लाव रे तो व्हिडिओ


लाव रे तो व्हिडिओ

श्री ज्ञानेश्वर आव्हाड(सिन्नर)नाशिक
एप्रिल महिन्याचे तापमान सरासरी ओलांडून ज्या प्रमाणे तापत अाहे त्याचप्रमाणे निवडणूकीचेही वातावरण तापत अाहे.
त्यातच लाव रे तो व्हिडिओ.या डायलाॅगने महाराष्टातील राजकीय तापमान उच्चांकी पातळीने वाढले अाहे.लोकशाहिमध्ये निवडणुकपूर्व जाहिरनामा पूर्ण न झाल्याने दिलेल्या अाश्वनांची जाणीव करून देण्याचा राज ठाकरे यांचा उद्देश असावा असे दिसून येते.पक्ष कोणताही असो,जाहीरनामा घोषित करताना
मतदार जनतेला *गृहीत* धरलेले असते!!अाणि घोषणांची पूर्तता काहीअंशी न झाल्याने  इतर राजकीय पक्ष मिडीयाद्वारे त्याचा प्रसार करतात.त्यामुळे जनतेला सत्ताधारी पक्षाच्या चूका नजरेत येतात.
प्रश्न असा अाहे की विरोधी पक्षही सत्ताकाळात खोटी अाश्वासन देऊन सत्ता भोगलेलीच असते ना!!मग त्यांच्या तरी योजना १००% यशस्वी कुठे होतात??
अाज राज साहेब ज्या प्रतिमा दाखवत अाहे त्या योग्यच अाहे पण त्यांनी चार पाच वर्षापूर्वी या सरकारला समर्थन दिलेलं अाहे.अाज उलटी प्रतिक्रिया होत असल्याने लोकांचा गोंधळ होत अाहे.त्यापेक्षा निवडणूक अायोगाने सरकारच्या कामाचे तीन वर्षात कामाची पूर्तता किती झाली ते तपासावे.जाहीरनामा ६०% पूर्ण करू न शकलेले सरकार बरकास्त करून टाकावे.म्हणजे सत्तेच्या गुळाला पाच वर्ष चिकटणारे मुंगळे लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी जास्त चालढकल करणार नाहि.लाव रे तो व्हिडीओ प्रमाणेच दर निवडणूकांमध्ये हा पायंडा पडणार अाहे व सरकारचे वाभाडे निघत रहाणार अाहे.हे लोकशाहीला पूरक अाहे.त्यात काही वावगे वाटू नये असे मला वाटते.
हा लेख कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू किंवा प्रसार करीत नाही

शिरीष उमरे,यवतमाळ
नोटबंदीच्या मित्रो च्या दहशतीनंतर व मनकी बात ची भाई और बहनो ही सुरुवात अंगावर काटे आणायची सेम तसेच बुमरँग एका तश्याच मराठी टग्या व्यक्तिमत्वाने तमाम राजकारणी व  गुजरात्यांवर उलटवले... लाव रे तो व्हीडीओ व आण रे त्याला स्टेजवर ह्या वाक्यांचे टेरर व गारुड महाराष्ट्र ओलांडुन केंव्हा राष्ट्रीय पातळीवर गेले हे कळलेच नाही.

सत्तेच्या मग्रुरीत सत्ताधारी मागील निवडणुका जिंकण्यासाठी जे बरळले होते, जी आश्वासने दीली होती, जे बोगस काम गावपातळीवर झाले होते, ते लपवण्यासाठी खोटे प्रकरण घडवुन लोकांचे लक्ष मुळ विकासाच्या मुद्द्यांपासुन वळवण्याचा जे विकृत घाणेरडे हतकंडेे वापरत होते त्यासाठी पाण्यासारखा पैसा मिडीया व पब्लिसिटी वर खर्च करुन लोकांना धार्मिक, भावनिक उन्मादित करुन परत आपला डाव साधण्याचा प्रयत्न भ्रष्टाचारी कपटी नेते करत होते त्यांच्या करतुतीच्या लक्करे वेशीवर टांगण्याची सुरुवात गुढीपाडव्यापासुन सुरुवात झाली ती आज संपेल... दुसऱ्या चरणात सोलापुर नांदेड इचलकरंजीत सुरु झालेल्या ह्या वादळाने  चक्रावाताचे रुप धारण करुन नाशिकात प्रवेश केला. तोपर्यंत ह्या धडाक्यात पालापाचोळ्यासारखे राजकारण्यांचे सगळे डाव उध्वस्त झालेत.

वक्त्रुत्व कसे चौफेर असावे, तंत्रज्ञानाचा अतुक वापर कसा करावा, लोकमानसातला आक्रोष ओळखुन त्याला वाचा फोडण्याचे कसब कसे असावे, एखाद्या गोष्टीचे सखोल पृथ्थकरण करुन समोरच्याला निरुत्तर कसे करावे, समोरच्या लाखो लोकांच्या मनाला हात घालुन त्यांना दोन तास खिळवुन ठेवण्याची कीमया कशी साधावी ह्याचे जीवंत प्रशिक्षण महाराष्ट्रात सुरु होते त्याची दखल जागतिक पातळीवरील माध्यमावर घेतली गेली.

बाकी प्रशिक्षकाची जातकुळ काढणे, त्याचे स्वार्थी राजकीय डावपेच सांगणे वैगेरे डागडुजी करण्याचे शर्थीचे प्रयत्न भरपुर झालेत पण वक्त्याने मांडलेल्या मुद्यांना कोणी खोडु शकले नाहीत. एका प्रकारे सामान्य नागरिकांच्या मनातील खदखदीला व्यासपीठ मिळाल्याने लोकांनी डोक्यावर उचलले त्याचे भाषण !!

आज सांगता होणार ह्या चळवळीची ... नक्कीच बघा ऐका हसा समजावुन घ्या... करमणुकीसोबत ज्ञानवर्धन... संध्याकाळचा जिवाला मोफत  विरंगुळा ... ह्या कडक उन्हाळ्यातील गार झुळुक !!


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,वाशिम.

या राजकारणाच्या राज्यात काय होते आहे ते बघू दे सर्वांना, लाव रे तो विडिओ।

मतदारांनाही कळेलच कुठले ते महाभाग आपण निवडले होते ते कळेल सर्वांना, लाव रे तो विडिओ।

राजकीय नेते नि कार्यकर्ते कशे बोभाटा माजवत आहेत ते ही पाहुडे सर्वांना, लाव रे तो विडिओ।

कालची आश्वासने आज कोणत्या अश्वासनात विरलीत ते कळूदे सर्वांना, लावरे तो विडिओ।

काय कामे करणार आहे हे सेल्फी सम्राट आणि त्यांचे विरोधक ही कळू सर्वांना, लाव रे तो विडिओ।

मिटले का देशातील प्रश्न; का नुसते करताहेत निवडणुकीपूरते वातावरण उष्ण. कळू दे सर्वांना, लाव रे तो विडिओ।

Image Source: google.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************