अंगणवाडी:सद्यस्थिती व शिक्षणातील गरज.

अनिल गोडबोले,सोलापूर.

मी लहान असताना आमच्या शाळेमध्ये "बालवाडी" नव्हती पण मोठ्या मुलांच्या नादाने लहान मुलं शाळेत यायची आणि पहिली चा वर्ग शेजारी बसायची... छोटी मूल म्हणजे बाईंची (टीचर, मॅडम, मिस... म्हणत नाहीत अजूनही कोकणात) जबाबदारी... त्याच त्यांना बसवून घ्यायच्या झोपु द्यायचा..  त्या वर्गाला कोकणी भाषेत "खापरी" अस म्हणत.. कोणी विचारलं की "खापरित असा.."एवढं उत्तर मिळायचं...

महाराष्टमध्ये साधारण पणे 2000 साला नंतर मुलांना "महिला व बाल विकास विभागासोबत" जोडले गेले. आणि गावा गावात अंगणवाडी आल्या व त्याचा एक भाग म्हणून बालवाडी सुरू झाल्या..

लहान मूल घरी संभाळण्यातून सुटका म्हणून पालक मुलांना शाळेत पाठवतात..  तर शाळा पटसंख्या वाढवण्यासाठी मुलांना समभाळते आणि शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणते की बालकाच्या मेंदूची (पेशींची ) वाढ 5 वर्षापर्यंत होते त्यामुळे शिक्षण सुरू करण्याचा योग्य टप्पा त्याच वयात आहे..... 

शालेय पोषण आहार आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि गेली काही वर्षे "जननी शिशु आहाराची केंद्र " म्हणून अंगणवाड्या ओळखू जाऊ लागल्या..  

असो... मूळ मुद्धा असा आहे की, अंगणवाडी किंवा बालवाडी असण्याची गरज काय?
तर... मुलांचं समाजिकीकरण होत. 
शिक्षणाची गोडी लागते
चांगल्या सवयी विकसित करता येतात
अक्षर, पाठांतर आणि बुद्धी मत्ता या गोष्टीवर काम करत येत.

मुलांचे आरोग्य तपासणी व लसीकरण होत... व खेळ एकत्र खेळण्याची भावना वाढीला लागते...
 मुलांमध्ये किंवा कुटुंबांना समजून घेऊन मदत करता येते..

फक्त याचा अतिरेक होता कामा नये.. मुलांना तणावाखाली ढकलता नये आणि पालकांनी जबाबदारी तुन सुटलो बाबा म्हणून मुलांना शालेत पाठवू नये..

त्यामुळे कमी वयात हसत खेळत शिक्षण ही योजना व्यवस्थित पार पाडली जाईल..
__________________________________
सौदागर काळे,पंढरपूर.

एक प्रश्न सर्वांना विचारावसा वाटतो तो म्हणजे तुम्ही शेवटचे केव्हा आपल्या भागातील अंगणवाडीमध्ये जाऊन तिचे निरीक्षण,कामकाज पाहिले?अंगणवाडी सेविकांशी मुलांच्या बाबतीत चर्चा केव्हा केली?स्वतःलाच याचे उत्तर द्या.सकारात्मक उत्तर असेल तर उत्तम.
बालकांचा 3 ते 6 वर्षांचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो.अशावेळी बालक अंगणवाडीत जाणे हे त्याच्या सर्वांगीण वाढीसाठी फलदायी असते.प्राथमिक शिक्षणाचा पाया अंगणवाडीच्या माध्यमातून मजबूत करण्यासाठी साहाय्यक ठरवायचे असेल तर अंगणवाडी आधुनिक पद्धतीने साकारायला हव्यात.

अंगणवाडीत रोजची बालकांची उपस्थिती सुद्धा खूप परिणामक ठरते.सध्या अंगणवाडीत मुलं दररोज न जाण्याची काही कारणे आहेत.त्यात काही बालकांना आई -वडील,आजी -आजोबा यांचा लळा लागतो.त्यामुळे त्यांना सोडून राहायचे म्हटले की रडायला लागतात, काहीजण घरच्या अडचणीमुळे मुलांना पाठवण्यास उत्सुक नसतात,काही हुशार पालक घरीच मुलांना संस्कार देण्याच्या नावाखाली या अंगणवाडीसेविका व्यवस्थित ध्यान देत नाहीत या गृहीत मतांमुळे बालवाडीत पाठवत नाहीत.अंगणवाडीत सर्व मुले रोज उपस्थित असणं याच्यासाठी महत्त्वाचे आहे की,मुल एकलकोंडी होत नाही.सर्वांबरोबर खेळल्याने शरीराचा व व्यावहारिक ज्ञानाचा विकास होताना दिसतो.

आज देशातील किंवा आपल्या राज्यातील किती अंगणवाडीना अंगण आहे?किती अंगणवाडी विविध खेळण्यांनी भरलेल्या आहेत?अंगणवाडीतील सेविका बदलत्या काळानुसार कोणती बालगीते ,गोष्टी शिकवत असते?अंगणवाडीत बालकांना बसण्यासाठी कशी व्यवस्था आहे?प्रत्येक अंगणवाडीत BALA आहे का?(BALA म्हणजे Building as Learning aid)असे प्रश्न घेऊन आपण आपल्या गल्लीतील,भागातील, गावातील अंगणवाडीला भेट देऊन विचारपूस करू शकतो.यातून सद्यस्थिती जाणायला मदत होईल.या वर्षी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मध्ये राज्यातील 10 हजार अंगणवाड्या आदर्श करण्यासाठी 100 कोटींची तरतूद केली.त्यात आपल्या भागातील अंगणवाडी येण्यासाठी ग्रामपंचायतीने या स्थानिक प्रशासनाने  प्रयत्न केले आहेत का!केले नसतील तर पाठपुरावा करण्यासाठी सुचवायला हवे.

लहान वय हे फक्त ऐकत,बघत,अनुकरण करत शिकत असतं.आपण काहीही बोलण्यास सांगितले की ते बोलते.अन काहीही प्रश्न विचारत असते.जेव्हा ते अंगणवाडीत जात असते तेव्हा पौष्टिक आहारांबरोबर बालगीते, गोष्टी,भिंतीवरच्या चित्रातून- पक्षी,प्राणी,संख्या ओळख,रंग ओळख,शरीराची ओळख इत्यादी बाबींतून त्याला संस्कराची शिदोरी मिळणं गरजेचं असतं.

बालकांच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा हिस्सा बालगीते,गोष्टी आणि चित्र काढणे व त्याचे रंगभरण करणे हे असते.पण आपल्या अंगणवाडीत ठरलेली बालगीते आहेत.जे त्या बालकाच्या आई-वडिलांनी लहानपणी म्हटलेले असते तेच बालक आजही म्हणत असते.उदा-नाच रे मोरा,मामाच्या गावाला जाऊ या...पिढीनुसार बालगीते विज्ञान,इतिहास,गणित भूमितीशी निगडित असायला हवीत.अशा बालगीतांमुळे मुळे प्राथमिक शिक्षणात रुची निर्माण होते.गोष्टींचे ही तसेच..जास्त गोष्टी देवाभोवती असतात.तिथे महापुरुषांच्या, विज्ञानाच्या, काल्पनिक गोष्टीना स्थान नसते.ते असायला हवं.बदलत्या काळानुसार बालगीते,गोष्टींत बदल म्हणजे उदाहरण सांगायचे झाले तर..सद्या पाण्याची समस्या आहे.पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी,बालगीते  नेहमी बालकांच्या कानी पडायला हवीत.अंगणवाडीत किंवा पालकांनी आपल्या घरात कोरे पेपर ,रंगपेटी कायम ठेवायला हवीत.ते ठेवल्याने मुले हवं तसं कागदापासून फुले,पक्षी,वस्तू बनवणे ,त्या कागदावर रेघा ओढणे,कशीही ओबडधोबड चित्रे काढणे.हे त्यांच्या बुद्धीला चालना देत असते.

अंगणवाडीतील सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका ही अंगणवाडीसेविकेची असते.त्यांना आजही योग्य पगार व महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षण मिळत नाही.त्या कायम अपडेट ठेवण्यासाठी सरकारने त्यांचे प्रशिक्षण घ्यायला हवे.जर सरकार ते घेत नसेल तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांनी मागणी करायला हवी.त्यात त्यांना मुलांशी भावनिकदृष्ट्या जुळवून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कारक्षम सवयी कशा लावता येतील याचे शिक्षण कसे द्यावे,काळानुसार बदलणाऱ्या शिक्षणासाठी अंगणवाडीची काय भूमिका राहील हे सतत त्या माध्यमातून सांगायला हवे.उदाहरणार्थ सध्या सोशल इमोशनल लर्निंग(SEL) द्वारे शिक्षणावर भर दिला जात आहे.ते अंगणवाडीत रुजवण्यासाठी  सेविकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे.गावातील किंवा शहरातील प्राथमिक,माध्यमिक शाळेंच्या मुख्याध्यापकांनी बालवाडीकडे लक्ष द्यायला हवे कारण त्यांच्या शाळेत प्रवेश घेणारी मुले अंगणवाडीतूनच येत असतात .म्हणून अंगणवाडीतच मुलांचा पाया भक्कम करण्यावर स्थानिक नागरिकांची धडपड कायम राहिली तर त्या बालकांचे प्राथमिक शिक्षण सुकर झाल्याशिवाय राहणार नाही.
__________________________________
शिरीष उमरे, मुंबई
लहानपणापासुन घरकोंबडा राहायची सवय नसल्याने आमच्यावेळेसचे बालकमंदीर म्हणजे आनंदी आनंदी गडे ! अशी स्थिती होती.  फारसे आठवत नाही पण गोपालकाला म्हणजे सामुहीक जेवण आणि सुसु ला आली तर ताईंना सांगणे एवढेच लक्षात आहे. बाकी वेळ मित्रांसोबत फुल मस्त्या ! काय खेळायचो हेही आठवत नाही....

थोडक्यात आईबाबा व्यतिरिक्त ताई व पोलीस आपल्याला चुक केली तर मारु शकतात ही सामाजिक जाणीव झाली होती. मैत्री म्हणजे निखळ आनंद व मज्जा हे उमगले होते. घर ते बालकमंदीर यामधे मोठे विश्व असते ह्याची जाता येता चुणुक बघितली होती. सामाजिक शिस्तेची पायाभरणी इथुनच झाली होती. 

आत्ताच्या अंगणवाड्या त्या मानाने बऱ्याच चांगल्या वाटतात. जगाची व शिक्षणाची खरी ओळख इथुन होत असल्याने ह्या एक वर्षात मुलांच्या मन, भावना व बुध्दी विकासाला चालना मिळते.  खरे तर एक माणुस कींवा नागरिक म्हणुन जी सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणेला सुरुवात होते त्यासाठी सुक्ष्म अभ्यासाची गरज आहे. विकसित देशात ह्याची फार काळजी घेतल्या जाते कारण ते उद्याचे नागरिक घडवत असतात.

