अमृत महोत्सवी आठवड्याच्या निमित्ताने... *माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षा*

*🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप*
📄 *आठवडा 7⃣5⃣वा* 📝
*अमृत महोत्सवी आठवडा*
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
 *14 एप्रिल 2019 ते 20 एप्रिल 2019*
💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐

अमृत महोत्सवी आठवड्याच्या निमित्ताने... *माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षा*


किरण पवार ,औरंगाबाद

वि४ ग्रुप म्हणजे नक्कीच एक आगळावेगळा आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करायला शिकवणारा ग्रुप आहे. आज समुहात असलेले वा नसलेले इतर व्यक्ती असतील ते एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणाने नक्कीच स्वत:त ज्ञानाची आणि विशेषत: जागृकतेची भर पाडत आले. मला नेमका दिवस आठवत नाही मी कधी इथे जॉईन झालो. पण ज्यादिवसापासून इथे आहे त्यादिवसापासून नक्कीच थोडाफार का असेना पण बदललो. मला लेख लिहायची पूर्वीपासून आवड होतीच परंतु काही विषयांबाबत मर्यादित माहिती असायची किंवा ती पूर्णत: नसायचीच. या ग्रुपने वैचारिक तारतम्य तर दिलचं शिवाय अजूनही भरपूर गोष्टी दिल्या त्या म्हणजे माझ्या लेखांमधे दिवसेंदिवस भर पडत गेली. बऱ्याचदा ग्रुपवर अनेक विषय लिहायचे सुटले पण ते सुटलेले विषयही जमा करून लिहण्यासाठी नंतर वेळ काढून लिहले. लेख समोरच्याला उद्देशून सांगायला अथवा पूर्णत: टिकात्मक असा काही वि४ माझ्या मनात नसतो. मी जेव्हा योग्य लेख लिहू शकतो तेव्हा मी स्वत:ची बुद्धी तपासत असतो. ज्या दिवशी स्वत:ला जाणवत नाही की, योग्य लिहलयं तेव्हा पुन्हा माझं वाचण सुरू होतं. असो.
           आता मुळ मुद्यावर येतो. वि4 समुहाकडून माझ्या असलेल्या अपेक्षा म्हणजे, समुहाने घडवलेल्या विविधांगी विचारांची ही पिढी पुढच्या पिढीसाठी काहीतरी अमुल्य ठेवा आणि शिकवण देऊन जाणारी असावी. इथल्या सुजाण नागरिकत्वाच मुल्य कायम जपून रहावं. साहित्यिकाला केवळ लिखाणातलं मर्यादित लिहीणचं नाही तर सामाजिकतेकडेही त्याच भान असावं. कारण साहित्यिक लिखाणातून एक वेगळी चळवळ एखाद्या अन्यायाविरूद्ध स्थापित करू शकतो, याची बरीच उदाहरण इतिहासात आपल्याला पहायला मिळतात. त्याचबरोबर समुहातल्या काही मंडळींनी किमान पंधरा मिनीटे वेळ काढून दिलेल्या विषयांबाबत आलेल्या लेखांवर मत मांडत जावे. आणि शक्यतो जमल्यास लिखाणही करावं. धन्यवाद!
*=============================*

