४०% लोक मत का देत नाहीत ?
शिरीष उमरे, यवतमाळ
खरेच ६०% लोक मत देतात का ? हो... जवळपास एवढे लोक मत देतात व ह्याचे श्रेय जाते आपल्या संस्कृतीला... लोकशाही फार पुर्वीपासुन रुजली आहे ह्या मातीत !!जे मत देत नाहीत ह्यामधे माझ्या मते बहुतांशी तीन प्रकाराचे लोक असतात.
एक ज्यांना ह्याचे महत्व कळालेले नसते. त्यांच्यासाठी हा दिवस सुट्टी असते. आळस व निष्काळजी व निरुत्साह ह्यामुळे ह्या सुखवस्तु लोकांना काही फरक पडत नाही कोण निवडुन आले ते !! पैश्याच्या जोरावर आपली सगळी कामे करवुन घेणारी ही तथाकथित सुशिक्षीत जमात अतिशय धोक्याची आहे. भ्रष्टाचार वाढवण्यात ह्यांचाच हात असतो.
दुसरे जे अन्यायाला चिडुन व हतबल होउन बहीष्कार टाकतात. पुढे ह्यातुन च आत्महत्या वा नक्षलवाद ह्या समस्या उभ्या राहतात.
तिसरे जे इच्छा असुनही मत देऊ शकत नाहीत. ह्यात इलेक्शन कमीशन कार्यालयाचा अनागोंदी कारभार, सरकारचा नविन मतदार फ्रेंडली कायदे बनवण्यात विरोध, प्रसार माध्यमांचे दबाव तंत्र नसणे अशी बरीच कारणे असतात. रोजगारामुळे मत न देऊ शकणार्यांची संख्या लक्षणीय आहे. ह्यातुन डुप्लीकेट वोटींग चे प्रकार घडतात.
मग ह्यातुन मतदार वाढीसाठी काय प्रयत्न व्हायला पाहीजे ?
आधार कार्ड वापरुन गुप्त मतदान भारताच्या कानाकोपर्यातुन कुठुनही मत देता आले पाहीजे.
सगळ्या उमेदवारांची संपुर्ण माहीती मतदारांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी इलेक्शन कमीशनची असली पाहीजे. प्राथमिक शिक्षणापासुन च नागरिक घडवला गेला पाहीजे.
जे जाणुनबुजुन मत देत नाहीत त्यांना सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ करण्याची शिक्षा व्हायला हवी. जे नियमीत मत देतात त्यांना सरकारकडुन विमा संरक्षण दिल्या जाऊ शकते. अजुनही बरेच उपाय आहेत... राइट टु रिकॉल व पॉवरफुल नोटा हे कायदे होणे आवश्यक आहे सदृढ लोकशाहीसाठी !! त्यावर चर्चा पुन्हा कधीतरी ..
*=============================*
संगीता देशमुख,वसमत
अनेक वर्षापासून देशात कोणत्याही निवडणुकीत मतदान हे सरासरी ६०-७०% च्या आसपासच होत आहे. वरवर पाहता हा मुद्दा सहज वाटत असला तरी तो तेवढाच गंभीर आहे. जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा उल्लेख होतो. आणि त्या देशात जर ३०-४०% लोक लोकशाही घडविण्यापासून अलिप्त रहात असतील तर देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. मतदान कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. यात लक्षणीय बाब म्हणजे निरक्षर,अडाणी,गरीब लोक हे मतदान करण्यात सुशिक्षीतांपेक्षा अग्रेसर आहेत. कारण काल विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे येथे फक्त ४०% मतदान झाले आणि अनेल खेडोपाडी ७०% च्या wअर मतदान झाले. यावरून हे लक्षात येईल. गरीब,मजूर,कामगार लोक कामावर जाण्यापूर्वी आवर्जून मतदानास जातात. परंतु बरेचसे नोकरदार तर मतदानाची सुट्टी आहे,याचाच उपभोग घेतात. तेव्हा ते मतदानाला न जाता एखाद्या टुरवर जाणारे महाभागही आहेत. काहीजण सुट्टी आहे,म्हणून मतदानाऐवजी पेंडींग पडलेले कामे करतात. अनेकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नसते. यात महिला अग्रस्थानी आहेत. अशाही अनेक महिला आहेत ज्यांना वाटते की,त्यांच्या एका मताने राष्ट्रउभारणीत फारसा फरक पडणार नाही. अनेक ग्रामीण महिला आहेत की,ज्यानी आजवर फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाच फक्त मतदान