सागरात बुडणाऱ्या गणेशाचे मनोगत

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

सागरात बुडणाऱ्या गणेशाचे मनोगत 


करण बायस

(बाप्पाला निरोप द्यायची वेळ असते तेवढ्यात सर्वांचे लाडके बाप्पा काही वेळेसाठी त्यांच्या मनातील समाजाबद्दल असणारी खंत व्यक्त करण्यासाठी press conference घेतात.)

*पत्रकार* : नमस्कार बाप्पा 🙏,खुप आनंद झाला भेटून तुमच्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी माझी प्रश्न चालू करतो.

*१)लो. टिळक यांनी सार्वजनीक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती यामागे त्यांचा जो हेतू होता(जाती-धर्मांना एकत्रित आणण्याचा) तो हेतू पूर्ण झाला का ? याबद्दल तुम्हाला काय वाटते?*

-लोकमान्य टिळक यांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा जो हेतू होता त्याचं कारण अस होत की सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित यावं आणि संघटीत होऊन स्वातंत्रेची चळवळ उभी करता यावी. मी गेली कित्येक वर्षांपासून, दरवर्षी येऊन बघत आहे की माणूस दिवसेंदिवस जातीवादी आणि धर्मवादी बनत चालला आहे. काही जातीवादी संघटना उभ्या राहिल्या आणि धार्मिक कट्टरता निर्माण केली,यातूनच आतंकवाद पण तयार झाला.आणि आता तर नवीनच काहीतरी प्रत्येक धर्मातील जात त्यांचा नवीन धर्म बनवण्याच्या तयारीत दिसत आहे.लो. टिळकांचा हेतू हा चांगला होता, पण पुढे लोकांना त्या हेतूंची जबाबदारी घेता जमली नाही.या गोष्टीचा विचार करून फार दुःख होतं(कमी आवाजात).

*२)तुम्हाला आराध्य दैवत म्हणून सुपारी ची पण पूजा केली जाते, आणि हे एक सुपरीत गणपती आहे असं म्हणणाऱ्या आणि ते माणवुन घेणाऱ्या लोकांबद्दल तुमचं मत काय?*
-(हसत) मला पण हे बघून हसू येतं, माणूस हा पृथ्वी वरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे आणि काही फसवणारे स्वतःच्या पोटासाठी थोडी बुद्धी लढवतात आणि लोकांना लुटतात कारण बऱ्याच वर्षांपासून त्या जातीतील समाजाने दुसऱ्या समजतील लोकांना conditioned करून ठेवलं की आम्ही जे म्हणतो ते खरं असते किंवा त्यांनी म्हटलं तस नाही एकल तर वाईट होऊ शकते आणि लोकांच्या मनात एक भीती निर्माण केली. आज मोठं मोठी धार्मिक प्रवचन देणारी काही मंडळी लाखो रुपये त्यांची फीस म्हणून मानधन घेते आणि थोडी फार दान करते,आणि ते दान पण असं की त्यातून सुध्दा त्यांना परत काही फायदा होईल आणि लोकांना असं वाटत की आमचे महाराज खूप दान करतात. आजच्या काळात हा एक चांगला धंदा बनला आहे.

*३)आजकाल देवाच्या नावावर पैसे कमावण्यासाठी कोणी पण महाराज बनण्यासाठी निघत आहे आणि भरपूर पैसे कमवत आहे ?*
- हो,मी हे निरीक्षण केले आहे.जस की मी बोललो एका समाजाने लोकांना conditioned करून ठेवले कदाचित या गोष्टीचा फायदा घेतला जात आहे.आणि महत्त्वच म्हणजे अशावेळेस स्त्रियांना लक्ष्य केलं जातं अशाच कारणांमुळे समाजात स्त्रियांचं शोषण वाढत चाललं आहे. मी बघत आहे देवाच्या नावावर किंवा त्या देवाचा प्रचार करून स्वतः उभा केलेले मठ किंवा मंदिर याबद्दल बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात आणि लोकांच्या भावने बरोबर खेळ करतात, आणि ज्या वेळेस ते मठ मोठं होत त्याला जास्तीतजास्त मानधन मिळतो त्यावेळेस तिथला मुख्य पुजारी हा फक्त मोठ्या माणसाला म्हणजे पैशाने मोठे असलेल्या लोकांना जवळ बसवतात आणि बाकीच्या भक्तांना दूर ठेवतात हे सुद्धा पैशासाठीच होतं.

