आव्हाड ज्ञानेश्वर, दापूर सिन्नर.
प्रसारमाध्यमाची जी जी साधने उपलब्ध अाहेत ती सर्व माध्यमे भाषेचा प्रसार करण्यास हातभार लावत असतात.अगदी माणवाची उक्रांती झाल्यापासून भाषा प्रसारासाठी मोठे प्रयत्न झाले.
मासिके,पुस्तके,वर्तमानपञे,रेडीओ,टि व्ही यातून भाषेचा प्रसार झाला.परंतू यात अाधुनिक इंटरनेट सारख्या साधनाने भाषा संस्कृतीची देवाण घेवाण वेगाने होऊ लागली.लिखित साहित्य वेगाने सेवा पुरवू लागले.अावश्यक लेख,पुस्तके,कविता,नाटक,चिञपट एका क्लीकवर पाहता येउ लागली.सुविचार,विनोद,प्रार्थना,उपदेश यांची देवाणघेवाण यामुळे वाढली.इंटरनेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना क्षणात उपलब्ध होत अाहे.यामुळे इतर भाषांप्रमाणे मराठी भाषा समृद्ध होत अाहे.खेळ,प्रसिद्ध ठिकाणे,महत्वाच्या व्यक्ती यांची माहिती घरबसल्या मिळत अाहे.अायुर्वेदीक औषधे,वनस्पती,प्राणी,पक्षी,शहरी व ग्रामिण जीवन शैली यांचा अभ्यास करण्यास मदत झाली.
इंटरनेटचा वापर अशा विधायक कामासाठी होत असल्याने त्याला मराठी भाषेत अांतरजाल म्हणणे वावगे ठरणार नाही!!!
==============================
पवन खरात,अंबाजोगाई
आज आपण पाहतो आहेत की मराठी साहित्यापेक्षा वाचकांना इंग्रजी साहित्या वाचायला आवडते. काही जण म्हणत असतील मी तर मराठीच साहित्य वाचतो.
आजही अनेक प्रकाशन संस्थेच्या माहितीनुसार ते नवीन मराठी साहित्य छापताना शंभर वेळा विचार करतील पण एखादे इंग्रजी साहित्य मराठीत भाषांतर असेल तर ते डोळे झाकून छापायला तयार होतात. याचे कारण आपण काय समजायचे , मराठी साहित्य दर्जेदार नाही की मराठी साहित्यात काही रस उरला नाही.
मराठी साहित्य हे आज पुन्हा नव्याने भरारी घेत आहे. यासाठी खूप मोलाचे योगदान आहे ते इंटरनेटचे, कारण आजचा तरुण वर्ग कागदी पुस्तकापेक्षा pdf स्वरूपातील पुस्तके वाचायला जास्त प्राधान्य देतात.
मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार हा इंटरनेट मुळे खूप कमी वेळात ते वाचकांना वाचण्यास उपलब्ध होत आहेत.
इंटरनेट चे योगदान जर आपण पाहिले तर खालील उदाहरणे पाहता येतील.
1. विचार व्हाट्सअप ग्रुप
आज आपण विचार ग्रुप मध्ये आहेत, सर्व नवीन व जुनी लेखक या ठिकाणी जे विषय दिलेले आहेत त्यावर व्यक्त होतात. या ठिकाणी लिखाण करताना तुम्ही तुमच्या भाषेत पण वाचणाऱ्या व्यक्तीला समजेल अशा भाषेत लिहू शकता .प्रत्येक लेखकाने लिहलेले लेख आपण याठिकाणी वाचतो त्यावर प्रतिक्रिया सुद्धा देतो.
त्यामुळे आपल्याला सुद्धा लिखाण करण्यास प्रेरणा मिळते. आणि आपण सुद्धा दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतो.
2. प्रतिलिपी
प्रतिलिपी हे मराठी वाचकांसाठी खूप छान अस माध्यम आहे, यामध्ये लाखो लेखक दररोज आपले लेख लिहितात व लाखो वाचक ते आनंदाने आणि कमी वेळेत वाचतात. विविध कथा, कविता, शायरी इ. वाचायला मिळेल.
3. मराठी माती वेब साईट
या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला छान कविता असतील विविध घटकावर लेख असतील ते वाचायला मिळतील.
4.मराठी कविता वेबसाईट आणि अँप
मराठी कविता ही वेबसाईट तशी मला खूप आवडते, कारण या वेबसाईटवर कधीकाळी मी सुद्धा कविता लिहायचो. या वेबसाईटवर तुम्हाला प्रेम, विरह, प्रेरणा, व्यंग इ. प्रकारच्या अतिशय सुंदर आणि अर्थपुर्ण कविता वाचायला मिळतील.
ही फक्त उदाहरणे आहेत, यासारख्या अनेक वेबसाईट आणि अँप आहेत , जे मराठी साहित्यात मोलाचे योगदान देत आहेत.
मराठी साहित्य नेहमीच श्रेष्ठ राहिले आहे, त्यासाठी इंटरनेट चे योगदान खरच मोलाचे आहे,
त्याचेच योगदान म्हणून आपण आज आपण उत्कृष्ट लेखकांचे विविध लिखाण आपण सहज पणे वाचू शकतो आणि ते आपल्याला उपलब्ध झाले.उदा. पु.ल.देशपांडे, प्र. के.अत्रे, वि.स.खांडेकर,भालचंद्र नेमाडे, वपु काळे.इ.
=============================
वाल्मीक फड निफाड नाशिक
योगदान सांगायचे झाले तर फार मोठे योगदान हे इंटरनेटचे आहे.आजकाल कोणतेही पुस्तक असो इंटरनेट वर पुस्तकाचे नाव टाकले की,पुस्तक आपल्याला वाचण्यासाठी ऊपलब्ध होते.तसेच जे काही आपले धार्मिक ग्रंथ काही पौराणिक पुस्तके आपल्याला इंटरनेट वर सहज ऊपलब्ध होतात.आज इंटरनेट म्हणजे एका देवदुताप्रमाणे काम करतोय.मागिल काळात टिव्ही रेडीओ तसेच मोबाईल ह्या गोष्टिंमुळे बराच वाचक वर्ग वाचनापासून दुरावला गेला होता.पण जेव्हापासून अँडराँइड मोबाईल आणी त्यामध्ये इंटरनेटची सुविधा त्यामुळे बरेच वाचक आता इतर गोष्टि सोडून ऊदा.गेम खेळणे,सिनेमा पहाणे अशा अनेक पर्याय सोडून देऊन फक्त मराठी पुस्तके वाचत असतात.
इंटरनेटमुळे माझ्या मराठी भाषेची ओळख जगाला पटलेली आहे.माझ्या भाषेतील असलेले अलंकार ,व्याकरण,आणी एका शब्दात अनेक अर्थ असलेली माझी मराठी भाषा फक्त आणी फक्त इंटरनेटमुळे इतर देशांतही पोहचलेली आहे.
इंटरनेटमुळे माझ्या मराठी भाषेला इतका बहुमान मिळाला की,माऊलींची ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी आज माझ्या महाराष्ट्रातील अनेक शिक्षक युरोपियन देशात जाऊन तेथील लोकांना मराठी भाषा शिकविण्याचे काम करत आहेत.
बघा आज जर इंटरनेट ऊपलब्ध नसते तर माझ्या मराठी भाषेचा बोलबाला सातासमुद्रापार गेला नसता.आत्तापर्यंत आपण फक्त महाराष्ट्रातच म्हणायचो "इये मराठीयेची नगरी"पण आता इंटरनेटमुळे पूर्ण जग म्हणेल असे मला वाटते.
=============================
अनिल गोडबोले,सोलापूर
इंटरनेट आलं आणि दुनिया बदलून गेली... आणि हे खरंच वाटायला लागलं आहे. मराठी भाषा आणि साहित्य या बाबतीत देखील बरेच बदल झाले. पारंपरिक पद्धतीने लिखाण आणि वाचन करणारे यांना हा सर्वात मोठा धक्का असला तरी त्याने बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी केल्या.
आता आपला विचार ग्रुप हे एक आश्चर्यच आहे. यातील खर तर कोणी कोणाला भेटलेल नाही पण सर्वजण एकमेकांना ओळखतात, लिखाण करतात, कौतुक करतात, ब्लॉगवर प्रसिद्ध करतात, मत मांडतात, भांडतात, चुका झाल्या की कान धरतात, आणि हे सर्व नुसत्या बोटांच्या टोकावर.....
त्या मुळे मराठी ने फार कात टाकली अस झालं नाही... दुर्दैवाने.! ते होणं गरजेचं आहे.. आपल्या ब्लॉग आणि ग्रुप सारखे अनेक ग्रुप आहेत काही वेबसाईट आहेत..
आज दर्जेदार लिखाण नाही वाचक नाही.. अस म्हणणाऱ्यांना मात्र चपराक बसलेली आहे.. पण त्या बरोबर वाङ्मय चौर्य देखील वाढत आहे.. दुसऱ्याचे लेख स्वतःचे म्हणून ढापुन प्रसिद्ध केले जातात..
नाण्याला दोन बाजू आहेत त्या प्रमाणे तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. इ- साहित्य, किंवा मराठीमाती, अक्षरनामा, विकास पीडिया सारखे ब्लॉग आणि वेब साईट फार उत्तम दर्जाचे साहित्य आणि माहिती पुरवतात..
मला वाटत की या इंटरनेट च्या माध्यमातून पुस्तके वाचणे आणि लिहिणे या बद्दल प्रेम वाढण्यासाठी प्रयत्न केले तर साहित्यिक असणं... ही मक्तेदारी राहणार नाही.
लिहा, व्यक्त व्हा, वाचा भांडा.. पुन्हा एकत्र व्हा.. हे फक्त काय.. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्हायला पाहिजे का?... अजिबात नाही..
मराठी च्या अभिवर्धनासाठी, अभिजात दर्जा साठी इंटरनेट चे योगदान चांगले आहे पण ते अजून वाढले पाहिजे.
