साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

साहित्य: आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून जाणार आहोत?

विषय क्र. 2:- साहित्य: आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून जाणार आहोत?

Image result for marathi literature

अनिल गोडबोले.सोलापूर

Image result for marathi नाटक
मराठी मध्ये ज्याला "वारसा" असा शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे की, मागच्या पिढीकढुन पुढीला मिळालेली देणगी.
सर्व बाबतीतच आपण पुढे जे काही देणार आहोत त्यात चांगलं किती आणि वाईट किती याचा हिशोब करू नये इतकं भयानक वास्तव समोर दिसत आहे. प्रदूषण, पर्यावरण ऱ्हास, कमी दर्जाचे जीवन आणि समस्या तर आहेत. त्यावर उपाय योजना देखील आहेत.
पण साहित्य निर्मिती बद्दल खरच चित्र समाधानी आहे का? यावर विचार करायला पाहिजे. साहित्य निर्मिती मध्ये आघाडीवर आहे... मराठीतील कथा, ललित आणि औचित्यपूर्ण लेख. काही केखक आहेत जे अतिशय ओघवत्या भाषेत लिहितात परंतु पु.ल. , किंवा व. पु. यांनी साधलेले प्रभाव आताच्या लिखाणातून येताना दिसत नाही.
कविता आणि नाटकं यांचा दर्जा वाढला पाहिजे नाहीतर या पुढच्यापिढी मध्ये स्तर अजूनच ढासळून जाईल. साध्या सध्या वाक्या मधून अतिशय योग्य व अर्थपूर्ण शब्द रचना होताना दिसत नाहीत.
कादंबरी आणि प्रेरणात्मक लेखन  व त्याचा वाचकवर्ग एवढा काही प्रभावित दिसत नाही. त्याचंच प्रतिबिंब म्हणजे आशय नसलेले चित्रपट. काही चित्रपट, नाटक चांगली आहेत पण ती नियमाला अपवाद असल्या सारखी वाटतात.
वाचक वर्ग, प्रेक्षक कमी झाला आहे किंवा आपण जे देऊ, लिहू, करू ते समाजात सहज ओढलं जाईल.. अस साहित्यकारांना वाटत असेल तर तो भ्रम आहे.
कॉमेडी शो ना चलती आहे सध्या पण बाकीच्या मालिका, त्यातील पात्रे व कथानक या मध्ये कुठेही ताळमेळ दिसत नाही.
सर्व ठिकाणी चित्र नकारात्मक नाही. पण ते अजून जास्त प्रमाणात आणि दर्जेदार साहित्य निर्मिती मध्ये बदलले गेले पाहिजे.
अभिजात भाषेचा दर्जा तर सोडा.. साधी भाषांतरित पुस्तके देखील न समजण्यासारखी असतात. त्या पेक्षा मूळ भाषेतील पुस्तक जास्त समजतात.
आपण मराठी टिकवली पाहिजे, वाचवली पाहिजे, नाहीतर पुढची पिढी दर्जेदार शिक्षण व मराठीतून आनंद कसा घेतील?.. हा एक प्रश्नच आहे.

अर्चना खंदारे,हिंगोली.

