आजचा तरुण आणि भगतसिंग

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

आजचा तरुण आणि भगतसिंग

नवनाथ वाघ,अहमदनगर.

एकदा असंच थेटर मध्ये एक चित्रपट पाहताना सुरुवातीला *अब भी जिसका खून न खोला, वो खून नहीं पानी है*...... अशा काही ओळी दिसल्या. तात्पुरता श्वास रोखून वाढावा अस सुद्धा कुणाला झाल नाही.

आमचं रक्त उसळत की; भाऊबंदकी मध्ये शेताचे बांध कोरताना, शेजारयाची जिरवायला,निवडणुका मध्ये, जत्रात मिरवायला, महागडे मोबाईल वापरायला. उरलंच तर, फ्लर्ट करायला,कुणा मागे मागे शेपुट हलवत फिरायला.

भगतसिंग हे हसत हसत फासावर गेलेले क्रांतिकारक ह्यापलीकडे फार तर 1 2 वाक्याचीच ओळख आपण पटवुन देतो. त्यांच्या कार्यातून पेटून उठायला त्यांची समर्पित भावना लक्षात घ्यायला हवी.

आज आपल्याला तरुणांचं बलिदान नकोय पण निदान देशासाठी समर्पित भावना पुरेशी आहे.

*.....जो देश के काम ना आए ओ बेकार जवानी है l* ही त्या थेटर मधल्या वाक्याची दूसरी ओळ होती.

देशाच्या काम येण म्हणजे काय ? आता बंदुका😱 घेऊन नेमकं कुठं उभा रहावं अस वाटत असेल. नाही, मग निदान स्वछता अभियानात एखादा फोटो तरी इन्स्टाग्रामवर असावा. 🤔🤔अम्म्मम नाही का, मग सामाजिक मोठी मदत तरी करावी.. नको का कुठून आणावा ना इतका पैसा.... अअम्म....काय करावं मग🧐

चला विकास करूयात का, नाही बुआ🤥, राजकारणापासून चार हात लांबच बर😒....

क्रांतिकारक बनायचय ना 🤗, भगतसिंगा सारख, चला मग जीव ओतून देऊ😎...अहो पण  ओतायचा कुठे?🤨

आहेत की अशा काही खास जागा,
आपल्या कामावर, क्षेत्रावर जीव ओतू, त्या क्षेत्रात नाविन्यता कशी आणता येईल ह्यावर भर घालू, त्यातून संशोधन वृत्तीवर भर घालत राहू.

व्यवसाय, नोकरीतुन योग्य पैसा कमवत राहू, निदान टॅक्स भरता येईल इतका रोजगार तरुणांनी उपलब्ध करून घ्यावा; त्यासाठी लागणारे कौशल्य वाढवावे. निदान टॅक्स च्या रूपाने देशाच्या कामी आलो तरी समाधानकारक व पुरेस मानून घेऊ.

आपली अभिप्रेत असलेली जवानी ह्यातून दिसून येईलच, फालतूपणा कमी,धाडसी व क्रियाशील तरुण निर्माण होतील तीच खरी भगतसिंह ह्यांना आदरांजली असेल. ते आपल्या रूपाने भारतभूमीत कार्य करत राहातील.

तुम्ही पाहिलेत का भगतसिंगाना ? चला मस्त सेल्फी काढू
*==========================*

अनिल गोडबोले,सोलापुर

भगतसिंग हे नाव घेतलं की नक्की काय आठवतं? त्यांनी केलेला काकोरी कट, घातलेल्या गोळ्या आणि संसदेतले बॉम्बस्फोट...
आणि हल्ली पिक्चर मुळे जालियनवाला बाग हत्याकांड, चंद्र शेखर आझाद व तुरुंगातील उपोषण आणि फाशी..( हे देखील खूप डिटेल झालं)

पण सोईस्कर रित्या ते ज्या विचारधारेतून वागत होते किंवा तसच का वागले आणि राजकीय मत या बद्दल जास्त बोललं जातं नाही असं मला वाटत.

आजचा तरुण हा जे काही वागत आहे ते विचार धारेतून वागत आहे का? हिंसेचे समर्थन करता येणार नाहीच पण त्यावेळी ती गोष्ट त्यांना का गरजेची वाटली? या बद्दल विचार होणे गरजेचे आहे.

त्यांच्या पक्षाचे नाव देखील रिप्लब्लिकन पक्ष होत. त्यांची राजकीय मत आणि नास्तिकता किंवा कुठल्याही मुद्ध्याला ठाम पणे नाकारण्याची किंवा जे बुद्धीला पटत आहे ते सर्वस्व ओतून करण्याची जिद्द असलेला तरुण आज पाहिजे आहे.

आजच्या तरुणांकडे सगळं काही आहे.. फक्त ती दृष्टी आली ना की भगतसिंग नक्की मुळापासून समजू लागतील

आणि शेवटी आता  "कातिल" ही आपलेच आहेत. "सरफारोश" पण आपले च आहेत. हा निरक्षीरविवेक कळला तर आम्ही ही म्हणू "सरफारोशी की तमन्ना आबा हमारे दिल मे है।"
*==========================

प्रविण, मुंबई

देशाप्रेमाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भगत सिंह
त्यागाची व्याख्या म्हणजे भगत सिंह
सळसळणारे रक्त म्हणजे भगत सिंह
अन्याया विरुद्धचा आवाज म्हणजे भगत सिंह
धर्मांधेशी बंड म्हणजे भगत सिंह
तरुण भारताची ओळख म्हणजे भगत सिंह
क्रांतीच दुसर नाव म्हणजे भगत सिंह

भगत सिह जगले ते देशासाठी. तो फासीचा शेवटचा क्षण जणू काही सांगत होता कि मृत्यू यावा तर असा. आयुष्य ला हि हेवा वाटावा अस होता तो क्षण होता. अनेक पैलू असलेले त्यांचे आयुष्य होत. ते लेखक होते, कवी होते, देशातील पहिले मार्क्सवादी, भाषेवर पकड असलेले ते उत्तम वाकपटू इ. अनेक पैलू त्यांच्या आयुष्यात होते. पण आजही हि भगत सिंह यांची देशभक्ती हीच काय ती लोकाना माहित आहे आणि जे काही चित्रपट आले त्यातही “राष्ट्रवाद” प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला.  भगत सिंह हे पुरोगानी आणि वैज्ञानिक विचारांचे क्रांतीकारक होते. ते नास्तिक होते आणि शेवटच्या क्षणी पण त्यानी ईश्वर कडे प्रार्थना केली नाही. तरुणांना चीकीस्तिक रहाव, रूढी- परंपरावर टीका करावी, जे सद्सद्विवेक बुद्धीला पटते तेच स्वीकारावे आणि कोणत्याही विचारावर, व्यक्तीवर आंधळ्यासारखं विश्वास ठेऊ नये हीच त्यांची शिकवण होती. पण आजचा तरुणात ती बंडखोरी नाही दिसत. सध्या देशात जे चाललाय त्यावरून तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि टीकात्मक तरुणाची जात दुर्मिळ होतेय आणि भक्तांच प्राबल्य वाढतंय. प्रत्येक अन्यायाविरुद्धच्या आवाजात भगत सिंह आज हि जिवंत आहे आणि प्रत्येक तरुण मनातला भगत सिंह जागा करणे गरजेचे आहे.
शेवटी म्हणे ,भगत सिंग तुझे जिंदा होणा है

कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
*==========================*

अभय डोंगरदिवे

*मेरे सिने में जो आग है*
*लहू से लिपटा जैसे साज है,*
*भारत माता के कदमों पर*
*जान भी मेरी गिरवी आज हैं...*


*इन्कलाब का एक नारा हैं*
*जो हैं धधकता मेरे दिल में,*
*न्योछावर हैं धड़कन मेरी*
*इस मिट्टी के हर कण कण में...*


*बेंच दिया है ख़ुदको मेंने*
*देश को कई ज़माने से,*
*तन मन मेंरा इस धरती का*
*ना लौटूंगा मनाने से...*


*पागल बनकर प्यार करूं मैं*
*जान से भरी हथेली हैं,*
*पहला प्यार है मिट्टी मेरा*
*अब मौत भी बनीं सहेली हैं...*


*देश की गोद में आजादी को*
*चाहता हूं में गीत सुनाना,*
*अब इस बार हैं लिखना मुझको*
*अपने लहू से राग पुराना...*


*सरफ़रोशी चढ़ चुकी हैं*
*दिलों दिमाग और नस नस में,*
*शहिद बननेे चला है बेटा*
*है आंसु ना अब बस मैं...*
*================== ========*

गणेश भंडारी

आज आपल्या देशाचे भूषण असलेले व आपण सर्वांना अभिमान असलेले भगतसिंह यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना शत-शत नमन!

आपण भगतसिंहांना साधारणतः प्रखर देशभक्त, थोर क्रांतिकारक, देशासाठी बलिदान देणारे या रुपात ओळखतो. पण त्यांची केवळ एवढीच ओळख पुरेशी नाही. त्यांची साम्यवादी विचारसरणी, त्यांचे नास्तिक असणे, चिकित्सक वृत्ती, अभ्यासाची व नवीन गोष्टी शिकण्याची आवड हे इतर अनेक पैलू विचारात घेण्यासारखे आहेत; पण ते त्यांच्या देशभक्तीच्या व बलिदानाचा वलयापुढे दुर्लक्षितच राहिले. किंबहुना ते जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवले गेले असे म्हणण्यासही वाव आहे.

आपणा तरुणांना भगतसिंहांचा आदर्श घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण बारकाईने पाहिले असता असा सल्ला देणाऱ्याला भगतसिंहांचा नेमका कोणता आदर्श अभिप्रेत असतो? नास्तिक्याचा? चिकित्सक वृत्तीचा? साम्यवादी विचारांचा? छे छे! काहीतरीच काय? तो आदर्श घेतला तर त्यांच्या दृष्टीने केवढा अनर्थ होईल!

वर चर्चा केलेल्या भगतसिंहांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा परिप्रेक्ष्यात आजचा तरुण नेमका कोठे आहे? आजचा तरुण-म्हणजे आपणच-आज आपण विविध लहानसहान गोष्टींतून आपली देशभक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण भगतसिंहांना अपेक्षित असलेली देशभक्ती आपण अजूनही दाखवू शकलो नाहीत. आपण केवळ देशभक्तीच्या विविध प्रतिकांत व पर्यायाने आंधळ्या देशप्रेमात गुरफटत चाललो आहोत. देश या संकल्पनेच्या आपण करून घेतलेल्या आकलनातच लोच्या आहे! देश म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र नसून त्या भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या माणसांचा मिळून देश बनतो हे अजून आपल्याला समजलेले नाही. देशातील माणसांवर होणाऱ्या अन्यायाची भगतसिंहांना भयंकर चीड होती. त्याविरुद्ध ते पेटून उठत. आज आपल्या डोळ्यांदेखत आपल्या देशबांधवांवर विविध प्रकारचा अन्याय होतोय. स्त्रियांवरील अत्याचार, आपलेच बांधव असलेल्या दलितांचा छळ, मजुरांचे शोषण, शेतकऱ्यांची पिळवणूक- किती उदाहरणे द्यावीत! आज आपल्या डोळ्यांदेखत हे सगळे घडत असताना पेटून उठतोय का आपण? होतेय का गरम आपले रक्त हे सारे पाहून? करतोय का आपण उघड विरोध या सर्वांचा? नाही ना? उलट बऱ्याचदा आपण या सगळ्यांचे निर्लज्जपणे समर्थनही करतो. जे थोडे लोक याविरुद्ध बोलतात, त्यांना वेड्यात काढतो. मग कोणत्या तोंडाने भगतसिंहांचा वारसा सांगणार आपण? आपल्याला अधिकार तरी आहे का तो?