*४)प्रत्येक मोठ्या मंदिरांना भरपूर दान येते ते दान तिथले महाराज आणि ट्रस्टचे मेंबर्स खातात,त्याचा वापर कसा केला पाहिजे ?*
-पहिली गोष्ट देवळातल्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव नसतो हे समाजाने मान्य करायला पाहिजे.लोकांची भक्ती आहे ते जातात योग्य आहे मंदिरात शांतता भेटते आणि मनाच्या शांती साठी मंदिरात जायला हवे.ठीक आहे भक्त आपल्या भक्तीने दान करतात तर त्याचा वापर योग्य तो केला पाहिजे.आज एवढे श्रीमंत धार्मिक स्थळ असून काही लोक उपाशी झोपतात,जर पैशाचा वापर योग्य केला तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवता येईल,याप्रकारे एकच समस्या नाही तर भरपूर काही समस्या सुटतील पण पुन्हा तिचं गोष्ट येते की हे लोक देवाचा वापर स्वतःचा धंदा करण्यासाठी करत आहे.एकच अपेक्षा आहे, समाजाने असं गृहीत धरू नये की आमच्या समस्या देव सोडवतील,देवाने(निसर्गाने) माणसाला एवढं सक्षम बनवलं आहे की तो त्याच्या सर्व समस्या सोडवू शकतो.

*५)स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांवर होणारे अत्याचार याबद्दल काही मत मंडाल का??*
-प्रत्येक आपल्या सोबतच्या व्यक्तीला एका माणसाच्या दृष्टिकोणाने बघितले तर नक्कीच स्त्री पुरुष समानता असेल. पण हे ऐकून दुःख झाले की आणखी पण स्त्रियांवर अत्याचार होतात.स्त्रीयांना कमी लेखल जाते.खूप दुःख होते जेंव्हा ऐकतो की स्त्री भ्रूणहत्या सारख्या घटना घडतात,दुःख होतं की ज्या दगडाच्या देवाची पूजा करता आणि त्याच मंदिरात बलात्काराच्या घटना घडतात.

*६)गरिबी,बेरोजगारी आणि राजकारणी लोकांकडून सत्तेसाठी होणारी सामान्य माणसाची फसवणूक,यावर सामान्य लोकांनी काय करावे?*
-आमच्या पक्षाला निवडून द्या आम्ही तुमचा विकास करू हे आता छळ करणार धोरण वाटत आहे.तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण द्या जमत नसेल तर  औपचारिक,बेसिक शिक्षण देऊ शकता जेणे करून त्यांची गरिबी दूर होईल.व्यवस्थित नौकरी देऊ शकत नाही तर त्यांना आहे त्या क्षेत्रात व्यवस्थित पैसा द्या आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा.
बेरोजगारी कमी करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे.युवकामध्ये एक learning attitude निर्माण करण्याची गरज, कोणत्या पण गोष्टीत नवीन शिकण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे.


समाज मला आजपर्यंत खूप दुःखी करत आलं आहे,अपेक्षा आहे पुढच्या काही वर्षात समाज स्वतःला बदलून घेऊन आणि प्रत्येकाला एका मानवाच्या दृष्टीने बघेल.
वर्षातून एकदा माझी जागोजागी मूर्ती ठेवून पूजा करण्याची गरज नाही अपेक्षा आहे तुम्ही समाजाला सोबत घेऊन पुढे यशस्वी व्हावे.
(एवढं बोलून बाप्पा दुःखी 😔होऊन गायब झाले)..
*===========================*

सानप बालाजी,बीड.