 जन्माला आलेल्या  प्रत्येक व्यक्तीला  समाजाचं  देणं  असते.प्रत्येक व्यक्तीवर  समाजाचं ऋण असते आणि ते फेडायचं असेल तर साहित्य सारखी  दुसरी  अनमोल  वस्तू  नाही.आणि हि अनमोल वस्तू येणाऱ्या पिढीला  देणे चांगले व महत्वाचे आहे.
आज एकविसाव्या शतकामध्ये आपण कित्येक पूर्वीच्या शतकाचा अभ्यास हा साहित्यामुळेच  करू शकतो  आहे.तथागत गोतम बुद्ध यांचे विचार, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांची  राजनीती,अनेक महान संत आणि शाश्त्रज्ञ  इत्यादी  यांची ओळख हि आपल्या ला साहित्यामुळेच झाली आहे.या ( पूर्वीच्या ) पिढीने अतिशय  अनमोल अशी साहित्य नावाची  रत्नाची  खान  नंतर च्या पिढीसाठी  सोडून  गेल्या मुळे च क्रांतीसूर्य  आणि क्रांतीजोति सावित्रीबाई जोतिबा फुले,राजर्षी  साहू  महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे  आणि इत्यादी सारखे अनेक संत, कवी आणि लेखक  निर्माण झाले..
आणि आज आपली पिढी या महान नायकांनी  सोडून गेलेल्या  साहित्याचा  आधार घेऊन आज समाजामध्ये पुढे  जात आहे .आणि याचा एक आदर्श आजच्या पिढीला घेणे  अतिशय महत्वाचे आणि काळाची गरज बनले  आहे..कारण आज ची पिढी हि तंत्रज्ञाचा खूप मोठ्या प्रमाणावर  वापर  करीत आहे आणि लिखित  साहित्याचा खूप कमी वापर करीत आहे.त्यांना हे लिखित साहित्य वाचन रटाळवाणे  वाटत आहे.त्यामुळे आज च्या या पिढीमध्ये वाचनाची गोडी  निर्माण करणे फार गरजेचे  आहे.
   माझ्याच घरचा  एक किस्सा  मला इथे सांगावासा  वाटतो आहे.माझ्या मामा  ची दोन मुले आहेत एक डि.फार्मसी प्रथम  वर्षात  आहे,तर दुसरा  मायक्रोबायोलॉजी  ला आहे.दोन दिवस  पूर्वीच सुट्टी  आहे म्हणून घरी आले आहे.संध्याकाळी सर्वजण एकत्र बसले  असता,सहजपणे वाचनाचा विषय निघाला.मी सहज मामा ला विचारले  कि,मामा तुम्ही मुलांना  पुस्तक वाचन करू नका  असे सांगितले आहे का ? त्यावर मामा तर शांतच  बसले.पण, माझ्या त्या दोन्हीही भावांनी  मला सांगितल,ताईडे आम्ही  हातामध्ये  पुस्तक घेतले  नाही म्हणजे आम्ही वाचन केले नाही याचा अर्थ असा होत नाही,तर आम्ही आमच्या  मोबाईल वर  वाचन केले आहे असे त्यांनी सांगितले...
यावर मामाकडून आणि माझ्याकडून त्यांना चांगलीच  शाबासकी मिळाली....
अशाप्रकारच्या घटना कित्येक घरामध्ये  घडत  आहेत अस्या प्रसंगांना  आळा घालण्याचे  काम आज च्या वडीलधाऱ्या  व्यक्तीने  करणे गरजेचे आहे. साहित्याचा वारसा  पिढ्यानपिढ्या  चालत  ठेवणे हे आपले कर्तव्य  आहे. आणि प्रत्येक पिढीसाठी  नाविन्यपूर्ण  साहित्य सोडून जाणे  आणि त्या पिढी चा कार्यकाळ  जागरूक  करून तो अजरामर  ठेवणे होय..
विचार ग्रुप हा नवीन लेखक आणि कवी घडविण्याचा  नाविन्यपूर्ण उपक्रम  तसेच अविरत  प्रयत्न  करीत आहे आणि या ग्रुप च्या माध्यमातून  मी चांगले लिखाण  करण्याचा  प्रयत्न करीत आहे..सर्वजण मिळून एक संकल्प  करूया  येणाऱ्या नवीन पिढीसाठी साहित्याची  एक आगळीवेगळी  भेट देऊन  जाऊया.....

संगीता देशमुख,वसमत

Image result for marathi नाटक
सगळ्याच बाबी काळानुसार कूस बदलत असतात. साहित्यही याला अपवाद नाही. साहित्यात  मधल्या काळात विद्रोही साहित्याने साहित्य क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. पण आज उच्च शिक्षण घेऊनही विद्रोही साहित्य हे अत्यल्प प्रमाणात निर्माण होत आहे. पूर्वीचे साहित्य हे त्या लेखकाची स्वतंत्र ओळख असायची. एका साहित्यिकाची संकल्पना दुसऱ्यालेखकाच्या साहित्यात आढळत नसे. परंतु आज  सोशल मिडियामुळे एकमेकांच्या संकल्पना तर सोडाच पण एकमेकांच्या चक्क साहित्याची चोरी होताना दिसते. त्यामुळे साहित्याला हवी तशी धार प्राप्त होत नाही. जवळपास जास्तीत जास्त साहित्य एकाच धाटणीचे दिसून येते. दोन चार शब्दांची जुळवाजुळव जमली तरी स्वतःला साहित्यिक,लेखक म्हणून मिरवून घेण्यात ही पिढी अव्वल आहे. परंतु साहित्यातील नवरस,अलंकार,वृत्त,छंद असा  अनमोल खजिना लुप्त होत आहे. आज दिवसाकाठी शेकडो साहित्य प्रकाशित होत आहे. एक वर्षच काय पण काही महिन्यात लिहायला सुरुवात करून स्वतःची पुस्तके बाजारात येत आहे.  परंतु यात नवतरुणांचे  होणारे पदार्पण नक्कीच आशादायी आहे. काहीवेळा अभिव्यक्ती होणं हे महत्वाचं असतं त्यावेळी ते  नियमानीच बांधील असणं महत्वाचे नसते.
पण येणाऱ्या साहित्यिकानी आपली  अभिव्यक्ती जपतानाच त्याला काही साहित्यिक मूल्यही प्राप्त होते की नाही,याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजचे साहित्य हे उद्याच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत असते. म्हणून उद्याच्या पिढीला कोणती दिशा द्यायची,हे आजच्या साहित्यिकांनी ठरवायला हवे.

