विषय क्र. 2:- साहित्य: आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून जाणार आहोत?
अनिल गोडबोले.सोलापूर
मराठी मध्ये
ज्याला "वारसा" असा शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे की, मागच्या पिढीकढुन पुढीला मिळालेली देणगी.
सर्व बाबतीतच आपण
पुढे जे काही देणार आहोत त्यात चांगलं किती आणि वाईट किती याचा हिशोब करू नये इतकं
भयानक वास्तव समोर दिसत आहे. प्रदूषण, पर्यावरण ऱ्हास, कमी दर्जाचे जीवन
आणि समस्या तर आहेत. त्यावर उपाय योजना देखील आहेत.
पण साहित्य
निर्मिती बद्दल खरच चित्र समाधानी आहे का? यावर विचार करायला पाहिजे. साहित्य निर्मिती मध्ये आघाडीवर आहे... मराठीतील
कथा, ललित आणि औचित्यपूर्ण
लेख. काही केखक आहेत जे अतिशय ओघवत्या भाषेत लिहितात परंतु पु.ल. , किंवा व. पु. यांनी साधलेले प्रभाव आताच्या
लिखाणातून येताना दिसत नाही.
कविता आणि नाटकं
यांचा दर्जा वाढला पाहिजे नाहीतर या पुढच्यापिढी मध्ये स्तर अजूनच ढासळून जाईल.
साध्या सध्या वाक्या मधून अतिशय योग्य व अर्थपूर्ण शब्द रचना होताना दिसत नाहीत.
कादंबरी आणि
प्रेरणात्मक लेखन व त्याचा वाचकवर्ग एवढा
काही प्रभावित दिसत नाही. त्याचंच प्रतिबिंब म्हणजे आशय नसलेले चित्रपट. काही
चित्रपट, नाटक चांगली आहेत पण ती
नियमाला अपवाद असल्या सारखी वाटतात.
वाचक वर्ग,
प्रेक्षक कमी झाला आहे किंवा आपण जे देऊ,
लिहू, करू ते समाजात सहज ओढलं जाईल.. अस साहित्यकारांना वाटत असेल तर तो भ्रम आहे.
कॉमेडी शो ना
चलती आहे सध्या पण बाकीच्या मालिका, त्यातील पात्रे व कथानक या मध्ये कुठेही ताळमेळ दिसत नाही.
सर्व ठिकाणी
चित्र नकारात्मक नाही. पण ते अजून जास्त प्रमाणात आणि दर्जेदार साहित्य निर्मिती
मध्ये बदलले गेले पाहिजे.
अभिजात भाषेचा
दर्जा तर सोडा.. साधी भाषांतरित पुस्तके देखील न समजण्यासारखी असतात. त्या पेक्षा
मूळ भाषेतील पुस्तक जास्त समजतात.
आपण मराठी टिकवली पाहिजे, वाचवली पाहिजे,
नाहीतर पुढची पिढी दर्जेदार शिक्षण व मराठीतून
आनंद कसा घेतील?.. हा एक प्रश्नच
आहे.
अर्चना खंदारे,हिंगोली.
जन्माला आलेल्या
प्रत्येक व्यक्तीला समाजाचं देणं
असते.प्रत्येक व्यक्तीवर समाजाचं
ऋण असते आणि ते फेडायचं असेल तर साहित्य सारखी
दुसरी अनमोल वस्तू
नाही.आणि हि अनमोल वस्तू येणाऱ्या पिढीला
देणे चांगले व महत्वाचे आहे.
आज एकविसाव्या
शतकामध्ये आपण कित्येक पूर्वीच्या शतकाचा अभ्यास हा साहित्यामुळेच करू शकतो
आहे.तथागत गोतम बुद्ध यांचे विचार, संत कबीर, छत्रपती शिवाजी
महाराज यांची राजनीती,अनेक महान संत आणि शाश्त्रज्ञ इत्यादी
यांची ओळख हि आपल्या ला साहित्यामुळेच झाली आहे.या ( पूर्वीच्या ) पिढीने
अतिशय अनमोल अशी साहित्य नावाची रत्नाची
खान नंतर च्या पिढीसाठी सोडून
गेल्या मुळे च क्रांतीसूर्य आणि
क्रांतीजोति सावित्रीबाई जोतिबा फुले,राजर्षी साहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि
इत्यादी सारखे अनेक संत, कवी आणि
लेखक निर्माण झाले..