भगतसिंहांना अभिप्रेत देशभक्ती आपण आपल्यात मुरवू शकलो नाही, त्यांच्या बाकीच्या गुणांचे अनुकरण तर दूरची गोष्ट. त्यांची साम्यवादी विचारधारा समजून घेण्याचा, तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे तर दूरच; पण कोणी थोडा डावीकडे झुकलेला दिसला तर आपण त्याला सरळ 'नक्षलवादी' हे लेबल लावून मोकळे होतो. आता तर त्यासाठी 'अर्बन नक्षल' ही नवीन टूम आलीय. जर भगतसिंह आज आपल्यात असते, तर त्यांना आपण पचवू शकलो असतो का? त्यांची आपण काय दशा केली असती याचा नुसता विचार करूनच अंगावर काटा येतो. ज्यांच्या देशप्रेमाचे आज आपण गोडवे गातो, त्यांची आपण देशद्रोही ठरवून केव्हाच बोळवण केली असती, त्यांना पाकिस्तानचे हस्तक, देशाचे शत्रू अशा पदव्याही बहाल केल्या असत्या.

भगतसिंहांची वृत्ती चिकित्सक होती. कोणत्याही गोष्टीवर ते आंधळेपणाने विश्वास ठेवत नसत. तिच्या मुळापर्यंत जाऊन, तिचा खरेखोटेपणा तपासून जर बुद्धीला पटले तरच त्या गोष्टीचा ते स्वीकार करत. त्यांच्या या चिकित्सक बुद्धीची झलक त्यांच्या 'मी नास्तिक का झालो' या निबंधात पाहायला मिळते. त्यांच्या या चिकित्सक वृत्तीची जरा आपल्याशी तुलना करूयात? चिकित्सक वृत्ती मुद्दाम अंगी बाणवावी लागते, त्यासाठी मनाला तसे वळण लावावे लागते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांचीच आपल्यात कमतरता आहे. परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचा आपल्या मनावर इतका पगडा आहे, की त्यांची चिकित्सा न करताच आपण त्यांना कवटाळून बसतो. तर्काच्या कसोटीवर त्यांना परखीत नाहीत. नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव ह्या लोकांनी आपल्याला तार्किक विचार करण्यास कितीही प्रवृत्त केले तरी आपण तो करीत नाही. एवढेच काय, एखाद्याने तसा विचार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला साथ देणे, प्रोत्साहन देणे तर दूरच; उलट त्याची निंदा करतो, त्याला हतोत्सहित करतो. आजच्या तरुणांच्या दैनंदिन वागण्याचे जरा बारकाईने निरीक्षण केले, तर ते चिकित्सक वृत्तीच्या अभावी अंधश्रद्धांच्या चिखलात किती खोलवर रुतले आहेत याची कल्पना येईल.

भगतसिंहांची आणखी एक विशेषता म्हणजे चांना नवीन गोष्टी शिकण्याची, ज्ञान संपादन करण्याची असलेली आवड. फाशीच्या तख्तावर चढण्याचा अगदी आदल्या दिवसांपर्यंत त्यांची ज्ञानसाधना चालू होती. त्यांना अवघे तेवीस वर्षांचे आयुष्य मिळाले, पण त्या अल्पावधीत त्यांनी किती अफाट ज्ञान मिळवले होते, याची चुणूक त्यांच्या उपलब्ध लेखनावरून येते. आणि आजचा तरुण? मला वाटते, त्याची आणि पुस्तकांची कित्येक दिवस गाठच पडत नसावी! आजच्या इन्स्टंट मनोरंजनाच्या काळात आपण ज्ञानसाधना विसरूनच गेलो आहोत.

जर आपल्या तरुण पिढीने खरोखर भगतसिंहांचा आदर्श घेतला, आपल्यातून हजारो-लाखो नव्हे, पण काही शेकड्यांतच भगतसिंह आपल्या देशाला लाभले, तर आपल्या देशाचे चित्र आजच्यापेक्षा निश्चितच वेगळे असेल यात शंका नाही!
*==========================*
संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे
  फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे.. काय हा त्याग..'मेरी दुल्हन तो देश कि आझादी है! म्हणून घरातून निघून गेलेला एक तरुण..आम्ही तर स्वातंत्र्यांसाठी लढणारे क्रांतिकारक..फाशीच्या वेळी ते म्हणाले आम्हाला थेट तोफेच्या तोंडी द्या..तोफेचे गोळे आम्ही फुलासारखे झेलू. पण फाशीसारखी फुसकी शिक्षा आम्हा भारतमातेच्या सुपुत्रांना देऊ नका'' असे त्यांचे उद्गार..

   भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती. गुलामी आणि दारिद्ऱ्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते.

  भारतातील किती तरूणांनी शहिद भगतसिंह यांचे " मी नास्तिक का आहे " हे पुस्तक वाचले आहे? खरं तर भारतातील प्रत्येक तरूणांनी हे पुस्तक वाचले आणि समजून घेतले तर देशात फार मोठा बदल होऊ शकतो.

  तुरुंगात वाचण्यासाठी पुस्तके मिळावेत म्हणून, अन्नत्याग करणारा भगतसिंग सारखे क्रांतिकारक या देशात पुन्हा जन्माला आलेच नाहीत..
*==========================*

प्रविण,मुंबई

कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
जिन्दा लाशे घूम रही है
देशभक्ती किश्तोंमें बिक रही है
मुडदों  में जान डालना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

किसान भूखा है, दलित पिछडा है
महिला अत्याचार का प्रथा बन रहा है
इंसानियत को जगाना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

कोई धर्म पाला तो मर रहा है
कोई धर्म टाला तो मर रहा है
जातीव्यवथा को उठाके फेकना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

कोई लिखनेके लिए डर रहा है
कोई बोलने के लिए डर रहा
आझाद देश में आझादी लाना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
*==========================*
अर्चना  खंदारे, हिंगोली
 लिख रहा हू मैं अंजाम 
जिसका  कल  आगाज आयगा
मेरे  लहू  का  हर एक  कतरा
इन्कलाब  लायगा......
                                                     वरील  कविता  हि स्वतंत्र  पूर्व  काळा  मध्ये भगत सिन्ह यांनी देशातील युवा पिढीला उद्देशून म्हटली आहे,त्याच्या बलिदाना मुळे आज आपण स्वातंत्रोत्तर भारतात आहोत,त्यांनी जर त्या वेळी देशासाठी स्वतंत्र्यं क्रांती घडवून आणली नसती तर आज हि आपण गुलामगिरीच्या विळख्यात खितपत पडलेले असतो,भगत सिंह जी हे  स्वतंत्र पूर्व  काळातले वीर  क्रांतिकारक,चिकित्सक,साम्यवादी  विचारसरणीचे युवा होते , वयाच्या  23 व्या वर्षी त्यानीं मृत्यू  ला कवटाळून देशसाठी आत्म बलिदान  केले ,आज च्या युवा पिढी  ने त्यांचा  आदर्श  डोळ्या  पुढे  ठेऊन  देशासाठी  कार्य  करावे  पण  आज ची युवापिढी हि  धर्म  जात  पंथ  या  मध्ये गुरफटत चालली  आहे  आणि  त्याच  बरोबर  त्याच्या मनावर धार्मिक  ते  बाबत  च्या गोष्टी,दंतकथा बिंबवल्या  जात आहेत, भगत सिंघ  जी  ने देशासाठी बलिदान दिल  त्याचा  वारसा  हा  आज च्या युवा पिढी ने चालवत  ठेवावा म्हणजेच  त्यांनी  तरी  देशासाठी जीवदान  केले आज च्या युवा पिढी ला  जीवदान करण्याचीच  काही  गरज नाही,त्याच्या बलिदान देण्या मागचा उद्देश समोर ठेऊन आज देशासाठी आपणास  काही तरी करायचे आहे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवावा,आज देशामध्ये राजकीय कलह,जातीय दंगली  घडतांना दिसत आहेत म्हणून आपल्या देशास  सर्वधर्मनिरपेक्ष विचार,बोधीक,चिकित्सक,निस्वार्थी,कार्यतत्पर,साम्यवादी विचारसरणी आणि अष्टपैलुत्व गुण असलेली  युवा पिढी ची गरज आहे ,अस्या  तरुण  पिढीची  आज देशास जास्त  गरज आहे,तरच खऱ्या  अर्थाने  देशाचा  विकास  घडवून  आणता  येऊ  शकतो.भगत सिह हे प्रखर,ज्वलंत,नास्तिक  विचाराचे  व्याक्तीमत्व आपणास मिळालेलं  एक रत्न आहे.
अस्याया थोर  क्रांतिकारक विचारवंताचे  एक तरी गुण प्रत्येक  तरुणाने  आत्मसात  करायला  पाहिजे,तरच  आपण त्यांचे  खरे  वारसदार  आहोत असे म्हणता  येईल.
*==========================*

समीर वि. सरागे, जि.यवतमाळ

भारताच्या इतिहासातील  एक महान क्रांतिकारी होऊन गेले ते म्हणजे शहीद ए आझम  भगतसिंह.
 भगतसिंह आज या देशात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार आणि शिकवण आजही आपल्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. जो युवक अवघ्या वय वर्षे २३ असतानी हसत हसत फ़ासावर चढला तो किती शुर आणि पराक्रमी  होते हे यावरून लक्षात येते.

भगतसिंगाना बालपणा पासुनच देशाभिमान व देशप्रेम होते. त्यांनी १९२६ मध्ये देशाच्या स्वातंत्र्या साठी नौजवान भारत सभेची स्थापना केली होती.  महात्मा गांधीनी जेव्हा १९२२ मध्ये चौरीचौरा  च्या घटने नंतर असहयोग आंदोलनास समाप्त करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांचा अहिंसावादी विचारधारेशी मोहभंग झाला होता. आणि त्यांनी असे देखील सांगितले की, स्वतंत्र हे अहींसे ने नव्हे तर हातात शस्त्र घेऊन मिळत असते.२३ मार्च १९३१  च्या रात्री भगतसिंह, राजगुरु आणि
सुखदेव यांना  लाहोर षडयंत्र रचल्या प्रकरणी फाशी देण्यात आली. भगतसिंह नेहमी म्हणायचे १) बम और पिस्तूल से क्रांती नही आती ,क्रांती की तलवार विचारों की सान पर तेज होती है। २) व्यक्तियों को कुचलकर भी आप उनके विचार नही मार सकते। ३) निष्ठुर आलोचना और स्वतंत्र विचार ये क्रांतीकरी सोच के दो अहम लक्षण है।
इतके त्यांच्या देशाप्रती देशाच्या स्वातंत्र्या प्रति  भावना ज्वलंत होत्या  देशावर मरुन जायला देखील हे क्रांतिकारी तरुण मागेपुढे पाहत नव्हते. मौत तो मेरी दुल्हन है असे तें नेहमी त्यांच्या कुटुंबियाना म्हणायचे.  इतकी प्रचंड राष्ट्रभक्ति त्यांच्या नसा नसात होती.