वाल्मीक फड,निफाड ,नाशिक

अनेक दिवसापासून मनात एक प्रबळ इच्छा होती की,काहीतरी लिहावं पण आपण तर पडलो अल्पशिक्षीत आपण काय लिहीणार?ह्याचं मुख्य कारण म्हणजे मी जर एखादे पुस्तक वाचायला घेतले आणी त्यावर लेखकाचे नाव वाचले तर त्यांच्या नावापुढे प्रोफेसर,डाॕक्टर किंवा इतर त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख असायच्या त्यामुळे मनाला एक हळहळ असायची कि आपण काय लिहीणार आहोत यांच्यासारखे.परंतु माझा पुतण्या सचीनकडून मला वि४ समूहाबद्दल माहीती मिळाली.मग काय मला तर आकाश ठेंगणे झाले आणी मी समूहात सामील झालो.
तसं मी सातवीत असताना सात आठ कविता केल्या होत्या त्यातिल दोन मी समूहावर टाकल्या पण होत्या नववीत असताना मी दोन नाटके लिहून ती नाटके शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात स्वता कलाकार होऊन सादर पण केली आणी भरपूर प्रमाणात दादही मिळाली होती.
खरं ह्या समूह तयार करण्याचा विचार ज्या महानुभवाच्या डोक्यात आला त्यांचे मनापासून आभार मानतो.कारण हा समूह मला मिळाला नसता तर कदाचित मी माझे विचार आपणापर्यंत पोहचवू शकलो नसतो आणी तुमचे पण चांगले विचार मला अनुभवायला मिळाले नसते.व्याकरणाची इतकी जाण नसताना आपण मला वाचता आहात यातच मला धन्यता वाटते.
समूहाकडून अपेक्षा इतकीच आपणासारखे उच्चशिक्षण घेतलेले नाही म्हणून तुमचे सुंदर विचार वाचण्यास मिळावे हिच प्रेमळ अपेक्षा.जय हिंद .वंदे मातरम्.
*=============================*

संगीता देशमुख,वसमत

            मला या समूहात येवून जवळपास एक वर्ष होत आले. समूहात कोणीही ओळखीचे नव्हते. अक्षय पतंगे यांनी या समूहात मला घेतले. समूहाचे शीर्षक पाहून समूहाचे वेगळेपण आणि गुणवत्ता कळाली. या समूहात काही अनुभवी लोकांसोबतच अगदी नवीन तरुण पिढी असल्याने आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव यांना आहे. लवकरच माझ्यावर ॲडमिनपदाचीही जबाबदारी टाकण्यात आली. फार धडाडीने मी ही जबाबदारी पार पाडत नसले तरी पूर्णत: निष्क्रियही नसते. आणि हीच अपेक्षा मी या समूहाच्या अमृतामहोत्सवी आठवड्यानिमित्त करते. असं म्हणतात की, "ये दुनिया इसलिए बुरी नही के यहाँ बुरे लोग ज्यादा है।

बल्कि इसलिए बुरी है कि यहाँ अच्छे लोग खामोश है…." याप्रमाणे तरुणांनी आजूबाजूला काय घडत आहे,यावर व्यक्त व्हायलाच हवं. त्याशिवाय त्यांना त्यांच्या कल्पनेतील भारत कसा पहाता येईल? देशाचा भावी आधारस्तंभ म्हणून माझे हेच कर्तव्य आहे. म्हणूनच समूहातील लोकांनी व्यक्त व्हावं म्हणून आपल्याला ते वारंवार प्रोत्साहीत करीत असतात. दररोज विषय बॅंक टाकून आवर्जून आठवण करून देतात. खरच काही जणांची हा समूह अतिशय उत्कृष्टरित्या कसा चालेल याची सर्वतोपरी धडपड चालू असताना मात्र बरेचसे सदस्य हे लेख वाचतात की नाही,हेही कळायला मार्ग नाही. या समूहात २५२ सदस्य आहेत. आणि ज्याअर्थी आपण व्हाटसॅप वापरतो त्याअर्थी मला वाटते,दिलेल्या विषयावर किमान चारपाच ओळी ह्या प्रत्येकाला लिहिता यायलाच हव्यात. कारण माझी ही अपेक्षा फार अवास्तव आहे,असं वाटत नाही. २५२ सदस्य आहेत म्हटल्यावर दर आठवड्याला किमान १००-१५० लेख हे यायलाच हवेत. काही वेळा आपल्याला हे विषय कठीण वाटत असतील तर आपण आपल्या पध्दतीने विषय सुचवायला हवेत. पण इतक्या संवेदनशील समूहात विचारविमर्श व्हायलाच हवा. मला वाटते,विचार करणे हे मानवाचे आणि विशेषतः जिवंतपणाचे लक्षण आहे. आणि आपल्या समूहाचे नावच आहे "वि४"! या अमृतमहोत्सवी "वि ४" समूहात विचार व्हायला हवा आणि तो व्यक्त व्हायला हवा,ही मी अपेक्षा करते.
*=============================*