किरण पवार,औरंगाबाद

सध्याच्या तरूणाईच साहित्य केवळं आपल्याला येतयं; एवढच मर्यादित नजरेतून पाहणं असं झालयं. मुळात साहित्याचा दुरवर बऱ्याचदा गंधही नसतो पण आपण टेंभा मात्रा अलगद लावून मिरवतो. साहित्याला अभिरूची असते, वेगळेपणातून उठावदारतेचा रंग असतो, अतिविशेषणांची बऱ्याचदा कादंबऱ्यातून जोड असते. मनातून भावलेलं न कल्पना करू शकलेलं जग उभं करण्याची ताकद ही साहित्यात असते. साहित्याला बऱ्याचदा व्याकरणात अडकवण्याचे प्रयत्न सध्या होतात पण बहिणाबाई चौधरी वा इतर लेखक घ्या त्यांनी जर कधी व्याकरणाचा विचार केला असता तर उत्कृष्ट कविता तयार झाल्या असत्या का...? प्रत्येक नवसाहित्यिक म्हणे, प्रेमापासून प्रवासास सुरूवात करतो पण मुळात सुरूवात मध्यापर्यंत आली तरूणाईला प्रेमचं विषय चघळायचा असतो. आज मराठी साहित्य सोडून इंग्रजी आणि हिंदी साहित्याचा जर विचार केला तर महत्वाचं असतं "प्रेम". हमखास चेतन भगतचं कौशल्य अपार आहे पण दरवेळी तो त्याचे उद्दिष्ट पोहोचवायला प्रेमाचा सहारा घेतो; याच कारण आपली प्रेमाप्रती असलेली अतिएकनिष्ठता. असे बरेच लेखकांची उदाहरणे देता येतील. पण आज मुळात मराठी साहित्य महाराष्ट्रातला तरूण खरचं किती उत्साहाणे वाचतो, हेदेखील विचारात घेणे महत्वाचे आहे. उत्तम कांबळेंच्या मनाला छेदून जाणाऱ्या लेखातली ताकद इतर कुठल्या गोष्टीत मिळते का...? साहित्य म्हणजे, अवघड काहीतरी खूप विचाराअंती लिहलं असं नाही. ते कागदावर योग्य स्वरूपात उतरलं जावं; हीच अपेक्षा असते.
महाराष्ट्रातील आपलीच तरूणाई आज इंग्लीश/हिंदी पुस्तके खरेदी करून आणि मराठी पुस्तके पी.डी.एफमधे वाचतात. वर सार्थ अभिमानही असतो. पण मुळात मराठी साहित्यानं जे "फिटे अंधाराचे जाळे", "नाच रे मोरा", "नटसम्राट", अशा विविधांगी साहित्याची सरं येते का इतर कुठे...? बऱ्याचवेळा साहित्यकार साहित्य लिहताना अनुभवानचा, तत्कालीन परिस्थितीचा, राजकीय हालचालींचा अशा प्रत्येक सूक्ष्म बाबींचा विचार करतो. थोडक्यात साहित्य छोट्याला रंगवून त्याची मैफील सजवून ते आपल्यापर्यंत पोहोचवतं. पण सध्या लिखाणात कुठेतरी ती भावना हरवत चालली आहे ते केवळ स्ट्रेट फॉरवर्ड मानसिकता होत चालल्यामुळे. त्यामुळे साहित्यात नेमका कोणता खास ठसा आपण पुढच्या पिढीसाठी सोडून जाणार हा खरचं एक मोठा प्रश्नयं. मृत्यूंजयातलं वा युगंधरेतलं (युगंधरा- डॉ.सुमित्री क्षेत्रमाडे) पात्र रंगवायला साहित्यकाराचं खर कसबचं लागतं.

राजश्री ठाकूर , मुंबई .