           गणपती बप्पा खूप वर्षानंतर या वर्षी जरा जास्त सुखाने आले कारण त्यांची दरवर्षी ज्या मुन्नी बदनाम, नाचायला लागली शालू, अश्या कर्णकर्कश आवाजाने त्यांची जी एन्ट्री व्हायची, आणि त्या मिरवणुकीत तथाकथित भक्त फुल्ल होऊन डान्स करायचे  त्या djवर यावर्षी कोर्टाने बंदी आणलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी dj वाजवला गेला नाही. त्यामुळे बप्पा काही प्रमाणात का होईना खुश नक्कीच असतील.
            (मी काही djच्या विरोधात नाही पण ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा जरा बाजूला ठेऊन विचार करूया देवासमोर, थोर व्यक्तीसमोर कसलेही अर्थहीन गाणे लावून नाचणे योग्य आहे का...?)
           बऱ्याच ठिकाणी बाप्पासमोर मंडळाचे सदस्य म्हणवून घेणारे कार्यकर्ते बऱ्याच वेळा दिवसभर पत्ते खेळत बसायचे त्याचे प्रमाण देखील खूप ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येते. असेच  हे प्रमाण वरचे वर कर कमी व्हावे अशी बाप्पा चरणी प्रार्थना.
           आता जो गणपती उत्सव चालू आहे तो पाहून माझ्याच मनाला कधी कधी  प्रश्न पडतो की टिळकांनी खरंच याच गोष्टीसाठी गणपती उत्सव चालू केला का...?
           टिळकांनी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येण्यासाठी/मिळून मिसळून वेगवेगळे कार्यक्रम साजरे करावेत यासाठी या गणेश्योस्तव चालू केला होता. पण आता सध्या *एक गाव एक गणपती* ऐवजी एक गल्ली 4-5 गणपती अशी परिस्थिती आहे.
           गणपती बाप्पा बसवायचे असतील तर त्यापासून प्रदूषण होऊ नये असे इको फ्रेंडली बाप्पा बसवावेत,
           गणपती बाप्पा बसवायचे असतील तर प्रत्येकाच्या मनात बसवावेत,
           गणपती बाप्पा बसवायचे असतील तर प्रत्येकाने आपल्या मुलांच्या मनात आईवडिलांना प्रदक्षिणा घालणारे बाप्पा बसवावेत म्हणजे म्हातारपणी आपली वृद्धाश्रमात होणारी रवानगी तरी टाळता यावी.
           बाप्पा बसवायचे असतील तर आपल्या मनात मनात बसवून प्राणिमात्रांचे रक्षण करावे.आणि जाता जाता बाप्पाना दोन वचन देऊन पठाऊया,
          *1) *मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही आणि करू देणार नाही.*
          *2) बाप्पा तुम्ही गेल्यानंतर मी माझा परिसर स्वच्छ ठेवील, आणि सर्वाना परिसर स्वच्छ ठेवण्यास भाग पाडील.*
          म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर तर येतीलच पण पाऊस, आनंद, हर्ष घेऊन येतील.
*==============================*

संदिप बोऱ्हाडे, वडगाव मावळ, पुणे
   लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकत्रीकरणासाठी, सर्व भेद विसरून एकत्र येणाऱ्या समाजाची ताकद निर्माण व्हावी, त्या ताकदीने समाजाला एक विधायक दिशा मिळावी, समाजाचे प्रबोधन व्हावे आणि अशा अनेक अर्थानी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव सुरु केले..!!
काय दिसते आजच्या आमच्या या गणेशोत्सवातून...??
इथे टिळकांचे फक्त नाव घेवून आमच्या श्रद्धेचा बाजार मांडला जातो..

    आपणही त्यांचं अनुकरण करीत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करायला लागलो, पण आपण त्यातलं सार्वजनिकपण जपलं का? आलो का आपण एकत्र? आणलं का आपण समाजाला एकत्र?
ज्या उद्देशाने ह्या भक्तीच्या उत्सवाची सुरुवात झालेली तो उद्देश जरासा तरी कुठे साध्य झालेला दिसला का हो?

   समाज एकत्र येण्यासाठी सुरू केलेल्या ह्या उत्सवाने आज मात्र खूपच गलिच्छ रूप घेतलेलं दिसून येतंय. गल्लीबोळात स्वतःची मंडळे निर्माण करून गल्लीबोळात राजे निर्माण केले गेलेत. कोणी इकडचा राजा तर कोणी तिकडचा राजा, आणि आपला राजा इतरांपेक्षा वरचढ दाखवण्यासाठी काय ती स्पर्धा? एकत्र यायचं सोडा, पण इथे तर सगळ्याच गोष्टींची वारेमाप उधळपट्टी करून जो तो दुसऱ्या मंडळापेक्षा आपला गणपती कसा मोठा ह्याचं मार्केटिंग करायला लागलाय.