केले. तर शहरी भागातील अनेक महिलानी वयाच्या चाळीशीपर्यंत मतदान केले नाही. काहीजणांचे नाव मुळगावी नोंदवलेले असते आणि नोकरी-व्यवसायानिमित्त फार दूरव असतात. अशीही अनेक लोक मतदानापासून वंचित असतात. खरेतर यावर सरकारने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत,यांची निवडणुकीपूर्वी दखल घ्यायला हवी. कारण ही जबाबदारी बी एल ओ ची आहे. ज्यानी सुट्टी असूनही मतदान केले नाही,अशांवर कारवाई व्हायला हवी. ज्या ठिकाणचे मतदान जास्त झाले तिथे शासनाकडून काहीतरी छोटीमोठी योजना पोहोचवावी. जेणेकरून ते उत्साहाने मतदान करून घेतील. जे गरीब,मजूर मतदान करत नाहीत त्यांना राशनसारख्या योजनेचा लाभ नाकारावा. कोणतीही बाब यशस्वी करायची असल्यास चांगल्याचं कौतुक अन् चुकीला शिक्षा मिळायला हवी. त्याशिवाय कुटुंब असो, संस्था असो,अथवा ते प्रशासन असो त्यात सुधारणा घडून येत नाहीत. काहीप्रमाणात मतदार यादीतही अनेक त्रूटी असतात,जसे की, लोकांच्या नावात त्रूटी असणे,तिथे इच्छा असूनही मतदान होत नाही.एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी नोंदवलेले असल्यामुळे तो एकाच ठिकाणी मतदान करतो,दुसरीकडे तो टक्का घसरतो.वरील बाबी मतदानाचा टक्का घसरविण्यास जबाबदार असल्या तरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सरकारबद्दल लोकांची अनास्था असणे. आपण वर्षानुवर्षे मतदान करत आहोत परंतु कोणतेही सरकार ज्याप्रमाणात घोषणाबाजी करतात त्याप्रमाणात त्या बाबी पूर्ण केल्या जात नाही. मग आपल्या मतदानाचा उपयोग काय?हाही प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आजकालची सरकारं ही लोकांच्या मतावर नाहीतर त्याने निवडणुकीत वाटलेल्या पैशाच्या आणि दारुच्या बळावर उमेदवार निवडून येतात. असे दारू आणि पैशाच्या बळावर निवडून येणारे उमेदवार पाहिले की,विवेकी माणूस मतदानाबाबत उद्विग्न होतो. देशात एवढे तरुण सुशिक्षित आणि सक्षम असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकाना उमेदवारी दिली जाते,तेव्हाही अनेक लोक निवडणुकीपासून अलिप्त रहाणे पसंत करतात. दिवसेंदिवस राजकारणातील वाढत जाणारा खोटारडेपणा,अविश्वास हे मतदान कमी होण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे याबाबत स्वतः सरकारने जागरूक असणे महत्वाचे आहे. निवडणुकप्रक्रिया पारदर्शक बनवणे,पैसा,दारू हे निवडणूक काळात दूर ठेवूनजनतेची प्रश्न,देशातील गंभीर समस्या, जनतेचा विकास हेच मुद्दे घेऊन निवडणुका लढवायला हव्यात. जनतेचा विश्वास जिंकणे
*============================*
अनिल गोडबोले,सोलापूर
1. मतदानाबाबत उदासीनता.:- आपण मत दिल काय नाही दिल काय फरक पडतो..2. मतदान ही गोष्ट महत्त्वाची आहे, हे बिंबवण्यात व्यवस्था कमी पडत आहेत.
3. मतदान प्रक्रिये मध्ये बराच गोंधळ आहे. बूथ सापडत नाही, यादीत नाव नाही, चेहरा एकाचा आणि पत्ता दुसऱ्याचा व नाव तिसर्याचे.
४. मतदान हे आपल्यासाठी असत हे आपल्याला माहीत नाही.
5. काही लोक मूळ गावापासून पोटापाण्यासाठी लांब राहतात.. खरच काही जणांना यायला जमत नाही.
6. सुशिक्षित लोक स्वतःला जबाबदार घटक मानत नाहीत.
7. महिला, आदिवासी, आणि वंचित घटक हे कोणाच्या तरी प्रभावाखाली मतदान करतात. त्यांना मतदान प्रक्रियाच माहीत नसते.
8. काहीजणांचा लोकशाही वर विश्वास नाही. उदा. नक्षलवादी
9. मतदान प्रक्रिया हा एक हत्ती आहे त्याला हलवणे हा खूप मोठा अडथळा आहे.. साधी सोपी सुटसुटीत प्रक्रिया नाही.
