प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे का गरजेचे आहे?

प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे का गरजेचे आहे?



अनिल गोडबोले,सोलापूर
पाण्यात पडलेली कोणतीही गोष्ट पाण्याच्या गती बरोबर वाहत जाते त्या प्रमाणे जीवनात माणूस हा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीप्रमाणे चालत असतो.पाण्यात जर एखादा खडक मध्येच आला तर प्रवाहाला थांबवतो.. पाणी जिरवतो.. साठवतो.. व वाया जाणारे पाणी उपयोगाला येते त्याप्रमाणे ... जीवनात जर चुकीचे घडत असेल तर प्रवाह थांबवणे गरजेचे आहे.प्रस्थापित व्यवस्था किंवा सत्ता मानसिकतेचा उपयोग करून प्रवाह निर्माण करतात व त्यात काहीही (काहीही..) सोडतात आणि बाकीचे त्याला धरून वाहत जातात.त्यात फायदा जरी सत्ता करणाऱ्यांचा असला तरी लोकांचे नुकसान होत असते. तेव्हा त्या गोष्टी करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे.अशा माणसांमुळे तर सुधारणा होत असते. आणि सुधारणांचा लाभ मात्र सगळे लोक घेतात.

किरण पवार,औरंगाबाद
या प्रश्नाच उत्तर द्यायचं झाल्यास एक प्रश्न आणखी हवा तो म्हणजे, प्रवाह कोणता? किंवा प्रवाहाची असलेली दिशा नेमकी काय...? कारण बऱ्याचदा प्रवाह हे मार्मिकतेचे आणि सर्वांगाणे विकसित करणारे असू शकतात.  आणि अशा वेळेस ठरवलचं प्रवाहाच्या विरूद्ध जायचं तर अधोगती झाल्याशिवाय पर्याय नाही. पण काही वेळा नकारात्मकता, अयोग्यता, गुलामी आणि एकाच दिशेत चालणाऱ्या कल्पनायुक्त्या यांना कुणीतरी भेदावचं लागतं. इतिहास साक्षी आहेच त्याखेरीज क्रांती घडत नाही. त्यामुळे नाविन्यपूर्ण आणि जगण्यासाठीच अनुकूल वातावरण आपण आपल्या पुढच्या पिढीला किंवा सोबतच्या समाजाला देण्यासाठी एखाद्या प्रवाहाच्या विरोधात उभ राहणं गरजेच असतं;असं मला वाटतं.  




दिपाली वडणेरे ,नाशिक
     प्रवाहाच्या  विरोधात उभे राहणे म्हणजे वाटते तितके सहज  किंवा सोपे आहे असे नाही पण वाटते तितके जास्त काही अवघड  देखील नाही पण त्यासाठी हवी फक्त स्वतःची मनापासुन कसुन तयारी , स्वतःवर आत्मविश्वास आणि  धाडस आणि आपण बर्याच वेळा कित्येक ठीकाणी करतो देखील पण काही वेळा तिथे आपणच वाईट ठरत असतो. परंतु ; म्हणून काय आपण शांत राहायचं किंवा  प्रयत्न सोडून द्यायचे असे मुळीच नाही करायचे.... आपले प्रयत्न सतत चालूच ठेवायचे कारण कधी ना कधी का होईना यश तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि आपण योग्यच करतोय एवढा विश्वास  मात्र आपला स्वतःवर असणे गरजेचे आहे.... विरोधक तर आपले आपण काही करो वा न करो तरीही तयार होतात मग प्रयत्न करून विरोधक तयार झाले तर आपल्यासाठी ते फायद्याचेच ठरेल ना ....विरोधक असतील काहीतरी नविन करायला पण मजा येते आणि उत्साह देखील येतो आणि तेव्हाच  तर आपण स्वतःची नविन ओळख निर्माण केली करायला सुरूवात करतो , स्वतःमध्ये असलेले नविन कलागुण आपल्याला समजतात , जगण्याला एक वेगळे वळण ( दिशा ) मिळत असते .... यशस्वी झालो की आपले विरोधक देखील आपल्याच बाजुने होतात .... आणि म्हणूनच प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे ......