     ह्याच तथाकथित मंडळांनी घोषित केलेल्या राजांसाठी दोन दोन दिवसांच्या रांगा लागायला लागल्या..घरातही तोच, दारातही तोच आणि चराचरातही तोच असून देखील केवळ ह्या राजाचं रूप किती देखणं आणि ह्याचं मंडळाचा राजा कसा नवसाला पावतो ह्या चर्चा ही सर्वदूर पसरवल्या. मग नवसाची रांग वेगळी, दर्शनाची रांग वेगळी, सोनं चांदी दान करायचं असेल तर ती रांग वेगळी, पैसे मोजून मिळणाऱ्या VIP पासची रांग वेगळी.
अरे..... म्हणजे हा धंदाच सुरू केला त्याच्या नावाने. समाज एकत्र यायच्या ऐवजी ह्यातून वाढलेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेची दरी मात्र प्रकर्षाने जाणवायला लागली. मजल तर तेव्हा गेली जेव्हा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस उपयुक्तांनावर हात उगारला सर्वांनी ही बातमी पाहिली असेलच..जो पर्यंत श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक न कळणारे, स्वतःला राजाचे भक्त म्हणवणारे बिनडोक, अंधश्रद्धाळु आहेत तोपर्यंत असेच सुरू राहणार. घरात आई बापासारखे दैवत असून बाहेर जाऊन अंधश्रद्धा पोटी स्वतःला त्रास करणे हे खूप वाईट आहे.

      मी फक्त टीका नाही करत पण जे लिहितोय तेच वास्तव आपणाला सुद्धा दिसत असेलच..भ्रष्ट राजकीय नेत्यांची ही मंडळे, त्यांच्या भ्रष्ट पैशाच्या देणग्या, केवळ मनोरंजन साठी होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी हजेरी लावणारे हे संस्कृतीशून्य कलाकार.. मिरवणुकामधून दारू ढोसून अचकट विचकट नाचणारे मंडळाचे युवा कार्यकर्ते..रात्री त्या गणपती समोर चालणारे जुगाराचे पत्त्याचे खेळ..ह्या अशासाठी गणेशोत्सव असतो ...?? कुठून येतो हा पैसा..?? अशा पैशाने त्या नसलेला गणेशाची केलेली पूजा आणि अशा उत्सवाचे काय होईल.?? जल्लोष कोणत्या प्रकारचा असावा हे लोकांना कळायला हवं. गणपती समोर कोणी DJ लावत का? हीच संस्क्रुती आणि परंपरा आहे का? समोर देव देवाला बसवायचं आणि त्याच्या समोर वाटेल तस दारू ढोसून अश्लील गाणी लावून नाचायचे याचे भान आहे का लोकांना?

   अजून सांगायचं तर काही विधायक व सामाजिक उद्दिष्टे जोपासण्यासाठी सुरू केलेला हा उत्सव आपण मोठ्मोठ्या आवाजातल्या धांगडधिंगा पर्यंत पोहोचवला. पर्यावरणाला हानी पोहोचवत कानठळ्या बसवणारा आवाज... त्यावर सूरु असलेली अचकट विचकट गाणी आणि त्यावर आपलं भान हरपून नाचणं.. नक्की काय करतो आहोत आपण ह्याची आपल्याला ही तरी जाण आहे ना?
आणि ह्यावर कहर म्हणजे तो कणाकणात असूनही आपापल्या मंडळांना श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्याला दिलेलं उंचच उंच रूप..
त्यातून कधीमधी होणारे अपघात, विसर्जनाच्या वेळी होणारी हेळसांड... विसर्जनानंतर उरणारे भग्न अवशेष...