अनिल गोडबोले,सोलापूर

एक विचार.. कोणालाही न भेटता 75 आठवडे सतत मराठी साठी काम करतो आणि ते देखील मोठे लेखक नसताना... त्यामुळे सर्वात पहिल्यांदा सर्वांना "अमृत महोत्सवी आठवड्यानिमित्ताने शुभेच्छा"

विचार ग्रुप चालत आहे मध्येच जोरात कधी हळू... पण थांबणार निश्चित नाही.. त्यामुळे माझ्या सर्व अडमीन सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.!

सर्व सदस्य जे लिहितात, वाचतात त्या सर्वांचे देखील अभिनंदन.!

अपेक्षा म्हणाल तर फार माफक आहेत.
1. 257 सर्व सदस्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे 3ही विषयावर एकतरी आठवड्यात लिहावे.
771 लेख....!

2. उदासीन लोकांना लिहिण्याची आणि वाचनाची गोडी लागली पाहिजे.

3. या नंतर एक विशेषांक काढावा आणि दिवाळी अंक.. भरपूर साहित्य घेऊन..!

4. एखादं संमेलन व्हावं सर्व विचार लेखक सदस्यांचे.. (त्याला बऱ्याच गोष्टी लागतील याची कल्पना आहे)

5. 100 वा आठवडा अजून काहीतरी वेगळं आणि भव्यदिव्य व्हायला पाहिजे.

6. नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून इतर प्रस्थापित साहित्यिक अभिमानाने उदाहरण देतील.

7. येणाऱ्या युगातील फार मोठी मराठी साहित्य संवर्धनासाठी चळवळ होऊन नवीनच इतिहास घडेल. मराठी अभिजात दर्जा मिळवेलच... आणि जगात सर्व मान्य भाषा होईल यात कोणतीही शंका राहणार नाही..


भरपूर अपेक्षा झाल्या.. त्या पूर्ण होवोत हीच एक मोठी अपेक्षा आणि सदिच्छा व पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद..!!
*=============================*

सौदागर काळे,पंढरपूर

आता वि४ बघता बघता ७५ आठवद्याचा होतो आहे. जवळपास दीड वर्षांचा.या दीड वर्षात २२५ च्या आसपास विषय चर्चेला घेतले.ते आपण वेळ मिळाल्यास ब्लॉगवरही पाहू शकता.वि४ ग्रुप कसा आकाराला आला .हे अगोदर सांगितले आहे.ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज वाटत नाही.आपला ग्रुप सतत बदलत राहिला आहे. प्रवाहासारखा.त्यात तुमच्यासारखे वाचक-लेखक चिऊच्या गोष्टीसारखं चोचीत जेवढं पाणी बसेल तेवढं मराठी साहित्याच्या माठात टाकत आला आहात. पण आपल्या घरातील पाण्याचा माठ नुसता भरून ठेवून त्याचे पिण्यासाठी वापर नाही झाला तर काही दिवसानंतर तो पिण्यायोग्य राहत नाही.ते पाणी शिळं झालं म्हणून आपण बदलतो.त्याप्रमाणे वि४ वर अनेक जण लिहीत आहेत.ते फेसबुक पेज,ब्लॉगवर इतरांना वाचण्यासाठी पोहोचावे म्हणून आपली ऍडमिंन टीम निस्वार्थ हेतूने वेळ काढून योगदान देत असते.या आपल्या ऍडमिंन टीमला वि४ सेवक म्हटले तर वावगे वाटणार नाही.अशा वि४ सारख्या माठात आपण विविधांगी विचारांचे पाणी भरतो.ते पाणी आपण पिण्यासाठी नाही वापरले तर तो माठ भरण्याचा काय उपयोग?अशावेळी ७५ आठवडे झाले!दीड वर्ष झाले!२२५ विषय चर्चेला घेतले!असा पोकळ अभिमान आपण प्रत्येक वेळी मिरवल्यासारखे होईल.म्हणून हा वि४ चा माठ रोज भरावा ,रोज वाचकांनी वाचून रिकामा करावा.
आता माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षाबद्दल:

