोहोचत नाही.निरोगी आरोग्याची त्यांना माहिती नसते तर एखाद्या  दुर्गम भागात जाऊन आदिवासींना निरोगी आरोग्याबाबतची माहिती देणे  आरोग्य सेवकांना  धाडसाचे काम वाटते मग ते त्या कामातून अंग काढून घेतात.
        शिक्षणाचे ही तसेच आहे.आदिवासींची बोली,लिपी ही वेगळी असते.ती समजुन त्यांच्या मुलांना शिकवणे खूप अवघड असते हे जरी खरं असले तरी त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचे ठरेल.
      आदिवासी समाजातील कितीही आमदार-खासदार निवडून आले तरी एकदा त्यांना शहरीकरणाची व पैशाची हवा लागली कि ते या  स्वतःच्या आदिवासी लोकांकडे दुर्लक्ष करतात.
Source: INTERNET
       अशा अज्ञान व अंधकारमय वातावरणात खिचपत पडलेल्या समाजाला प्रकाशमय करण्यासाठी एक लखलखता तारा जन्माला आला.डॉ.प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करुन अंधकारमय जीवन जगणाऱ्या आदिवासींना प्रकाशाचे दिशेने वाटचाल करण्यास लावली आहे.
    ज्या गडचिरोली भागात नौकरी करण्यास सरकारी कर्मचारी ,पोलिस घाबरतात अशा ठिकाणी आमटेनी आदिवासींचे पुर्नवसन केले.स्त्रीयांवर अत्याचार  केले जात होते.तेथील युवक-युवती नक्षलवादी कसे होतात याचा अभ्यास करुन इत्यादी सर्व समस्यांतून आदिवासीना मुक्त करणेसाठी शिक्षण व ज्ञानाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे.त्यांना स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती करुन दिली पाहिजे.
    आदिवासींच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात अंधश्रध्दा व काळी-पांढरी जादूचे आकर्षण असते.हे अंधश्रध्देचे जळमळाट दूर केले पाहिजे.आदिवासींचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रात नागपूर ,अमरावती,नाशिक इत्यादी २९ ठिकाणीची कार्यालये आदिवासींच्या पुर्नवसन व विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत आहेत.पण यातील प्रमुख अडचण म्हणजे अधिकारी वर्गाची काम करण्याची मानसिकता नाही. अनागोंदी कारभार,समयसुचकतेचा अभाव हे अवगुण आहे. उदाहरणार्थ आदिवासी विद्यार्थ्यांना हिवाळ्यात थंडी पासून बचाव करणेसाठी शासन स्वेटर खरेदी केली जाते पण त्याचे वाटप उन्हाळ्यात होते तेही निकृष्ट दर्जाचे.आदिवासी कल्याण योजनांचा लाभ खरच त्यांच्या पर्यंत पोहचतो का? मेळघाट सारख्या दुर्गम भागात शासन रोहयो कामाचा आदिवासी मजूरांना ३महिने झाले तरी मोबदला देत नाही.या हलगर्जीपणाला काय म्हणावे?ही त्यांची क्रुर चेष्टा नाही काय?
Source: INTERNET