 आपल्याकडे सुध्दा असा अभ्यास होणे गरजेचे आहे. ऑडीओ विडीओ इंपॅक्ट साधुन करमणुक, ज्ञान व संस्कृती यांची सांगड घातल्या जाऊ शकते. वेगवेगळ्या नाविण्यपुर्ण खेळांतुन टीमवर्क, खिलाडुवृत्ती व शारिरीक आरोग्याचे महत्व बिंबवल्या जाऊ शकते. त्यासाठी दुरदृष्टी असणारे नेते, शिक्षक व साधनसुविधांची गरज आहे...
___________________________________

पाणी..


शिरीष उमरे, मुंबई

पाणी लागतच जिवंत राहायला !!
माणुस म्हणा.. जनावर म्हणा.. पक्षी म्हणा.. जलचर म्हणा.. वनराई म्हणा... आपल्या पृथ्वी चे वैशिष्ट्य आणि अस्तीत्व म्हणजे पाणी !!

पावसाचे पाणी व भुगर्भातील साठलेले पाणी दोनच स्रोत्र आहेत पाण्याचे उपलब्ध ... विहीरी, तलाव, झरे, नद्या सगळे आटत चाललेत... आता समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. का आली ही वेळ ? मागील ३० वर्षापुर्वी बिनधास्त कुठल्याही ठीकाणचे पाणी पीऊ शकत होतो... आता बॉटलचे पाणी पिण्याची वेळ आली आहे...

ह्या तीन दशकात मानवाने पृथ्वीला इतके ओरबाडले आहे की आता विनाशाकडे वाटचाल सुरु झाली आहे. जंगल नष्ट केलीत, कारखाण्यांमुळे हवा पाणी प्रदुषीत करुन टाकली, पाण्याचा व्यापार करण्यात माणुसकी मारुन टाकली... कुठल्याही खेड्यात जा.. कोल्ड ड्रींक विकत मिळेल पण शुध्द पाणी पाजणारा माणुस मिळणार नाही...

आता ना नियमीत पावसाचे पाणी मिळत आहे ना भुगर्भातील पाणी ... पहीली गरज पिण्यासाठी, मग शेतीसाठी व शेवटी उद्यागासाठी असे करावयाचे सोडुन पैश्यासाठी मुठभर राजकारणी व व्यापारी लोकांनी स्वत:च्या नितीमत्तेला विकुन टाकले. पाण्याचा अपव्यय फॅशन तर पाण्याचा व्यवसाय नफ्याचा धंदा झालाय.

परिस्थिती हाताबाहेर जात असतांना आता सगळेजण खडबडुन जागे झाले आहेत. जंगल पुन:र्वसन, पाणी संवर्धन, नद्यांचे पुन:र्जीवन, पाणी वापर कायद्यात बदल, पाणी बचत हे महत्वाचे मुद्दे होऊन त्यावर काम होणे सुरु झाले आहे...

ही शेवटची संधी !! मुठभर संधीसाधु लोकांविरुध्द सामान्य जनतेची लढत यशस्वी ठरली नाही तर पृथ्वीची विनाश अटळ आहे... पुढची पीढी माफ करणार नाही आपल्याला...
________________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
पावसाळ्यात ढगातून येत पाणी,
सांगा बरं साठवत का त्याला कोणी।

सांगाल का कोणी कोठून येत पाणी,
पिण्यासाठी नळातून येत पाणी,
शेतीसाठी विहिरीतून येत पाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
दुष्काळ असेल तर डोळ्यात येत पाणी,
कारण याच पाण्यासाठी फिरावं लागत अनवाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
प्रत्येक पावसाच्या थेंबाचे व्यवस्थपन करत का कोणी,
नसेल करत तर राडवणारच ना आपल्याला पाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
देवाची करणी अन नारळात पाणी,
पाणीच नसेल तर लोक करतात येड्यावाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
पृथ्वीवरच जीवन जपत हे पाणी,
वेळ आली आता जपायची हे पाणी।

" पाणी हेच जीवन आहे. "
__________________________________

अनिल गोडबोले
सोलापूर

काय लिहावं पाण्या बद्दल... पाणी हा विषय लिहिण्याचा कमी आणि अनुभवण्याचा जास्त आहे..
मस्त पैकी पडणारा पहिला पाऊस आणि भिजणारी ती... तिच्या सोबत पाण्यात मिसळून जाणारा तो..

कँटीन वर बसल्या बसल्या गणू ने ऑर्डर दिली , 'चार कट आणि दोन बिसलेरी'.... एकूण बिल 70 रुपये... पाण्याची बॉटल 25 रुपये .. कट चहा..5 रु (स्थळ सोलापूर बाहेर हायवे वरील ढाबा).. ..पाण्याची किंमत..!

"हॅलो म्युनिसिपल ऑफिस.. मी ;;;;; बोलतोय.. आमच्या कडे भारत नगर शेजारी पाईप लाईन फुटली आहे.. पाणी वाया चालले आहे... किती वेळा सांगितलं तरी सुधारणा होत नाही कशी."
पलीकडून फक्त, "पाठवतो कोणाला तर.. गप बस म्हाताऱ्या"...  रस्त्यावर साठलेल्या पाण्यात छोटी मुलं उड्या मारत होती... रामराव मात्र गरोदर सुनेला ... रिक्षा पर्यंत घेऊन कस जायचं... याचा विचात करत होते..

"ओत बे पाणी अजून... लैच हार्ड पॅक झाला हाय... ह बघ टोटल टेंडर साडे तीन कोटीच हाय.... त्यातले 20 लाख माझी फी आणि वरचे 30 लाख बाकीच्यांचे... बाकीचे अडीच मधी ते टाकी आणि पाईप लाईन भागवा."  "एवढे ... रावसाहेब सिमेंट, वाळू, कामगार महाग झालं जीएसटी मूळ काही सुटत नाही... मागचे पण 1 कोट राहिलेत... बघा जरा गरीबकड."
"आ..  होत न्हाय एवढ्यात??... ते महेता लागलाय माग... करू का सही तिकडं...उग मराठी माणूस कॉन्ट्रॅक्ट घेतलाय म्हणून मदत करायला तर काय इचारुच करू नको आमचा."
भागवतो साहेब...

मुंबई चे साहेब मिटिंग ला येणार म्हणून ग्राम पंचायत मध्ये गडबड चालू होती... तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आलं... "सायबला पानी रं..!" सरपंच दात कोरत म्हणाले, "अन्वर कडन जार मागीवलाय... " (मिटिंग जलयुक्त शिवार अभियान पाहणी आणि पेयजल विकास मंत्रालय अधिकारी)

5 दिवसा आड पाणी पासून 10 दिवस कमी दाबाने पुरवठा.... या रोजच्या वार्ता...

एवढ कशाला आता, कोणाला तरी बघून "काळजाक पाणी पाणी" देखील होत नाही...

पाणी, जल, एच टू ओ... जीवन पृथ्वीवर 71% आहे...  आपण उगाचच चिंता करतो....

मध्येच एक बातमी "केपटाऊन मध्ये पाण्याचे रेशनिंग"...

नळ तोट्या पाईप आणि व्हॉल्व तर बदलण्याची गरज पडे पर्यंत दुरुस्त करायचे नाहीत असा एक नियमच आहे भौतिक शास्त्रांत..

तिसरं महायुद्ध पाण्यामुळे होणार म्हणे... "चुल्लूभर पानी मे डूब मर..." अस म्हणताना चूळ भरायला तरी पाणी मिळेल??

तिकडे रेडिओ वर एक गाणं लागलं होतं."आज ब्ल्यू है पानी पानी..।"

पाणी वाचवा वगैरे काम ते पाणी फाउंडेशन करतय ना... सरकारी यंत्रणा आहे की... ,माझा काय संबंध... मला कम्पणीत नोकरी पाहिजे पुण्याला... बस.. बाकी काय खर खर नको डोक्याला माझ्या...

तर पाणी... मला तर हे अनुभव आहेत... आता थांबतो... 7 दिवसांनी पाणी आलं आहे... उद्या अंघोळ पासून पिण्या पर्यंत पुन्हा 7 दिवस भागवायचे आहेत..
"लाव रे तो कुलर..."
__________________________________
     
पवन खरात, अंबाजोगाई.

पाणी हे जीवन आहे,
यावर बोलतील सर्वजण छान।
बचत करा पाणी म्हणलं की,
बंद होतील सर्वांचे कान ।

संपून जाईल पृथ्वीवरील पाणी,
ओस पडतील सारे गाव ।
पैशात सुद्धा तोलायचा नाही,
पाण्याच्या कॅप्सूलचा भाव ।

उन्हाची झळ लागली की,
आठवेल हिरवागार झाड ।
जेव्हा कोरड पडेल घशाला,
दिसेल फक्त कोरडा आड ।

जर पाणी वाचवलं उदयासाठी,
तर सृष्टी सुद्धा ही टिकेल ।
तूच जबाबदार या सर्व विनाशाला,
हाव निसर्गावरील कधी रे सुटेल ।

माझी पिढी पाहून गेली,
नदी नाला सागर तलाव ।
येणाऱ्या पिढीला खरेच
आठवेल का रे H2O हे नाव ।

पाणी वाया घालवू नका,
मिळतय म्हणून फुकट ।
पाण्यावाचून तुझं माणसा,
होईल जगणं हे बिकट ।

पाणी वाचवा,जपून वापरा ।
आहे पाणी हे अनमोल ।
खरंच आहे मित्रांनो,
जल है तो कल है ।
_________________________________

 किरण पवार
औरंगाबाद,

                 आणायचं कोठून ? पाणी.... हाच महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या मराठवाड्यातील काही भागात तरी. लातूरकडच्या काही गावांची परीस्थिती तर मुत्यंत बिकट आहे. लोक रातरात दोन-तीन वाजेपर्यंत पाण्यासाठी जागे राहतायेत. दुष्काळ पडलायं पण फरक आजवरही कोणालाच पडला नाही. मराठवाडा पहिल्यापासूनच तसा महाराष्ट्राच्या राजकारणात तितकासा महत्त्वाचा गणलाच गेला नाही. बऱ्याच भ्रष्टावादी नेत्यांमुळे असेल, असो. पश्र्चिम महाराष्ट्र सुखात आहे. त्याला जोवर झळा बसत नाहीत तोवर कोणीही विदर्भ वा मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात कोणी लक्ष देणा नाही. दिखावा आजतागायत चालूच आहे. पाण्याचा मुद्दा झाडांशी येतोचं. पण फक्त लावले किती ? हाच प्रश्न विचारला जातो. जगवले किती याचं काहीच माप नाही. रस्त्यांच्या कामात मोठीमोठी वृक्षतोड होते आणि बदल्यात दुभाजकात ठराविक झाडचं लावली जातात‌. आज त्याने बहुतांशी झाडांची प्रजातीही नष्ट होत आहे. त्याचा इनडारेक्ट परिणाम आरोग्यावर होतोयं. पण आम्हाला हे जाणून घेणं नकोयं. पाण्याचा प्रत्येक श्वासासी संबंध आहे. मग तो तितका महत्त्वाचा न घेता सरळ बऱ्याचदा मस्करितही डावलला जातो. आज पाण्याअभावी वृत्तपत्रात रोज किमान एक बळी गेल्याची बातमी असते. पण आम्हाला अजूनही गांभीर्य नाहीच. असं चालू राहिलं तर एक दिवस तडफडून पाण्याविना माशासारखं मरावं लागेल; एवढं मात्र नक्की.
__________________________________