10. NOTA चा म्हणावा तसा प्रचार होत नाही. आपल्याला रिजेक्ट करण्यासाठी सुद्धा मतदान करता येत, हा विश्वास नाही. उलट बऱ्याच लोकांनी नकाराधिकार वर चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत. म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही वगैरे..
शेवटी;- "कोणीही आला तरी तेच करणार" त्यामुळे मत प्रक्रिया मोडकळीला आली आहे.
*============================*
पवन खरात,अंबाजोगाई
मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा फक्त अधिकारच नाही तर ते कर्तव्य सुद्धा आहे. अधिकार मागण्यासाठी आपण कोणत्याही थराला जायची तयारी करतो.मग कर्तव्य पार पाडण्याची वेळ येतो तेव्हा का तोंड लपवून बसायचे."अधिकार मागायची लाज वाटत नाही तर मग कर्तव्य पार पाडायला का लाज वाटते?"
भारतीय निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. तो फक्त शोभे साठी नाही किंवा त्यांना काम नाही म्हणून नाही तर भारतीय लोकशाही बळकट करायची असेल तर 100% मतदान होणे गरजेचे आहे आणि त्यांची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकाला व्हावी यासाठी ते अनेक जन जागृती कार्यक्रम राबावतात आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. पण 60% मतदार आपले कर्तव्य बजावत आहेत मग हे 40% मतदार लोकशाहीत वाढत असलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या वाढीसाठी प्रोत्साहन देत आहेत.असच म्हणावे लागेल.
जगात अभिमानाने सांगतो की सर्वात मोठी लोकशाही आमच्या भारत देशात आहे, पण मागील तीन निवडणुकीचा विचार केला तर सरासरी 60% इतके मतदान झाले आहे तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे उरलेले 40% भारतीय नागरिक मतदान का करत नाहीत .
हे 40% मतदार खूप छान प्रतिक्रिया देतात,
"मी जर मतदान नाही केलं तर लोकशाहीला काय फरक पडणार आहे?" आज मतदानानिमित्त सुट्टी आहे कुठेतरी फिरायला जाऊ,आपल्याला काय भेटणार आहे मतदान करून. यांना कसे समजेल आपण जर मतदान केले नाही तर आपणच आपल्या लोकशाही चा गळा अवळतो आहे.एक मताची किंमत फक्त एक मताने पराभव मिळालेला उमेदवार नक्कीच जणू शकेल.
एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदान करावे हे गांभिर्याने लक्षात घ्यायला हवे.
फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते.हेच प्रेम आणि राष्ट्रभक्ती जर मतदानाच्या दिवशी जर लक्ष्यात ठेवले तर खरचं भारतीय लोकशाही सक्षम होईल.
*=================================*
वाल्मीक फड,निफाड,नाशिक.
जवळजवळ ६०% लोक मतदान करतात पण ह्या ४०%मध्ये मोडतात ऊच्चभ्रू आणी जास्त करुन सरकारी नोकरीत असलेले कर्मचारी.कारण यांना काय करायचंय मतदान करुन आपला पगार मिळतोय ना बस्स. मतदानाचा दिवस एक सुट्टीचा दिवस म्हणून त्या दिवसी मौजमजा करायची परंतू मतदानाच्या दिवसी मजा करणाऱ्या लोकांना सत्तेवर असणाऱ्या सरकारबद्दल बोलण्याचा सुद्धा काहीएक आधिकार उरत नाही.मला तर वाटतंय की,मतदान केल्यावर अशी काही व्यवस्थापक असावी की जेणेकरुन मतदान केलेला व्यक्ती ओळखता येईल आणी न केलेला सुद्धा.म्हणजे जर कर्मचारी असेल तर त्याचा एक दिवसाचा पगार सरकारने कापून घ्यावा आणि इतर लोकांना त्या महीन्याचे सरकारी राशनआहे ते देऊ नये .पण ह्या सर्व गोष्टींसाठी शासकीय यंत्रणाही तितकिच सक्षम असायला हवी.
दुसरा पर्याय मतदान झाल्यानंतर ज्यांनी मतदान केले नाही अशा लोकांच्या गाठीभेटी घेऊन विचारणा करावी की,बाबा तु मतदान का करत नाही तुझा लोकशाहीवर विस्वास नाही का?
मि बघतो आमच्याकडील गरीब लोक पण मनाने श्रीमंत असलेले लोक दुसऱ्याच्या शेतात मजूरीला जाण्याच्या आगोदर मतदान करुन जातात.मी काही सांगत नाही की तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ नका पण आपले कर्तव्य पार पाडून.