      डिजीटल इंडियाचा सध्या खूप गाजावाजा होत आहे. दरी खो-यात राहणाऱ्या दुर्गम भागात आदिवासी लोकांना शिक्षण,वीज,रोजगार इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे प्रथम काम आहे.जिथे एस.टी.महामंडळची बस पोहचू शकत नाही तिथे आम्ही अॉनलाइन नेटवर्क पोहचवणार आहोत.वीजेचा अस्तित्व नसलेल्या गावात आमचे सरकार संगणक शिकवणार आहेत .वाह रे मेरे डिजीटल इंडिया.पण सरकार फक्त कागदोपञी व वर्तमानपत्र यामध्येच डिजीटल इंडियाला प्रसिद्धी देण्यात दंग आहेत.
  आदिवासींना आधुनिक शेतीचे फार नाही किमान नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान व माहिती दिली तरी त्यांच्या आर्थिक प्रगतीला फुन न फुलाची पाकळी सारखा आधार लाभेल.
        हेमलकसाच्या धर्तीवर प्रत्येक आदिवासी क्षेत्रात आमटे सारखे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना सरकारने आर्थिक पाठबळ व तंत्रज्ञान मिळवून दिले पाहिजे.
 रेल्वे ट्रॕक टाकण्यासाठी सरकार जंगलात जाऊ शकते मग आदिवासींच्या विकासासाठी का नाही? नक्षलवाद संपविण्यापेक्षा त्यांच्या मनातील नक्षलवाद वाढविणा-या पध्दती वा गोष्टींचाना नष्ट केले तर अधिक छान होईल.मुळात आदिवासी माणूस म्हणून सन्मान द्या व प्रेमाने वागवा.जंगलातील झाडाची पाने नेसणा-या माणसाला शहरात नेऊन कापड बांधायला लावणे म्हणजे विकास नव्हे.मुल जन्माला आल्यावर लगेचच जिन्स घालत नाही.त्याला वाढवावे लागते नंतर शिकवावे लागते.अगदी आदिवासी बांधवाच असच आहे.
      तात्पर्य डिजीटल इंडिया आपल्यासाठी अभिमान व गौरवाची बाब असेल पण निसर्गाच्या जुळलेल्या आदिवासी लोकांना निसर्गाच्या जडण घडणीतुनच साकारले पाहिजे.आधुनिकीकरणाचे जोखड त्यांच्यावर लादले तर ते आपल्या पासून दूरच जातील.मग काय भारत कधीच डिजीटल इंडिया होऊ शकणार नाही?म्हणूनच शहरवासीयां सोबत गाव व जंगलवासी आदिवासी यांनाही आपुलकीच्या व प्रेमाच्या चौकटीत घ्या.यावर एक प्रकाश टाकण्यासाठी माझी स्वतःची केलेली कविता -
 " मी आदिवासी रामासारखा वनवासी
द्रोणाचार्याची सत्ता तिथे
अर्जुनाच्या हाती खलबत्ता
एकलव्याची व्यथा
गुरू असूनी माथी निर्रथकता
निःस्वार्थ आमच्या भाळी
स्वार्थाने केली बळजबरी जिथे
पानां फुलात सजलेले खोपटे
काजव्यांनी दिपते
आधुनिक युगात मात्र
प्रकाशासाठी तरसते
मोह फुलांनी सण रंगले होते
त्यानेच आम्हांस व्यसनी केले
याच समाजाचा मी
तरी फेकला गेलो
दूर एका वेशीच्या कोप-यावरी
वाट पाहतो सावरायची अन् आधुनिक युगात वावरायची
देईल का साथ कुणी मला विकासासाठीची "

सिद्धार्थ एडके सर, मोशी, पुणे:
     जग हे विज्ञानाच्या जोरावर चंद्र, मंगळ ग्रहपर्यंत पोहचले आहे. त्यात *आपल्या देशातील धर्म हे वेदप्रामान्य वादी,* जीवनातील सर्व घटनांचा कर्ता करवीता परमेश्वर ही भावना जोपसनारा, जीवनात काही वाईट घटना घडल्यास *आपले नाशिबच फुटक* म्हणून स्वताची समजूत काढनारा. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक साधने आली आणि वेदप्रामान्य म्हणणारेच वेद बाजूला सारून चैणीचे जीवन जगत आहेत. लोकांना आयुर्वेद सांगत आहेत पण स्वता मंदिरात AC च्या थंड हवेत मजा करत आहेत.

डिजिटल भारताच्या गप्पा ही सध्या देशात जोरात सुरु आहेत. हे सर्व पाहून एकवेळ छान वाटते की *जुन्या कालबाह्य गोष्टी सोडून नविन आधुनिकतेचा स्वीकार करत आहोत. देशातील अनेक शहरे वायफाय ने जोडून शहरातील जनतेला फ्री इंटरनेटची सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रेल्वेमध्ये वेगवान अशी मेट्रो, बुलेट ट्रेन सारख्या प्रवासाच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
शहरी लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहराच्या बाहेर डोंगरावर मोठमोठी धरणे बांधली जात आहेत. मोठमोठी हायवे रस्ते निर्माण केले जात आहेत. ह्या सर्वातुन मानवी जीवन सुखकारक आणि वेगवान होण्यास मदतच होणार आहे.