============================
दिपाली वडणेरे , नाशिक
मराठी साहित्याच्या प्रसारामध्ये इंटरनेटचे योगदान हे अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे असे म्हणायला हरकत नाही . आज इंटनेटच्या माध्यमातून का होईना पण आपल्यासारख्या तरूण पिढीमध्ये मराठी साहीत्य वाचण्याची आवड निर्माण झालीये..... आज इंग्रजीचे सावट सगळीकडे पसरलेले असतांना , इंग्रजी साहीत्य, रचना ,इत्यादीकांचे... आकर्षण असताना देखील आपण इंटनेटच्या माध्यमातून मराठी साहीत्य वाचण्याला अधिक प्राधान्य देतोय....तुम्ही कोणतीही भाषा अभ्यासा , वाचा , लिहा, पण जो उत्साह मराठी साहीत्य वाचण्या - बोलण्यात, ऐकण्यात , लिहीण्यात योतो ना तो इतर कोणत्याच भाषेत येत नाही .. मराठी भाषा जिकडे वळवली तिकडे वळते समजण्यासाठी देखील अत्यंत सोपी महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत सर्वच विभागांतील भाषा मराठीच परंतु प्रत्येकाची आपली बोलीभाषा ही वेगवेगळीच पण ऐकायला , बोलायला आणि महत्वाचे म्हणजे ती समजून घ्यायचा प्रयत्न जर केला ना तर खरचं एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो .... पण शेवटी काहीही असो मराठी महाराष्ट्राची मायबोली आहे ती....
हो मध्यंतरीच्या काळात थोडेफार कुठेतरी वाटत होते की इंग्रजी चे सावट पसरल्याने मराठी भाषा कुठेतरी मागे पडतेय ....पण असे काहीच नाही उलट आज इंटनेटच्या माध्यमातून तरूण पिढीचा अनेक मराठी साहीत्य असो वृत्तपत्रे असो वा अजून काही सविस्तर माहीती असो सर्व हे PDF स्वरूपात वाचण्याकडे जास्त कल आहे ... एखादे साहीत्य वाचायचेय पण मिळत नाहीये....एखादे काम अडलेय पण कसे करावे ? कुठुन सुरूवात करावी हे कळत नाहीये मग काय इंटरनेट वर एका क्लिक वर आपल्याला हे सर्व अगदी सहज उपलब्ध होऊ लागलेय त्यामुळे मराठीकडे बरचसा कल हा सर्वांचाच वाढत चाललाय असे मला स्वतःला तरी वाटतेय कारण मी स्वतः हे नेहमीच अनुभवते .... मी ग्रामीण भागातील असल्याने बऱ्याचदा मलाही सर्वच उपलब्ध होते असे नाही मग काय इंटरनेट वर शोधते आणि मिळवते जे हवयं ते.... महाराष्ट्रातील मराठीच पण वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत त्या मला वाचायला आणि ऐकायला खूप आवडतात.....एक वेगळाच आनंद असतो त्यातही ....
आज इंटनेटमुळे मराठी साहीत्य अभ्यासण्यास , म्हणा कींवा मराठीचा झेंडा उंचावण्यात , त्याचा प्रसार होण्यास खूप मदत होत आहे आज मराही साहीत्यांचे अनेक संमेलने भरतायेत ,अनेक पुरस्कार यामध्ये देण्यात येताय....
आधी काही बातम्या असो वा कुठे काही संमेलन असो वा अजुन काही हे सर्व आपल्याला वृत्तपत्रांमधून दुसऱ्या - तिसर्या दिवशी समजायचे पण आता इंटरनेट मुळे चुटकीसरशी सर्व बातम्या आपल्या बसल्याजागी समजतात....एखादी बाब आपल्याला समजली नाही तर त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर अशी सखोल माहीती आज सहज शोधून काढून अभ्यासतोय....आणि हे सर्व आज आपल्याला सहज शक्य होतंय... आणि त्यातच वि-४ गृप च्या माध्यमातून लेख लिहीले जाताय , ते ब्लॉग वर प्रसिद्ध केले जाताय , यातुन वाचनाची व लिहीण्याची सवय , आवड , गोडी तर लागतेच आहे पण बरोबरच यामुळे मराठी भाषेचे लेखक सुद्धा लवकरच तयार होतील ... यामधुन सुद्धा मराठी भाषेचा / साहीत्यांचा प्रसार हा होतच आहे....
शेवटी इंटरनेट वर मराठी टायपिंग करणे खूप अवघड आहे असं सर्वच जण म्हणतात पण वाटते तितकी अवघड मुळातच नाहीये.. मला स्वताःला मराठी टायपिंग करायला आणि लिहीण्याची सवय ( आवड) ही इंटरनेट मुळेच लागली.....
थोडक्यात मराठी साहीत्य प्रसारात इंटरनेट चे योगदान हे अनमोल आणि खूपच महत्वपूर्ण आणि फायदेशीर व यशस्वी ठरत आहे.....!
=================================
खुप छान
उत्तर द्याहटवा