Image result for stoned age CAVES PAINTINGS
बुद्धी व मन यांना चालना देऊन कृतीत परावर्तित होण्याची निकड भासाविणारे साहित्य म्हणजे
' साहित्य ' अशी साहित्याची  सर्वसाधारण व्याख्या होऊ शकते.
अश्मयुगीन गुंफेतील चित्रांपासून ते फेसबुक पोस्ट , स्टेटस अपडेट पर्यंत सगळ्याचा समावेश साहित्यात होऊ शकतो.    आदिमानवाने फक्त साहित्यनिर्मिती कडे ध्यान दिले .. पुढली पिढी , हस्तातंरीत करणे वगैरे प्रकार नाही , जंगलातल्या झऱ्यासारखे . त्या साहित्याला वहात रहाणे ठाऊक . प्राशन कुणी करेल अथवा नाही याबद्दल सुतरामही चिंता न करणारे .
त्यापुढे लिपी आली , समूहाने राहणारे आले त्याबरोबर सहवासाने येणारी समूह निष्ठा आली , हावभावावरून एकमेकांना जोखणे आले म्हणून मग माझं ते चांगलं हि भावना असलेली माणसे , उत्तम कृती करण्यास माणसे कटिबद्ध होऊ लागली असतील . माझ्या उत्तम कृतीचा भावनिक लाभ माझ्या समूहातील व्यक्तींना व्हावा असे प्रकर्षाने वाटू लागले असेल , कधीतरी दोन समुहांच्या आदान प्रदानात स्पर्धेचा उगम झालेत आणि झऱ्याचे , ' माठ ' झाले .
हे असे झाले हे आजच्या पिढीतल्या आपल्याला कसे बरे कळले ? आजवरच्या साहित्यावरून .
मौखिक भिंत , जमीन , भूर्जपत्रे , कागद ते स्क्रीन आणि पुढे कदाचित स्क्रीनलेस अशा वाहनाने त्या त्या काळातील साहित्याच्या भोयांनी हे आनंदाने वाहून आज आपल्या कराग्रांवर आणून दिले आहे . त्याबद्दल त्या अनंत वाहकांना आदर व कृतज्ञता .
याच पालखीचा पुढला मार्ग पाऊलभारासाठी आपल्या स्कंधांवर आहे , काय हस्तांतरित करू आपण  पुढल्या पिढीला ?
रद्दी की संपदा ? माहिती की ज्ञान ? जाळे की सोपान ? अंधार की कवडसे ?
मला वाटतं आपण पुढल्या पिढीला साहित्यातून निवडण्याचे स्वातंत्र्य देणार आहोत . आपण नसतांनाही सांगणार आहोत त्यांना .. ' विपुल आहे , आपल्या कलाने वेचा ' हे महान , हे निषिद्ध अशी कुठलीच लेबलं न लावता  मोठ्ठ्या लायब्ररीज तुमच्या अंगुळीवर आहेत , नजरेच्या कक्षात , तिथून मेंदूमध्ये काय रुजवावे हे ठरवा .
' आहे ' ' मला मिळू शकत ' हा दिलासा आपण देतोय पुढल्या पिढीला . त्यात आपली जी काही गंगाजळी आहे ती ओतुया .. हि दिंडी जल्लोषात निघू दे , काळाची आणि पिढ्यांच्या कौतुकाची तमा न बाळगता ..

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

विषयाला हात घालताना डोक्यात विचार होता तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या पिढीसाठी काय दिले तर त्यामध्ये बरंच काही आहे संस्कृती, तंत्रज्ञान, साहित्य ई.

असो आता वेळ येते ती आपल्या येणाऱ्या पिढीला अपल्याकडून काय अपेक्षित असेल त्याची. तर मला वाटते जस आपण आजवर जे काही वाचून विचार करण्याची क्षमता मिळवली हे असाच काहीसं साहित्य येणाऱ्या पिढीला द्यायला हवं कारण याच्या बळावरच उद्याचा सामाज टिकणार की तुटनार हेही अवलंबून आहे.

.....हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-2)

🌱 *वि४* 🌿 व्हॉट्सअप ग्रुपवरून
.....हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-2)

(यातील सर्व पुस्तकांचे छायाचित्रे गुगलवरून घेतले आहेत)
            