परंतु अलीकडे आपण दृष्टिक्षेप टाकल्यास ती देशभक्तिची , देशहिताची भावना दिवसेंदिवस लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. कारण आज देशाभिमान जागृत होईल अश्या  प्रकारचे शिक्षण आज मिळने दुपस्त आहे. राष्ट्रीयत्वाची भावना कोणी जागृत करण्याचे काम करत नाही. यावर कोणी चर्चा करत नाही ,ना पाठ्यक्रमातून या क्रान्तिकाराना आजच्या तरुण पीढ़ी समोर आनण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. तर कसे क़ाय देशप्रेमी या देशात घड़तील ( जन्माला येतील)?

उलट आपल्याच देशात राहून ,याच देशातील साधन संपत्ति उपभोगुन, इथे नाव प्रतिष्ठा कामवुन स्वताला बुद्धिजीवी संबोधुन अर्बन नक्षल च्या स्वरुपात याच देशाला संपविन्याचे , मातीत घालनयचे षड्यंत्र  अलिकडे केल्या जात आहे.  कश्मीर भारताचा अंग नाही, भारत की बरबादी तक जंग रहेगी, हमे चाहिए आझादी, ही ब्रिदवाक्ये टुकड़े टुकड़े गैंग, आझादी  गैंग आणि  त्यांच्या पाकिस्तानची भक्ति करणाऱ्या समर्थका कडून सदैव होत असलेली आपल्याला दिसून येईल.  आणि याला अटकाव किंवा प्रतिबंध केला तर अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येण्याचा कांगवा केला जातो.  परंतु विरोधाभास म्हणजे जेव्हा आतंकवादी/ नक्षलवादी आपल्याच जवानाचे, पोलिसांचे मुडदे पाडतात तेव्हा ही आझादी आणि टुकड़े टुकड़े गैंग आणि त्यांचे समर्थक कोण्या बीळत लपतात कोणास ठाऊक?   भारत देशाचा ध्वज जाळने , दगडफेक करणाऱ्यांचे ,देशा विरुद्ध षड्यंत्र करणाऱ्यांचे(आतंकवादी/नक्षलवादी) यांचे समर्थन करणे , दंग्या च्या वेळी याच देशातील संपत्ति नष्ट करणे, आतंकवद्या करिता अर्ध्या रात्री न्यायाल्याचे दरवाजे उघड़ने वैगरे हे दृश्य वरुण भगतसिंग बघत असतील तर तें देखील दुखी होऊन रडत असतील आणि म्हणत असतील की मि  या देशाला व येथील जनतेला  स्वातंत्र्य मिळवून देण्या  करीता फ़ासावर लटकलो आणि आज हेच लोक याच देशाचे शत्रु झालेत या देशालाच संपविन्या करिता षड्यंत्र रचत आहेत? किती वेदना हॉट असतील त्यांना हे अलिकडचे दृश्य बघून! एवढेच नव्हे तर तत्कालीन सरकारच्या काळात भगतसिंगाना एका पाठ्यपुस्तका मध्ये आतंकवादी म्हणून दखविन्यात आले आहे. हा तर भगतसिंगाचा घोर अपमानच होय. ज्या तरुणाने देशासाठी बलिदान दिले त्याला आतंकवादी दखविन्यात येते यापेक्षा दूसरी शरमेची गोष्ट कोणती या देशात हा तर देशद्रोहच जनु.! आणि क़ाय आजची पीढ़ी या क्रान्तिकाराना समजून घेईल ? की राष्ट्रप्रेम आणि देशभक्ति करणे म्हणजे आतंकवादी होने होय का?

तसेही आजच्या तरूनपीढ़ी मध्ये देश ,स्वातंत्र्य या बद्दल अनास्था असल्याचे नेहमी दिसून येते एवढेच नव्हे तर देश किंवा देशभक्ति संदर्भात बोलने किंवा काही वक्तव्य करणे म्हणजे त्याला विशिष्ट राजकीय पक्ष किंवा एखाद्या विचारधारेशी जोड़ने हा होय आणि याला मेन स्ट्रीम मीडिया मधील काही चैनल , पत्रकार, डिझायनर बुद्धिजीवी, राजकीय व्यक्ति pramote करतात. म्हणजे देशभक्ति करणे ,त्याबद्दल बोलने म्हणजे धर्मनिर्पेक्षतेची गळचेपी किंवा हत्या करण्या सारखे होय. असे दाखविन्याचा किंवा भासविन्याचा नेहमी प्रयत्न होत असतो आणि या प्रकारच्या घटना इथेच या देशात घडतात याचे आश्चर्य वाटते. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा कारण की,     फुकटात मिळालेल्या वस्तुला मोल आणि महत्व नसते अगदी तसेच स्वातंत्र्यचे देखील आहे कारण आजच्या या
 तरुणाना आपल्या पूर्वजा कडून स्वातंत्र्य हे फुकटात म्हणजे gift मिळाले आहे म्हणून त्यांना याची कीमत आणि महत्व नसणे स्वाभाविक आहे.

केवळ सोशल मिडियावर स्वातंत्र्य दिनी स्टेटस अपलोड करणे इथपर्यंत आपली राष्ट्रभक्ति  दिसने गरजेचे नाही.  कोणतेही  कार्य करण्या आधी ते देशहिताचे समजुनच करणे अभिप्रेत आहे. आणि देशभक्ति करणे म्हणजे सोशल मिडियावर स्टेटस टाकने किंवा देशभक्तीचे गोड़वे गाने मात्र नव्हे यउलट जे काही राष्ट्रहिताच्या बाबी आहेत त्याला महत्व आणि समर्थन देणे हे होय. कोणत्याही देशाची जनताच  ही त्या देशाची strenth ताकत असते. जसा विश्वास आणि आत्मीयता ही प्रत्येक कुटुंबातील सदस्याना बांधून ठेवते अगदी तसेच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ति ही त्या देशातील जनतेला एका अटूट बंधनात बांधून ठेवन्यास महत्वाची भूमिका बजवतात. कारण जात, धर्म ,पंथ वर्ण ,गरीब ,श्रीमंत या पलीकडे राष्ट्रप्रेम ही भावनाच देशाच्या प्रत्येक नागरिकात असणे महत्वाचे आहे. आणि या  सिद्धांतावरच राष्ट्रभक्ति जीवंत आहे. म्हणून जगात प्रत्येक नगरिकाला त्या त्या राष्ट्राच्या नावाने ओळखल्या जात असते जसे  भारतीय नागरीकास भरतीय म्हणूनच इतरत्र  ओळखल्या जाते.

म्हणून देशाभिमान बाळगा , राष्ट्रहित जपा कोणत्याही देशकार्याला आपले म्हणून करा भारत हा तरुणांचा देश आहे परंतु हा देश केवळ हुल्लड़बजंचा , पश्चिमत्यांचे अनुकरण करणाऱ्यांचा, देशद्रोही नारे लावणाऱ्यांचा  किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्यांचा नसून देशहित जोपासणाऱ्यांचा आहे. जेव्हा ही भावना प्रत्येक़ नागरिकात जागृत होईल  तेव्हाच राष्ट्रप्रेमी निर्माण होतील व या देशाचे टुकड़े करणाऱ्यांचे मनसूबे हानून पाड़तील हिच भगतसिंग ,राजगुरु ,सुखदेव या सारख्या क्रान्तिकाराना ख़री श्रद्धाजंलि असेल.
*जय हिंद*
Source of images internet

नेमके कशात बिझी असतो आपण एवढे?



गणेश भंडारी, अहमदनगर.

"गण्या, अरे माझ्या मोबाईलचं बिल भरलं का?"
"नाही ना आई"
"अरे भर ना मग! तीन दिवसांपासून मागे लागलेय तुझ्या, अजूनही भरलं नाहीस? त्या आयडियावाल्या बाईचा रोज फोन येतोय बिल भरा म्हणून."
"भरतो गं आई. अगं वेळच भेटला नाही. बिझी आहे सारखा."
"एवढा रे कशात बिझी? आणि गेल्या पंधरा दिवसांपासून तुझ्या मागे लागलेय, तो मागच्या खोलीतला बल्ब गेलाय; तेवढा बदल म्हणून. तुझे आपले उत्तर ठरलेले-बिझी आहे म्हणून! अरे, एवढी काय कामं असतात तुला न कशात एवढा बिझी असतो काही कळत नाही मला! नेहमी त्या गांधीजींचे नाव घेतोस ना, त्यांचा आदर्श घे जरा. त्यांनाही तुझ्यासारखाच चोवीस तासांचा दिवस आहे ना, पण बघ त्यांनी किती प्रचंड कामे करून ठेवली. त्यांनी देशच काय, पूर्ण जग बदलले आणि तुझ्याच्याने साधा एक बल्ब बदलून होत नाही?"

आईच्या या तोफखान्यापुढे मी काय बोलणार बिचारा! पण तिचेही काही खोटे नाही म्हणा! ती किती किरकोळ कामे सांगते आपल्याला, पण तीही आपल्याच्याने होऊ नयेत? नेमकी गडबड काय होतेय? नेमके कशात एवढे बिझी आहोत आपण? मुळात आपण खरंच बिझी आहोत का? साला विचार करायला पाहिजे यावर, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील....

गेल्या चार तासंपासून विचार करतोय, आपण नेमके कशात बिझी आहोत; पण नेमके उत्तर काही सापडेना राव! काय करावे बरे? कोणाची मदत घ्यावी का? कोण बरे मदत करीत उत्तर शोधायला? अरे हो- एक व्यक्ती आहे! मघाशी आईने बोलता-बोलता गांधीजींचे उदाहरण दिले ना, त्यांनाच विचारुया! तेच काहीतरी मार्ग दाखवतील!

