धर्म आवश्यक कि रोजगार ?


धर्म आवश्यक कि रोजगार ?

वाल्मीक फड, निफाड नाशिक



 धर्मापेक्षा निच्छितच रोजगार आवश्यक आहे कारण रोजगार नसेल तर आपण आपले पोट कसे भरणार? कारण खाली पेट तो  भजन भी नही होता.जुन्या काळात एक म्हण प्रचलित होती "पोटात भर तर तंगडीत जोर"याचाच अर्थ असा आहे कि,मणूष्य जर उपासी असेल तर जोपर्यत त्याला पोटाला अन्न मिळत नाही तोपर्यंत त्याला जात धर्म ह्या गोष्टीशी काही घेणेदेणे नसते.म्हणून रोजगार हे आवश्यतेचं पहिले मुळ राहील.

याउलट धर्म काही कमी समजू नका. धर्मामुळे लोक एकञ गुण्यागोविंदाने नांदतात.जात असू द्या हो कोणतीही त्याने काही फरक पडत नाही. म्हणून हिंदुस्थानात जे रहातात ते अप्रत्यक्ष हिंदूच आहेत. आता काही लोकांनी स्वधर्म सोडून दिला त्याला कोण काय करणार. संभाजी राजांनी तर स्वधर्मासाठी आपल्या प्राणाची आहुति दिली.
खरं म्हणजे आपल्या देशावर जी वेळोवेळी परकीय आक्रमणे झाली त्याच वेळेस खर्या धर्माचा नाश झाला .त्या लोकांनी आपले हित साधण्यासाठी भारतात जातीजातींत भांडणे लाऊन आपला डाव साधून घेतला. ह्या गोष्टि केल्या आपल्याच गद्दारांनी.धर्माशिवाय देश असु शकत नाही आणी असेल तर त्या देशात स्वबघिनीसी विवाह होत असेल.यावरुन चांगले आचार विचार व सात्विक भाव रहाण्यासाठी धर्माची सुद्धा नितांत गरज आहे.बघा लहान मुले ही जेव्हा धर्माच्या बंधनात राहून लवकर सुसंस्कारी होतील तसे पाच्छात्य संस्कृती बघून नाही होणार.म्हणूनच धर्म सुद्धा तितकाच आवश्यक आहे.

शिरीष उमरे, यवतमाळ




धर्म म्हणजे काय असते हो ? अस्तित्वात असलेल्या सगळ्या धर्माची मुलतत्त्वे बघाल तर शांतीपुर्ण, सामंजस्याने उत्साहवर्धक प्रगतीशील सहजीवन असा काहीसा अर्थ सगळीकडे दिसतो. म्हणजे एक वाहता निर्मळ झरा विचारांचा... पण कुठला धर्म असा राहीला आहे ??

कालबाह्य रुढी परंपरा, अंधश्रध्दा,  अमान्य नियमाद्वारे असमानता, अन्याय, जातपात, जुलुम, जबरदस्ती ह्यामुळे जे धर्नाचे स्तोम माचले आहे त्यात वैज्ञानिक दृष्टीकोणाचे दमन होत आहे.

पुर्वी रोजगाराची समस्या नव्हती. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र होते. मागील पीढीपेक्षा जास्त चांगले करण्याची चढाओढ असायची. द्वेष, मत्सर, हाव ह्यांना थारा नसायचा. आपली संस्कृती आपण च मातीत घातली. हा समतोल बिघडवण्यास आपण च कारणीभुत आहोत.

अर्थहीन शिक्षण, जीवनमुल्यांची ऱ्हास व भौतिक सुखाची हाव ह्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले.
जर मानवता धर्म नीट समजावुन घेतला तर रोजगाराच्या समस्या येणार नाहीत.
सगळे समजुन उमजुन ही हा बदल घडवणार कोण ? शिवाजी जन्मावा शेजारी ही वृत्ती सोडा.. स्वत:पासुन सुरुवात करु या...


अनिल गोडबोले, सोलापूर

रोजगार आवश्यक.
माणूस जगला तर बाकीच्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कितीतरी धर्म प्रसार करणाऱ्यांनी पहिल्यांदा लोकांना रोजगार, साधन दिली मग ती लोक जन्मजात धर्म सोडून तिकडे गेली.
धर्म ही जगण्याची रीत आहे. ती नियमांवर्ती आधारित आहे. पण नवीन गोष्टी चा शिरकाव करण्यासाठी सुधारणा होणे गरजेचे आहे.
आज धर्म हा अफू सारखाच काम करताना दिसत आहे. धर्म गरजेचा तो पर्यंत जो पर्यंत तो माणसाला जगवतो. माणसाला भीतीखाली, नियमांखाली दाबण्यासाठी धर्म असेल तर काही उपयोग नाही.

रोजगार, जीवन, आनंद,  प्रगती या गोष्टी मिळणे हे देखील गरजेचे आहे. आपण ज्या सामाजिक नियमांनी जगतो.. तोच पुढे धर्म होऊन जातो.