बालाजी सानप,बीड:
Dr. A. P. J. Abdul kalam यांचे आत्मचरित्र  *wing's of fire*  म्हणजेच मराठीत अनुवादित *अग्निपंख*  आणि एक अमेरिकन तरुण ते एक भारतीय साधू राधानाथ स्वामी महाराज असा प्रवास करणाऱ्या एका *अमेरिकन साधूचे the journey home* हे आत्मचरित्र हे दोन पुस्तके माझ्या मनाची भूक नेहमी भागवत असतात. माझा  जेव्हा केव्हा self confidence  कमी होतो, माझ्यातली negativity वाढायला लागते तेव्हा मी हे दोन्ही पुस्तके वाचत असतो, आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो.
1) *अग्निपंख*
तमिळनाडु मधील रामेश्वर नावाच्या छोट्याश्या गावात एक नावड्याच्या घरी जन्म झालेला एक मुलगा देशातील सर्वोच्च स्थान राष्ट्रपती बनतो आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळवतो.
त्यांचा हा ध्येयवेडा संघर्षमय जीवन प्रवास त्यांनी या पुस्तक रूपाने आपल्यासमोर ठेवला आहे, जगातील जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याच्यामध्ये एक प्रकारची स्फुर्ती, उत्साह, नक्कीच निर्माण होतो हा माझा अनुभव आहे.हे आत्मचरित्र मला संपूर्ण पाठ असून सुद्धा मी  काही लीहू  शकत नाही करण मी जितकं लिहिणार तितकं कमीच आहे....
2) *the journey home*
अशांतीने भरलेल्या या जगात एका अमेरिकन तरुणाद्वारा आत्मशांतीचा आणि संतुष्टीचा शोध या आत्मचरित्रामध्ये दिला गेला आहे, रिचर्ड नावाचा एक अमेरिकन तरुणाने केलेला शिकागो(अमेरिका) ते वृन्दावन (मथुरा)पर्यंतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे...शिकागो ते युरोप व युरोप ते वृन्दावन त्यांनी सुरू केलेली भ्रमंती  तुर्कस्तान,इराण, इराक, अफगानिस्तान, पाकिस्तान मधून जगाची अध्यात्माची राजधनी असणाऱ्या भारत देशात येऊन थांबते, व भगवद्गीतेच्या तत्वनानाने प्रभावीत  होऊन रिचर्ड प्रभूपाद स्वामी महाराजांचा अनुग्रह घेतो व राधानाथ स्वामी बनतो, सध्या महाराज हे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करत आहेत....हा सारा प्रवास वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, हे पुस्तक वाचताना मला 8 तास कसे गेले ते सुध्या काळत नाही.वर्षातून कमीत कमी 2 वेळा ही दोन्ही पुस्तके वाचतो व मनाच्या भुकेला शांत करतो.....
जयंत जाधव,लातूर.
माझ्या आयुष्यात मी नेहमीच वाचन हे ठरवून नाही पण विषयानुरूप करत असतो.सामाजिक कार्ये विषयाचे शिक्षण घेताना व सामाजिक संस्थेमध्ये Adoption-दत्तक विधानाचे,Drug addiction centre -व्यसनमुक्ती केंद्रात व HIV/Aids counsellor म्हणून  कार्यरत असताना वाचन खुप करावे लागते.२००५ साली माझ्या वाचनात प्रा.रवी बापटले यांच्या द्वारे संकलित आरोग्य विषयक माहिती पुस्तक "ईच्छाशक्तीःएक संजीवनी" वाचण्यात आले ह्या पुस्तकातुन मला चांगलीच प्रेरणा मिळाली व तेव्हापासून HIV/Aids पिडितांसाठी पुर्णवेळ कार्य करण्याचे ठरवले ते आजपर्यंत चालू आहे.
महेश देशपांडे,पुणे
खरतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल खुप काही सांगण्यासारख आहे. *खुप* पुस्तक, *विविध* विषयांवर असलेली पुस्तक, आत्मचरित्र, इतिहासपर, वैज्ञानिक, अगदी भयकथा इथपासुन, बालसाहित्य यासह अनेक विषयांवरिल पुस्तके वाचन्यात आली. माझ्याबाबतीत सांगायचं झाल तर, जरी मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरीही, मला छत्रपती शिवरायांवरिल पुस्तकाने मला प्रेरित केले अस मी म्हणेन. कारण , विं. दा च एक काव्य आहे त्यातील ओळ अतिशय सूचक आहे. ती अशी,
*इतिहासाचे घेऊन ओझे डोक्यावर ओझे ना नाचा ।*
*करुनि पदस्थल त्यांचे भविष्य त्यावर वेचा ।*म्हणजे इतिहासातील गोष्टी मार्गदर्शक म्हणून घेतल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्या भविष्याविषयी आखणि केली पाहिजे. संपूर्ण मानवजातिसाठी आदर्श राजा कोणी असेल तर ते म्हणजे आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्यावरील पुस्तकाने मि प्रेरित झालो. बऱ्याच लेखकांची शिवरायांवरील पुस्तके वाचली. त्यातून अनेक बोध घेण्यासारखे आहेत. पण, सर्वांचा विचार करत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द , धमक आपल्या मध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. यालाच सारासार विचार असे म्हणतात. काही लेखक, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील व पुस्तके श्रीमानयोगी, राजा शिवछत्रपती इत्यादी.
आजही सर्वाना आवाहन की, शिवरायांचे चरित्र वाचा आणि फक्त वाचून न थांबता ते अंगिकारण्याचा त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न नक्की करा....
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिनही भाषेमधील पुस्तके वाचलित. मराठीत सगळ्यात जास्त. इंग्रजी भाषेत थोड़े आणि इंग्रजी सुद्धा थोडेच वाचले पण, मराठीची गोडी खुप. चेतन भगत लिखित सर्व पुस्तके One night @ call centr शिवाय. तसेच अर्नब रॉय ई. लेखकांची पुस्तके वाचली.