वाल्मीक फड 
निफाड नाशिक

खुप सांगुनही जनतेला पाण्याबद्दल गंभीरता जाणवत नाही.पाण्याबद्दलची दखल वेळेतच नाही घेतली गेली नाही तर फार मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत.पाण्याचे मुळ म्हणजे झाड आहे त्यामुळे झाडे लाऊन भागनार नाही तर त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे आहे.
मला तर वाटतंय की,आपण आपल्या घरासमोर आपल्या शेतात आपल्या कुटूंबात जेवढी सदस्य आहेत त्या प्रमाणात,संख्येत आपण वृक्ष लागवड केली तर भरपूर झाडेही लागतील आणी झाडांचे संगोपनही होईल.पण हे करीत असताना आपण आपल्या मुलाबाळांची जशी काळजी घेतो त्या प्रमाणेच झाडांचे संगोपन केले तर सारा देश हिरवागार होईल आणि मुळ पाण्याची समस्या दुर होण्यास फार मदत होईल.
आज गावाकडे मि बघतोय जे लोक आज रानात शिवारात वास्तव्य करुन आहेत त्यांचे फार हाल झालेले आहेत,डोक्यावर हंडे घेऊन माता बघीनी खुप दुरवर जावे लागत आहे.त्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे.जनवरांना चार्याचे जुगाड करावे की,पाण्याचे हा प्रश्न आज ग्रामीण भागातील शेतकर्याँना पडलेला आहे.
यावर जालीम उपाय म्हणजे जेवढे वृक्ष लागवड करता येईल तितकी अधिक वेगाने करावी लागेल.तसेच बंधारे,धरणे यांचा गाळ काढून पाण्याची क्षमता वाढवून जेवढे पाणी जमीनीत मुरवता येईल तेवढे पाणी जमीनीत मुरवावे लागेल.
शहरातील लोकांनीही आपले पाणी वापरताना काळजी घेतली पाहीजे.आपल्या रहात्या घराजवळ जागा ऊपलब्ध असेल तर वृक्ष लागवड केली पाहीजे.अतिरिक्त पाण्याचा अपव्यय टाळला पाहीजे.
पाणी हेच जीवन आहे हे आत्ता तरी आपणा सर्वांना कळावे हिच परमेश्वराला प्रार्थना करतो.🙏🏻🙏🏻🙏🏻
__________________________________

मुकुंद शिंदे.

 नाव च ऐकलं की एक बिनरंगाच,बिनचवीच एक द्रव्य समोर येईल.
कुणाच्या डोळ्या समोर समुद्राचं निळशार पाणी,तर कुणाच्या समोर झऱ्यातून झुळझुळणार पाणी.
पण आज काल चित्र बदलत चालय,आणि आता उन्हाळ्यात तर फक्त पाणी म्हणलं की समोर येत ते कोरड्या पडलेल्या विहरी,कोरड्या नद्या आणि रिकामी भांडी,म्हणजेच दुष्काळ।
चित्र कुटच कुठे पण बदलय नक्कीच,आणि त्याला आपणच कारणीभूत आहोत.
आता म्हणलं जातंय की पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल पण यातील "होईल" हे क्रियापद बदलून "होतय" अस म्हणायला पाहिजे आता कारण आपण सद्या पाकिस्तान मध्ये जाणार पाणी अडवण्याचं विचार करतोय तर 'चीन आपल्या देशामध्ये येणार पाणी अडवण्याच्या' तर आपल्या राज्या मध्ये ही वाद चालू च आहेत 'कर्नाटक-महाराष्ट्र' अशे अनेक वाद चालू झालेत.
10 वर्षा पाठीमागे जर कुणी बिसलेरी मधून पाणी पिण्याचा विचार केला असता तर नक्कीच हसलो असतो,पण काळाने ती ही वेळ बदलली."हे जर असच चालू राहील तर
आपण कमावलेला पैसा पुढची पिढी,तो सर्व पैसा पाण्यात(पाण्यासाठी) घातल्या शिवाय राहणार नाही".
_________________________________

यशवंती होनमाने.

पाणी रे पाणी तेरा रंग कैसा .....
      पाणी म्हटल की आपल्या डोळ्यासमोर काय येत .........तर .....भरपूर पाणी , मुबलक पाणी , कुठेही पाण्यासाठी वणवण नाही .कुठेही अगदी सहज उपलब्ध होणारे .....पण आत्ता अशी परिस्थिती आहे का ? ? ? ?
पूर्वी मी सातारा जिल्ह्यात जॉब करत होते तिथे कधीही पाण्याची अडचण जाणवली नाही .पण मुळातच मी सोलापूर भागातील असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरायचे याची शिकवण .पण सध्या मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात जॉब करते .बापरे ...खुप अडचण आहे इकडे पाण्याची .मला तर कधी कधी वाटत की पळून जाव .खुप ऊन , पाणी अगदी मोजकेच , पाण्यासाठी ची दूर दूर ची भटकंती ...खुप त्रास आहेत इकडे .आपण जर पाणी जपून नाही वापरलं तर महाराष्ट्राचा वाळवंट होईल .
     म्हणून सांगते पाणी जपून वापरा ..जल हैं तो कल हैं ! ! ! ! !
_________________________________

स्वप्नील चव्हाण, बुलढाणा
 
     विषय आला की पहिले ते भारुड आठवत....."पाणी हरवलं ,कोणी ते चोरलं.. आणि शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं"...
  एकदम कमी शब्दात परिस्थिती सांगून जातं हे भारुड......मुद्दा हा नाही की पाणी वाचवता येणार नाही ,मुद्दा हा आहे की पाणी कोण वाचवणार......कारण कदाचितच असा कोणी असेल ज्याला हे माहीत नाही की आपल्याला पाण्याची कमी भविष्यात जाणवेल आणि आताही बऱ्यापैकी जाणवत आहेच......पण तरीही आम्ही पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न करणार नाही....आम्ही झाडे लावणार नाही.....त्याच्यासाठी सरकार आहे ना.!!
       मला नाही वाटत आज कोणी फोटो न काढता झाड लावत असेल म्हणून..... कारण आपल्याकडे दाखवणारे जास्त आहेत करणारे कमी...... म्हणून एक सरळ साधा दृष्टिकोन हाच राहील की जर पाणी वाचवायचं असेल तर सुरुवात  स्वतःपासून करावी.....छोट्या-छोट्या गोष्टी असतात अगदी अंगोळीपासून तर गाडी धुण्यापर्यंत....जिथे पाणी वाचवता येऊ शकत...जनजागृती गरजेची आहेच पण त्याला कृतीची साथ कशी देता येईल यावर जास्त भर दिला तर भविष्यात येणाऱ्या अडचणीना मत देता येईल......
      " पाणी अडवा,पाणी जिरवा"  प्रकल्प कागदापेक्षा प्रत्यक्षात उतरले तर पाणी वाचेल......"रेनवॉटर हार्वेस्टिंग" पुस्तकात सगळे शिकलात पण किती जणांच्या घरात आहे ,हा विचार करा.....तुम्ही झाडं कापून घर बांधता, पण झाड लावताना तुम्हाला नकोस वाटत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.......
    शेतकरी आत्महत्या करून पण त्यांच्या वेदना तुम्हाला कळत नसतील तर खरंच विचार करा.....
    पाणी लागतंच ....सगळ्यांना..... मग सगळ्यांनी मिळून वाचवूयात.....विचार गृप च्या माध्यमातून लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करा....लोकांची मानसिकता बदलू द्या....आजचा विचार उद्याची मोहीम बनऊयात....आणि पाणी वाचवूयात.......

      पाण्याशिवाय आयुष्य नाही.....म्हणून आयुष्य वाचवूयात......
__________________________________

मनिष लता अशोक 
सातारा

पाणी हा शब्द तसा दोन अक्षरांचा पण किती ना मोठेपण त्यात आहे. पाणी म्हंटले की आपले जीवनमान त्यावर अवलंबून आहे. पाणी हे अनमोल आहे त्याचे मोजमाप करणे हे अशक्य... पण सध्य परिस्थितीत पाणी आणि पाणी एवढेच चालू आहे. पाणी हे काय?केवढे? कसे?कुठे? हे सर्व प्रश्नचिन्ह सध्या आपल्या समोर आहेत. त्यावर काय करावे काय करू नये हे जाणून घ्यायला हवे. सध्या मी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुक्यात पाणी पुरवठा करणाऱ्या संसाधनांचा अभ्यास करत असताना मला आलेले अनुभव आपल्या समोर मांडत आहे. येथील काही भागात पाझर तलाव, सिंचन तलाव, शेत तळे, बंधारे(लघुबंधारे, मोठेबंधारे) यांची असणारी सध्य परिस्तिथी आणि लोकांना त्याबद्दल असणारी आस्था ह्याचे प्रमाण फारच तारतम्य असे होते. काही गावालगत पाणी पुरवठा करणाऱ्या स्तोत्रांचा पुरेपूर वापर तेथील गावकरी करतात. पण एक गोष्ट मात्र ते लक्षात घेत नाही की कमीत कमी आणि पुरेसा वापर कसा करावा की बाकी लोकांना त्याचा फायदा कसा घेत येईल ही समज कमी प्रमाणात आहे. एका गावात काही शेतकरी वर्गाशी चर्चा करताना असे आढळून आले की जानेवारी ते जून (थोडक्यात पावसाळा सुरूवाती परेंत) त्यांस घरटी ५ ते ७ लोकांसाठी ५०० ते ६०० लिटर पाणी(पिण्यासाठी, वापरासाठी, धूण-भांडी)लागते. एरवी १०० ते २००लिटर पाणी पुरेसे असते. हे झाले पाणी वापरबद्दल पण जेव्हा संवर्धनाबद्दल विचारणा केली असता कोणासही काही माहीत न्हवते किंवा काय बोलावयास तयार न्हवते. शेतीमधील होणारी मातीची धूप, खतासाठी किंवा अडचणी मध्ये येणारी झाडे पाला, गवत जाळणे याने होणारी मातीची धूप याबद्दल त्यामध्ये नैराश्य दिसून आले.. गावातील सर्व एकजुटीने येऊन काम करण्यास व पाणी संवर्धनासाठी काही ठराव हाती घेण्यास माघार घेत असताना आढळले. स्वतः पुरता पाण्याचा प्रश्न किंवा गावपूरता सुटला म्हणजे खुप गॉड अस आहे. पण हेच पाणी आपण भविष्यात कसे जास्त प्रमाणात वापरता येईल किंवा त्यासाठी काय करता येईल या संदर्भात प्रबोधन करणे गरजेचे आहे. लोकांना पाण्या संदर्भात गांभीर्य असणे हे गरजेचे आहे, असे मला लोकांच्या सहवासातुन जाणून आले. हे सांगण्याचे कारण एवढेच की पाण्यासाठी वण-वण करणारे माझे माय-बाप व लहान लेकरे यांनी एकत्र येऊन पाणी संवर्धनासाठी एकत्र यावे.. व पाण्याचा अट्टहास करता पाणी हवे तेथे श्रमदान असा करावा....

