पाणी व दुष्काळ निवारणासाठी लोकसहभागाची गरज


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

     आपण शाळेत असतांना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या गुरुजनांनी हा प्रश्न विचारला होता तो म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? तर  त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा ...असो आता त्यात आणखी बदल करावासा वाटतो तो म्हणजे अन्नपाणी आणि उर्वरित दोन.

    आपल्याकडे एक म्हण प्रसिध्द आहे  ती कोणती तर " तिसरे महायुद्ध पाण्यासाठी लढले जाईल " ही तर खरी वाटते कारण आपल्याकडे याची सर्रास गावकडली उदाहरणे देता येतील...तीच स्थिती राज्ये, देश आणि पुढे जाऊन जगाची अस सर्व चित्र आहे.

    हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे कारण हा थेट माणसाच्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला अर्थ प्राप्त होतो तो " पाणी हेच जीवन आहे " या म्हणीनुसार.

    आज मागील काही दशकांपासून आपल्याकडे या पाण्याने आग लावली आहे मुळात पाणी आग विझवण्याचं काम करत पण त्याच उलट होऊन बसलं आहे कारण आहे आपल्याकडील सरकारी धोरण
1. पाणी आडवा पाणी जिरवा चं झालं पैसा जिरवा.
2. जलस्वराज्य चं झालं दुष्काळराज्य.
आणि आताच
3. जलयुक्त शिवार
या योजनेत खरा लोकसहभाग कधीच न लाभल्याने ह्या योजना पाहिजे तेवढ्या कमाल नाही दाखवू शकल्या आणि दुष्काळ हा सतत येत आहे आणि तो भविष्यात कमी होण्याची शाश्वती नाही.

    आपल्याकडे पाणी फौंडेशन ने गावं जलमय करण्याचं एक अनोखा कार्यक्रम आणला आणि तो लोकांच्या सहभागाने चालवण्याचा निर्णय एक चळवळ बनून गेला आहे आणि या चळवळीने वेगळाच इतिहास घडवला आहे आणि पुढेही घडवेल कारण या चळवळीला खरा लोकांचा पाठिंबा लाभला आहे आणि त्याला बळकटी मिळते जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना " वाटरकप " देण्याला आमंत्रित केले जाते.
 
शेवटी,
झाडे लावा, झाडे जगवा।
नंतरच आनंदाने फळं खावा।।
तसच
पाणी आडवा , पाणी जिरवा।
नंतरच मिशीला पीळ देऊन मिरवा।।
======================

वाल्मीक फड, नाशिक.

            दुष्काळ हि एक नियमीत येणारी समस्या बनली आहे.शहर वगळता ग्रामीण भागात ह्या दुष्काळी परीस्थीतीने थैमान घातले आहे.सर्वात मोठा तडाखा शेतकरी वर्गाला बसला आहे कुठे चारा नाही कुठे पाणी नाही जनावरे पाळावी की,सोडून द्यावे अशी परीस्थीती शैतकर्यांची झाली आहे.
दुष्काळ निवारण्यासाठी अनेक ऊपाय करता येऊ शकतील.तसं जर पाहीलं तर सरकारची माणसिकता असेल तर यावर एक रामबाण उपाय आहे तो सरकारच्या मदतीने केला गेला तर माझ्या मते दुष्काळ हा शब्द सुद्धा शेतकर्याँना जुना वाटल्याशिवाय रहाणार नाही.
बघा आज आपल्या कोकणात भरपूर पाऊस पडतो मोठमोठे पूर येतात म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी समुद्राला जाऊन मिळते तर ते पाणी आपण धरणांची मर्यादा वाढवून म्हणा किंवा आणखी धरणे वाढऊन पाण्याचा साठा वाढवला पाहीजे.
वाढलेल्या साठ्यातून सरकारने हे अनुदान ते अनुदान देण्यापेक्षा जे शेतकर्याँना जाहीर करून कधीही मिळत नाही ते जाहीर करायचा कार्यक्रम सोडून जिथे पाणी ऊपलब्ध असेल त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी पाणी नसेल तेथे मोठाल्या पाईप लाईन टाकून दुष्काळी भागातील जे छोटे छोटे बंधारे आहेत त्यामध्ये सोडले तर कोठेही विहीरी कोरड्या पडणार नाही पर्यायाने शेतकरी व ग्रामीण भागात दुष्काळ आठवणार नाही.
पाण्याचे योग्य नियोजन केले गेले पाहीजे.पाणी वापर करताना पाणी विनाकारण वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहीजे.
खरोखर जर शेतकरी व ग्रामीण भागात दुष्काळी भागात हा ञास होऊ नये असे जर प्रामाणिक मत असेल तर जो ऊपाय मी वर सांगितला आहे तो जर केला तर कायम दुष्काळी परीस्थीती दुर होऊन जाईल.पाणी पोहोचल्यामुळे झाडे वाढतील सगळीकडे हिरवेगार होईल पर्यायाने पाऊस पडेल म्हणजेच दुष्कळाचे निवारण झाल्याशिवाय रहाणार नाही.
====================