   या उत्सवामधून समाजाला नक्की कोणती दिशा मिळते..? समाजाचे नक्की कोणते प्रबोधन होते..??
हे गणेशोत्सवाचे भरकटलेले रूप पाहताना, आमचा समाज आणि युवक त्या मागे धावताना पहिले की मनाला खूप वाईट वाटते..बाकी आत्ता काहीजण येतील म्हणतील की आमच्या संस्कृतीवर टीका करतो आमच्या धर्मावर टीका करतो पण मी त्यांना सांगू इच्छितो की हेच सत्य आहे आणि जर सत्य टीका असेल तर त्यांनी तसही समजावे..
*=============================*

समीर वि.सरागे,नेर जि. यवतमाळ

माझे नाव  श्री गणेश भगवान शंकराचा द्वितीय पुत्र मला बुद्धिची देवता देखील म्हटल्या जाते. तसे माझे विविध १२ नावे आहेत यातील गणेश हे नाव सर्वात प्रचलित आहे.

 जेव्हा मि आणि माझा भाऊ कार्तिक  आमच्या मध्ये  माझे वडील अर्थात भगवान शंकरानी  पैज लावली की, जो सर्वात आधी पृथ्वीला प्रदक्षिणा  मारेल तो माझा सर्वात लाड़का पुत्र अशी घोषणा भगवान शंकरानी केली. मि लट्ठ असल्याने कार्तिकच जिंकेल हे सर्वाना माहिती होते कार्तिकने पृथ्वीला प्रदक्षिणा मारन्यास सुरुवात केली।  परंतु मि माझ्या आई वडिलांना च प्रदक्षिणा घालन्यास सुरुवात केली,  यावर मि भगवान शंकर आणि माता पार्वती अर्थात माझे आई वडील यांना उत्तर दिले की या पृथ्वीवर असा कोणीच व्यक्ति  नाही ज्याला आई-वडील नाही आणि  म्हणून मि आपल्या भोवती प्रदक्षिणा घातली. यावर भगवान  शंकरानी मला आशीर्वाद दिले. व तूच माझा सर्वात लाड़का पुत्र घोषित केले.

हे झाले माझ्या बद्दल.

. हिंदू संस्कृती मध्ये 33(कोटी) प्रकारचे देव आहेत यात मला सर्वात  मानाचे प्रथम स्थान आहे कोणत्याही शुभ कार्य किंवा  प्रसंगाची  सुरुवात ही माझ्या पूजनाने होते. मि नेहमी मूर्ती रुपात सर्वत्र राहु शकत नाही म्हणून माझ्या एवजी सुपारी ठेऊन  तिची पूजा केली जाते.

अलीकडे दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मि प्रत्येकांच्या  घरी भेटिला येत असतो. माझ्या येण्याची  जय्यत तैयारी केली जाते मंडप उभारले जातात  घरोघरी सजावट केली जाते इतके की बरेच जन माझ्या येण्याची वाट आतुरतेने बघत असतात. जेव्हा मि चतुर्थीला येतो तेव्हा जनसागर माझ्या दर्शनासाठी येतो. मग
रोज माझी नित्य नियमाने पूजा अर्चा करतात, हार फूल वैगरे  वाहतात वैगरे माझ्या नावाने अन्नदान वैगरे होते जी खुप छान परंपरा आहे. भुकेल्याला अन्न देणे हे प्रत्येक धर्मात संगीतलेलेच आहे. सर्वाना अन्नदान शक्य होत नाही म्हणून ते आप आपले अल्प योगदान देत असतात. माझ्या करिता सर्वच सारखे आहेत मि कधीही जाती भेद ,उच्च नीच , काळा - गोरा , गरीब -श्रीमंत वैगरे भेदभाव केला नाही सर्वच माझी लेकरे आहे. जे मला पूजतात , मानतात ते आणि जे मला मानत नाही , पूजत नाही, माझ्या वर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणजे पक्के नास्तिक आहे ते देखील मला प्रिय आहेत. शेवटी ति माझिच लेकरे आहेत.  मि जरी निर्गुण निराकार आहे.  मला आकार नाही परंतु माझ्या शरीराचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला माझ्या प्रत्येक अव्यवाचे महत्व कळेल!