"प्रणाम बापू!"
"ये बेटा! आज कसाकाय वेळ मिळाला तुझ्यासारख्या बिझी माणसाला?"
"बास का बापू, आता तुम्हीही बोलणार का मला?"
"मीही म्हणजे? आधी कोणी काय बोललं का तुला?"
"तर! आई बोलली. तिने काही किरकोळ कामे सांगितली होती, पण खरे तर माझ्याकडून ती करून झाली नाहीत. बिझी होतो म्हणून सांगितलंय तिला, पण मला कळेना की असं का होतंय ते."
"असं म्हणजे?"
"म्हणजे सतत बिझी-व्यस्त असल्यासारखं तर वाटतंय; पण कामं तर कोणतीच होत नाहीयेत. नेमकं कळेनाय की मी एवढा कशात बिझी असतो? वेळ का पुरत नाही? मघापासून विचार करतोय यावर, पण उत्तर काही सापडेना. आईने तुमचे उदाहरण दिले मघाशी. मग विचार केला, चला तुमच्याशीच बोलूया. प्लीज सांगा ना, तुमच्याकडेही माझ्याइतकाच वेळ आहे, पण तुम्ही किती प्रचंड कार्य केले तेवढ्या वेळात. मग मलाच का जमत नाही? कुठे चुकते माझे?"
"अरे, अरे! एवढ्या साध्या गोष्टीसाठी किती परेशान होतोस!"
"साध्या? साधी गोष्ट आहे ही?"
"नाहीतर काय! मला तुझी समस्या कळली. तू बिझी असतोस-पण निरर्थक गोष्टींमध्ये. आणि तुला वेळेचे नियोजनही शिकावे लागेल. फार कठीण नाही ते. प्रयत्नांनी जमून जाईल. जीवनाला थोडी शिस्त मात्र लावावी लागेल."
"काय करायचं, थोडं सविस्तर सांगा ना!"
"सगळ्यात आधी आपला वेळ कुठे खर्च होतोय याचा जरा बारकाईने विचार करावा लागेल. त्यातूनच समस्येवरचा उपाय मिळेल. आता मला सांग, दिवसाचे तास चोवीस, बरोबर? त्यांपैकी झोपण्यात किती जातात आणि नोकरीच्या ठिकाणी किती जातात?"
"झोपण्यात साधारणतः सात आणि नोकरीसाठी जाण्यायेण्याच्या वेळेसह म्हणजे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सात-म्हणजे अंदाजे साडेनऊ तास."
"म्हणजे हे वजा जाऊन तुझ्याकडे उरले साडेसात तास. त्यातील अडीच तास तुझी दैनंदिन कामे, जेवण, अंघोळ यात जातात असे म्हटले तरी तुला पाच तास मिळतात. आता या पाच तासांचे काय करतोस सांग पाहू?"
"अं...अं खरं सांगू का? मोबाईल, व्हाट्सअप-फेसबुक आणि टीव्ही पाहण्यात खूप वेळ जातो हो!"
"दॅट्स इट! तुझ्या बिझीपणाचे मूळ त्यातच आहे! तूच नाही रे, तुझ्या पिढीतल्या अनेकांचे पाहिलंय मी. मध्यंतरी एक सर्व्हेही झाला होता यावर. भारतातल्या मुलांचे रोज सरासरी चार ते पाच तास मोबाईल व टीव्हीवर खर्च होतात. कसा रे इतर कामांसाठी वेळ मिळेल मग?"
"पण बापू, जीवनात काहीतरी विरंगुळा हवाच ना?"
"मी कुठे म्हणतोय की निरस जीवन जगा म्हणून? पण कोणत्याही गोष्टीचा प्रमाण असावे रे! मला सांग, या जगात केवळ मोबाईल-टीव्हीनेच विरंगुळा मिळतो का? आज अनेकानेक उत्तमोत्तम पुस्तके अगदी सहज उपलब्ध आहेत. कधी वाचले होते शेवटचे पुस्तक? काहीतरी उत्तम लिहावे, त्यासाठी चिंतन करावे. हिंडावे-फिरावे. माणसे वाचावीत. केलंय कधी हे? त्यातून विरंगुळा मिळतोच, पण ज्ञानही वाढते."
"हे सगळं करण्याचा कंटाळा येतो हो खूप!"
"उत्साह पाहिजे उत्साह! कंटाळा म्हणजे उत्साहाची कमी! उत्साह वाढवण्यासाठी जीवनशैली बदलली पाहिजे. रोज रात्री कितीला झोपतोस आणि सकाळी कितीला उठतोस?"
"रात्री साडेबारा-एक होतात आणि मग सकाळी उठायला आठ-साडेआठ."
"ताजी हवा कशी मिळेल मग? माझ्याकडे बघ-मी रात्री आठला झोपतो आणि पहाटे चारला उठतो. तू निदान सहाला उठायचा प्रयत्न कर. सहाला उठावे, बागेत फिरायला जावे. तेथेच पंधरा मिनिटे ध्यान करावे."
"खरेच की! किती फ्रेश वाटेल नाही?"
"हो. त्यामुळे दिवसही चांगला जातो. योग्य नियोजन करता येते"
"खरं, ते वेळेच्या नियोजनाविषयी बोलला होतात-"
"आपल्याकडे उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करायला शिकले पाहिजे. निरर्थक गोष्टींवर खर्च होणारा वेळ कमी करून तो आवश्यक कामांसाठी कसा वापरता येईल हे पाहिले पाहिजे. समजा तू व्हाट्सअपवर दोन तास खर्च करतोस. ते खरेच आवश्यक आहे का? नाही वापरले तर काय बिघडेल? मला वाटते काही बिघडणार नाही."
"होय. मध्यंतरी मी नऊ-दहा महिने व्हाट्सअप वापरात नव्हतो, पण फारसे काही बिघडले नाही. आवश्यक माहिती, निरोप इकडून तिकडून मिळतच गेले."
"असाच विचार प्रत्येक गोष्टीचा कर. टीव्हीवर काय पाहतोस? त्या राधा-शनायाच्या भानगडीच ना? काय उपयोग तुला त्यांचा? तो वेळ तू दुसरीकडे वापरू शकतोस. बातम्या पाहत असशील तर याचाही विचार करावा की यातील किती माहिती माझ्यासाठी खरेच आवश्यक आहे? माणसाने आपल्या खऱ्या गरजा ओळखायला शिकले पाहिजे.वेळ कुठे निरर्थक खर्च होऊ शकतो, याची केवळ एक-दोन उदाहरणे दिली मी. स्वतःच्या बागण्याचे बारीक निरीक्षण केलेस तर आणखीही बरेच काही सापडेल तुला, होय ना?"
"खरंय."
"वेळेचे नियोजन करण्याचेही एक तंत्र असते. प्रथम दीर्घ मुदतीची लक्षे ठरवावीत. म्हणजे की मला या एका वर्षात काय काय साध्य करायचंय? मग ते कसे साध्य करता येईल, त्यादृष्टीने महिना, आठवडा, दिवस व अगदी तासाचेही नियोजन करावे. मायक्रो प्लॅंनिंग!"
"इतके साचेबंद आयुष्य?"
"कोण म्हणतं? एकदा करून तर बघ! नियोजनाप्रमाणे ध्येये साध्य करण्यातही एक वेगळाच आनंद असतो. आणि अगदी साचेबंदपणा टाळण्यासाठी थोडी लवचिकता-वेळेचे मार्जिनही ठेवावे."
"अजून काय काळजी घ्यावी नियोजन करताना?"
"केवळ कागदावरचे नियोजन नको आपल्याला, तर त्याची अंमलबजावणीही व्हायला पाहिजे. म्हणजे बघ की हा एक तास मला वाचनासाठी खर्च करायचाय असे ठरवले आहे, तर तो त्याच गोष्टीसाठी खर्च व्हावा. माझे काही किस्से तू ऐकलेच असतील की कसे मी ठरलेल्या वेळी ठरलेली कामे करायचो ते. त्या बाबतीत स्वतःशी प्रामाणिकपणा व आत्मनियंत्रण खूप महत्वाचे. वाचनाच्या मध्येच तुला मोबाईल खुणावेल, पण कंट्रोल-तुला सध्या वाचनच करायचंय! आणखी एक-हे नियोजन म्हणजे तुझी वैयक्तिक बाब आहे. तुझ्या गरजेप्रमाणे तुला ते करायचंय. तुझ्या गरजा तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या दुसरे कोणी ओळखू शकणार नाही. तेव्हा या बाबतीत ऐकावे जनाचे अन करावे मनाचे! पण एकदा जे काही ठरवले असेल, तेथून माघार घेणे नाही! मधून मधून नियोजनाप्रमाणे आपण वागतोय का याचाही रिव्ह्यू घ्यावा. कुठे चूक होत असेल, नियोजनात सुधारणा पाहिजे असे वाटत असेल तर त्याप्रमाणे बदल करावेत."
"साध्या गोष्टी आहेत हो या!"
"तर! पण अमलात आणून बघ-तुझा बिझीपणा कुठल्या कुठे पळून जाईल आणि महान कामे करण्यासाठी तुला वेळच वेळ मिळेल!"

खरेच बापूंशी बोलून एक नवी दिशा मिळाली हो! डोक्यात बल्बच पेटला म्हणा ना! आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला हवे. मग बघू आईची बोलणी कशी काय बसतात ते!
===========================


अर्जुन (नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद

             आजची तरुण पिढी माझ्यासह सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. फेसबुक, व्हॅटअप, इन्स्टाग्रामचा अतिरेकी वापर करत आहे. काहीही काम नाही लै बुझी असल्याचा आव आणतय....लिखाण काय करत नाही, वाचन संपलय, बुद्धी गहाण ठेवून लाईक, कमेंटच्या नादात चांगल्या गोष्टीला मुखलीय.

           मला तर वाटतंय काहीतरी लिहलं पाहिजे पण कामाच्या व्यापामुळे जमत नाही, तरीही माझ्या आवाक्यात विषय असला की मी सोडत नाही.....एवढी चांगली संधी असून देखील तरुण लिहत नाहीत. "कीव करावी वाटते माझसारखं लोकांची" आज आपलं लिहन छापून येणं ही काय सोपी गोष्टी नाही. फुकट मिळायला त्याचं मोल नसतं.

           दोस्तांनो लै बिझी असल्याचा आव आणू नका,लिहत राहा,बुद्धीची मशागत करत राहा...."नाहीतर कधीतरी वाटेल षंढ सोशल मीडियावर तासनतास घालवला हाती का आलं घंटा ? जास्त नाटकी बोललोय असं नाही ही खरी स्थिती आहे.


===========================

शिरीष उमरे नवी मुंबई

मी स्वभावाने तरुण अाहे. 😎वयाने म्हातारा आहे.😝  मला आठवते कॉलेजमध्ये शिकत असतांना मी लय बिझी राहायचो.😌

कधी एनसीसी त 💂‍♂तर कधी वादविवाद स्पर्धा 🎙 तर कधी निवडणुकीच्या हाणामारीत 🏑🤼‍♀ तर कधी कॉलेजच्या गॅदरींग मध्ये 🎼🎤🎸🎭!!

घरच्यानी सोडुन दिलेला सांड जसा... आमच्या वेळी स्पर्धा परीक्षा, मोबाइल, सोशल मिडीया वैगेरे चा बागुलबुवा नव्हता. 😅

आज लक्षात येते की एका विशिष्ट वयात आपण खुपच बिझी असतो आणि ते लादलेले मुळीच नसते. नाविन्याची आवड, करुन बघायचे धाडस व गरम रक्त ह्यातुन वेळेचे भान राहत नाही.. ह्यावेळी योग्य मार्गदर्शक मिळाला तर खुपच छान...
अन्यथा पस्तावा शिवाय हातात काही पडत नाही...

मोबाइल , सोशल मिडीया अजिबात वाईट नाही जर त्याचा वापर योग्यरित्या केला तर च..

आज आम्ही म्हातारे विकीपिडीया, गुगल, युट्युब, फेसबुक, व्हॉटस्अप, लिंकीडइन, इंस्टाग्राम, ट्विटर व कित्येक अॅपस् याचा वापर बिझनेस साठी करतो. पैसे कमावतो. मग काय हरकत आहे ह्यावर बिझी राहण्यात ? आज डीजीटल मार्केटींग हे खुपच महत्वाचे आहे.

तरीही  असे वाटते की युवा पीढीने व्यायाम, वाचन, लिखाण, चर्चा ह्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. स्वत:च्या हॉबीज जपायला हव्या...

पोपटपंची थांबवतोय... बाकी तरुण पीढीला आवाहन की तुमचे बिझी असणे हे कीती महत्वाचे हे सिध्द करण्याचा प्रयत्न करा.. फकित चार ओळी !! 👍🏻
🙏🏼😇


===========================



अनिल गोडबोले
सोलापूर

पृथ्वीला स्वतःभोवती आणि सुर्या भोवती फिरताना लागणारा कालावधी तर माणसाने मोजला व त्याच्या आधाराने तो रोज काम करू लागला.

अजून काही तरी मिळवायचं आहे या आशेने किंवा माझ्या मनाला वाटत म्हणून एका एका गोष्टींच्या मागे लागला.. त्यामूळे ज्याच्या मागे लागला त्याला वेळ द्यावा लागला आणि बाकीच्याला वेळच शिल्लक राहिला नाही.

उद्योग आणि त्यांच्या वाढी साठी माणसाच्या गरजा वाढत गेल्या किंवा वाढवत राहण्याचा खेळ सुरू झाला.

मग technology ने माणसाला भयानक वेग दिला. वेग मिळाला की माणूस निवांत राहील अस वाटू लागलं.

मग निवांत वेळेत तो अजून पळू लागला अजून पैसे संपत्ती कमवू लागला. वेळच नव्हता तेव्हा..

मग त्याने एवढं ओरबाडले की त्याच्या पुढच्या पिढीला एन्जॉय करण्यातून वेळ मिळेना.
आणि जे वेळ काढून जगत होते त्यांना काहीच राहील नाही म्हणून कमवण्यासाठी पळू लागले आणि बीझी झाले.

ज्यांच्याकडे पैसे आणि टेक्नॉलॉजी आहे ते त्यांच्या प्राथमिकता सोडून दुसरं काहीतरी करत आहेत.

तर शेवटी महत्त्वाचं काय.. वेळ.. नाही ...
तर आपली प्राथमिकता महत्त्वाची

बीझी आपण आपल्या जगातच आहोत. आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे त्या मध्ये सुद्धा.. मला जस पाहिजे तेच झालं पाहिजे..

आपल्याच शेपटाला काठी बांधून त्याला गाजर बांधलं आहे आणि त्याच्या मागे पळतोय आपण..

जगतो आहोत का आपण.. हे जग कोणीतरी चालवत आहे आणि आपण पळतोय..

खरोखर बीझी आहोत का आपण.. निसर्गात, झाडात मनासारखा निसर्ग सौंदर्य बघत कधी फिरणार.

मित्र नावाचं एक नात दिल होत निस्वार्थी पणे... त्याला भेटून खूप आनंद व्हायचा.. पण बीझी असल्यामुळे तोच भेटत नाही..

एक दिवस बीझी असतानाच घरचे पोचवायच्या आत जरा जगलो तर बर होईल..

खरच जरा बीझी पणा सोडून डोळे मिचकावून जगाकडे बघुयात का..!

===========================



डॉ. विजयसिंह पाटील. MBBS.DA.कराड...

मला वाटते, बिझी असणे आणि ओक्युपाईड असणे यात फार मोठा फरक आहे.उदा. मी बिझी आहे याचा मी लावलेला अर्थ, पूर्णपणे कामात व्यग्र. पहाटे उठून चालण्याचा व्यायाम,मग चहा, प्रातर्विधी आटपून देवपूजा करून, सकाळचा नाश्ता. व मग दिवसभर घाण्याचा बैलासारखं काम आणि फक्त काम. उसंत मिळालीच तर दुपारचे लगबगीनं उरकलेलं जेवण. संध्याकाळच्या पलीकडे व रात्रीच्या अलीकडे कधीतरी हे काम संपतं. (मध्येच घराचं बांधकाम, मग फार्महोऊस, गाड्या बदलणे हा क्षणिक विरंगुळा).घरी आल्यावर जेवणास वेळ असेल तर चहा घेऊन गावात मित्रांकडे फार फार तर अर्धा तास गप्पा. परत घरी. जेवण झाल्यावर त्याच त्याच टीव्ही मालिका. मग अंथरुणावर पडल्या पडल्या झोप. परत पहाटे उठून नेहमीचाच दिनक्रम. महिन्यातून एकदा दीड दिवस सुट्टी घेऊन कुठल्या तरी ठिकाणची गडबडीत आवरलेली ट्रिप. 'परत ये रे माझ्या मागल्या'. वर्षातून एकदा परप्रांतात पाच सहा दिवसांची सहल. परदेशी गेलो तर फक्त स्थळं आणि दिवसांची संख्या वाढायची.
पण कोणत्या तरी एका क्षणी लक्षात आले, की हे कुठतरी थांबलं पाहिजे.'
शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं की आपण व जनावरे यात फारसा फरक नाही. उलट ते भूक लागल्यावर खातात, झोप आल्यावर झोपतात. ते आपल्या मनाचे राजे... आणि आपण सवयीचे गुलाम. (त्यांतच अल्बर्ट कामुचं एक पुस्तक वाचनात आले.  त्यांच्या म्हणण्यानुसार ' माणूस रोज तेच तेच दिनचर्या करून रोजच आत्महत्या करतो '. शॉक बसल्यासारखं झालं.
विचार केला, कामाचा व्याप हळूहळू कमी करायचा आणि आपले छंद जोपसायचे...
आणि मग सुरु झाला माझा ओक्युपाईड दिवस.
पहाटेचा व्यायामात खंड पडू दिला नाही. व्यग्र कामाचा कालावधी कमी कमी करत आणला. आणि फावल्या वेळात,  वाचनासाठी, आवडते सिनेमा मुख्यतः इंग्रजी, मित्रांसोबत गप्पा टप्प्या, बाईक रायडिंग, जवळचीच पण न पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे, फोटोग्राफी, आणि हल्ली हल्ली थोडंफार लिखाण.
यामुळं दैनंदिन चिडचिड बऱ्यापैकी कमी झाली, वजन आटोक्यात आलं, स्ट्रेस लेव्हल कमी झाली.
अगदी बारीक सारीक गोष्टीत आनंद मिळायला लागला.
विचार केला असता असं जाणवलं की, आत्तापर्यंतचा मोठा कालावधी हातातून निसटून गेलाय. तो कालावधी फक्त( बिझी )आर्थिक दृष्ट्या कारणी लागला.. आता खरं आयुष्य जगायला शिकलोय..
=========================

शीतल शिंदे ,दहिवडी
         🤔 नेमके  बीझी कशात असतो आपण हे पाहणे फार गरजेचे आहे .ऐथे कोणाला वेळच मिळत नाही हो .आउटपुट मात्र ईतरानसारखच .उठल्या पासून झोपेपर्यण्त पोट भरण्यासाठी  आणी सम्पत्तीचा संग्रह  करण्यासाठी खटाटोप करत असतो .शेवटी काय मोकळेच जाणे .
कधी दुसऱ्याच्या दुखः त  सहभागी झालोय का आपण ? ईतरानकडे पहायला तरी वेळ आहे काय आपल्याकडे , ते सोडाच हो बुजुर्ग झालेल्या आई वडिलांना पहायला पण वेळ नसतो आपल्याकडे त्यांना ऑनलाईनच अग्नी देतो .सम्पत्तीचे एवढे जतन  करतो  की पाठीवर पाय देत  आलेल्या बहीण - भावंडानां आर्थिकदृष्ट्या , मानसिकदृष्ट्या मदत कराविशी वाटत नाही आपल्याला . हे आपले असते बीझी आयुष्य .पैसा कमावण्यासाठी केलेला  खटाटोप !
              समाजासाठी झटणे तर लाम्बच .समाजासाठी कार्य करू म्हटले की आता अभ्यास आहे , मग नोकरीच्या शोधात आहे आणी हो अहो नवीन लग्न झालेय आता . झाले आता मुलगा दहावीला आहे मग घराचे कर्ज आणी  मुलांच्या  शिक्षणाचे कर्ज फेडतोय हो आता .हुश्श ,
          थकलोय आता  सेवाणीव्रुत्त  झालोय हो आता , आता काय गुडगे दम काढत नाहीत बघा .
              मुले नातवंडे आपापल्या व्यापात .
           ना कधी छंद जोपासला , ना कधी सामाजीक बांधिलकी  जोपासली .
       संपले ते आयुष्य  , स्वतांमधूण कधीतरी  बाहेर येवून  गरजूंना  मदतिचा हात  देवूयात नीराधाराणा  मदत करुयात .दुसऱ्याचे पोट भरले तर आपले पोट लवकर भरेल , दुखः दूर केले तर आपले दुखः लवकर दूर होईल अगदी शंभर टक्के .चला मग पुन्हा स्वतः साठीतरी  समाज कार्य करूयात आणी आपले कार्य सिद्धीस नेवुयात 🙏
===========================


संगीता देशमुख,वसमत,जि. हिंगोली

पूर्वीचा काळ किती छान होता! असं म्हणायची वेळ आज आपल्यावर आली. आत्ता आत्तापर्यंत म्हणजे मला नोकरी लागल्यावरचा काळ विचारात घेतला किंवा विसाव्या शतकाच्या शेवटचा विचार केला तरी लक्षात येईल की, सामान्य माणसाच्या जीवनात यंत्रांचा शिरकाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. फार मोठ्या जमीनदाराच्या शेतातही तेव्हा जमिनीच्या मशागतीपासून तर शेतीतील जास्तीत जास्त  कामे माणसांच्याच साहाय्याने होत असत. फार झाले तर मळणीयंत्रासारखी मोजकी यंत्र शेतात आली होती. घरातली  जात्यावरची दळणे गेली असली तरी विहिरीचे पाणी शेंदणे,कपडे धुणे,आणि गावातल्या गावातच काय पण तीन-चार कि. मी. पर्यंत पायीच जात असत. शहरातही मध्यमवर्गीय लोकांकडे फार तर सायकलचा उपयोग होत होता. ही सर्व कामे करण्यात भरपूर वेळ जायचा आणि यातून ज्यांचा वेळ उरला ते मोठे लोक दूरदर्शन पहात असत आणि गरीब लोक मंदिरात भजन,किर्तन यात वेळ घालवायचे. पण तरी सुध्दा त्यांच्याकडून "मला वेळच मिळत नाही" अशी तक्रार कधी ऐकली नाही. परंतु आज यांत्रिकीकरणाचा झपाट्याने विकास झाला. आणि मानवाच्या जीवनात त्याचा इतका शिरकाव झाला की,ही स्वारी आता चक्क स्वयंपाकघरात शिरली. इकडे लाइटबील सारख्या छोट्यामोठ्या कामासाठी कोसभर दूर जाऊन  तासभर उभं रहावं लागायचं  ती कामे आता दोन अंगठ्याच्या अंतरात आणि काही मिनिटात होत आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर लक्षात  की,पूर्वीच्या तुलनेत आजचा वाचलेला वेळ गेला कुठे?
                 आज येताजाता अनेक लोकांच्या तोंडून हेच ऐकायला मिळते की,"मला वेळच नाही" किंवा "मला वेळच मिळत नाही"!पुन्हा पुन्हा मनात तोच विचार  डोकावतो की, ' नेमके कशात बीझी असतो आपण एवढे!'  मजलदरमजल करत जाण्याची आम्हाला सवय होती आणि आज दळणवळणाची साधने आली तरी आम्ही वाहनांचा वेग अफाट ठेवतो. का? तर लवकर पोहोचायचे असते... पूर्वीचे लोक मोठ्या प्रमाणात अवांतर वाचन करायचे. आज असे वाचनही कमी झाले. यंत्रामुळे आमचा कितीतरी वेळ वाचला. परंतु मला वाटते, त्या वाचलेल्या वेळाचे आपल्याला नियोजन करता आले नाही. इंटरनेटच्या जाळ्यात आपण पुरते अडकलो. अभिमन्यूसारखी आपली अवस्था झाली. या जाळ्यात शिरलो तर खरं पण यातून बाहेर पडण्याचा कळूनही वळत नाही. मग पर्यायाने "मला वेळच मिळत नाही",अशी सबब सांगून आपण आपल्याच माणसापासून,सत्कार्यापासून,चांगल्या सवयीपासून दूर जात आहोत. कोणाला चांगला विचार करण्यास वेळ नाही,कोणाला चांगले लिहिण्यास,वाचण्यास वेळ नाही,कोणाला चांगले काम करण्यास वेळ मिळत नाही. खरे तर  ही आपली तंत्रज्ञानापुढे हार आहे. 
           आजही आपण आपल्याजवळ असलेल्या वेळेचे नियोजन योग्य पध्दतीने केले तर आपला बराचसा वेळ चांगल्या सवयीसाठीं,आपल्या माणसासाठी आणि महत्वाचे म्हणजे समाजकार्यासाठी लावू शकतो. पण यासाठी आपल्याला त्याची आवड असणे गरजेचे आहे कारण तशी म्हणच आहे  "आवड असली की सवड मिळते" आणि आणि काम करायचेच नसेल तर  "ना के नौ बहाणे" ठरलेलेच आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य उपयोग घेऊन वाचलेला  वेळ सत्कारणी लावू शकतो.
=======================

निखिल खोडे,  ठाणे.
           मागच्या रवीवारी ग्रुप वर विषय टाकण्यात आले होते आणि आता मी लिहायला सुरवात केली.... म्हणजे नेमके कुठे बिझी असतो आपण यावरून समजले...😅
         
           *वेळेचं गणित* (केंव्हा ते आठवत नाही पण बहुधा इयत्ता सहावी सातवीला) विचारधन होते त्यातले २-३ वाक्य आठवते की महापुरुषांनी वेळ मिळत नाही ही तक्रार कधीच केली नाही. मग मी कधी - कधी स्वतःच विचार करतोय की आपल्याला वेळ कमी का पडते कोणत्याही गोष्टी साठी?
         
            वेळेचे व्यवस्थापण करणे हे कधी मला जमलेच नाही. प्रत्येक वेळेस वेळापत्रक बनवले परंतु वेळापत्रका प्रमाणे काम करणे झालेच नाही..
सोशल मीडिया वर बराचसा वेळ निघुन जातो.. त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळते हा एक मुद्दा सोडला तर बाकी तर नुसता टाइमपास चालु असतो..
            
              कामाच्या जबाबदारी मुळे दिवसाचा वेळ कसा निघून जातो कळायला  मार्ग नाही..फक्त शेवटी इतकंच की लक्षात आहे.."वेळ कोणासाठी थांबत नाही"....⏳⌛

(या ब्लॉगमधील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

माझ्या आठवणीतली शाळा सहल

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄आठवडा 47 वा 📝

माझ्या आठवणीतली शाळा सहल


या विषयावर शिरीष उमरे ,नवी मुंबई.शीतल शिंदे ,दहिवडी
अमोल धावडे,अहमदनगर.प्रदिप इरकर,वसई.पालघर.
सिताराम पवार,पंढरपूर.डॉ. विजयसिंह पाटील,कराड .यांनी जागवल्या आहेत आपल्या लहानपणीच्या सहलीच्या आठवणी.
वाचा तर मग…….

शिरीष उमरे ,नवी मुंबई.
प्रत्येक गोष्टीत काहीतरी नविन व पॉजीटीव्ह शोधण्याची सवय लावली त्या आखरे मास्तरांची आठवण आली *शाळा सहल* म्हटल्याबरोबर !!...😍

सातवीत शिकत असतानाची गोष्ट आहे की सरांनी डोळे मिचकावत वर्गात सांगितले  सोमवारी आपण ट्रीपला जाणार आहोत.... जल्लोष !! सगळ्यांचे उजळलेले चेहरे व कीलबिलाट ...पुर्ण वातावरण च  बदलुन गेले !!

सरांकडे ₹२० बस तिकीटीचे जमा करायचे होते. आपआपला टीफीन घ्यायचा होता. तयारीत कसे तीन दिवस निघुन गेले कळाले नाही. पहाटे सहा ला आईने दिलेला डब्बा व पाणीबॉटल रुमाल घेऊन स्वारी बाबांच्या सायकलवर बसस्टँडवर हजर.. सगळ्या वर्गमित्रांच्या बिर्हाडाला बस मध्ये कोंबुन बस रवाना झाली आणि एका अस्मरणीय प्रवासाची सुरुवात झाली....

सरांनी सगळ्यांसाठी आणलेला कच्चा चिवड्यावर ताव मारत खिडकीतुन धावणारी झाडे पहाण्याची मज्जा घेत आमची धमाल सुरु होती. मग सरांनी प्रत्येकाला कंडॅक्टरचे काम समजावुन सांगितले. घंटी वाजवण्याचे प्रकारापासुन ते तिकीटीला पाडलेल्या छीद्राचा अर्थ ही नवीन माहीतीचे प्रॅक्टीकल कुतुहलाने बघुन आमचा पुढचा धडा ड्रायवर साहेबांचा झाला... हॉर्न, आरसा, गेअर, ब्रेक, अॅक्सीलेटर, वायपर वैगेरे चा वापराचे प्रात्याक्षिके झालीत. थोडा वेळ गाण्याच्या भेंड्या रंगल्या. मग आमचे गाव आले आणि ड्रायवर कंडॅक्टर काकाना टाटा करुन आमची टोळी निघाली पुढच्या प्रवासाला... कच्चा रस्ता .. दुरवर हीरव्यागार डोंगरावर दिसणारी लाल कौलारु घरे ... हवेनी डोलनारी शेतातली कणसे... एक वेगळाच सुगंध सर्वांना धुंद करुन गेला. फुलपाखरांमागे धावणे व पक्षांच्या आवाजाची नक्कल करता करता सरांच्या मामाच्या वाड्यावर केंव्हा पोहचलो कळालेच नाही.  रस्त्यात सरांनी पुस्तकातले वनस्पतीशास्त्र असे उलगडुन दाखवले की परत पाठांतराची गरज च भासली नाही. वाड्यातली बकरीचे व कोंबडीचे पिल्लांसोबत खेळतांना व बैल जोडी जुपतांना आणि गायीच्या धारोष्ण दुधाचा हळदी सोबत आस्वाद घेतांना प्राणीशास्त्र समजावुन सांगण्याची सरांची हातोटी बघुन विस्मीत झालो की हाच का तो खडुच्या धुळीत भरलेला शाळामास्तर ... सरांचे आज वेगळेच रुप बघायला मिळत होते. कीती सांगु आणि कीती बोलु असे त्यांना झाले होते. मग आजीने दिलेला पोळीच्या चुरम्याचा लाडु तोंडात कोंबुन आम्ही सगळे चढलो बैलबंडीवर... बैलगाडीचा हा प्रवास गजब... मधात एका झर्याचे थंडगार पाणी पिऊन मासोळ्या खेकड्यांशी खेळुन भिजुन मस्त्या करत पोहचलो एका कील्ल्याच्या पायथ्याशी ... वरच्या महादेवाच्या मंदिरात जेवायचे आहे तर लवकर चढा असा आदेश मिळताच आम्ही मावळे निघालो चढाई करायला ...
चढाई करतांना खरचटणे, ढोपर फुटणे आणि मग त्यावर कंबरमोडीच्या पानाचा रस लावणे हे वैद्यकीय उपचार करत सगळी आम्ही माकडे भिडलो बोरा करवंदाच्या रानमेव्यावर... मस्त मातीत मळुन घामाजोगाळ होत पोहचलो माथ्यावर... तोपर्यंत सरांनी भुगोल व इतिहास सहज रसाळ पध्दतीने शिकवला हे कळाले पण नाही. वरुन दिसणारे विहंगम दृश्य डोळ्यात साठवुन बुरुजाच्या वाटेने परत एका दरीत उतरलो आणि सगळे अचंबीत राहलो. एक छोटासा धबधबा आमची वाट बघत होता... सरांच्या परवानगी ची वाट न पाहता कपडे फेकुन सगळी वानरसेना धबधब्याखाली नाचत होती. सर मिश्कीलपणे हसत बाजुच्या मंदिरात गेले. थोड्या वेळाने पांढर्याशुभ्र दाढीच्या साधुसोबत परतले पंचे घेउन... सगळ्यांची डोकी पुसुन दिलीत.
मग सुरु झाला आमचा राजेशाही जेवणाचा थाट !! सगळ्यांचा डब्ब्यांचा गोपालकाला ... नंतर साधुबुवांनी दिलेला दहीभाताचा प्रसाद व पळसाच्या द्रोणात अमृततुल्य ताक ...शेवटी त्यांनी दिलेल्या रानफळावर मारलेला ताव... सगळे पेंगु लागले ह्याच नवल काय !! दोन तासाच्या गाढ झोपेनंतर सगळा शिणवा निघुन गेला. उठल्यावर सरांनी बनवलेला गवती चहाने परत बॅटरी फुल...
मंदिराच्या पटांगनात लंगडी, धाबाधुबी, मामाचे पत्र वैगेरे खेळ झाले... खुप धमाल केली आणि साधुबुवाच्या पाया पडुन पायथ्याकडे प्रवास सुरु झाला. गप्पा मारत मारत परत वाड्यावर केंव्हा आलो माहीतीच पडले नाही. आजोबांनी बनवलेला हुरडा व शिंगाडे खाउन मसालेदार दुध पिऊन सगळे जड पावलांनी बसस्टॉपकडे निघालो. बसमध्ये सुध्दा सगळे अर्धनिमोल्लित डोळ्यात आज घालवलेले भावविश्वाचे पुन्हा स्वप्न बघत होते. बसमधुन उतरल्यावरही कोणाचीच घरी जाण्याची ईच्छा नव्हती...
आजही इतक्या वर्षानंतर सगळे डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहीले...
आज वाटते की सगळ्यात जास्त पगार हा प्राथमिक शिक्षकांचा असावा... ते घडवतात पुढची पीढी... धन्य ते मास्तर जे जीव तोडुन शिकवतात 🙏😇

जाता जाता एक गोष्ट अजुन... सरांनी लावलेली प्रवासाची आवड अजुनही कायम आहे... पस्तीस वर्षापासुन भटकंती सुरु च आहे... नाविन्याचे कुतुहुल कायम आहे... शिकण्याची अतृप्ता अजुनही जिवंत आहे... जगण्याची मजा घेणे सुरु च आहे... सगळ्या गोष्टी पॉजीटीव्हली बघणे चालु च आहे...
रजा घेतो ✨🙏😇📝

शीतल शिंदे ,दहिवडी.
            आमची सहल जाणार म्हणून 4 दिवस आधीच आईच्या मागे "माझी सहल जाणार ' सहल जाणार "  म्हणून आईच डोकं उठवले .ईयत्ता चौथी मधे असताना .पहिलीच सहल होती. जवळच होती पण निसर्गरम्य परिसर होता तो .फार उत्साह होता .
सहलीला जाताना ओढ्याकाठी  पाण्यात उड्या मारल्या ' चिंचा  खाल्ल्या ' आता आलो xyz नावाच्या  देवीच्या मंदिरात .दगडी इमारत पहिली , छान खेळून दमलो आता जेवायला बसायचे .
आईने चपाती भजी बनवून दिली होती .
   सर्व मुले मुली एकाच पंगतीत बसलो .मात्र आम्हाला वेगळ्या बाजूला बसवले .का तर अनुसूचित जात . मग काय भूक पाळून गेली .घरी आल्यावर आईने विचारले कशी झाली ? सांगितले छान .

      दुसरी - सहल
इयत्ता - सातवी -  पुन्हा एकदा निसर्गरम्य  परिसरात पण वनभोजन
गुरुजींनी आमच्याकडून वर्गणी  काढली साहित्य खरेदी केले .गेलो तिकडे शेती , झाडे , फुले  छान परिसर होता तो .अजूनही डोळ्यासमोर दिसते ते चित्र .गाणी , गोष्टी वगैरे झाले आता जेवण बनवायचे होते .आम्ही सर्व मुली स्वंयपाक बनवायला तयार झालो .पण तिथेही जतीप्रथा! आम्हा चार मुलींना फक्त तांदूळ, जिरे  निवडणे , एवढेच काम दिले ना चपाती लाटलि ना भाजी बनवू दिली ना जेवण वाढू दिले .फार नाराज झालो होतो पण काय करणार . माळकरी गुरुजी आमचे ते .अजूनही ते क्षण आठवतात .कसे विसरणार .भांडी घासायला मात्र काम दिले .
     पण हरकत नाही म्हटले त्याचे कारण असे की  तेच गुरुजी वर्गामधे मात्र जातीभेद नाही केला .हुशार विध्यार्थीनी म्हणून मला मॉनिटर  केली होती .पण सहलीची मात्र आठवण राहिली .
    🙋 आणी तिसरी सहल
वन भोजनाची इयत्ता नववी .गाडीने सर्वजण गेलो .xyz देवाचे मंदिर होते . सर्व साहित्य निवडून झाले .आता स्वयंपाक बनवायचा मात्र आम्हाला वाटले  आता आपल्याला मराठी साररखेच केले जातेय की काय ? म्हणून आम्ही तीघीजनी जवळच्या नातेवाईकांकडे गेलो ते जेवण बनवून झालेवरच आलो .
     सर आमच्यावर रागावले होते फार .म्हणाले आता तुम्हाला शिक्षा देणार .आम्ही एकीमेकीच्या तोंडाकडे पहायला लागलो आता शिक्षा काय असेल ?
   शिक्षा होती "तुम्ही  तीघीणी सर्व मुला - मुलींना जेवण वाढायचे ".शिक्षा ऐकून फार आनंद झाला .आणी आनंदाने आम्ही सर्व जेवण वाढले .मात्र इयत्ता  सातवीच्या वर्गाची वनभोजन सहन , गावपातळीवरील विचाराची रुढी तशीच्या तशीच आहे .कधी सम्पेल सांगता येत नाही .
         सातवीचे गुरुजी भेटले त्यांना चहासाठी घरी बोलावले मना मधे आदर तोच  होता गुरुजी म्हणून .वैभव पाहून गुरुजी काहीच बोलले नाहीत .मीच त्यांच्या मुलीबद्दल  - वर्ग मैत्रिणी बद्दल , त्यांच्या बाईंना विचारले .
     आज मी एवढ्या वर्षांनी मन मोकळे केले .

अमोल धावडे,अहमदनगर.

नमस्कार माझ्या जिवलग मित्र/मैंत्रिणींनो
मित्रांनो सहल विषय निघाला की फिरायला जाणे, मज्जा करणे, नवीन ठिकाणं पाहणे या सर्व गोष्टी आनंदी आनंद. पण माझ्या आयुष्यात माझी बारावी पूर्ण होईपर्यंत सहलीला जायचा योगच आला नाही. परंतु मी अस लांब गेलो नसलो तरी मी पाचवी सहावीला असताना गुरुजींनी सांगितले की तुम्हा सर्वांची सहल जाणार आहे सर्व मुले आनंदी झाले परंतु माझ्या चेहऱ्यावर आनंद नव्हता कारण सहल म्हटलं की जाण्यासाठी लागणार खर्च तो माझ्याकडे नव्हता. परंतु गुरुजींनी सांगितलं की आपल्याला सहलीसाठी जवळच एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावर जायचं आहे. मी जाम खुश झालो दुसऱ्या दिवशी मस्त घरून पाच रुपये, मस्त डबा व नवीन कपडे घालुन मी सहलीसाठी गेलो. जवळच असणाऱ्या तलावावर आमची सहल गेली त्याठिकाणी मस्त मित्रांसोबत मज्जा धमाल केली. दुपारी घरून दिलेल्या डब्यांचा स्वाद घेतला खुप मज्जा केली. ही माझी आठवणीतील सहल आहे. बारावी नंतर मित्रांसोबत खुप ठिकाणी फिरण्यासाठी गेलो परंतु त्या वेळेस शाळेत असताना आणि आत्ता मित्रांसोबत जातांना खुप मोठा फरक आहे. सध्याच्या जिवनात खूप साऱ्या ठिकाणी जाऊन आलो तेही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहे. परंतु परिस्थिती माणसाला खुप काही शिकायला भाग पाडते हा अनुभव किंवा ही सहल माझ्यासाठी खुप आनंददायी होती त्यामुळे हा आनंद मांडण्याचा प्रयत्न केला.
धन्यवाद 🙏😍


प्रदिप इरकर, वसई,पालघर.

माझ्या आठवणीत शाळा सहल तशी काही नाही परंतु आठवणीत राहिली ही आमची NSS चा कॅम्प!
9 वीला असताना आमच्या शाळेतून सहल गेली होती तिला मी नव्हतो गेलो त्यांनतर 10 वि सहल च नव्हती.11 वि 12 वि science चे विद्यार्थी म्हणून फक्त अभ्यास च करावा असाच काहीसा होते त्यामुळे मनासारखी सहल झाली नव्हती व वरिष्ठ विद्यालयात आल्यानंतर NSS मध्ये सहभाग घेण्याचे माझे कारण तर कॅम्पच होता.

वसई पासूनच काही दूर असलेल्या चांदीप गावातील शाळेत आमचा कॅम्प होता पूर्ण 7 दिवस!
थंडीचे दिवस होते.आमचा शाळेत रोजचा दिनक्रम ठरला होता.आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे 7 गटात विभाजन केले होते.5:30 ला उठणे मग प्रातःविधी आटोपुन आम्ही योग करत असू,सर्व जणांना विशेष न आवडणारे असे होते😜
मग आमचा एक ग्रुप स्वयंपाक करण्यासाठी थांबत असे व आम्ही सर्व जण श्रमदान करण्यासाठी जात असत,हे सर्वांचे आवडते काम होते कधी स्वतःच्या घरी पण झाडू न मारणारे आमच्यातले काही जण उत्स्फूर्तपणे काम करत असत.

   श्रमदान आटोपून आल्यावर आम्ही अंघोळ करण्यासाठी जात असत.एका बाथरूममध्ये ४-५ जण अंघोळ करत असत😅
अंघोळ होईपर्यंत आमचे जेवण तयार झालेलं असायचे मग आम्ही जेवणावर ताव मारून दुपारच्या कार्यक्रमाला तयार होत असे.
दुपारी वेगवेगळं विषयांवर वक्ते येऊन आम्हाला भाषण देत असत.अंधश्रद्धा, पथनाट्य आणि अनेक विषयांवर आम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ते संपल्यानंतर संध्याकाळच्या चहाची व्यवस्था केलेली असे,चहा पिल्यानंतर आम्हीं मैदानावर मैदानी खेळ खेळत असे त्यात आम्ही चक्क सोनसाखळी, सुट्टी साखळी असे लहानपणीचे खेळ खेळून पुन्हा एकदा बालपण जगायची संधी आम्हाला ह्या 7 दिवसात मिळाली होती.
संध्याकाळच्या जेवणानंतर आमच्या प्रत्येक गटाला एक पथनाट्य सादर करायचे असे.मुंबई लोकल,शौचालय, स्त्रियांची परीस्थिती  अशा अनेक विषयांवर पथनाट्य सादर केली गेली त्यावेळी आमच्या गटाने सादर केलेले अंधश्रद्धा विरोधी पथनाट्य व त्यात मी केलेली भोंदू बाबाची acting  सर्वांच्या इतकी स्मरणात राहिली की पुन्हा कॉलेज मध्ये आल्यानंतर मला *बाबाजी* या नावानेच सर्वजण हाक मारत असत😅.
   आम्ही 26 जानेवारी सुद्धा त्याच शाळेत साजरा केला.
असा हा आमचा रोजचा 7 दिवस दिनक्रम असे.
ह्या 7 दिवसात अनेक नवीन गोष्टी ,नवीन मित्र, ग्रामीण आदिवासी भागातील जीवन,आम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, आम्ही अगदी सहलीप्रमाणे पार पाडलेली एक शैक्षणिक कॅम्प, अशा अनेक आठवणी स्मरणात घेऊन पार पडलेली आमची ही सहल माझ्या विशेष स्मरणात आहे😍

सिताराम पवार,पंढरपूर.

मला प्रवास खूप आवडतो. सहल ही शक्यतो निसर्गरम्य ठिकाणी, ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले आशा ठिकाणी जाते. मी आठवीत असताना मला सहलीला जाता आले नाही, कारण माझा मोठा भाऊ जाणार होता, मंजे दोघपैकी एकट्याने जायचं. मग मला दहावीत असताना संधी मिळाली. सहल कोकणात रायगड, प्रतापगड, रत्नागिरी, महाबळेश्वर येथे जाणार होती.
सुरवातीला आमच्या शिक्षकांनी बसमध्ये आमच्या गावात येताना त्यांची मुलं आणली,(सहलीला नेण्यासाठी) मग आमच्या मित्रांनी गोंधळ केला आणि त्यांना कॅन्सल केलं शिक्षक थोडे नाराजच झाले. आमची सहल अशी सुरू झाली जसा सोलापूर जिल्हा ओलांडून पुढे जावं तसं निसर्गच अदभुत अस दर्शन होऊ लागलं. मला तर ते डोंगर, दऱ्या, घाट बघून अस वाटायचं की आपण वहिवरची चित्रं तर पाहतनाही ना असा भास होत होता, खरंच सह्याद्रीचा थाट पाहून मी अचमबीतच झाले. कारण मी पहिल्यांदा माझा जिल्हा ओलांडला होता. प्रतापगडावर मात्र हद्दच झाली आमची बस पुढे आणि मुलींची मागे होती. जस आपण जिना चढावा तशी वर जायला वाट होती, आमची वर चढताना वळणावर ड्रायव्हरला ब्रेकच बदलणं येईना, आमची बस तर अशी होती की पाठीमागे दरी, सरळ मागे गेली तर दारीतच!!आम्ही बसमध्ये,5  मिनिताट तर बस मधून मुलं बाहेर!!शिक्षकांनी मोठे दगड चाकाला उटी मनुन लावले. मग पाठीमागून मुलींच्या बसचे ड्रायव्हर आले त्यांनी गियर बदलला, तोपर्यंत आम्ही बसमधून खाली,बस रिकामी
आणि सर मणले ,इथून पुढे प्रतापगड नाक्कोच, आणि आम्ही हताशपणे त्या दरीकडे पहात होते. मनात नाही ते विचार घोंगावत होते....


डॉ. विजयसिंह पाटील,कराड.( MBBS. DA.)

वडिलांची वारंवार बदली होत असल्याने, सातवीपर्यंत कुठं सहलीला जायला मिळालं नाही. सहलीला जावं असं त्याकाळात वाटलं पण नाही. मला वाटते, सत्तर ऐंशीच्या दशकात सहलीचा फारसा ट्रेंड ही नव्हता. दहावीची परीक्षा झाली आणि आम्ही मोकळं झालो.
एके दिवशी, कुणाच्या तरी मनातून आयडिया निघाली. ,
सायकल वरून , कराडपासून आठ नऊ किलोमीटर वर असलेल्या, पाचवडेश्वर ठिकाणी जायचं. सायकल वरून जायचं म्हणून निम्मी अधिक गळाटली. काहीतरी कारणं सांगून एकाएकनं काढता पाय घेतला. राहिलो आम्ही दहाजण.
आमच्यात एक अभ्या नावाचा पुस्तक पंडित होता, (मी त्याचं नाव पुस्तकराव ठेवलंवतं). दुसरा मिल्या. दोघेही अभ्यासात तोडीसतोड. अभ्याला  अफाट पुस्तकी ज्ञान तर मिल्या सगळ्यातच हुशार. अजून तिघे अन्या, लक्षा, निव्वळ टारगट . फक्त दंगा मस्ती, मारामारी करण्यात एक नंबर, ( फक्त ह्याच्यातच पहिला नंबर, अभ्यासात शेवटचा). बाकी आम्ही सगळीकडेच जेमतेम.
अभ्यानं स्वयंघोषित ट्रीपच अध्यक्ष पद घेतलं. व ट्रिप संबंधी मिटिंग ठेवली.
मिटिंग सुरू झाली. अभ्यानं एक स्वतः बनवलेली डायरी आणली होती. कसं निघायचं, बरोबर साहित्य काय काय घ्यायचं याची चर्चा सुरू झाली.
पहिलाच खोडा मिल्यानं घातला ' मी स्कुटरवरून (हा गडी वडलांची स्कुटर चालवायचा ) आलो तर चालेल का ?'.
मिटिंग मध्ये खळबळ उडाली. सगळ्यांनी मिळून त्याला विरोध केला
अभ्याच्या तोंडावर हसू आलं. मिल्या मिश्किल हसला.  ( मला लक्षात आलं, हे नुसतंच खोड्या काढणार ).
दोन दिवस अगोदर तयारी सुरू झाली. सकाळी नऊ वाजता निघायचं. एकत्र जमण्याचं ठिकाण निश्चित झालं. प्रत्येकानं डबा घेऊन यायचंही ठरलं. दोन्ही चाकात हवा मारून घ्या, हायवे वरून जायचं शिस्तीत जाऊया. बरोबर टॉवेल व उंडरवेअर घ्यावी ( पोहण्यासाठी ),इत्यादी अनेक सूचनांचा खच पडला.
पोहायचं आहे तर, सगळ्यांनी घरी कल्पना द्यावी ,.असं अभ्यानं सुचवताच, कशाला कशाला असं म्हणत माझ्यासह बऱ्याच मेम्बरनी खळकळ केली. इथं मिल्याने अभ्याला पाठिंबा दिला.
वर्गणी  ( सहभाग निधी: अभ्याचा शब्द ) गोळा करायचा विषय निघताच टारगट गॅंग संतापली. ' ये शहाण्या, आपण इथंच जाणार आहे, मुंबईला नाही, उगच खुळ्यागत बोलू नको ,'. तसं अभ्याचा चेहरा पडला. आणि पुस्तक राव ' हँ हँ' करत खुसदीशी हसला.

वडील कामानिमित्त चार दिवस गावी गेले होते. त्यामुळं त्यांना विचारायचा प्रश्नच पडला नाही. आईनं सहलीची परवानगी दिली, पण पोहण्यास कडकडून विरोध केला. पाण्यात गेलास तर बाबांना सांगीन असा दमही दिला.

अभ्यानं, सहलीचा कार्यक्रम एका फुलस्केप कागदावर छान अक्षरात लिहून सर्वांना दाखवला. तो खालील प्रमाणे...
चौकात आगमन... सकाळी ठीक 8.30 वा.
प्रयाण...  बरोबर नऊ वाजता.
प्रथम विश्रांती स्थळ.. अमुक..
द्वितीय विश्रांती स्थळ... तमुक...
अंदाजे अकरा वाजता नियोजित ठिकाणी आगमन.
देवदर्शन..15 मिनिटे. जलविहार..(हाही शब्द अभ्याचा ) अर्धा ते एक तास.
दुपारचे भोजन . दोन वाजता..
विश्रांती .. अर्धा तास..
भेंड्या व तस्संम बैठे खेळ एक तास.
साडेचारला परतीचा प्रवास.
सहा वाजता घरी परत.
सगळ्यांना कडकडून भूक लागल्याने, ह्यावर कोणीही विरोध केला नाही .

ठरलेल्या दिवशी सकाळी  सगळे चौकात हजर झाले. अभ्यानं पांढरा शर्ट  पांढरी पॅन्ट, पांढरी कापडी गोल टोपी,पांढरे कॅनव्हासचे बूट ,असा वेष परिधान केलेला. मिल्या मात्र रंगीबेरंगी कपड्यात, तर माझा ड्रेस, शाळेचाच गणवेश ( दुसरा बाहेर वापरायचा ड्रेस आईनं नेमका त्याचदिवशी धुवायला घेतलेला ) , डोक्यावर ncc ची टोपी तर पायात स्लीपर.. रानवट गॅंगनं डोक्याला टॉवेल गुंडाळलेला आणि पायात कोल्हापुरी चपला. कपड्यांच्या, पादत्राणाच्या आणि टोप्याच्या एव्हड्या व्हरायटी कुठंच बघायला मिळणार नाहीत.
ठरलेल्या वेळेला निघालो. (त्या काळी 1980 साली वाहतूक फारशी नसायची.) अन्या, रम्या, मिल्या, लक्षा, मी आणि इतर दोन जणांना रोजची सायकल चालवायची सवय. आम्ही म्हणजे मी, आणि रानवट गॅंग नेहमीच्या स्पीडनं निघालो.
चाललो होतो नेहमीच्या वेगानं, पण कधी पहिला थांबा मागे गेला ते कळलच नाही. मागून दुरून शिट्टीचा आवाज ऐकू आला. (नंतर कळलं की, अभ्याच शिट्टी वाजवत होता ).पोलिसांनं कुण्या ट्रकवाल्याला आडवलं असेल असं समजून आम्ही दरमजल करत दुसराही स्टॉप ओलांडला. फाटा आल्यावरच लक्षात आले थांबायचं. झाड बघून व सावली धरून आम्ही गप्पा चालू ठेवल्या. मागून मिल्या आला. ' अरे येऊ द्या की त्यांना'.
थोडा का बऱ्याच वेळाने अध्यक्ष व व अजून दोन जण धापा टाकत आले. आणि गप्पदिशी सायकल झाडाला लावून खालीच बसले. अभ्याचे कपडे धुळीने व ट्रकच्या काजळीने लालसर काळे पडले होते . घामाच्या धारा अंगाखांद्यावरनं वाहात होत्या..वाऱ्याने टोपी लांब उडून गेलेली..


त्या तिघांस धड बोलता येईना ( हे फक्त रविवारी मोकळ्या जागेत सायकल चालवत).
दम घेऊन अभ्या म्हणाला, ' हिथं मोठं डेरेदार झाड आहे, आजूबाजूला हिरवीगार शेती आहे, हिथचं आपण सहल साजरी करूया .'
मिलिंदच्या पुढाकाराने ही सूचना तात्काळ बहुमताने धुडकावली गेली, (पिण्याच्या पाण्याची सोय नाही व मेन इंटरेस्ट पोहण्यात असल्याने .)
कसंबसं फाट्यावरून आम्ही छोट्या रस्त्यानं इश्चित ठिकाणी पोहोचलो.
मोठी मोठी झाडे, विस्तीर्ण पटांगण , मंदिर आणि पुढं संथ वाहणारी कृष्णा नदी.. वर सूर्य आग ओकत असतानाही, इथं खाली मस्त सावली व गार वारे..
सगळ्यांनी हातपाय धुवून देवदर्शन केलं. सगळ्यांच्या पोटात खच्चून  कावळे ओरडत होते. तिथंच झाडाखाली आमची पंगत बसली. एव्हडी भूक लागली होती की, पाचच मिनिटात डबे संपले, तरी अजून भूक शिल्लक होती.. शेजारच्या पाण्याच्या टाकीतून ओंजळीत पाणी घेऊन पोटभर पाणी पिलं.
रम्या, अन्या, लक्षाआणि अर्थातच मी तिथंच कलांडलो. लक्ष्या दोन मिनिटातच घोरायला लागला. त्या आवाजानं , पिशवीतून पत्ते हुडकत असलेला अभ्या दचकला. लक्ष्याच्या तोंडातून निघणाऱ्या संगिताला , रम्या अन्याच्या तोंडानी सार्थ साथ दिली.
अर्ध्या तासाने यांना हलवून जागं केलं. हे डोळे चोळत उठले आणि चला पोहायला म्हणत कपडे काढायला लागले. अभ्या ' अरे  पोहायला जायचं नाही असे बाबांनी सांगितले आहे व आपलं तसं ठरलं पण आहे.'
पण याला  न जुमानता आम्ही चारपाच जण मिल्याच्या नेतृत्वाखाली नदीकडे निघालो. नदीत उतरायला चांगल्या दगडी पायऱ्या बांधल्या होत्या. आम्ही पहिल्या पायरीवर पाय टाकताच ' ये गाबड्यांनो, तिकडं कुठं  ' असा खणखणीत आवाज तिथं घुमला. आम्ही जागीच पुतळ्यासारखं उभे. मागे असणारी भिऊन चार पावलं मागे सरकली. शेजारच्या रानातून एक विजार बंडीवरचा आणि डोक्याला टॉवेल गुंडाळलेला व तोच पुढं तोंडावरून घेतलेला, हातात मोठी काठी घेतलेला इसम आला. ' ये सुकाळीच्यानो , पव्हायला येतं का ? आयबा ला ईचारलं है का ?'.

त्याचा तो अवतार बघून,सगळ्यांना घाम फुटला. काही न बोलता गप मान खाली घालून सगळी मागे फिरली. ' अर म्या काय म्हणतुया, हिकडं या, ' पाचव्या पायरीवर काठी आपटून ' ह्येच्या खाली जायचं न्हाय, एव्हड्यातच खेळा, जर खाली गेला तर पाय मोडून हातात दीन, '. सगळ्यांनी माना डोलवल्या. तासभर पाण्यात डुंबत बसलो, घाबरत घाबरत अभ्या पण पाण्यात उतरला. तास दिडतास गेला. कुणी बाहेर यायचं नाव घेईना. वरुन परत गडगडाट करत आवाज आला. ' हं बास , आता या वर'..
सगळी वर आली. संध्याकाळ होत आलेली. ' चंदया, ये की लगोलगी ', तसं आमच्याच शाळेतला पण दुसऱ्या तुकडीतील, चंद्रकांत हातात जर्मनचा मग भरून उसाचा रस व ग्लास घेऊन आला. सगळी ' अरे  तू इथं कसा काय ?' असं विचारू लागली.
' अगुदर रस प्या, मग सांगतु तुमाला 'असा परत गडगडाट झाला.  सगळ्यांनी पोट भरेपर्यंत रस पिला..
(मग सगळी हकीकत कळली. मिल्याच्या वडलांना अंदाज होता की किती पण सांगितले तरी ही पोरं ऐकणार नाहीत. त्यांचा एक मित्र याच गावचा.  पोरांच्या वर लक्ष ठेवायला सांगितले होते.मित्रांनं चंदूच्या वडलांना सांगितलं. )
निरोप घेऊन आम्ही परत निघालो. घर कधी आलं ते कळलंच नाही.
नव्वद टक्के गंमत मजा आणि दहा टक्के फजिती, अशी ही माझी पहिली सहल…


(या ब्लॉगमधील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)


संबंधीत जणांच्या सहलीच्या आठवणी कशा वाटल्या.खालील कमेंट्स मध्ये नक्की कळवा.तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************