अर्चना खंदारे, हिंगोली.

           पाणी  हे जीवन आहे 'आणि जीवन किती अनमोल आहे हे हि आपल्याला माहित आहे. तरी हि आपण पाण्याचा  अपव्यव करतो. याचा अर्थ असा होतो  कि आपण आपलेच  जीवन अपव्यव करीत आहोत. हे लक्ष्यात  घ्यायला  पाहिजे ....

          आता चांगलाच  उन्हाळा  सुरु झालेला  आहे .म्हणजे सर्वांपुढे  पाणी समस्या  हा गंभीर  प्रश्न सुरु झाला आहे. मग आपलं सुरु होते, ' तहान लागली कि, विहीर खोदायची '!!!हा प्रश्न  आपल्याला पावसाळा किंवा हिवाळ्यात  का पडत नाही. तर त्याचे  कारण असे कि त्या ऋतूमध्ये पाणी आपल्याला जास्त प्रमाणात मिळते म्हणून आपण त्याची  किंमत  करत नाही. पाणी वाचवण्याचे  विविध उपक्रम आपण राबवत  नाही. त्याचा योग्य वापर करत नाही..या मध्ये शासनाच्या  योजना  हि काही अशाच  प्रमाणात राबविल्या जातात.. म्हणजे शासनाने योजना  राबविली  का ? तर हो..त्या योजने  मध्ये काम करणाऱ्या लोकांना रोजगार  मिळाला  का ? तर हो..पण जे काम पूर्ण करायचे होते ते चांगले किंवा योग्य झाले का ? त्याचा पत्ता  नाही..
       
               असो, सर्वतः हा दोष  शासनाला  देऊन काही उपयोग  नाही, सर्वात  मोठी चूक  तर आपलीच आहे म्हणजे ज्या योजनेत  किंवा योजनेसाठी  आपण काम करतो ते चांगल्या  प्रकारे राबवून घेणे हे आपलेच काम आहे..
 

               पाणी व दुष्काळ  निवारण्याचा  महत्वाचा मुद्दा असा कि, काही गावा मध्ये सार्वजनिक  पाण्याची  टाकी  असते व त्यातून संपूर्ण गावाला नळा च्या माध्यमातून पाणी पुरविल्या जाते. गावामध्ये  काही छोटी  तर काही मोठी कुटुंबे असतात.त्या कुटुंबांना  वेळ  ठरवून म्हणजेच एक किंवा दोन तास अस्यया प्रमाणे सारखेच पाणी पुरविल्या जाते. अस्या वेळी काय होते, छोट्या आणि मोठ्या कुटुंबाला सारखंच पाणी दिल्या  जाते, तर प्रत्यक्षात  छोट्या कुटुंबाला जास्त गरज नसतानाही  ते कुटुंब पाण्याचा अपव्यव करते.कारण त्या कुटुंबाला वाटते, पाणी आहे कुणाचं  शासनाच्या टाकीच  वाया  गेलं  तर गेलं...
पण ते कुटुंब हा विचार करत नाही.कि, आपल्याला आज गरज  आहे तेवढेच  पाणी आपल्या वापरात  आणले  तर उद्या  तेच  पाणी आपल्या व सर्वांच्या उपयोगाला येईल.गरज आहे तेवढेच पाणी प्रत्येकाने  वापरले  तर पाणी हि समस्या काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होईल. माझ्या तरी मते, हा एक प्रकारचा  लोकसहभाग  होऊ शकतो असे म्हणता येईल..
मला तरी वाटते, पाणी व दुष्काळ  निवारणासाठी  चा लोकसहभाग हा पावसाळ्यातच  राबविला  तर आपल्याला पाणी समस्या वाटणार  नाही.
धन्यवाद.
===================
     
मुकुंद शिंदे.
         