किरण पवार,औरंगाबाद


गरजेचा तर रोजगार आहे
पण आवश्यक वाटतो धर्म आहे,

संस्कृतीला जपण मानन योग्यचं
पण हिंसा करत धर्म मिरवणं आहे,

रोजगार किमान मुबलक हवा
राहणीमान तेवढं सुसज्ज हवं आहे,
पण ताळमेळ जमत नाही अन्
मानला आम्ही धर्मच माणुसकीपेक्षा मोठा आहे,

चुकीच्या गोष्टींच तेवढं आजही
सुशोभीकरण सरळ दिसतं आहे,
धर्मांधतेच्या नावाखाली मंदिर-मज्जिद गरजेचं बनवून
आम्ही कापला एका माणसाचाच गळा आहे.

दिपाली वडणेरे - नाशिक


धर्म  की रोजगार ?
तसे महत्वाचे  तर दोन्हीही आहेत कारण धर्म  आपल्याला  कसे जगावे,  वागावे , राहावे हे शिकवतो तर रोजगारा वर आपले जगणे अवलंबून  आहे  त्यामुळे  गरजेचे  दोन्हीही
   रोजगार तर आपल्याला मिळवायचाच आहे कारण तो जिवन जगण्यासाठी  गरजेचा आहे... पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला रोजगाराची आवश्यकता  नितांत आहे पण त्याच बरोबर धर्म त्याचे पालन  गरजेचे असलेले रूढी-परंपरा, रिती-रिवाज यांना सोबत घेऊनच....  हो पण म्हणजे काय सर्वच म्हणजे ज्या अनिष्ट,  ज्यावर आपल्याला काडीचाही विश्वास  नाही  अशा नव्हे,  तर ज्या  खरच गरजेच्या  आहेत ज्यामधून पल्यावर आपल्या मुलाबाळांवर योग्य संस्कार  पडणार आहे असा धर्म  , रिती-रिवाज देखील आपल्याला पाळायचे आहेत.....आपले सण - उत्सव  आपली संस्कृती  आपल्याला जपायची आहे आणि यासाठी  धर्म  महत्वाचा आहे .
      आजचे युवक/युवती  काहीही विचार न करता बोलून मोकळे होतत की माझा देवावर / धर्मावर अजिबात  विश्वास नाही.....पण कुठेतरी आणि थोडाफार का होईना तो मानतोच आणि मानलंही पाहीजे आज जर आपणच नाही मानणार तर मग आपल्या पुढील पिढ्या तरी कशा घडवणार आहोत याचा तरी विचार केलायं का कधी ? आहो नका न मानू तुम्ही  पण ज्या अनिष्ट  प्रथा  आहेत ,  विचार आहेत ते नका  मानू पण
आज आपल्या आपण साजरे करतो ते का करतो ? केव्हापासून ? करतो कशासाठी करतो? हे   करत असण्यामागे  प्रत्येक  सण--उत्सवामागे कारणे आहेत ती  आपल्यातील कित्येकांना माहिती नाहीती ती कधी आपण जाणून घेण्याचा  प्रयत्न  करतो का ?  ती जाणुन  घ्या म्हणजे आपल्या पुढील पिढीने  आपल्याला विचारले तर सांगता आले पाहीजे यासाठी गरजेचा आहे धर्म ...
    
रोजगार तर महत्वाचाच आहे पण त्याचे महत्त्व  हे प्रत्येकालाच  आहे कारण त्याची जाणिव  सर्वांनाच  आहे  जाणिव असणे महत्वाचे  असते ...पण आज धर्म   त्याचे महत्व  याचीही जाणिव  असणे गरजेचे आहे हो पण त्यातुन आपण काय घेतोय हे सुद्धा  तितकेच महत्वाचे  आहे . सकारात्मक  बाजू  घेणे आपल्या  हातात  आहे. चांगले ज्ञान आपल्याला यातुन घेता आले पाहीजे.  आणि सर्वांत  महत्वाचे  म्हणजे माणुसकी हाच सर्वांत  मोठा  धर्म  आहे  आणि आपली संस्कृती,  सर्व ग्रंथ संपदा,  आपला धर्म  आपल्याला हेच सांगतो आणि  सर्वांत  आधी आपण सर्वांनी  मिळून तीच जोपासण्याचा प्रयत्न  करूया... यासाठी प्रयत्न  करायचे  म्हणून  धर्म  महत्वाचा आहे....

     हो पण म्हणून धर्म  घेऊन बसायचं असं नाही तर रोजगार मिळवून  पोटाची खळगी भरेल इतके तरी मिळलवेच पाहीजे  नुसता धर्म  तर आपले पोट भरू शकणार  नाहीये त्यासाठी  कष्ट  तर आपल्याला करावेच लागणार आहे कष्ट  तर आपण इतरांसाठीच करतो पण धर्म - प्रपंप- देवदेव जे काही आपण करतो ते स्वतःसाठी  करत असतो त्यामुळे  तो सुद्धा  रोजगारासारखाच  निटनेटका आणि प्रामाणिक  पण करा   आणि रोजगार सांभाळून धर्म  सांभाळा आपल्या संस्कृतीची जोपासणा करा  कारण  महत्वाचे आणि गरजेचे दोन्हीही आहेत... .

लिहीण्यासाठी  तसे तर या विषयावर खुप काही आहे.... आपल्या बंधु- भगिनींनी  देखील अनेक वेगवेगळ्या  प्रकारे  आणि अतिशय  सुंदर  असे लेखन  केलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************