आणि आज आपली पिढी
या महान नायकांनी सोडून गेलेल्या साहित्याचा
आधार घेऊन आज समाजामध्ये पुढे जात
आहे .आणि याचा एक आदर्श आजच्या पिढीला घेणे
अतिशय महत्वाचे आणि काळाची गरज बनले
आहे..कारण आज ची पिढी हि तंत्रज्ञाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर
करीत आहे आणि लिखित साहित्याचा खूप
कमी वापर करीत आहे.त्यांना हे लिखित साहित्य वाचन रटाळवाणे वाटत आहे.त्यामुळे आज च्या या पिढीमध्ये
वाचनाची गोडी निर्माण करणे फार
गरजेचे आहे.
माझ्याच घरचा एक
किस्सा मला इथे सांगावासा वाटतो आहे.माझ्या मामा ची दोन मुले आहेत एक डि.फार्मसी प्रथम वर्षात
आहे,तर दुसरा मायक्रोबायोलॉजी ला आहे.दोन दिवस पूर्वीच सुट्टी आहे म्हणून घरी आले आहे.संध्याकाळी सर्वजण एकत्र
बसले असता,सहजपणे वाचनाचा विषय निघाला.मी सहज मामा ला विचारले कि,मामा तुम्ही मुलांना पुस्तक वाचन करू
नका असे सांगितले आहे का ? त्यावर मामा तर शांतच बसले.पण, माझ्या त्या दोन्हीही भावांनी मला सांगितल,ताईडे आम्ही
हातामध्ये पुस्तक घेतले नाही म्हणजे आम्ही वाचन केले नाही याचा अर्थ
असा होत नाही,तर आम्ही
आमच्या मोबाईल वर वाचन केले आहे असे त्यांनी सांगितले...
यावर मामाकडून
आणि माझ्याकडून त्यांना चांगलीच शाबासकी
मिळाली....
अशाप्रकारच्या घटना कित्येक घरामध्ये घडत
आहेत अस्या प्रसंगांना आळा
घालण्याचे काम आज च्या वडीलधाऱ्या व्यक्तीने
करणे गरजेचे आहे. साहित्याचा वारसा
पिढ्यानपिढ्या चालत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आणि प्रत्येक पिढीसाठी नाविन्यपूर्ण
साहित्य सोडून जाणे आणि त्या पिढी
चा कार्यकाळ जागरूक करून तो अजरामर ठेवणे होय..
विचार ग्रुप हा नवीन लेखक आणि कवी घडविण्याचा
नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच
अविरत प्रयत्न करीत आहे आणि या ग्रुप च्या माध्यमातून मी चांगले लिखाण करण्याचा
प्रयत्न करीत आहे..सर्वजण मिळून एक संकल्प
करूया येणाऱ्या नवीन पिढीसाठी
साहित्याची एक आगळीवेगळी भेट देऊन
जाऊया.....
संगीता देशमुख,वसमत
सगळ्याच बाबी
काळानुसार कूस बदलत असतात. साहित्यही याला अपवाद नाही. साहित्यात मधल्या काळात विद्रोही साहित्याने साहित्य
क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. पण आज उच्च शिक्षण घेऊनही विद्रोही
साहित्य हे अत्यल्प प्रमाणात निर्माण होत आहे. पूर्वीचे साहित्य हे त्या लेखकाची
स्वतंत्र ओळख असायची. एका साहित्यिकाची संकल्पना दुसऱ्यालेखकाच्या साहित्यात आढळत
नसे. परंतु आज सोशल मिडियामुळे
एकमेकांच्या संकल्पना तर सोडाच पण एकमेकांच्या चक्क साहित्याची चोरी होताना दिसते.
त्यामुळे साहित्याला हवी तशी धार प्राप्त होत नाही. जवळपास जास्तीत जास्त साहित्य
एकाच धाटणीचे दिसून येते. दोन चार शब्दांची जुळवाजुळव जमली तरी स्वतःला साहित्यिक,लेखक म्हणून मिरवून घेण्यात ही पिढी अव्वल आहे.
परंतु साहित्यातील नवरस,अलंकार,वृत्त,छंद असा अनमोल खजिना लुप्त होत आहे.