     पानी प्रश्न म्हणाला की दुष्काळ डोळ्यासमोर येतो पण हाच प्रश्न घेऊन सत्यमेव जयते शो झाला होता,अमीर खान आणि टीम ने ठरवलं की नुसतं प्रश्न मांडून उपयोग नाही तर त्या वर उपाय शोधला पाहिजे
:- यावर उपाय म्हणून पानी फौंडेशन ची स्थापना झाली आणि  लोकसहभागातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत किती तरी गावे दुष्काळमुक्त झाली आणि त्या गावांच्या वरचा कलंक पुसला.पण हा कलंक पुसन गेल्या 70 वर्षांमध्ये का जमलं नाही तर त्यामागे कारण होत लोकसहभाग पण या स्पर्धे मध्ये गावांनी लोकसहभागातून काम केलं आणि पानी प्रश्न मिटला.
आता आपला विचार विनिमय झालाच पाहिजे पण त्याबरोबर कृती ही झाली पाहिजे असं वाटतंय.कारण पेपर मध्ये किंवा बातम्यांच्या मध्ये पाण्यामुळे एवढे मृत्य वैगेरे बातम्या वाचताना हळहळतो आणि थांबतो पण तेच आता बदललं पाहिजे आणि आपण यामध्ये उतरलं पाहिजे
"य क्रियावान स पंडितः"
==================

संगीता देशमुख,वसमत.
     
       पाणी हे जीवन आहे. पण आज हेच जीवन हळूहळू लोप पावत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. पर्यावरणाचे असंतुलन,प्रचंड वृक्षतोड,दिवसेंदिवस पावसाळ्यात  पावसाचे कमी होणारे प्रमाण,झपाट्याने वाढती लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येचा पाण्याचा प्रचंड वापर. यांत्रिकीकरणामुळेही घरात,सार्वजनिक ठिकाणी,कारखाने येथे  पाण्याचा वापर प्रचंड वाढलेला आहे. हा पाण्याचा वाढता वापर ही खरेतर काळाची अनिवार्य गरज बनली किंबहुना ती मानवाने बनविली. अशा परिस्थितीत पाण्याचा वापर कमी होणार नाही आणि जमिनीच्या पोटातले पाणीही आपण वाढवू शकणार नाही. म्हणून आहे त्या उपलब्ध पाण्यात आज आपल्या गरजा भागवणे गरजेचे झाले आहे.  पाण्याच्या वाढत्या दुष्काळाला समर्थपणे  तोंड देणे आवश्यक आहे. यासाठी गरज आहे ती  सर्वप्रथम लोकांमध्ये जलसाक्षरता आणण्याची. लोकांना घरापासून पाण्याचा वापर कमी करून,जिथे शक्य आहे तिथे पाण्याचा पुनर्वापर करणे,पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे याबाबतीत जागरूक करणे आवश्यक आहे.  आज गावोगावी पाण्याचा एवढा दुष्काळ आहे की,तिसरे महायुद्ध पाण्यावरून होऊन की काय अशी भीती वाटायला लागली. आणि पाण्याहून शेजाऱ्याशेजाऱ्यात झालेले खून मी स्वतः पाहिलेले आहेत. यासाठी पाणी नैसर्गिक संपत्ती आहे,ती आपण तयार करू शकणार नाही त्यामुळे लोकांचाच सहभाग घेऊन पाण्याचे महत्व लोकांना समजून सांगावे लागेल. जोवर पाण्याच्या वापरात,त्याच्या व्यवस्थापनात लोकांचा सहभाग वाढणार नाही तोवर आपण दुष्काळाचा सामना करू शकणार नाही. अण्णा हजारे,पोपटराव पवार,कांतराव झरीकर,दीपक नागरगोजे यांनी लोकसहभाग घेऊनच अत्यंत दुष्काळग्रस्त भागात आज पाण्याचा सुकाळ निर्माण केला आहे. गावे समृद्ध केली आहेत.
=====================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************