माझ्या पोटाला उदर अर्थात लंबोदर म्हटल्या जाते याचा अर्थ माझ्या उदर म्हणजे सर्व चराचर श्रुष्टि समावलेली आहे. माझे मस्तक म्हणजे ब्रम्हांड होय माझे डोळे सूक्ष्म तीक्ष्ण दृष्टि चे प्रतीक आहे, तसेच माझी सोंड ही महाबुद्धित्वाचे प्रतीक आहे.मला बारा विविध नावाने देखील  ओळखल्या जाते.
असो

जेव्हा गणेशोत्सव दरम्यान  १० दिवस हे धार्मिक उत्सव, आनंद  आणि प्रसन्नतेचे  चे दिवस असतात सर्विकडे रोशनाई वैगरे असते माझे मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते. परंतु या दरम्यान मि बरेच लोक अशे बघतो जे माझ्या उत्सवला केवळ मनोरंजन म्हणून बघतात  कर्कश आवजात DJ/ Dolby साऊंड वाजवीने ,नाचने वैगरे यामुळे आपण ध्वनि प्रदूषण करत आहो आणि याचा त्रास आपण आपल्याच लोकांना देत आहो याची जाणीव असु द्या. माझ्या दर्शना करिता मंदिरात येताना आपली वाहने अस्तव्यस्त न लावता एका विशिष्ट अंतरावर लाववी जेने करून इतराना  वाहतुकीस अडथळा होणार नाही.
 तसेच मला वाहिलेली फुले हार ही नर्माल्य कलशात टाकून तिची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच आनलेली साहित्ये काम झाल्यावर  अस्तव्यस्त  न फेकता कचरा पेटितच टाकने मला अभिप्रेत आहे. आणि जमा झालेली वर्गनी ही कोणत्याही समाजिक कार्यात उपयोगात आनावी जेने करून या उत्सवाचे खरे स्वरूप आणि महत्व अजुन द्विगुणित होईल. व याचा मुख्य उद्देश समाजात पोहचन्यास मदत होईल. केवळ माझी पूजा अर्चा केल्याने मि पावेल असे नाही तर तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचे  सामाजिक कर्तव्य जरी  पाळलीत तरी ही देखील माझ्या करिता  एक मोठी भक्ति आणि सत्कार्यच  होईल.

१० वा दिवस मला माझा भक्ताना निरोप देण्याची वेळ या दिवशी मला निरोप देण्याची जय्यत तैयारी करण्यात येते सर्व भक्तकड़ून मि निरोप स्वीकारत असतो आणि त्यांना आशीर्वाद रूपाने सुख समृद्धि देत असतो माझ्या जाण्याने सर्वच भक्तगणाचे डोळे पानावलेले असतात कारण ते माझ्यावर खुप आदर आणि प्रेम करतात . मला देखील त्यांना सोडून कुठे जायचे असते परंतु जसे तुम्ही आयुष्यात येता आणि चार दिवस झाले की जगाचा निरोप घेता अगदी माझे देखील तसेच आहे.  तुम्ही मनुष्य आयुष्य जगता परंतु मि येतो तेव्हा हे १० दिवस तुमच्या  करिता उत्स्व, समृद्धि आणि आनंद म्हणून घेऊन येतो


पुढच्या वर्षी मि जेव्हा आपल्या भेटिला  येईल तेव्हा मि आपल्याला सांगितलेल्या या महत्वाच्या बाबी आपण सर्व भक्तगण याचे योग्य पालन कराल आणि धार्मिक उत्सवा सोबतच  आपण आपली सामाजिक जबाबदारिहि तेवढ्याच ततपरतेने पार पाडाल  अशी मि अपेक्षा करतो
चला आता मला  आपणास सोडून जाण्याची वेळ आली आहे कारण आता मि समुद्राच्या / तलावाच्या आत शिरन्यास तयार आहे.

तुमच्या सोबत गप्पा मरण्यात १० दिवस कसे गेले कळलेच नाही.

माझी आठवण असु द्या तुम्ही मला  या उत्स्वच्या  माध्यमातून दिलेल्या अमूल्य मान सनमाना, भेट वस्तु दिल्या बद्दल मि आपला आभारी आहे.

चला तर मग भेटुया पुढल्या वर्षी

*आपला गणपती बप्पा*
*===================================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************