Manjiri karambelkar:
मला सगळ्यात भावलेलं आणि कायम प्रेरणा देणारं पुस्तक म्हणजे रशियन लेखक बरीस पलेवोय यांचं *एका अस्सल माणसाची कहाणी*
युद्धात आपले दोन्ही पाय गमावलेला एक वैमानिक प्रचंड मेहनत आणि जिद्दीने परत सैन्यात जातो आणि कसा लढतो याचं पूर्ण वर्णन या पुस्तकात आहे.ही सत्यकथा आहे.
सिताराम ढगे,मंगळवेढा:
हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो.
ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही डॉ नरेंद्र जाधव लिखित ...
     हे पुस्तक अगदी अध्श्यासारखं    वाचलं.. ज्या क्षेत्रात असशील त्या क्षेत्रात तू टॉपला असाल पाहिजेस हा त्यांच्या वडिलांचा अट्टाहास ...भले तू चोर जुगारी हो पण अट्टील हो...
      मुलांना शिकवण्याची धडपड   आणि स्व जपण्याची ....शिकवण या सर्व बाबीचा उल्लेख येतो...
      ".खरच पुस्तक मस्तक घडवतात आणि अशी घडलेली मस्तके कुणापुढे नतमस्तक होत नाहीत...."
       
राहुल आनपट,मंगळवेढा
आयुष्यात तुझ्यासारखी नकोय मला
तूच हवीय मला,
साथीला नसली तर चालेल पण,
जगण्याच्या प्रत्येक वळणावरती भेटायला येत ज मला ।
अग कसं जमतं तुला
इतकं सहन करायला
दुसऱ्यांच्या चुकांसाठी जिझायाला ।
होय मित्र हो मी तिच्याबद्दल बोलतो आहे ,जिने माझं आयुष्य तर बदलून टाकलंच पण त्यात स्त्री बद्दल पुन्हा एकदा मनात सन्मानित विचारच ,न मोडणार घर दिल त्या पुस्तकाचं अन तीच नाव  *'श्रावणी'*.
विजया ब्राम्हणकर लिखित पुस्तक *"श्रावणी"*.
होय त्यातील श्रावणी आहेच इतकी कष्टाळू । तिला थोडं मनात घेतलं की माणूस प्रेमात पडल असच तीच वर्णन ।
मला वाटतं प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलांनी वाचायला हवं असं ते पुस्तक ।

या पुस्तकातून शिकलो फक्त
*जगणं काय असतं ?*
*जगायचं कस असतं ?*
दुःखाला सामोरे जाऊन यशाचं गड कशे चढायचे असतात ?
*प्रेम कुणावर करावं ?*
*लग्न करावं तर कुणाशी ?*
या सर्वांची उत्तर मला मिळाली ।
तुम्ही ही वाचा *श्रावणी*