अर्चना खंदारे,हिंगोली.

होय...
प्रवाहाच्या  विरुद्ध उभे राहणे  गरजेचे आहे कारण त्यामुळे आपल्यामध्ये  असलेल्या क्षमतांची ओळख व किती तरी कला गुणांना वाव मिळेल.पण सुरुवातीला प्रवाह  हा चुकीच्या दिशेने जात तर नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे.कारण जर प्रवाह हा जर योग्य दिशेने जात असेल तर त्या प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणे हा आपला मूर्खपणा  ठरू शकतो..
आणि जर प्रवाह हा चुकीच्या दिशेने जात असेल  तर मग प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणे नक्कीच योग्य व फायदेशीर  ठरेल..आणि अस्या चुकीच्या वाहणाऱ्या प्रवाहाला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे, मग त्यासाठी  त्या प्रवाहातून एकट्यानेच विरोध केला तरी चालेल आणि प्रवाहातून विरुद्ध जाऊन स्वतःचे ध्येय  गाठण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे...आपल्याला माहित असतानाही आपण जर विरोध केला नाही (विरुद्ध गेलो  नाही )तर मेंढरा मध्ये आणि आपल्या मध्ये फरक काय राहणार..आणि आज करो या मरो अशी स्थिती निर्माण झाली आहे.म्हणूनच इथे, "ज्याच्यात  हिम्मत आहे,त्यालाच किंमत आहे"....
म्हणूनच  प्रवाहाची  दिशा ओळखून प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणे गरजेचे आहे ...



वैशाली सावित्री गोरख
आपण पाहतोच की जेव्हा पाण्याचा प्रवाह वाहत असतो तेव्हा तो आपल्याबरोबर ,सरसकट पालापाचोळा ही घेऊन वाहत असतो ,पाण्याला समजत नाही की आपण आपल्या प्रवाहाबरोबर काय काय घेऊन  चाललोय .त्याचपद्धतीने आपल्या समाज एक प्रवाह आहे ,त्यात काही गोष्टी ठरवून ठेवलेत किंवा नवीन काही गोष्टी लादल्या जातात नि ह्या सगळ्यातुन चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत नि आपल्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या वेगळ्या करून ,आपल्या मनाला  नि त्याच बरोबर त्या चुकीच्या आहेत तरीही समाज त्याच समर्थन करतोय तर चुकीच्या गोष्टीचा विरोध करणे ,नि त्या योग्य कशा आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे ,नि हे सगळं करताना तेवढ्याच पद्धतीचा अपमान,निंदानालस्ती ,सहन करण्याची धमक आपल्यात हवी ,ज्या पद्धतीने जोतिबा फुले, सावित्रीबाई  फुले सामाजिक प्रवाहाच्या विरोधात जाऊन मुलीच्या शिक्षणासाठी झटले होते नि त्यांनीही किती तरी मोठया प्रमाणात ह्या समाजाकडून होणारा अन्याय सहन केला पण त्यांनी जिद्द सोडली नाही ,त्याच पद्धतीने आज आपण 21 व्या शतकात येऊन ही त्या दोघांन सारखे प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करण्याची धमक ठेवत नाही .
    नि आजच्या युगात खूप  काही गोष्टी साठी प्रवाहाच्या विरोधात जाणे गरजेचे आहे ,आज जात नि धर्माच्या नावाखाली जो बाजार उठवला आहे नि सर्वांना एक समान माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्यायचा असेल तर तरुणांनी जागे होऊन आंतरजातीय विवाह करणे , ह्या साठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ,हे मी एक उदाहरण दिलं आणखी बऱ्याच आशा गोष्टी आहेत ज्या साठी आपल्याला प्रवाहाच्या विरोधात जावं लागणार आहे पण त्यासाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी ही हवी .

यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतली आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************