आज दिवसाकाठी शेकडो साहित्य प्रकाशित होत आहे. एक वर्षच काय पण काही महिन्यात
लिहायला सुरुवात करून स्वतःची पुस्तके बाजारात येत आहे. परंतु यात नवतरुणांचे होणारे पदार्पण नक्कीच आशादायी आहे. काहीवेळा अभिव्यक्ती
होणं हे महत्वाचं असतं त्यावेळी ते
नियमानीच बांधील असणं महत्वाचे नसते.
पण येणाऱ्या साहित्यिकानी आपली
अभिव्यक्ती जपतानाच त्याला काही साहित्यिक मूल्यही प्राप्त होते की नाही,याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजचे साहित्य
हे उद्याच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत असते. म्हणून उद्याच्या पिढीला कोणती दिशा
द्यायची,हे आजच्या साहित्यिकांनी
ठरवायला हवे.
किरण पवार,औरंगाबाद
सध्याच्या
तरूणाईच साहित्य केवळं आपल्याला येतयं; एवढच मर्यादित नजरेतून पाहणं असं झालयं. मुळात साहित्याचा दुरवर बऱ्याचदा
गंधही नसतो पण आपण टेंभा मात्रा अलगद लावून मिरवतो. साहित्याला अभिरूची असते,
वेगळेपणातून उठावदारतेचा रंग असतो, अतिविशेषणांची बऱ्याचदा कादंबऱ्यातून जोड असते.
मनातून भावलेलं न कल्पना करू शकलेलं जग उभं करण्याची ताकद ही साहित्यात असते.
साहित्याला बऱ्याचदा व्याकरणात अडकवण्याचे प्रयत्न सध्या होतात पण बहिणाबाई चौधरी
वा इतर लेखक घ्या त्यांनी जर कधी व्याकरणाचा विचार केला असता तर उत्कृष्ट कविता
तयार झाल्या असत्या का...? प्रत्येक
नवसाहित्यिक म्हणे, प्रेमापासून
प्रवासास सुरूवात करतो पण मुळात सुरूवात मध्यापर्यंत आली तरूणाईला प्रेमचं विषय
चघळायचा असतो. आज मराठी साहित्य सोडून इंग्रजी आणि हिंदी साहित्याचा जर विचार केला
तर महत्वाचं असतं "प्रेम". हमखास चेतन भगतचं कौशल्य अपार आहे पण दरवेळी
तो त्याचे उद्दिष्ट पोहोचवायला प्रेमाचा सहारा घेतो; याच कारण आपली प्रेमाप्रती असलेली अतिएकनिष्ठता. असे बरेच
लेखकांची उदाहरणे देता येतील. पण आज मुळात मराठी साहित्य महाराष्ट्रातला तरूण खरचं
किती उत्साहाणे वाचतो, हेदेखील विचारात
घेणे महत्वाचे आहे. उत्तम कांबळेंच्या मनाला छेदून जाणाऱ्या लेखातली ताकद इतर
कुठल्या गोष्टीत मिळते का...? साहित्य म्हणजे,
अवघड काहीतरी खूप विचाराअंती लिहलं असं नाही.
ते कागदावर योग्य स्वरूपात उतरलं जावं; हीच अपेक्षा असते.
महाराष्ट्रातील आपलीच तरूणाई आज इंग्लीश/हिंदी पुस्तके खरेदी करून आणि मराठी
पुस्तके पी.डी.एफमधे वाचतात. वर सार्थ अभिमानही असतो. पण मुळात मराठी साहित्यानं
जे "फिटे अंधाराचे जाळे", "नाच रे मोरा", "नटसम्राट",
अशा विविधांगी साहित्याची सरं येते का इतर
कुठे...? बऱ्याचवेळा साहित्यकार
साहित्य लिहताना अनुभवानचा, तत्कालीन
परिस्थितीचा, राजकीय
हालचालींचा अशा प्रत्येक सूक्ष्म बाबींचा विचार करतो. थोडक्यात साहित्य छोट्याला
रंगवून त्याची मैफील सजवून ते आपल्यापर्यंत पोहोचवतं. पण सध्या लिखाणात कुठेतरी ती
भावना हरवत चालली आहे ते केवळ स्ट्रेट फॉरवर्ड मानसिकता होत चालल्यामुळे. त्यामुळे
साहित्यात नेमका कोणता खास ठसा आपण पुढच्या पिढीसाठी सोडून जाणार हा खरचं एक मोठा
प्रश्नयं. मृत्यूंजयातलं वा युगंधरेतलं (युगंधरा- डॉ.सुमित्री क्षेत्रमाडे) पात्र
रंगवायला साहित्यकाराचं खर कसबचं लागतं.