हे सर्व आधुनिक जगात अत्यावश्यक आहे. ह्या सर्वबाबी आपण जर केलो नाही तर आपण जगात मागास समजले जाऊ. आपला विकास खुंटला जाईल.


जग आणि जगासोबत भारत एवढी प्रगती करतोय की भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे. पण ह्याच भारताची दूसरी बाजु पाहणे ही आवश्यक आहे. जो अजूनही उपाशी पोटी काबाड़ कष्ट करत जंगलात अतिशय दुर्गम भागात आपला उदरनिर्वाह करतो आहे. ज्याच्याकडे दळनवळणाची साधन नाहीत, त्यामुळे सर्वस्वी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहवे लागते. त्यामुळे तो कधी मेट्रो किंवा बुलेट ट्रेनची स्वप्नही पाहत नाही. तो विषयच त्यांच्यासाठी चर्चेचा नाही. मनोरंजनांची साधने असतात याची ही कल्पना नाही. मोबाईल फोन हा विषय सुद्धा कुतुहलाचा आहे. तेव्हा त्यांच्यासाठी लैपटॉप हे तर खुप लांब राहिले.

अतिशय दुर्गम भागात राहत असल्यामुळे रस्त्यांची सोय नाही.  पण त्याचवेळी मोठमोठे हायवे उभारण्यासाठी याच लोकांच्या जमीनी काढून घेतल्या जातात. आणि त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते.
Source: INTERNET

शहरांना पाणी पूरवठा करण्यासाठी धरण बांधनी साठी सर्वप्रथम जमीन ही ग्रामीण भागातील निवडली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या जमिनी काढून घेतल्या जातात.
उपासमारीमुळे रोजागरच्या शोधात ही सर्व मंडळी शहराकडे वळतात. पण पुरेसे शिक्षण नसल्यामुळे आधुनिक यंत्र हाताळन्याचे कौशल्य अवगत नसल्यामुळे त्यांना काम शोधण्यास अडचणी येतात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि मानशिकतेवर होतो.

तर त्याचवेळी जे ग्रामीण भागात राहतात त्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसते. साधा हिवताप जरी आला तरी मैलो दूर चालत जावे लागते, तर एखाद्या वेळी गर्भवती महिला किंवा सर्पदवंश झाला असेल तर कोणत्या परिस्थितिला तोंड द्यावे लागत असेल ? याची कल्पना ही करता येत नाही.

शिक्षणाची सोय नसल्यामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचे मोठ्या प्रमाणात जीवनात महत्त्व येते. याच कारणांमुळे काही तरुण नक्षलवादी कार्यवह्यांकडे वळले जातात.

देशात इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या जाहिरतिसाठी जो खर्च केला जातोय त्यातील थोड़ाफार ही खर्च नित्यनेमाने आणि प्रामणिकपने वापर केल्यास यांचेही जीवन सुधारेल.