ह्या सोबत एक फोटो पाठवत आहे पिण्याच्या पाण्यासाठी लहान लेकरांचा अट्टाहास....

लिहिण्याचा पर्यंत केला आहे. कसे वाटले आणि लेखनात काय बदल अपेक्षित आहे सांगावे...
_________________________________

    निखिल खोडे, पनवेल.

              पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे याची जाणीव आता आपल्या सर्वांना व्हायला लागली आहे.  जितक्या काटकसरीने आपण ते वापरू तितके पाणी जास्त दिवस पुरणार आहे. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे पण ते वापरत असताना जरा थोडे जपून अथवा काटकसरीने वापरले तर त्यात फक्त आपलेच नाही तर इतरांचे सुद्धा भले होईल. पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब कसा साठवला येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. काही पाणी बचतीचे मार्ग:
१) घरातील फरश्या, गच्ची, जिने धुण्याच्या फंदात पडू नका. ओल्या पोछाने जरी पुसले तर त्या स्वच्छ राहतात.
२) पाण्याचा कोणी चुकीचा वापर करत असेल तर त्याला योग्य प्रकारे समजावून सांगा.
३) घरा वरील पाण्याच्या टाक्या नळ बंद न केल्यामुळे विनाकारण वाहत राहतात त्या वाहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४) कालचे भरलेले व उरलेले पाणी शिळे झाले म्हणुन फेकून देऊ नका. पाणी एका दिवसात शिळे होत नाही.
५) बोअर च्या सभोवताल किंव्हा नजीक सात ते आठ फूट खोल खड्डा खणा. या थरात मोठे दगड, बारीक खडी, विटांचे तुकडे, जाडी रेती टाकून हा थर भरून टाका व घरावरील पावसाचे पाणी या खड्ड्यांजवळ सोडून द्या. हा खड्डा ते पाणी शोषून घेईल व पाणी पाझरत पाझरत जमिनीच्या भूर्गभाशी जाऊन शुद्ध होईल. त्यामुळे जमिनीत पाण्याचा साठा वाढेल.
__________________________________

 शुभम आशा कैलास
तालुका, जिल्हा सातारा.

हा असा विषय आहे की त्यावर लिहिलं जाईल तेवढं कमीच वाटणार, कारण प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी, त्याच अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. आता माणसाबद्दल बोलू, कोणताही व्यक्ती 3 आठवडे काही न खाता जगू शकतो पण पाण्याशिवाय तो 2 ते 3 दिवस जगू शकत नाही. एका लेखामध्ये वाचलं होतं की आपण पाण्याशिवाय 100 तास जगू शकतो ते पण जर तापमान नॉर्मल असेल तरच. हा आता महात्मा गांधींनी 21 दिवसांचा सत्याग्रह केला, होता पण सध्या विषय आहे पाण्याचा. पाणी हे प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. सध्या मी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामधील गावानं मध्ये पाण्यावर अभ्यास करायला आलोय. आपल्याला माहीतच आहे यवतमाळ हा विदर्भातील जिल्ह्यातील एक जिल्हा आहे. इथे वर्ष 2 वर्षांपूर्वी पाण्याचे टँकर पुरवावे लागले होते पण सध्या तशी परिस्थिती पाहायला नाही दिसत. पाणी फौंडेशन मुळे तसेच जेवढ्या काही NGO असतील त्यांनी यवतमाळ कडे आकर्षित झाले पाणलोट विकासाच्या कामांसाठी. तसेच CAIM प्रोजेक्ट द्वारे जी काही कामे पाणलोट विकासाच्या लक्षेत्रामध्ये झाली त्यामुळे ही येथील भूजल पाण्याची पातळी वाढायला मदत झाली. CAIM हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकार ने 2013 च्या आसपास सुरू केला होता. विदर्भातील शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या यांसाठी हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. या पाणलोट विकासाच्या कामांमध्ये धान फौंडेशन चाही काही प्रमाणात वाटा आहे. तसेच नवचेताना NGO ने हज भरपूर चांगल्या प्रमाणात वाटरशेड अंतर्गत कामे झाली. लोकांमध्ये झालेल्या संवादावरून अस जाणवलं की जलयुक्त शिवार या योजनेत फक्त खर्च खूप मोठ्या प्रमाणावर झाला त्यातून प्रत्यक्ष शेतकऱयांना फायदा खूप कमी प्रमाणात झाला. शेतकऱयांच्या तुलनेत सरकारी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना खुप फायदा झाला असे लोकांसोबत चर्चा केल्यानंतर जाणवलं. पण काही योजना खूप च चांगल्या पद्धतीने झालय असाही जाणवलं. उदा., मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ झालेली लोक व मला भेटली. पण मी धान फौंडेशन या संस्थेमार्फत इथं आल्या असल्यामुळे मला बरीचशी कामे ही धान फौंडेशन ने केलेली च पाहायला मिळाली. मी पाणी फौंडेशन च्या ही फील्ड वर जाऊन भेटी दिल्या. मी कामे पहिली आणि प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर झालेली कामे पुढील प्रमाणे:
1) शेततळे
2)डाहलीचे बांध
3)सिटीसी
4)शोष खड्डा
5) मातीचा लहान बांध
6) सिमेंट नाला बांध
यापेक्षा ही जास्त नाव आहेत पण सध्या एवढीच आठवताहेत. वरती दिलेल्या कामांचा उद्देश एकाच आहे की भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासली नाही पाहिजे. पाणी फौंडेशन च्या द्वारे एक पाण्यासाठी चळवळ उभी राहिली आहे. भविष्यामध्ये या गोष्टींची मोठी नोंद घेतली जाईल. जल है तो कल है अस म्हणतात ना ते खर्च आहे. एवढं बोलून थांबतो. लेखामध्ये काही सुधारणा असतील नक्की सुचवा आणि काही समीक्षा करायची असेल तर मला वैयक्तिक मेसेज करा,
वाचल्याबद्दल धन्यवाद.
__________________________________
टिप-(सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहे)

माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग


 

 विश्वनाथ कदम.  वसमत जिल्हा. हिंगोली



माझ्या परिवारातील सद्स्य, नातेवाईक, माझ्या गावातील प्रतिष्ठित नागरीक आणि माझे जिवलग मित्र...
 

           सर्वप्रथम मि आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहु  इच्छीतो..
 

       कारण आज ठिक  एक महीना पूर्वी (दि.७  मे) घडलेल्या घटनेतून माझ्या अमूल्य जिवाचे जतन करून, पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहन्यासाठी, जगण्यासाठी, संकटातून सावरण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे मानसीक पाठबळ दिले, धैर्य दिले,  वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली,मनात नवचेतना जागरूक केली. त्यामुळे मि आपल्या सर्वांच्या जन्मोजन्मी ऋणात राहीन.
 

        नेमक  घडल आस कि नेहमी गावाकडे आले की मि  विहीर पाहण्यासाठी काम सुरू होते त्या विहरीत जायचो.     आसच  पाडव्याच्या दुस-या दिवशी विहरीत  पाहण्यासाठी गोलो  होतो, जाताना क्रेन मध्ये गेलो. पण काही वेळानंतर  त्या क्रेनच  ब्रेक तुटल मग काम करना-यांनी वर येण्यासाठी दोरी बांधुन दिली, माझ्या आगोदर दोन व्यक्ती त्या दोरीने वर आले(अंकुशराव आणि लोडबा)त्या नंतर मि वर येत असताना अर्ध्यात आल्यानंतर माझे त्या दोरीचे हात सुटले आणि मि खाली विहरीत पडलो...
 

   मि विहीरीत पडल्यानंतर एक खळबळ उडाली ,सगळ्याची धावपळ सुरू झाली. नेमके याक्षणी काय करावे? मला कस वर काढाव? हे सगळ्यांनाच प्रश्न पडले.  प्रत्येकाच्या मनात वेगवेळ्या शंका येत होत्या. त्यात  कुणी दोरी(धांद) आण, कुणी रूमाल आण, कुमी  बाज  आण.   कुणाच्या पायात चप्पल नको ( सोपान),कुणाच्या डोक्यावर रूमाल नको तर कुणाकडे तेवढी लांब दोरी नही. कुणी शेताकडे दोरी आनन्यासाढी धावतोय ,तर कुणी कुणाच्या घरी दोरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, जो तो आपल्या परिने प्रयत्न करतोय. विहीरीत जो व्यक्ति होता ( दिलीपराव) त्यांनी स्वतः चा रूमाल माझ्या डोक्याला बांधून रक्त 💉थाबवन्याचा प्रयत्न केला.  शेवटी पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करून एका तासानंतर बजेवर  बांधून मला वर काढले.
       
          काढल्या नंतर सरू झाला दवाखान्याचा प्रवास, सुदैवाने तेंव्हा गावात वाहन उपलब्ध होत (सुधाकरची गाडी) दवाखान्यात पोहोचताच उपचार सुरू झाले. त्यानंतर दिनांक ९ मे ला मला होश आली.माझ्या सोबत अस काही घडले हे कळाल.( यातल  मला काही माहीती नव्हत पण दवाखान्यातून परतल्यानंतर बर्याच जणांकडून ही घटना खुप वेळस कानी पडली.)

परंतु आज माझ्या वडीलांच्या प्रयत्नांनी आणि आशिर्वादाने, मोठ्या आत्याच्या प्रयत्नांनी आणि आशिर्वादाने, मोठा भाऊ आणि ताईच्या प्रयत्नांनी आणि आशिर्वादाने,  गावकर्यांच्या प्रयत्न आणि सहकार्याने आणि मित्रांच्या सोबतीने पुन्हा एकदा मि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळ आपल्यामुळे शक्य झाले त्यामुळे ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न केले त्यांच्या सदैव  ऋणात राहीन.. संकटाच  काय ते तर येण्यासाठीच असतात. स्वामी विवेकानंदांना सुद्धा शिकागोच्या धर्म परीषदेय गेल्यानंतर राहन्यासाठी व जेवनासाठी दारोदारी फिरावे लागले ,मि तर एक सामान्य व्यक्ति आहे. तुमच्या सोबतीने या संकटाचा सामना केला तसा कुठल्याही संकटाचा करेल.
     

               खरच सदैव मि  तुमच्या सर्वांच्या ऋणात राहीन....



खरच माझ्या साठी हा प्रसंग खुप खुप प्रेरणादायी आहे.
__________________________________

अनिल गोडबोले
सोलापूर..

या विषयावर लिहिण्यासाठी प्रसंग शोधत होतो तर भली मोठी रांग लागली... आठवणींची.. कोणी कुठे.. कस.. आपल्याला प्रेरणा दिली असेल.. याची

लहान पणी मला आठवत आहे... तिसरीत असताना. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर भाषण दे... तू बोलशील व्यवस्थित" अशी प्रेरणा आमच्या एक शिक्षकांनी दिली.. आणि मी पहिल्यांदा शाळेबाहेर जाऊन एका कार्यक्रमात भाषण दिल..(अर्थात पाठांतर करून) पण त्या नंतर मात्र प्रत्येक वक्तृत्व स्पर्धा मी सहभाग घेतला.

त्या नंतर मला आठवत की बीएस्सी करून मी जॉब शोधत होतो... आणि मला समाजकार्य करणाऱ्या संस्थे मध्ये नोकरी मिळाली..."तिथे रोज, एच आय व्ही/ एड्स, कंडोम, आजार, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, ट्रक ड्रायव्हर.. या ठिकाणी काम करण्यात मला काहीच कळत नसे. कारण घरी किंवा मित्रात देखील असे विषय कुठे नसतात.. आणि डायरेक्ट रस्त्यावर उतरून माहिती द्यायची?... मी पळून जाण्याच्या विचारात होतो.... पण आमचे एक डॉक्टर होते.. त्यांनी मला समजावलं की तू नाहीतर कोणीतरी हे काम करणारच, त्या नंतर वेळोवेळी सामाजिक प्रश्नांची जाणीव होत गेली...

आता या टप्प्यावर आल्यानंतर मात्र एक प्रेरणादायी गोष्ट अशी घडली की... काही नोट्स वाचण्यासाठी मी मागच्या इ- मेल शोधत होतो. तेव्हा 2009 साली माझ्या एका मैत्रिणी ने पाठवलेला मेल मला पुन्हा वाचायला मिळाला, आणि माझ्या विषयी तीच जे मत होतं.. ते वाचून मला आश्चर्य आणि आनंद वाटला..

मी ज्या वेळेला मेल उघडत होतो तेव्हा डोक्यात बरेच विचार घोळत होते, 'इन्स्टिट्यूट, शिक्षक, पुढची बॅच, नियोजन, परिस्थिती बदलत जात आहे... वगैरे वगैरे तसेच आपण किती प्रयत्न करणार आहे? आयुष्यात कधी यशस्वी होणार की नाही.....आणि अचानक तो मेल।वाचला व आत्मविश्वास वाढला.

2009 साली पाठवलेला एक मेल, जेव्हा मोबाईल मध्ये मेल नव्हता.. नेट कॅफे शिवाय इंटरनेट उपलब्ध नसायचे... त्या वेळी पाठवलेला मेल.. आणि खर तर  तेव्हा जेवढा त्याचा अर्थ कळला नाही.. तेवढा आता समजला..
अचानक पणे विचार करण्याची पद्धत बदलली..

तर उत्तम प्रेरणादायी काय असेल? तर ते त्या त्या वेळी तुमचे नकारात्मक विचार बदलून तुम्हाला चांगलं वागायला भाग पाडत ते सर्व प्रेरणादायी.....
__________________________________

भूषण.
सोलापूर..

काहीच दिवसांपूर्वी ची गोष्ट...
13-14 ऑगस्ट ची..
मुंबई वरून 13 ला रात्र सोलापूर ला निघालेलो..
मुंबई सोलापूर प्रवास तसा नाविनही नाही आणि विशेषही नाही, त्यामुळे उत्साही वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता, रात्री 10:30 ते सकाळी 7:00 पर्यंतचा प्रवास असल्याने निवांत झोप घ्यायची हे ठरलेलं..
सोबत राजेश पण होता पण त्याची सीट दुसर्या डब्ब्यात असल्याने नाईलाजाने त्याला जावं लागलं.
रात्रीचे 11-11:30 वाजले, आता झोपुयात असं ठरवलं पण समोरच्या सीट वर दोघा मुस्लिम व्यक्तींच्या गप्पा सुरु होत्या...दोघेही चांगल्या मोठ्या घरातले आणि सुसंस्कृत दिसत होते आणि सभ्य...ते दोघेही वयाने मोठे असूनही एकदम अदबीने त्यांनी विचारलं की "तुम्हाला डिस्टर्ब तरी होत नाहीए ना, तस असेल तर आम्ही दुसरीकडे जातो?"
तस तर त्यांच्या आवाजाने मला झोप येत नव्हती, पण तरिही मी म्हटलं की मला काही डिस्टर्ब होत नाहीए..
शेवटी झोप काही लागेना.. वेळ जात होती आणि 2:30-3:00 च्या सुमारास ते दोघेपण झोपी गेले अन मलाही थोडी झोप लागली..
सकाळ झाली, 6:00 च्या आसपासची वेळ. डोळ्यांवर झोप स्पष्ट दिसत होती माझ्या, पण सोलापूर येणार असल्याने उठून बसणं गरजेचं होतं..
त्यातल्याच एकाने मला म्हटलं की, "हमारी वजहसे आपकी निंद पुरी नही हुई"
मी फक्त एक smile देऊन गप्प बसलो..कारण त्यांचा सभ्यपणा पाहून मलाही जास्त तक्रार करावीशी वाटलीच नाही..
थोड्या वेळाने तोंड धुवून आल्यावर टॉवेल काढण्यासाठी मी सॅक उघडली तर त्यात एक Badge आणि एक तिरंगा ठेवलेला त्यांनी पाहिला...
आणि मग एकदम सभ्य आवाजात त्यांनी विचारल की ," साहब क्या मै आपसे कुछ बात कर सकता हु?"
मी म्हटलं,"त्यात विचारण्यासारखं काय?"
तर तो माणूस सांगायला लागला, "साहब मेरा भी एक छोटा बच्चा है, वो भी अपने वतन से बेहद मूहब्बत करता है, अभी छोटासाही है, मगर मुझसे कहता है की बापू कल 15 अगस्त है, अपने तिरंगेका त्योहार है, मैने तो ऊसे यही सिखाया है की, बेटा सबसे पहले अपना वतन है, बाकी सब बाद मे, मै ऊसे आर्मी अफसर बनाना चाहता हु.."
मी केवळ ऐकत होतो..
परत मला म्हणाले की ," आप भी कभी मेरे बच्चे को मिलेंगे तो आप भी ऊसे इस मिट्टी से प्यार करने की बाते सिखा देना"
मी खरच काही बोलू शकत नव्हतो, मी फक्त मान हलवून होकार देत होतो..
मला ते म्हणाले की, "साहब, मै कभी कही भी खुद का मजहब अपने देश से बडा नही मानता, और यही बात मै अपने बच्चे को भी सिखाता हु"
त्यांचं बोलणं ऐकून खरच खूप समाधान ही भेटतं होत आणि आनंदही भेटतं होता, एवढ्या छोट्या मुलाला ते कित्ती मोठी गोष्ट शिकवत होते..

कुठे जाती भाषा धर्मासाठी लढणारे इतर लोक, अन कुठे असे देशावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारे लोक.. त्यांच्या बोलण्याने रात्रभरची मरगळ संपली...
ते म्हणतात ना की राष्ट्रनिष्ठेला कुठला धर्म नसतो कारण राष्ट्रनिष्ठा हा स्वतःच एक धर्म आहे..
शेवटी सोलापूर आल्यावर मी उतरत असताना, त्यांनी मला म्हटलं की ," साहब मैने अपने बेटे के लिए तीन झंडे लिए थे, उसमेसे एक आप रख लिजीए, मेरी ओर से आपको 15 अगस्त का तोहाफा,इससे बडा तोहफा मेरी नजर मे कुछ हो ही नही सकता"
.
निःशब्द...!!!
.
केवळ निःशब्द...
.
आजवर मला मिळालेल्या "One of the richest Gifts" पैकी एक गिफ्ट होत ते...
प्रत्येक माणूस जाती धर्माची आयडेंटिटी सोडून, भारतीय म्हणून स्वतःला ओळखु लागला तर मग Brotherhood तयार व्हायला आणखी कशाचीच गरज नाही पडणार..
कोण कुठला तो माणूस,पण त्याने फक्त एक "हिंदुस्थानी" ह्या नात्याने माझ्याशी आपुलकीचा बंध बांधला..
त्याने दिलेला तो तिरंगा एकदम सन्मानाने आणि अभिमानाने घेऊन त्याला शेवटच अभिवादन करून मी समाधानातच निघालो, एका भारतीयांची भेट झाल्याच्या समाधानात...मी निघालो प्रेरणा घेऊन, ह्या देशासाठी झटण्याची प्रेरणा घेऊन...
__________________________________


वाल्मीक फड निफाड नाशिक.

प्रसंग अनेक प्रकारचे येतात माणसावर परंतु प्रतिकूल परीस्थीती असताना जो त्यावर मात करुन तेही न डगमगता पुढे जात असतो तो खरा माणूस असतो असं मला वाटतय.
खरं म्हणजे प्रेरणा फक्त आपले चाललेलं आयुष्य आपल्याला येणारे उत्पन्न यावर आधारीत असली म्हणजे ती प्रेरणा बहुधा इतकी विशेष नाही.खरी प्रेरणा म्हणजे अशी कि,ती प्रेरणा मिळाल्याने माझे देशप्रेम वाढेल,माझ्या हातून समाजातील जे वैचारीक ,आर्थिक तसेच समाजिक दुष्टिने जे मागास घटक आहेत आणी त्यांची सेवा करायला जी प्रेरणा मिळेल त्या प्रेरणेला खरी प्रेरणा म्हणावी असे मला वाटते.
तसा मला गायनाचा नाटकाचा छंद लहानपणापासूनच पण जेव्हा मी आठवीत गेलो तेव्हा माझ्या बाबतीत एक प्रसंग घडला.शाळेत गॕदरींगच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती ,काही मुले नाटकाचा सराव करत होती आणी मी पण त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होतो.शिक्षक वारंवार  सांगुनही राजाचे पाञ असलेल्या त्या मुलाच्या लक्षात काही गोष्टी येत  नव्हत्या.गुरुजी वैतागून गेले पण काही बोलता येत नव्हते.गुरुजींना पाहुन मी मनाचा धिटपणा दाखवत म्हणालो सर मी करुन दाखऊ. सरांनी आशाळभूत नजर माझ्यावर फिरवत मला मानेने होकार दिला.मीही आलेल्या संधीचं सोनं केलं असा राजाचा रुबाब दाखवला आणी मला त्या नाटकात राजाचे काम मिळाले.
जेव्हा माझे संवाद आणी अभिनय सरांनी पाहीला आणी माझ्या पाठीवर जेव्हा शाबासकीची थाप मिळाली मी तर कृतकृत्य झालो.
हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही कारण तिथून पुढे खर्या अर्थाने माझा कलाकारी प्रवास सुरु झाला.कविता लिहिने कथा लिहीने नाटक लिहून स्वताच कलाकार होऊन सादर करणे आणी म्हणूनच हा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्व प्रसंगापेक्षा प्रेरणादायी आहे असे मी मानतो.
__________________________________


श्रीनाथ कासे,
सोलापूर.


