वाचन:- इंटरनेटवर की पुस्तकांतून ?

किरण पवार,औरंगाबाद.
       दर्पण बता बचपण कहाँ? हे गाणं ऐकलच असेल तुम्ही. थोडक्यात काय तर दर्पण म्हणजे हा जो आरसा आहे तो काही गोष्टींचे वा नानाविध प्रकारांचे प्रतिबिंब दाखवण्याचे काम करतो. आपण काही ठराविक साहित्याला नक्कीच समाजाचा आरसा म्हणू शकतो. पण पूर्णत: एखाद साहित्य समाजाचा आरसा असेलच असं नाही. कारण काही साहित्य हे काळाच्या पुढील विचारांवर आधारलेलं असतं. ज्यात सध्या/चालू गोष्टी किंवा सामाजिक/आर्थिक वा इतर गोष्टींचा लवलेशही नसतो.
ते साहित्य समाजाचा आरसा आहे जे साहित्य त्या ठराविक काळाच्या ठराविक सामाजिक संदर्भांना समोर ठेऊन लिहल्या जातं. अशी साहित्याची ऊदाहरण बरीच देता येतील. उदा. १) दुनियादारी:- ही विशिष्ट प्रकारचा सामाजिक आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते; जसं की त्या काळी प्रेमाबद्दल असलेले निष्कर्ष.
२) युगंधरा:- त्या साठ-सत्तरीच्या विसाव्या शतकात पुरूषी अहंकार असा होता की, बायको आपल्यापेक्षा जास्त शिक्षीत नको. याचा अंत वाच्यासारखा आहे. संदर्भ काळानुसारची अनुभूती फार मनातून येते.
३) हसरे दुख:- हे जरी चार्लीच आत्मचरित्र असलं तरी याला आपल्याला सामाजिक आरसा दर्शवणारं साहित्य नक्कीच म्हणता येईल; कारण यात तत्कालिन समाजामुळे भोगावे लागणारे परिणाम दाखवल्या गेले आहेत.
मुळात अशी पुस्तक ऑनलाईन वाचून त्यांच्यातल्या गाभार्थात आपल्याला जाता येत नाही. आणि आणखी महत्वाची बाब सांगायची म्हटलचं तर बऱ्याच ऑनलाईन पुस्तकातल्या नव्या आवृत्तीत बरेच बदल केलेले आढळतात. जे मुळ स्वरून बदलल्या गेलं असल्या कारणाने तुम्ही लेखकाच्या खऱ्या शैलीशी ताळमेळ साधण्यात क्वचित गफलत नक्कीच करू शकता. साहित्य तेव्हाच अर्थपूर्ण असतं जेव्हा तुमच्या जिद्दीची, विचारांची, कुतूहलांची त्याला जोड असते. आणि अशी जोड केवळ छापील पुस्तकांतून मिळते. ऑनलाईन आवृत्तीतून तो आभास भेटत नाही. कारण सध्या जे मोबाईलवरून पी.डी.एफ. मधे वाचण करण्याचं प्रमाण वाढत चाललयं आणि मोबाईलवरून वाचताना माणूस वेळ कमी असल्याच्या भावनेतून पटपट वाचण करुन मोकळा होतो व त्या नादात तो वैचारिक क्षमतेला पुस्तकाशी एकरूप होऊ शकत नाही.
..........................................
वाल्मीक फड,निफाड,नाशिक.
       खरं म्हणजे वाचन हे बहुधा पुस्तकातून जर केले तर बर्याच अंशी उत्तम असते कारण पुस्तकातून वाचलेले जवळजवळ हे जिवन आहे तोपर्यंत लक्षात रहाते.पुस्तकातून वाचताना आपला कटाक्ष पुस्तकावर असतो आणी जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेतो त्यावेळेस आपण पुस्तकात एकरुप झालेले असतो.पुस्तक सोडून दुसरीकडे आपली नजर जात नाही फक्त पुस्तक आणी पुस्तक.एखादे पुस्तक कींवा ग्रंथ वाचताना आपल्याला काही भावार्थ समजून घ्यायचा झाला तर तो पुस्तकातून लगेच मिळून जातोय.
परंतु इंटरनेटचे याविरुद्ध आहे वाचताना आपण टाईमपास म्हणून वाचत असतो.इंटरनेट म्हणजे एका यंञाचा वापर जेथे बुद्धीच्या ठिकाणी यंञाचा वापर आला म्हणजे ते आपल्या बुद्धीत चांगल्या प्रकारे रूचत नाही.कारण एकच यंत्र आपण सुविधा किंवा टाईमपास यासाठी बनवलेली वस्तू आहे त्यामुळे इंटरनेटमुळे आपण प्रभावीपणे वाचन करू शकत नाही.थोडक्यात सांगायचे म्हणजे ते आपल्या आंतरमनाला आरपार भेदू शकत नाही.तसं पुस्तक वाचताना काही वेळेस तर माझ्या डोळ्यांतून अनेकदा अश्रू तरळलेले आहेत तसा अनुभव मला इंटरनेटचे लेख किंवा इतर साहीत्य वाचताना आलेला नाही.
--------------------------------------------------------

R. सागर, सांगली
.
वाचन खरंतर इंटरनेटपेक्षा पुस्तकांतून केलेलं चांगलं. आजकाल इंटरनेटवर बरीचशी पुस्तकं कधीही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळं तो वाचकांसाठी चांगला पर्याय आहे. पण पुस्तकांतून वाचन करताना आपण जितकं एकरूप होऊन वाचन करतो तितकं एकरूप इंटरनेटवर नाही होता येत. माझा तरी असा अनुभव आहे. तरीही काही साहित्य असंही असतं जे पुस्तकरुपात येण्याआधी इंटरनेटवर उपलब्ध होतं. कित्येकदा नवोदित लेखक सोशल मीडियावरच आपलं साहित्य प्रकाशित करतात आणि त्यातल्या कित्येक जणांचं साहित्य वाचनीय असतं. त्यामुळं ते इंटरनेटवरच वाचावं लागतं.
.
पुस्तकांतून असो किंवा इंटरनेटवर असो वाचनाची आवड जोपासणं महत्वाचं. कदाचित पुस्तकाऐवजी इंटरनेटवर केलेलं वाचन म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखंच आहे.
-------------------------------------------
यशवंती होनमाने .
वाचन -इंटरनेट कि पुस्तक ? हा काय प्रश्न आहे ? ? ? ? ?
पुस्तकाची सर येईल का त्या इंटरनेट ला .हल्ली सगळे म्हणतात कि आम्ही नेटवर वाचन करतो , सगळ येत त्या नेटवर .पण कोणी विचार केलाय का की पुस्तक वाचण्याचा जो आनंद आहे जी मजा आहे ती या नेटवर येईल का ?
अहो ते नवीन पुस्तक , त्याचा पहिल पान उघडल्यावर येणारा सुगंध , जुन पुस्तक वाचताना आधीच्या वाचणाऱ्या ने केलेल्या खुणा हे सगळ नाही अनुभवता येत त्या इंटरनेट वर .
आपण कितीही मॉडर्न होऊ देत पण पुस्तक वाचनाची मजा ही पुस्तक वाचूनच येणार ....नेटवर नाही ....
त्यामुळे वाचन करायचे ते पुस्तक घेऊनच ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************