१.ग्रुपमधील जुन्या लेखकांनी वेळ काढून लिहीत रहावे जेणेकरून आपली लेखणी अजून समृद्ध होईल.अन जे वाचक आहेत,जे लिहिण्यासाठी धडपडत आहेत.तेही आपल्यातील काही गोष्टी शिकून स्वतः समृद्ध होत राहतील.

२.फेसबुक पेज व ब्लॉगवर तुमचे प्रसिद्ध झालेले लिखाण किंवा तुम्हांला आवडलेले लिखाण लिंकद्वारे शेअर केले तर अनेक वाचकांपर्यंत आपले विचार पोहोचू शकतात.

३.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वि४ समूह आपल्या माध्यमातून पोहोचला आहे.तो प्रत्येक तालुक्यात पोहोचत जावा.

४.या ग्रुपला अजून चांगल्याप्रकारे आपण सर्वजण मिळून पुढे कसे नेऊ शकतो.यावर प्रत्येक रविवारी या ग्रुपने ठरवलेल्या नियमातील वेळेनुसार चर्चा करावी.

५.हा ग्रुप कोणत्याच विचारधारेचा पुरस्कार करत नाही.म्हणून ग्रुपमध्ये अजून आपल्या माध्यमातून विविध विचारधारेचा पुरस्कार करणारी माणसे जोडत जायला हवीत.

६.वि४ ग्रुपचा प्रवास एखाद्या कुटुंबासारखा बळकट व्हावा.

७.वि४ चे ४-वि....१.विद्यार्थी २.विनय ३.विवेक ४.विरजा हे घटक प्रत्येकांनी निरंतर आत्मसात करत आपली वैचारिक वाटचाल करत राहावी.

८.तुम्ही सर्वजण या विषयाच्या माध्यमातून अपेक्षा मांडा.म्हणजे आपल्याला अजून ग्रुपला चांगल्याप्रकारे कसे वळण देता येईल.हे समजेल.
ही छोटीशी आशा .धन्यवाद.
*=============================*

निखिल खोडे, पनवेल

       युवकांचे मराठी भाषेत स्वविचार मांडण्यासाठी उपलब्ध असलेले व्यासपीठ म्हणजे वि४ व्हॉट्स अप ग्रुप! नवीन लेखकांचे विचार ब्लॉग, फेसबुक पेज द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविले जातात. गेल्या ७५ आठवड्यापासून सुरळीत चालू असलेला ग्रुप ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला विविधांगी विषय दिले जातात. आठवड्यात दिलेल्या विषयांवर तरुण मंडळी स्वतःचे विचार मांडत असतात.

वि४ ग्रुप कडून असलेल्या अपेक्षा

१) वि४ ग्रुप मधील वाचकांनी ४ ओळी मध्ये का होईना आपले विचार ग्रुप वर मांडावे.

२) ग्रुप मधील लेखांना जास्तीत जास्त वाचक वर्ग मिळवा यासाठी प्रयत्न असायला हवे.

 ३) वि४ ग्रुप ची लवकरच दुसरी शाखा म्हणजे वि४-२ सुरू व्हावा त्यासाठी नवीन लेखक जोडावे.

४) वि४ व्हॉट्स अप ग्रुप अविरत पणे चालू असाच चालु राहावा त्यासाठी शुभेच्छा!!
*==========================-==*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************