नेमके प्रेरणा म्हणजे काय ? त्याचे प्रकार आणि त्याच्या मानवी जीवनातील स्थान, या सर्व गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे.
माझ्यामते, एखाद्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक, धैर्य वाढवण्यासाठी आणि एखादा कार्य करण्यासाठी त्याला मदत करते ती प्रेरणा...
प्रेरणेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक आंतरिक प्रेरणा, दोन बाह्य प्रेरणा.
मला प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळते. माझ्यासाठी सर्वात मोठा " प्रेरणेचा स्रोत "  म्हणजे माझे वडील. माझे वडील भारतीय सैन्यामध्ये होते. मला त्यांच्या सैन्य जीवनापासून प्रेरणा मिळत गेली. पुण्याच्या NDA मध्ये शस्त्र घर माझ्या वडिलांकडे असायचे . तिथे अनेक शस्त्र, बंदुका असायच्या. त्यामध्ये सर्वात छोट्या शस्त्रपासून पासून मोठे रायफल पर्यंत सर्व उपलब्ध असायचे. वडिलांचे मित्र मला माझ्या हातामध्ये, मला न उचलणारे रायफल द्यायचे आणि चालव म्हणायचे मी खूप प्रयत्न करायचो पण ते काय मला जमायचं नाही.
सेवानिवृत्तीनंतर आम्ही आमच्या गावाकडे राहायला आलो ग्रामीण भागांमध्ये लहानाचा मोठा झालो पाचवीला हायस्कूल मध्ये गेलो होतो तिथे प्रथम क्रमांक मध्ये उत्तीर्ण झालो. तिथे निबंध स्पर्धा घेतली जायचे तिथे मी भाग घ्यायचो आणि मनाला येईल ते लिहायचो आणि त्या लिखाणाने मला प्रेरणा मिळायची.
घरी शेती, फळबाग असल्यामुळे मी ते विकायला विविध आठवडी बाजारामध्ये जायचो. तेथे किरकोळ व्यापाराशी संपर्क यायचा. खरं मार्केटिंग काय असतं ?मी तिथेच शिकलो. पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये शेतातील माल घेऊन जायचो. त्याला भाडे खूप जायचे म्हणून आम्ही मालवाहतुकीसाठी ऑटो रिक्षा घेतली. अकरावी आणि बारावी मध्ये मालवाहतुकीस साठी रिक्षा चालवायचो. रात्रभर वाहन चालवणे, दिवसभर शेतातील कामे यामध्ये मला ड्रायव्हर, व्यापारी आणि ट्रॅफिक पोलीस यांचा जवळचा संबंध यायचा. ड्रायव्हरचे काम खूपच कठीण असते. येथूनही मला प्रेरणा मिळाली.
पुढे शिक्षणामुळे गाव सोडणे आवश्यक होते त्यामुळे हे सर्व सोडून आपल्या शिक्षणाचा प्रवास सुरू केला तसेच राजकारणामध्ये आवड असल्यामुळे या ना पार्टीमध्ये उपस्थिती नोंदवायचो.राजकारणामध्ये दोन गोष्टी गरजेचे आहेत एक नंबर जात, दोन नंबर पैसा या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे समप्रमाणात आहे तोच यात टिकू शकतो. नंतर समजलं राजकारणापेक्षा समाजकारण करणे गरजेचे आहे. वडिलांची समाजसेवा गावाकडे सुरू होती. एकदा गावाकडे गेल्यावर समजले की राजीव गांधी पेन्शन योजनेसाठी काही विधवा स्त्रिया आणि दारिद्र्य रेषेखालील काही वृद्ध आपल्या घरी चकरा मारत होते. मी वडिलांना विचारलं नेमकं काय प्रकरण आहे. वडील नेहमीप्रमाणे माझ्याकडे बघितले आणि स्मितहास्य करत म्हणाले, मी जवळजवळ दोन महिने झाले त्यांच्यासाठी काम करतोय. यांचे सर्व फॉर्म भरलोय, यावर तलाठ्याची सही होत नव्हती. ते आता झालेले आहे. तलाठ्याच्या वरचा एक अधिकारी सही करण्यासाठी पैसे मागतोय. मी तर या लोकांना पैसे मागू शकत नाही, कोण विधवा आहे तर कोण वयोवृद्ध आहे. त्यांच्याकडे जिल्ह्याचे ठिकाणी जायला पन्नास रुपये नाहीत, ते कुठून पैसे देतील.
 मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. काही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आले आणि काही प्रकरणे स्थानिक पातळीवर रोखली गेली. जेव्हा एका वृद्धाच्या बँक खात्यात सहाशे रुपये जमा झाले. हा क्षण माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी होता.

मागच्या वर्षी जेव्हां दसऱ्याच्या दिवशी गावाकडे गेलो होतो. तेव्हा गावातील एका शिक्षकाने विचारले काय करतोय सध्या ?  मी, एम बी ए झालाय सर, जॉब ला आहे. ते म्हणाले, अरे तू तर रिक्षा चालवायचा ना ? मी त्यांना एवढंच म्हटलं, सर तेव्हा त्याबरोबरच मी शिक्षणही घेत होतो.
वडिलांबरोबर एकदा केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली तो क्षण, कॉलेजमध्ये सामान्यज्ञान स्पर्धेनिमित्त माझा संस्थापक आणि कुलगुरू हस्ते सत्कार, तो क्षण, दिव्य मराठी मध्ये माझा राजश्री शाहू महाराज यांच्या वर लिहीलेला लेख पहिल्या पानावर आला होता तो क्षण, पुण्यनगरीमध्ये माझ्या तोडक्या मोडक्या कविता छापून यायच्या तो क्षण, याशिवाय बरीच कामे माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग आहेत.
टीप- (सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहे)

माझी कविता.

सौदागर काळे,पंढरपूर.

कविता समजली का?

माझी कविता मलाच कावते
सवाल जवाब करत राहते
क्षणोक्षणी,पदोपदी विचारते.
कविता समजली का?

तुझ्याच पोटासाठी मी 
कित्येकवेळा विकली गेली!
हे ऐकून पुन्हा पुन्हा भूक लागते.
कविता समजली का?

सोयीनुसार तू भूमिका बनवत गेला
तुझ्या सेल्फीसाठी भांडवल झाले
बाह्यरंग-अंतरंग नासवत राहिले.
कविता समजली का?

उकरंडा चाचपून उकरुन
आठवणी खालवर होत गेल्या
तेव्हा तोंडावरचा रुमाल हातात आला.
कविता समजली का?

प्रत्येक चौकात रेड सिग्नल दाखवून
नजरा सूक्ष्म करण्यास लावते
थांबवत राहते...म्हणत राहते..
कविता समजली का?

____________________________

अर्चना खंदारे ,हिंगोली.....
     पहिला स्पर्श तुझा.....

पावसाच्या पहिल्या   सरी  जश्या  जमिनीला मिळतात तसा  पहिला स्पर्श तुझा .....

ओळखीचा  पण अनोळखी  बनून  केलेला नकळत  भेटीमधला  पहिला स्पर्श तुझा.....

दुसऱ्यासाठी कस जगावं  असं सांगणारा  पहिला स्पर्श तुझा....

तू सर्वांमधून  खूप वेगळी  आहेस असं सांगणारा पहिला स्पर्श तुझा.....

स्वतःबरोबर दुसऱ्याची  काळजी  घे  म्हणणारा  पहिला स्पर्श तुझा..

आयुष्यामध्ये कितीही  संकटे  आली  तरी खचून  न जात  त्याचा सामना  कर  असं सांगणारा पहिला स्पर्श तुझा ....

आयुष्यात स्वतःला कधीच एकटं समजू नको,कारण तुझा आत्मविश्वास  तुझ्या सोबत आहे असं सतत  सांगणारा पहिला स्पर्श तुझा.....

खरंच मनाला एक विलक्षण  लावून  गेला पहिला स्पर्श तुझा....

पहिला स्पर्श तुझा.....

काही चुकल्यास  क्षमस्व ......

____________________________
रुपाली आगलावे, सांगोला...
                  जीवन
जीवन म्हणजे नक्की काय असतं?
कोणी हसत , कोणी नाचत,
कोणी रडत , कोणी हिरमुस्त, 
पण कसे ही असो ,
जीवन मात्र सगळ्याना हवं असतं।
     कोणी आलं की आनंद होतो,
     कोणी गेलं की दुःख होतं।
     येणं - जाणं चालू राहतं, तरीही
     जीवन मात्र सगळ्यांना हवं असतं
बरस्त्या पावसात जीवन कधी बहरून जातं,
कडक उन्हात कधी कधी करपुनही जातं।
बहरण, करपन चालू राहतं, तरीही
जीवन मात्र सगळयांना हवं असतं।
     वाऱ्याचा झोत कधी सुखावतो,
     कधी तोच झोत दुखातही विसावतो।
     सुख, दुःखाच येणं जाणं चालू राहतं, तरीही
     जीवन मात्र  सगळयांना हवं असतं।

____________________________

वाल्मीक फड निफाड नाशिक 
        पावसाची पुकार
वारा वहात आहे
ढगही पलीकडे जात आहेत,
मग पाऊस केव्हा येणार ?
माणूस खुश केव्हा होणार?
पावसाला मी विचारले तु का येत नाही?
तो म्हणाला हि तुमचीच चुक.
तुम्ही झाडे तोडली प्रदुषण केले ,
मी तरी काय करु माझे मनच रमत नाही.
मि जेव्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा हा वारा मला दुर कोठेही नेऊन घालतो .
झाडे तोडून तुम्ही शेती तयार केली,
डोंगर दर्यात सुद्धा नाही 
झाडी वेली.
आता तुम्ही एकच निर्धार करा,
वृक्षमय प्रदेश तुम्ही सर्वजण करा.
पाऊस पडेल चोहीकडे होईल सर्व शांत,
तुमच्या हाताने तुमचा होणार नाही अंत.

____________________________
महेश देशपांडे,मु. पो. ढोकी, जिल्हा उस्मनाबाद
कवीची उद्विग्न अवस्था आहे 

याउपर काही होईल असं काही वाटत नाही,
कारण, आठवणी मेल्यात लोकांच्या ।

आपले म्हणायाचे, तर काय संदर्भ देणार? 
एकत्र घातलेले दिवस ? छे छे ते तर शक्यच नाही ।
कारण आठवणी मेल्यात लोकांच्या ।

नव्या नवरीचे नऊ दिवस असतात तसे, नव्या नात्याचे नऊ दिवस अस काहीसं झालेलं आहे ।
कारण नात टिकवायच म्हटलं तर, सदासर्वकाळ एकत्र राहू शकत नाही आणि आठवणींशीवाय पर्याय नाही  ।
पण आठवणीच मेल्यात लोकांच्या । 

नात्याचं काय घेऊन बसलाय, ते समजायला खूप काळ जावा लागतो । कधी कधी एवढा काळ घालवूनही समजत नाही ।।
मग नात्याचा उलगडा कसा होणार ? माणसाच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर, बोललेल्या गोष्टी, भावना समजून घेणं महत्वाचं असत ।
यासाठी माणस आठवणीत तर राहायला पाहिजे ।
पण आठवणीच मेल्यात माणसांच्या .

____________________________
       किरण पवार , औरंगाबाद.
        आस उजेडाची .

तिमिरातून जातेयं सावकाश
तिला ओढ आहे प्रकाशाची,

नैराश्याच्या गर्तेत गुरफटलेली
तरी स्वप्ने पाहतेयं उज्वल आशेची,

धरूर ठेवलयं जखडल्या गेलीये
तरीही हालचाल आहे तिची वेगाची,

भांभावलेल्या प्रसंगात मनात डोकावतेयं
तिला जिद्द हवीये पुन्हा वर येण्याची,

काठोकाठ रस्ता अनोळखी काट्यांचा
तरीही ती चालतेयं वाट वणव्याची,

भयान सगळं अस्थिरलेलं झालयं
तरीही खूनगाठ घट्ट स्थिरावायची,

एकदा विस्कटलेलं आयुष्य पुन्हा जोडण्या निघालेली
धडधडणारी स्पंदना आहे ती ह्रदयाची.

