गंगा नदी स्वच्छ झाली का?.. नमामी गंगे



क्षितीज गिरी, सातारा

भाजप सरकारने 2014 च्या निवडणुकीत गंगा साफ करण्याचा वादा केला होता.तसे बरेच वादे केले होते त्या पैकी हा एक.एवढेच नाही तर ती स्वच्छ झाल्याचा दावा पण मागे काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.अजून किती खोटे बोलणार ते काय माहिती.पण कांग्रेस पण काय यशस्वी झाली नाही यामध्ये त्यांनी पण वेळच्या वेळी कडक पावले उचलली असती तर आज ही वेळ आली नसती.आणि मुळात सरकारला तरी का म्हणून पूर्णपणे जबाबदार धरायचे आपण. एक नागरिक म्हणून आपण किती जागृत असतो या विषयावर. कंपणीतील अशुद्ध काही ठिकाणी तर विषारी पाणी निदी मध्ये सोडले जाते तेव्हाच आपण याला विरोध केला पाहिजे.सगळे सांडपाणी आणि कचरा आपणच तर टाकतो किवा सोडतो पाण्यात आणि मग दोष सरकारला देतो.त्यात प्लास्टिक मुळे तर खूपच प्रदूषण होते.
गंगा स्वच्छ करण्यासाठी नमामि गांगे हा उपक्रम भाजप सरकार कडून राबवला गेला पण तो फक्त जाहिरातीवर. ग्राउंड लेवल ला म्हणावे एवढे काम झालेच नाही.
जगामध्ये बाकीच्या प्रगत देशांचा जर विचार केला तर त्याच्याकडील  नद्या साफ असतात.ते तर नद्यांना देव मनात नाहीत.तरी साफ असतात.आपण तर नद्यांना देवी वा श्रद्धेचे स्थान दिले आहे.तरी इतकी गहाण का.काही ठिकाणी तर नदी जवळून जावेसे पण वाटत नाही.एवढा गहाण  वास येतो.कुभ मेळ्यात कसे डुबकी लावतात काय माहिती.

पण थोडक्यात काय भाजपची योजना पूर्णपणे फसली आहे.गंगा अजिबात साफ झाली नाही.त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात  योजना राबवली पाहिजे.त्यामध्ये राजकारण न करता लोकांनी व सरकार प्रतिसरकार ने सर्वांनी मिळून जर प्रयत्ना केले तर आपली गंगा साफ होऊ शकते नाहीतर दर 5 वर्षांनी फक्त हा राजकारणाचा विषय राहील राम मंदिरा सारखा.
_______________________________


वाल्मीक फड, नाशिक.

खरं तर हा प्रश्न आपण स्वतालाच विचारायला पाहीजे की,नदीच्या स्वच्छतेसाठी आपण प्रथम  काय केले आहे.जेव्हा आपण स्वतापासून सुरुवात करु तेव्हाच खर्या अर्थाने नदी किंवा गंगा स्वच्छ होईल असे मला वाटते.
खरं म्हणजे ह्या असल्या कामांना सरकारला दोष देण्यापेक्षा आपणच यावर काहीतरी तोडगा काढला पाहीजे.थोडक्यात म्हणजे आपण गणपती विसर्जन करतो,ताबुत विसर्जन करतो आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांडपाणी,कंपनीचे केमिकलयुक्त पाणी हे पाणी ह्या गोष्टि आपण नदीत सोडायला बंद केल्या तर काय लागंतं नदी  स्वच्छ व्हायला?
नदी आज खर्या अर्थाने खरंच निर्मळ नाहीये जुन्या काळात आम्ही तहान लागली की बुट्टी लाऊन मनमुराद पाणी प्यायचो पण आत्ता नदीजवळ गेलं की पाण्याच्या वास (दुर्गध) येतो.
सरकारने नमामी गंगे नावाचे मिशन हातात घेतले पण त्याचा म्हणावा असा परीणाम झाला नाही.सरकारच्या भरवशावर थांबण्यात मजा नाही. म्हणून आता आपण सावध होऊन गंगेमध्ये सांडपाणी सोडणे,रासायनिक खतांचा अतिवापर,गणपती विसर्जन,ताबुत विसर्जन अशा ज्या नदीला अस्वच्छ करणाऱ्या वस्तु टाळल्या पाहीजे.
________________________________

संगीता देशमुख,वसमत

२०१४ च्या जाहिरनाम्यात नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत' ही संकल्पना मांडताना गंगा नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी तसा अल्पसा प्रयत्न करून,तेथे दीपोत्सव करून एक दिवसाच्या स्वच्छ गंगेचे फोटो जास्त टाकून लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. वास्तवात मात्र गंगा नदी स्वच्छ झालीच नाही.  आज पृथ्वीवरील पाण्याचे फारमोठे प्रदूषण झाले आहे. त्यात लोकांच्या अंधश्रद्धा,धार्मिक भावना,मोठमोठाले उद्योगधंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यातल्या त्यात धार्मिक ठिकाणी तर हे पहावतच नाही. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की,ते प्रदूषण होऊ नये म्हणून लोकांचे प्रबोधन होऊन मनपरिवर्तन व्हायला हवे. गंगा नदी ही आपल्या देशाची मुख्य नदी. तिने माता म्हणून अनेकांचे जीवन समृद्ध केले परंतु माता म्हणून श्रध्दा-अंधश्रद्धेपोटी तिची हेळसांडही खूप झाली. रुढीपरंपरांचे पालन करता करता ती घाणीची जननी झाली. अशी ही नदी नुसती स्वच्छ करून थांबता येणार नाहीतर तिथे येणारे भक्त,उद्योगधंदे यांच्याकडून होणारे प्रदूषणाचे स्त्रोत थांबवावे लागतील. आणि यासाठी काही वर्षे निश्चितच लागणार आहेत. त्यासाठी लोकांचे मनपरिवर्तन होणे आवश्यक आहे. त्याशिवाय केलेले काम मग क्षणिक आणि  फक्त फोटोसेशनपुरतेच मर्यादित रहाते.  असं भावनिक होणं नेत्यांनीही टाळायला हवं.
_________________________________
टीप- (सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************