आपण मतदान नाही केले तर असेच कायम हे आंगठेबहाद्दर ,गुंडागर्दी करणारे लोक निवडून जातील आणी जो तळमळ करणारा देशाला वाहून घेतलेला माणूस मागे राहून जाईल मग विचार करा आणी ठरवा आपला देश कोठे राहील.आजतरी आपल्याला देशभक्त नेत्यांचीच गरज आहे.
माझ्या मते आपण नुसतं लिहून चालणार नाही तर आपआपल्या प्रभागात आपण तो दिवस देऊन मतदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहीजे.चुकभूल माफी असावी.
*==========================*
दिपाली वडणेरे,नाशिक.
सद्या सगळीकडेच मतदान चालु आहे आणि त्यातच लिखाणानासाठी निवडलेला विषय ४० टक्के लोक मत का देत नाहीत ? खरचं विचार करायला आणि लिहायला भाग पाडणारा विषय आहे ..खरंतर हा खूप महत्त्वाचा आणि वाचार करण्याला भाग पाडणारा असा विषय आहे. मतदान करणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण स्वतःहून काळजीने , जबाबदारीने पार पाडला पाहीजे. मतदानाच्या दिवशी नोकरदारांना तर सुट्टीच असते वैयक्तिक व्यावसायिक यांना देखिल सुट्टीच असते असे म्हणायलाही काही हरकत नाही काही त्या दिवशी गावे / शहरे ही बंदच असतात. त्या दिवशी जवळपास सर्वच जण मतदान करून येतात मोलमजूरी करणारे असो , व्यवसायीक वा नोकरदार सर्वच आपला अधिकार चोखपणे बजावतात.
आता यत राहिले ते ४० टक्के मतदान न करणारे ? आणि यामध्ये कोणकोण आहेत ? तर या ४० टक्क्यांमध्ये वरच्यांमधीलच म्हणजेच नोकरदार , व्यावसायिक , मजूरवर्ग , आदी ....
सुट्टी म्हटली की जवळपास बरेचजणांचे हेच विचार की आपण एकट्याने नही केले मतदान तर कुठे एवढा फरक पडणार आहे . जाऊ दे काय करायचे मतदान ? आणि इतक्या वेळा तर केले काय फायदा झाला आपल्याला ? असा विचार करणारे असतात . एका मताने कुठे कुणाचं काही राहून जाणार आहे ? तर काहीजण ट्रीप ला जाण्याचे नियोजन करतात आणि फिरायला निघून जातात तर काही जण शहराकडे राहत असतील तर गावाकडे भेटायला म्हणून निघून जातात / येतात . मोलमजूरी करणारा पण तेच काय होणार हे इतक्या वर्षात नाहि झाल काही अन् आत्ता काय होईल ? हं काहिच नाही होत त्यापेक्षा आपल रोजान गेलं तर रोज तरी फिटल असा विचार करून कामाला निघून जातात. एवढचं नाही काही तर असे असतात मला जायलाच जिवावर येतंय अस बोलून टाळतात हो...
विचार केला तर खूप काही कारण आहेत 100 % मतदान न होण्याचे .. पण ....! जर प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी व हा आपला अधिकार आहे हा विचार जर केला ना तर ना कारण शोधावी लागतील ना मतदान न करणारे शोधवे लागतील.... गरज आहे ति फक्त एका चांगल्या सकारात्मक विचारसरणीची आपल्या मतदानाच्या जबाबदारी आणि अधिकार यांच्या जाणीवेची.....आपल्याला काय फायदा आहे.... इतक्या वर्षांत काय झाले काय नाही झालीे हा विचार करताय ना मग तो एकाच बाजूने न करता दुसर्याही बाजूने ही करून पहा की का नाही झाला काही बदल आपोआप आपले उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल .... आणि बदल करण्याची देश घडविण्याची जबाबदारी आपण त्यांना निवडून दिलेयं महणून त्यांची एकट्याचीच आहे हा विचार सोडून आपणही थोडाफार नाहीकाही जास्त पण आपली विचारशैली , ते करण्याची पद्धत, इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःत बदल घडवण्याचा तर नक्कीच प्रयत्न करू शकतो...
चला मग लोकशाही असलेल्या भारत देशाचे सुपुत्र, एक सुशिक्षित , सुजाण नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावूया....🙏☺
🙏 चुकभूल माफी असावी .....
*============================*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा