माझा आवडता उद्योजक.

         निखिल खोडे, पनवेल.

              माझा आवडता उद्योजक अमेरिकन गुंतवणूकदार व व्यावसायिक वॉरन बफेट हे आहेत. कमी वयातच म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. जगात तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत असुन सुद्धा त्यांची काटकसरीचे राहणीमान असणारे वॉरन बफेट यांना कसलाही गर्व नाही. पाच दशकापूर्वी घेतलेलं घरात आजही ते  वास्तव्यास आहेत. स्वतःची गाडी स्वतः चालवतात. शेअर मार्केट बद्दलचे सर्वात मोठे जाणकार मानल्या जातात. कोणताही वायफळ खर्च करत नाही. वॉरन बफेट त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा चॅरिटी ला देतात. 
              
             वॉरन बफेटचे गुंतवणुकी संदर्भात अफलातून विचार आहेत. शेअर बाजारात मंदी च्या वेळेत गुंतवणूक करायची. गुंतवणूक ही दीर्घकालीन असायला पाहिजे. कोणत्याही एका उत्पन्नाच्या आधारावर राहायला नको. उत्पन्न वाढविण्यासाठी दुसरीकडे बचत करायला हवी. गरज नसलेल्या वस्तू विकत घ्यायला नको नाहीतर तुमच्या कडे असलेल्या वस्तू विकण्याची वेळ तुमच्या वर येईल. तुम्हाला जितक्या वेगाने पैसा गुंतवता येईल तेवढ्या लवकर गुंतवणूक करा.
                
              बचत कशी करावी यावर बफे यांचे विचार आपण खर्च केल्यावर उरलेल्या पैश्याची बचत करतो, आपल्याला याउलट करायला हवे. आधी बचत करून उरलेल्या पैसा खर्च करावा. आपली बचत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी. पैसा ठेवला की कुजतो आणि  गुंतवला की वाढतो. पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज लागत नाही. स्वतः मध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. 

                  व्यवसायात येणारे धोके यासाठी बफेट सांगतात की, आपण करत असलेल्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते व आपण काय करतो ह्याची कल्पना नसते  तेव्हा धोके निर्माण होतात.
 ह्या उद्योजकाकडुन बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

____________________________

शिरीष उमरे यवतमाळ

औद्योजकतेचे प्रणेते जमशेदजी टाटा पासुन आताचे विजय गोडबोले पर्यंत ....औद्योगिक क्रांती, नंतर हरीत क्रांती, मग दुग्ध क्रांती .... दुरसंचार आणि  संगणक सॉफ्टवेअर.... ऑटोमेशन, नॅनो टेक्नाॅलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉर्मा, करमणुक, फायनांस सेक्टर ह्यामधे बेंच मार्क सेट करणारे हजारो उद्योजकांच्या  यशस्वी जीवनगाथेने प्रेरीत झालेला मी ह्या विषयावर विचार करायला बसलो तेंव्हा मला आठवला जोती !!

आता कोण हा जोती ? एक कुरळे केसाचा रापलेला गौरवर्णी सडपातळ हसतमुख तरुण ज्याची सगळ्यात पहीली भेट आजपासुन अठ्ठावीस वर्षापुर्वी झाली. मी मुंबई ला मॅजेस्टीक आमदार निवासात राहायला गेलो तेंव्हा भेटलेला बाजुच्या ग्राहक भंडारासमोरील मोकळ्या जागेत छोटीसी चाय टपरी चालवणारा जोती !! 

पाच-सहा भारतिय भाषा लिलया बोलणारा सदा मोहवणारे स्मीत हास्य चेहऱ्यावर बाळगणारा, सकाळी पाच ते रात्री दहा अशी कामाची वेळ... असा रोज पंधरा तास वर्षभर राबणारा हा जोती थकत कसा नाही ह्याचे मला नेहमी नवल वाटायचे. सदैव दुसऱ्याच्या मदतीला धावुन जाणारा त्यामुळे ह्याच्या हीतचिंतकांची गणती हजारोत असायची. कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो, सढळ हाताने मदत करणारा हा अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा धनी मला नेहमी त्याच्या अषटपैलु गुणांनी आश्चर्याचा धक्के देत राहायचा. त्याच्या सीए ने सांगितले की त्याचा महीन्याचा पंधरा लाखाचा टर्नओवर आहे तेंव्हा मी तोंडात बोटे च टाकली. त्याच्या टपरीवर चहा कॉफी वेज सँडवीच एवढेच असायचे पण त्याचा सप्लाय जवळपास एक कीमी च्या परिघात असायचा. क्वालिटी, टेस्ट, स्वच्छता, कींमत व क्वांटिटी ह्यात तो कधीच कॉन्परमाइज करायचा नाही. त्याच्या फोर्टपोलियो मॅनेजर ने त्याच्या इनवेस्ट च्या नॉलेज व विजनची तारीफ केली तेंव्हा मी अवाक च राहीलो. करोडो ची गुंतवणुक तीही इतक्या गुतागुंतीची पाहुन माझी मती गुंग झाली. जोतीच्या म्हणण्यानुसार त्याने सगळ्यात जास्त व योग्य इनवेस्टमेंट त्याच्या २० जणांच्या टीममधे केली आहे. ते स्टाफ नाही तर माझी फॅंमिली आहे. अजुन नवल म्हणजे त्याने सगळ्यांना त्याचे बिझनेस पार्टनर बनवले आहे. 
आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला काय कोणालाच अजुनही त्याची जातापात, धर्म, मुळ गाव, मातृभाषा, नातेवाइक, शिक्षण ह्याबद्दल काहीच माहीती नाही ना त्याच्या टीमची !!
मानवतेचा सच्चा उपासक सदैव कामात गुंतलेला  हा पक्का मुंबईकर मला नेहमी आदर्श वाटत आला आहे. 
तुमचा जोती कोण ? लिहा चार ओळी 

____________________________


गणेश नारायणराव फाळके.

माझा आवडता उद्योजक या विषयावर लिहायचं ठरलं तर डोक्यात सगळे टॉपलेवलचे उद्योजक यायला लागले.. ज्यांचे बरेच किस्से पुस्तकांतून.. लेखांतून.. आणि चर्चासत्रातून ऐकायला मिळाले..

शिरीषभाऊंनी लिहिला तो विषय.. दोन तीन दिवसांपासून डोक्यात येतोय.. पण लिहावं की नको.. याच पेचात अडकून बसलो..शिरीषभाऊंचा लेख आला.. आणि पेच सुटला..

आपल्या अवतीभवती बरीच मंडळी आहेत..जे दोन चार तास नुसती गर्दी खेचत असतात..

कुणी अगदी थोड्या पैशात गावठी औषधोपचार करतात,कुणी एखादी पानटपरी टाकतात, कुणी भेळपुरीची गाडी, कुणी चहानाश्त्याचा गाळा,कुणी साधा भेळीचा ठेला लावतात..
पण यातला प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला यशस्वी उद्योजक असतोय..
म्हणून तर शिवाजीनगर रेल्वेस्टेशनच्या बाहेरच्या एका कोपर्‍यातल्या छोट्याशा दुकानात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येणारा श्री यदुनाथप्रसाद यादव *झटका भेळवाला* असतो.. आणि लोणावळयातल्या गर्दीच्या ठिकाणापासून दूरवर एका बाजूला श्री दगडूबुवा गायकवाडांची *बुवांची मिसळ* पस्तीस वर्षे फेमस असते..

ही आपापल्या क्षेत्रात छोट्याशा व्यवसायातून वर आलेली गरीब जनता.. माझ्यामते आवडती उद्योजकंच आहेत..

___________________________

अनिल गोडबोले,सोलापूर

माझा आवडता उद्योजक या विषयावर खरं तर मला दोन नाव समोर येत आहेत.
एक आदरणीय रतन टाटा आणि बिल गेट्स.

टाटा यांचं नाव खर तर सर्वाना माहीत आहे.. पण मला आवडतात कारण अजूनही त्यांच्या धोरणात मानवता आणि उदारमतवादी पणा आहे. कुठेही लुचेपणा किंवा फसवेगिरी नाही.. सामाजिक कार्य आणि माणसांना महत्त्व दिल्यामुळे ते अजूनही बऱ्याच वरच्या पदावर आहेत.. बाकीचे किस्से सांगण्यात फार काही अर्थ नाही.

बिल गेट..  दुर्दम्य इच्छाशक्ती, मार्केट ओळखण्याची आणि तयार करण्याची शक्ती यामुळे अख्ख्या जगात मायक्रोसॉफ्ट पोहोचवली आणि निवृत्त होऊन समाजकार्य करत फिरत आहेत..

मार्क झुकरबर्ग हा देखील आहे.. पण अजून त्याच्या कारकिर्दीचा बराच टप्पा शिल्लक आहे.. त्यामुळे त्याबद्दल नंतर कधीतरी

____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************