                    या कवितेचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करतो. या कवितेच्या म्हणण्यानुसार सांगायच असं आहे की, एक लहान मुलगा आहे ज्याचे निर्णय चुकल्यामुळे तो थोडा आयुष्यात मागे पडलायं. अशाने त्याच्या भोवतीच्या परिसरातील इतर व्यक्तिंनी त्याच खच्चीकरण भरपूर केलयं. पण तो अजून डगमगला नाहीये. थोडा नैराश्याच्या दिशेने तो चालल्यावर त्याच्या लक्षात येतं आणि तो पुन्हा नव्या आशेच्या शोधात स्वत:ला झोकून देतो. अशात थोडासा चलबिचल जरी झाला असला तरी उद्दिष्ट मात्र एकच आणि अंतिम आहे. अशातून बाहेर पडून नव्या ऊजेडात प्रवेश करण्याची त्याला घाई झाली आहे कारण हे सर्व ओझं नकोयं त्याला. आणि न डगमगता स्वत:ला सिद्द करण्याची जिद्द बाळगली आहे त्याने. ह्या सर्व भावना तो त्याच्या स्पंदनेत साठवून आहे. धन्यवाद!

____________________________
जगताप रामकिशन शारदा,बीड.
          माझी कविता

कवितेत बोलायचे असते,कवितेत चालायचे असते

मांडताना कोणालातरी आपण मात्र सांडायचे असते

कटु वास्तव गोड शब्दांत सांगायचे असते.

फुलाची कोमलता, ज्वालामुखी ची दाहकता

अलगद सौम्य शब्दांत मांडायची असते.

खदखदणार मन कवितेत खळखळून हसवायचे असते.

नाचता नाही आले आनंदात तरी शब्दांत मात्र गुणगुणायचे असते

वागण जरी बोथट असल तरीही शब्द मात्र धारदार ठेवायचे असतात.

सोबत असणाऱ्यांना भंडावून सोडायचे असते

सोडून गेलेल्या चे गुणगान करायचे असते.

कोरतील मनावर चित्र असे शब्द वापरायचे असतात

घालतील घाव मनावर असे शब्द वापरायचे नसतात.

शब्द जरी अस्त्र असले तरी ते वस्त्राप्रमाणे वापरायचे असतात

 शोभले स्वतःला तरीही इतरांवर मात्र लादायचे नसतात.

कोणी बोलेल विद्रोही, वेडा, प्रेमवीर

आपण मात्र रहायचं असत खंबीर

बोलणाऱ्यांचे शब्द मनावर घ्यायचे नसतात

भासले खास तर कवितेत घ्यायचे असतात.

ती सोडून गेली म्हणून कवितेत रडायच असत

तिच्या आठवणीने कविता झाली म्हणून

आनंदाने मनसोक्त नाचायच असत.

कवितेला च कधी कधी प्रेयसी मानायचे असते

शब्दा शब्दा न तीला नटवायचे असते.
____________________________

              रामदास हांडे, पुणे 
       मी देखील एक माणूस आहे फक्त वेश्या नाही.

पुण्याच्या बुधवार पेठेचा रस्ता
तुम्हास ठाऊक आहे।
कधी माणूस म्हणुनी भेटा मला
मी देखील एक माणुस आहे।

तरुण येतात म्हातारे येतात
येतातही बिना लग्नाचे।
देहवर्ती स्वार होऊनी
लचके तोडतात अब्रूचे।

ईच्छा नाही माझी इथे
इशारे तुम्हास करण्याची।
मजबुरीने गळा अवळलाय
सवय लागलेय गुदमरण्याची।

ग्राहक म्हणुनी सर्वच येतात
तुम्ही माणूस म्हणुनी या।
माणसातल्या माणुसकीचे
दर्शन मजला द्या।

____________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग।

माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग,
आठवताना होतं माझं मन नेहमी दंग,
आयुष्यात मिळाली खूप माणसांची संग,
ज्यांनी नाही केली प्रार्थना माझी भंग।

एकच आहे माझं देवाला मागणं,
असावं सर्वांचं समानतेने वागणं,
ह्याच गोष्टी देतात मला जीवनात प्रेरणा,
मनात घट्ट करतात सामाजिकतेची धारणा।

कोठून मिळते हो सर्वांनाच सुख,
सर्वाना असते लालसेचीच भूख,
हेच खरं कारण आहे या जगाचं दुःख,
प्रेरणादायी प्रसंग करतील सर्वांना अंतर्मुख।

कोण आहेत बरें प्रेरणादायी मानव,
आहेत का ते देव - देवता दानव,
माझ्या मते आहे आहे सर्व प्रेरणादायी,
फक्त घ्यावे सर्वांनी मनीं न करता घाई।

____________________________

 स्वप्नील चव्हाण, मेहकर
      "......कळेना...!! "

सुचलीस तू मला एखाद्या चारोळीसारखी
पण यमक मात्र जुळेना,
ध्रुवपदापर्यंत अगदी छान जमलं पण कडव्यात काय लिहावं ते मात्र कळेना......

तू सुंदर आहेस की तूच सुंदर आहेस
हे कोड काही सुटेना,
मी तुझ्याकडे बघतो का मी तुझ्याकडेच बघतो 
हे माझं मलाच कळेना.....

लख्ख प्रकाशात मला तू सवलीसारखी अंधुक भासलीस,
पण तापतांना या उन्हामध्ये मला तूच हवीशी वातलीस....
प्रकाश मोठा की ऊन मोठं
हे तंत्र काही उमजेना,
मला सावली पाहिजे का तीच सावली पाहिजे हे माझं मलाच कळेना......

THEORY चा पेपर जरा कठीणच जातो
कारण पाठांतर मला काही जमेना,
तू भेटलीस मला MCQ पेपर सारखी 
पण उत्तर कोणतं गिरवावं तेच कळेना.....

मला तू जेवणातील मिठासारखी भासलीस
पण जेवण खारट होऊ नये याचीही भीती वाटलीच,
"भाजीत मीठ की मिठात भाजी" हा प्रश्न लोकांना पडतोच कसा हे काही समजेना,
आणि अळणी जेवण्याऐवजी मीठ टाकूनच का जेवाव वाटतंय हे माझं मलाच कळेना........
____________________________
ऋषिकेश खिलारे
✍🌹मेळघाट होळी🌹

आमच्या ताईसाहेबांची बोली
आली रे आली होळी आली...

आदिवासी संस्कृती सजली भारी,
गारा मट्टी करू लगली सारी,
मिळून सारवले घर अंगन सारे ।।

🎋 गोठानाच्या मध्यभागी उभारली हीरव्या बांबूची होळी,
बांबूच्या शेडांवर बांधली पाळण्याची दोरी।
परंपरागत सणासुदीला पुजेचा घाट अन आडा पटेल चा भलताच थाट।।

🎋 नवनवीन कपड्यात सजली पोर सारी,
पुरी न जीलू चा सुगंध हरेक दारी
झुमकी म्हणे रामकीले बनाया भेजा माया घरी ।।
🎋 पेटली रे पेटली होळी पेटली,
ढोलक्याने तालात वाजवला ढोल
एका हातात दशत्ती अन एका हातात थपकी
होळीच्या अवतीभवती पोरी करतात गदली
🎋 सगळेच घेतात गाठीभेटी
देवान-घेवाण प्रेमाची
उधळण असते पाच दीवस
पळस फुलांच्या रंगाची
🎋 दुसऱ्या दीवशी दारोदारी मागतात फगवा
आलू की संबज्जी मिठा नही लगता
भोकरबरडी जाणाबाई जलदी जलदी देना
पोरी न पोर गातात गाणी
जमवला फगवा की करतात मेजवानी
🎋 रंगपंचमीच वादळवारं सुटतं
सारे पोर पोरी रंगान भिजततं
पंचमिला माहोल निरोपाचा थाटतं
आता गावकरी घेतात होळीची शेवटची भेट
संगीत नृत्याची मैफिल डोळ्यात साठते थेट!
कोरकूचा सण 'होळी लय भारी'
गोडं लावते 'दीवाळीले' पणत्या दारी
संकल्प

जगायचं कशासाठी?


जगताप रामकिशन शारदा,बीड

पडल कधी कोड विचारांना की जगायच कशासाठी
न घेता उसंत क्षणाचीही त्यांना सांगायचे
साने गुरुजींच्या प्रार्थनेतील खरा तो एकची धर्म जगाला सांगण्यासाठी
समाजात उभ्या केलेल्या मतलबी धर्माच्या भिंती भेदण्यासाठी
धर्मा धर्मात विभागलेला माणूस माणसात आणण्यासाठी
विश्वची माझे घर मानणाऱ्या भारताला विश्वगुरू करण्यासाठी
बुध्दाचा शांततेचा संदेश जगाला देण्यासाठी,
दाखवत भारतीय ऐश्वर्याची संपन्नता परकीय आक्रमणांना चोर ठरवण्यासाठी
पानिपतच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत हे सांगण्यासाठी
छातीवर पडलेल्या घावापेक्षा गाजवलेला पराक्रमाच्या पुनरावृत्तीसाठी
स्वातंत्र्य चळवळीत सांडलेल्या रक्ताला प्रणाम करण्यासाठी
बलिदान व्यर्थ गेले नाही हे स्वातंत्र्य सैनिकांना दाखवण्यासाठी
गांधींच्या तत्वांवर उभारलेल्या भारताचा डोलारा सांभाळण्यासाठी,
सुभाषबाबूंच्या भारताप्रतीच्या आदरांसाठी,
विवेकानंदांच्या विचारातील समाज पाहण्यासाठी
कलमांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी
भारतीय राज्यघटनेतील सर्वधर्मसमभाव रूजवण्यासाठी,
लोकशाहीच मंदिर नितीमुल्यांनी आदर्श अस सजवण्यासाठी,
समाजात पसरलेली विशमता मिटवण्यासाठी,
आदर्श भारत घडवताना कामी येण्यासाठी,
गटार गंगेची शुध्दता परत मिळवण्यासाठी
पिकाची प्रसन्नता शेतकऱ्यांच्या जीवनात आणण्यासाठी,
माणसाचा जन्म फुकट घालवला नाही अस शेवटी स्वतः च्या समाधानासाठी
----------------------------------–-----------–-----–----------

अर्चना खंदारे ,हिंगोली.

                  खरे तर हा प्रश्न  प्रत्येकाने स्वतःशी  करायला पाहिजे.कारण त्यामुळेच आपल्या जगण्याला एक नवी  दिशा  मिळू  शकेल.माणूस हा समाजशील  प्राणी  आहे आणि त्यामुळेच तो समूह  करून राहतो.समूहामध्ये आपले जीवन  व्यथित करीत असताना.समाजाशी  समरूप  असलेल्या प्रत्येक घटकाशी  त्याचा संबंध  येत असतो त्यातून त्याला चांगले वाईट अनुभव येतात.समाजात वावरताना  चांगले वाईट अनुभव घेत  असताना परिस्थिती नुसार  स्वतःसाठी  व समाजासाठी त्यामध्ये  अनुकूल  बदल करणे गरजेचे असते...
          
            आता इथे,माझ्या मता  विषयी लिहायचे  असता,मला माझ्या आई साठी जगायचं...आणि आहे तो पर्यंत हि आई साठीच  जगणार  यात  काही शंका  नाही.आणि त्या नंतर मला स्वतःसाठी जगायचं  कारण मी स्वतः हा एक चांगली व्यक्ती बनले तरच  मी इतरांचा आदर,त्यांचे हीत आणि त्यांच्या साठी चांगले कार्य  करेन. यावरून  मी कदाचित  स्वार्थी  हि वाटत असणार ,परंतु  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेऊन  मी बोलत आहे.जर,स्वतःला जेवढे  ज्ञान  संपन्न केले तर त्याच्या किती तरी पटीने  आपण इतरांसाठी  खूप काही करू शकतो.स्वतःला एखाद्या दिव्याच्या ज्योती  प्रमाणे पेटवत  ठेवले तरच आपण संपूर्ण जगाला प्रकाशमय  करू शकतो.आणि मला असच  जगायला आवडेल....
-------------------------------------------------------–---------

प्रविण, मुंबई

काही प्रश्न असे असतात की त्याची एकतर उत्तरे नसतात किंवा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे "जगायचं कशासाठी ?" विज्ञानाच्या साहाय्याने याची उकल करून पाहिली, अध्यात्माचा मार्ग निवडून पाहिलं पण हे कोड काही केल्या सुटत नाही. दोन दिवसांपूर्वी रॉबिन शर्मा यांच्या "who will cry when you die" या पुस्तकातील एक कथा वाचत होतो. त्यातील मुख्यपात्र हे अत्यंत समृद्ध आणि यशस्वी असत. मृत्यूशय्येवर असताना त्यांना विचारलं तुम्हाला जर हे आयुष्य दिल तर तुम्ही कोणती गोष्ट कराल? तो यशस्वी (?) "पुरुष म्हणाला मी तो माणूस होईल जो मला बनायचं होत" या उत्तरात आयुष्यच एक कडू सत्य दडलं आहे की आजही माणसाला आयुष्य जगायचं कशासाठी हे नाही कळलं?
___________________________________________

यशवंती होनमाने .
    काय गंम्मत आहे ना , की आपल्याला प्रश्न पडतोय , जगायचं कशाला ? ? 
मला जगायचं आहे स्वतःसाठी , स्वप्नं पूर्ण करण्यासाठी , देवाने सुंदर जन्म दिलाय त्या जन्माचं सार्थक करण्यासाठी , ज्या समाजात राहतोय त्या समाजाचे देण देण्यासाठी , हे सुंदर असं जग बघण्यासाठी ....
मला जगायचं आहे स्वतःला सिध्द करण्यासाठी , माझ्या जवळच प्रेम मुक्तपणे उधळण्या साठी , जगात मुक्तपणे फिरण्यासाठी ....
मला जगायचं आहे जे जे हवं ते ते सगळ करण्यासाठी .....
_____________________________________________

वैशाली सावित्री गोरख.

      खरं तर हा प्रश्नच खूप विचार करायला लावणारा आहे की जगायचं कशासाठी? नि असा प्रश्न ही काही ठराविक वयातच पडू शकतो,नि त्या ठराविक वयातच स्वताला योग्य दिशा दिली तरच ह्या आपल्या जगण्याचं सार्थक होईल नाही तर सगळा आयुष्यातील महत्वाचा वेळ निघून जाईल,उतर वयात तुम्ही विचार करायला लागला की जगायचं कशासाठी तर ह्याला अर्थ राहणार नाही तर योग्य वयातच विचार करायला लागेल की जगायचं कशासाठी ? 
    सध्या तर सगळीकडे पाहिल्यावर नक्की लोक कशासाठी जगात असतील तेच कळत नाही म्हणजे काहीजण फक्त दिवस दिवस दीड जीबी डाटा संपवण्यासाठी जगतात ,म्हणजे तुम्हला समजलं असेलच की फक्त व्हाट्स अँप वरती स्टेट्स टाकण्यासाठी नि व्हाट्स अँप चे स्टेट्स बघण्यासाठी ,नि टिक टॉक चे व्हिडीओ करण्यासाठी काही तरुण पिढी जगतेय ,त्यानंतर काही तरुण पीडी प्रेमासाठी जगतेय ,नि प्रेम नाही सक्सेक झालं की एका क्षणात मारण्याची जिद्द ठेवतेय ,येथे ही दिसत की मग आपण फक्त प्रियकर किंवा प्रेयसी मिळवण्यासाठी जगतोय नि थोडही ह्यातून बाहेर येऊन जीवनाकडे वेगळ्या दृष्टीनेही पाहता येईल का? ह्याचा ही विचार न करता जगणारा तरुणवर्ग मी पाहिलाय. त्यामुळेच प्रश्न पडला की आपण का जगतोय .
      आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आयुष्य हे फक्त एकदाच आहे नि मग आपण विचार करतो की आयुष्य एकदा आहे तर ते मस्त जगलं पाहिजे पण नेमकं मस्त म्हणजे काय ? तर आपण मस्त ची पण व्याख्या खूप वेगळी केलेय, ब्रॅंडेड कपडे घालणे,हातात मोठे मोठे फोन असंण ,चार चाकी गाडी असंन म्हणजे मस्त पण हे सगळं आपण कोणाच्या जीवावर करतोय त्याचा विचार केला तर कळेल की जगायचं कशासाठी नि कोणाच्या जीवावर जगायचं , स्वतःच्या की घरच्यांच्या ?
मला तर स्पष्ट वाटत की जगायचंच आहे तर एक स्वतंत्र नि स्वताची अशी एक विचारसरणी घेऊन जगा , तुम्ही कोणत्याही गोष्टी साठी कोणावर अंकित राहू नका नि कोणाला तुमचा भार होऊ देऊ नका ,हे वाक्य मी एक मुलगी आहे म्हणून लिहलाय कारण आम्ही जेव्हा जन्म घेतो तेव्हाच आमच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी पालकांनी ,समाज्यानी ठरवून ठेवलेत नि त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच अस्तित्व नसणं ,स्वताची ओळख नसणं ,मी मुलगी आहे तर मला पहिल्यांदा कोणाची तर मुलगी म्हणून ओळखतील परत कोणाची तर बायको ,बहीण नि आई ,झालं माझं अस्तित्व एवढंच असेल , तर ह्या सगळ्यातून बाहेर जाऊन मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मला बायको ,आई बनायचं नाही का तर मला हे सगळं असूनही स्वताची अशी एक ओळख हवीय नि ती निर्माण करण्यासाठी मला जगायचंय .
एक भारतीय नागरिक म्हणून सामाज्यात ज्या ज्या चुकीच्या गोष्टी चाललेत त्या त्या बद्दल मी न डगमगता बोलावं , माझं स्वतःच मत निर्माण करावं 
ह्या साठी मला जगायचंय. व मला आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टींना समर्थन करायचं नाही नि ह्या लाभलेल्या मोतीमोल आयुष्यात , वेगवेगळ्या लोकांच्या , खूप साऱ्या पुस्तकांच्या , निसर्गाच्या संगतीत मला माझं आयुष्याचं जगायचंय नि महत्वाची गोष्ट आपल्याला येणारे अनुभव गाठीशी बांधून त्यातून योग्य दिशा आयुष्याला देऊन मला जगायचंय .
_____________________________________________

दिपाली  वडणेरे ,नाशिक
       
जगायचं कशासाठी खरंतर  ह्याच एका प्रश्नाच्या  उत्तरासाठी अपण जगत असतो असे  म्हणायला काहीच हरकत नाही असे मला तरी वाटते ...
            कशासाठी  जगायचे ? एक गहण प्रश्न आहे  पण जर विचार केलाच ना तर एवढे कठीणही नाही  आणि एवढे सोपेही नाही जगणे.... पण एक मात्र  नक्की की आपल्यापुढे  कशीही परिस्थिती  उभी राहो चांगली वा वाईट पण आपण तिला नेहमी धैर्याने,  विचारपूर्वक  आणि हसत हसत सामोर गेले पाहीजे माझ्या मते कदाचित यालाच जिवन जगण्यची कला म्हणतात .. कोणी आपल्या बाबतीत काहीही बोलो पण आपण फक्त  एकच करायचं आपली परिस्थिती , आपल्याला  किती  सुख-दुःख आहे हे बघूनच  दुसर्याच्या सुख -दुःखाची जाणिव करायला  हवी.... दुसऱ्याचे सुख पाहून पाहून आपण स्वतः दुखी व्हायचे आणि दुःख पाहून हसायचे त्यापेक्षा  दुसर्‍याच्या  सुख-दुःखात आपले  सुख-दुःख मानता यायला हवे .....
         बाकी जात - पात सोडून माणूस म्हणून जगण्यासाठी  आणि माणूसकी हाच धर्म  अन् हीच जात यासाठी जगावे.....मी पणा सोडून गरिब-श्रीमंती असा भेद न करता समोरचा  व्यक्ती  पण मानूसच आहे याची जाणिव  ठेऊनच त्याच्याशी तुच्छतेने  न बोलता- वागता नम्रतेते वागण्यासाठी जगायचे.....कुटुंबासाठी विशेष म्हणजे  आई - वडिलांसाठी  जगायचे.... त्यांची सेवा करण्यासाठी जगायचे......पण त्याआधी स्वतःसाठी जगायचे ....स्वतःसाठी का म्हणून ???  हा सर्वात मोठा  प्रश्न ;  तर स्वतःसाठी  ह्या म्हणून जगायचे की आधी आपण नम्रतेने ,  शांततेने वागायला - बोलायला हवे अन् विवेकातुन राहायला हवे थोडक्यात जर आपल्याला दुसर्याकडून चांगले वागण्याची , बोलण्याची , अपेक्षा  असेल तर स्वतःपासून  मी सुरूवात करेन आधी समोरच्याला आदर - सन्मान , देईन तेव्हाच पण स्वतःकडील नम्रता मात्र  कधीट नाही सोडणार कारण नम्रतेते  राहीले तर न होणाऱ्या गोष्टी ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो त्या गोष्टी घडतात....ज्यातुन अनपेक्षित  आणि सुखद आनंद देणारे क्षण घडून येतात .... या आनंदाच्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी जगायचे..... 
          दुसर्‍याला  दोष देण्याऐवजी त्यांच्या  चुका शोधण्याऐवजी आपण कुठे चुकतोय हे शोधता आले पाहीजे  आपलो चुकी आपल्याला शोधायचीय अन् आपल्यात नविन बदल  कसा करून घेता येईल  यासाठी जगायचेय.... 
        जिवनात काहीतरी नविन करायचे अन् त्याचा मनसोक्त  आनंद घ्यायचाय कुणालाही न दुखावता यासाठी जगायचेय..... यासाठीच जगायचेय.....
        विषयच असा आहे की खूप काही लिहीता येईल आणि या विषयावर प्रत्येकाचे  वेगवेगळे  विचार पण खरचं विचार करण्यासारखे  आणि जीवनाला  एक नविन कलाटणी ( वळण , दिशा ) देणारे आहेत .....

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************