हीच श्रावणी जिचं नाव मी माझ्या कॉलेज च्या बॅग वर 4 वर्ष झालं लिहून ठेवले आहे आणि ते अजून पुसलं गेलं नाही । याचं श्रावणाच्या नावावरून मी मित्राच्या मुलीच नाव *श्रावणी* ठेवलंय ।
धन्यवाद ज्यांनी हा विषय निवडला आणि सुचवला । या विषयाला बोलताना मला १२ वित पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते ।हीच श्रावणी मी पूर्ण वर्गाला सांगितली होती ।
पुस्तक :- *~श्रावणी~*
लेखिका :- विजया ब्राम्हणकर
वैशाली गोरख सावित्री:
मी आठवीत असताना पहिली कांदबरी माझ्या हातात पडली ती होती
महाश्वेता ~सूधा मूर्ती
ह्या कांदबरीनेही मला खूप प्ररीत केले. मला स्वताःकडे एक स्ञी म्हनून नाही तर माणूस म्हनून बघायला भाग पाडले,मूलींना शिक्षण घेने तर जरुरीचं आहेच पण नूसतं शिक्षण घेवून न थांबता स्वताः आर्थिकस्वतंञ होण महत्वाच अशा बर्रयच गोष्टी त्या वयातही माझ्यामनावर ठासून गेल्या . त्याचप्रमाणे आनंद यादव सरांच्या *झोंबीने* ही तेवढ्याच प्रमाणात खंबीर बनवल . आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात की तेव्हा आपण हसणं ही विसरलेलो असतो त्या दिवसात *एकटा जीव सदाशीव *ही दादा कोंडकेवरची कांदबरी वाचून एवडी हसत होती की माझी आज्जी मला विचारायची 'पोरे वेड तर लागलं नाही ना गं' .असचं कादबर्रनीच जगायला शिकवलं ,हसायलाही शिकवलं ,खंबीरही बनवलं .
पण मी ठामपणे म्हणू शकत नाही की एकाच कादंबरीने मला प्रेरीत केलं.प्रत्येक कादंबरीनेच काहीना काही शिकवलेलं आहे प्रेरीत केलं आहे .
सिताराम पवार,पंढरपूर:
आर आर पाटील यांचे"मी कसा घडलो" लहान पुस्तक आहे परंतु खुपचं प्रेरणादायी आहे.यामध्ये त्यांनी आपल्या लहानपणी आलेल्या कटू अनुभवावर कशी मात केली सांगितले आहे.कमवा व शिका या योजनेत काम करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तेव्हा कमवा व शिका योजनेअंतर्गत पगरवढीसाठी त्यांनी प्रा.पाटील सरांना कसे पटवूनदिल हे मनाला चटका लावून जाते.
वक्तृत्व स्पर्धा धेमध्ये भाग घेऊन बक्षीस महत्वाचं नसून त्यात मिळणार पैसे खूप महत्वाचे होते.वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी पेपर दिला आणि त्यातते प्रथम क्रमांक पटकावला.कपडे नसल्याने त्यानी आपल्या वडिलांची जुनी कपडे काढून त्यापासून शर्ट शिवला त्यावेळी ते मनतात"वडील वारल्यानंतर आई जेवढं रडली नाही त्यापेक्षाही जास्त तेव्हा रडली कि जुना वडिलांचेशर्ट कापडवापरले"त्यांनी रोजगार हमी योजनेवरही काम केले, यातून "परस्थिती कशीही येवो आपण धैर्याने सामोरे जावे ही प्रेरणा क्षणोक्षणी मिळत राहते.
वीणा गवाणकर यांच"एक होता कार्व्हर "हे पुस्तक सुद्धा खूपच प्रेरणादायी आहे.

मधुकर लेंगरे:
कोल्हाट्याचे पोर
हे पुस्तक वाचून   मी माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. या पुस्तकाचे वाचन करताना मि समाजातील बऱ्याच पैलूंना जवळून अनुभवले. विचारसरणी कशी आहे त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यातील फरफट होते. हे पुस्तक वाचताना माला माझ्या स्वताची लाज वाटत होती. कि मि एवढे दिवस जे पाहत होतो ते ते सत्य नव्हते. यांना पन समाज का स्थान देत नाही त्याची एवढी हेळसांड करतोय हेच समजत नव्हते
आशितोष तरडे पुणे:
  ‎लहानपणापासून वाचनाची आवड होती म्हणून पुस्तकांशी मी संलग्न होतो पण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आणि प्रेरित करणार पुस्तक वाचनात यायचं अजून बाकी होत.प्रत्येकाच्या वाचनात असं एक पुस्तक नेहमीच येत कि त्यातली एखादी ओळ खूप आवडते व ती ओळ पुन्हा पुन्हा वाचण्याचा किंवा इतरांना ती सांगण्याचा मोह आवारतच नाही.पण प्रत्येक ओळीवर अस्थिर करणारी,भावनिक करणारी,क्षणार्धात डोळे पाणवणारी तर दुसऱ्याच क्षणी त्वेषाने क्रोधीत करणारी,खोल विचारांना उंचवटा देणारी *मृत्युंजय* हि शिवाजी सावंत यांची कादंबरी वाचनात आली आणि मराठीच्या प्रतिभाशाली भाषेचा जणू साक्षात्कार झाला.खर तर कादंबरीच्या पहिल्या पानापासूनच हि मी कधी संपवेन असं वाटायला लागत आणि कळत नकळत जेव्हा तिचा अर्धा पल्ला ओलांडतो तेव्हा ती संपूच नये अस राहून राहून मनाला वाटत.कर्णाच्या जीवनाची परिस्थितीच्या काटेरी कुंपणात गुरफटलेली लक्तर प्रत्येक पानावर उलगडताना आपल्या मनाची गुंतागुंत अधिक वाढत जाते आणि शेवटी लेखक आपल्याला अबोल करून सोडतो...
सौदागर काळे,पंढरपूर:
आपण घरात बसल्यानंतर कोणीतरी खिडकीतून डोकावत राहतं तसंच काही पुस्तक माझ्या मनात डोकावत राहिली.काही पुस्तकं हास्यक्लबला न जाताही मनमुराद हसण्यास शिकवत आली.काही पुस्तकं संस्कारची धडे देत राहिली.तर काही पुस्तकं डोळ्यातून पाणी काढू लागली,मला प्रौढ करू लागली, समाजाबद्दल  चिंता करण्यास भाग पाडू लागली अन स्वतःला चिंतन करण्यास शिकवू लागली.
                             लहानपणापासून पुस्तकासाठी भिकारी बनत आलो.तरीही झोळी रिकामी राहतच आली.अजूनही ती भूक भागू नये व तशी भविष्यात वेळ येऊ नये असं वाटत राहतं.शेवटी पुस्तकाशिवाय जगणं म्हणजे काठीचा आधार घेत जगण्यासारखं, अंधासारखं चाचपडत जगण्यासारखं.
                ‎
      आता इथं एखाद्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे दुसऱ्या पुस्तकांवर  अन्याय केल्यासारखं,दुसऱ्या मित्राला विसरल्यासारखं.
                ‎
    पण ज्या पुस्तकानं मला आठवी किंवा नववीत(२००८) असेल तेव्हा प्रथम पुस्तकाद्वारे रडवलं होतं. एकाच रात्रीत ते उद्या मिळणार नाही म्हणून वाचून काढलं होतं. ते नंतर मला विद्यापीठासाठी अभ्यासक्रम म्हणुन आलं.ते पुस्तकं म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांची " *बनगरवाडी* "
                ‎
    या पुस्तकानं मला काय दिलं तर असा जेव्हा प्रश्न मनात येईल तेव्हा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी शब्द असतील," *या पुस्तकानं मला माझ्या माणसांच्या व्यथाचं गाठोडं दिलं* "
                 
     या बनगरवाडीत मेंढरे राखणारे धनगर, घोंगडी विणणारे सनगर, शेती करणारे कुणबी व भटकंती करणारे रामोशी यांचा समावेश आहे.ही कादंबरी मानव-निसर्ग असा संघर्ष सांगते.म्हणून  ती वेगळी ठरते.
            
      ' _दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो'_ ,असं जेव्हा कादंबरीमधील मास्तर म्हणतो तेव्हा ते वाक्य तेवढ्यापुरत मर्यादित न राहूं देता आपल्याही जीवनप्रवासाच्या कहाणीची सुरुवात करण्यास भाग पाडतं.
              ‎
     या पुस्तकातील मास्तरकडून मला प्रामाणिकपणा,जबाबदारी पार पाडणं, गावाच्या विकासासाठी नि:स्वार्थ झटणं,प्रत्येकाचं काम आपलं म्हणून करणं, सत्य बोलणे यासारखे साधे संस्कार तो न कळत देत राहतो.
            
     ‎" _एका गावात राहून एकमेकांशी भाषा करायची न्हाई ,हे बरं न्हाई ;मास्तर!_ "असं अगतिक होऊन बोलणारा गावचा कारभारी मला समंजसपणा शिकवतो.
             
‎" _पोरं साळत आली तर त्येसनी शिकव,गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस!_ "असा मास्तराला दम भरणारा दादू बालट्या मला समाजातल्या कुप्रवृत्ती व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.
             
  गावातल्या तालमीच्या उद्घाटनासाठी राजा येणार असतो.तालीम बनवत असताना "आयबू" उंचावरून पडतो.बेशुद्ध पडतो.तोपर्यंत राजा गावात येऊन उद्घाटन करून जातो.जेव्हा त्याला जाग येते तेव्हा मास्तराला म्हणतो, " _मास्तर,राजा आला का?_ " उत्तर येत ," _येऊन गेला._ "तेव्हा आयबू रडतो अन त्याच्याबरोबर आपण सुद्धा. तेव्हा त्याला आपण तालमीसाठी काम केल्याची शाबासकी नको असती तर दुरून डोळ्याने " *राजा* " कसा दिसतो ही पाहण्याची इच्छा असते.तीही त्याची अपूर्ण राहते.
             
‎या कादंबरीतील आनंदा,रामा, शेकूबा,नानी, अंजी,काकुबा ही पात्र सुध्दा खूप काही शिकवून जातात.
             
  ‎या पूर्ण पुस्तकात निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे.दुष्काळामुळे बनगरवाडीतील एक एक जण जगण्यासाठी गाव सोडू लागतो तेव्हा ते वर्णन वाचणं असह्य होतं.
              ‎" _झाडे-झुडपे वाळून कोळ झाली. भुकेल्या मेंढरानी चगळ न चगळ वेचले.फुफाटा फार झाला. चक्रीवादळे होऊ लागली, विहिरिंचे पाणी आटले. वाडीचा हेळ आटला_ ." यासारखी दुष्काळाची वर्णने वाचत वाचत स्वतः आपण मूक होऊन जातो.
              ‎
   अन एकाच गोष्टीसाठी कादंबरी  प्रेरित करत राहते , " _तू पाण्याचा प्रत्येक थेंब वाचव","झाड लाव अन ते जगव"_
              ... *पलायन न करण्यासाठी.*

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************