नाही तर डिजिटल इंडिया हे जाहिरातीपूर्ते मर्यादित राहील आणि *मी आदिवासी या डिजिटल भारतातही सरकारचा वनवासी होउनच जगावे लागतेय*
Source: INTERNET
अभिजीत गोडसे :सातारा:
     *मुळातच आदिवासीच्या* खुप समस्या आहेत . एकीकडे नक्षलवाद दुसरीकडे पोलिस तिसरीकडे सरकार आणि सगळ्यात महत्त्वाचे बघ्यांची भूमिका घेणारी जनता. अशा चारी बाजूने आदिवासी पूर्णपणे भरडला आहे . असे म्हटले तरी  काही वावगे ठरणार नाही. एकूणच आर्थिक , सामाजिक , राजकीय या काञीत हा समाज अडकला आहे .सर्वात मोठी समस्या ही आहे की मुळात हा समाज मुख्य प्रवाहातच नाही . आणि याचाच फायदा तेथील तथाकथित राजकारणी घेत आहेत. मतदाना पुरता या लोकांचा फायदा झाला बास ! असा विचार करणारे बरेच नेते आहेत. नक्षलवादाच्या समस्या ,  त्यांच्या मागण्या हा आणखी ऐक वेगळाच विषय . ही परिस्थितीत पाहता. आदिवासी हा घटक वर्षांनी वर्षे मागेच राहीला . मुख्य प्रवाहात  हा घटक आला नाही याला आपण सर्वच जबाबदार आहोत ! हे नक्की . सरकार कोणाचेही असो ते त्यांचे काम करत असते ! प्रत्येक सरकारला वाटते आपण सर्वच समस्या सोडवाव्यात पण काही प्रश्न लवकर सुटत नाहीत हे वास्तव आहे. संपूर्ण देश चालवत असताना कोणताना - कोणता  , दुर्लक्षीत घटक मागे राहत असेल . राहीला ही आहे . म्हणजे सरकार काही काम करत नाही असे मुळीच नाही . ते त्यांच्या धिम्या गतिने आदिवासी पाड्यात काम करते . अनेक सरकारे पाहिली या आदिवासी समाजाने .पण यांच्या बाजुणे उभे राहिले ते म्हणजे काही समाजसुधारनेचा वसा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते . कोणतेही आपेक्षा न करता हे धडपडत राहीले आणि आदिवासी समाजाचा देवच झाले. मग ते मेळघाटातील 'बैरागड'  मधे काम करणारे डाँ. रवीद्रं आणि डाँ.  स्मिता कोल्हे असतील,  'गडचिरोली' मधे डाँ. प्रकाश आणि डाँ.  मंदाकिनी आमटे असतील , चंद्रपूर 'आनंदवन' मधे काम करणारे डाँ. विकास आणि डाँ. भारती आमटे असतील असे खुप जनाची नावे सांगाता येतिल. नव्या दमाने काम करत असणारे तर खूप आहेत. हेच लोक जे आहेत ते आदिवासी समाजाचे ऐक प्रकारे सरकारच आहेत ! आदिवासी समाजाची दिशा या थोर व्यक्तीनी बदललीच. त्यांच बरोबर शैक्षणिक , आर्थिक , आरोग्य आणि मुलभुत संमस्या सोडवल्या .  त्यांच्यात परिवर्तन देखील घडवून आणले आहे . आणत आहेत .
Source: INTERNET

         खरा प्रश्न आहे तो शिकलेला वर्ग ( बघ्यांची भुमिखा घेणारा वर्ग )  जो भौतिक सुविधांनी भरभरून वाहत आहेत . स्वतःला उच्छंभ्र म्हणवून घेणारी ही मंडळी मोठ - मोठ्या  शहरानंमधे राहणारी आणि स्वताःकडे सर्वच प्रश्नाची उत्तरे आहेत असा. गोडसमज करुण घेणारी सरकार आणि इतर समाज यांचे काय चुकते , कुठे चुकते. म्हणजे फक्त चुका काढणारी ! अरे याना तुम्ही जरा खाली, मागे वळून बघा जरा,  जावा त्या आदिवासी भागात काय समंस्या आहेत त्या जाणून घ्या , बोला त्या आदिवासी बांधवा बरोबर , समजून घ्या तेथील नक्षलवाद पण असे होत नाही .  फक्त या मंडळींना थंडीचा डिसेंबर महीना आला की, समाजसुधारणेचा झटका येतो. आणि मेळघाटात किंवा जेथे कुठे अशा वाड्या- वस्त्या आहेत तेथे कुटल्यातरी फुटकळ नुकत्याच उगम झालेल्या (सामाजिक कार्य करण्याच्या आकर्षणा पोटी जन्माला आलेल्या आणि त्यातूनच छोटा- मोठा पुरस्कार मिळालाच तर ठिक. अशा तात्पुरता संस्था, स्वतःला स्वयम घोषीत सामाजिककार्यकर्ते म्हणऊन घेणारे त्यातील कार्यकर्ते  )  सामाजिक संस्था.  रुबाबदार चारचाकी गाडी मधे येतात आणि कुठे चादर द्या , कुठे गोधडी द्या , कुठे बिसकीट पुडे द्या, असे थोर सामाजिक कार्य करत ( तो वर्ग )  असतात. आणि ते आदिवासी बांधव हे सर्व घेत असते. याच बरोबर वळूनवळून आलेल्या पाहुण्याच्या आलिशान गाड्या , त्यांची कपडे , राहनीमान या सर्व गोष्टी हा पाड्यावरचा आदिवासी बांधव कुतूहला पोटी पाहत असतो . हे पाहुणे आले की लगेचच साहित्य वाटतात , फोटो सेशन करतात त्याच बरोबर त्यांचा महत्त्वाचा सेल्फी काढतात आणि जनु काही देश चालवत असल्या सारखे आल्या पाऊली निघून जाततात. आणि लगेचच फेसबुक आणि ईतर माध्यमे यांनवर फोटो टाकत समाजसेवेचा आव आनतात . आणि आभासी जगात लाईक , कमेट घेत बसतात . अरे ते काय प्राणी आहेत का ? आले की खायल टाकले निघून गेले ! सेवा  करायची तर घ्याना आदिवासी मुलांचा शैक्षणिक खर्च आंगावर , मुलांना दत्तक घ्या , एखाद्या कुटुंबाची जबाबदारी घ्या किंवा तुमच्याकडे कोणती रोजगार साधने असतील तर द्या ..नुसते बिसकीट पुडे वाटले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. तर त्यांच्याच 'परिवर्तन' झाले पाहिजे यासाठी काहीतरी करा . सर्व काही सरकारने आदिवासीन साठी केले पाहिजे असे नाही तर तुमच्या सारख्या वर्गाने पुढे आले पाहिजे . अर्थात काही यामधे झोकुण देऊन काम करताहेत पन त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे.

           आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच घटकांनी  पुढे आले पाहिजे तरच खरी आदिवासी संस्कृती पुढे येईल त्यांच्यातील सुप्त गुणांणा वाव मिळेल. जंगालाचा राजा जर व्यवस्थित जगत असेल तर निश्चित डिजीटल भारताचे स्वप्न पहायला हरकत नसावी .
Source: INTERNET
                        