राजश्री ठाकूर , मुंबई .
बुद्धी व मन
यांना चालना देऊन कृतीत परावर्तित होण्याची निकड भासाविणारे साहित्य म्हणजे
' साहित्य '
अशी साहित्याची सर्वसाधारण व्याख्या होऊ शकते.
अश्मयुगीन
गुंफेतील चित्रांपासून ते फेसबुक पोस्ट , स्टेटस अपडेट पर्यंत सगळ्याचा समावेश साहित्यात होऊ शकतो. आदिमानवाने फक्त साहित्यनिर्मिती कडे ध्यान
दिले .. पुढली पिढी , हस्तातंरीत करणे
वगैरे प्रकार नाही , जंगलातल्या
झऱ्यासारखे . त्या साहित्याला वहात रहाणे ठाऊक . प्राशन कुणी करेल अथवा नाही
याबद्दल सुतरामही चिंता न करणारे .
त्यापुढे लिपी
आली , समूहाने राहणारे आले
त्याबरोबर सहवासाने येणारी समूह निष्ठा आली , हावभावावरून एकमेकांना जोखणे आले म्हणून मग माझं ते चांगलं
हि भावना असलेली माणसे , उत्तम कृती
करण्यास माणसे कटिबद्ध होऊ लागली असतील . माझ्या उत्तम कृतीचा भावनिक लाभ माझ्या
समूहातील व्यक्तींना व्हावा असे प्रकर्षाने वाटू लागले असेल , कधीतरी दोन समुहांच्या आदान प्रदानात स्पर्धेचा
उगम झालेत आणि झऱ्याचे , ' माठ ' झाले .
हे असे झाले हे
आजच्या पिढीतल्या आपल्याला कसे बरे कळले ? आजवरच्या साहित्यावरून .
मौखिक , भिंत , जमीन , भूर्जपत्रे , कागद ते स्क्रीन
आणि पुढे कदाचित स्क्रीनलेस अशा वाहनाने त्या त्या काळातील साहित्याच्या भोयांनी
हे आनंदाने वाहून आज आपल्या कराग्रांवर आणून दिले आहे . त्याबद्दल त्या अनंत
वाहकांना आदर व कृतज्ञता .
याच पालखीचा
पुढला मार्ग पाऊलभारासाठी आपल्या स्कंधांवर आहे , काय हस्तांतरित करू आपण
पुढल्या पिढीला ?
रद्दी की संपदा ?
माहिती की ज्ञान ? जाळे की सोपान ? अंधार की कवडसे ?
मला वाटतं आपण
पुढल्या पिढीला साहित्यातून निवडण्याचे स्वातंत्र्य देणार आहोत . आपण नसतांनाही
सांगणार आहोत त्यांना .. ' विपुल आहे ,
आपल्या कलाने वेचा ' हे महान , हे निषिद्ध अशी
कुठलीच लेबलं न लावता मोठ्ठ्या लायब्ररीज
तुमच्या अंगुळीवर आहेत , नजरेच्या कक्षात ,
तिथून मेंदूमध्ये काय रुजवावे हे ठरवा .
' आहे ' ' मला मिळू शकत '
हा दिलासा आपण देतोय पुढल्या पिढीला . त्यात
आपली जी काही गंगाजळी आहे ती ओतुया .. हि दिंडी जल्लोषात निघू दे , काळाची आणि पिढ्यांच्या कौतुकाची तमा न बाळगता
..
दत्तात्रय
विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
विषयाला हात
घालताना डोक्यात विचार होता तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या पिढीसाठी काय दिले
तर त्यामध्ये बरंच काही आहे संस्कृती, तंत्रज्ञान, साहित्य ई.
असो आता वेळ येते
ती आपल्या येणाऱ्या पिढीला अपल्याकडून काय अपेक्षित असेल त्याची. तर मला वाटते जस
आपण आजवर जे काही वाचून विचार करण्याची क्षमता मिळवली हे असाच काहीसं साहित्य
येणाऱ्या पिढीला द्यायला हवं कारण याच्या बळावरच उद्याचा सामाज टिकणार की तुटनार
हेही अवलंबून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा