शांतता प्रस्थापित होणे हे एक दिवास्वप्न तर नाही ना...

प्रविण, मुंबई
         जगामध्ये दुर्मिळ होत चाललेली जात म्हणजे माणूस आणि लोप पावत चाललेला गुणधर्म म्हणजे " शांतता".
जेव्हा गहन विचार केला तेव्हा कळलं की शांती हि अशी प्रेयसी आहे की जी मानाववावर प्रचंड प्रेम करते परंतु द्वेष नामक  व्यक्तीच्या आंधळ्या प्रेमात मानव आकंठ बुडाला आहे आणि शांततेच झुरणं चालूच आहे. पण मानवाला एक कळत नाही (कदाचित कळत पण वळत नाही) की आपण स्वतः चीच चिता रचत आहोत आणि द्वेष हातात अग्नी घेऊन चिताग्नी देण्यास सज्ज आहे

देशाला गरज हि बंदुकीची नाही तर लेखणीची आहे
मुलांच्या हाती बॉम्ब नको पुस्तकांची गरज आहे
देशाला शस्त्र नको शास्त्र हवं आहे
देशाला गोध्रा, 26/11 , बाबरी नको देशाला शांतता हवी आहे
आणि शेवटी एकच म्हणेन
देशाला ना धर्म, जात, पंथ नको देशाला एक गांधी हवा आहे.


(Images taken from internet)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************