रामदास हांडे,पुणे:
         विषयाच्या जाणिवेला स्पर्श करण्यापूर्वी एक उदाहरण आपल्यापुढे जाणीवपूर्वक ठेऊ इच्छितो,काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग काही कामानिमित्त गावी चाललो होतो,भीमाशंकरला जाणारया गाडीचे नाव स्पीकरवरून वाजल्यानंतर तेथे जाणाऱ्या प्रवाश्यांची गाडीकडे धाव पडली,बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी होती हि सर्व रेलचेल,मी सुद्धा त्या गर्दीचा हिस्साा बनलो आणि गर्दीतून मार्ग काढत अगदी सर्वाना हवीशी वाटणारी खिडकीच्या शेजारची शीट मिळवली,जागा मिळाली याच आंतरिक समाधान आणि चेहऱ्यावर थोडस स्मित होतंच जणू काही ती शीट मला निवडणुकीच्या पाच वर्षांसाठीच मिळाली होती.असो,त्याच गर्दीचा मागोवा घेत एक ऐन तिशीचे गृहस्थ माझ्या बाजूला येऊन बसले आणि शिवाजीनगर(पुणे)ते भीमाशंकर हा प्रवास सुरु झाला.प्रवासातील नेहमीच्या प्रश्नांनी आमच्या प्रवासाला सुरुवात झाली,हॅलो मी अमुक अमुक भीमाशंकर ला चाललोय,सादरणत किती वेळ लागेल,पहिल्यांदाच जातोय ना माहित नाही,अगदी पुणेरी शब्दात हा त्यांचा पहिला प्रश्न. नेहमी गावाकडे जाण येणे असल्यामुळे 3 ते 3.30 तास लागतीलस उत्तर मी दिल,"ओ बरं झालं जागा मिळाली "असे पुट्पुटणारे शब्द माझ्या कानी आले,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मी भीमाशंकर परिसरातील आहे याची खात्री त्यांना पक्की झाली.भीमाशंकर अभ्यारण्या,जंगल आणि आदिवासी यांचं नात कदाचित त्यांना माहित असावं म्हणून त्यांनी त्याच्या भाषेतील आदिवासी वर्णनाची माहिती माझ्या पुड्यात टाकण्यास सुरुवात केली."मला आदिवासी लोकांची खूप भीती वाट्ते,कारण मी अस ऐकलंय कि ते माणसांना मारून खातात "त्यांचं हे वाक्य मला आजही जसेच्या तसे आठवतय,तुम्हाला प्राण्यांना मारून खातात अस म्हणायचं आहे का?खुलासा करण्यासाठी मी उलट प्रश्न केला,परंतु ते त्यांच्या मतावर ठाम होते.सुरुवातीला त्यांच्या बोलण्याचा खूप राग आला,पण एकीकडून त्यांच्या अज्ञानाची कीव आली. शंकानिर्सनासाठी मी उलट प्रश्न केला,"काय सर माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का मी माणसांना मारून खाईन."कदाचित माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला,व सुटाबुटातील सुशिक्षित तरुण शरमेने खजील होऊन,पुढच्या बाकावर जाऊन बसला.
        सांगायचं तात्पर्य एवढच कि आजही आदिवासींना वनवासीनच लेबल लाऊन रानटी म्हणून संबोधले जातंय ते सुद्धा डिजिटल तंत्रज्ञानाची याने बनवून चंद्रावर जाणाऱ्या भारतातील INDIA मध्ये.
      आदिवासी या शबदाची फोड केली तर,सर्वात आधीपासून वास्तव्य करणारा रहिवासी असा त्याचा अर्थ अगदी पहिलीच्या पोराला विचारला तरी तो सांगेल.मग इंग्रजांप्रमाणे परप्रांतातून येऊन स्वतःला स्वयंघोषित पणे भारताचे भाग्यविधाते म्हणण्यात कुटलं आलाय शहाणपण?
      जल,जंगल,जमीन यांची मालकी असणारा आजचा आदिवासी आज वनवासी,(म्हणजे ज्याला काहीच नाही असा)बनविण्याचा प्रयत्न चालत आहे,कारण दिवसेंदिवस डिजिटल होणाऱ्या इंडियामध्ये बांधकामांसाठी जमीन कमी पडत आहे,परंतु *आदिवासी जमीन हस्तांतर कायद्यामुळे* बिगर आदिवासी व्यक्तीस ती खरेदी करणे सहजा सहजी शक्य नाही,परंतु आज घटनाकार त्यामध्ये सीईस्कररित्या बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत.मित्रांमध्ये चर्चा करता करता आरक्षणाचा विषय निघतो,आणि तो आदिवासींवर येऊन संपतो,काय तर म्हणे आदिवासींना आरक्षण खूप जास्त आहे,पण ते टक्केवारीत बोलत नाही जे कि फक्त 7.5%आहे,आदिवासींचे मेरिट कमी लागते,पन त्यांना हे माहित नाही कि आदिवासींची हि शिक्षणाची पहिली पिढी आहे,आदिवासी वर मोट्या प्रमाणात खर्च केला जातो,पण कसा आणि कोठे होतो हे संगण्याच धाडस होत नाही.आरक्षण हे घटनेने दिलेलं आहे आणि ते सुद्धा।लोकसंख्येच्या प्रमाणानुसार परंतु निसर्गनियमप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे,पण आरक्षण वाढतंय का?याचा विचार आपण करतोय का?आज इतर तरुणांप्रमाणे आदिवासी तरुणही बेरोजगार आहेत,कारण कदाचित तुम्हाला माहित नसेल आज 'जात चोरीला जाण्याचं प्रमाण वाढत चाललंय'ऐकायला नवल वाटतंय ना,पण हि वास्तुतिथी आहे.परवा परवा पेपरमध्ये बातमी होती *2446 सरकारी बाबू बोगस* म्हणजे आदिवासी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवणे आणि त्यामध्ये आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट अग्रेसर आहे.लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही महाभाग आदिवासींची ओळख पुसून त्यांना वनवासी करण्याचा प्रयत्न करत आहेत,कारण त्यांना माहित आहे,लाजरा बुजरा हा समाज कधी भडाभडा बोलत नाही,सर्वाना आपलंसं समजून लगेच विश्वास टाकतो,पण।येथेच तो फसला जातो कारण लोकांच्या बोलण्यातील स्वार्थ लवकर त्याच्या लक्षात येत नाही.
Source: INTERNET
   पण खेड्यांचा देश समजल्या जाणाऱ्या डिजिटल इंडियाला कधी कळणार कि इंग्रजांविरुद्ध लढणार पहिला क्रांतिकारक हा आदिवासी होता,वीर बाबुराव शेडमाके त्यांचं नाव,निसर्गाला देव मानून त्याची पूजा करणारा आदिवासी कधी कळणार या डिजिटल इंडियाला.स्वतःची वेगळी भाषा,वेशभूषा,राहणीमान यांची आजही जपवणूक करणारा,त्याचबरोबर लग्नातील हुंड्याच्या बेड्या तोडून(काही अपवाद वगळता)जमातीतच रोटी बेटीच व्यवहार करणारा आदिवासी कधी कळणार या डिजिटल इंडियाला.
  कधी भेट देऊन या वृद्धआश्रमाना आणिशोधून पहा तेथे कोणी आदिवासी आजी आजोबा भेटतोय का,(अपवाद वगळता) कारण आदिवासींना संस्कृती जोपासण्याचा बाळकडू याच आई वडिलांनी पाजलय याची कदाचित जाण असेल त्यांना,मराठीत एक म्हण आहे,'खाल्या भाकरीची जण ठेवणे'हवं तर तस म्हणा.
  कधी वेळ मिळाला तर आदिवासी पड्यावर्ती जा,तेथील संस्कृतीच दर्धन घ्या पण त्याना वनवासी करण्याचा शहाणपण करू नका,कारण तो काही बारश्याच कार्यक्रम नव्हे किंवा नव्हे कुठला नामकरण सोहळा,आणि त्यानंतर सुद्धा तुमच्या डिजिटल इंडियाला आदिवासी हे नाव नाही शोभत नसेल तर ,डिजिटल इंडियाचा नाव बदला कारण,आदिवासी हा कोणता वनवासी नाही कि नाही कोणी आर्यवंशी तो आहे फक्त आदिवासी आदिवासी आणि आदिवासी,,,,,,,,,,,,,,

संगीता देशमुख,वसमत ,हिंगोली:
मानवाचा पूर्वेतिहास पाहता आदिवासी हीच मानवी जीवनाची  सुरुवात! जेव्हापासून माणूस समूहाने रहायला लागला ती सुरुवात मानवी जीवन म्हणजे आदिवासी! हळूहळू मानव प्रगत होऊ लागला. आदिवासापासून ग्रामीण ते नागरीकरण असा प्रवास सुरु झाला. आज संपूर्ण जग आधुनिकतेकडे झुकले आणि अजूनही जिथे आधुनिकता तर सोडा पण जिथे अन्न,वस्त्र,निवाऱा यासारख्या बाबीही दर्जेदार मिळत नाही, ती मानवी जमात म्हणजे आदिवासी! अजूनही संपूर्णतः फक्त आणि फक्त नैसर्गिकजीवन जगणारा घटक म्हणजे आदिवासी! त्यांची जीवनपद्धती,सण-उत्सव,रीतभात ही पूर्णतः निसर्गाशी सलंग्न आहे. अजूनही बऱ्याच आदिवासी भागात आदिवासी लोक  तीन दगडाची चूल मांडून त्यात पकडलेले प्राणी,पक्षी फक्त भाजून खातात. झाडांची वल्कलं म्हणजे त्यांची वस्त्रे! उघडीनागडी,अव्यवस्थित,गबाळी,कामाने ज्यांची शरीरे रापून गेलेली आहेत,कुठे कंबरेपुरते अर्धवट गुंडाळलेले लंगोटीसदृश्य,अनवाणी पायाने जंगल पायाखाली घालणारी लोकं दिसली की आपल्याला कळतं,हे आदिवासी  लोकं!
Source: INTERNET
             आदिवास म्हणजे जिथून मानवी सुरुवात झाली! लौकिकार्थाने घेतले तर वनवासी म्हणजे  जंगलामध्ये राहणारे लोक! पण व्यंगार्थाने घेतले तर  वनवासी म्हणजे जे सर्व भौतिक सुख-सुविधांपासून,आपल्याच माणसापासून अलिप्त! आणि आजचे वनवासी हे व्यंगार्थानेच वनवासी आहेत. इकडे सरकार डिजीटल इंडिया बनवण्याचे आश्वासन देत आहे आणि दुसरीकडे अदिवासी अजूनही वनवासीच आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. इथला  आदिवासी अन्न,वस्त्र आणि निवाऱ्यासाठीच धडपडतोय,तर इकडे सामान्य भारतीयांच्या प्राथमिक गरजा ह्या अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण आणि आरोग्य इथपर्यंत पोहोचल्या आहेत.  आजच्या तंत्रज्ञानयुगातही हा आदिवासी मानवी हक्कापासून युगानुयुगापासून वंचितांचे जीवन जगत आहेत.
          साहजिकच तिथे अंधश्रद्धा अतिशय बळावलेली आहे. आम्ही हेमलकसा येथे गेलो असता डॉ. प्रकाश आमटेसोबत जेव्हा आदिवास्यांच्या अंधश्रद्धेबद्दल बोललो तेव्हा ते म्हणाले,"ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो,ती आदिवासींसाठी श्रध्दा आहे." हे वाक्य खूप मार्मिक आहे. जिथे आपल्याला श्रध्दा काय आणि अंधश्रद्धा काय हे माहीत असताना आपण अंधश्रध्देचा पुरस्कार करतो तिथे तर अजून हे सांगणारे कोणी पोहोचलेच नाही! पण जिथे डॉ. प्रकाश आमटे,साधना आमटे यांच्यासारखे व डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्यासारख्यानी नंदनवन फुलवले आणि या आदिवासींना मानवी जीवनाच्या प्रवाहात आणले. आदिवासीसाठी जीवनाचा उध्दार करणारे हेच  खरे उद्गाते! त्यासाठी त्यांना कोणते दिव्य पार पाडावे लागले असेल,हे आपल्यासारख्या सामान्यांसाठी कल्पनातीत आहे.  
Source: INTERNET
           आदिवासी भागातील एका जि. प. च्या शिक्षकाने त्यांच्या शाळेची  सहल नागपूरला आणली होती. तेव्हा त्यातील एका विद्यार्थ्याला पत्रकाराने विचारले की,सहलीतून तुम्हाला काय मिळाले?  त्यावर त्या मुलाने दिलेले उत्तर फार चिंतनशील होते. तो म्हणाला,"आम्ही जिथे राहतो तोच आम्ही भारत समजत होतो. आणि भारत इतका विकसीत आहे,हे आम्हाला नागपूरला आल्यावरच कळाले." जोवर हे लोक जंगलातच आहेत तोवर ठीक! पण अशी विद्यार्थी जेव्हा त्यांच्या बाहेरचे जग पाहतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की,हा देश त्यांच्यासाठी काय करतो? की फक्त मतदानापुरताच वापरतो? अशा सुशिक्षित लोकांना त्यांच्यासाठीची सरकारची जबाबदारी कळते,आणि जेव्हा त्यांना कळतं की,सरकार किती बेजबाबदार आहे, तेव्हा हेच सुशिक्षित तरूण आदिवासी आपल्या हक्कांसाठी लढतात. आणि ते हक्क सरळ मार्गाने मिळत नाहीत म्हणून ते नक्षलवादी बनतात. खरेतर शासनाकडून ,पोलीसांकडून,वनाधिकाऱ्याकडून आदिवासीवर फार अन्याय आणि अत्याचार होत असतात! खेदाने म्हणावे लागते की,आदिवासी हे या डिजीटल इंडियापासून मैलो दूर असून ते फक्त मतदानापुरते भारतीय नागरिक आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************